मँगो मलई बर्फी

Submitted by नानबा on 11 February, 2010 - 14:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मँगो पल्प
रिकोटा चीज
दुधाची पावडर
साखर (मँगो पल्प किती गोड आहे त्यावर अवलंबून)
बदामाचे काप, केशर (सजावटी साठी)

क्रमवार पाककृती: 

एक वाटी रिकोटा चीज असेल तर त्यात अर्धी वाटी दुधाची पावडर आणि आवडी प्रमाणे मँगो पल्प घालून एकदम छान मिक्स करून घ्यावं. मायक्रोवेव्हला दोनदा ३ ते चार मिनिट लावावं (लावा- काढून हलवा- पुन्हा लावा अशा प्रकारे) - येवढ्या वेळात हे बर्फी होण्याइतपत घटट झालेलं दिसेल. नसल्यास आणखीन एकदा मायक्रोवेव्ह ला लावा.
ताटाला तूप लावून त्यावर जाडसर थापून वड्या पाडाव्यात.
वरून बदाम आणि केशर भूरभूरावं.

वाढणी/प्रमाण: 
वड्या किती मोठ्या पाडता (आणि एक माणूस किती खातो त्यावर अवलंबून :P)
अधिक टिपा: 

~मँगो पल्प न टाकताही छान होते ही बर्फी - पण मग मायक्रोवेव्हला एकदाच लावावी लागते.
(पल्प मुळे जरा पातळ पणा येतो त्यामुळे आटवायला जास्त वेळ लागतो. पल्प नसेल तर ही वडी एकूण ५ मिनिटात होते
~ जराशी ओलसरच असते ही. त्यामुळे वड्या कोरड्या खोबर्‍याच्या बर्फीइतक्या/काजू कतली इतक्या कोरड्या होण्याची अपेक्षा ठेवू नका.
~ विकावी इतकी छान लागते ही बर्फी!
~ जास्त खाल्यास वजन वाढण्याची हमी Wink

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच पाककृती! नानबा सध्या चवदार रेस्प्यांवर रेस्प्या टाकतेय. Happy डिस्क्लेमर टाक, 'खाऊन वजन वाढल्यास नानबा जबाबदार नाही!' Happy

वजन वाढल्यास नानबा जबाबदार नाही!
>> हा हा हा.. लोकांचं माहित नाही.. पण माझंच वाढलं तर मला जबाबदारी झटकता येणार नाही (का थायरॉईड वर ढकलू? Wink )
संध्याकाळी फोटू टाकीन...

मी हि अशीच रिकोटा चीजशिवाय फक्त दूध पॉवडर व आमरस टाकून आंबावडी व उरलेल्याचे आंबामोदक बप्पाला नेवैद्य म्हणून केलेली गेल्या गणपतीत.

काय सॉलिड असतात तुझ्या एकेक रेसिपीज.
पुण्यात एके ठिकाणी अशी मँगो बर्फी मिळते ना ? नातेवाईकांच्या एका गटगला कुणीतरी खिलवली होती.

छान वाटतेय कृती. मी नेहेमी सायोची मलई बर्फी मँगो पल्प, अंजीर वगैरे घालुन करते. नानबा, पण वजन वाढेल बर्का Proud

मग फक्त नॅ ठेव Proud

(त.टी.निबंधच खालच पोस्ट आधी वाचाव)

हो ना.. म्हणून तर डिस्क्लेमर टाकलाय (जास्त खाल्यास वजन वाढण्याची हमी Wink )

मध्ये मध्ये मला फूल-टू झटके येतात - मग सगळ पूर्ण बंद.. मध्ये मध्ये घसरते!
(आत्ता चॉकलेट नको म्हणाले एकाला! मग काय वाटलं काय!)

अगो, निबंध, अमृता, सिन्ड्रेला.. उगाच हाफिसात मोठ्यांदा हसवू नये कुणाला!
(काम नाहीचे तसही सध्या! पण तरी लोक चमत्कारिक पणे बघतात!)

मला काहीच क्लू नाही. तुझं प्रमाण सांगतेस का?
>> खरं सांगू का? माझा सगळाच स्वैपाक इन्ट्युशनवर चालतो. त्यामुळे मला वाट्या-चमच्यांच प्रमाण सांगायचं म्हणजे लईच टेंशन येतं.. म्हणून कालची कृती सव्वा माणसासाठी झाली (डिस्केमरच म्हण ना!)

एका वाटी चीज ला तीन चमचे आमरस टाकून बघ.. थोडीशी चव घे.. कमी वाटला तर आमरस वाढव - जास्त वाटला तर चीज वाढव!
(आणि मुख्य म्हणजे, प्रयोग करून झाला की तुझं प्रमाण इथे सांग- म्हणजे सगळ्यांच्याच रेफरन्सला होईल)

>> एका वाटी चीज ला तीन चमचे आमरस टाकून बघ.. थोडीशी चव घे.. कमी वाटला तर आमरस वाढव - जास्त वाटला तर चीज वाढव!

आणि दोन्ही वाढलं की सव्वाचा दीड माणूस कर. Proud

Jokes apart, रेसिपी मस्त वाटत्ये. नक्की करून बघणार. Happy

मी रिकोटाचे पेढे/कलाकंद करते तेव्हा हे प्रमाण घेते.
१ वाटि रिकोटा असेल तर १ वाटि साखर्(इथे कमि लागेल आंबा-रस असल्याने)
आणि २ वाट्या दुध पावडर.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/119176.html?1180980692

इथे रिकोटाला काही पर्याय आहे का
>> काय माहित! पण रिकोटामुळे त्याला तो 'मलई बर्फी' चा मऊखर पणा येतो!
संध्याकाळी फोटोज टाकेनच!

नानबा तुमच्या ह्या मॅगो मलई बर्फी नी आज माझी गंमत च केली. मी आज सकाळी ऑफ लाईन मायबोली नवीन लेखनात आले तर "मॅगो मलई बरफी "दीसली म्हणुन पटकल अ‍ॅनलाईन झाले यम्मी यम्मी करत नवीन लेखनात आले तर दीसली "पोह्याची उकड्'.मी आपली विचार करतेय अस कस झाल्.परत नाव पण वाचल "नानबा"च दीसल्.परत वेड्यासारख ऑफ लाईन जाऊन चेकल्.:हाहा:
मग परत ऑन लाईन जाऊन दुसर पान पाहील मग दीसली तुमची ति यम्मी यम्मी "मँगो मलई बर्फी"
छान च आहे.

नाही, पण हे सारखं सारखं 'सव्वा माणूस' काय आहे हं? Proud Light 1

भारतात रिकोटा चीजला काय पर्याय आहे माहित नाही, पण बर्फी मावेमध्ये करून बघेन.

Pages