एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग

Submitted by माणूस on 21 January, 2009 - 22:11

एकापेक्षा जास्त लोकांबरोबर काम करणे थोडे कठीण असते म्हणून...

मधे मला माझ्या camera ची एक lens विकायची होती म्हणून ad दिली होती. तर जो माणूस ती घ्यायला आला तो New York Police Department मधे कामाला होता. Transaction व बाकी ईकडच्या तीकडच्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला की आता retire व्हायला तीन वर्‍ष राहीलीत म्हणून गेल्या दोन वर्‍षापासुन हा उद्योग सुरु केलाय. This is my backup plan, and it has already started to help me to make living out of it तो काही म्हातारा होता असे वाटले नाही, असेल ३५-४० वर्‍षांचा.

मग मी विचार केला, ह्याला तीन वर्‍ष fixed नोकरी शिल्लक असुन हा असा विचार करतो, आपली तर s/w मधली नोकरी. ज्याचा काही नेम नाही, आणि ३ महीन्यांन पुर्वीच अनुभव घेवुन झालाय.

म्हणून काहीतरी backup plan असायला पाहीजे असे वाटायला लागले.

तर कंप्युटर सोडुन मला अजुन काय जमतेय? काही नाही. कंप्युटर पुर्वी म्हशीं चे दुध काढायचो आणि विकायचो, पण ते आता जमेल असे वाटत नाही ना करायची ईच्छा असेल. (शहरीकरण :))

तर... do you have any backup plan ideas, or do you have any backup plan?

Lets hope some new unthought ideas will pop-up, and you read only members, register and reply.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुख्य म्हणजे तुम्ही जे काय करू इच्चिता त्याला गिर्‍हाईके पाहिजेत. तुम्हाला काही येते म्हणून तुम्हाला काम देतीलच लोक, असे नाही. तिथे विश्वास लागतो, ओळखी लागतात, तेव्हढे तुमचे networking पाहिजे. शिवाय तिथे salesmanship पण लागते. माझ्या अनेक ओळखी आहेत, एकानेहि माझ्याकडून विमा घेतला नाही. शेवटी तो धंदा सोडावा लागला. माझ्याकडे गणित शिकायला कुणीहि विद्यार्थि येत नाहीत. वास्तविक मी कित्येक वर्षे कुणा संस्थेसाठी हे काम कमी पैशात केले आहे.

Happy Light 1

चांगली बातमी...

१५-२० event फुकट शुट केल्यावर, which includes time for the whole day, post production processing, printing... मला परवा एका परिवाराकडुन त्यांच्या मुलांचे फोटो शुट करायची ऑर्डर मिळाली... अर्थात हे पण free च असणार. पण कोणीतरी स्वतहुन खास फोटो काढण्यासाठी घरी बोलावले, which is big thing for me.

अजुन एका मुलीने देखील मजेत तीचा portfolio बनवशील का विचारले...

so i think, with this progress after an year or so, i may get my first extra $ through photography.

अभिनंदन माणसा!

एकदम छान वाटले वाचून! तुझी अशीच प्रगती होत राहो and u know एक वर्ष कशाला within a few months चांगल्या ऑर्डरी तुझ्या पदरी rather pocket मध्ये पडोत.

सॉरी जरा उशीराच वळलो या बाफवर.

खूप वर्षांपूर्वी जेव्हा करियरला सुरवात केली तेव्हाचे काही छंद आज व्यवसाय झालेले दिसतायत.

व्यायामशाळेतले तेव्हाचे मित्र आज "हेल्थ क्लब् ज" मध्ये मॅनेजर आहेत.
कुत्रे पाळण हि आवड होती पण त्यांना शिकवण , सांभाळण (बेबी सिटींग), कन्सल्टींग देणं हे आज मोठे उद्योग झालेत.
शोभेचे मासे उत्पादन करण, वाढवणं, टाक्या बनवण, सेट करून देण, रेग्युलरली मेंटेन करण हेही व्यवसाय झालेत.

आज माणसाकडे वेळ नाही सा झालाय. त्यामूळे सर्विस हि इंडस्ट्री वाढत जातेय वेगाने.

वरती तर मी माझे प्लान्स / छंद लिहिलेयत. पण हो आज ह्या वर पोट जाळण नव्हे तर चांगल कमवू शकतो एखादा.

भारतामधे फ्रीलान्सर म्हणुन काम करण्यासाठि कन्म्पनी सुरु करावी लागते का? क्लाएन्टला इनवोइस/बिल कसे पाठवावे लागते? (कोणत्या फोर्ममधे?)

कोणाला जर वेब डिजायनिंग किवा ग्राफिक डिजायनिंग बद्द्ल प्राथमिक माहिति असेल तर हळु हळु या व्यवसायात आपला जम बसवु शकतो कुठ्ल्याहि recession मध्ये या व्यवसायाला मरण नाहि आहे. आणि या साठि एका संगणका सिवाय विशेष काहि
भांडवल लागत नाहि

मला घरगुती सजावटीच्या वस्तु बनवणार्‍या महिलांसाठी काही व्यवसाय सुचवता येतील जे माझ्या व्यवसायाला पुरक आहेत. मला असे काम करून देणार्‍यांची गरज सुद्धा आहे.
ज्या महिला घरबसल्या गृहसजावटीच्या कचर्‍यातून कला ते नानाविध हस्तकला प्रकारातल्या तंत्रांमधे निष्णात आहेत त्या कॉश्च्यूम अ‍ॅक्सेसरीज आणि कॉश्च्यूम एजिंग या संदर्भातल्या गोष्टी करून देऊ शकतात ठराविक फी घेऊन.
उदाहरणे खालीलप्रमाणे...
१. मेटल एम्बॉसिंगच्या फ्रेम्स करणार्‍यांना कॉश्च्युम ज्वेलरी आणि कॉश्च्यूम फिलिग्रान बनवता येणे अगदी सोप्पे आहे.
२. फॅब्रिक डायिंग/ पेंटींग घरगुती स्तरावर करणार्‍या महिलांना आमची कॉश्च्युम एजिंगची तंत्रे आत्मसात करणे डाव्या हाताचा मळ असेल. आणि सध्या हे काम करून देणारे कोणीही अस्तित्वात नाही. डायवाल्यांना एजिंगचा सेन्स नसतो. त्यामुळे सध्या तरी मी स्वत:च हे करते, माझ्या असिस्टंटस ना शिकवते आणि करून घेते.

अशी अनेक उदाहरणे देता येतील.
खरोखर इच्छा असेल तर मी मार्गदर्शन करायला तयार आहे.

नीधप,
छानच सूचना. पण या कल्पनेचा अधिक पाठपुरावा करावास, असे वाटते.
आजच्या काळात हे असंच काहीतरी लोकांना सांगण्याची फार गरज आहे. Happy

पण या कल्पनेचा अधिक पाठपुरावा करावास, असे वाटते.<<
हो रे. पण सध्या वेळच होत नाहीये. अरे अजून आपल्याकडे फॅशन डिझायनिंग कुठलं, स्टायलिंग कुठलं आणि कॉश्च्युम डिझायनिंग कुठलं यामधेच क्लॅरिटी नाहीये प्रत्यक्ष काम करणार्‍यांच्यात तर कॉश्च्युम क्राफ्ट हा प्रकार विसरूनच जाऊया.. Happy

कॉश्च्युम क्राफ्ट हा प्रकार विसरूनच जाऊया.. >>>

नी, काही लोकांना हाताशी घेऊन तू नाही का सुरु करु शकत? का त्याला आपल्याकडे डिमांड नाहीये?

एक सेपरेट युनिट टाकण्याएवढी डिमांड नाहीये अजून. ती वाढेल कदाचित काही वर्षांनी पण तेवढी डिमांड आत्ता नाहीये. त्यामुळे युनिट टाकणं, ते चालवणं, तेवढं काम आणणं इत्यादी साठी मला फॅशन अ‍ॅक्सेसरीज, होम अ‍ॅक्सेसरीज अश्या क्षेत्रात काम सुरू करावं लागेल. ज्यात मला मुळीच इंटरेस्ट नाहीये.
पण कुणी गृहसजावटीच्या वस्तू घरातल्या घरात करत असेलच तर त्यांना हा बिनाभांडवली आणि अधून मधून पैसे मिळवून देणारा जोडव्यवसाय होऊ शकतो.

माणसा, एखाद्या Amway/Quixstar वाल्यानी तुझ्या या पोस्ट वाचल्या तर तो उधळलेल्या गाढवासारखा पाय झाडत नाचायला लागेल!
>> खूप हसले.
भिक्षुकीबद्दल थोडसं - कधीच मरण नाही ह्या गोष्टीला. पुण्यात वगैरे रेटही इतके जास्त आहेत की त्यापेक्षा मला माझ्या गावातून आमची आख्खी टोळी स्वतःच्या खर्चानं पुण्यात आणण परवडेल!
मी स्वतः काही गोष्टी शिकले आहे. लघुरुद्र/पूजा/दशहराच्या वेळी देवे म्हणायला किंवा इतर काही गोष्टी करायला कॉलेजात असताना मी आणि माझ्या मैत्रिणी (आमची टोळी) जायचोही.. अजूनही गावात असेन आणि कुणाकडे कार्यक्रम असेल तर जाईनही. पण मदत/हौस म्हणून ठीक आहे 'धंदा' म्हणून नको वाटतो. (आणि श्राद्धासारख्या गोष्टी हौस म्हणूनही शक्य नाहीत!)
अर्थात ज्याच्या अशा 'ईमोशन्स' नसतील तो करुच शकतो हे! पुण्यात रु १००००/- वगैरे उदकशांतीचेच घेतात! मी उदकशांत करायचा प्लॅनच कॅन्सल केला हे ऐकून. पण करणारे असतातच!
आणखीन करण्यासारखा उद्योगः बर्‍याच कंपन्या सध्या पेपर डेटा डिगिटल करताहेत. घरबसल्या करता येतं - बरे पैसे मिळतात (माझी शेजारीण करायची)

बुटीक काढणं (घरातल्या घरात) आणखीन एक उद्योग.

मला आता आतापर्यन्त भिक्षुकी म्हणजेच त्याचा अर्थ भिकारी वाटायचा. हि वरची पोस्ट वाचल्यावर भटजी/गुरुजी/पंडित असे कळले. Happy

no offnese to anybody.

बुटीक काढणं (घरातल्या घरात) आणखीन एक उद्योग.<<
हा पसारा घरातल्या घरात तितकासा सोपा नाही आणि मुळातलं भांडवलही भरपूर लागतं.
एकट्या माणसाने करायचा उद्योग नाही. बुटीक टाकायचं तर १० शिंप्यांची टीम पाहिजे आणि फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर्स/ सप्लायर्सशी रॅपो पाहीजे. पॅटर्निंग आणि पॅटर्न ग्रेडेशन हे तुम्हाला स्वतःला जमलं पाहिजे तर उपयोग आहे. रिटेलच्या किमतींमधे कापड आणाल तर धंदा बसेल.
कापड आणि डिझायनिंगचं ज्ञान हवं.

अर्थात हल्ली अनेकजण होलसेलवर कापडं आणून ठेवतात आणि जरा चकाचक पसारा करून मागणीप्रमाणे शिवून देतात. जरा चकाचक शिंप्याचं दुकान एवढाच मुद्दा असतो आणि त्यालाही बुटीक म्हणतात. पण ते बरं चालायला सुद्धा उत्तम शिंपी हाताशी हवेत आणि तुम्हाला मुळात ते सगळं काम येत असलं पाहिजे.

तिकडे उद्योजकता विकासाच्या बाफवर टाकले हेच पण बहुतेक हे तिथे योग्य नाहीये. पण इथे नक्की चालेल.
अनेक ठिकाणी ग्रामीण भागांमधे आता शूटींग्ज होत असतात. तिथे शूटींगसाठी लागणारे मनुष्यबळ आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणे हा एक महत्वाचा व्यवसाय होऊ शकतो. नीट अभ्यास करून आणि थोडं डोकं चालवून सेटप तयार केला तर चांगला चालू शकतो. सेटपसाठी खूप भांडवल लागणार नाही. संवादकौशल्य आणि माणसे जोडणे महत्वाचे. ठराविक काळापुरताच पूर्ण वेळ आणि बाकीचा वेळ इतर सगळे उद्योग सांभाळून करता येण्यासारखा व्यवसाय आहे. कोकण आणि गोवा इथल्या ग्रामीण भागात हे विषेशकरून शक्य आहे.

नम्स्कार

ईंग्रजी सफाईदार नसलेल्या गृहिणींना घरुन करता येण्यासारखा मराठी भाषेसंबंधित काही व्यवसाय आहे का? घरी शिकवणी घेणे हा एक पर्याय आहे. पण कॉम्पुटर आणि ईंटरनेट या माध्यमातून करता येईल असा काही व्य्वसाय आहे का?

माणसा, हा सेक्शन चालू केल्याबद्दल धन्स! मलाही नेहमी वाटते की स्वताचा काहीतरी लघूद्योग असावा...पन कुठुन आणि कशी सुरुवात करायची ते कळत नाही...:अओ:

उदबत्त्या, डिटर्जंट पावडर, अत्तर स्प्रे बनविणे. पुजा साहित्याची रेडीमेड थाळी बनविणे. आयत्या वेळी फुलांसकट डिलिवर करणे. भटजींबरोबर टाय अप असल्यास आणिक सोपे.

अनन्या दहावीचे मराठीचे क्लासेस घेता येतील. मी पण स्पेशल इन्ग्रजीचे घेणार आहे. आठ्वड्यातून २ दिवस दोन तास.

धन्यवाद आश्विनीमामी

हो क्लासेसचा विचार चालू आहे. पण मराठी भाषांतर अथवा तत्सम काही कामे ईंटरनेट मार्फत करता येतील अशी काही कामे मिळू शकतात का?

नानबा,
>>आणखीन करण्यासारखा उद्योगः बर्‍याच कंपन्या सध्या पेपर डेटा डिगिटल करताहेत. घरबसल्या >>करता येतं - बरे पैसे मिळतात (माझी शेजारीण करायची)
-- शक्य झाल्यास डिटेल्स देऊ शकाल का? काही सम्पर्क वगैरे.
धन्यवाद.

>>आणखीन करण्यासारखा उद्योगः बर्‍याच कंपन्या सध्या पेपर डेटा डिगिटल करताहेत. घरबसल्या >>करता येतं - बरे पैसे मिळतात (माझी शेजारीण करायची)
-- शक्य झाल्यास डिटेल्स देऊ शकाल का? काही सम्पर्क वगैरे.
धन्यवाद.

सॉफ्टवेअरचे ऑन लाईन छोटे प्रोजेक्ट करणे......... माझा मित्र करायचा..... गुगल सर्च करा..

मी पण सॉफ्ट्वेअर शिकण्याचा प्रयत्न केला... पण स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयवहः म्हणून सोडून दिला..... Happy

>>>>> पुण्यात रु १००००/- वगैरे उदकशांतीचेच घेतात!
तुम्ही नक्की (महाराष्ट्रीयन) "ब्राह्मण गुरुजींसच" भेटला होतात ना? की एखादे पुज्य जास्ती टाकलेत?
कारण पुण्यातला सध्याचा रेट आवश्यक सामानसुमानासहीत जास्तितजास्त ३,५००/- पर्यन्तच आहे,
या दरात कमीजास्त बदल होऊ शकतो तो उपलब्ध ब्राह्मणान्च्या ग्रेड नुसारच!
असो

>>>>> भिक्षुकी किंवा भटकी करणे....हली शास्त्रोक्त पुजा, होम्-हवन करणारे लोक लवकर मिळत नाहीत...मिळाले तरी काही तरी थातुर्-मातुर करुन पार होतात..
माझ्या मते याला काही फारशी तयारी लागत नाही..आणि स्वतः ची नोकरी सांभाळुन पण हा जोड धंदा म्हणुन करण्यासारखा आहे...

केदार, अरे बाबा, याला महाभयानक तयारी लागते! थातुरमातुर करणारे या व्यवसायात टिकूही शकत नाहीत, शिवाय थातुरमातुर करणारे "पापाचे धनी" होतात ते वेगळेच!
इथेही स्पर्धा आहे, कौशल्य आहे, अभ्यास आहे आणि मुख्य म्हणजे "कष्ट" आहेत! इतके काही ते सोपे नाही. एकवेळ कॉप्म्युटरच्या मुक्याबहिर्‍या स्क्रीनवर कोड लिहीणे कितीतरी सोप्पे, तो काहीही तक्रार करणार नाही, पण तर्‍हतर्‍हेच्या शूर्/उदार्/दानी यजमानान्पासून, कृपण्/कन्जुस्/सन्शयी/तिरसट्/विक्षिप्त/मूर्ख यजमानान्पर्यन्त सगळ्यान्न्च्या तर्‍हा साम्भाळून, सहन करुन उद्योग यशस्वीपणे करणे हे "जावे त्याच्या वन्शा तेव्हाच कळे", त्यापुढे एक कोड लिहीणे मला किस झाडकी पत्ती वाटते
यात पुन्हा शहरी व ग्रामिण यजमान हा फरक आहेच, पेठी व इतर हा देखिल, स्वतःहून धार्मिक कृत्य करणारे वेगळे अन कुणितरी (घरातील वा बाहेरील) सान्गितल म्हणुन विश्वास नस्तानाही ओढून ताणून कृत्यास बसलेले यजमान वेगळे! पाच कोसावर भाषा बदलते तसेच असन्ख्य रितीरिवाजही बदलतात व ते अचूक माहिती असावे लागतात
यजमानांस एकदा का आचमनास सान्गितल्यावर , काळवेळेप्रमाणे, घरातील, वा सार्वजनिक ठिकाणि उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर भटजी काय करतो यावर बारकाईने अस्तेच अस्ते! अशा वेळेस, नाटकाच्या स्टेजवर पहिल्यान्दाच प्रेक्षकान्ना सामोरे जाताना जी त्रेधातिरपीट उडू शकते तसेच काहिसे होऊन मन्त्र नि तन्त्र दोन्हिही ऐनवेळेस विसरले जाऊन फजिती होऊ शकते -(चुकुन माकुन असे झाल्यास काय करावे हे ट्रेड सिक्रेट असल्याने इथे सान्गत नाही! :P)
याव्यतिरिक्त, भटजी म्हणुन वागण्याबद्दल समाजाच्या विशिष्ट अपेक्षा असतात, त्यान्ना खरे उतरावे लागतेच लागते, जे न उतरतील, त्यान्ना यजमान पुन्हा दारात उभा करत नाही!

अन, सगळ्यात महत्वाचे म्हणजे, वर वर बघताना हा एकट्याने करायचा उद्योग वाटला, तरी तो तसा नाही. किरकोळ सत्यनारायणाचि पुजा वा लग्न लावणे इत्यादी फुटकळ उद्योग एकेकट्याने जरी निभावता आले तरी यातिल अन्य उद्योगाची रेन्ज ही टिमवर्कचीच आहे, नि टिम साम्भाळण्यामागिल सर्व कौशल्ये/सावधानता इथेही लागु होतातच! किम्बहुना अन्य कोणत्याही क्षेत्रापेक्षा येथिल टिम साम्भाळणे महाजिकिरीचे काम अस्ते (ते तसे का, व काय करावे, ही ट्रेड सिक्रेटे आहेत) तेव्हा मुळात हा विषय एकेकट्याने करायचे व्यवसाय यात येऊच शकत नाही असे माझे मत.

नुस्ता ब्राह्मणापोटी जन्माला आला व जानवे चढवले अन्गावर म्हणजे कोणि जातीने "ब्राह्नण" झाला तरी "आचार्य" वा "ऋत्विज" वा "गुरुजी" होऊ शकत नाही. तसे होण्यास, कष्टपूर्वक मिळवलेल्या ज्ञानाच्या तेजाबरोबरच, तुमचे शुद्ध व नम्र आचरण, जे तुमच्या प्रत्येक कृतीतुन यजमानास कळू शकणार अस्ते, ते परिणामकारक असावेच लागते. तुमचे वय सहसा आड येत नाही पण व्यक्तिमत्व नक्कीच आड येऊ शकते. बहुश्रुतता आवश्यक अस्तेच, पण वेळेस आपले मत न माण्डण्याची कला अवगत असावी लागते, नाहीतर कॉन्ग्रेसी यजमानाकडे जाऊन, सेनाबीजेपीवाला गुरुजी जर सोनिया कशी धर्म बुडवते यावर मत देऊ लागला तर बाकी काही नाही, धर्म वगैरे राहील बाजुलाच तरत, पण त्या यजमानाकडे त्यास पुढच्यावेळी बोलावले न जाउन त्याचा धन्दा मात्र बुडेल. सबब, समयसूचकता अत्यन्त आवश्यक गुण बाणवावाच लागतो

मी करतोय ना सध्या अ‍ॅप्रेन्टिसशीप! Proud म्हणुन माहित आहे हो!
यजमान अन भटजी, दोन्हीन्च्या सम्बन्धावर ग्रन्थ लिहून होईल इतके मटेरिअल आहे माझ्याकडे उपलब्ध!
पुन्हा असो! कारण मी अस्ल काही लिहील की ती तिकडची कधीतरी मधेच पचकतात, की बघा हा कसा जिकड तिकडच्या बीबीन्वर जाऊन आपलीच अक्कल पाजळुन महत्व वाढवुन घेत अस्तो! Wink

लिंबुभटजी, एक सेपरेट बीबी उघडा. सर्वसामान्याना नेहमी लागणार्‍या पूजा/विधी याबाबत...

लिंबुभटजी, एक सेपरेट बीबी उघडा. सर्वसामान्याना नेहमी लागणार्‍या पूजा/विधी याबाबत...>> अनुमोदन.
काये इतके वर्ष घरात देवपूजा वगैरे काही नव्हतच. दिवाळीची सोडून. आता मी परत नव्याने देवघर, व एक रूटीन बसवत आणले आहे. पण रोज काय करायचे वगैरे माहिती नाही. ( लहानपणी कधी तरी पूजा करत असे आइ बरोबर. ) तुम्ही माहिती द्या.

>>आणखीन करण्यासारखा उद्योगः बर्‍याच कंपन्या सध्या पेपर डेटा डिगिटल करताहेत. घरबसल्या >>करता येतं - बरे पैसे मिळतात (माझी शेजारीण करायची)
-- शक्य झाल्यास डिटेल्स देऊ शकाल का? काही सम्पर्क वगैरे.
>>> तिची कंपनी कोथरूड डेपोच्या जवळ होती. unfortunately शेजारीण इन्डिया मध्ये आहे (मी सध्या नाहीये).. तिचा # हरवलाय. पण ईमेल आयडी सापडेल.
तीला रात्री ईमेल करते आणि विचारते. चालेल?

आणखीन एक, ओळखीचा एक मुलगा आणि त्याचे मित्र ईन्जिनियरिंग च्या विद्यार्थांना सोफ्टवेअर प्रोजेक्ट करून विकायचे (morally चुक बरोबर ज्याचं त्यानं ठरवा.. मी फक्त माहिती देतेय)
पहिल्या वर्षी कष्ट झाले, त्यापुढे तयारच असायचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स फक्त थोडसं कस्ट्मायझेशन करायचा.. असं सांगत होता.

Pages