मँगो मलई बर्फी

Submitted by नानबा on 11 February, 2010 - 14:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मँगो पल्प
रिकोटा चीज
दुधाची पावडर
साखर (मँगो पल्प किती गोड आहे त्यावर अवलंबून)
बदामाचे काप, केशर (सजावटी साठी)

क्रमवार पाककृती: 

एक वाटी रिकोटा चीज असेल तर त्यात अर्धी वाटी दुधाची पावडर आणि आवडी प्रमाणे मँगो पल्प घालून एकदम छान मिक्स करून घ्यावं. मायक्रोवेव्हला दोनदा ३ ते चार मिनिट लावावं (लावा- काढून हलवा- पुन्हा लावा अशा प्रकारे) - येवढ्या वेळात हे बर्फी होण्याइतपत घटट झालेलं दिसेल. नसल्यास आणखीन एकदा मायक्रोवेव्ह ला लावा.
ताटाला तूप लावून त्यावर जाडसर थापून वड्या पाडाव्यात.
वरून बदाम आणि केशर भूरभूरावं.

वाढणी/प्रमाण: 
वड्या किती मोठ्या पाडता (आणि एक माणूस किती खातो त्यावर अवलंबून :P)
अधिक टिपा: 

~मँगो पल्प न टाकताही छान होते ही बर्फी - पण मग मायक्रोवेव्हला एकदाच लावावी लागते.
(पल्प मुळे जरा पातळ पणा येतो त्यामुळे आटवायला जास्त वेळ लागतो. पल्प नसेल तर ही वडी एकूण ५ मिनिटात होते
~ जराशी ओलसरच असते ही. त्यामुळे वड्या कोरड्या खोबर्‍याच्या बर्फीइतक्या/काजू कतली इतक्या कोरड्या होण्याची अपेक्षा ठेवू नका.
~ विकावी इतकी छान लागते ही बर्फी!
~ जास्त खाल्यास वजन वाढण्याची हमी Wink

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतात रीकोटा चीजला पर्याय कन्डेन्स्ड मिल्क आणि किसलेलं पनीर किंवा मिल्क पावडर आणि उकळतं दूध.... प्रयत्न आणि चुका करून प्रमाण निश्चित करता येईल.

मिल्क पावडरला लोणी चोळून त्यात उकळतं दूध ओतायचं आणि चमच्याने ढवळायचं की त्याचे क्रम्बल्स तयार होतात. ते साखरेच्या पाकात घालून ते मिश्रण थापून वड्या पाडायच्या. जुन्या मायबोलीत आहे. शोधून लिंक टाकते.
हे बेसिक..... पुढचं कोणीतरी करून बघा आणि इथे लिहा..

एक मदत - मी जेव्हा बर्फीच्या वड्या पाडते तेव्हा सुरीला चिकटुन त्यांच्या कडा अगदी खडबडीत होतात. बाजारच्या बर्फीसारख्या वड्या कशा कापायच्या???

एक तर सुरीला तूप लावून घे, आणि मिश्रण साधारण गरम असताना सुरीने कापून ठेव, गार झाल्यावर पुन्हा सुरी फिरवून वड्या बाहेल काढ.

पूनम, रिकोटा चीज मिल्क पावडर किंवा खव्याच्या जवळ जातं चवीला. रिकोटा म्हणजे रिकूक्ड. तुम्ही कलाकंद बर्फी करायला जे जिन्नस वापरत असाल भारतात तेच वापरुन त्यात आमरस घातलात तर नानबाच्या कॄतीने बर्फी तयार होईल.

Pages