मुंबई जीटीजी ३० जानेवारी २०१०- लालु

Submitted by रैना on 6 January, 2010 - 02:58

लालु (शर्मिला) मुंबईत येत आहे.
सर्वानुमते शनिवार ३० जानेवारी मुकरर करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार येऊ नका कृपया. लालुचे फ्लाईट त्याच रात्री आहे. Proud
- स्थळ- गणेश उद्यान शिवाजी पार्क.
- लालुनी विनंतीवजा (आज्ञा) केली आहे की खूप धावपळ करुन, सुट्ट्या वगैरे काढुन येऊ नका मंडळी. सहज जमत असेल तरच या. Happy

पान वाहून गेलय त्यामुळे आठवतय तशी यादी टाकते. प्लीज गैरसमज नको, तुमचं नाव यात नसलं तर तो माझ्या वयानुसार विस्मरणाचा दोष आहे असं समजा आणि कृपया नावं द्या. यातील कोणालाही मी कधीच पाहिलेलं नाही. कंपु वगैरे धोषा नको.

१) लालु
२) मंजू (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
३) साधना (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
४) असुदे
५) केदार १२३
५) आफ्रिकेहून आशुतोष
६) कविता नवरे
७) किरू
८) गजानन ?
९) विशाल कुलकर्णी
१०) रैना
११) असुदेची गाडी असेल तर मनीषा लिमये
१३) यो रॉक्स ?
१४) डुआय विथ सिग्नीफीकंट अदर
१५) भ्रमर
१६) नील वेद
१७) शर्मिला फडके
१८) विनय भिडे
१९) आनंदमैत्री
२०) घारूअण्णा
कोणा संयोजकांना इथुन पुढे चार्ज घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. येणा-यांनी कृपया आपला सेल नंबर मला माबोसंपर्कातून मेल करा.

मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा करा मंडळी... जोरदार होऊन जाउदे लालु जीटीजी... रैना,तुझ्या पहिल्यावाहिल्या मायबोली जीटीजी संयोजनाबद्दल ऑल द बेस्ट :).. तुला इतक्या वर्षांच्या गटग संयोजनाच्या माझ्या अनुभवावरून एक सांगतो आयत्या वेळी कोणी येवो न येवो आपण मात्र एकच लक्षात ठेवायचं `आल इज वेल' .. Proud

शुभेच्छा राहिल्याच Happy गटगला हार्दिक शुभेच्छा. रैना फारसं छळू नका रे. वेळेवर गाड्या सोडा. ठरल्या जागी भेटा. धांदरटपणा करू नका. होऊन जाऊदे.. वृत्तांत लगेच लिहा Happy

आभारी आहे मयुरेश.
आयत्या वेळी कोणी येवो न येवो >> ही दुष्ट शंका तशीही मला छळते आहे.
सुरवात आजच लालु नी केली गणेश उद्यान की पुतळा, की माँसाहेब पुतळा? Proud

मी माझा फोनंबर खालील व्यक्तिंना पाठवते आहे. ते साधारण वेगवेगळ्या एरियातील वाटताहेत म्हणुन. अजून कोणी राहिलंय का ?
१) भ्रमर
२) अश्विनी के
३) आशुतोष
४) शर्मिला फडके
५) मंजू
६) लालु

रैना, मी, अश्विनी के आणि आशुतोष एकाच एरीयातले भाई आहोत Proud
तरी पण पाठव तू नंबर, ताबडतोब माझा नंबर कळवण्यात येईल.
इथे नमनालाच चांगलं रांजणभर तेल घालून झालंय, आता वृ. नंतर किती पोस्टी पडतील त्यावर आकडा लावा पाहू Wink

>>>>आयत्या वेळी कोणी येवो न येवो >> ही दुष्ट शंका तशीही मला छळते आ>>>>
रैना GTG जाए, कोई ना आए... (रैना बीत जाए च्या चालीवर..) Wink

ऐश करो भाई लोग. शुभेच्छा. Happy
(गालावर हलक्या थपडा मारत, छातीचे ठोके मोजत, बावरल्या वेहेर्‍याने उद्यानापुतळ्याला प्रदक्षिणा घालत, आल इझ वेल म्हणणार्‍या कार्याध्यक्षीण बाईंचा फोटु टाका रे इथे नंतर. Proud )

पण नक्की कुठे? उद्यानगणेश की माँसाहेब पुतळा??

>>>> २४ तासावर गटग आलं आणि अजून ठिकाण नक्की नाही का? Rofl
एका वेळी अनेक ठिकाणी होणारे वाट्टं हे गटग! Light 1

भ्रमा, कर्रेक्ट
गटगला येणा-या इच्छुक मायबोलीकरांनी याची त्वरीत नोंद घ्यावी.

गटगला न येणा-या मायबोलीकरांनी काड्या घालून नविन कार्याध्यक्षीणबाईंना कृपया अधिक गोंधळात पाडू ने. Wink

>उद्यानगणेश... >> बाप्पा (जीटीजीचं) कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेत! Happy शुभेच्छा!

बाप्पा (जीटीजीचं) कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेत >>> बाप्पाना कोणा कोणाला बघण्याचा चान्स मिळतोय ते बाप्पाच जाणे. Happy

डुआय- फटके Proud

इथे शुभेच्छा देणा-या सर्वांचे आभार. जी.टी.जी झालंच तर कळविणेत येईल.

येणा-यांनो (गाववालो के स्टाईलमें) पासवर्ड विसरू नका- राजमलाई, आणि (आपल्याच) हातात झेंडुचे फुल घेऊन या .

गटगला न येणा-या मायबोलीकरांनी काड्या घालून नविन कार्याध्यक्षीणबाईंना कृपया अधिक गोंधळात पाडू ने>>> होय होय. बरोबर.

बर त्या गोंधळात कोणीतरी कॅमेरा न्या आणि फोटो काढा रे.
फोटो माबोकरांचेच काढा Wink एका गटगच्या फोटोंमध्ये माबोकर नसलेल्या एका (मुलींच्या) ग्रूपचादेखील फोटो आहे Lol

एका गटगच्या फोटोंमध्ये माबोकर नसलेल्या एका (मुलींच्या) ग्रूपचादेखील फोटो आहे>>>>>>>>.
हा काय वेंधळेपणा नाय काय हा तर इब्लिस्पणा. Happy

जीटीजीला शुभेच्छा!!
मी उद्या फोनवरुन हजेरी लावेनच. Happy

माबोकर नसलेल्या एका (मुलींच्या) ग्रूपचादेखील फोटो >> करू की त्यांना ही माबोकर...

काय रे... हो ना? Wink

पूनम... मुली कसल्या (तुमच्या सारख्याच) काकवा होत्या त्या..!!
माहिला दिनानिमित्त्त वैशालीत आलेल्या.. Proud

आणि हो गटगला शुभेच्छा.. Happy

Pages