एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग

Submitted by माणूस on 21 January, 2009 - 22:11

एकापेक्षा जास्त लोकांबरोबर काम करणे थोडे कठीण असते म्हणून...

मधे मला माझ्या camera ची एक lens विकायची होती म्हणून ad दिली होती. तर जो माणूस ती घ्यायला आला तो New York Police Department मधे कामाला होता. Transaction व बाकी ईकडच्या तीकडच्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला की आता retire व्हायला तीन वर्‍ष राहीलीत म्हणून गेल्या दोन वर्‍षापासुन हा उद्योग सुरु केलाय. This is my backup plan, and it has already started to help me to make living out of it तो काही म्हातारा होता असे वाटले नाही, असेल ३५-४० वर्‍षांचा.

मग मी विचार केला, ह्याला तीन वर्‍ष fixed नोकरी शिल्लक असुन हा असा विचार करतो, आपली तर s/w मधली नोकरी. ज्याचा काही नेम नाही, आणि ३ महीन्यांन पुर्वीच अनुभव घेवुन झालाय.

म्हणून काहीतरी backup plan असायला पाहीजे असे वाटायला लागले.

तर कंप्युटर सोडुन मला अजुन काय जमतेय? काही नाही. कंप्युटर पुर्वी म्हशीं चे दुध काढायचो आणि विकायचो, पण ते आता जमेल असे वाटत नाही ना करायची ईच्छा असेल. (शहरीकरण :))

तर... do you have any backup plan ideas, or do you have any backup plan?

Lets hope some new unthought ideas will pop-up, and you read only members, register and reply.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबुभौ.. अगदी सपशेल मान्य.. पण मी खुद्द आमच्या नातेवाईकात याची उदाहरणे पाहिली आहेत..
आधी फक्त जेव्हा जमेल तसे भिक्षुकी पण करणारे.. नंतर फुल्ल टाइम या व्यवसायात जम बसवते झाले आहेत.... जर परंपरागत ज्ञानामूळे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधणार असेल तर काय हरकत आहे ?

एक सेपरेट बीबी उघडा. सर्वसामान्याना नेहमी लागणार्‍या पूजा/विधी याबाबत...
>> हे बरे लिंबुभौ करतील... त्याची ट्रेड सिक्रेटे उघड करावी लागतील.. Proud

>>>>> भीक मागणे हाही उद्योग एकट्या माणसाला करता येण्यासारखा आहे. तुम्हाला काय वाटतं?

आमच्या वाटण्याचा काय सम्बन्ध? तुम्हीच प्रत्यक्ष भीक मागुन बघा, अन ते प्रत्यक्ष अनुभवाचे जाणते बोल येथिल अज्ञ जनान्ना उपदेश्पर वाटा!
तरीही, तुम्हाला म्हणून सान्गतो, यावर मला काय वाटते,
तुम्हाला माहिते? लहानपणि तान्हे असताना तुम्ही भुकेने कासावीस होऊन रडायचा, मगच तुम्हाला दुध पाजले जायचे! माझ्या मते आईच्या वा गाईच्या दुधची रडूनओरडून, स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करुन, भीक मागण्याची अक्कल जन्मतःच परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली अस्ते व ती तुम्ही यशस्वीपणे वापरत होता
पुढे तुम्ही थोडे मोठे होता, खाद्यपदार्थ आवडणे नावडणे कळू लागते, आवडीचा पदार्थ घरचे वा दारचे करीत असले की तिथे तुम्ही टुकत बसता, बाजारातुन जाताना आईबापाकडे निरनिराळ्यावस्तुन्करता हट्ट धरता, हे सगळे भीक मागण्याचेच प्रकार बरं!
त्याहुन मोठे झाल्यावर शाळा कॉलेजमधे गेल्यावर ऑपोझिटसेक्सच्या व्यक्तिच्या एखाद्या देखिल नजरकटाक्षाचे तुम्ही भुकेले अस्ता व तो मिळावा म्हणुन तुम्ही नाना उपाय करता व तो कटाक्ष मिळवता, हे मिळवणे म्हणजे देखिल भीकच मागणे यात सन्शय नाहि!
पुढे तुमचे लग्न ठरते, पुरुष असाल तर "वरदक्षिणेच्या" नावाखाली लग्नात, व पुढील वर्षभर सणासुदिन्चे मानपान या नावाखाली तुम्ही एकप्रकारे भीकच गोळा केलेली असते!
नोकरीमधे तर "बोनस" नावाची वार्षिक भीक घेताना तुम्हाला आनन्दाचे भरते येते!
येताजाता कुठेही काही फुकट ते पौष्टीक असे वागताना तरी वेगळे काय होत असते? साधी भाजी घेताना विक्रेत्याने दोन मिरच्या अधिक टाकल्या तरी त्या भिकेने खूष होणारे तुम्ही!
अस काही नाही की भीक मागण्याकरता फाटकेतुटके कपडे, महिनाभर आन्घोळ न करणे, तोन्डावर असहायता नि डोळ्यात आशाळभूत करुणाच आणली पाहिजे, त्यातिल काहीही न करता देखिल या जगातील प्रत्येक जण कधिना कधी वा नित्य, कशाचिना कशाची भीक मागतच अस्तो असे माझे मत आहे
आता तुम्हाला काय वाटते यावर, ते नन्तर सान्गा, आधी तुमचा प्रत्यक्ष अनुभव सान्गा Proud

पेपर डेटा डिजिटल करणे अथवा डेटा एन्ट्रीची कामे असतील तर कृपया माहिती कळवा. मी नेटवर शोध घेऊन पाहिला पण एक तर फार माहिती मिळाली नाही, आणि जी मिळाली ती खात्रीशीर वाटत नव्हती.

LT Happy

आजच्या लोकसत्ताच्या पुणे पुरवणीमधे बातमी आली आहे
एका तरुणाने, २४ तास पन्क्चरची "मोबाईल" सेवा सुरू केली आहे! ह्याट्स ऑफ टु हिम!
केरळी लोकान्चे वर्चस्व झुगारुन द्यायला हा उपक्रम चान्गला आहे! Happy
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=454... ही लिन्क आहे

morally चुक बरोबर ज्याचं त्यानं ठरवा.. मी फक्त माहिती देतेय >> ते करुन घेणार्‍यांनी ठरवायचं. Happy

>>>>> मी मजेमजेत भीक मागण्याबाबतचे वाक्य लिहिले. Lol
बा प्रयोगा, मग मी तरी कुठे ती पोस्ट "धीरगम्भिरपणे" लिहीली आहे? Wink
अन माझी पोस्टदेखिल मजेमजेत घेता न आल्याबद्दल तुझे ते खालचे उधार सुभाषित तुलाच लागु पडते का ते बघ! Proud

तरीही;
तू व्यक्त केलेले वरील विचार वर वर पहाता योग्य वाटले तरी त्यावर वाद/चर्चा/मतभेद होऊ शकते, तसेच मी "अनुभव वा अनुभुती" शिवाय, वरील पोस्टमधील एकही अक्षर लिहीलेले नाही, अगदी ते आईच ममत्व/वात्सल्य वगैरे बाबी देखिल निरनिराळ्या परिस्थितीन्च्या रेट्यापुढे कशा चूलीत जातात ते डोळ्याने बघितले आहे, पण या बीबीचा तो विषय नसल्याने तूर्तास पुरे, सबब तुझ्या युक्तिवादावर मी माझे मत राखुन ठेवतोय, परत कधीतरी हा विषय मी नक्की चर्चेला घेईन! Happy

टीपः तुमचे ते स्वतन्त्र अनुभव लौकर येऊद्यात, म्हण्जे मगच झब्बू देता येईल! कसे?

>>>> ( पाठीवर चंदनाची लाकडे घेऊन जाणारे गाढव केवळ ओझ्याबद्दल कुरकुर करते. चंदनाचे मूल्य जाणत नाही. तसेच अनेक विद्या शिकलेला ब्राह्मण असला तरी खरे ज्ञान जाणत नसला तर त्याची गणनाही पशूत करावी.)
याबाबत देखिल या सुभाषिताच्या गर्भितार्थाबद्दलच माझे तीव्र मतभेद आहेत! इतके टोकाचे की सुभाषित रचणार्‍याने रचताना भान्ग घेतली होती का अशी विचारणा माझे मनात उद्भवते आहे! पण तो या बीबीचा विषय नाही!
[त्यातुनही जर सुभाषित मान्य करायचे तर साला आमचा क्याशिअर महामूर्ख वा पशूच म्हणला पाहिजे वरील सुभाषितानुसार! येडच्याप माणुस, येवढ्या लाखो करोडो रुपयान्च्या "मूल्यवान" नोटा मोजतो, त्याचे काहीच नाही, अन तरी बेटा नोटा मोजायचे किती काम पडते म्हणून कुरकुरतोच! Wink ]

माझ्या ठाण्यातील एका मैत्रिणीने टॉय लायब्ररी सुरु केली आहे घरच्या घरी. खेळणी, CDs व पुस्तके असे काँबिनेशन ती देऊ करते. सद्ध्या तिच्याकडे १२ मेंबर्स आहेत. रु.२५० महिना फी असते. थोडे डिपॉझिट घेते. आठवड्यातून शनि रवी असे खेळणी बदलून द्यायचे वार आहेत तिचे. बाकी सोम ते शुक्र ती दुपारी २ तास प्लेस्कूल चालवते घरच्या घरी. तेव्हा मात्र १ बाई मदतीला ठेवली आहे. ४ महिनेच झालेत सुरु करुन ७-८ मुलं येतात.

स्वतःची २ मुलं, त्यांच्या शाळा, अभ्यास सांभाळून तिला छान जमतंय हे.

शिन्चे, कप्पाळकरन्टे, कशास भीक म्हणतील, काहि नेम राहिलेला नाहि. Uhoh उद्या, पूजेपोटी जि दक्षिणा आधिच ठणकावून मागतो, त्यासहि भिक म्हणाल. शिवाय पूजेचे पैसे घरात जमा करून नन्तर सन्ध्याकाळि ओम्कारेश्वराच्या इथे डाळफुटाणे अन चिक्कि खाण्यासाठि पैसे मागतो, त्यासहि भिक म्हणाल. Sad पूजा साग्रसन्गित व्हावि यासाठी हट्ट धरणारे यजमान दक्षिणेसाठी मागेपुढे बघतात, बोम्ब्यास दोष लावतात, तेच खरे भिकारी नाहित का? तरि बर, आमच्या खमक्या बोम्बीने दक्षिणा आधिच मागायचि सवय लावून दिलिहे.

आता मला रात्रि पोरे झोपल्यावर बोम्बिच्या आस्पास रेन्गाळताना भिकार्‍यासारखे वाटू नये म्हणजे कमावले. Sad दिवस वाईट आलेहेत. हा हन्त हन्त.

आर्टीफिशल फुलांची, तसबिरी/वॉल हॅन्गिन्ग तसेच खेळण्यान्ची "लायब्ररी" हे चान्गले व तुलनेत कमी भान्डवलातले उपाय आहेत, व अनुभवसिद्ध आहेत असे वाटते. वरील तिन्ही प्रकार मी आमच्या इथे कुणाकुणाला करताना देखिल अनुभवलेत.

माझ्या मित्राची बायको, तिने गेल्यावर्षी आम्हा सर्व परिचितान्कडून जुनेपाने (सुस्थितीतील पण न होणारे) सर्व प्रकारचे कपडे मागुन घेतले होते. या वर्षात तिने त्यापासून स्पन्ज व आतुन अस्तर वापरुन, झीप असलेल्या विविध आकारान्च्या, रन्गान्च्या पर्सेस, पिशव्या इत्यादी बनवले! मध्यन्तरीच्या सन्क्रान्तीच्या हळदीकुन्कवात लुटण्यासाठी म्हणून तिचा सर्व माल "हॉटकेकप्रमाणे" विकला गेला! अगदी पाच पाच रुपयान्पासुन मालाची रेन्ज होती! डझन वा शेकड्याच्या हिशोबाने चूटकीसरशी खपली! Happy प्लॅस्टिकवरील बन्दीच्या पार्श्व भूमीवर याचा विचार आपापल्या एरियात नक्कीच करता येईल, नाही का?

प्रयोग आणि लिंबू कॄपया भिक नको पण दुसरे काही चांगले करता येण्यासारखे उद्योग असतील तर त्याबाबत आपले मौलिक विचार शेअर करावेत.
अरेच्च्या यावरून आठवलं, शेअर्स बाबत कोणीच कसं लिहिलं नाही ?
हा पण एकट्या माणसाने अभ्यास करून करता येण्यासारखा उद्योग आहे ना ?

हा बा. फ. चालू केल्याबद्द्ल माणूस यान्ना मन।पुर्वक धन्यवाद! ज्ञाति यान्ना दिलेली youtube vaidya आइडिया आणि कान्चन यान्ना दिलेली open source contribution दोन्ही आइडिया चान्ग्ल्या आहेत. त्यानी जरूर seriously घेतल्या पाहिजेत. इतरांच्या कल्पनाहि आवडल्या पण मी IT त काम करत असल्याने या जास्त आवडल्या. मीहि गेल्या काही दिवसांपासुन विचार करत आहे. १० वर्षं web development करुन जे skills आत्मसात केले आहेत, त्याचा कुठेतरी उपयोग व्हावा. value creation करावे. I mean नोकरीच्या ठिकाणी करतोच आहे जमेल तसे. पण इतरही काही करावे स्वतंत्रपणे. उ.दा. परदेशात नोकरीला असलेल्यांच्या लहान मुलांसाठी wiki type गोष्टी संकलन website तयार करावी असा विचार आहे. पण ह्यात जोडधंद्यापेक्षा value creation चा भाग जास्त असल्याने कदाचित यावर स्वतंत्र BB काढावा का?

शेअर्सबद्दल एकट्याने करायचा व्य्वसाय.... म्हणजे ऑनलाईन डे ट्रेडींग म्हणायचे आहे का? अजिबात करु नका......... दुसरा व्यवसाय करुन शेअर्मध्ये ते पैसे लॉंग टर्मला गुंतवा.....

विषय खुप चांगला आहे. मी गेल्या २ वर्षापासून सायबर उघडण्याच्या प्रयत्नात आहे.
पण आईची परवानगी नाही. ती म्हणते की सासरी जाउन उघड. यावरुन आम्च्या घरी भांड्णेही होतात.
पण मी सायबर उघड्णारच ....मला नोकरीत इंटरेस्ट नाही .व्यवसायात आहे.
सध्या घरी क्लास घेते आणि सोबत नोकरी हि करते. पण डोक्यात सायबरचा विचार आहे.

I think even if you are employed, you can do business. The important point is you shouldn't let your own business affect your salaried work, otherwise your boss won't be happy.

In fact, most will start-up working part-time. This will ensure that you have a steady income and work out the feasibility of your new business part-time. You don't want to "jump" into the sea without knowing if you will sink or float.

But at some point in time, the founder must quit his full-time job and focus entirely on the business. This is the committment, sacrifice and risk that he must make to proof to the VC or angel that he has full trust on his business in order to get the necessary funding. I don't think anyone would want to fund the founder if he is working part-time on his business.

So, there is always a risk where you might lose your salaried job and never get funding.

Conclusion: Entrepreneur is not for someone who has weak heart and cannot take risk. Being able to step out of his own comfort zone and take risk is the first step towards Entrepreneurship.

एक सायबेरीयन कंपनी आहे . बेब साइट् डिझाइन् करुन् देतात . माझी त्या मालकाशी योगायोगाने ओळख झाली .
त्याने मला ऒफर दिली की, मी जर त्याला ग्राहक मिळवुन् दिले तर् तो मला कमिशन देणार . उदा- जर त्याने एका ग्राहकाला ५०० युरो चार्ज केले तर मला तो त्यातले १०० युरो देणार, आणि समजा त्याने ग्राहकाला १००० युरो चार्ज केले तर तो मला त्यातले २०० युरो देणार - याप्रमाणे .
पण मी सध्या शिकत असल्यामुळे ती ऒफर स्विकारु शकत नाही
कोणाला इछा असल्यास माझ्याशी संपर्क करावा

network marketing चालु करा.

गाजराची पुन्गी वाजली तर वाजली......

असा business आहे हा.

जम बसला तर याच्या सारखा business नही.

सगळ्यात मस्त टपरी टाका Happy

नेटवर्क मार्केटींग म्हणजे लोकांना मोठ्ठी स्वप्न दाखवुन त्यांच्या खिशात हात घालणे असे माझे स्पष्ट मत आहे.

<<माझ्या ठाण्यातील एका मैत्रिणीने टॉय लायब्ररी सुरु केली आहे घरच्या घरी. खेळणी, CDs व पुस्तके असे काँबिनेशन ती देऊ करते.>> अस्विनी याबद्द्ल जरा डिटेल माहिती मिळू शकेल काय ?
म्हणजे जर एखाद्याला नव्याने सुरू करायचे असल्यास काय गरजेचे आहे ?

Its my personal opinion.....
I am doing job as well as business also. Doing it since last 4-5 years.
Its realy very very difficult to handle both the things.
If some one realy wants to start business while doing job needs basic managment things
1. Good time managment
2. Multitasking - handling multiple balles in air
3. Calm attitude and Patience
......
First needs to check wheather we have these abilities or not and then should think of both things. Otherwise do any one , either job or business. For one business there can be other side business which is easy situation.
I am ready to help people who are in Pune or near by cities to do both the things and personaly can suggest some options also.

Todays situation is that I am doing job just for timepass as my business doesn't need me full time as wife is looking after day today activities.

I was very very weak in
1. Good time managment
2. Multitasking - handling multiple balles in air
3. Calm attitude and Patience
so it takes very long time for me to learn and then get settled down

Pages