परतोनि पाहे- पूर्वतयारी चेकलिस्ट. काय करावे आणि करू नये आणि शाळा

Submitted by रैना on 12 January, 2010 - 12:24

इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. Proud
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी तुझ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करते.

- नोकरी मी परतण्याआधी तोक्योतून शोधायला सुरवात केली होती. एकदा परतायचा निर्णय झाल्यावर नव-यानी त्याच्या अमेरिकन कंपनीद्वारे ट्रान्सफर घेतली होती. जेणेकरुन एकाला तरी नोकरी पक्की होती.
आमच्या ओळखीच्या अनेकांनी ट्रान्सफर घेतली. त्यांना वर्षानुवर्षे भारतीय कंपन्यात केलेली नोकरी कामात आली. आणि शिवाय परत जावेसे वाटले तर पर्याय खुले ठेवले.
- मुलाखतींमध्येच पगार हा City Compensation Index वर आधारित असल्यामुळे pay cuts ओघानेच आले. कितीही पैसा जोडला तरी तो अपुरा असतो ही आमची भुमिका होती. घर वगैरे नव्हते तेव्हा. जो पगार भारतात मिळाला तो मान्य केला.
- मुलाखती फोन, वी.सी द्वारे झाल्या. भारतातील मित्रमैत्रीणींना CV पाठवला, एक दोन हेडहंटर्स ना पाठवला, पूर्वी भारतात काम करत असताना जी कंपनी होती त्यांनाही पाठवला, www.naukri.com, www.monsterindia.com वर साधारण जॉब्स कसे असतात हा अंदाज घेता येईल.
सर्व पर्याय उपलब्ध आहेत आणि ते वापरावेत. लोकांशी बोलणं चालु केलं. थोडक्यात job landscape चा अंदाज घेणे.
- नोकरी हातात असल्याशिवाय येणे हा पर्याय मी तरी सुचवणार नाही. भारतात कशाला, जगात कुठेही.
हवं तर एखाद वर्ष आधी तयारी करुन एक दोन ट्रिप करुन काय उपलब्ध आहे याची चाचपणी करा.
आणि जर खरोखरी तुमची आर्थिक परिस्थिती फार बळकट असेल तर तो प्रश्नच उद्भवत नाही.
तुमचं घर जर असेल तर कदाचीत हातात नोकरी असल्याशिवायही येऊ शकता.
- मागच्या बाफ वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे जो देश आपण सोडतोय त्यातील टॅक्स चे वर्ष संपताना तो सोडला तर बरे. टॅक्सेस फाईल करायला सोपे पडते.
- मुलांच्या शाळा हा एक फार मोठा विषय आहे. त्याबद्दल नंतर.
- काय वस्तु घेऊन याव्यात ? हे तुम्ही शिपमेंट (air/sea) साठी किती खर्च करणार यावर अवलंबुन आहे. भारतीय कंपन्या ट्रान्स्फर करताना खर्च देत नसत पूर्वी. एकदा स्वतः खर्च करणार हे निश्चित झालं की आणायच्या वस्तु आपोआप कटाप होतात.
त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक गृहोपयोगी वस्तु शक्यतोवर अजिबात आणु नयेत. फ्रीज, टिव्ही, वॉशिंग मशील, डिशवॉशर वगैरे. प्रत्येक गोष्टीच्या अ‍ॅडापटर वरच फार खर्च होतो आणि Voltage Fluctuation मुळे ते उडतात. कंपनी खर्च देणार नसेल तर शक्यतोवर कोणीही या वस्तु घेऊन यायचा विचार करत नाहि. शिवाय भारतात सर्व वस्तु मिळतात.
- जाताना दोन सुटकेस वर गेला असाल तर येताना घर सोबत आणणे हे फार कटकटिचे काम आहे.
- गॅस, घरभाडी, साधारण area वगैरे बाबत लोकांशी बोलुन ठेवणे, चौकशी करणे. आम्हाला आल्यानंतर घर शोधायला महिना गेला. sea shipment आणि सामान यायला अजून एक-दोन. आणि गॅस यायला दोन महिने लागले (रेग्युलेटरचा शॉर्टेज). पहिले सहा महिने (जर नविन शहरात येणार असाल तर) कुठेही लागतातच.
- सुनिधीनी लिहीलं आहे त्याप्रमाणे मुलं आणि एक पालक आधी आल्यास बराच फरक पडतो.
- मुलं तिथे जन्मली असतील तर त्यांचे भारतीय विजा renew करणे याला वेळ लागतो. दिल्लीतही खेटे मारावे लागतात. हा मित्रमैत्रिणींचा अनुभव.
- सध्याचे बदललेले अगदी लेटेस्ट भारतीय विजा regulations प्रमाणे १% किंवा २० यापेक्षा जास्त लोकं बाहेरील देशातील असु शकत नाहीत. ही एक प्रचंड मोठी डोकेदुखी आहे आणि अजून मीच हापिससाठी कायदेपंडितांचे सल्ले घेते आहे. जरा हातात काहीतरी ठोस आले की कळवेन. अगदी पुढच्या महिन्यात वगैरे परत येणार असाल आणि परदेशी नागरिक असाल (pIO, oci) असले तरी कृपया तुमच्या कंपनीला नीट विचारल्याशिवाय येऊ नका.
- फर्निचर वगैरे विकुन परत यावे (कंपनी खर्च देणार नसेल तर). सी शिपमेंट भयंकर महाग असतं.आणि एवढं करुन सामान नक्की येइलच याची खात्री नसते. कस्टमस बद्दल लिहूच का ?
-सिंडे- हे तुझ्यासाठी. कारसीटचा फारसा उपयोग होणार नाही Happy इथल्या गाड्या छोट्या आहेत, सीट मावणार नाहीत वॅगन आर, मारुती इ.इ. मध्ये. बेबीकारसीटचा उपयोग होईल, स्ट्रोलरचा उपयोग पोरांना अकला येईस्तोवरच होईल. २ + वर्षांच्या मुलांसाठी नाही आणलंत तरी चालेल

रैना, मी उद्या सकाळी वाचेन वरचे सर्व. तू घेत असलेल्या कष्टाबद्दल सहस्त्रशः आभार!

माझे अजून काही प्रश्न आहेतः म्हणजे इथे सर्वांनाच. फक्त रैनाला नाही.

१) देशात गेल्यानंतर आपण परदेशातूनच या या गोष्टी आणावयाच्या असत्या असे कधी वाटले का? कुठल्या वस्तू?
२) मी देशात जेंव्हा जेंव्हा भेटीला जातो तेंव्हा तेंव्हा येथून एक एक वस्तू घेऊन जातो. असा विचार करुन की मला पुढे ती वस्तू लागेल आणि भारतात तितकी चांगली मिळू शकणार नाही. मी दरवेळी पुढील भविष्याचा वेध घेऊन वस्तू विकत घेऊन ठेवतो. तुम्हाला जर काही यादी देता आली तर बरे होईल.
३) इथे जमवलेले लाकडी फर्निचर भारतात आणलेले बरे की इथेच विकटाक केलेले बरे?

अजून विचारेन. धन्यवाद!!!!!!

बी,

तुम्ही एका महत्वाच्या मुद्द्याची आठवण करुन दिलीत ती म्हणजे आर्थिक बाबीची.

मुले जर देशाबाहेर जन्माला आली असतील तर भारतातल्या कॉलेजेस साठी ती एन आर आय असतात. (जर भारतीय नागरिकत्व घेतले नसेल तर). त्यामुळे त्याना उच्च शिक्षणासाठी जनरल कॅटेगरीत न धरता एन आर आय म्हणुन गणले जाते. (जरी तुम्ही आयुष्यभर भारतात राहिलात तरिही).
शाळांमधे एन आर आय म्हणुन फारसा फरक पडत नाही.

एन आर आय विद्यार्थ्याना जनरल कॅटेगरीच्या ५ पट फी आकारली जाते. (मी एक उदाहरण म्हणुन मेडीकल आणि इंजिनीयरींग घेतोय कारण ती खार्चिक आहेत , मुले मेडीकल किंवा एंजिनीयरींगलाच कशाला जायला हवी इ. वाद इथे कृपया सुरु करु नये.)

मेडीकलः
१. सरकारी कॉलेजात एन आर आय ना प्रवेश नाही.
२. ए आय ई ई ई ला एन आर आय ना प्रवेश नाही.
३. खाजगी कॉलेजात समजा जनरल ची फी वर्षाला १,५०,००० असेल तर एन आर आय ला ७,५०,००० आकारली जाईल.

इंजिनीयरींगः
१. मी पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाची फी पाहिली त्यात एन आर आय विद्यार्थ्यांची वर्षाची फी $५००० ($३५०० ट्युशन + $१५०० हॉस्टेल) होती.
२. प्रायवेट कॉलेज मधे पेड फी च्या ५ पट रक्कम आकारली जाते. (उदा. जर पेड सीट रु. ५०००० असेल तर एन आर आय ला रु २,५०,००० दर वर्षाला द्यावी लागेल).

हे आकडे २००९-२०१० चे आहेत. अजुन दहा-पंधरा वर्षानी महागाईचा दर धरुन खर्च किमान दुप्पट तरी येइल. (वरील आकड्यात देणगी/कॅपिटेशन फी इ. चा समावेश नाही. वरील आकडे हे शासनाने ठरवलेले आकडे आहेत).

हे गणितही लक्षात घ्यायला हवे आणि त्याप्रमाणे नियोजन करायला हवे.(गुंतवणुक इ).

टीपः ही मी जमा केलेली गेल्या १-२ वर्षातील माहिती आहे. त्यात चुक आढळल्यास कृपया दुरुस्त करावी.

देशात गेल्यानंतर आपण परदेशातूनच या या गोष्टी आणावयाच्या असत्या असे कधी वाटले का? कुठल्या वस्तू?
--------------------------------------------
आम्ही एल सी डी टीव्ही न्यायचा विचार करत होतो. पण तिथे न्यायची आणि सर्विस इ. ची डोकेदुखी पाहता भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तु घ्याव्यात हे ठरवले आहे.
लॅपटॉप मात्र न्यायला हरकत नाही असे वाटते.

बी, माझ्यामते काहिहि नेण्याची गरज नाहीये देशात.. तिथे अगदी सगळ मिळत. कॅमेरे, लॅपटॉप ह्या वस्तु आपण नेतोच बाकि फर्निचर वगैरे नको न्यायला, देशात मस्त मिळत.

मनस्मी, तुम्ही ही पोस्ट टाकलित कि लगेच मला टेंशन येत, पण ह्या बद्दल अजुनही जरा शंका आहेच मनात आणि ती शंका प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय मिटायची नाही. Happy

अमृता,

माझी माहिती चुकीची निघावी यासाठी मीही खुप होपफुल आहे Happy जर यात काही पळवाट असेल किंवा चुक असेल तर कृपया लिहा (म्हणजे इतरानाही उपयोगी पडेल).

मनस्मी, भारतात LCD आणि आता LED पण येथील किमतींतच (अगदी इथून नेण्याइतका फरक नाही.) मिळतात.

मी हाय एन्ड होम थिएटर न्यायचा विचार करत होतो, एक नेलेही, जे मी कन्वर्ट करुन चालवतो, पण ता दुसरे नेणार नाही, कारण तिथेच आणखी थोडे जास्त पैसे देउन तेथील व्होल्टेज वर चालणारे मिळते व सर्व्हीस ही मिळेल. घेणारच असाल तर नाकामाची, क्ल्पिश्च, केईएफ, बोस्टन अकुस्टिक्स, मारान्ट्झ असे हायएन्ड मध्ये व रेग्युलर प्याप्युलर मध्ये बोस, सोनी, यामाहा अश्या सर्वांचे भारतात डिलर आहेत.

छान चर्चा चालु आहे इथे.
'परतूनी पाहे' ह्या दुसर्‍या बीबी वर विनय देसाईंची पोस्ट फार आवडली आणि पटली !
तिथल्याच लालु, MT, मनस्मि, रैना , सशल ,पग्या यांच्या पोस्ट्स पण पटल्या:).
अमृता,
मिळतं गं सगळं देशात पण बर्‍याच ब्रँडेड गोष्टी भारतात जास्त महाग आहेत अस् वाटलं मला (जीन्स चे ब्रँड्स किंवा कपडे, कॉस्मॅटिक्स चे सेम ब्रँड भारतात खूप महाग आहेत ).
जर देशात कधी परत गेले तर या गोष्टी मी नक्कीच जे कोण यु.एस मधून ये-जा करतात त्यांच्या कडून मागवीन.:)

>> जर यात काही पळवाट असेल
पळवाट? इथून जाऊन एक सीट अडवणार पुन्हा फीच्या बाबतीत पळवाट शोधणार. आता तिकडचे म्हणतील नका येऊ. Happy Light 1

कोणाला कल्पना आहे का? अमेरिकेतुन भारतात कार नेता येते का? असल्यास नेणं किती फिजीबल आहे?

सध्याचे बदललेले अगदी लेटेस्ट भारतीय विजा regulations प्रमाणे १% किंवा २० यापेक्षा जास्त लोकं बाहेरील देशातील असु शकत नाहीत. ही एक प्रचंड मोठी डोकेदुखी आहे आणि अजून मीच हापिससाठी कायदेपंडितांचे सल्ले घेते आहे. जरा हातात काहीतरी ठोस आले की कळवेन. अगदी पुढच्या महिन्यात वगैरे परत येणार असाल आणि परदेशी नागरिक असाल (pIO, oci) असले तरी कृपया तुमच्या कंपनीला नीट विचारल्याशिवाय येऊ नका.
-------------------------------------------------
हे कळले नाही. कुठले रेग्युलेशन आहे हे?

पळवाट वगैरे नाही हो माहिती.. शाळेत काही फरक नाही हे मी आधीच तुम्हाला सांगितलय. कॉलेज मधे पण असु नये अस मला वाटत जर मुल तिथेच मोठ झाल असेल तर किंवा आई वडील बरीच वर्ष देशात असतिल तर. Happy

प्रिती, भारतात इथली कार नेण काही फिसिबल वाटत नाही ग. राईट हँड ड्रायव्हींगला लेफ्ट हँड वाली कार अडचणीची होइल. Proud आणि शिपींग, मग ते साईड बदलण ह्या पेक्षा तिथेच घे कर कशी Happy

डिजे, जिन्स बद्दल समहत Happy कॉसमेटिक्सचा फार काही अनुभव नाहीये ग.. ना इथे ना देशात Proud

मी एकलय लेफ्ट हँड ड्राईव्ह करुन मिळते, पण नक्की काहीच माहिती नाही म्हणुन विचारत होते. इथे गाड्या भारतापेक्षा बर्‍याच स्वस्त आणि स्पेशियस असतात तेव्हा नेता आली तर चांगलं.

या विषयासाठी Return to India क्लब (http://www.r2iclubforums.com/) ही अतिशय उपयुक्त अशी वेबसाईट आहे. हव्या त्या विषयांमधील माहिती आणी खुप मोठा लेखक/वाचक वर्ग आहे.

डिजे, नुसत्यआ जीन्सचं नाही पूर्ण वॉर्डरोबच आवडेल मला यूएस हून. Wink
मनस्मी, खरंच, हे असंच तुम्ही मागेही लिहिलं होतंत. एवढ्या फिया वाचून वाट्तं की जर मुलांना टॉप कॉलेजात जाता येत नसेल तर कशाला फार आटापिटा तरी करा परत जायचा.

कस्टम्स प्रमाणे १६०० cc पर्यंतची कार नविन असताना इम्मोर्ट करता येते, त्यापुढील CC साठी कार निदान एक वर्ष जुनी असावी लागते. जुन्या कारचा घसारा वजा जाता त्यावर १८१ टक्के आयात कर भरावा लागतो.

ही वेबसाईट कामाला येईल. http://www.cbec.gov.in/faq.htm

इथं फिया कमी आहेत का? मला तर माझ्या कलिग्जच्या मुलांच्या कॉलेजच्या फिया आणि खर्च एकुन चक्करच येते.

मला ही मनस्मींचं पोस्ट बघुन वाईट वाटलं, की मुलांना शासकीय कॉलेजात अ‍ॅडमिशन नाही मिळणार Sad मग नंतर म्हंटलं आपला तर शेख चिल्ली झालाय अगदी. पोरगं आताशी के जीत पण नाही गलं अन मी त्याच्या १२वी नंतरच्या शिक्षणाची काळजी करतोय Proud त्यात तो माझ्यावर गेला तर मग हा प्रश्नच उदभवणार नाही! हा का ना का ? Wink

शाळा प्रवेश Happy
संपुर्ण डिसेंबर मी घालवला यात पण काहिही हाती लागले नाही. प्रवेश परीक्षा द्याविच लागते त्याशीवाय अ‍ॅड्मिशन मिळत नाही. अ‍ॅड्मिशन द्या(सिक्युअर करण्यासाठी) मग आल्यावर परीक्षा देवु असे म्हणुनही काही फरक पडला नाही.मी बघितलेल्या सगळ्या शाळा भारता बाहेरील लोकांना टारगेट करणार्या होत्या.
आता परत गेल्यावारच धडपड करायची ठरवली आहे कारण इथुन काहीच होवु शकत नाही.

वैद्यबुवा,

अहो तरतुद करुन ठेवायची. ती १५ वर्षानंतर करायला गेलो तर पोरेच ओरडतील्..एवढी माहिती होती तर केलीत का नाही.
नाही त्यानी खर्चात पाडले तर त्याना ऐश करायला द्यायचे ते पैसे..;)

नाही त्यानी खर्चात पाडले तर त्याना ऐश करायला द्यायचे ते पैसे >> त्यांना का बरे द्यायचे ते पैसे?? आपणच ऐश करावी त्या पेक्षा Proud

डिजे, नुसत्यआ जीन्सचं नाही पूर्ण वॉर्डरोबच आवडेल मला यूएस हून
<< हो अगदी खरं, म्हणूनच कपडे अ‍ॅड केलं Happy , शुज पण अ‍ॅड करायला हवेत त्यात!!
ठराविक गोष्टींची इतकी सवय होते कि पाहिजे म्हणजे पाहिजेच :).

कॉस्मॅटिक्स तर देशात जबरी महाग आहेत इथल्या कंपॅरिझन मधे, M.A.C. ची लिपस्टिक इथे $१४ ला असते ती तिथे १४०० रु ना :(.
शिवाय M.A.C. कॉस्मॅटिक्स ब्रँड स्टोअर्स अजुन तरी शोधावी लागतात भारतात.
हैदराबाद, मुंबई ला दिसली , इतर ठिकाणी माहित नाही.

मग "मायबोली खरेदी आता अमेरिकेतून भारतात तुमच्या दारात" ही सेवा चालू करता येईल. Happy

Pages