शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंकर म्हणजे नोकर, दास

मुस्लिम 'हेडस्कार्फ' ला मराठीत काय म्हणतात???

हिजाफ..

मराठीत हिजाफ म्हणतात्??????दुसरा सर्वांना समजेल असा शब्द आहे का???

मराठीत नाही.. बहुतेक सगळ्यांच भाषांत हाच शब्द आहे. इस्लामशी निगडीत सर्व मराठी पुस्तकांत हाच शब्द वापरला आहे.

आणि फिरोझ/प्रतिभा रानडे, निळू दामले यांच्या पुस्तकांत 'हिझाफ' असं असलं तरी मूळ शब्द 'हिजाब' असा आहे.

'बुरखा' म्हणजे काय मग?

माझ्या माहितीनुसार हिजाब चा अगदी शब्दशः अर्थ पडदा / आवरण असा आहे, आणि बुरखा (खरंतर बुरका - का ला नुक्ता देऊन)चा अर्थ veil किंवा headscarf. पण बुरखा शब्द बरेचदा पूर्ण अंग आणि डोके झाकणार्‍या परिधानासाठी वापरलेला पाहिला आहे. चुभूद्याघ्या.

स्वातीचं बरोबर आहे.
पण headscarf या अर्थी हिजाब हा शब्द वापरला जातो.
हिजाब म्हणजे to dress modestly. आणि हिजाबमध्ये चेहरा व हात झाकले जात नाहीत. म्हणून headscarf ला हिजाब म्हणतात.

यःकश्चित या शब्दाचा अर्थ काय????

यःकश्चित म्हणजे अतिशय क्षुल्लक, काहीच महत्त्व नसलेला

अच्छा अच्छा.धन्यवाद

कःपदार्थ असाही एक शब्द आहे ना.. त्याचा अर्थ काय होतो?

माझ्यामते यःकश्चित आणि कःपदार्थ - दोन्ही समानार्थी शब्द आहेत.

खुतनी/खुतणी - अर्ध सुती, अर्ध रेशमी असं (चट्टेरीपट्टेरी) कापड

वैयक्तिक आणि व्यक्तिगत या शब्दांमधे काय फरक आहे??कधी वैयक्तिक वापराव आणि कधी व्यक्तिगत वापराव???

मातॄका म्हणजे काय? पु शि रेगेंची कादम्बरी आहे या नावाची.

चिन्या - थोडा गोंधळात पडलो पण शेवटी वैयक्तिक = व्यक्तिगत या निष्कर्षाप्रत आलो.

कौस्तुभ्,या दोन शब्द्दंचा परिस्थितीनुसार बदलायचा असतो का नाही???

चिन्या - मला नाही वाटत. किंवा अधिक अचूक सांगायचं तर सध्या तरी मला अशा परिस्थितीची कल्पना करता येत नाहीय जिथे हे दोन शब्द सर्वार्थाने वेगळ्या अर्थच्छटा दाखवतील.

ह्म्म्म... हा खरंच विचारात टाकणारा प्रश्न आहे. एकाचा अर्थ 'खाजगी' आणि एकाचा अर्थ 'व्यक्तीप्रमाणे बदलणारा/री/रे' असा फरक वाटतोय का ? उदा. 'तू दारु पितोस' ही तुझी व्यक्तीगत बाब आहे, 'दारु पिणे चूक की बरोबर' हा प्रश्न वैयक्तीक आहे.

  ***
  माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
  एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि

  slarti - पटतंय पण तरिही - 'तू दारु पितोस' ही तुझी व्यक्तीगत बाब आहे हेच उदा. 'तू दारु पितोस' ही तुझी वैयक्तिक बाब आहे असंही म्हणता येईल. "खाजगी"मध्ये काहीतरी लपवालपवी अंतर्भूत आहे. उदा. व्यक्तिगत पातळीवरुन लिहिलेली पत्रे आणि खाजगी पत्रे - दोन्ही वेगळी आहेत.

  व्यक्तीगत Individualistic हे तर वैयक्तीक private वाटते.

  माझ्यामते हे २ प्रकार-
  १)राज आणि उध्दवच भांडण हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे
  २)राजने हिंदुत्व करावे हे माझे वैयक्तिक मत आहे.

  यात अदलाबदल होउ शकते का???माझ्यामते नाही .पण कधी होते आणि कधी नाही??

  asami - माझ्या मते व्यक्तिगत = वैयक्तिक = Personal. Individualistic = फारतर व्यक्तिवादी (समाजवादीच्या विरुद्ध) किंवा "स्वतःपुरता". Private म्हणजे फक्त खाजगी.
  chinya - मला वाटते अदलाबदल होऊ शकते. " राज आणि उध्दवचं भांडण हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे" आणि "राजने हिंदुत्व करावे हे माझे व्यक्तिगत मत आहे." - मला काही फरक वाटत नाही.

  मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्याबद्दल काही विधानं करत आहे, तेव्हा 'वैयक्तिक' वापरावं आणि जेव्हा मी कोणा दुसर्‍याबद्दल विधान करत आहे तेव्हा 'व्यक्तिगत' वापरावं. इथे 'मी' म्हणजे प्रथमपुरुष.
  उदा. २ मित्रांमधला संवादः
  मि.१: तू दारू का पीतोस? दारू वाईट, स्वत:चं असं वाटोळं करू नकोस..
  मि.२: मी दारू प्यायची की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू कोण विचारणारा? तुझी दारूबद्दलची व्यक्तिगत मतं तू तुझ्यापाशी ठेव.
  .
  पटतंय का? Uhoh
  ------------------------------
  झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
  Proud

  पाडगावकरांचा एक कविता संग्रह आहे 'जिप्सी' नावाचा. त्यातली पहीली कविता ह्याच नावाची आहे. मला वाटतं तिची पहीली ओळ 'प्रत्येकाच्या मनात खोल दडली असते एक जिप्सी' अशी काहीशी आहे. तर ह्या 'जिप्सी' चा नक्की अर्थ काय होतो?

  Pages