परतोनि पाहे- पूर्वतयारी चेकलिस्ट. काय करावे आणि करू नये आणि शाळा

Submitted by रैना on 12 January, 2010 - 12:24

इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. Proud
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना,

www.bgacademy.org ,www.theorchidschool.org इथे पहा. सीबीएसई बोर्ड आहे

विद्या वॅली, परांजपे ब्लु रिज हे आयसीएसई बोर्ड आहे.

या सगळ्या शाळांची फी वर्षाला ५०,००० पर्यंत जाईल.(वाकड इथल्या बी जी अकॅडमी ची फी वर्षाला १,००,००० आहे).

स्वप्ना_तुषार
औन्ध ला डी ए व्ही - सीबीएसई बोर्डची शाळा आहे.वार्षिक फी ३०,०००/- पर्यन्त आहे.
साईट - www.davaundhpune.com
मेल - davaundh@gmail.com
वाकड ला इन्दिरा इन्स्टिटुट ची ही शाळा आहे . बोर्डाची कल्पना नाही.

माशा माहिती साठी धन्यवाद DAV जरा बरी दिसते.. orchid अणि BJ प्रकरण फार भारी आहे .(माझा मत..) अजुन काही शाळा आहेत का.. आम्ही बाणेर मध्ये ग्रीनपार्क च्या बाजूला राहायला असू ...तिथून कुठल्या शाळा जवळ असतील..

मुलान्च्या शाळेत अ‍ॅडमिशन साधारण कोणत्या महीन्यात सूरू होते(फोर्म/मुलाखत वैगरे)आणि प्रत्यक्ष मुलगा/मुलगी हजर नसेल तर इतर कोणी ही प्रक्रिया करू शकत का?शिवाय येथील प्री-स्कूल/के.जी किवा तत्सम शाळे कडून तसे (शाळा पूर्ण केल्याचे)प्रमाणपत्र लागते का
माझी मुलगी (साडे तीन वर्ष) प्री स्कूल मधे आहे.तिने पहीलीत देशात शाळेत जावे असा विचार आहे.तर मुम्बईत पहीलीसाठी वयोमर्यादा काय आहे?
तोषवी.

तोषवी, मुंबईमधे अ‍ॅडमिशनची प्रक्रिया ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान चालू असते.
पण तुझ्या मुलीला पहिलीत जर प्रवेश घ्यायचा असेल तर मला वाटत मार्च, एप्रिल मधे शाळांमधे चौकशी केली तर चालत थोडक्यात वर्षाच्या सुरवातीला शाळा जेव्हा सुरु होणार असतात तेव्हा.
मुल उपस्थित असण हे मला वाटत प्रत्येक शाळेवर अवलंबून असाव. आम्ही गेल्या वेळी देशात गेलेलो तेव्हा इथल्या शाळेनी लेकीचा प्रोग्रेस रिपोर्ट फक्त दिला होता. त्यातले कुठलेही कागदपत्र लागले नाहीत.

वयोमर्यादा इथल्यासारखीच आहे. म्हणजे पहिलीसाठी ६ वर्ष.

इथे कोणी ओशन शिप्मेंत पाठवला आहे का .. कुठल्या कंपनीने पाठवले आहे ..नाही पाठवले तर का नाही पाठवले.. आणि पाठवल्यावर का य वाटला बरोबर निर्णय होता का .. मला प्रोसेस चालू करायची आहे तुम्ही कुठून सुरवात केली होती..त्या रिटर्न टू इंडिया फोरम बघित्लाल आहे पण इथे कुणी संन्गीतालातर अजून बारा वाटेल
आणि हो पुण्यामध्ये अडमिशन प्रोसेस कधी चालू होते .. माझा मुलगा पहिलीत जाईल.. आणि मला तिथे येईपर्यंत बहुतेक मार्च एप्रिल उगवणार असा दिसत आहे साधरण..

मी तिथेच dual voltageची सिस्टीम मिळवायचा बराच प्रयत्न केला पण बोस तशा सिस्टीम्स नाही बनवत. अजून ती सिस्टीम लावून बघितली नाहिये त्यानंतरच काही प्रॉब्लेम्स येतात का ते सांगू शकीन>>>मनिश तुम्ही सांगाल का प्लीज कि तुम्हाला बोस ला काही प्रोब्लेम झाले का .. आमचा १८ सिस्टीम आहे .. त्यातला dvd प्रकार तर चालणार नाही असा सांगितला आहे .. म्हणजे इथे काय काय विकायचा याची तयारी चालू करायची आहे ..

प्रित १८ तुम्ही ह्याच कारणासाठी विकत असाल तर तुमच्या १८ वर हे करा.

भारतातील एक डीव्हीडी टाका.
प्ले की प्रेस करुन ३० सेकंद होल्ड करा, मग प्ले असा डिस्प्ले निघून जाईल. रिमोट ने मग ९,९,९ असे आकडे दाबा. ती डिव्हीडी ज्या रिजनची असेल त्याला तो डिकोड होईल.

परत अमेरिकन करन्यासाठी ०,०,० दाबा.

ह्या सगळ्या सिस्टीम्स तिथे मिळतात. बदल होण्यासाठी विकत असाल तर नक्कीच विका.

प्रित,

साधारण नोवेंबर/डिसेंबर मधे प्रक्रिया सुरु होते. पुण्यात परांजपेंची नवीन आय सी एस ई शाळा सुरु झाली आहे.

www.blueridge.in वर अधिक माहिती मिळेल.

आम्ही बालेवाडीला राहणार आहोत. मुलगी परांजपेच्या ब्लु रिज आय सी एस ई शाळेत. हिंजवडीला नवीन सुरु झाली आहे.
नर्सरी ते पाचवी पर्यंत वर्ग सुरु होणार आहेत.
(मुलगा वयाने जरा कमी असल्याने नर्सरी साठी पात्र झाला नाही).

मी आत्तापर्यंत केलेल्या चौकशी प्रमाणे अ‍ॅडमिशन साठी प्रत्यक्ष पुण्यात असणे आवश्यक आहे.
मनोज, तुम्हाला इथुन (यु एस) मधुन अ‍ॅडमिशन घेता आली का परांजपे शाळेत? किंवा अशी दुसरी शाळा माहीत आहे का?

मला मुलीला नर्सरी साठी अ‍ॅडमिशन घ्यायची आहे.

साधारण नोवेंबर/डिसेंबर मधे प्रक्रिया सुरु होते. >>> >> बाप रे.. हम्म नवरा डिसेंबर मध्ये जाणार आहे .. तो प्रोसेस चालू करू शकतो का.. सोरी पण खरच मला मुलांना तिकडे सोडून परत इकडे आवरण्यासाठी परत यायचा नाही .. म्हणून मी मार्च कडे जाईल असा विचार करत होते. ते टेस्ट वागिरे साठी कधी बोलावतात.. तेव्हा मुलाला गेले घेवून तर चालेल का नाही तर इथला लवकर गुंडाळेल तरी जानेवारीत जोब ट्रान्स्फर होईल बहुदा .. एवढे इफ्स आणि बट्स वाढत चाललेत .. असो

बघते हि पण .. वाद नाही चालू करायचा पण आय सी एस ई कि साधी शाळा ह्यावर द्वंद चालू आहे ..मला जरा सांगाल का तुम्हाला कसा वाटला ..तटस्थ राहून देणार असेल मत तर द्या मात्र.. हे प्रकरण वगळता साध्या कॉन्व्हेंट मध्ये पण असाच करावा लागता का .. लोयोला वागिरे सुचवली होती कोणी तरी ..

केदार खूप धन्स..हे नक्कीच टेपून ठेवते .. पण dvd मुले प्रोब्लेम न येत ... ते त्रांस्फोर्मार किया योग्य अडप्तर वापरून पण .. त्याच्यामुळे स्क्रीन ब्लांक येते .. मग dvd तर पुढची बात आहे असा मला २ जणांनी सांगितला.. तुम्हाला माहिती आहे का कोणी ज्यांनी नेला आणि व्यवस्थित चालतो आहे .. मला तरी १८ काय किवा ४८ चा फरक पडत नाही .. नवर्याला पडतो म्हणा पण तो पण खुश आहे साध्या तरी.. घरातला फुटकळ किमतीत विकून तिथे दुपटीने घायचा म्हणजे .. .. मुझ्हिक म्हणजे जीव कि प्राण त्यामुळे तो घेईलच काही तरी..

त्याच्यामुळे स्क्रीन ब्लांक येते .. >> तो NTSC / PAL लोचा असावा. टिव्हीच्या योग्य सेटींगने निघून जातो. पुण्यात लक्ष्मी रोडच्या सुरुवातीला पंपाच्या पाठीमागे एक इलेक्ट्रिक दुकान आहे, त्यांचाकडे साधारण १५०० रु पर्यंत एक चांगले कन्वर्टर मिळते. ते घ्या. माझ्या भारतातील घरी मी बोस नाही पण तसेच दुसरे होम थिएटर चालवतो, ते त्या कन्वर्टर वरुन. आणि माझा टिव्ही दोन्ही सपोर्ट करतो त्यामुळे मला तसे जाणवले नाही.

प्रित तुमचा नवरा तिथे डिसेंबर मध्ये जाऊन तुमच्या मुलासाठी admission नक्कीच घेऊ शकतो. पण १ली नंतरच्या इयत्तासाठी बहुदा प्रवेश परिक्षा आहेत त्यामुळे शाळेतच चौकशी केलेली बरी.
ICSE & CBSC मध्ये CBSC prefer करावं ..माझ्या मैत्रिणीची नणंद ICSE मध्ये शिकवते तिच्या म्हणण्यानुसार ICSE मध्ये इंग्रजीवर जास्त भर दिलेला आहे sci/maths normal /below normal आहेत ..त्यापेक्षा सुवर्णमध्य म्हणजे cbsc..
पण तरीही तुम्ही प्रत्यक्ष दोन्हीचा syllabus स्वतः check करा.

केदार, स्वप्ना> धन्यवाद.. भारतातल्या आणलेल्या सगळ्या DVD चालतात इथे . तिथे गेल्यावर इकडच्या चालवून बघू.. हम्म पण बोस आणायचा असेल तर शिप्मेंत करावी लागणार .. नाही तर ते एवढा मोठा धूड आणायला पंचाईत होणार.. बाकी स्पीकर वागिरे तर येवून जातील ब्यागेत..
एक एक शाळा बघते आता .. cbse बोर्डाची बघते आधी..

तोषवी सारखेच मलापण प्रश्न आहेत.

१) मुलीला पहिलीत अ‍ॅडमिशन घ्यायची आहे. अ‍ॅडमिशन साठी किती वय पुर्ण हवे? जुन मधे साडेपाच असेल तर चालते का?
२) अ‍ॅडमिशन प्रक्रिया काय आहे? परिक्षा? मुलाखत?
३) अ‍ॅडमिशन साठी मुलगी आणि आम्ही दोघेही हजर हवे का?
४) इथल्या शाळेचे काही प्रमाणपत्र लागते का?
५) ठाण्यात स्टेशनच्या आसपासच्या भागात कुठल्या शाळा चांगल्या आहेत?
इंग्लिश आणि सेमी इंग्लिश शाळा हव्या आहेत. कॉन्व्हेंट नको. जास्तीत जास्त मराठी मुलं असलेली शाळा असावी असं वाटतय

भारतात हे कंटेनर मिळतात का?.. मी इथे एका मॉल मधे पाहिलेले .. एकदम air tight बसतात.. म्हणुन घेऊन जायचा विचार होता माझा..पण मुंबईत मिळत असतील तर मी List मधुन उडवणार....
OXo Good Grip Pop Containers.jpg
@ मिनोती आणि मनीष.. खूप छान माहिती....यातले मी माझ्या list मधे नक्की add केले..

@मनीष बोस होम थियेटर स्पीकर सिस्टीम कशी चालू आहे... मला घ्यायची आहे जाताना..पण चालली नाही तर म्हणून घेतली नव्हती अजुन

हे OXO आहेत का? असे कंटेनर पाहिलेले मागे. हा ब्रँड का माहित नाही. पण मुंबईत टप्परवेअर मिळतं. किंमतीत- ह्याच्या न त्याच्या फार फरक नसावा कदाचित.

हो हे OXO आहेत. टप्परवेअर मिळत असेल तर चांगलं आहे..
माझ्या लिस्टमधे असलेली अजुन एक गोष्ट म्हणज़े इथे मिळणारे छोट्या कपाटासारखे 'jewelary box..' मी भारतात असताना असले पाहीले नव्ह्ते कधी..

मी OXO ची वेबसाईट बघितली.मी इथे बघितलेली अणि वापरलेली यांची products एकदम चांगली आहेत...
.कुणाला पाहीजे असल्यास , त्यांचा मुंबई मधे डिस्ट्रीब्युटर आहे त्याचा हा address

INDIA
PREMIUM HOMEWARE PVT. LTD.
22 - 24, Dheeraj Heritage, S.V. Road
Santacruz (W), Mumbai 400 054
India
Tel: 91 22 2660 0446 or 91 99674 10000
Fax: 91 22 2660 5963
E-mail: info@premiumhomeware.com
Website: www.premiumhomeware.com
Brand(s): Good Grips

लोकहो कोणी भारतातील PAL सिग्नल NTSC टीव्ही वर (एच डी मधे) पाहता आहात काय? येथे पुण्यात कोठे त्याला लागणारा कन्वर्टर मिळतो का (मी काही दुकानांत विचारले, पण त्यांना माहीत नाही). केदार ने वरती एका दुकानाचा उल्लेख केलाय ते बघतोच).

मुलगा/ मुलगी जर अमेरिकेत जन्मला असेल तर त्याला अमेरिकन नागरीकत्व मिळते का? भारतात जाऊन तिथल्या शाळेत मग फी जास्त वगैरे घेतात का? ड्युअल सिटिझनशिप बद्दल कोणी सांगू शकते का?

बाळ अमेरिकेत जन्मलं तर त्याला अमेरिकन सिटीझनशीप मिळते. भारतातल्या शाळांचे नियम, फिया याबद्दल माहिती नाही.
अजूनतरी दुहेरी नागरिकत्वाचा पर्याय उपलब्ध नाही. ओसीआय कार्ड मिळते. परंतु त्यासाठी बहुतेक मुलाच्या दोघा पालकांपैकी एकजण तरी अमेरिकन नागरिक असायला पाहिजे.
ओसीआय बद्दल अधिक माहितीसाठी इथे बघ.
https://indiavisa.travisaoutsourcing.com/oci/homepage

शाळेतील फीत काही फरक नाही. कॉलेज मधे वाढते असे ऐकले आहे.

वरती मीच विचारले होते त्या कन्वर्टर बद्दल - तो मिळाला आणि अत्यंत उपयोगी आहे. कोणाला माहिती हवी असल्यास येथे टाकेन.

Pages