एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग

Submitted by माणूस on 21 January, 2009 - 22:11

एकापेक्षा जास्त लोकांबरोबर काम करणे थोडे कठीण असते म्हणून...

मधे मला माझ्या camera ची एक lens विकायची होती म्हणून ad दिली होती. तर जो माणूस ती घ्यायला आला तो New York Police Department मधे कामाला होता. Transaction व बाकी ईकडच्या तीकडच्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला की आता retire व्हायला तीन वर्‍ष राहीलीत म्हणून गेल्या दोन वर्‍षापासुन हा उद्योग सुरु केलाय. This is my backup plan, and it has already started to help me to make living out of it तो काही म्हातारा होता असे वाटले नाही, असेल ३५-४० वर्‍षांचा.

मग मी विचार केला, ह्याला तीन वर्‍ष fixed नोकरी शिल्लक असुन हा असा विचार करतो, आपली तर s/w मधली नोकरी. ज्याचा काही नेम नाही, आणि ३ महीन्यांन पुर्वीच अनुभव घेवुन झालाय.

म्हणून काहीतरी backup plan असायला पाहीजे असे वाटायला लागले.

तर कंप्युटर सोडुन मला अजुन काय जमतेय? काही नाही. कंप्युटर पुर्वी म्हशीं चे दुध काढायचो आणि विकायचो, पण ते आता जमेल असे वाटत नाही ना करायची ईच्छा असेल. (शहरीकरण :))

तर... do you have any backup plan ideas, or do you have any backup plan?

Lets hope some new unthought ideas will pop-up, and you read only members, register and reply.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठल्या ही उद्योगाला किमान रीतसर प्रशिक्षण आवश्यक आहे हे ग्रुहीत धरलेय!
हेच उमगुन पोलीस मामांनी नाही का ३ वर्ष आधी पासुन तयारी सुरु केलीय! Happy

इंग्रजीत Concierge असा एक शब्द आहे.
हा उद्योग पुर्वी खुप चांगला चालत असावा, पण आजकाल अनेक गोष्टी अगदी फिन्गरटिप्सवर आल्यामुळे Concierge चा उद्योग चालू शकेल का (भारतात) ?

डाटा एन्ट्री ची कामे दुबईत मिळतील का? … नेट वर चेक केल. पण काही हाती लागले नाही.

किंवा अजून काही कल्पना.. बायकोने MSW केला आहे पण त्या बसिस वर जॉब मिळत नहि.

फार पुर्वी भारतात जेव्हा नुकतेच संगणकीकरण वाढू लागले होते तेव्हा डेटा एन्ट्रीची खुप कामे असायची, अनेकांनी तेव्हा त्याचा चांगलाच लाभ घेतला होता. पण हल्ली काय परिस्थिती आहे माहिती नाही. नेटवर जी माहिती असते ती कितपत विश्वासार्ह असते देव जाणे.

पुण्यात खरोखर असे काही जेन्युईन काम मिळू शकेल का कुठे डेटा एन्ट्रीचे ? स्वतःच घरी करून देता येईल असे.

होलसेल भावात वस्तू विकत घेऊन किंवा त्या त्या शहरातील प्रसिद्ध अशी उत्पादने होलसेल भावात मागवून ती रीटेल दरात वेगवेगळ्या प्रदर्शनांतून, घरून, हिंडून किंवा आपल्या ओळखीच्या लोकांमार्फत विकण्याचा जुना व बर्‍याच अंशी यशस्वी होऊ शकणारा व्यवसाय आहे.

यात तुम्ही

~ कपडे, साड्या, बेबी क्लोथ्स, ड्रेस मटेरियल, चादरी, टॉवेल्स, तयार कपडे, लेगिन्स - टॉप्स - कुर्तीज् , इनरवेअर, स्वेटर्स, शाली यांसारखे प्रकार विकू शकता. कार्पेट्सही विकणारे आहेत.
~ गिफ्ट आर्टिकल्स व फॅशन अ‍ॅक्सेसरीज्
~ कॉस्च्यूम ज्वेलरी / मोत्याचे किंवा सेमीप्रेशस स्टोन्सचे दागिने
~ लेदर बॅग्ज, कापडी / मॉक लेदर किंवा अन्य मटेरियलमधील हँडबॅग्ज, पर्सेस, वॉलेट्स, बटवे, फॅन्सी बॅग्ज प्रकार
~ काचेची किंवा व्हाईट मेटलची (पूजा व संबंधित) उपकरणे, भांडीकुंडी, गिफ्ट आयटेम्स इत्यादी
~ सॉफ्ट टॉईज्
~ हेल्थ रिलेटेड उत्पादने

महत्त्वाचे आहे ते,

१. भरपूर नेटवर्किंग, जनसंपर्क, जाहिरात व पुरेसा पाठपुरावा
२. विकत असलेल्या मालाची गुणवत्ता व गुणवत्तेतील सातत्य राखणे
३. आफ्टरसेल्स केअर - कोणी विकत घेतलेला माल खराब निघाल्यास त्यांना परतफेड किंवा त्याजागी दुसरी वस्तू देणे - तेही मुदतीत व गोडीत.
४. नव्या नव्या गोष्टी / डिझाईन्स (लेटेस्ट) आपल्याकडे उपलब्ध राहातील याची काळजी घेणे.
५. चांगले, विश्वासू व वाजवी किमतीत माल उपलब्ध करून देणारे सप्लायर्स शोधत राहाणे.
६. नियमित येणार्‍या ग्राहकांना आपल्याकडे नव्या वस्तू / नवा लॉट आल्यास त्याबद्दल कळविणे.
७. जिथे कोठे उत्पादने डिस्प्ले करणार असाल तिथे त्यांची मांडणी आधुनिक व आकर्षक पद्धतीने होईल असे बघणे. कस्टमर-फ्रेंडली डिस्प्ले.

माझ्या ओळखीत व नात्यात अशा तर्‍हेचे व्यवसाय करणारे अनेकजण आहेत. जरी ते एकटेच व्यवसाय करणारे असले तरी वेळप्रसंगी घरातल्या इतरांचीही मदत घ्यावीच लागते. ऑर्डर्स घेणे, ऑर्डर्स पोचविणे, प्रदर्शनासाठी स्टॉलवर थांबणे, स्टॉल लावणे - आवरणे, वेळी-अवेळी घरी आलेल्या ग्राहकांना न कंटाळता वस्तू दाखविणे व त्यांना त्यांबद्दल माहिती देणे, हिशेब ठेवणे, सप्लायरने जिथे माल उतरविला असेल तिथून तो घरी घेऊन येणे, ब्लॉग / फेबुपेज / जाहिरात यांसारख्या गोष्टी सांभाळणे, व्यावसायिक व्यक्तीच्या गैरहजेरीत व्यवसायासंबंधीचे फोन कॉल्स घेणे - संदेश नोंदवून ठेवणे अशा असंख्य कामांसाठी कोणी ना कोणीतरी लागतेच. तरी सुरुवातीला अगदी छोट्या स्वरूपातील व्यवसाय असेल तर बराचसा एकहाती करता येऊ शकतो. परंतु जसजसा व्यवसाय वाढवत न्याल तसतशी इतर माणसांची मदत घेणे अपरिहार्य ठरते.

नाही.

एक इंटरेस्टिंग व्य्वसाय आहे म्हणून इथं लिहितेय. चेन्नईमध्ये एक केटरर आहे. तो बर्‍याच पद्धतीचं (क्युझिन) बनवतो. ऑर्डरप्रमाणे हवे असेल तर तसे देतोच. त्याखेरीज दर शनि रविवारी तो ब्रेकफास्टचा मेनू शुक्रवारी डिकेलर करतो. पन्नास व्यक्तींसाठी हा मेनू बनवला जातो. तुम्हाला हवं असेल तर फेसबूकवर ऑर्डर द्यायची.सकाळी आठ सव्वा आठवाजता ब्रेकफास्टची होम डीलीव्हरी (अर्थात या सर्व्हीससाठी एरीया लिमिटेड ठेवलाय)

सगळ्यांत भारी म्हणजे त्याने या सर्व्हिसची इतकी अनोखी जाहिरात केली की "असा ब्रेकफास्ट ऑर्डर केला" हे सध्या त्या भागातलं स्टेटस सिम्बॉल बनलेलं आहे. त्याचा डायरेक्ट परिणाम अर्थात त्याच्या ओव्हरऑल केटरींग बिझनेससाआठी पॉझिटीव्हली होत आहेच (काय तर मराठी!)

माहितीतल्या एक बाई फक्त दहीवडे व बटाटेवड्यांच्या ऑर्डर्स घेतात. आणि उकडीचे मोदक.

रोज सकाळी ८ ते १०च्या दरम्यान त्या साधारण आठशे दहीवडे (एका पॅकमध्ये २ दहीवडे) आणि १००-२००च्या घरात बटाटेवडे पॅकबंद करून वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या कँटीनसाठी देतात. बवडे व दहीवडे पोचवायचे काम त्यांचे यजमान ऑफिसला जायच्या अगोदर करतात.

उकडीचे मोदक, पुरणपोळ्या व इतर फराळ पदार्थही त्या पोचवतात. पदार्थांचे पॅकिंग उत्तम असते, दर्जा (चव, वापरलेले घटक, स्वच्छता इ.) चांगला असतो, वेळ बर्‍यापैकी व्यवस्थित पाळली जाते आणि पदार्थांचे दर घसघशीत असतात. (तरी हे दर तो पदार्थ आयता हॉटेलातून मागवायचा तर त्यापेक्षा कमीच आहेत.) ग्राहकवर्गही साधारण असे दर परवडणार्‍या श्रेणीतील आहे.

एक मैत्रिण किलोंच्या प्रमाणात चॉकलेट्सच्या ऑर्डर्स घेते. मुख्य ग्राहक कॉर्पोरेट्स. व्यवसाय सीझनलच असतो बर्‍यापैकी.

कडधान्यांना मोड आणून पॅकेटमध्ये ऑर्डरप्रमाणे विकणे, भाज्या निवडून, चिरुन, वाटाणाचे सामान एकत्र करुन पॅक करून देणे, वगैरे असे उद्योगही छान आहेत. नोकरी करणार्‍या बायकांना ह्याचा चांगला उपयोगही होतो.

मी फेसबुक वर KP FASHIONS नावाचं पेज तयार केलंय , कुर्ती आणि ड्रेस मटेरीयल विकण्यासाठी, सध्या दोनच फोटो टाकलेत पेजवर , हळु हळु अपलोड करेन, माझा सेमी स्टीचड् अनारकली मटेरीयल डीझाइन करुन ह्या पेजवर डीस्प्ले करण्याचा विचार आहे , पाहुयात कसं जमतंय ते.

आठशे दहीवडे (एका पॅकमध्ये २ दहीवडे) आणि १००-२००च्या घरात बटाटेवडे >>>बापरे जबरी अॅक्टिव्हिटी पण टीम असेल

डीविनिता, हो, मदतीला हाताखाली दोन - तीन मदतनीस बाया आहेत. पार्सल डिलिवरीचे काम त्या बाईंचे यजमान करतात. कोणीच हाताशी नसेल तर त्या बाई पदार्थ पोचवतात किंवा मग त्यांच्या घरून पदार्थ घेऊन जायचे.

पुढल्या तीन वर्षात आयटी क्षेत्रामधे मंदी येणार, जवळपास ६ लाख कर्मचार्यांचे जॉब धोक्यात येतील अशा बातम्या वाचल्या की असं वाटतं आत्ता पासूनच सेकंड इनकम ची सोय केली पाहिजे. पण दररोज १० तास घराबाहेर असताना दुसरा काही व्यवसाय करणे ही अवघड वाटते.
फक्त शनिवार-रविवारीच थोडा वेळ मिळू शकतो.
अशांसाठी काय options आहेत?

Pages