एकट्या माणसाला करता येण्याजोगे उद्योग

Submitted by माणूस on 21 January, 2009 - 22:11

एकापेक्षा जास्त लोकांबरोबर काम करणे थोडे कठीण असते म्हणून...

मधे मला माझ्या camera ची एक lens विकायची होती म्हणून ad दिली होती. तर जो माणूस ती घ्यायला आला तो New York Police Department मधे कामाला होता. Transaction व बाकी ईकडच्या तीकडच्या गप्पा झाल्यावर तो मला म्हणाला की आता retire व्हायला तीन वर्‍ष राहीलीत म्हणून गेल्या दोन वर्‍षापासुन हा उद्योग सुरु केलाय. This is my backup plan, and it has already started to help me to make living out of it तो काही म्हातारा होता असे वाटले नाही, असेल ३५-४० वर्‍षांचा.

मग मी विचार केला, ह्याला तीन वर्‍ष fixed नोकरी शिल्लक असुन हा असा विचार करतो, आपली तर s/w मधली नोकरी. ज्याचा काही नेम नाही, आणि ३ महीन्यांन पुर्वीच अनुभव घेवुन झालाय.

म्हणून काहीतरी backup plan असायला पाहीजे असे वाटायला लागले.

तर कंप्युटर सोडुन मला अजुन काय जमतेय? काही नाही. कंप्युटर पुर्वी म्हशीं चे दुध काढायचो आणि विकायचो, पण ते आता जमेल असे वाटत नाही ना करायची ईच्छा असेल. (शहरीकरण :))

तर... do you have any backup plan ideas, or do you have any backup plan?

Lets hope some new unthought ideas will pop-up, and you read only members, register and reply.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>do you have any backup plan ideas, or do you have any backup plan?
कुणाकरता?
माझ्यासाठी म्हणत असशील तर मोप हेत! Happy
लिम्बीच्या गावाला धा वर्सापूर्वीच शेत घेवुन ठेवलय, दोन वेळचा भात नक्कीच सुटेल त्यातुन! Happy
अधेमधे जमेल तेव्हा लिम्बीच्या बाबान्च्या हाताखाली "उद्योगाला" जातोय, जमेल हळू हळू!
पन्चान्ग तर काय? नेहेमीच सन्ग अस्तय, थोडा अभ्यास वाढवायला हवा!

तरी पण, शहरातल्या आजच्या महागड्या रहाणीमानात माझा निभाव लागेल का?
नाही! नाही लागणार निभाव!
हाताशी आलेली पोर बॅकअप प्लॅनचा हिस्सा होऊ शकत नाहीत हे भानही ठेवायला लागत, त्यान्ना दिशा मिळाली की त्यान्चे ते स्वतन्त्र होणार, त्यान्च्यावर विसम्बुन राहून चालणार नाही!

मी सद्ध्या निरनिराळ्या खाद्यपदार्थान्च्या फास्ट डिश करायचा जोमदार प्रयत्न करतो हे! Happy वेळच आली तर वडापावची हातगाडी नाहीतर पानपट्टी कुठे चुकली नाहीये! त्यात थोडी सुधारणा करुन इतरत्र न मिळणारे पदार्थ ठेवले की झाले काम!

एक हे, बॅकअप प्लॅन म्हणून "राजकारणात" पडायच वेळीच बघायला हव होत Proud , पण ते झाल नाही! इथुन पुढे होईल अस चिन्ह नाही

तुमच्या काही सजेशन्स?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

ok, I am expecting to earn minimum 2000 rs per day. I used to make 1000 rs a day by selling milk 10-12 years back, now expecting more.

tell one thing, 1000 rs a day, whether it was turnover or net profit?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

माणसा,
पुर्वी जर निर्भेळ दूध विकून १०० रुपये कमवत असशील तर आता त्यात पाणी मिसळून विक २००० नक्की मिळतील. Happy
जोक्स अपार्ट.... तसे एकट्या माणसाने करण्याजोगे उद्योग आणि त्यातून मिळणारा मोबदला बराच आहे पण त्यासाठी खूप गोष्टींची तपासणी करावी लागते, मग कुठल्या कामात सतत खुर्चीवर बसणे, किंवा सतर फिरणे, खूप बोलावे लागणे, भांडवल, जागा.. हे मुद्दे ही येतात त्यापैकी तुझी तयारी कशाची आहे हे ही लक्षात घ्यायला हवं.

बॅक अप प्लॅन- गडगंज सासरा गटव!!!

बरेच उद्योग आहेत की असे
वास्तु कंसल्टंट; इन्टिरियर डेकोरेटर; रियल इस्टेट कंसल्टंट; वेडिंग/ इव्हेंट प्लॅनर;गिफ्ट बास्केट बनवणे; कंपन्यांमधे झाडांची निगा राखणे; फुलांची अरेंजमेंट ठेवणे/ बदलणे; कंपन्यांसाठी चित्रांची/शिल्पांची लेंडिंग लायब्ररी; फाडफाड इंग्रजीचे /व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस;मुलांचे/ घरांचे फोटो काढून देणे; बारीक सारीक होम इम्प्रूव्हमेन्ट कामे करणे; लॅन्डस्केप डिझाईन अन मेन्टेनंस;

अजून आठवले की लिहीन

माणसा, एखाद्या Amway/Quixstar वाल्यानी तुझ्या या पोस्ट वाचल्या तर तो उधळलेल्या गाढवासारखा पाय झाडत नाचायला लागेल! Proud

doctor बायको असेल तर उत्तम.... recession चा काही impact नाही होणार..

कंसलटींग चा प्रकार चांगला वाटतोय. पण ज्यात खुप स्पर्धा नाही असे कोणत्या कोणत्या प्रकारच्या कंसल्टींग करता येवु शकतात. परत दुधावरुन मला माहीतीय तेव्हा फ्रिज च्या कंसल्टींग मधे जास्त स्पर्धा नव्हती. अजुन असे काय प्रकार माहीत आहे का कुणाला.

१००० रु टर्नओव्हर मधे काय होणार? त्यावेळेस आमच्याकडे जवळ जवळ १०० म्हशी होत्या व दिवसाला साधारण ४०० ली दुध विकले जायचे. anyway past is past.

उद्योगात दोन प्रकारच्या लोकांवर विसंबुन रहावे लागते. skilled labor/unskilled labor.

skilled लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर ते अपल्याला फसवतात व ते कधी किती पैसे खातील ह्याचा नेम नसतो. कष्ट करायची ईच्छा नसते.

unskilled लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की ते लोक नीट काम करतीलच असे सांगता येत नाही, वर 11th hour ला हात वर करुन निघुन जावु शकतात.

त्यामुळे एकट्या माणसाला जमेल असा सुटसुटीत उद्योग काय?

शेअर ट्रेडींग कुणावरही डिंपेड न रहाता करता येवु शकते, पण त्यात काही human interaction नाही... and we all are social animals.

त्यामुळे एकट्या माणसाला जमेल असा सुटसुटीत उद्योग काय?

शेअर ट्रेडींग कुणावरही डिंपेड न रहाता करता येवु शकते, पण त्यात काही human interaction नाही... and we all are social animals.

>>> माणसा तुला नक्की काय हवय ते ठरव बघू आधी. एकटा की सोशल? Proud

well I would like people to use my skills/services, from this first I expect to get monetary benefits and next get appreciation, so i am talking about that kind of human interaction.

by dependency i meant, i should be able to provide the services on my own with very little or no help from others. Like deepanjali, she provides mehandi services on her own, not sure if she needs any help. She might need some, but I guess that’s limited.

Here is something said by Steve Jobs (Apple CEO)

Being the richest man in the cemetery doesn't matter to me... Going to bed at night saying we've done something wonderful... that's what matters to me.

The only way to do great work is to love what you do. If you haven't found it yet, keep looking. Don't settle. As with all matters of the heart, you'll know when you find it.

Innovation distinguishes between a leader and a follower.

Design is not just what it looks like and feels like. Design is how it works.

>>>> माणसा, एखाद्या Amway/Quixstar वाल्यानी >>>>> Lol
मन्दारा, खदखदा हस्लो रे भो!

माणसा, लेका शम्भर म्हशिन्चा सन्सार सोडून बोम्बलायला आयटीमधे कुठे घुसलास?
च्यायला, शम्भर म्हशिन्च शेण जरी विकल बरी बक्कळ पैका मिळेल! Happy असो, झाल ते झाल, आता पुढच ठरवुयात!
मला अस वाटतय की तुला......
१) कमित कमी किन्वा NIL भान्डवलात व्यवसाय सुरु करायचा हे
२) त्यासाठि कोणावरही अवलम्बुन राह्यला नको असाच व्यवसाय तुला हवाय ज्यात तुझी वैयक्तिक कौशल्ये वापरली जातील
३) भरपुर आर्थिक आवक हवी हे
४) मानसिक समाधानही हव हे
ओक्के! या मागण्या रास्त हेत
पण याची पूर्तता करण्यासाठी, तुझ्यापाशी काय काय उपलब्ध हे ते माहिती हवे! Happy
तरीही, पुढील बाबी तू करु शकतोस
१) व्यावसायिक सल्ला केन्द्र: हे कोणत्याही विषयाकरता असू शकेल, आयटीपासून बायटीपर्यन्त (वधुवरसूचक केन्द्र), रेसच्या घोड्यापासून व्यसनमुक्ती केन्द्रा पर्यन्त, म्ह्शीन्च्या वाणापासून ते वाणसामानापर्यन्त, मनीमॅनेजमेण्ट पासून इव्हेण्ट मॅनेजमेण्ट पर्यन्त काहीही म्हणजे काहीही......
फक्त यात एक हे, वाट बघायला लागते गिर्‍हाईकाची! आणि एकदा का गिर्‍हाईक सापडले की अगदी व्यावसाईकरित्या त्याच्या खिशावर वस्तरा चालवायला लागतो
२) ट्रेडीन्ग अर्थात व्यापार: कोणतीही वस्तू इकडून खरेदी करुन तिकडे कमिशन घेवुन विकणे
३) मॅन्युफॅक्चरिन्गः उपलब्ध भान्डवल व स्कील नुसार वस्तुन्चे उत्पादन करुन ते विकणे
४) राजकारणात पडणे
आता बोल, तुला यातल काय काय जमु शकेल वा नाही? कारणान्सहीत स्पष्टीकरण दे बघू! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

ह्म्म्म .. खुप चांगल्या प्रश्नावर चर्चा चालु आहे. वैयक्तिक कौशल्यावर आधारित काय काय उद्योग करता येतील ?

मला वाटतं ... १ली ते १० वीच्या शिकवण्या घेता येतील.. आज काल काय मराठी, इतिहास, भुगोल, संस्कृत या विषयाच्यापण शिकवण्या लागतात. पहिल्या वर्षीचा निकाल चांगला लागला की दुसर्‍या वर्षापासुन शिकवणी फुल होते.

याशिवाय घर बर्‍यापैकी मोठे असेल तर पाळणाघर, संस्कारवर्ग काढता येतील. तुमची सेवा खरच चांगली असेल तर चांगला प्रतिसाद मिळु शकतो. बरेच जण घरी होलसेल मधुन साड्या, बेडशीट, टॉवेल्स ई. ई. आणुन विकतात. यात गोची एवढीच होते की उधार वाढली तर अडचणीत येऊ शकतो. झालंच तर जमतील तेवढ्याप्रमाणात जेवणाचे डबे करुन देता येतील. उन्हाळ्यामधे उन्हाळी पदार्थ करुन देण्याचे उद्योग पण जोरात चालु असतात. आजकाल असले पदार्थ घरी करायच्या फंदात कोणी पडत नाही. चांगले मार्केटिंग करु शकत असाल तर या गोष्टी सहज जमतील .. पण यासगळ्यात यश येईपर्यंत प्रचंड चिकाटी ठेवावी लागते.

अजुन काय काय करता येईल .. खुप विचार करण्यासारखे आहे. सद्यातरी एवढेच आठवते आहे.

आवड, जागा आणि कौशल्य असेल तर एकट्याने शिकवण्या घेता येतात, पण त्यातली आर्थिक आवक ठराविक मर्यादेत अडकते.

मलाही हा विषय आवडला.

१) पोळी भाजी केंद्र उघडू शकतोस.
२) खानावळ काढू शकतोस माणसा.
३) ऑरगॅनिक भाज्या विकू शकतोस.
४) केस कर्तनालय उघडू शकतोस.
५) फुलझाडांची नर्सरी उघडू शकतोस.
६) गायी म्हशींचे दुध कसे काढायचे ते शिकवू शकतोस.

पण एक दोन वर्ष जम बसायला वेळ लागेल. कुठल्या शहरात तुला हे सर्व करायचं आहे त्याला खूप महत्त्व आहे. मोठ्या शहरात उद्योग जास्त चालतात.

असो.. तुला यासाठी शुभेच्छा!

तू खरचं म्हशीचे दुध काढायचासं यावर विश्वास नाही बसतं.

कुठलाही उद्योग केला तरी एक गोष्ट चुकणार नाही ती म्हणजे विकणे. मग ते वस्तु विकणे असो, अनुभव विकणे असो किंवा सेवा विकणे असो. बाकी स्वतः किंवा कुणाकडून करून घेता येईल. याउलट स्वतः काहीही केले पण विकणे (स्वतःला, वस्तुना) जमले नाही तर उद्योग जमणार नाही.

जितका एखाद्या गोष्टित पैसा जास्त, तितकी स्पर्धा जास्त आणि विकणे अवघड. किंवा मी तुमच्या जागी असेन तर स्पर्धा नसलेल्या कुठल्याही क्षेत्रात पडण्याअगोदर हे क्षेत्र इतराना अजून कसे सापडले नाही, का सापडले होते पण पुरेसे पैसे नसल्यामुळे कोणी टिकून रहात नाही, यावर मी खूप विचार करीन. माझी सेवा/वस्तू कोण विकत घेणार, केवढ्याला विकत घेणार आणि मी ठरवलेल्या भागात माझी सेवा विकत घेउ शकतील असे किती लोक असतील हे ठरवणे फार महत्वाचे आहे.

सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातही अजून एका व्यक्तिने करायचे क्षेत्र आहे (स्पर्धा भरपूर आहे पण तुमच्या डोक्याशिवाय फार भांडवल लागत नाही ) ते म्हणजे स्मार्टफोन्स साठी Games, Utilities लिहिणे. उदा. Iphone applications.

६) गायी म्हशींचे दुध कसे काढायचे ते शिकवू शकतोस >>> हे शिकायला कोण आणि किती लोकं येणार? मुख्य म्हणजे हे कशासाठी शिकणार?

>>>
तू पुर्वी म्हशींची दुध काढत होतास याचे खूपच नवल वाटले. एकतर तुझे इतके चांगले ईंग्रजी आणि त्यात तू तुझ्या कपड्यांचा मागे एकदा क्लोसेट टाकला होता त्यावरुन हा मुलगा फार उंच स्तरावरचा आहे असे वाटले.
>>>>
बी भाउ, म्हशीचं दुध काढणे, शेण गोळा करणे, नांगरणे इत्यादी गोष्टींचा आणि उंच स्तराचा काय संबंध?

--------------------------
बहोतसे आधे बुझे हुए दिन पडे है इसमें
बहोतसी आधी जली हुइ राते गिर पडी है
ये ऍशट्रे भरती जा रही है

अजय, परफेक्ट मुद्दा! विकणे ही स्वतन्त्र कला हे, ती अवगत असली तरच खैर अस्ते! Happy

या माणसाने रु.२,००० दर दिवशी हा आकडा फोडल्यापासुन माझी तर मतीच गुन्ग झाली हे! (आयला, मी अजुन ५०० ची लिमिट धडपणे क्रॉस करु शकलो नाहीये Sad )
नाही, अस्तात, तसेही व्यवसाय अस्तात, नोकर्‍या अस्तात..... अगदी देशात, पुण्यामुम्बईत देखिल दर तासावर फी आकारणारे कन्सल्टन्ट माहिती हेत! पण हा फारच वरचा स्तर झाला हो! माझ्या कुवती बाहेरचा हे! Happy
माणसा... आधी तुझ्यापाशी इन्व्हेस्ट करण्यालायक काय काय हे ते सान्ग बर, म्हणजे मग सुचवता येईल! अन मुख्य म्हणजे हे तुला कुठे करायचे आहे? देशात की देशाबाहेर? त्यावरही बरच अवलम्बुन हे! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

माणसा... आधी तुझ्यापाशी इन्व्हेस्ट करण्यालायक काय काय हे ते सान्ग बर, म्हणजे मग सुचवता येईल! अन मुख्य म्हणजे हे तुला कुठे करायचे आहे? देशात की देशाबाहेर? त्यावरही बरच अवलम्बुन हे! >>>>

अरेच्या हा माणसाला उद्योग सुचविण्यासाठीचा बाफ आहे होय... मी उगाच वर काहीच्या बाही सुचवले आहे. मला वाटले केवळ आपापल्या कल्पना सांगायच्या आहेत की वैयक्तिकपणे काय काय उद्योग करता येतील. माणसा तुला माझी वरची पोस्ट वाचुन राग येणे स्वाभाविक आहे... तुला मी शिकवणी, खाणावळ असलं काय सुचवलं ... पण ते तुला उद्देशुन नव्हते... सर्वसामान्यपणे काय करता याच्या त्या शक्यता होत्या.

तुमच्याकडे काय 'स्कील्स' आहेत हे ज्यांना माहित आहे ते नक्कीच तुम्हाला काहीतरी चांगलं सुचवु शकतील.

गैरसमजाबद्दल मी मनापासुन दिलगीर आहे....

पल्लवी

टण्या, मला त्या दोन गोष्टी माणसाशी विसंगत वाटल्यात. कुठलाही मनुष्य जो गायी म्हशींचे दुध काढतो तो काही फार शिकलेला नसतो. त्याचे राहणीमान फार उंचावलेले नसते. तो फार शहरी जीवन जगत नसतो. काहीजण अपवाद असतात त्यातलाच एक 'माणूस' आहे.

अरे बापरे बरेच प्रतीसाद येवुन गेले की.

नाही नाही हा काय माझ्या साठीचा फलक नाहीय, ईथे खुप लोक असतील ज्यांना काही करायची ईच्छा असेल, त्या सर्वांसाठी आहे. so continue...

परिस्थीती सगळे काही शिकवते, दुधाच्या व्यवसायात घरातले आहे नाही ते सगळे संपल्यावर लोकांची देणी फेडायला काहीतरी करावे लागणार होते, so i did what i had to and btw, i hold masters degree.

बाकींच्याना उद्या उत्तरे देतो, आता good nite/day Happy

माझ्या तर्फे एक सुचना - वेगवेगळ्या परदेशी भाषा शिकुन translation ची कामे घेणे. हे एकट्याने करता येऊ शकेल.

आणि वेगवेगळ्या वाद्यांचे classes घेणे. (अर्थात वाद्यं येत असल्यास.)

रेडियो साठी लहान लहान जाहीराती लिहून देणे!
हा पण एक मजेदार उद्योग आहे.

कुणीतरी केशकर्तनालय म्हटले आहेच... जरा आधुनिक नाव देऊन आणि आधुनिक सामुग्री ठेऊन हाच उद्योग करता येऊ शकतो!

_________________________
-Impossible is often untried.

पर्यटक स्थळांचे गाईड/मार्गदर्शक होणे.

चांगला विषय आहे. विशेषतः ज्यांना घरा कडे/ मुलांकडे पण लक्ष द्यायचे आहे आणि स्वतः च काही उत्पन्न असावे असे वाटतय अश्या माझ्यासारख्या ग्रुहीणीं साठी.

गेले तीन चार दिवस जरा कामात अडकलो होतो त्यामुळे ईथे येवु शकलो नाही.

होप तुम्ही लोकांनी देखिल गेले काही दिवसात कुठेतरी का होईना, थोडाफार विचार करायला सुरवात केली असेल.

beginning somehwere is important, then next comes persistent efforts and patience.

मधे तीन एक वर्षापुर्वी माझ्या एका बहिणीने ७-८ बेड असलेला दवाखाना उघडला, पहीले वर्ष असेच रिकामे गेले, हळू हळू जम बसु लागला आणि आता ती भाड्याच्या जागेतुन स्वतःच्या जागेत shift व्हायचा विचार करतेय. so there is beginning, efforts and patience, from my experience all pay back someday

अजुन एक महत्वाचे म्हणजे, स्वतःचा उद्योग करताना कसलीही लाज बाळगायला नको. पुर्वी मी रहायचो त्याच building मधे एक अती सुंदर मराठी मुलगी/बाई(?) रहायची, ओळख झाल्यावर कळाले ती tiffin बनवुन देते, नंतर अजुन ओळख झाल्यावर कळाले की ती पुर्वी "all the best" नाटकामधे काम करायची. आता त्या नाटकाचे कोणते version वैगेरे मला माहीत नाही, ना मी त्या details मधे गेलो. पण point is, she is not saying i used to be actress, i am in new york city where people come from all over world to act and i wont do work like cooking food for others. She took the decision which she felt was right at that situation.

होप वरील points वाचुन तुमच्या विचारांना अजुन चालना मिळेल. त्यातुन ज्या कल्पना सुचतील त्या ईथे जरुर लिहा. माझ्या मनात रोज बिजनेस च्या चिकार कल्पना येतायत, पण अजुन "हेच ते" असे नाही झालेय.

तरी कुणाला करावेसे वाटले तर काही प्रकार.

अमेरीकेत हजारोनी छोट्या छोट्या consulting कंपन्या आहेत, ज्या अपल्या consultants ना दर weekend ला timesheet fax करायला सांगतात. as i stasrted from bodyshopper and used to help them in this timesheet stuff, i kind of know what they do with it, a) they need it as proof b) enter all the details in sreadsheet, track how much payment is received from company, how much is paid back to the employee, send details to payroll running company.

these companies cannot afford time tracking software or they dont want to afford one.

now what one can do is create a simple application in which consultant can enter his weekly time. later your application provides nice reports to the bodyshopper, also helps him to track in/out money against those hours.

You are going to take care of hosting and all maintenance for this applications. and what you are asking in return is 2 cent per hour/per person.

thats 4 $ per person per month

thats 40 $ if you take a very small scale 10 consultant company.

if you'll get 7-10 companies also like this, thats still a lot of money. you can start with free 3 months trail or give free service to someone to understand how the model actually works.

----------------------------------------------------------------------
few more simple, not so complex and easy ideas tomm.

Pages