मुंबई जीटीजी ३० जानेवारी २०१०- लालु

Submitted by रैना on 6 January, 2010 - 02:58

लालु (शर्मिला) मुंबईत येत आहे.
सर्वानुमते शनिवार ३० जानेवारी मुकरर करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजता.
- भारतीय प्रमाणवेळेनुसार येऊ नका कृपया. लालुचे फ्लाईट त्याच रात्री आहे. Proud
- स्थळ- गणेश उद्यान शिवाजी पार्क.
- लालुनी विनंतीवजा (आज्ञा) केली आहे की खूप धावपळ करुन, सुट्ट्या वगैरे काढुन येऊ नका मंडळी. सहज जमत असेल तरच या. Happy

पान वाहून गेलय त्यामुळे आठवतय तशी यादी टाकते. प्लीज गैरसमज नको, तुमचं नाव यात नसलं तर तो माझ्या वयानुसार विस्मरणाचा दोष आहे असं समजा आणि कृपया नावं द्या. यातील कोणालाही मी कधीच पाहिलेलं नाही. कंपु वगैरे धोषा नको.

१) लालु
२) मंजू (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
३) साधना (शनिवर्कर त्यामुळे वेळ होईल)
४) असुदे
५) केदार १२३
५) आफ्रिकेहून आशुतोष
६) कविता नवरे
७) किरू
८) गजानन ?
९) विशाल कुलकर्णी
१०) रैना
११) असुदेची गाडी असेल तर मनीषा लिमये
१३) यो रॉक्स ?
१४) डुआय विथ सिग्नीफीकंट अदर
१५) भ्रमर
१६) नील वेद
१७) शर्मिला फडके
१८) विनय भिडे
१९) आनंदमैत्री
२०) घारूअण्णा
कोणा संयोजकांना इथुन पुढे चार्ज घ्यायचा असेल तर खुशाल घ्या. येणा-यांनी कृपया आपला सेल नंबर मला माबोसंपर्कातून मेल करा.

मंजूच्या मते शिवाजी पार्कात बरेच काही खायला मिळते. न मिळाल्यास तिला जवाबदार धरा. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रमर - कुठुन येत आहात तुम्ही- गोरेगावातून का?
मी हायवे वरुन (गो. इस्ट) तुम्हाला लिफ्ट देऊ शकेन. अजून कोणाला यायंच असलं तर सांगा.

३० जानेवारी, दुपारी ३.३०:
भ्रमा हायवेवर उभा आहे.. रैनाने गाडी नं सागितला आहे, तो घोकत आहे.. हातात मोबाईल आहेच..
"रैनाजी का? मी भ्रमर, जुना आयडी भ्रमरविहार.. हो हो, मीच तो उद्योजक. हो हो ते मीच लिहिलं होतं.. धन्यवाद.. निघालात का तुम्ही? हां हां, मी हायवेच्या 'सावकाश वहाने चालवा' या पाटीखाली उभा आहे.. तुम्ही कुठे आहात?"
"मला किनै निघायला जरासा उशीर झालाय, म्हणजे थोडा उशीर झालाय, मी नुकतंच बोरिवली सोडलंय.. मी सावकाश येत्ये (पाटी आहे ना तशी!) तुम्ही पुढे होता का? का थांबता?"
भ्रमा हताश! जल्लां एक लिफ्ट मागितली तर कोणी गाडीचं दार उघडायला बघेना! काय करता? जावा घरीच.. "बर.. असं करतो, तुम्ही थेट जा शिवाजी पार्काला.. मी येतोच एका कस्टमरकडे जाऊन.."
रैना कसनुसं हसत म्हणते, 'अहो असं करू नका प्लीज, सॉरी हां, मला झालाय खरा उशीर.. माझी लेक ना.. तुम्हालाही मुलगी आहे ना छोटी, माहित्ये ना किती गडबड असते.. तुम्ही प्लीज थांबा, असं करा एक पुस्तक वाचा, मग आपण गाडीत त्यावर चर्चा करू.. तुम्ही याच माझ्याबरोबर.. नाहीतर मी मायबोलीकरांना कशी ओळखू???????"
भ्रमा फोन ठेवतो..

Proud Light 1

पूनम Lol

पूनम- सि.रोड वरचा बदला इथे Biggrin
भ्रमर- वरील पोस्टला चॅलेंज म्हणुन ३.१५ वाजता (दुपारी) ओबेरॉय मॉल च्या इशान्य ( का नैऋत्य) वरून आपणांस उठविणेत येईल. Light 1

हो की! Happy हो गं, रैनाने सांगितलेलं, इथेही लिहिलय!
ह्म्म्म... पूनमच्या पोस्टमुळे थोडासा घोटाळा झाला बघ. Happy

आपणांस उठविणेत येईल.<<
आयुष्यातून असा शब्द सबटेक्स्ट आहे का?

सगळ्यांनो मजा करा रे.

लालू,
झारापचा चि. मसाला (उसळ आणि खतखत्यासाठीही योग्य असतो असा!) १३१२ कडे सुपूर्त केलाय. तो त्याच्याकडून घेणे न विसरता.
वापरल्यानंतर तो कितपत वेगळा स्पेशल आहे किंवा नाही हे मलाही कळवणे Happy

गाडी हाकत ये तो डोंम्बोलीवरन <<<<<बैलगाडी हाकत येणार असशील तर आधल्या दिवशीच निघ म्हणजे गटगच्या वेळेस पोचशील Proud

नाय बा! मी तुलाच सांगणार होतो की माझा पिकअप स्पॉट आता हा आहे - डों. ईस्ट Wink

बैलगाडी>>> अरे बैल परवडत असते तर शेतीच केली असती की मी. मनुष्यबळ संसाधन व विकास ह्यात मास्टरी आहे माझी Proud

मी पण येणार आहे! बरेच दिवस मायबोलीशी संपर्क नव्हता, या निमित्ताने परत नव्या-जुन्या मायबोलीकराना भेटता येईल!

भ्रमा.. आपण आपल्या या छोट्या भावाला इसरलात का ??
तुम्ही माझ्याबरोबर चला.. तुम्हाला हायवेने मस्तपैंकी घेउन जातो......... चालत Proud चलनेका मजा कुछ और है Proud

हो मलाही सांगा गटगं नसेल तर. नाहीतर, मी, लालु आणि भ्रमर एवढेच असायचो.

हो- फायनली (म्हणजे बहूतेक) आहे गटग वरील माहितीप्रमाणे. काऊंटडाऊन सुरू करा. Proud

मी सकाळीच सांताक्रूझला बहिणीकडे जाणार आहे. तिथूनच येणार. विन्या, भ्रमा very sorry पण तुम्हाला pick up करता येणार नाही. मन्या माझ्या सेलवर फोन कर. जमल्यास एकत्र जाऊ.

किरु माझ्या मनातल बोललास ,,,,,:फिदी:
मी पण २ वाजता दादरला अपॉईंटमेंट ला जाणार आहे..
येताना सगळे बाईकवरुन एकत्र येउ...कस ?

मी, लालु आणि भ्रमर एवढेच असायचो>>

ठीक. मीही आहेच पत्ते घेऊन येतो म्हणजे मेंढीकोट खेळता येईल Proud

Pages