परतोनि पाहे- पूर्वतयारी चेकलिस्ट. काय करावे आणि करू नये आणि शाळा

Submitted by रैना on 12 January, 2010 - 12:24

इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. Proud
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा, अटलोना ५६० घ्या. चांगला आहे.

http://www.amazon.com/Atlona-AT-HD560-CE-Video-Scaler/dp/B0011MOVN8

तुमचा टिव्हीवर खरेतर कन्वर्टरची गरज नाही. नवीन असल्यास. भारतात जाऊन डिश चा zentega वाला सेट टॉप बॉक्स घेतला व पावर कन्वर्ट केली की झाले.

आज हा बाफ पाहीला. सगळी चर्चा वाचली. मी भारतात रहाते. मुंबई मधील एका मोठ्ठ्या बांधकाम उद्योग समुहात काम करते. माझा शाळा आणि हॉस्पिटल यांच्याशी फार जवळुन संबंध आहे. काही मुद्दे खालील प्रमाणे.

१. शाळा : "तिकडुन" इकडे आलेल्या मुलांचे सुरवातिला फार हाल होतात. मुल जर लहान वयात इकडे आलं तर प्रश्ण नाही. पण जर मोठ्या वयात म्हणजे साधारण ३री ४थी च्या पुढे, तर इकडे फार फरक पडतो. एक तर शाळेत मराठी / हिंदी आज काल १ली पासुनच कंपलसरी आहे. दुसरे म्हणजे शिकवायची पध्धत. बदलत्या जॉब च्या कुटुंबाने आय्.सी.एस्.सी. किंवा सी. बी.एस्.सी च्याच शाळा निवडाव्या. मुंबई तिल शाळेत साधारण पणे वर्षा ला ३०,००० खर्च येतो. ८वी, ९वी १० वी तिल कोचिंग क्लास चा दर वेगळा. आय. बी. (ईन्टरनॅशनल बोर्ड) च्या नावा खाली खुप लूट चालु आहे. तेंव्हा नीट पाहुनच घ्यावे. ( मी एका आय. बी. शाळेची ट्र्स्टी आहे) खरे आय. बी. आहे ( जिनेव्हा) की खोटे ( सिंगापुर, थायलंड). अनेक बोगस लोक ह्या क्षेत्रात आहेत.

२. घरांच्या किमती: दक्षिण मुंबई १० कोटी च्या पुढे, दादर साधारण भाव २५,०००-३०,००० प्रति स्क्वे.फु. , पार्ला, सांताक्रुझ, मालाड, जोगेश्वरी, अंधेरी = वेस्ट ला १५,००० ते २५,०००. कांदिवली बोरिवली ९००० ते १५,०००. घाटकोपर १३००० ते १७०००. मुलुंड ११००० ते १३०००. ठाणे ८००० ते १२०००. डोंबिवली कल्याण ३००० ते ५०००. ठाणे, मुलुंड, डोंबिवली, कल्याण, पनवेल येथे खुप ऑप्शन आहेत. ठाण्यात खुप व्हरायटी आहे. अगदी १बी.एच्.के. पासुन ते ५ बी.एच्.के. पर्यंत व्हरायटी आहे.

३. फर्निचर : होम टावुन, @होम, ह्यासारख्या दुकानांच्या खुप शा़खा आहेत. तिकडे हवी तेवढी व्हरायटी आहे. सगळे फर्निचर आयात केलेले असते. प्रचंड दुकाने आहेत.

४. खाण्या पिण्याच्या वस्तु: बांद्रा, क्रॉफर्ड मार्केट, पवई चे हायको, हायपर सीटी, ईथे दुनियेतले सगळे ब्रँड आहेत. नाहीतर आणुन तरी देतात. पुण्यात मात्र कठीण वाटते आहे. कदाचित कॅम्प मध्ये असतील. झीप लॉक बॅग तर हव्या तेवढ्या. मुंबई मध्ये खुप एक्सपॅर्टस रहातात त्या एरीयात असे पदार्थ हवे तेवढे मिळतात. दक्षिण मुंबई तर साध्या दुकानात ( भुलाभाई देसाइ रोड, पेडर रोड, मलाबार हिल) पण मिळतात. चर्चगेट च्या एशियाटीक जवळच्या दुकानात तर काय हवे ते मिळते. ( माझे अनेक ईटालियन मित्र इथुनच खरेदी करायचे)

५. ईलेक्ट्रॉनिक : अगदी हवे ते मिळते. सगळे ब्रँड आता इकडे आहेत . मी अत्ताच एक्स. बॉक्स ३६० घेतला. (रोज टेनीस खेळते). हीरा पन्न्नात तर काय हवे ते मिळते. तुम्ही म्हणाल तो लॅपटॉप, टी.व्ही. सगळं आहे इथे.

६. टप्परवेयर च्या तर हव्या त्या चीजा आहेत. लॉक & लॉक चे कंटेनर. पवई च्या हायकोत, होम टाउन इथे सगळी किचन वेयर ची व्हरायटी मिळते.

७. कॉलेज चे शिक्षण तसेही आता महागच होत जाणार आहे. माझ्या मते ते सगळ्या जगातच महाग आहे. भारतात तर लोकसंख्येचा प्रश्ण. त्यामुळे त्यातुन कोणाचीच सुटका नाही.

८. मागणी येवढी जास्त नसल्याने भारतात कॉस्मेटीक महाग आहे. म्हणजे कधी कधी १५०० मोबाईल फोन येतो पण, लिप्स्टीक किंवा परफ्युम येत नाही. आयात केलेल्या कॉस्मेटीक वर लक्झरी टॅक्स आहे. इथले ब्रँड ही काही वाईट नाहीत. आर्थात हा पुर्ण वैयक्तिक विचार आहे. कपडे, कॉस्मेटीक, टॉयलेटरीज, अशा लक्झरी गोष्टीं बद्दल "नो. कॉमेंट्स"

९. हल्ली मुंबई/ठाण्यात मुख्य एरीयांमध्ये पाईप गॅस असतोच. नवे कनेक्शन इझीली मिळते. ( मी तरी गेली ८ वर्ष सिलेंडर वापरलेला नाही. )माझी आई दोन वर्षा पुर्वी सातार्‍याहुन ठाण्याला शीफ्ट झाली. गॅस सिलेंडर १० दिवसात मिळाला. अत्ताच मी नवा लँड्लाईन फोन घेतला, अर्ज केल्या पासुन ८ दिवसात आला. म्हणजे परिस्थिती वाईट नाही. बरे हे करताना कुठेही पैसे दिले नाहीत. कारण आम्हाला कसलीही घाई न्हवती. तुम्ही घाई केली की भाव वाढतो. ६ महीन्यां पुर्वी मी घर बदलले. लँड्लाईन शिफ्टींग साठी अर्ज केला. अजिबात फॉलोअप न करता १० दिवसात बदलुन मिळाला.

आर्थात हे माझे अनुभव. ईथली लोकसंख्या, ईथले प्रश्ण हे ईथले आहेत. जसे तिकडचे प्रश्ण वेगळे आणि खास त्या देशातिल होते. जाजु म्हणाल्या तसं आहे ते फेस करणे.

शाळेबद्दल माहिती
पुण्याला पाषाण जवळ विद्या व्हॅली शाळेच्या अडमिशन बद्दल माहिती हवी होती .
सध्या मुलगा ६ वी मध्ये आहे ,७ वी ला अडमिशन घ्यायची आहे तर कृपया पुण्यातील पाषाण जवळच्या शाळांबद्दल माहिती असल्यास सांगावी.

अमेरिकेतून भारतात काही फुटकळ गोष्टी न्यायच्या असतील तर त्या कशा न्याव्यात? समजा ३-४ खोकी सामान असेल (प्रत्येकी ५० पौंड) तर कोणता मार्ग किफायतशीर होईल? सामानात मख्यतः कपडे, पुस्तके, CDs, स्वयंपाक घरातील भांडी वगैरे सामान असेल तर.

समुद्रमार्गे पुस्तके पाठवली तर २-३ महिने लागतात पोचायला. मोजकेच खोके पण वजनदार सामान असेल तर ते सर्वात सोयीचं पडतं.
मी बर्‍याच मागे यू एस पोस्टल सर्विस तर्फे विल ड्युरंटच्या पुस्तकांचा संच अन इतर काही संदर्भ ग्रंथ पाठवले होते.

>>समुद्रमार्गे
मेधा+१

अमेरिकेतून पाठवायचा अनुभव नाही, पण इंग्लडातून पाठवली आहेत पुस्तके व फुटकळ सामान. काहीही मौल्यवान, इलेक्ट्रॉनिक वस्तू पाठवू नयेत पण. अनअकम्पनीड लगेज म्हणून भरपूर ड्यूटी बसते. पुस्तके, जुने कपडे, जुनी भांडी यावर ड्यूटी नाही.

कोणत्या पोर्टवर सोडवून घ्यायला जाणार आहे तेही ठरवावे. तिथल्या व्यवस्थेची माहिती असेल तर बरे पडते.

परागकण, तेथून देशात जे मूव्हर्स सामान नेतात त्यांना विचार. सहसा ते "किमान क्यु. फीट" चे लिमीट घालतात पण ते काही इतर पर्याय सांगतील. किंवा त्यांच्याकडेच थोडीफार जागा मोकळी जाणार असेल तर नेतीलही.

दुसरा जरा रिस्की पर्याय म्हणजे क्रेग लिस्ट वगैरे वर देशी लोक कंटेनर शेअर करणारे शोधत असतात, त्यांच्यातर्फे देता येइल का ते पाहा. त्यातल्या त्यात एखाद्या ओळखीच्या बरोबर पाठवता येइल - बर्‍याच मोठ्या कंपन्यांमधल्या देशी मेलिंग लिस्ट मधे अशा मेल्स फिरत असतात.

अमेरिकेतून भारतात काही फुटकळ गोष्टी न्यायच्या असतील तर त्या कशा न्याव्यात? >> मामा, बुंग कुठे निघालं? Happy

बॉक्सेस खुप चांगल्या प्रतीचे घ्या. मागच्या वर्षी इथेच आंतरराज्यीय मुव्हसाठी वॉलमार्ट मधुन बॉक्सेस घेऊन USPS ने शिप केले होते.. नविन ठीकाणी मिळेपर्यंत लक्तरं झाली होती सगळ्या बॉक्सेसची. U-HAUL मध्ये चांगल्या प्रतीचे बॉक्स मिळतात, पण आंतरराष्ट्रीय शिपींगसाठी किती योग्य असतील माहीत नाही.

आम्ही परत येताना माणशी २ (४० पाउंडाची एक) अशा आठ मोठ्या बॅगा आणल्या होत्या. त्यात कपडे एक दोन बॅगात पण इतरात भांडी, खेळणी वगैरे आणले होते. त्या चेक इन करता येतील.
का तुमचे चेक इन चे लिमिट च्या वर आणखी सामान आहे? मग वर इतरानी सांगितले तेच बरे पडेल.

नात्या, यू हॉलचे चांगले आहेत. त्यातही डबल वॉल्ड मिळतात. जरा महाग असतात (५-६ डॉ प्रत्येकी) पण एकदम दणकट. यू हॉलचे नेहमीचे (सिंगल वॉल्ड) सुद्धा चालतील, जर "क्रेट" मधून जाणार असतील तर.

अमेरिकेतून युनिवर्सल रिलोकेश्न्स कडून २ बेडरूम्स च सामान मागवलं होतं. अर्ध्याहून अधिक सामान मोडक्या अवस्थेत आलं होतं. काचेचं जवळपास सर्व सामान फुटलं होतं. इन्शुरन्स घेतला होता पण झालेला मन:स्ताप काही औरच होता.

टीव्ही आणि होम थिएटर सुद्धा मागवलं होतं. ते व्यवस्थित आलं पण त्यासाठी इकडे पाल टू एन टी एस सी कन्वर्टर घ्यावा लागला जो जवळपास १०००० रुपये आहे. अनलेस टीव्ही पाल आणि एन्टी एस सी सपोर्ट करत नसेल तर अमेरिकेहून आणायच्या फंदात पडू नये.

अरेरे प्रविणपा, मीच रेकमेण्ड केले होते का युनिवर्सल? असेल तर टोटल सॉरी. पण माझा स्वतःचा अनुभव बर्‍यापैकी चांगला होता (कॉर्निंग चे एक दोन सेट फुटले होते मात्र). आमच्या टीव्ही स्टॅण्डच्या दोन काचा आल्या नव्हत्या पण एक दोनदा पाठपुरावा केल्यावर बरोबर आल्या. माझ्या इतर काही मित्रांनीच मला रेकमेण्ड केले होते नाव.

निदान पैसे तरी मिळाले का इन्शुरन्स कडून?

कन्वर्टर दहा हजार म्हणजे येथे महाग आहे. मला अटलोनाचा बराच कमी पडला होता - युएसमधून आणला होता. बहुधा $१७४ शिपिंग वगैरे (अमेरिकेत) धरून, अ‍ॅमेझॉन वरून.

Pages