परतोनि पाहे- पूर्वतयारी चेकलिस्ट. काय करावे आणि करू नये आणि शाळा

Submitted by रैना on 12 January, 2010 - 12:24

इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. Proud
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वी कन्सोल इथे मिळते. रिलायन्स मॉल मध्ये आहे. मलातुमचे मॉडेल सांगितलेत व शंका सान्गितल्यात तर
मी चौकशी करेन. रविवारी. घरी पोचत आहे तेव्हा.

वी कन्सोल इथे मिळते. रिलायन्स मॉल मध्ये आहे. मलातुमचे मॉडेल सांगितलेत व शंका सान्गितल्यात तर
मी चौकशी करेन. रविवारी. घरी पोचत आहे तेव्हा.

नमस्कार. परतीच्या प्रयत्नांना शुभेच्छा.

शाळा प्रवेशाच्या संदर्भात बॅन्क ऑफ महाराष्ट्र ची एक योजना आहे त्या द्वारे आपण महिना काही रक्कम जमा करून शिक्षण कर्जा साठी सीड रक्कम जमवू शकतो. मग ते त्या प्रमाणात कर्ज देतात. मी घरी गेल्यावर बॅन्केत जावून त्या योजनेची माहिती घेऊन इथे पोस्ट करीन.

काही स्पेसिफिक उत्पादने सांगितल्यास मी अवेलेबिलिटी वगैरे शोधू शकेन.
हॅपी टू हेल्प यू.

इथे बागेत पाण्याची एक तोटी मिळते त्याने फवारा, मोठी धार वगैरे करता येते. ते मी पप्पांसाठी घेउन गेले आहे. अजुन आवडणार्‍या आणि लहान गावांमधे न मिळणार्‍या वस्तू म्हणजे -
१. बाथरूममधे शांपू, साबण ठेवायला एक कॅडी मिळते ती कॅडी किंवा त्याच्यासारखे फ्लोर मॉडेल मिळते ते
२. विनाईल चे शॉवर कर्टन्स त्याचा उपयोग पॅटीओमधे बाहेरच्या बाहुला लावले तर आत पाणी कमी आत येते.
३. इथे मिळणार्‍या सुर्‍या मुख्यतः पेअरींग नाईफ्स हा प्रकार लहान गावात चांगल्या मिळत नाहीत.
४. सालकाढणी, आले खिसायची बारिक खिसणी Ikea मधे स्वस्त आणि मस्त मिळतात
५. आईस्क्रीम स्कूप
६. चांगले कटींग बोर्ड
७. लाकडी चांगले हँगर्स
८. कोरेल सारखे डिनर सेट्स
९. सिलिकोनचे बेकिंगचे पॅन्स
१०. निरनिराळ्या फुलांच्या बिया
११. मिरॅकल ग्रो सारखी उत्पादने
१२. लहान मुलांसाठी थ्रीडी पझल्स
१३. लहान मुलांसाठी पुस्तके, फिशर प्राईसची वगैरे खेळणी
१४. केळांसाठी तो लाकडाला एक हुक लावुन केलेला एक स्टँड असतो तो
१५. ब्लॅक पेपर ग्राईंडर (यात भाजलेले जिरे घालून ऐनवेळी क्रश करता येतात)
१६. झिपलॉक पिशव्या, अ‍ॅल्युमिनिअम फॉइल, क्लिंग रॅप

असल्या वस्तू लहान गावात अजुनही मिळत नाहीत किंवा चांगल्या क्वालिटीच्या मिळत नाहीत.

ह्या वस्तू

माझे २ पैसे...

तिकडून इकडे (भारतात) तसे काहीही आणण्याची गरज नाही... इकडे सगळे मिळते...

तुम्ही जर जपान किंवा सिंगापूरहून येत असाल तर कॅमेरा, होम थिएटर, लॅपटॉप, मोबाईल, आयपॉड ह्या गोष्टी स्वस्त पडतील... अमेरिकत आणि भारतात ह्या गोष्टींच्या किंमतीत काही फारसा फरक पडत नाही...

कपड्यांच्या बाबतीत मी थोडा असहमत आहे...

भारतात अमेरिकेपेक्षा जास्त ऑप्शन उपलब्ध आहेत... ब्रँडेड व साध्या दोन्हीमध्ये... किंमतीतही फरक नाही...
अर्थात हे मी जास्ती करून पुरुषांच्या कपड्यांविषयी बोलत आहे...

अर्थात वर्षानुवर्षे तुम्हाला एखाद्या ब्रँडची सवय झाली असेल तर भाग वेगळा...

कॉस्मेटिक्स आणि दारू इकडे नक्कीच महाग आहे

आम्ही मिस करतो काही शुल्लक गोष्टी... जश्या झिपलॉकच्या पिशव्या, पिनट बटर, क्लिंग-रॅप, सुर्‍या इत्यादी Happy

तळटीप : माझे अमेरिकेचे ज्ञान चार वर्षे जुने आहे Happy

मिनोती छान लिस्ट केलीस.... पटली

मिल्याला अनुमोदन. मी पण स्वयंपाकघरातल्या अश्या फुटकळ गोष्टी ,रॅकस अश्या मला फालतु वाटलेल्या व फेकून दिलेल्या गोष्टी मिस करतेय.

मिल्या पिनट बटर इथे मिळते. रेगुलर अमेरिकन ब्रँडचेही. Happy

फर्निचरविषयी,जर तुम्ही खुप चांगले घेतलेले असेल तर जरुर शिप करा. इकडेपण हाय एन्ड फर्निचर महाग आहे. लाखाच्या वरती सहज जाते. अमेरिकेत सी शिपमेन्ट कंटेनर $३००० पडतो (आताचे कन्फर्म करावे लागेल)पण त्यात तुम्ही बाकीचे सर्वच टाकू शकतात व ते परत इथे येउन परत घ्यायची गरज नसते.

हे मी केले नव्हते. पण उशीरा शिकलेले शहाण्पण आहे. पण मी कधी धड काही घेतलेच नव्हते परत जायचेय म्हणून व जे घेतले होते ते परत आणायच्या लायकीचे नव्हते.

हो हो.. कधीही कोणी परदेशातून पुण्यात येणार असेल तर माझ्यासाठी पीनट बटर, झिपलॉकच्या पिशव्या आणि क्लिंगरॅप घेऊन या रे- ही स्टँडींग ऑर्डर आहे Happy

पुण्यात देशी ब्रँडचे अगदी गरीब दिसणारे आणि खप नसलेले पीनट बटर मिळते Sad झिपलॉक, क्लिंगरॅपही मिळतात, पण क्वालिटी नाही चांगली.

मिनोतीची लिस्ट मस्त. किरकोळ वस्तू घेऊन या, भारतात इतक्या चांगल्या नाही मिळत. टीव्ही, फ्रीज, कार सारख्या मोठ्या वस्तू वगैरे इथेच घ्या Happy

मिनोती मुद्दे १ ते ४ आणि १० ते १३ खरेच आहेत.

मिल्या पवई हिरानंदानीच्या हायकोमध्ये युरोपिअन/ अमेरिकन असे सगळे ब्रँड्स मिळतात - पीनट बटर, श्लाखमेलन, हॅखल्श्लाख, इ.

बा द वे मी बरीच एडीटलेली पोस्ट मिसलीयेत बहुदा! Wink

आम्ही मागच्या जुलै (२००९) मध्ये US मधून परत आलो. बरेचसे सामान आणले सोबत (चेक इन बॅग्स आणि शिप केलेले सामान). जसे की
१. क्रोकरी (कोरेलची), कटलरी सेट, ब्लॅक पेपर ग्राइंडर, काचेचे (Pyrex कंपनीचे) बाउल्स्/सर्विंग बाउल्स, फोटोफ्रेम्स, ग्लास सेट्स, कंफर्टर आणि क्विल्ट, मॅग्नेटवाले छोटे डबे जे फ्रीजला लावता येतात, इ.
२. काही कँपिंगचे सामान (तंबू, स्लीपींग बॅग, फोल्डींग खुर्ची, मोठा कूलर इ.) - या गोष्टी २-३ वर्षे वापरल्या होत्या आणि खूप चांगल्या अवस्थेत होत्या. शिवाय भारतात या वस्तू सहज मिळत नाहित आणि महाग आहेत.
३. DVDs, Audio CDs - US मध्ये असताना डील्स बघून चांगल्या DVDs/CDs जमवल्या होत्या (आमच्यासाठी आणि मुलीसाठि)
४. इलेक्ट्रॉनिक्स - बोस होम थियेटर स्पीकर सिस्टीम, त्याचा यामाहाचा रिसिव्हर, यामाहाचा मोठा कीबोर्ड. वायरलेस राउटर (इंटरनेटसाठी). बोस घ्यायचे माझे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते. त्यात २००७ मध्ये एक खूप चांगले डील मिळाले. २ वर्षे वापरल्याने त्याचे पैसे तसे वसूल होते. इथल्या किंमती कंपेअर केल्या तर मला ती सिस्टीम तिथे २ वर्षापूर्वी इथल्या आताच्या किमती पेक्षा निम्म्या किमतीत मिळाली. त्यातच माझे शिपींगचे पैसे वसूल झाले असे मी समजतो. मी तिथेच dual voltageची सिस्टीम मिळवायचा बराच प्रयत्न केला पण बोस तशा सिस्टीम्स नाही बनवत. अजून ती सिस्टीम लावून बघितली नाहिये त्यानंतरच काही प्रॉब्लेम्स येतात का ते सांगू शकीन. यामाहा कीबोर्ड मात्र व्यवस्थीत चालू आहे. २ लॅपटॉप्स आणलेत जे इकडे खरेच खूप महाग आहेत. २ वर्षापूर्वीच केनवूडचा CD/MP3/radio असा कार प्लेयर घेउन आलो होतो. त्याचा सध्या काही उपयोग नाही कारण मी घेतलेल्या गाडीत in-built सीडी प्लेयर आहे.
५. मायक्रोवेव्ह ओव्हन - शिकागोतून खास भारतासाठी असणारा मावे घेउन आलो होतो ३ वर्षापूर्वी. हा आणण्यात फार काही फायदा नाही.
६. हेल्मेट - अतिशय उत्तम क्वालिटी. मला शक्य असतं तर मी बाइकच आणली असती. पण त्यासाठी पण खर्च बराच आहे शिवाय ७५० सीसी बाइक चालवता येण्यासारखे ट्रॅफिक आपल्याकडे नाही.
७. मुलीची पुस्तकं, खेळणी (तिची सायकल, किक स्कूटर, Nintendo DS, इ.). बर्‍याचश्या गोष्टी आधीच घेउन वापरल्या होत्या. त्या गोष्टी तिकडे तशाच/स्वस्तात कोणाला तरी देउन इथे येउन परत त्यावर पैसे खर्च करण्यात काहीच अर्थ नव्हता शिवाय या गोष्टीपण आपल्याकडे फारशा स्वस्त राहिलेल्या नाहीत.
LCD TV पण आणला असता तर बरं झालं असतं असं वाटतंय आता. २००८ च्या डिसेंबर मध्ये एक ५०" TVचं चांगलं डील मिळत होतं.

भारतात परत यायचेच आहे हे आधीपासूनच ठरवलेले असल्याने गेली ४-५ वर्षे त्यादृष्टीने बरेच सामान डील्स कडं लक्ष ठेवून घेतले होते. बाकी तिकडून फ्रीज, सोफा असल्या गोष्टी आणण्यात मला तरी फारसा इंटरेस्ट नव्हता. शिवाय शिपींगचा खर्च मी स्वतः केलाय त्यामुळे तो खर्च वाढवण्यात काही अर्थ नव्हता.
शिपींग कंपनी शोधताना माझ्या काही मित्रांचा अनुभव ऐकला आणि जी कंपनी 'डोअर टू डोअर' शिपींग करेल त्यांना काँट्रॅक्ट दिले. एका मित्राने फक्त मुंबईपर्यंत सामान आणले आणि बाकिचा क्लिअरन्स स्वतः केला. त्यात त्याला खूप मानसिक आणि आर्थिक त्रास झाला.

तिथून निघण्यापूर्वी मी खालील गोष्टी केल्या..
१. पोस्टात जाउन १ वर्षासाठी Forwarding Address देणे.
२. नको असलेली क्रेडीट कार्डस, बँक अकाउंटस् बंद करणे, पाहिजे असलेल्या बँकेत आणि क्रेडीट कार्ड कंपनीला भारतातला किंवा US मधल्याच मित्राचा पत्ता देणे.
३. सॅलरी अकाउंट चालू ठेवले कारण काही सेटलमेंट बाकी होती शिवाय मागच्या वर्षाचे टॅक्स रिटर्नस येणार आहेत.
४. सगळ्यात जुणे क्रेडीट कार्ड चालू ठेवले कारण परत कधी US ला जावे लागले तर चालवता येइल शिवाय क्रेडीट हिस्टरी चालू राहील (क्रेडीट हिस्टरीची लेंग्थ पण महत्वाची असते).
५. येण्यापुर्वी बहुतेक सर्व बिलं चुकती केली. मी इ-बिलच वापरायचो त्यामुळं राहिलेली १-२ बिलं इथून पण भरता आली. शिवाय सर्व कनेक्शन्स (वीज, फोन, मोबाइल, इंटरनेट, केबल) बंद केली. मोबाइल वाल्यांना US मधून उडाल्यावर २ दिवसांनी कनेक्शन बंद करायला सांगितले (जर फ्लाइटला उशीर झाला तर आणि इमर्जन्सीमध्ये वापरता यावा म्हणून). दोन्ही GSM फोन unlock करून घेतले, भारतात वापरता यावेत म्हणून.

परत आल्यावर -
पुण्यात आधीच घर होते त्यामुळं आल्यावर रहायचा प्रश्न नव्हता. शिवाय ज्या कंपनीकडून onsite गेलो त्यांच्याकडूनच परत आल्याने नोकरीचाही प्रश्न नव्हता. आल्या आल्या प्रोजेक्टपण लगेचच मिळाला.
मुलीच्या अ‍ॅडमीशन साठी (Jr. KG) आम्हाला थोडे फिरावे लागले. जवळच्या ३-४ शाळा short list केल्या होत्या. त्या शाळांना भेट देउन तिथल्या सोयी वगैरे बघून आलो. त्यानंतर त्यांच्या priority ठरवून त्या त्या शाळेत प्रयत्न केले. आम्हाला जी शाळा खूपच आवडली होती तिथं अ‍ॅडमिशन नाही मिळू शकली पण त्याच्या नंतरच्या शाळेत नशिबानं २ जागा रिकाम्या झाल्या होत्या तिथं मिळाली.

परत येण्यामागची वैचारिक भूमिका आणि आल्यावरचे अनुभवपण लिहायचेत 'त्या' बाफंवर. तिकडं लिहीन लवकरच.

बी ने मस्त सुरुवात केली व मिनोती, मनिष ने उत्तम भर घातलीये त्याच्यात. मी पण इथल्या (अमेरिका) Bed Bath n Beyond ह्या दुकानात मिळणार्‍या स्वयंपाकघर , बाथरुम, बेडरुम ह्यातल्या भरपुर गोष्टी नेणार आहे. electronic वस्तु बहुतेक नेणार नाही. फ्रिज, उत्तमसा सोफासेट, मॅट्रेस (कंटेनर घेतला तर) न्यायची इच्छा आहे.

एक सांगावसं वाटल.

पुण्यात चांगल्यापैकी आणि अगदी वेगवेगवेगळ्या सायझेसच्या झीपलॉक बॅग्ज मिळतात. मी स्वतः तेथून इथे (अमेरीकेत) आणते. फ्रिजर बॅग्ज मात्र इथून पाठवते. वहिनी आणून देते. तिला विचारून सांगेन. केळ्याचा स्टँडही तिकडूनच आणला.

अनघा, माझ्या नवर्‍याची कार निघायला ४ दिवस बाकी असताना क्रेग लिस्ट का पेनीसेव्हर मध्ये अ‍ॅड टाकली. बरेच फोन आले. १० वर्षाची, १५०k + miles ,स्टीक शिफ्ट कार दुसर्‍या दिवशी विकली पण. आम्ही निघायच्या एक दिवस आधी डिलरला देऊन तो देईल ते पै़से घ्यायचा विचार केला होता. त्यामानाने बरे पैसे मिळाले.कार विकल्यानंतर मात्र हिंडण्याफिरण्यावर फार बंधन येते.

क्रेगलिस्ट वर टाका अगदी नक्कि विकली जाइल. आणि दर २ दिवसांनी जाहिरात रिफ्रेश करत रहा म्हणजे लिस्ट मधे वर दिसत राहिल.

लहान मुलांसाठी umbrella stroller जरूर आणावा. ३-५ वर्षांची पोरं असून, बाहेर फिरायला गेल्यास फार सोयीचे पडते. दोन मुलं double stroller ही बरा.

धन्यवाद.... अदिती, अमृता
क्रेगलिस्ट वर टाकली आहे ....पण १० दिवस झले तरी काही हालचाल नाही...म्हणुन इथे लिहीले
२ कार मधली ही कार नवीन आहे म्हणून जास्ती काळजी...म्हणुन ही आधी विकून मग जाताना जुनी विकायची असा प्लान आहे...२ दिवसांनी जाहिरात रिफ्रेश करण्याची आयडिया वापरते आता....

मी या वस्तू घेउन जाते आहे
Lunch box - कारण या वर माझी आई खूप खूश आहे...त्यातला प्लास्टिक बॉक्स वेगळा धुता येतो म्हणून
Black & Decker Tool Box

बाकीचे जसे बॉक्समधे टाकत जाईन तसे लिहीन

देशात फारसा नाही वापरता येत ग स्ट्रोलर. गर्दी, रस्ते आणि कुठल्याही वाहनात स्ट्रोलर ठेवायची सोय नसणे ह्या मुळे अडचण येउ शकते. आमचा तर पडुनच असायचा. त्यापेक्षा लहान मुल असेल आणि घराजवळ छान फिरायला बाग किंवा जागा असेल तर त्यांना रोज फिरायला न्यायला उपयोगी होइल. Happy

माझ्याकडे मी येथून जाताना इथल्या वस्तू आणि तिथून निघताना तेथील वस्तू सोबत असतात. मागे मी चिनीमातिची झाकण असणारी बरणी तिकडून इथे आणली आणि चायनीज चिमी मातीचे वाडगे आणि चमचे येथून तिथे नेले Happy मोड आणण्याची चाळणी येथून तिथे नेली आणि रवा-पिठ गाळण्याची चाळणी तिकडून इकडे आणली Happy अशा बर्‍याच गोष्टी आहेत. हे सर्व मला इथून कधीतरी परत तिथे नेता आले पाहिजे म्हणजे बरे वाटेल Happy

आर्च,कृपया मला ते केळीचे स्टँड कुठे मिळेल पुण्यात सांगतेस का? केळी टांगायची कुठे हा माझा सदोदीत प्रश्न आहे. केळीचेही स्टँड असते हे वाचून एकदम आनंद झाला. तेंव्हा तू पत्ता न विसरता दे ही नम्र विनंती!!!!!

इथे सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा!!!!!

मिनोती नी लिहिलेल्या यादीतले सर्व सामान मुंबईत तरी मिळते. तिथून(मुंबईतून) लहान गावात नेणे बरे राहिल. व पिनट बटर, सुर्‍या, झिपलॉक बॅग्स,फॉईल, प्लॅस्टीक रॅप सगळे चांगल्या कॉलीटीचेच व्यव्स्थित मिळते. मॉलमधील स्टोर international वस्तू जश्या शॉवर कर्टन्स,बनाना स्टँड,फळांची परडी(फळे ठेवायला, आक्खे बाथरूम फर्निचर जसे सोप डिस्पेनसर्,होलडर वगैरे आणखी छान डिझाईन मध्ये पण मिळते हो. कुठल्याही मोठ्या किचन शोवरूमध्ये बर्‍याच वस्तू मिळतात.आई भारतात फक्त दर वर्षी इथून गणपतीत जाते , ती अश्य वस्तू घेवून जात नाही उगाच बॅगेचे वजन कशाला वाढवा. तिथे कारण हे मिळते आरामात.(पुण्यात मिळते का नाही कल्पना नाही). Happy
फक्त खालील गोष्टीचा कधी शोध घेतला नाहीय.(म्हणून माहित नसेल)
निरनिराळ्या फुलांच्या बिया
मिरॅकल ग्रो सारखी उत्पादने

स्ट्रोलर नेताना वजनात धरतात का? आम्ही आमच्या पश्चिम किनार्‍याच्या सहलीसाठी २ सीटर स्ट्रोलर घेतला आहे. जाताना टाकायचे जीवावर येत आहे. ($१६०).
जर नेता येत असेल तर घेउन जाता येइल.

बी अरे तुळशीबागेतून. बाहेर ती दुकानं आहेत न, पंड्या वगैरेसारखी. त्याच एका दुकानातून. रस्त्यावरपण विकत असायचे. पण मी दुकानातून घेतला.

आणि हो, तुळशीबागेबाहेर एक माणूस रस्त्यावर पत्र्याच १० रुपयाच सालं काढायच यंत्र (?) विकत होता. त्या यंत्राच्या दुसर्‍या बाजूला भोकं असलेलं दुसर यंत्र आहे. त्याने कोबीच्या, गाजराच्या इतक्या सुंदर सळया निघतात. चायनीज कुकींगला एकदम मस्त. इथे आल्यावर सगळ्या मैत्रीणी त्यांना का नाही आणलं म्हणून विचारत होत्या. पण नेहेमी काय होतं अस रस्त्यावरच काहि बघितलं आणि घरी आणलं की ते चालतच नाही त्यामुळे घ्यायच धाडस होत नाही. पण हे मेड इन चायना वगैरे न्हवत. त्या माणसाने स्वतः बनवलं होतं त्यामुळे त्याच्या कल्पकतेला दाद द्यायला घेतलं पण एकदम मस्त आहे. खरं तर २ बोटं लांब पत्रा आहे पण साल काढण आणि ते सळया काढण एकदम धारदार आणि मस्त आहे.

पूनम,
इकडे मुंबईत मंगलदास मार्केटच्या बाहेरच्या बाजूला प्लॅस्टिकचं होलसेल मार्केट आहे तिथे एका दुकानात क्लिंगरॅप आणि झिपलॉक एकदम उत्तम क्वालिटीच्या मिळतात. पुढच्या वेळेला त्या बाजूला गेल्यावर तुझ्यासाठी आणू का? १०० ची बॅग एकदम घ्यावी लागते मात्र.

कॅन ओपनर, सुर्‍या, गार्लिक ग्रेटर, मेजर कप्स, मेजर स्पून्सचा सेट, सॅलडचा चिमटा जो डिटॅचेबल असतो अश्या काही वस्तू मी आणल्या होत्या त्या अजून वापरतेय. इथे किती मिळतात माहीत नाही...

मिनोती नी लिहिलेल्या सर्व सामान मुंबईत तरी मिळते>>एकदम बरोबर, पार्ल्याला alpha मधे बहुतेक सगळ्या US branded गोष्टी मिळतात. एकदा मी tylenol पन घेतले होते तिथुन. Happy

आमच्या घरी कोणी पुण्या/मुंबईत नाहीये त्यामुळे माझ्या अल्पमतीने मी लिहिलेय. आणि लिहीताना ते स्पष्ट देखील केले होते. कुणाला त्याचा उपयोग होईल असे वाटत नसेल तर मी उडवते.

उडवतेस कशाला.
ज्यांना पुण्यामुंबईचा अ‍ॅक्सेस नाही सहजपणे ते तिकडून घेऊन येतील. ज्यांना मुंबईत खरेदी करणं शक्य आहे ते बॅगा भरून आणणार नाहीत. मुंबईतच विकत घेतील.

आपलं वापरून झालेलं पण सुस्थितीत असलेलं सगळं सामान अमेरिकेत विकून टाकता येऊ शकतं आणि ते विकत घेण्यात विद्यार्थीच नाही तर बरी परिस्थिती असलेल्यांनाही कमीपणा वाटत नाही ही एक गोष्ट मला फार आवडली होती.
आपल्याकडे पूर्वी मोठ्या भावंडांच्या वस्तू लहान भावंडांना मग अगदी सख्खी नसतील तरी मामे, चुलत, मावस, आत्ये भावंडांना दिल्या जायच्या.. कपडे, पुस्तकं, खेळ इत्यादी... माझ्या लहानपणीही असे काही फ्रॉक्स मी घातल्याचे मला आठवतेय. त्यातले एकदोन माझे अति आवडते होते आणि ते फाटले तरी मी तेच घालायचा हट्ट करायचे हे ही आठवतेय माझ्या आईला कमीपणा वाटायचा नाही त्यात. पण माझ्या वस्तू मात्र सगळ्या कामवालीच्या मुलींनाच दिल्या गेल्या. हल्ली कामवाल्या पण वापरलेल्या वस्तू घेत नाहीत. आपण इतके अति स्वाभिमानी का बरं झालोय कारण नसताना?

Pages