पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mala instant upma kartat tasa sabudanyachi khichadi karta yeu shakte ka koni sangu shakel ka? ani ti kashi karaychi ani te mixture kiti diwas changle rahu shakte pls. koni dtl madhe sangel ka?

बिग बझार आणि इतर सुपर मार्केट्स मध्ये जे पांढर्‍या रंगाचे मश्रूम्स मिळतात, ते साफ कसे करायचे म्हणजे त्याचे कोणते पार्ट्स काढून टाकायचे?

दिनेश् दा मला १५ महिन्याच्या मुलिसाथि काहि पदार्थ सुच् वा please. ति कहिच खात नाहि. १ वीक HOSPITAL मध्ये थेवुन पहिले. सग् ले TEST झाल्या. १ स्पून च्या वर कहिच खत नहि. PEDIASURE वर जग्ते आहे. कहितरि सुच्वा. रोज रोज ३/४ वेला नवीन कराय् ला मला time मिलत नाहि. मि SINGLE MOTHER आहे. तूम् च्या RECIPES खुप आव् डतात.सोप्या अन खमंग.........

पुण्यात चिंचेचा तयार कोळ कुठे मिळु शकेल? मी बर्‍याच ठिकाणी चौकशी केली परंतु मिळाला नाही. जर तयार कोळ मिळत नसेल तर चिंचेचा घट्ट आणि टिकाऊ कोळ कसा करावा?

सुमेधा पुण्यात ज्ञानल कार्यालया शेजारी कॅनिंग सेंटर आहे तिथे चिंचेचा तयार कोळ आणी चिंचेचा सॅस मिळतो..तिथे ट्राय करुन बघा..

बाजारात डाबर होममेडचा चिंचेचा कोळ कुठल्याही दुकानात मिळु शकेल/. आणि नाहीच मिळाला तर मॉल मधे जिथे आल लसुण पेस्ट --डाबर कोकोनट मिल्क ठेवलेल असत तिथे मिळेल नक्की.
मी तोच वापरते. चांगला आहे Happy

रुपांतर, मुलीला अन्न गिळायला तर त्रास होत नाही ना ? कधी कधी अन्ननलिकेचे तोंड लहान असले तर मुलाना गिळायला त्रास होऊ शकतो. त्याची तपासणी झाली असेलच ना ?
एरवी भूक न लागायचे काही कारणच नाही. जर कफाचा त्रास नसेल (तो बहुतेक बाळाना असतोच ) तर गोड थंड पदार्थ देऊन बघा. चायना ग्रास, कष्टर्ड, आईस्क्रीम, खीर वगैरे. तूप, मध एकत्र करुन देता येईल. अगदी चिमूटभर सुंठ त्यात घालायची.
तिला दात आले आहेत का ? आले असतील तर गूळपापडी, चिक्की देता येईल. घराच्या बाहेर उघड्यावर नेऊन, गप्पा मारत भरवून बघा. कधी कधी कंटाळा हे पण न खायचे कारण असते (टीव्ही शक्यतो नकोच )
जंताचा त्रास होतो आहे का ? त्याचे औषध दिले का ? तेही भूक मंदावण्याचे कारण असते. हा त्रास हल्लीच सुरु झाला का ?
(शक्यता कमी आहे,) पण काही मानसिक तणाव आहे का ?
औषधांपेक्षा, आहारातून मिळालेले पोषण, कधीही जास्त मानवते. एखादी जेवणाची वेळ टाळून / बदलून बघा. कदाचित आपणहून ती खायला मागेल.
सविस्तर लिहा, आम्ही सगळे मदत करुच.

दिनेश् दा तुम्हि ग्रेट आहात...many thanks for the reply. I will tell you bit more about Arya.
१. अन्न गिळायला ज् र त्रास होत असेल तर ति vomit / gag sound karel प ण तसे कहि नाहि.
२.दात (३ ) आले आहेत. घरात् ले सग् ले corners,balcony वापरुन झाले for meal time .खुप नख्र रे आहेत बाहुलिचे.
3.जंताचा त्रास असेल तर diarrhea, pooh issues नाहित.
४. सग् ले मउ , chunky,finger ,cereal,puree,boiled प्र् योग झाले.
आता २ -3 kg वाढन्हे जरुरि आहे. नाहितर परत hospital. please 3/4 पोषक पदार्थ सुचवा.गोड एवढ आवडत नाहि.माझे प्रयत्न चालु आहेत् च.

पोह्यांचा करदंड ( हा अगदी गोड नसतो, आल्यामूळे किंचीत तिखट लागतो ), वजन वाढण्यासाठी नाचणी सत्व, वापरून केलेल्या तिखट पोळ्या, थालिपिठ वगैरे. सातूचे पिठ (बाजारात तयार मिळते )
बदाम, आणि खारीक उगाळून. आवळा आणि इतर आंबट गोड फळे (हातात देऊन खायला लावणे )
खारी बिस्किटे, कॉम्प्लॅन / हॉर्लिक्स सारखे पेय. काजू व बदाम वापरून केलेले केक, चॉकलेट्स.
चालत असेल तर अंडे, चिकन सूप. रोजच्या जेवणात थेंबभर लिंबाचा व आल्याचा रस (हा एकत्र करुन फ्रिजमधे ठेवता येतो, रोज काढायची जरज नाही.)
जेली, चायना ग्रास वर सुचवले आहेच. राजगिरा व नाचणी यांचा शक्य तितका वापर. तूपाचा मर्यादित वापर. अंगाला तिळाच्या तेलाचे मॉलीश (निदान आठवड्यातून एकदा तरी ) अवश्य करावे.
ग्लेज्ड कॅरट्स, गाजर हलवा, दूधी हलवा., भाज्यांचे आईसक्रीम.
नूसत्या उकडलेल्या रंगीबेरंगी भाज्या (बीट, बटाटे, गाजर, मका, स्विट कॉर्न, शेवग्याच्या शेंगा )
तांदळाची पेज (मीठ व मिरपूड घालून )
मुख्य म्हणजे रोज खाणे बदलत रहायचे. शक्यतो, भरवण्यापेक्षा हातात धरुन स्वतःच्या वेगाने खाऊ देणे.

रुपांतर, लेक खेळते का ? तिला जेवायच्या वेळे आधी लहान मुलांचे व्यायामाचे प्रकार करुन बघा. उदा: उड्या मारणे, इ.

पूर्ण वेळ लिक्विड डाएटवरुन सॉलिड्स वर जाताना माझ्या लेकाने पण बराच त्रास दिला. मुलीला फळं आवडतात का ? दूध पिते का ? दोन खाण्यांमधली वेळ वाढवुन बघा. तसेच आधी तिचे रुटीन सेट करण्यासाठी फक्त तिचे आवडते पदार्थ द्या. मग भलेही दिवसातुन दोनदा एकच पदार्थ खाऊ देत (पिडिआशुअर नको). तसेच एकाच जेवणात थोडा भात, एखादं फळ, थोडं दूध असे वेगवेगळे पदार्थ देऊन बघा.

आणि टीव्ही/व्हिडिओ बघता बघता चार घास जास्त खाणार असेल तर काही हरकत नाही. सध्या तिचे वजन वाढणे गरजेचे आहे. माझ्या लेकाला स्टमक फ्लु झाला होता तेव्हा पिडिआलाइट प्यायला नाही म्हणायचा. मग त्याचे आवडते व्हिडिओ लावुन मी त्याला पिडिआलाइट द्यायचे. बरा झाल्यावरही कितीतरी दिवस जेवताना व्हिडिओ लाव म्हणायचा. पण हळुहळु गेली ती सवय. हॉस्पिटलमधे जाण्यापेक्षा हे बरे असे मी म्हणेन.

वर मी विचारले होते की 'बिग बझार आणि इतर सुपर मार्केट्स मध्ये जे पांढर्‍या रंगाचे मश्रूम्स मिळतात, ते साफ कसे करायचे म्हणजे त्याचे कोणते पार्ट्स काढून टाकायचे?"
कोणिच उत्तर दिले नाही Sad
चुकीचा प्रश्न होता का? ते पुर्ण च्या पुर्ण वापरायचे असतात का?
त्याच्या आत काहीतरी काळे तंतु आहेत, ते काढून टाकावेत का?

अमि मश्रुम संपूर्ण वापरले तरी चालतात. काही जण त्याचे मोठे देठ काढून टाकतात पण मी तरी संपूर्ण वापरते.

हो मी पण पुर्ण मश्रुम वापरते. फक्त एक काळजी घ्या वापरण्या आधि नेहमी भाज्या वगेरे धुतो त्यापेक्षा जास्त धुउन घ्या त्याला बरीच माती वगेरे असते.

मश्रूमचा तळाचा भाग जर काळा झाला असेल तर तो कापून टाकावा. एरवी पुर्ण मश्रूम खायला हरकत नाही. वर फारच माती लागली असेल (जो भाग तपकिरी झाला असेल) वा सडला असेल तर तेवढा भाग काढुन टाकायचा. एखाद्या कृतित (उदा स्टफ्ड मश्रुम ) दांडे काढायला सांगितले असतील, तर तेही चिरुन स्टफिंगमधे वापरायला सांगितलेले असतातच.
मागे जगजितसिंग कालरा यानी मश्रुम धुताना, त्याला तांदळाचे पिठ लावून धुवायला सांगितले होते. त्याने ते साफ होतात. (पण शक्यतो ताजे मश्रुम घेताना, जास्त डाग पडलेले घेऊच नयेत. )

हो रुपांतर, आधी खुप चर्चा झालीय इथे. लालूने लिंक दिली आहेच.

अहो हट्टाने नाही लिहिल. लालुने दिलेल्या link वर मला तरि लहान मुलान्चा आहार हा section दिसला नाही. आरोग्यम धनसम्पदा मधे तो आहे. रुपान्तरला पटकन उत्तर मिळाव असा उद्देश होता. मला तरी तिच्यापर्यन्त ते पोचण महत्वचे वाटले. माझी मुलगी keyboard दिसला की लगेच keys press करते...तरी लिहिल...चूक भूल माफ करावी.

मिनोती, मी त्या गटात सामिल नव्हते झाले, त्यामुळे, मला "मुलान्चे खाणे " हे सदर बहुतेक दिसत नव्ह्ते. लालुची link बरोबर आहे.

चूक दुरुस्त केली आहे. पण ती दखवून द्यायची पध्दत खटकली. हट्टाने लिहिले हे presumptuous नाही का? असो. विषयान्तर झाल म्हणुन टिका होण्यापूर्वी थाम्बते.

धन्यवाद, मला वाटले की मी काही तरी चुकीचे विचारत होते.
मी जे मश्रूम आणले होते, त्यांना तो टोपीसारखा भाग असतो त्याच्या आतल्या बाजूस काळे तंतू होते. ते मी काढून टाकले.

मी आणते मश्रुम्स त्यांना बाहेरुन माती असते लागलेली, मागे दिनेशनी मश्रुम्स पाण्याने धुतले तर पाणचट होतात लिहिलेले, त्यामुळे मी त्यांना धुत नाही, पण उकडलेला बटाटा सोलावा तशी त्याचे वरचे कवर अलगद सोलुन काढते, खालचा दांडा जरासा कापते आणि मग वापरते.

नाही शिजवला तरी चालतो..दलियाला आधी थोडं भाजुन घ्यायचं रव्यासारखं..

धन्स..

Pages