बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे याच बीबीवर वाचले होते की अंगावरची लव कमी करायला वेखंड लावावे. माझ्या मुलीला लहानपणी atopic dermatitis चा त्रास होता. (अजुनही आहे पण होमिओपॅथी औषधामुळे आणि सायीमुळे आटोक्यात आहे), त्यामुळे तिला बेसनवगैरे काहीच लावले नव्हते. ती आता १० महिन्याची आहे तर तिला आता बेसन / कणिक आणि वेखंड लावले तर लव जाईल का? उन्हाळ्यात या उपायांचा त्रासतर नाही होणार?
माझी मैत्रीण पुढच्या वीकमध्ये भारतातून येते आहे तिला सांगता येइल आणायला.
अंगावरची लव जायला अजून काही उपाय आहेत का?

अजूनही लावायला हरकत नाही. बेसन + हळद + दुध हे साबणाऐवजी लावावे. आंघोळ झाल्यावर वेखंड लावावे. डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

कोरफडीचा गर लावल्यासही फायदा होईल. कोरफडीची पाने grocery store मध्ये मिळतात.

थॅंक्स अश्विनी.
वेखंड आंघोळ झाल्यावर म्हणजे ते दिवसभर तसेच राहू द्यायचे का, धुवायचे नाही?
वॉलमार्टमध्ये बहुतेक कोरफडीचे जेल मिळते, त्याचा उपयोग होईल का?

धुवायचे नाही. आपोआप जाते.

कोरफडीचे ताजे पान मिळाले तर उत्तम. नाहीतर जेल लावून पाहा.

अश्विनी, वेखंड चेहर्‍यावर लावले तर चालेल का? आणि उगाळून लावायचे नं?
सॉरी, खुप प्रश्न विचारते आहे, पण बाळाला लावयचे ना म्हणून.

चेहर्‍याला नको. डोळ्यात जाण्याची भिती आहे. उगाळून लावायची गरज नाही. चूर्ण चालेल. फक्त लावताना डोळ्यात उडणार नाही याची काळजी घे.
प्रश्न पाहिजे तितके विचार. मी इथे येईन तेंव्हा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन.

अश्विनी, अजून एक राहिलं विचारायचं.
तीला नं परवा ताप आला होता आणि २-३ दा उलट्या पण झाल्या. आता ताप नाहीया पण दुध प्यायल्यावर तीला जोरात खोकला येतो आणि उलटी होतेय. मला आधी वाटले सॉलीडमुळे होते आहे म्हणून मी तीला सॉलीड नाही दिले, पण आज पुन्हा तसेच झाले. आणि तिच्या श्वास घेतांना खूप घरघर आवाज येतोय.
तीला रविवारी सन्ध्याकाळी केळ दिले होते आणि रात्रीच ताप चढला, केळामुळे कफवगैरे झाला असेल का?
खोकल्यासाठी व उलट्यांसाठी काही घरगुती औषध देता येइल का? डॉक्टरनी तापाकरता टायलेनॉल सांगितले होते आणि खोकल्यावर इतक्या लहान वयात औषध देणे सेफ नाही असे म्हटले.

मी जुने आर्काईव्हस पण वाचून बघते आहे.

केळ्यामुळे कफ होतो. छाती गरम (सोसवेल इतक्या) कापडाने शेकून घे. गुटी देत असशील तर वेखंड, सुंठ, ज्येष्ठमध, हळद प्रत्येकी १०/१२ वेढे मधात उगाळून दे. दिवसातून ३ वेळा.
थंड काही खायला प्यायला देऊ नकोस. पाणी पण कोमट दे.

अश्विनी....
माझा आयाम सात दिवसांचा आहे. सी सेक्शन झाले होते. पहिले दोन दिवस दुध आलेच नाही म्हणुन त्याला वरचे दुध {लक्टोज मिल्क}दिले. तिसर्‍या दिवशी त्याने दुध प्यायला त्रास दिल पण आता तो अंगावरचे दुध पितोय... काल पासुन त्याला दुध पुरत नाही असे जाणवतय.... रात्री आणि पहाटे.... त्याने ओढ्ल्यामुळे निप्पल्स दुखायला लागले..पण त्याचे पोट भरत नाहीये... मला तर निप्पल्सना जखम होइल कि काय वाटायला लागलय...
मी रोज सकाळी कडुलिंबाच्या काड्यांचा रस पितेय कपभर्....दिवसतुन किमान ५ ते ६ ग्लास दुध शतावरी कल्प घालुन.. तसेच एकदा खसखशीची आणि अळिवाची खिर..... डॉक्टरनी गोळ्या पण दिल्या आहेत....
काय करु?
बाळाला न्हाऊ घालणार्‍या बाईच्या मते दुध आहे पण नस मोकळ्या नाहीत.. मालिशने होतिल मोकळ्या... उद्या सकळई ह पण उपाय करुन बघेन्....पण मला दुध असल्याचे जाणवत नाही.....
आयामला वरचे दुध देवुनही त्याची भुक भागत नाहीये..... अंगावरचे दुध प्यायला कि शांत झोपतो...डॉक्टर म्हणतात सप्लिमेंट वापरा....पण दुसरा काही उपाय नाही का?
नेट वापरु नको...बसु नकोस असे सगळे म्हणत असतानाही मायबोलीवर मदत मिळेल म्हणुन आ़ज ऑनलाईन आलेय.... प्लिज ज्यांना जे उपाय माहित असतिल ते कळवा....

अल्पना, अभिनंदन. Happy
दूध वाढण्यासाठी अजून काही वेगळा उपाय माहित नाही, मेथीचा उपयोग होतो. पाणीही व्यवस्थित पी. वरचे दूध देऊनही त्याची भूक भागत नाही असे का वाटते? आणि भूक भागत नसेल तर सप्लिमेंट द्यायला काहीच हरकत नसावी. अंगावरचे आणि सप्लिमेंट असे दोन्ही चालू ठेवता येते. आणि लगेच दूध येत नाही, तिसर्‍या-चौथ्या दिवसापासूनच नीट येते तेव्हा आधी सप्लिमेंट देतात.
ही लिन्क पहा- http://www.breastfeeding.com/all_about/fenugreek/all_about_fenugreek_mil...
तिथे अजूनही बरीच माहिती आहे. इथे अजून काही लोक सांगतीलच. टेन्शन घेऊ नको. Happy

खसखसीची खीर असा एक उपाय सांगितला होता
Happy
.............................................................

तो उपाय ती करतेच आहे. लिहिलंय तिने वर.

धन्यवाद लालु, झकास....
लालु, अगं तो एक तर वाटी चमच्याने दुध पित नाही... एक एक तास लगतो ३० मिलि. पाजायला..... तयार केलेले सगळे दुध संप्वत नाही. पोट भरल्याप्रमाणे गिळायचे थांबवतो किंवा बाहेर काढतो. झोपायला पण लागतो.. आणि नंतर १०-१५ मिनिटात परत हात चोखायला लागतो किन्वा भुक लागल्याप्रमाणे तोंड उघडुन नुसते चोखल्यासरखे करतो.
अंगावरचए पाजायला घेतले कि मग शांत होतो.....एक दिड तास अगदी जोर्जोरत चोखतो.....डोळ्यातुन पाणी येईल इतके दुखते...दवाखान्यात निप्पल्स तयार करण्यासाठी इंजेक्शन्च्या सिरिंजनी सक्शन केले होतो...त्यावेळी पण दुखले नव्ह्ते इतके दुखते....

>>एक तर वाटी चमच्याने दुध पित नाही
मग बाटली देऊन पाहिलीस का? हे बाटलीबद्दलच लिहीले असशील तर बाटलीने नीट पिता येत नाही आहे असं वाटतंय. अंगावरचे आणि बाटलीने पिणे याच्या टेक्निक मध्ये जरा फरक असतो. काही मुले कन्फ्युज होतात. नीट पिता येत नसल्यामुळे खूप वेळ लागत असेल आणि कंटाळून तो झोपी जात असेल. पण पोट तर भरलेले नसते.

नाही बाटली नाही वापरली... पण काल पासुन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यासारखे वाटतयं. मेथ्याचे पाणी घ्यायला सुरवात केली... दुध येतय आणि सध्या त्याला पुरतय्...त्याचा दुध प्यायचा त्रास संपलाय...

अश्विनी, आयामला बेसन आणि हळ्दीने अंघोळ चालु आहे, पण अंगावरची लव अजुनतरी कमी झालेली नाही. तो आता चार आठवड्याचा होईल. त्याला कोरफडीचा ग्र लावु का? चेहेर्‍यावर म्हणजे कपाळावर खुप लव आहे, तिथे लावले तर चालेल का? आणि हा गर अंघोळीनंतर लावावा का?
अजुन एक प्रश्न.... गेले ३-४ दिवस तो खुप रडतोय, सारखा दुध प्यायला मागतो...पोट भरले तरी मागतो आणि नंतर उलटुन टाकतो...सध्या तो फक्त अंगावरचे दुध पितोय.. दुध कमी पडते कि काय वाटुन फॉर्म्युला मिल्क देवुन बघितले...पण ते पिवुनही त्याला अंगावरचे दुध हवे असते.. दुध पितनच तो झोपतो,आणि निप्पल तोंडातुन निघाले कि लगेच उठतो... त्यामुळे रात्रभर व कधी कधी दिवसभर जागा असतो. झोप आली तरी निप्पल तोंडात नसेल तर त्याला झोप लागत नाही... डॉक्टर म्हणताहेत कि तो मदर निप्पलचा एडिक्ट झालाय... झोप लागावी म्हणुन त्यांनी त्याला रात्री फिनार्गंद द्यायला सांगितलेय्...पण मग त्याची सवय नाही का लागणार?
दुसरा काही उपाय आहॅ का? जर त्याला नुसते चोखायला म्हणुन पोट भरले असताना प्यायला घेतले नाही तर अक्रस्थाळेपणा करतो..आवाज फुटेपर्यंत रडतो..इतक्या लहाणपणी इतके रडु द्यायची भीती वाटते...

अल्पना... सर्वप्रथम तुझे अभिनंदन.

बाळ झाल्यानंतर आईला सतवणारा सर्वात मोठा प्रश्न, कि बाळाची भुक भागते की नाही. माझे पहिले सांगणे आहे की तु tension free रहा. त्यामुळे तुला दुध व्यवस्थित सुटेल. तुझ्या आहारावर concentrate कर. eggs / fish / chicken soup चालत असेल तर त्याचा समावेश कर. बाजरिच्या रव्याची, खसखशिची खिर, डिंकाचे - मेथिचे लाडु, शतावरि, मेथिची भाजी तसेच पुर्ण आहार घे. चहा-कॉफी कमी कर.

बहुतेक बाळांचेही स्वभाव असतात. पोट भरले तरी रडत राहतात. त्याचे जर वजन नीट वाढ्त असेल तर तुझे दुध नक्कीच कमी पड्त नाहिये. शक्यतो त्याला ३ ते ३.६ महिन्याचा होईपर्यंत वरचे देऊ नको. मला doctor ने बाळ जेव्हा मागेल तेव्हा त्याला दुध पाजायला सांगितले होते. बाळाच्या सवयी set होईपर्यंत आईला खुप patience ठेवावे लागतात. बाळ झोपला की तुही झोपून घेत जा. न जानो नंतर किती वेळ जागावे लागेल. दूध पिताना झोपला तर. निप्पल सोडवुन घेताना, जो हात free असेल त्याची करंगळी हळुच त्याच्या तोंडामध्ये सरकवायची आणि नंतर अलगद सोडवुन घ्यायची. कितीहि त्रास झाला तरी बाळाला बाटली / रबरी निप्पल तोंडात धरायला देऊ नको.

बाळाचे शैशव एकदाच अनुभवायचे असते. आत्ता कितीही त्रास झाला तरी त्याच पुढे HAPPY MEMORIES होतात.

धन्यवाद पल्लवी.... अग ह्याचे पोट भरतय्...मला काळजी तो झोपत नाही ह्याची वाटतेय.... तो फक्त निप्पल तोंडात असेपर्यंत झोपतो...तोंडतुन निप्पल सोडवले किन्वा सुटले कि लगेच जागा होतो... त्यामुळे २४ तासात तो ८-९ तास झोपतो फक्त....

अल्पना तु त्याला पाळण्यात झोपवते का?

पाळण्यापेक्शा झोळीत बाळ जास्त छान झोपतं. त्याला झोळीत आईच्या पोटात असल्यासारखे वाटत असाव. तु बाळाला गुटी देते का? बाळ झोपल्यावर थोडा अंधार कर ... हवा खेळ्ती असु दे. रात्री झोपण्यापूर्वी तु तुझ्या हाताने बाळाला हलकेच मसाज कर. बाळाला छातीशी घेऊन थोडं गुणगुणलं तरी थोडी गुंगी येऊ शकेल. नऊ महिने बाळ आईच्या पोटात असतं .. त्याला बाहेर आल्यावरही आई जवळ आहे अस feeling करुन द्यायला हवे. doctor म्हणत असतील तर ७-८ दिवस फेनर्रगन द्यायला हरकत नाही. येवढ्यामूळे लगेच सवय लागत नाही. बाकी तुला मदत करायला मोठी माणसं तुझ्याजवळ असतीलच. तेही तुला योग्य सल्ला देतिलच.

hi
my son is 19 months old . recetnly there was blood work done on him and the results are shocking .
He is allergic to peanut,egg white ,corn,seasame seeds,milk ,soy and Wheat . he is very thin and also suffered from eczema and asama . I need some help with receipes as well any other indian remedies to manage this .
oen more thing is how do u deal all these food allergies in india ,here we read the food lables and all . Please help me on this .

सर्वात प्रथम म्हणजे Its important that (you may have done this already) you and your husband (and close family) educate themselves about food allergies. You can check with public libraries about material. Secondly get enrolled in FANAA at least you get familiar with whole paradigm. There are alternatives available which can help for almost normal life, you will explore them as you get to know more about, and they are not very difficult to work with. Last but most important, make your son aware of his food allergies, there is no substitute to it.

As far as managing in India goes, it is pretty much same as in here. You will surprised to find alternatives available in India as well, once you start looking around (Al bait it's little difficult to control in India than in US) . I can not really enumerate over here as they keep changing depending upon circumstances and time.

Hopefully he will outgrow his allergies ( at least egg, corn and milk) over the period of time.

अश्विनी, तुम्ही पूर्वी कधी ऐकले नसेल म्हणून शॉकिन्ग वाटले पण हे तसे फार कॉमन आहे. ज्यांची allergy आहे त्या गोष्टी देणे ताबडतोब बंद करा. बरेच दिवस बन्द केल्यावर एक एक पदार्थ सुरु करुन पहायचा. जर त्रास झाला तर पुन्हा नवीन पदार्थ देण्यापूर्वी काही दिवस थांबावे. एक्झिमा आणि अस्थमा याशिवाय इतर काही त्रास आहे का? म्हणजे कधी रॅश उठणे, अंगावर, चेहर्‍यावर सूज येणे इत्यादी. वर असामीने लिहील्याप्रमाणे काही गोष्टींचा intolerance असतो. मूल मोठे होऊन पचनशक्ती सुधारली की ते कमी होते. एक शेंगदाणे सोडल्यास बाकी सगळ्या allergies वय ५ पर्यंत जातीलही. सध्या भात, डाळी, भाज्या, मांसाहार (चालत असेल तर. यात सीफूड मध्ये शेलफिश-प्रॉन्स इत्यादी ची allergy असू शकते.) यावर भर देता येईल. vitamis, calcium supplement देता येईल.

thanks for your response. today only we had a allergist appointment and he said my son can have milk as well corn . Nuts are to be avoided till some more time and Wheat is going to be tested on thursday .

I'm not sure if you are aware of this or not but coconut is considered as allergen induced food and especially people with nuts allergies can be (mot necessarily) susceptible to it. Hence be cautious when (if) you try coconut or any derived food.

गेल्या तीन-चार दिवसांपासुन, मी दिल्लिला आल्यापासुन माझ्या बाळाला प्रत्येकवेळी दुध प्यायल्यावर लगेच शी होतेय...सुरवातिला पाण्याचे प्रमाण जास्त होते... नुसता पिवळा फेस असायचा.. कालपासुन पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण अजुन्ही फेस येतोय. मी त्याला गुटी देतेय.. गुटिमध्ये जायफ्ळ आणि मुरुडशेन्गेचा वेढा वाढवलाय व हिरड्याचा कमी केलाय. तसेच आज त्याला फाटलेल्या दुधाचे पाणी दिले होते.. त्यची रुटिन स्टुल टेस्ट केली होती.... त्याचे रिपोर्ट ठिक आहेत...
मी सध्या खिचडी, दही असेच जेवण घेतेय... अजुन काही उपाय सान्गा.. माझ्या सासुबाई माझे दुध बंद करा म्हणत आहेत...

अल्पना, शी पुसताना बाळ नेहमीपेक्षा जास्त रडतंय का? शीची जागा लाल झालीय का? काही वेळा अशी शी होणं पण 'नॉर्मल' आहे असं सांगतात.१-२ दिवसात हा त्रास थांबला नाही तर पुन्हा डॉक्टरला दाखवा. कारण सांगते.माझ्या मुलाला तो चार महिन्यांचा असताना असाच त्रास सुरु झाला. पहिली स्टूल टेस्ट नॉर्मल आली. (त्या दिवसात मी गुटी द्यायचं पूर्ण थांबवलं!) पण त्रास सुरुच राहिला. इतका की शी पुसताना श्वास कोंडेपर्यंत रडायचा. दुसर्‍या टेस्ट मधे 'स्टूल्स हायली ऍसिडिक' म्हणून सांगीतलं. 'टेंपररी लॅक्टोज इंटोलरन्स' आहे असं प्रमाण झालं. बाकी दूध बंद करून फक्त'झीरो लॅक' ब्रँडचं लॅक्टोज रहित दुध द्यायला लागलं. एक आठवड्यात गाडी रुळावर आली.
बाळ व्यवस्थीत दूध पीत असेल, खेळंत असेल तर काळजी करु नका.
सासुबाई माझे दुध बंद करा म्हणत आहेत<<< आधी डॉ़क्टरना विचारलेलं बरं!

जायफळाचा वेढा वाढवल्यामुळे जरा घट्ट होते आहे का ? बाळ केव्हढे आहे आता ? माझ्या बाळाला २-२.५ महिन्याचा असताना असाच त्रास झाला होता अगदी २-३ दिवस. पण रडत वगैरे नसे. डॉ म्हणाले होते ४ दिवस झाल्यावरही असेच झाले तर स्टूल टेस्ट करु. पण काही उपाय न करताच त्रास थांबला. मृ म्हणाल्याप्रमाणे डॉ. ना विचारुनच काय करायचे ते केलेले बरे.

बाळ सव्वा दोन महिन्याचे आहे.. जायफळाने शी थोडीशी घट्ट झाली...पण तरीही मधुनच एकदम पाण्यासारखा पातळ फेसही येतो...आता प्रमाणही कमी झालेय... दिवसातुन ५-६ वेळा. शी ची जागा किंचितशी लालसर झालीये...पण तो रडत नाही...खेळत असतो...१-२ दिवसांनी परत भेटायचे आहे डॉ ला....
तुमच्या दोघींच्या उत्तरामुळे थोडसे बरे वाटले...
आपल्या कडच्या आणि माझ्या सासरच्या रीतींमध्ये खुप फरक आहे...दररोजच मोठे मोठे धक्के बसतात... अंघोळ घालण्याची पद्धत, बाळांतणीचे खाणे सगळेच वेगळे, त्यामुळे काय करावे कळत नाही...

नमस्कर मन्डलि,

मी मायबोलिवर नविन आहे. ३-४ वर्शा पुर्वि एक दोन वेला अलेले इथे पन नन्तर कधि अलेच नहि इथे... मराठी मि पहिल्यन्दाच लिहितेय. प्रेग्नन्त असतअना इथे अले असते तर फार हेल्प झलि असति... असो ...मला एक प्रश्न विचरायचा आहे. Not sure if this is the right thread or not. Aadhich maafi magate yogya thread nasel tar... Maza prashna - maza mulagaa 14 mahinyancha hoil ya mahinyat. khupach active ahe to. pan to khat matra titakasa nahi. especially dudhala khup natak karato... itaka ki amhala radavato... divasbharat far far tar 12-15 ozs milk kasabasa deto amhi tyala... तो अगदि लहान पनापासुन अस्अच आहे... त्यल दुध मुलिच नहि अवडत... he is better with solids compare to milk. Mala sangal ka please ki tyane kiti dudh ghetal pahije ani kahi tricks ki tyane tyala dudh avadel? mi anek formule change kele... atta wholemilk detey. same natak Sad Bottle tar to ghetach nahi... spoonfeed karav lagat... PLS PLS PLS need some help. Also mala 0 knowledge ahe ayurvedatal. would love to know what all i can give him to increase his apetite? and good for his health?

mi USA madhe rahate. Ithalya doctoranchya mhananyane to thoda underwt ahe... pan te sagale measurements american asatat... 14 mahinyanch indian baby asel tar sadharan kiti weight asat, konala kahi info ahe ka ya baddal?

Pages