परतोनि पाहे- पूर्वतयारी चेकलिस्ट. काय करावे आणि करू नये आणि शाळा

Submitted by रैना on 12 January, 2010 - 12:24

इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. Proud
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैदराबाद, मुंबई ला दिसली , इतर ठिकाणी माहित नाही >>> इतर ठिकाणच्या लोकांना गरज पडत नसेल त्याची Wink

नुसत्यआ जीन्सचं नाही पूर्ण वॉर्डरोबच आवडेल मला यूएस हून
>> अरे, भारतात सगळ्या प्रकारचे सगळे कपडे विकत/शिवून मिळतात रे.. म्हणजे अर्थातच असलेले छान छान कपडे इथेच सोडून जायला नकोच वाटेल. पण तिथे मिळत नाही असं काहिच नाही!

मला वेस्टर्न कपडे इथलेच आवडतात. माझेही नी मुलांचेही. भारतातून मुलांचे वेस्टर्न कपडे आणणं मी कोणे एके काळी बंद केलं. फक्त एथनिक...
मला परदेशातून भारतात परत जाताना (शक्य झाल्यास) फर्निचर, अप्लायन्सेस, आर्ट पीसेस वगैरे न्यायला आवडतील.

मल पण वेस्ट्र्न कपडे इथलेच आवडातात, क्वलीटी/स्टाइज दोन्ही साठी, नो मॅटर मेड इन पुढे कुठल नाव आहे :).
देशात वेस्टर्न मधे weird fashions असतात ! Uhoh

डिजे हल्ली हायपर सिटी, सेंट्रल मधे वेस्टर्न कपडे बरेच बरे मिळतात.. बाकि मुलांच्या कपड्यांबाबत अनुमोदन.. मुलांच्या परटिक्युलरली मुलग्यांच्या जीन्स कायच्याकाय असतात. कुठेतरी खिसे, कुठुनकुठुन दोर्‍या निघालेल्या... मुलांचे कपडे अमरिकेत खूप क्युट मिळतात. Happy

अमृता,
पुणे-मुंबई-हैदराबाद चे सेंट्रल, पिरॅमिड्स , लाइफ्स्टाइस, सगळे मॉल्स पालथे घातलेत पण वेस्ट्र्न कपड्यांची ट्रेंड च विचित्र आहे भारतात..

नाही, मला कुठचेच नाही आवडत. मागे वेस्टसाईडला घेतलेले ते जरा बरे वाटलेले. बांद्रा वेस्टला ही एक दुकान चांगलं वाटलेलं.

मला अमेरिकेमधली केबल जाताना न्याविशी वाटते. सध्या भारतातला कार्यक्रमांचा दर्जा (निवडक वगळता) फार घसरला आहे. हिंदी सिरियल्सची तर नावं ऐकूनच काटा येतो अंगावर.

परत यायच ठरलयं ना आता?

मग तिकडचे काय इथे मिळते ते शोधत बसू नका, इथलेच मला काय शोभतेय, परवडतेय हे बघा.

शाळा/कॉलेजात भारतीय नागरिकत्व असलेल्यांना प्रवेश मिळतो ना? मग इथले उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर एक तर ५ पट फी भरा किंवा स्टेटस बदला. ज्यांची मुले केजीत आहेत (माझ्यासारखे) त्यांनी परत सेव्हिंग सुरू करा कॉलेजप्रवेशासाठी!

परदेशात असताना हायक्लास जगण्यासाठी खर्च करतो ना आपण? मग भारतातलं हायक्लास जगणं स्वस्त कसं असेल?

मला खरच कमाल वाटते कधी कधी की परदेशात ५ - १० वर्ष काढली की एवढे बदलतो आपण की "देसी" फॅशन/चॅनल्स विचित्र वाटतात? एकदाच ठरवा आपण इथले की तिथले? आणि मग सुखात रहा. सारखे तिथे कसे छान आहे किंवा भारतात कित्ती छान नि सुरक्षित असे करत बसू नका. त्रास होतो त्याचा आणि जे पुढ्यात आहे ते निरस वाटतं.

जस अमेरिकेत - युरोपात - मध्य पूर्वेत - अति पूर्वेत सगळे भारतीय प्रकार (कपडे, कंदील, खाणे, इ.) मिळतात तसेच भारतात जगभरातले सगळे ब्रँडस/प्रकार मिळतात, जिथे शाळादेखिल International तिथे बाकी कशाचा काय पाड? पैसे द्या नि घ्या.

दोन्ही बाफवर भावनिक चर्चा नि मते व्यक्त होताहेत. रैनाने सुचवलय तस ह्या प्रकारच्या बाफवर ज्या गोष्टी खरच उपयोगी आहेत त्यावर बोला.. म्हणजे जनता नाउमेद होणार नाही.

..

रैनाने सुचवलय तस ह्या प्रकारच्या बाफवर ज्या गोष्टी खरच उपयोगी आहेत त्यावर बोला.. >>> तेच तर बोलताएत की लोकं.

मी इथुन बिझीनेस सूट, ट्राउझर्स, ऑफिस कॅजुअल स्कर्टस् नक्की नेणार. आणि नंतर इथुन भारतात येणार्‍यांच्या घरी ऑनलाइन ऑर्डर करणार. अजून लिहिते Happy

.. Happy

मला जाईजुइ च म्हणण काहि अंशि पटल. कपडे, आणि इतर वैय्यतिक गरजेच्या वस्तु ह्यांच्या बाबतित प्रत्येकाच्या आवडि निवडि वेगवेगळ्या असतात त्याम्उळे त्या बाबतित एकाच्या अनुभवाचा दुसर्‍याला फारसा फायदा नाहि. मुलांच्या शाळा, रहाण्याचि जागा, वेगवेगळ्या नोकरि/व्यवसायातिल संधि अश्या कॉमन विषयांवर चर्चा केलि तर जास्त बर.

जाईजुइ, परदेशात राहुन काहि गोष्टिंचि सवय होउ शकते त्यात मातृभुमिला कमि लेखण्याचा उद्देश असेलच अस नाहि. माझ्या नवर्‍याचा एक मित्र गेल्या वर्षि भारतात कायमचा परत गेला त्याचा अनुभव असा कि बँकेत खात उघडणे, गॅस च कनेक्शन घेणे ह्यासरख्या साध्या लाल्फिति कारभारामुळे गोष्टि प्रचंड मनस्ताप देतात, ह्या गोष्टि परदेशात इतक्या सोप्या असतात कि कळत नकळत तो सोपेपणा गृहित धरला जातो. शाळेत असताना आपण सगळेच सायकल वापरत होतो अगदि मजेत मग कॉलेज मध्ये गेल्यावर जेंव्हा हातात गाड्या (दुचाकिच पण स्वयंचलित) आल्या त्यानंतर जर कधि सायकल चालवावि लागलिच तर त्याचा त्रास व्हायचा तसच आहे हे.

महेश, तुम्हि तुमच्या मुलिच्या शाळेच्या अनुभवाबद्दल जरा सविस्तर लिहाल का? परत आल्यावर मलाहि माझ्या मुलाला मराठि शाळेत घालायला आवडेल पण हल्लि मराठि शाळांचा शिकवणार्‍या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचाहि दर्जा घसरत चालला आहे, विद्यार्थ्यांअभावि मराठि शाळा बंद पडताहेत अस सारख ऐकायला मिळत आणि आपला विचार कितपत योग्य आहे अशि शंका येते. ह्या बाबतित तुमचा प्रत्यक्ष अनुभव काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.

देशात वेस्टर्न मधे weird fashions असतात !

आमच्याकडे जी लग्ने होतात, त्यासाठी भारतीय दुकानात जे भारतीय कपडे मिळतात ते अतिशय महाग मिळतात. म्हणून तसे कपडे भारतात स्वस्त मिळतील का, असे विचारले तर तिथले लोक म्हणाले हे असले कसले कपडे, अशी फॅशन नाहीये इथे.

एकंदरीतच बर्‍याच बाबतीत, जसे सौंदर्यप्रसाधनाची साधने, महत्वाची औषधे, इ. गोष्टींसाठी, ज्याची आपल्याला सवय आहे, ज्याची खात्री आहे, अश्याच गोष्टी घ्याव्या.

भारतात अश्या गोष्टींमधे मधे भेसळ असण्याची शक्यता अधिक असते.

बँकेत खात उघडणे, गॅस च कनेक्शन घेणे ह्यासरख्या साध्या लाल्फिति कारभारामुळे गोष्टि प्रचंड मनस्ताप देतात, ह्या गोष्टि परदेशात इतक्या सोप्या असतात कि कळत नकळत तो सोपेपणा गृहित धरला जातो.

हे खरे आहे, पण मनस्ताप व्हायला नको असेल तर भारतीय पद्धतीप्रमाणे वशिला, लाचलुचपत इ. मार्गांचा अवलंब करावा. ज्या देशात रहातो तिथे जसे वागतात तसेच आपण वागावे. लाच देणे काही एव्हढे वाईट नाही. लाच नाही दिली तर मनस्ताप झाला म्हणून दु:खात दिवस काढण्यापेक्षा लाच देऊन काम करून घेतले की झाले. मी भारतात गेलो की सर्रास वशिला, लाचलुचपत असे करून माझी कामे करून घेतो. माझ्या मते तुम्ही पण असे केलेत, तर तुम्हालाहि भारतातले कायदे, नियम यांचा त्रास होणार नाही. होम लोन स्वस्त भावात, मुलांचे कॉलेजातले प्रवेश, सगळे काही हवे तसे करून घेता येते. त्या बाबतीत भारतातले लोक अत्यंत चांगले व मदत करणारे आहेत. मग मनस्ताप होणार नाही. मग आनंदात भारतात जे काय करायला गेला असाल, ते सुरळित होऊन आनंदात रहाल.

शेवटी भारत, अमेरिका यांची तुलना करत बसाल, तर आनंदमय जीवनाला मुकाल.

कितपत योग्य म्हणजे कुठल्या अर्थी म्हणायच आहे??
गेम्स इथुन घेउन जावे लागतिल कारण तिथे मिळणारे गेम्स इथल्या कंसोल मधे चालणार नाहीत. बाकी Wii घेउन जायला काही हरकत नाहि अस मला वाटत. मी नेणार आहे Happy

मला जरा शंका होती नेण्याबद्दल पण नवरा म्हणाला " अगं आपण काही एकटे नसणार आहोत परत जाणारे आणि भारतात सुद्धा अनेकांकडे असेल तो गेम्..उद्या मुलगा मोठा झाला कि विचारेल का नाहि आणला तेव्हाच wii game येताना बरोबर्?..भारतात विकत घेणे परवडणार नाही..." म्हणून विचारले इथे पोस्टून..:)

मी इथे खरे तर संसारा-उपयोगी वस्तूंबद्दल म्हणत होतो. कपडे आणि मनोरंजन करणारी साधणे या माझ्या आवश्यक गरजा नाही.

माझ्या भारतातील घरी मी इथली नळं-तोट्या घेऊन गेलो. त्यामुळे एकतर धार छान येते आणि दुसरे म्हणजे पाणी वाचते. इथली चायनीज भांडी देखील मी नेली आहेत. जसे की चायनीज लोकांचे steamer मला आवडलं. ते मी इडली वगैरे साठी घेऊन गेलो.

इथल्या काही खास रजया वगैरे पण मी नेल्या आहेत घरी.

खास करुन इथे मिळणार्‍या वेगवेगळ्या प्रकाराच्या पिशव्या, बॅगा मी खूप प्रमाणात नेल्या आहेत. भारतात मल कधीच कुठे पिशव्या आणि बॅगा नीट मिळाल्या नाहीत.

इथल्या चटया वगैरे पण मी नेणार आहे.

इथे ईंडोनेशिय बत्ता मिळतो. तो बत्ता लसून मिरच्यांचा पेष्ट करायला फार सोपी आहे. तोही मी यंदा नेत आहे.

तेंव्हा संसारापयोगी वस्तूंबद्दल इथे लिहाल तर मला ते आवडले.

रैना, माहिती वाचली. जुई चांगले लिहिले आहे. धन्यवाद!

Pages