Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
ह्म्म्म....
ह्म्म्म.... कदाचित फरक वाटणे वा न वाटणे हे वैयक्तीक आहे (की व्यक्तीगत ?). हे रोचक आहे.
बी, जिप्सी म्हणजे भटके. जसे आपल्या इथले बंजारा, लमाण इ. हे वाच http://en.wikipedia.org/wiki/Gypsy
***
माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि
अगदी
अगदी तांत्रिक फरक करायचा झालाच तर -
व्यक्ति पासून वैयक्तिक (जसं मुख पासून मौखिक आणि व्य च वैय होऊन - व्याकरण पासून वैयाकरणी) - म्हणजे व्यक्तिचं, व्यक्तिपासून, व्यक्तितून इ.
व्यक्तिगत - "-गत" प्रत्यय म्हणजे आतील, आत गेलेलं जसं की अंतर् - गत (अंतर्गत), हस्तगत. यानुसार व्यक्तिगत म्हणजे व्यक्तिच्या आतील
म्हणजे तांत्रिक दॄष्ट्या वैयक्तिक मालमत्ता होईल पण व्यक्तिगत मालमत्ता नाही. मात्र बोलीभाषेत या सीमारेषा पुसट असतात किंवा पूर्ण अनुपस्थितही असू शकतात. आणि त्यात काही विशेष गैर नव्हे.
पीएसजीच
पीएसजीच मतही मला बरोबर वाटतय. कौस्तुभच शेवटच मतही बरोबर वाटतय
जीएंचे
जीएंचे 'माणसे : अरभाट आणि चिल्लर' हे जे पुस्तक आहे त्यात अरभाट या शब्दाचा नक्की अर्थ काय ? (थोडक्यात, माझ्या आयडीचा अर्थ समजावून कसा सांगायचा ? :))
अरभाट आणि
अरभाट आणि चिल्लार मध्येच अरभाटचा अर्थ स्पष्ट करुन सांगितला आहे जीएंनी..
आणि माझ्या माहितीप्रमाणे ते चिल्लार आहे, चिल्लर नाही (चूभूद्याघ्या)..
माझ्या अल्पमतीनुसार अरभाट म्हणजे काय ते सांगतो.. अरभाट म्हणजे काहीतरी भन्नाट, अतरंगी.. जसे दातार मास्तर एकदाच सिक्स मारतात किंवा पायथागोरसचा झळाळता त्रिकोण ह्या गोष्टी माझ्यासाठी अरभाट आहेत
अतरंगी
अतरंगी
धन्यवाद टण्या. पुस्तक वाचुन खूपच दिवस झालेत त्यामुळे लक्षात नाही. मुलखावेगळा ? विचित्र ?
वैयक्तिक
वैयक्तिक वर्सेस व्यक्तिगत

.
एकवचनी उल्लेखासाठी "वैयक्तिक" वापरणे सयुक्तिक ठरते, तर
अनेकवचनी समुहाच्या उल्लेखावेळेस "व्यक्तिगत" योग्य ठरते!
चु.भु.द्या.घ्या.
...;
आपला, लिम्बुटिम्बु
विदर्भात
विदर्भात 'अरबट चरबट' असाही एक शब्द आहे. हा आरभट बहुतेक अरबटशी निगडीत असावा.
शक्,हुण्,कु
शक्,हुण्,कुशाण यांना इंग्रजीत काय म्हणतात्???मंगोलिअन्सना मराठीत काय म्हणतात???
शक, हुण,
शक, हुण, कुशाण यांना इंग्रजीतही हेच शब्द आहेत.
Hun, Kushan इ.
मंगोल असा शब्द आहे मंगोलियन्ससाठी. या मंगोलचा अपभ्रंश मुगल असा आहे.
म्हणजे
म्हणजे मंगोल आणि मुघल एकच का???
नाही
नाही चिन्या.
मंगोल हा वंश आहे. चेंगीझ खान हा मंगोल होता.
पण १५०० च्या आसपास आलेल्या आक्रमकांना आपण मुघल म्हणतो. तो अपभ्रंश असु शकतो कदाचित पण अर्थ आता तो राहीला नाही कारण मंगोल वेगळे व मुघल वेगळे.
चेंगीझ खान
चेंगीझ खान हा मंगोल होता. त्याचा नातू हुलागू खान . त्याने १३व्या शतकाच्या मध्यावर मध्य-पूर्व आशियावर आक्रमण केले. मंगोल वंशाची काही मंडळी त्यामुळे पर्शिया-तुर्कस्तानात स्थायिक झाली.
या मंडळींत प्रमुख होती बारलास नावाची जमात. चंगिझ खानचे हे वारस होते. तैमुरलंगसुद्धा यांच्यापैकीच.
तैमुरमुळे 'तिमुरीड' हा वंश सुरू झाला, आणि बाबर हा या तिमुरीड वंशातील. बाबरचे वडिलांकडून तैमुरशी आणि आईकडून चेंगिझ खानशी नाते होते.
ही मंगोल जमात पर्शिया-तुर्कस्तानात स्थायिक झाली, आणि त्यांच्या संस्कृतीत सामावून गेली. त्यांनी इस्लाम स्वीकारला. त्यांची भाषासुद्धा मंगोल, तुर्की, फारसी भाषेचे मिश्रण होती.
मंगोल या शब्दाचा अपभ्रंश मुगल. संस्कृती बदलली तरी मुगल मंडळी मुळची मंगोल वंशाचीच होती.
या मुगलवरूनच इंग्रजीत 'mogul' हा शब्द आला आहे.
चिनुक्स
चिनुक्स बरोबर. तु कुंडलीच मांडलीस.
मी २५०-३०० वर्षांच्या संस्कॄती बदलामूळेच ( १२५० ते १५००, शिवाय १५०० नंतरही वेगळीच संस्कृती) ते वेगळे आहेत असे लिहीले. मुगल हा शब्दही कदाचित फार नंतर आला असावा. जसे की १६ व्या शतकात. तो पहिले कधी वापरला गेला हे तुला माहीती आहे का?
मंगोल
मंगोल साम्राज्याच्या चीन, मंगोलिया या भागाला मुघलीस्तान म्हटले जात असे. हा पर्शियन शब्द १३व्या शतकात प्रचलित झाला.
'मुघल' हा शब्दही तेव्हाचाच.
संदर्भः encyclopedias of civilisations.
छान माहीती
छान माहीती दिलित.
महाल या शब्दाचे मुळ काय आहे??
मदत ह्या
मदत ह्या शब्दाचा उगम कोणता ? मराठीत हा शब्द कसा काय ?
क्रोर्य ह्या शब्दाचा उगम कोणता ? संस्क्रुतमधुन क्रु धातु पासुन ह्याची उत्पत्ती आहे पण पुढे .... ?
seaman ला
seaman ला नाविक सोडुन अजुन कुठला शब्द आहे???
disturbed age चे भाषांतर काय होईल??
kindling a zeal चे भाषांतर काय??
halo ला काय म्हणतात??
halo ला
halo ला प्रभावळ असा शब्द वापरतात.
seaman - दर्यावर्दी ? नाखवा?
kindling a zeal स्फुल्लिंग चेतवणे, जागृत करणे प्रज्ज्वलित करणे ?
distburbed age हे एखाद्या व्यक्तिबद्दल नसेल तर त्रस्त, संत्रस्त काळ चालेल का?
क्रूर या विशेषणा वरून क्रौर्य हे नाम आलंय. जसं शूर वरून शौर्य
धन्यवाद
धन्यवाद शोनु
क्रुर ह्या
क्रुर ह्या विशेषणामध्ये ही क्रु हा धातु आहे पण "र " लावण्याचे कारण किन्वा फोड काय ?
seaman म्हणजे
seaman म्हणजे खलाशी पण होईल.
"Sycophantism".
"Sycophantism".
तातूनाना,
तातूनाना, वरच्या शब्दाला पोरकं सोडून कुठे गेलात???
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
पायपिट,
पायपिट, बसपिट, रिक्षापिट, ट्रेनपिट, विमानपिट -- या शब्दांमधे 'पिट' चा अर्थ काय होतो?
यांपैकी
यांपैकी फक्त पहिल शब्द ऐकलाय.. पायपीट = तंगडतोड..
बसपिट,
बसपिट, रिक्षापिट, ट्रेनपिट, विमानपिट

बी कुठुन काढलेस हे शब्द तू?
बसपिट,
बसपिट, रिक्षापिट, ट्रेनपिट, विमानपिट >>
बी पीटटचा आणखी ऐक शब्द - पिटपीट.
विमानपिट > म्हणजे कॉकपिट म्हणायच का तुला?
बी, हे शब्द
***
We must not avoid pleasures, but we must select them. - Epicurus
बी , बसपिट,
-प्रिन्सेस...
Pages