मुंबई जीटीजी ३० जानेवारी २०१०- लालु

Submitted by रैना on 6 January, 2010 - 02:58

लालु (शर्मिला) मुंबईत येत आहे.
सर्वानुमते शनिवार ३० जानेवारी मुकरर करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार येऊ नका कृपया. लालुचे फ्लाईट त्याच रात्री आहे. Proud
- स्थळ- गणेश उद्यान शिवाजी पार्क.
- लालुनी विनंतीवजा (आज्ञा) केली आहे की खूप धावपळ करुन, सुट्ट्या वगैरे काढुन येऊ नका मंडळी. सहज जमत असेल तरच या. Happy

पान वाहून गेलय त्यामुळे आठवतय तशी यादी टाकते. प्लीज गैरसमज नको, तुमचं नाव यात नसलं तर तो माझ्या वयानुसार विस्मरणाचा दोष आहे असं समजा आणि कृपया नावं द्या. यातील कोणालाही मी कधीच पाहिलेलं नाही. कंपु वगैरे धोषा नको.

१) लालु
२) मंजू (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
३) साधना (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
४) असुदे
५) केदार १२३
५) आफ्रिकेहून आशुतोष
६) कविता नवरे
७) किरू
८) गजानन ?
९) विशाल कुलकर्णी
१०) रैना
११) असुदेची गाडी असेल तर मनीषा लिमये
१३) यो रॉक्स ?
१४) डुआय विथ सिग्नीफीकंट अदर
१५) भ्रमर
१६) नील वेद
१७) शर्मिला फडके
१८) विनय भिडे
१९) आनंदमैत्री
२०) घारूअण्णा
कोणा संयोजकांना इथुन पुढे चार्ज घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. येणा-यांनी कृपया आपला सेल नंबर मला माबोसंपर्कातून मेल करा.

मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ३० ला यायला तयार आहे, पण ४ ची वेळ भारी आहे.. Happy मी, मंजुडी शनिवर्कर्स आहोत Happy

मी २३-२६ मुंबईत नाहीय त्यामुळे....

रैना / आजी / माजी आयोजक,

तारखा झाल्या फिक्स वेळेच काय?

इथं आमंत्रितांना(च) प्रवेश वगैरे आहे का? Happy

गप रे कुलदीप. कोण आमंत्रित ? तू येणारेस की नाही ते सांग. Happy

३० तारखेला - दुपारी ४ :०० वाजता असे ठरले ना ?

मंजे- पुरूषांना काय मिळेल आणिक ?
शिवाजी पार्कात एवढे सगळे खायला मिळते म्हणल्यावर मी पण येणार. Wink

साधना/ मंजु आणि शनिवर्कस - तुम्ही किती वाजेपर्यंत येऊ शकाल?

<<मंजे- पुरूषांना काय मिळेल आणिक ?>>
म्हंजे ? बायका खातात ते पुरूष खात नाहीत काय ? अर्थात पुरुषांची डोकी सोडून ..... Light 1

३० तारखेला - दुपारी ४ :०० वाजता ओके डन उत्सवमुर्ती लालूजी येणार ना पण....

असं नाही गं सोबत मित्र / मैत्रिणी आणू शकतो ना? Wink किडींग.

पार्कात एवढे सगळे खायला मिळते ह्म्म्म्म त्यादिवशी इकडच्या / तिकडच्या सेनेचा मोर्चा वगैरे नसला म्हणजे झालं Wink

दीपक म्हण धावेल.

३० तारखेला संध्याकाळी ४:०० वाजता... ठरलं.
दिप्या, काय रे तब्येत झालीये तुझी.. जरा व्यायाम कर.. व्यायाम कर..

मी ३० ला यायचा प्रयत्न निश्चीतच करेन.

तसे १७ ला मी पुण्यालाही जाणार आहे.. तिथेही लालु गटग ठरतोय त्या दिवशी Happy

रैना, हे गप्पांचे पान झाल्यामुळे माहिती वाहून गेली आहे. वरचा पॅरा एडिट करुन ठरलेली तारीख, वेळ लिही ना.
सुट्ट्या काढू नका यासाठी. Happy थोडा उशीर झाला तर चालेल. सगळ्यांना जवळ पडेल असे नाही आणि तेव्हा सहज शक्य असेल तर या. पुढच्या वेळी रविवार ठेवू नक्की. Happy

शिवाजी पार्कात उद्यान गणेश मंदिराच्या मागिल बाजुस मायबोलीकरांचे गटग व्हायचे. बरोबर ना नील? Wink आताचं ठाऊक नाही.

हं, मला वाटतं फार पूर्वी मांसाहेबांच्या पुतळ्याजवळ भेटी व्हायच्या माबोकरांच्या.. त्या ठिकाणाहून खाण्याचे ऑप्शन्स जवळ आहेत.. (अशोकचा भजी पाव सोडून)
मजा करा.. लाल्वाक्कांना फ्रँकी खाऊ घालाच Wink

शिवाजी पार्कात उद्यान गणेश मंदिराच्या मागिल बाजुस मायबोलीकरांचे गटग व्हायचे. बरोबर ना नील?

नक्की जागा सांगा..

मागच्य वेळेस मी मुद्दाम मोठ्ठेमोठ्ठे ग्रुप्स बघुन त्यांच्या आजुबाजुला हिंडुन हेच का ते माबोकर हा अंदाज घेत होते.. नंतर कळले माबोचा ग्रुप किती मोठा होता ते. पण त्यामुळे मला निदान माबोकरांची जागा तरी कळली. गणेश मंदिराच्या मागच्या बाजुला.....

ह्या उपासने शिपा बीबीवर अशोकच्या भजीपावच्या आठवणी जागवल्या होत्या म्हणून गेल्या वेळचं शिपा गटग झालं होतं.
साधना, हे असं सारखं सारखं बोलून नाही दाखवायचं बरं का.. असतात काही अडचणी, सगळ्यांना प्रत्येक वेळेला जमतंच असं नाही. शरीराने नाही, मनाने तरी प्रत्येक मायबोलीकर गटगला उपस्थित असतोच...

Pages