एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग

Submitted by माणूस on 21 January, 2009 - 22:11

एकापेक्षा जास्त लोकांबरोबर काम करणे थोडे कठीण असते म्हणून...

मधे मला माझ्या camera ची एक lens विकायची होती म्हणून ad दिली होती. तर जो माणूस ती घ्यायला आला तो New York Police Department मधे कामाला होता. Transaction व बाकी ईकडच्या तीकडच्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला की आता retire व्हायला तीन वर्‍ष राहीलीत म्हणून गेल्या दोन वर्‍षापासुन हा उद्योग सुरु केलाय. This is my backup plan, and it has already started to help me to make living out of it तो काही म्हातारा होता असे वाटले नाही, असेल ३५-४० वर्‍षांचा.

मग मी विचार केला, ह्याला तीन वर्‍ष fixed नोकरी शिल्लक असुन हा असा विचार करतो, आपली तर s/w मधली नोकरी. ज्याचा काही नेम नाही, आणि ३ महीन्यांन पुर्वीच अनुभव घेवुन झालाय.

म्हणून काहीतरी backup plan असायला पाहीजे असे वाटायला लागले.

तर कंप्युटर सोडुन मला अजुन काय जमतेय? काही नाही. कंप्युटर पुर्वी म्हशीं चे दुध काढायचो आणि विकायचो, पण ते आता जमेल असे वाटत नाही ना करायची ईच्छा असेल. (शहरीकरण :))

तर... do you have any backup plan ideas, or do you have any backup plan?

Lets hope some new unthought ideas will pop-up, and you read only members, register and reply.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

From: I opened a charming neighborhood coffee shop. Then it destroyed my life.

(http://slate.com/id/2132576/)

Looking back, we (incredibly) should have heeded the advice of bad-boy chef Anthony Bourdain, who wrote our epitaph in Kitchen Confidential: "The most dangerous species of owner ... is the one who gets into the business for love."

माझ्या मते बरीच time tracking online applications available आहेत.

माझ्या एका जवळच्या आप्तांना नेट कॅफे सुरु करयचा विचार आहे. इंटर नेट कॅफे बद्द्ल कोणास माहिती असल्यास प्लीज द्या.

काय करावे लागेल (legal doc etc)? खर्च किती असेल? असे बरेच प्रश्न आहेत.
सध्यातरी त्यांच्याकडे मोक्याच्या जागी एक दुकान आहे.

नेट कॅफे म्हणजे तिथे इंटरनेट सोबत कॉफी सुद्धा ठेवावी लागते काय?

Think people, think

http://www.arabianbusiness.com/545943-20000-indian-workers-to-be-flown-o...

Tri-state मधील H1 लोकांसाठी, bailed-out bank मधे सरकार टाकु पहात असलेले नविन रुल्स.

http://www.businessweek.com/blogs/money_politics/archives/2009/02/h-1b_v...

http://www.moneycontrol.com/india/news/economy/senate-wants-changeh1b-no...

http://www.immigration-law.com/Canada.html (read news on 2/9)

Think people, think >>

माणसा, तुला या लिंक्स मधुन नक्की काय अभिप्रेत आहे ते कळले नाही. तुला भारतीयांवर अन्याय होतोय असे वाटत आहे का?

जॉब जातायत, backup plan चा विचार करा.

एकट्या माणसाला करता येइल असा १ उद्योग मला सुचला आहे ; तो म्हणजे
वधु - वर सुचक केन्द्र चालु करणे.
यामधे कोणत्याही विशेश कोशल्याचि गरज नहि.
बकि येत असल्यास शिवण काम चा व्यवसाय किंवा शिकवणी ही उत्तम उत्पन्न मिळवुन देउ शकते.

विविध सरकारी दाखले काढून देण्याचे काम एकट्याने करता येण्यासारखे आहे. यात लागणारे विषेश कौशल्य म्हणजे माणसे मॅनेज करणे!
_________________________
-Impossible is often untried.

वरच्या पोस्ट वाचुन असे दिसते कि कुठले पर्याय निवडता येतील ते देशात/परदेशात राहताय त्यावर अवलम्बुन आहे.
इथे अमेरिकेत तरी व्हिसा नसेल तर कोणतेच काम करणे शक्य नाहिये Sad मी ४-५ महिन्यापुर्वीपर्यन्त बे एरिया मध्ये biotech company मध्ये research scientist म्हणून काम करत होते. एक वर्ष नवरा आणि मी एकाच शहरात नोकरी मिळण्याची वाट पाहत असेच back up plan/नोकरी शोधत होतो. अखेर नुकताच सुरु झालेला एच१बी सोडुन मी नवर्याच्या नोकरीच्या ठिकाणी शिफ्ट झाले, नोकरी सोडल्यामुळे एच१बी अर्थातच रद्द झाला. बरयाच ठिकाणी स्वयम्सेवक म्हणुन काय करता येइल हे जाउन पाहिले पण नाही पटले. जिथे काहि बुद्धी वापरुन करता येइल असे कुठलेच काम नव्हते. BAMS/ MS-biochemistry असल्यामुळे एखाद्या रुग्णालयात काम करण्याची इच्छा उफाळुन आली. पण तिथे बेड्शीट बदलण्याचे काम करता येइल असे सान्गितले. असो. त्यांमुळे सध्या भरपूर वेळ आहे back up plan चा विचार करायला Happy

विषयाला धरुन, देशात शिक्षण चालु असताना आयुर्वेदिक औषधे, केसान्चे तेल, च्यवन्प्राश, शतावरी कल्प यासारख्या गोष्टी विकुन पैसे मिळवले. ते वापरुन बहुतेक लोकाना फायदा होत असल्याने डबल समाधान. इथे अजुन तसे काही करण्याचा प्रयत्न नाही केला. पण देशात करणे सोपे आहे.
अजुन एक, देशात एकटे राहणार्या व्रुद्ध् लोकान्ना घरी जाउन हेल्प करणे, कदाचित कमी पैसे मिळवुन देणारे काम होउ शकते.
इथे अमेरिकेत मराठीभाषिक बरेच असतील तर सन्स्कार वर्ग मस्त कल्पना आहे.

आयुर्वेदातील ग्रथांचे मराठी/ईंग्रजी भाषांतर.
नाहीतर YouTube Vaidya (BAMS) id उघडा व त्यावर बेसीक रेमीडीज द्यायला सुरवात कर.

no immidiate returns, but for sure something in future.

आयुर्वेदातील ग्रथांचे मराठी/ईंग्रजी भाषांतर.
नाहीतर YouTube Vaidya (BAMS) id उघडा व त्यावर बेसीक रेमीडीज द्यायला सुरवात कर >>>>
धन्यवाद माणसा!! चान्गली कल्पना आहे. पण अशी भाषान्तरे आहेत बरीच.. दुसरे एक सुचले म्हणजे मी सन्स्क्रुत एम ए करत असताना असे बरेच विषय होते की ज्यासाठी पुस्तके उपलब्ध नव्हती, वाटायचे की या विषयान्साठी पाठ्यपुस्तके असती तर परीक्षा जरा सुसह्य झाली असती. अर्थात किती लोक सन्स्क्रुत एम ए करतात कुणास ठाऊक !!

दहा मैत्रिणी असणारा >>>> हो ना नॅन्सी धरुन तूला दहापेक्षा अधिक नक्कीच असतील. मुलींच्या आई-वडिलांना तर कै कळतच नै Wink

काय लोकहो संपला का उत्साह? का आपला job 100% secured आहे आश्या भ्रमात आहात?

YouTube Vaidya मला तर भन्नाट कल्पना वाटत आहे, दर दोन आठवड्याला जरी एक video produce केला तरी त्याच्या publicity तुन खुप बर्‍याच नव्या ओळखी व ओळखीमधुन नविन कल्पना कळतील.

एक तर मला आत्ता लगेच सुचतेय... YouTube वर १०-१२ videos post झाल्यावर जेव्हा तुमचे थोडेफार नाव होईल, then you can start virtual consulting. In office, lot of meetings happen virtually over internet using webcams. There are many sites which provide services for virtual meetings. Use those services to start you own online clinic, give free consulting initially through email. if someone needs close attention ask them to use your virtual clinic.

चांगला विषय आहे. सर्वांनी विचार करवा असाच.

YouTube Vaidya मला तर भन्नाट कल्पना वाटत आहे>>> माणसा Happy मीही गम्भीरपणे विचार करत आहे या पर्यायाचा!! अर्थात या सगळ्यात काय लीगल्/इलीगल असा सगळा विचार करावा लागणार..

भिक्षुकी किंवा भटकी करणे....हली शास्त्रोक्त पुजा, होम्-हवन करणारे लोक लवकर मिळत नाहीत...मिळाले तरी काही तरी थातुर्-मातुर करुन पार होतात..
माझ्या मते याला काही फारशी तयारी लागत नाही..आणि स्वतः ची नोकरी सांभाळुन पण हा जोड धंदा म्हणुन करण्यासारखा आहे...

तसेच पुण्या-मुबै सारख्या ठिकाणी यांची काही कमी नाही हे मान्य्..पण एकदा जम बसला, publicity झाली तर चांगली प्राप्ती होउ शकते....माझा मित्र सांगत होता, कि त्याच्या companichya नविन ऑफिस चे उदघाटनच्या वेळी पुजेसाठी जो पंडित आलेला होता, तो एका private company मधे चांगल्या हुद्द्यावर होता..आणि हा त्याचा side business होता.. Happy

पण माणसा, धन्यवाद ह्या बाफ बद्दल्...खरच निकडीची गरज आहे विचार आणि कृती करण्याची Happy

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

Hi,
I am Kanchan,i was working with IT since last 4 year,got married in nov 08,came to US on H4....took leave withouy pay for 3 months.however because of economy dint get extended leave....i m getting bored sitting at home..since used to be super busy last 4 years..can anybody suggest i can do here at US on H4 and use my 4 years experience....primarily to keep me busy and to earn money....

thanks

कांचन
ही सगळी चर्चा वाचुन बघा. http://www.maayboli.com/node/7060
तुम्हाला या धाग्यावरचे काही काही मुद्दे उपयोगी पडतील.
अमेरीकेत डीपेंडंट व्हिसावर असतांना कुठल्याच पद्धतीने काम करुन पैसे मिळवता येत नाहीत.

when there is will, there is way.

अमेरीकेत डीपेंडंट व्हिसावर असतांना कुठल्याच पद्धतीने काम करुन पैसे मिळवता येत नाहीत.>>>
असे कुठल्या गुजराथ्या समोर म्हणाल्यावर तो काहीतरी मस्त उत्तर देईल.

मला माहीत आहे बोलणे सोपे आहे, आणि करणे अवघड... पण बोलल्याने कुठेतरी सुरवात होते, म्हणून बोलतोय Happy

if you were programmer back in India, then you can start contributing to open source projects. that'll give you mental satisfaction. for monetory benifits, learn how to make flower arrengments, find where you get cheap flowers and start selling your services in functions. Happy

माणसा, ते ही (फुले) लीगल नाही Happy पण ओपन सोर्स ची आयडिया खरेच चांगली आहे.

मागच्या काही वर्षांच्या अनुभवावरून, आर्थिक मंदीच्या काळात फारशी अपेक्षा ठेवू नका (ई-ए-डी आले तर चान्सेस जास्त आहेत हे नक्की). आर्थिक परिस्थिती सुधारली तर एच्-वन सुद्धा पुन्हा होईल, किंवा तोपर्यंत ई-ए-डी आले तर मग त्यावर नोकरी करणे सोपे होईल.

माणसा मला वैध मार्गाने म्हणायचे होते. Happy
कांचन यांच्याकडे EAD/Green Card नाही ही गृहीत धरुन मी लिहीले होते. अवैध मार्गाने डे केअर चालवणारे, जेवणाचे डबे देणारे, आणि अजुन बरेच काही करणारे लोक असतातच ना.

हा तर माझा प्रान्त.
१) Creative Writing करू शकता.Internet वर Content लिहू शकता. Ad film scripts etc. मी तर इन्ग्रजीतील काहीही text लिहूआनी edit करू शक्ते कर्ते पन. चान्ग्ले पैसे मिळतात. text management.
२) कुत्र्याना सम्भाळने. रोज चाल्वून आन्ने. रोज चे ५ कुत्र्यान्चे contract मिळाले तरी खूप. केनेल चालवने. केनेल मधे प्रत्येक कुत्र्यासाती रोजचे २०० रू भरावे लाग्तात.
३) tutions, crafts, लहान मुलाना शिकवने. चित्रकला, गणीत इ.
४) घरी hand made chocolates बनवने. अतिशय सोपे काम. पण प्रोफीट आहे.
५) अत्तर, स्प्रे, अगरबत्त्या साबन, पावडर बनवीने आनि विकने. जसे तुम्च्या colony साथी contract and advance payment घ्याय्चे.
६) वडापाव ची गाडी हा माझा ही back up plan आहे.
७) म्हातार्या मान्साना human touch, service पुरविणे.
8) House cleaning for busy people. valet service. or help network for single working people/ parents.
9) shop for others. with their lists and money. सर्व धन्द्या मधे सचोटि आणी उत्तम कामा ची गरज आहे.
शिवाय हिशेब चोख पाहिजे. आपली कीर्ती आपन्च बनविनार.
मी हे सर्व उद्योग केले आहेत. पूर्नेवेल नोकरी अस्ताना सुधा.

गंभीरपणे पर्याय शोधणार्‍यांसाठी, महाराष्ट्रात, ' जिल्हा उद्योग केंद्र' इथे व उद्योजकता विकास केंद्रांवर अशा अनेक याद्या मिळतात.
त्यातले प्रकल्प अहवाल मात्र दुर्लक्षण्यासारखे असतात. वास्तवाचा लवलेश असतो का नसतो त्यात हेच उमगले नाही.

उत्पादन उद्योग व सेवा उद्योग दोन्हींच्या याद्या मिळतात.

उद्योगासाठी आवश्यक बाबींचा सखोल आभ्यास त्यात पहायला मिळतो.

प्रत्यक्ष व्यापार / उद्योग करण्याचा अनुभव घेणे एकूणच महत्वाचे.

काही मुख्य कौशल्य आत्मसात करावे लागतात, उदा. विक्री कला
काही ज्ञान आत्मसात करावे लागते जसे: वित्त व जोखीम व्यवस्थापन
थोडे सोवळे बाजूला ठेवावे लागते उदा. करचोरी, विजचोरी, थोडेफार कायदे धाब्यावर बसवणे उदा. कामगार कायदे, सर्रास लाचखोरी [ऑर्डर मिळवण्यासाठी] ही सर्व कामे निष्ठूरतेने व सराइतपणे जो हे करू शकतो त्याला व्यापार / उद्योग करताना मानसीक अडचणी येत नसतील असे वाटते.
भारतात, असे काही करताना, FIRST BREAK ALL RULES, असा अ‍ॅप्रोच वाढतो आहे. ज्याने त्याने जेव्हढे जमेल, जसे जमेल तशी पावले टाकून वाटचाल करावी.

श्री. टाटा, श्री. नारायणमूर्ती यांचा आदर्श ठेवताना, सध्या व्यवहार्य नाही त्यामुळे बुडला असा शेरा पडतो.
नियम, कायदे तोडणे हे मनाला जड जाता कामा नये, असा मुलमंत्र इथे व्यवसायापुर्वी दिला जातो.

धन्यवाद.

ह्या प्रतिष्ठितपणावरून आठवले.मी माझ्या मुलाला पुण्याच्या एका हायस्कूल्मद्ये घातले. तेव्हा साहजिकच गणवेषाचा विषय निघाला तेव्हा शाळेने सांगितले की डेक्कन वर तर मिळेलच्.पन ह्या ह्या पत्त्यावर जा ते जवळ आहे. तिथे मिळेल. शाळेजवळचा पत्ता असल्याने लगेच गेलो अत्यन्त पॉश इमारतीचा पत्ता पाहिल्यावर चुकून तर आलो नाही ना असे वाटले. एका मजल्यावर गेलो .मजल्यावर दोनच फ्लॅट . एकाच व्यक्तीचे.म्हणजे सगळा मजलाच की. हिय्या करून एकाची बेल वाजवली. एका बाईनी दार उघडले. कपडे होतेच त्यांच्याकडे .विकत घेतले. ३५० रुपये. आश्चर्य म्हणजे ते घर पुण्यातल्या टॉपमोस्ट कार्डिऑलॉजिस्टचे होते.आम्ही आपले चोम्बडेपणाने 'डॉ.++++ म्हनजे?' 'हो हो ते माझे मिस्टर 'अशी बाईंनी हसून ओळख करून दिली. नन्तर विचार केला . नवर्‍याच्या एवढ्या मोठ्या रेप्युटेशनमध्येही बाईंनी आपली 'स्पेस' जपली होती. कदाचित आवडही असेल्.पण नवर्‍याची सावली बनून राहण्यापेक्षा स्वताची ओळख जपण्याची पद्धत आवडली.

<<भिक्षुकी किंवा भटकी करणे....हली शास्त्रोक्त पुजा, होम्-हवन करणारे लोक लवकर मिळत नाहीत माझ्या मते याला काही फारशी तयारी लागत नाही.. >>

हे काही खरे नाही. बरीच तयारी केल्याशिवाय खरे तर हे करूच नये, मला वाटतहि नाही की कुणि स्वतःशीच इतके अप्रामाणिक असतील की पैशासाठी इतरांच्या भावनांशी खेळतील नि देवाला विकतील! असले कुणी माझ्या घरी आले तर एका मिनिटात त्याला तोंडघशी पडून अपमानाने परत जावे लागेल.

भारतात कुठेतरी याचे शिक्षण देणार्‍या संस्था आहेत. तिथे जाऊन शिकावे.
Happy Light 1

माझ्या तर्फे एक सुचना - वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकुन translation ची कामे घेणे. हे एकट्याने करता येऊ शकेल.>>
या बद्दल कुणाला काहि अजुन माहिती आहे का? मला भाषा शिकायची आवड आहे त्यामुळे या कामातही रस आहे. भाषांतराची कामे नक्की कशी घेता येतात? त्यासाठी कशाप्रकरच्या प्रशिक्शणाची गरज असते?

भारतामध्ये लघु उद्योगांना सरकारी पाठिंबा कितपत आहे? इथे अमेरिकेत जसे 'small business' करणार्‍यांना खूप सार्‍या सवलती मिळतात.
तसेच भारतामध्ये independent consultant (eg. software) ही मानसिकता कितपत रुळलेय? तिथे health insurance वगैरेचा विशेष व्याप नसल्याने हे जास्त सोप्पे जाईल आणि कमीत कमी वेळ खर्चून जास्तीत जास्त मोबदला मिळेल, ते ही स्वतः एकट्याच्या मेहनतीवर.

shraddha138, भाषांतराच्या क्षेत्रात २ मुख्य प्रकारः

१. भाषांतर : म्हणजे लेखी. यात परत साहित्यिक भाषांतर आणि तांत्रिक भाषांतर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. (भारतात पोटापाण्यासाठी भाषांतर करायचं असेल, तर तांत्रिक भाषांतराला पर्याय नाही.)

२. दुभाषी : interpreter - तोंडी सांगायचं असतं, तुमची प्रत्यक्ष / फोनवर उपस्थिती लागते.). लहान - मोठी संभाषणं (उदा. बिझनेस डील्स) पासून ते मोठ्या कॉन्फरन्सकरण्या(उदा. EU किंवा UN ची सभा) काम करण्यापर्यंत याची व्याप्ती असते. यासाठी भाषेवर निर्विवाद प्रभुत्व हवं, कारण प्रत्यक्ष काम करत असताना काही रेफर करता येत नाही.

दिल्लीचं जे एन यू आणि हैद्राबादचं CIEFL या भारतातल्या या क्षेत्रातल्या शिक्षणासाठी महत्त्वाच्या संस्था.

अजून माहिती हवी असेल तर मला विपू / इमेल वर विचारू शकतेस.

- गौरी

Pages