बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिल्पा, ही सगळी दात येण्याची नॉर्मल लक्शणं आहेत...हिर्ड्या शिव्शिवतात त्यामुळे खेळ्णी, दुपटं चावावसं वाटतं, कीर्कीर वाढते...काही मुलांना तापही येतो....त्यामुळे घाबरु नका....बाकी डॉ काय तो योग्य सल्हा देतीलच Happy

thanks sayalee..
Dr.la vicharle pan tyani kahi khas reason nahi sangitle, normal aahe bolali, Den-Tonic deu ka vicharle tar nako bolali, zopat nahi mhatla tar sangitla ki aata to motha zalay, tyala khelaych asta, manun. me ektich aste na manun mala jara tras hoto g baki kahi nahi, ani chotya chotya goshtinch pan lagech tension yete, guidence karayla javal konich nahi na..... ( maaybolikar sodun) mhanun jara kahi doubt alla ki lagech ithe dhavte. khup masti karayla bagto jara pan mala bajula jayla det nahi, mag mazi kam hot nahit, jevan pan banvayla milat nahi mala, aata tyala kitchen made geun bolat bolat thodasa kahi tari karte. tari eka goshtich aasharya vatata evdasa bal continue 10-12 tas kasa jaga rahu shakto?? tehi suddenly evde changes vagnyat...... aso.......bagu...

शिल्पा, त्याला सकाळी चांगला मसाज करुन, अंघोळ घालून थोडा वेळ तरी झोपायची सवय लाव. किंवा दुपारी तरी. म्हणजे काम करायला थोडा वेळ मोकळा मिळेल.

thanks both,
सकाळी मसाज करुन आंघोळ घातल्यावर तो छान ४-५ तास continue झोपायचा पण सध्या ८-१० दि. नाही झोपत आहे म्हणुनच मला जास्त काळजी वाट्ते, suddenly एवढी झोप कमी कशी झाली? थोडी थोडी कमी झाली असती तर समजु शकले असते. आणी झोपलातरी एकदम कींचाळत ऊठ्तो १०-१५ मि. तच, कोनीतरी मारुन जबरद्स्तिने ऊठ्वल्यासारखा.... पण मग जागा झाला की चांगला खेळतो ( फक्त मी नजरेच्या टप्प्यात हवी).
त्याची गालाची स्कीन फुट्ली (थंडीने) आहे, तर कोणती क्रीम लावु? johnson baby lotion चालेल का? साबण बदलु का? johnson baby soap & oil chaalu aahe. maalishwali mhante ki Dove or Pears chaalel. काय करु? एकाच गालाची जास्त रफ झाली आहे. काही घरगुती उपाय असेल तरी सांगा.

माझी मुलगी आत्ता ६ महिन्यांची आहे. तिला दात येत आहेत. सध्या खुप सर्दी झालीय आणि दोन दिवस ताप पण आहे. कफ पण आहे. सर्दी कमी होण्यासाथी आणि कफासाथी काय करु?

माझा मुलगा १३ महिन्याचा आहे. गेल्या काही दिवसापासून तो , रोज रात्रि ३ च्या सुमारास उटतो आणि खुप रडतो, भुक असली तरी दुध पीत नाही. त्यावेळेस काय करावे? रात्रि झोपेत असताना बाट्लीने दुध देणे योग्य का? I know this is a kind of stupid question , being as his mother I can understamd these things however i am not getting what can be done for his calm sleep? I am working in an IT company so I am going through very tight schedule . please help me !!

शिल्पा पीअर्स अज्जिब्बात नको वापरुस थंडीत. त्याने त्वचा भयंकर फुटते. जॉन्सनचं विंटर केअर लोशन लावत रहा. जास्तच त्वचा फुटल्यासारखी वाटत असेल तर सरळ आपलं खोबरेल तेल लाव थोडसं.

सर्दी कमी व्हायला वेखंड उगाळुन लाव कपाळाला. जास्त असेल तर छातीला पाठीला पण लाव. आणी २ वेढे आनि जायफळ पोटातुन दे.

वेखन्ड मी लावते उगाळुन नाही. माझ्याकडे चुर्ण आहे ते लावते. पोटात देवुन बघते. तिच नाक पण चोंदलय. त्यासाठी काय करु?

नाक चोंदल्यावर आम्ही बाळाच्या छातीवर (कपड्यांवरून) थोडेसे नीलगिरी तेल शिंपडतो. थोड्या वेळात आराम पडतो. (बाळांसाठी नीलगिरी तेल वापरणे योग्य आहे का?)

तव्यावर ओवा भाजून एखाद्या नरम कापडात पुरचुंडि बांध आणि ती बाळाच्या जवळ ठेव त्या वासाने बाळाला श्वास घेणं सोपं होईल.

शिल्पा ,थन्डी वाढल्यावर जास्त स्निग्ध तेलाची त्वचेला गरज आसते.यावेळी खोब्रेल तेल सगळ्यात चन्गल्.कोमट करुन मालिश करु देत्.आणि मसाज नन्तर तेल मुरय्ल हव आर्धा तास्,मग आन्घोळ!

शिल्पा, इथे बदामाचं तेल मिळतं ते पण लावु शकतेस थोडं. अ‍ॅवीनो किंवा युसिरीनचे लोशन लावुन बघ. घरात फार थंडी किंवा हीटिंग आहे का ?

सर्दी ,आणि चातीत कफ असेल तर बाळाला गुटी देतेस असे ग्रुहीत धरून्...वचा(वेखन्ड्),सुन्ठ , जेष्टीमध, डीकेमाली, या सर्वान्चे ५ वेढे उगाळून त्यात ओव्यचा अर्क २ थेम्ब घालून आइच्य दुधातून गुटी देणे.
अशावेळी वरचे आणि बाटलीने दुध देणे टाळावे.कफामुळे बाट्लीचे दुध बाळाला घ्यायला त्रास होतो करण बाटलीने दुध घेतान त्यच फ्लो जास्त आसतो. वेखन्ड चुर्ण असेल तर ते बाळाच्या दोक्यवर घालायला हरकत नाही.
<<तव्यावर ओवा भाजून एखाद्या नरम कापडात पुरचुंडि बांध आणि ती बाळाच्या जवळ ठेव त्या वासाने बाळाला श्वास घेणं सोपं होईल>>ह्यने ही खूप फयदा होतो्या पुरचुन्डीने छाती ही शेकावी कफ सुटायला मदत होईल.

Hi All,
I am again posting the same message. I think here new comers won't get any inputs. anyway I hope someone will help me.
माझा मुलगा १३ महिन्याचा आहे. गेल्या काही दिवसापासून तो , रोज रात्रि ३ च्या सुमारास उटतो आणि खुप रडतो, भुक असली तरी दुध पीत नाही. त्यावेळेस काय करावे? रात्रि झोपेत असताना बाट्लीने दुध देणे योग्य का? I know this is a kind of stupid question , being as his mother I can understamd these things however i am not getting what can be done for his calm sleep? I am working in an IT company so I am going through very tight schedule . please help me !!

झोपेमध्ये दूध पिण्याची सवय चांगली नाही पण भूक लागली असेल तर दूध तर द्यायलाच हवे.रात्री झोपताना दूध देऊन बघ कदचित उठणार नाही मग.थंडी वाजत नाही ना ते पण बघ.

thanks..खूप विचित्र रडतो तो आणी dr ना पण विचारले तरी काही फरक पडला नाही . त्याची चिडचीड कमी कशी करता येइल? आणि शान्त झोप कशी येइल त्याला?

हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म मलाहि हाच प्रश्न आहे. माझा आठ महिन्यांचा मुलगा रात्रि कमितकमि ३/४ वेळा उठतो आणि त्याला (आइचच) दुध हव असत किंवा नुसत तोंडात ठेवायच असत न ओढता ते काढल कि खुप रडतो फॉर्मुला पित नाहि. त्याच्या डॉ नि म्हंटल स्वतः जवळ झोपवु नकोस, त्याला वेगळ झोपायचि सवय कर म्हणजे शांत झोपेल त्या प्रयत्नात मी एक आठवडा रात्रि जागुन काढला :(. मी रोज त्याला साधारण झोपायच्या अर्धा तास आधि सॉलिड्स देते हेतु हा कि पोट भरल्याने शांत झोपेल पण काहिच बदल नाहि अजुन काहि करता येउ शकते का?

शिल्पा, साबणाऐवजी शक्य असेल तर कच्च्या दुधात बेसन घालुन त्याने आंघोळ घाल. अजुन तर थंडीची सुरवात आहे, जर आत्ताच त्वचा कोरडी पडली असेल तर पुढे अजुन त्रास होईल. माझ्या मुलाला पण गालावर अन पायावर असं झालं होतं दिवाळीच्या वेळेस. त्यानंतर त्याला ऑलिव्ह + तिळ + सरसो + बदाम तेलाने मालिश करतेय. घराजवळच्याच आयुर्वैदिक दुकानात मला हे तेल मिळालं खास थंडीसाठी लहान मुलांच्या मालिशसाठी. अन साबण पुर्ण बंद केलाय. कच्च्या दुधात थोडंसं बेसन अन कच्च्या तिळाचं कुट घालुन उटण्याप्रमाणे वापरतेय. खुप फरक पडलाय.

खुपच छान वाटल सगळ्यांनी मनापासुन प्रतिसाद दिल्याबद्द्ल........... धन्यवाद सर्वाना
थोडे दिवस आपल खोबरेल तेलच वापरुन बघीन म्हणते, घराच्या बाजुला झाडे आहेत ना त्यामूळे गार वारा असतो सकाळ्चा खुप, आणी साहेब सकाळी ४ पासुन जागे असतात ना खेळत अगदी fressh mood मध्ये. आणी काळोख आवडत नाही सगळ ओपन असेल तर स्वारी खुशीत असते आप्ल्याच :), म्हणुन अगदी डीट्टो सफरचंद झालय......
मालीश कीती महीने केले तर चांगले? थोड्याच दिवसात ६ महिने पूर्ण होतील बाळाला मालीश बंद केले तर चालेल का? (म्हण्जे बाईकडुन)

मी तरी अजुनही करते मालिश. माझा मुलगा आता दिड वर्षाचा होईल. पहिले २ महिने माहेरी असताना मालिश अन अंघोळीसाठी बाई लावली हती मी. मग इकडे दिल्लीला येताना तिच्याकडून शिकुन घेतलं, मालिश अन अंघोळीचं तंत्र. :). त्यानंतर काही दिवस सासुबाईंनी पण केली मालिश. आयाम ६-७ महिन्याचा झाल्यापासुन मी किंवा त्याचा बाबा करतो मालिश वैगरे.

हेच विचारायच होत अल्पना, म्हणजे बाईकडुन करुन नाही घेतल तरी चालेल ना? मी करेनच मग पण बाईकडुन घ्यायच म्हण्जे थोड पदध्तशीर असत ना शास्त्रोक्त वगेरे... म्हणुन वीचार्ले.

नमस्कार,
मी माय्बोलि वर नविनच आलि आहे. माझी मुलगी २ १/२ महिन्याचि आहे. मला सुरुवातीपासुनच खुप कमी दूध येतय. मी रोज बाजरिचि पेज घेते आनि अश्विनी ने सान्गितलया प्रमाने शतवरि कल्प पन घेत होते पन तरिहि पुरेसे दूध येत नाहिये. me aata aadhi breast feeding ani nantar formula milk detey. me aikala aahe jar balala aaich dhoodh nahi bhetala tar tyachi immune system week hote? ani 3 mahinya nantay kay aahar dyava?

नम्रता, त्याचं रडु भुकेचच आहे हे जर तुम्हाला माहिती आहे तर त्याला बाटली द्यायला हरकत नाही. अती भुकेने रडारड होउन घेत नसेल बाटली. तसेच हळु हळु सवय कमी होते रात्री उठायची. संध्याकाळी सात वाजता जेवण भरवुन रात्री दहा वाजता दुध देऊन बघ मग मधेच ३-४ वाजता उठणार नाही. इथे मायबोलीवर चर्चा झाली अही ह्या विषयावर. शोधुन बघा.

आणि हे नवीन मेंबर वगैरे कशाला उगीच. परत विचारायचा प्रश्न हाय काय नाय काय.

प्रिती, तीन महिन्यानी लगेच सॉलिड्स देऊ नये असे आम्हाला इथल्या आणि भारतातल्या डॉ ने सांगितले होते. आईने पण तसेच सांगितले होते. पण द्यायचाच असेल तर ह्याच धाग्यावरची आधीची पाने वाचून बघ. मला वाटते ही चर्चा झाली आहे आधी.

प्रिती, आहारातील दूध-दही चे प्रमाण वाढव,जेवणात मेथ्यांचा वापर कर. हिरव्या पालेभाज्या,फळे भरपूर घे. शतावरी कल्प चालू ठेव. माझ्या मते एवढे केल्याने पुरेसे दूध यायला हरकत नाही.
एक वेळेला अंगावरचे दूध आणि एक वेळेला फॉर्म्युला असेही करुन बघ.तसेही २-३ महिन्यानंतर बाळाची भूक वाढलेली असते, त्यामुळे अंगावरच्या दूधासोबत फॉर्म्युला सुरु केला तरी चालेल.

काल रात्रीपासुन माझा मुलगा सारखा कानात बोट घालतोय. कानाला हात लावु देत नाहीये. आंघोळ करतानापण कान साफ करु दिले नाही. हात लावल्याबरोबर रडायला लागला. झोपेत असताना बघितले कान, तर वरुन तरी मळ वैगरे काही दिसत नाहीये. सरळ डॉक्टरकडे घेवून जावू का? बुधवार-गुरवारी जमू शकेल.. तोपर्यंत काही उपाय?
सॉलीवॅक्स सारखे काही ड्रॉप्स कानात घालुन बघावे का?

अल्पना, ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जा. बुधवार गुरूवार पर्यंत नको थांबूस ग. इयर इन्फेक्शन असेल तर निमूटपणे अँटीबायोटीक्स चालू करावीत. दोन डोसमध्ये कान दुखायचा थांबेल पण कोर्स पुरा कर. तोपर्यंत गरम कापडाने कान शेक. तिळाचे तेल किंचित कोमट करून, आपल्या हाताला सोसवेल असे, कापसाने पिळून कानात टाक. त्याने कान दुखायचा थांबेल.

प्रिति, डिंक हळिवाचे लाडू, मेथीची भाजी, मेथ्या भिजवून त्याची खीर इ. जेवणात घेत जा. द्रवाहाराचे प्रमाण वाढव. अश्वगंधारिष्ट दोन्ही जेवणानंतर सम प्रमाणात पाणी मिसळून घे.

शिल्पा, मालीश किमान वर्षभर तरी ठेव. जितकी जास्त करशील तितके चांगले.

नम्रता, नक्की भूकेनेच रडतो का? पोट दाबले तर जास्त रडतो का ते पाहा. शी व्यवस्थित होते का? डॉक्टरांना दाखवलेस तर त्यांचे म्हणणे काय होते? त्यांनी तपासले तेंव्हा पोट, कान इ. चा काही प्रॉब्लेम नव्हता ना? इतर काही नसेल तर दुध पुरत नसेल त्याला. रात्री झोपण्यापूर्वी काहीतरी सॉलीड सिरीयल इ. देऊन बघ.

अल्पना, ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जाणे हेच योग्य होईल्.बर्‍याचदा इयर इन्फेक्शन असेल तर मुलान्ना कळत नाही.मुलाला आधी सर्दी झाली असेल तर इअर इन्फेक्शन होउ शकते.कानात पाणी अजीबात जाउ देउ नकोस्.आणि स्वताह हुन कान साफ करायला जाउ नकोस्.कोटन बड मुळे मळ असेल तर तो आणिक आत सरकु शकतो.डॉ पाहून ड्रोप्स/औषध देतीलच.

प्रीती अश्विनी नी सन्गितल्याप्रमाणे आहळीव मेथी यान्चा उपयोग आहारात करच.याशिवाय भरपुर द्रवपदार्थ दूध यान्चे प्रमाण आहारात असू दे.
शेपू ची भाजी खात जाअ.शतपुश्पा(शेपू)हे दुध वाढवते.शतावरी कल्प चालू ठेवच्.दूध कमी येतय म्हणून पाजायच कन्टाळा करू नकोस्.वरच दूध देण्या अगोदर ही बाळाला आगोदर अन्गावर पाजायच आणि मग लागेल तस वरच द्यायच.
तोषवी.

Pages