शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटले सिलना म्हणजे शिवुन टाकणे अशा अर्थी असावा. पण पुस्तकातला शब्द सील आहे.

फार्सी का बरे ?

विमनस्क, अन्यमनस्क, शुन्यमनस्क, छिन्नमनस्क.
यांच्या अर्थांमधला फारक माहिती असल्यास कृपया सांगा.
बाकी आधीची चर्चा चालू द्या.

विश्रब्ध या शब्दाचा काय अर्थ होतो?

विश्वासू, शांत, स्थिर, निर्भय असे वेगवेगळे अर्थ होतात.

  ***
  ...s a Moebius signature. This is a Moebius signature. Th...

  विश्रब्ध - चा अर्थ विखुरलेला/ली असा होतो ना? जुन्या हितगुज वर चर्चा झाली होती विश्रब्ध शारदा पुस्तकाच्या नावावर.
  रापचिक चा नेमका अर्थ अन व्युत्पत्ती माहित आहे का कोणाला ?

  माझ्यामते रापचिक/राबचिक हा शब्द केवळ निर्माण होणार्‍या ध्वनीमुळे अर्थ प्रसृत करणार्‍या शब्दांपैकी एक आहे.. ह्याला बहुधा अभिधाशक्ति असे म्हणतात (चु.भु.दे.घे.). रापचिक (माल) असे म्हटल्यावर डोळ्यासमोर एक आकृतीबंध तयार होतो (माझ्यातरी).. लहानपणी प्रत्येक शिवीला माझ्या डोक्यात एक आकार दिला गेला होता. का ते माहिती नाही.

  विश्रब्ध हा शब्द ग्रेसच्या कुठल्या कवितेमध्ये पण आहे का?

  [१] अनाहत ह्या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे?
  [२] 'फ्रॉम दि हॉर्सेस माऊथ' असे नेहमी म्हटले जाते. हॉर्स च का? ईतर प्राणी का नाही? हा वाक्प्रचार कसा प्रचलीत झाला?

  -बापू करन्दिकर.

  From the horse's mouth ची वुत्पत्ती मला वाचलेले आठवते त्याप्रमाणे रेसिंग मधून आली. racing च्या ज्या tips horse handlers कडून येतील त्या बाकीच्या punters पेक्षा जास्ती reliable असणार. त्यापेक्षा अधिक खात्रीदायक माहिती फक्त घोडाच देउ शकतो अशा अर्थाने हि phrase आली.

  पकुर्डे म्हणजे काय? लहान पाखरं का?

  आहत याचा अर्थ आघात होणे. आहत नसलेला तो अनाहत.
  अनाहत हा शब्द नाद किंवा स्वर यांबाबतीत वापरला जातो. आपण जे शब्द उच्चारतो ते शरीराच्या आत आठ ठिकाणी आघात होऊन बाहेर पडतात. (दात, ओठ, तालू वगैरे) हे कुठलेही आघात न होता जो स्वर किंवा नाद उमटू शकतो त्याला अनाहत नाद म्हणतात.

  खालील पैकी कुठला शब्द जास्त बरोबर आहे, व्याकरणच्या दृष्टीकोनातून?
  १)तज्ज्ञ
  २) तज्ञ

  गजानन, इतकं संक्षिप्त नाही कळलं .. पण धन्यवाद.

  खालिल वाक्यात 'थोडाच', 'थोडीच' चा नेमका अर्थ काय घ्यावा?
  १) तो थोडाच तुला नाही म्हणेल.
  २) ती थोडीच तुला नाही म्हणेल.

  मराठीत, थोडक्यात, थोडासा या शब्दांचा अर्थ 'कमीतकमी' असा होतो. पण वरील दोन व्याक्याला तो लागू पडत नाही.

  मला वाटते अशि वाक्यरचना हिंदिच्या प्रभावामुळे होते. जस मराठितुन विचार करणारे थंडि वाजते च भाषांतर थंडि बज रहि है करतात तसच हिंदितुन विचार करणारे वो मना थोडि करेगा ह्याच मराठित अस शब्दशः भाषांतर करेल. विदर्भातले लोक वगळता मी अशि वाक्यरचना इतर कुठल्याहि मराठि बोलणार्या लोकांकडुन ऐकलि नाहि. मध्यप्रदेश आणि विदर्भ ह्यांच्या भौगोलिक जवळिकि मुळे हे झाल असाव.

  'विचक्षणा' ह्या शब्दाचा अर्थ काय आहे?

  नाही मराठमोळी, पुणे मुंबई आणि समस्त महाराष्ट्रातच 'मी थोडीच.. तू थोडीच' अशी भाषा बोलतात. कालच मी पार्ल्याच्या बीबीवर अर्चनी लिहिलेले हे वाक्य वाचले. पुर्वी मलाही तसेच वाटायचे की फक्त आम्ही वर्‍हाडीच फक्त असे बोलतो पण नाही इतरत्र देखील अशी भाषा बोलतात.

  बी आम्हि वर्‍हाडी नाहि आपण वर्‍हाडी Happy मी अगदि पक्कि नागपुरकरिण आहे.

  मायबोलिवर अस्सल वर्‍हाडी मला भेटलेच नाही अजून.. सर्व वर्‍हाडी कसे पुणे मुंबई करांसारखेच वाटतातं Happy

  क्ष शब्दार्थासाठि धन्यवाद!

  बी, खरे वर्‍हाडि म्हणजे नक्क्कि काय? जन्मापासुन पुढचे २२/२३ वर्ष वास्तव्य हा क्रायटेरिया चालत नाहि का? :).

  अनर्गल या शब्दाचा अर्थ काय???

  ज्ञानेश्वरांच्या 'विश्वाचे आर्त माझ्या मनीं प्रकाशले' या अभंगातील खालील वाक्याचा काय अर्थ आहे?

  आवडीचे वालभ माझेनि कोंदाटले

  आवडीचे वालभ माझेंनि कोंदटले।
  ज्ञानदेवांना अनेक जण ज्ञानी, योगी म्हणून संबोधतात. पण भक्तिची परिसीमा काय असते हे ज्ञानदेवांनी अशा अभंगांमधून दाखवले आहे. वालभ म्हणजे प्रेम. आणि माऊली म्हणतात तेही "आवडीचे" प्रेम आहे. म्हणजे ज्या प्रेमाबद्दल प्रेम वाटते ते हे प्रेम, तो हा विठ्ठल माझ्या ठायी कोंदटला आहे, भरून राहिला आहे. विठ्ठल हा प्रेमळ नसून तो निव्वळ प्रेमस्वरूप आहे हे ज्ञानदेवांना इथे म्हणायचे आहे. आणि असा हा विठ्ठल माझ्या अंगांगात भरून राहीला आहे, अशी तिळमात्रही जागा नाही जिथे तो नाही..
  एका वाक्यांत खूप काही सांगून जाण्याची ज्ञानदेवांची खासियतच आहे म्हणा.. असो.

  >>क्ष, मग त्या 'हास्य' चा संदर्भ कसा लावायचा ?

  घटो हास्योत्कच इति माता तं प्रत्यभाषत । अब्रवीत्तेन नामास्य घटोत्कच इति स्म ह ॥

  ह्याची फोड खालीलप्रकारे करता येईल.

  घटो हास्य उत्कच इति माता तं प्रत्यभाषत.
  तेन अब्रवीत अस्य नाम घटोत्कच इति स्मः

  मग ह्यावरून असामीने सांगितलेला अर्थ बरोबर वाटतो.

  >मग ह्यावरून असामीने सांगितलेला अर्थ बरोबर वाटतो.
  >>घटोत्कच जन्माला आला तेंव्हा त्याच्या हसण्याचा आवाज मडक्यामधे बोलल्यासारखा/हसल्यासारखा होता म्हणून ते नाव - इति असामी

  मग "उत्कच" चा काय संबंध लावणार?

  काय हे स्लार्ती.. मूळ श्लोक असा आहे..

  घटभासोत्कच इति मातरं सोऽभ्यभाषत । अभवत्तेन नामास्य घटोत्कच इति स्म ह ॥

  खंडकाव्य आणि महाकाव्य ह्यात फरक काय आहे?

  मी आभारी आहे.

  घररिघी या शब्दाचा अर्थ काय आहे?

  पहा:
  "घररिघी झाले पट्टराणी बळे..वरीले सावळे परब्रम्ह"

  घररिघी - घरात बळजबरीने प्रवेश करुन.

  "मी (परपुरुषाच्या) घरात बळजबरीने प्रवेश करून त्याची पट्टराणी झाले आहे. त्या सावळया परब्रह्माला मी वरिले आहे."

  Pages