बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथले डॉक्टर सहसा अंडरवेट म्हणून सांगत नाहीत. माझी दोन्ही मुलं वेट चार्ट च्या प्रमाणे दहा-बारा पर्सेंटाईलच्या आसपास आहेत. पण इथले अन भारतातले डॉक्टर त्याबद्दल काळजी करत नाहीत.
बाळाच्या वजनाची ( पुष्कळदा अवाजवी ) काळजी आई वडिल, आजी आजोबा वा इतर नातेवा़इकच जास्त करतात Happy

दूधच द्यायचं असेल तर चॉकलेट सीरप किंवा स्ट्रॉबेरी सीरप घालून पहा. बोर्नव्हिटा किंवा केशर वेलची साखर घालून देऊन पहा.

तुमच्या मुलाला दही, चीझ, अंडं , लोणी, तूप या सारखे पदार्थ देउ शकता. मासे, चिकन वगैरे चालत असेल तर ते द्या. मॅकरोनी किंवा स्पघेटी मधे लोणी घालून दिलं तर मुलं प्रेमाने खातात. केळी कुसकरून, सफरचंद उकडून कुसकरुन देता येईल. भाज्या ज्या काही देत असाल त्यात लोणी किंवा चीझ घालून देता येईल.बाळाचे इतर डेव्हलपमेंट बरोबर असेल तर वजनाची चिंता सोडून द्या.

वजनाची चिंता करण्याच्या बाबतीत भारतीय पालक कदाचित ९० पर्सेंटाइल वर असावेत Happy

वर्षा-सव्वावर्षाच्या बाळाचं वजन त्याच्या जन्मतः असलेल्या वजनाच्या साधारण तिप्पट असावं असा एक ठोकताळा असतो. ह्यानुसार वजन योग्य असेल तर काळजी करु नका. शोनू म्हणतेय तसं दुधातल्या कॅल्शियम्ची गरज इतर दुग्धनज्य पदार्थांतून पूर्ण केली जाऊ शकते. दही आणि चीज खाऊ घालता येईल. चॉकलेट दूध (शक्य असल्यास ऑरगॅनिक) देऊन बघा. मिल्क शेक किंवा अगदी घरगुती आइसक्रीम द्यायला हरकत नाही. नाचणीसत्व देता आलं तर बघा. (दुधात शिजवून).

शोनु आणि मृ ने सांगितलेच आहे. नुसते दुध्-दुध्/वजन्-वजन करु नका (मी पण ह्या सगळ्यातुन गेले आहे). त्याने तुम्हालाच त्रस होइल आणि मनापासुन, आवडीने खाल्लेले जास्त अंगी लागते असे म्हणतात. माझा मुलगा ह्याच वयाचा आहे. त्याला दुध अजिबात आवडत नाही. माझ्या सारखे दुध देण्याच्या प्रयत्नांनी तो अजुनच irritate व्ह्यायला लागला. तेव्हा मी जे नाही त्याच्या मागे धावणे सोडले. तसेच रोज खीर देईन म्हणु तर त्याला ते ही चालत नाही. तेव्हा मी- मनुके घालुन milkshake, दही, चीज, नाचणीची खीर, बदाम्/खारीक्/रवा खीर, दुध्-भात, दुध्-पोळी, केळं, ब्रोकोली, लिमा बीन्स, अंड, Calcium-fortified orange juice ह्यातले काही ना काही त्याच्या खाण्यात देण्याचा प्रयत्न करते. तरी माझ्या सगळ्याच प्रयत्नाना यश येतेच असे नाही Sad

हे खाण्या-पिण्याचे नखरे त्याच्यात कुठुन आलेत माहिती नाही. आम्ही दोघेही असे नाही, लहानपणी नव्हतो, असो.

तसेच तुमच्या बाळाची १ वर्षांनंतर होते ती तपासणी झाली आहे का ? तेव्हा डॉ सर्व ठीकठाक आहे असे म्हणाले असतील तर जास्त काळजी करु नका. काही काही बाळे फार तडतडी असतात. त्यांचे वजन फार छान नसले तरी एकुण तब्येत चांगली असते. ते महत्वाचे.

Shonoo, Mru and cinderella

Thank you soooooooo much for responding… you guys are awesome…
LOL Shono -<< वजनाची चिंता करण्याच्या बाबतीत भारतीय पालक कदाचित ९० पर्सेंटाइल वर असावेत >>
Shonoo, Mi chocolate / strawberry syrup try karun zal. Organic chocolate milk hi try kel.
He is around 5 percentile in weight and close to 90 percentile in height...
To almost tyachya vajanachya tippat ahe but not quiet… १९.५ - २0 pounds right now (14 months). Tyach birthwt was almost 7 pounds. Mala sarakha vatat ki tyache bones week hotil dudh ghetal nahi tar… khupach kami gheto to dudh… Mi tyala dahi dete divasatun ekda…

BTW Mru, he nachani satva kasa banavayach? Ani ithe Indian store madhe milate ti nachani vaparali tar chalel ka? Personally mala tari avadat nahi ti…asa vatat ki tyat kasalitari powder misalaliye...

Cinderella, ditto… amhihi already give up kelay dhavan tyachya mage lagan dudhasathi… pan kalaji vatat rahate ga sarakhi.. anyways mi tuम्हि सगल्यानि sangitalelya goshti karun baghate khato ka te… kheer matra avadat nahi tyalahi yevhadi...Tyach 12 month ch checkup zal. Doc sagal vyavasthit ahe mhanali except vajan thoda kami ahe mhanali. Ani ti sarakhi mage lagate ki tyala atleast 16 oz tari dudh de mhanun Ti mhanali ki he is gonna be tall and skinny Happy

Anakhi ek prashna – Mi working mom ahe… Mostly mi tyala gerber food dete… ani daalbhat/ khichadi bhaat divasatun ekda… adhemadhe kadhitari poli ani daal dete… Is it OK? Gerber food denyamage uddeshya haach ahe ki mala kalat tyane kiti ani kai khaal also its very convenient…

षोनू, बोर्नव्हिटा मि आनलय पन इतक्या लहान मुल्ल्लना चालत का ते? अनि कितिवेल दिल तर च्चलेल? मागे एकदा प्र् यत्न केला त्याल द्ययचा, पन त्यआल फारस अव् डल नहि ते...

ईथे दुधाचा विषय निघालाचं आहे. मलाही एक शंका आहे. माझी मुलगी २ वर्ष १ महिन्याची आहे. तिला सकाळी एकदा आणि रात्री एकदा असं २ वेळा मी दुध देते. एकुण ती १६-१७oz दुध पिते. एवढं दुध तिच्या वयाला पुरेसं आहे का अजुन वाढवु?तिला boost आवडतं पण मग तिच्या solid खाण्यावर परिणाम होतो म्हणुन मी तिला limit केलं.हे प्रमाण जर कमी असेल तर मी दुध वाढवते तिचं. कृपया सल्ला द्या. (काही केल्या glass ने दुध पीत नाही ती.bottle हवी अजुनही तिला :()

ममु, ह्या लिन्क वर क्लिक करुन तिथले २ बीबी पहा-
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/92989.html?1219738700
तुम्हाला हवी असलेली बरीच माहिती तिथे आहे. दुधाऐवजी दही, चीज चालेल. अजून काही महिन्यांनी (वय दीड वर्षे) मोठी माणसं जे जेवतात तेच बरेचसे अन्न दिले तरी चालते. फक्त खूप मसालेदार, तेलकट नसावे.

ढन्यवाद लालु... मि चेक करते... बाप्रे माझ मर्राथी त्याय्पिन्ग भयइकर अहे... सोरि फोर दआत...

असूदे, असूदे. Happy
>>ढन्यवाद
चालेल. हे 'धन्स' पेक्षा बरं आहे. Happy

मराठमोळी मुलगी
हळू हळू जमेल मराठी नीट लिहायला. प्रयत्न करत रहा.
व्हॉट टू एक्स्पेक्ट - टॉडलर इयर्स असं पुस्तक मिळत. अमेरिकेत. त्यात एक ते तीन वर्षे वयाच्या मुलांना वाढवण्याबद्दल फार छान माहिती दिली आहे. शिवाय
बेबीसेंटर डॉट कॉम इथे व आय व्हिलेज इथे पण बरीच माहिती मिळेल. या वयावर मुलांना वेगवेगळ्या पदार्थांची ओळख करून द्यावी. एखादा प्रकार नाही आवडला तर त्यामागे कटकट करू नये. आठ्-दहा दिवसांनी परत देऊन पहावं.गर्बर अडि अडचणीला, प्रवासात वगैरे सोयीचं आहे. पण रोज मुलांना एखादि भाजी अन एखादं फळ उकडून मॅश करुन देणं काही फारसं जिकिरीचं नाही. सफरचंद, रताळं , फरसबी, पालक, छोटी गाजरं, वटाणे, बटाटा, भोपळा यातले दोन प्रकार दोन छोट्या वाट्यांमधे ठेवून प्रेशर पॅन मधून दोन शिट्या शिजवून घ्यावे. व गार झाल्यावर मॅश करून टपरवेअर च्या डब्यातनं डेकेअर मधे अथवा बेबी सीटर कडे द्यावेत. भाज्या उकडून झाल्याबरोबर थोडं लोणी किंवा तूप घातलं तर ते नीट मिसळून येतं. घरि दही लावत असाल तर ते सुद्धा छोट्या टपर वेअर मधेच लावलं तर तेही डेकेअर मधे द्यायला सोपं पडतं.

सुप्रिया बॉटल ऐवजी सिप्पी कप देता येइल. डोरा, प्रिंसेस किंवा तत्सम तिच्या आवडीचं चित्र असणारा सिप्पी कप मिळाला तर त्या आकर्षणाने बाटली चा हट्ट कमी होईल. इथले पालक कधी कधी बाटली किंवा पॅसिफायर 'सँटा क्लॉज ला देऊन टाकतात' तसं करुन पाहता येईल. गणपती बाप्पाला पण चालेल बॉटल दिऊन टाकली तर Happy

धन्यवाद षोनु,

खुप छअन महिति दिलित. मि खरतर हे सगल विकत अनुन देते. दहिहि मि घरि लावत नहि. पन प्रयत्न नक्कि करेन.
तो सोलिड्स बर्यापेकि अच्चेप्त करतो. पन तुम्हि म्हनतय तस फूड बनवुन त्यामधे लोनि किव तुप घातल तर हेल्प होइल.

खरच खुप खुप धन्यवाद.

हाहाहाहाहा @ << असूदे, असूदे.
>>ढन्यवाद
चालेल. हे 'धन्स' पेक्षा बरं आहे. >> लालु अपन फारच फनि बुवा.

लालु बुवा नाही बाई आहेत Wink

मुलांना एखाद्या पदार्थाची आवड निर्माण करायचा सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे आई-बाबांनी स्वतः ते खाणे, नियमीतपणे. माझ्या मुलाच्या बाबतीत तरी ही पद्धत चालते. त्याला कुठलाही नवा पदार्थ द्यायचा असेल तर मी त्याच्यादेखत खाते. मग तो आपणहुन मागतो आणि खातो. तसे त्याला द्यायला गेले तर खात नाही. असे ४-५ वेळा केल्यावर मग काही प्रश्न नाही. दुधाचेच काय घोडे अडले आहे कळत नाही Sad

अह ओह!!! माफि अस्सावि लालु बाइ...
नविन असल्यवर अष्या चुका व्व्हयच्याच. लालु प्रसाद मुळे सगले लालु बुवाच वाट्त्तात. Happy

cinderella, धन्यवाद ग सन्गित्ल्या बद्द्ल.

हे कोनाला माहित्ति आहे का कि कुमारि आसव कश्यसाथि वापरतात... आनि लहान बालाना दिल तर चलत का...क्रुपया कहि महिति मिलेल का मला? माझि एक मैत्रिन तिच्य ६ महिन्यच्य मुलला रोज ४-५ थेम्ब पन्यातुन देते...

मि उत्तराचि वाट पहातेय.... कोणि स्सन्गु शकाल का कि कुमारि आसव कश्यसाथि वापरतात...आनि लहान बालाना दिल तर चलत का ते......

बर्‍याच दिवसानी आलेय... नव्या मायबोलीवर बाळाबाबत हा एकच बीबी सापडला, म्हणुन इथेच पोस्ट करते. आयाम आता पाच महिन्याचा झालाय. दुध कमी पडत असल्याने त्याला तिसर्‍या महिन्यानंतर दिवसातुन एकदा आणि नंत्र दोन वेळा फॉर्म्युला देतेय. त्याच्या डॉक्टरनी दिड महिन्यापुर्वीच त्याला खिचडी वैगरे द्या म्हणुन सांगितले होते.. दोन आठवड्यापासुन मुगाचे वरण, भाज्या घालुन देतेय.. इथे तर त्याला दही द्या म्हणताहेत डॉ. जुने बीबी वचुन काढलेत... तरी हिवाळ्यात काय द्यावे, इथल्या( दिल्लीच्या) हिवाळ्याचा आईला अनुभव नाहीये, म्हणुन ती पण जास्त सांगु शकत नाहीये, आणि सासरी लहान बाळांना फक्त वरणाचे पाणी, खिचडी हेच देतात...
अजुन एक प्रॉब्लेम आहे, त्याला अजुनही दिवस रात्र ह फरक कळत नाही, रात्री फॉर्म्युला देते, भुक लवकर लगु नये म्हणुन्...तर हे साहेब, फॉर्म्युला प्यायल्याबरोबर शी करतात आणि मग पहाटे ३-४ पर्यंत जागतात... बरोबर खेळावे लागते... मध्ये रात्री झोपायला सुरुवात केली होती..पण एका आठवड्यात पुन्हा पाढे पंचाव्वन्न...आमच्या घरात उजेड येत नाही त्यामुळे दिवस असो वा रात्र, ट्युब लावावी लागते..त्यामुळे तर नसेल ना? काहीतरी उपाय सुचवा...
मला घरुन काम करायची ऑफर आलीये, पण ह्याचे शेड्युल रोज बदलत असल्यामुळे काम करता येत नाहीये...

अजुन एक.. तो कालपासुन थोडासा खोकतोय्...खोकला नाही, पण हसता हसता किंवा रडताना आणि कधी शी करताना ठसकतोय... इथे थंडी सुरु झालीये..आणि समीर व मला दोघांनाही सर्दी, ताप खोकला होता...अ़जुन आमचे घसे थोडे खराब आहेतच.. आम्ही गुळण्या करतोय्..पण आयामला काय करावे

अल्पना,रव्याची खीर किंवा रवा शिजवुन तुप मीठ घालुन देउ शकतेस. सुट झालं नाही तर बंद करायचं. रागी थंड असते, देउ नये म्हणतात पण मी ईथे अमेरिकेतही दिली. माझ्या मुलिला तरी काही त्रास झाला नाही. दह्याच्या बाबतीतही माझा डॉ. म्हणतो की, दह्यात antibitics असतात. १२हि महिने द्या. तुझ्या बाळाची तब्येत बघुन यातलं काही देउ शकतेस. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर भाज्या शिजवुन आणि फळे नुसतीचं smash करुन दे. सुपही देउ शकतेस. मऊ भात देत असशीलचं.
या सगळ्या गोष्टी ६ महिने पुर्ण झाल्यावर दयायच्या की आताच हे तुझ्यावर आहे.

आणि झोपेच्या बाबतीत, १ वर्षापर्यंत त्रास होईलच पण संध्याकाळी बाळाला जागे ठेवने, रात्र झाली की सपुर्ण घरात पुर्ण अंधार करणे,पोट्भर खायला देणे. असे उपाय करुन बघ. Nightime toys हि मिळतात. aqurium सारखे. ते बघत बघत बाळ झोपी जाते. यातलं काहीचं उप्योगी पडलं नाहीतर मग............ Happy भगवान मालिक.
Good Luck and enjoy.

थँक्स सुप्रिया.... आत्तासुध्धा आमचे जागरण चालु आहे.. मघाशी एक सांगायचे राहिलेच... त्याला खायला आवडले...अजुनत्री त्याबाबतित त्रास झाला नाहीये... आज त्याला गाजर दिले होते ....आवडीने खाल्ले... पण आज काँस्टिपेशन आहे.... रोज दिवसातुन दोनदा शी करतो... आज अजुन एकदाही नाही...प्रयत्न करतोय आणि मग थोडे रडुन सोडुन देतो... काय करावे... आणि त्याला पाणी किती पाजावे.... डॉ. ने काही सांगितलेच नाही...गरज नाही म्हणाले..पण वरचे अन्न असेल तर थोडे पाणी पण लागेल ना....

अल्पना,
शोपा, वावडींग, ओवा असतील घरात तर त्यांचे पाणी उकळून दे. चमच्याने भरव. दिवसातून ४-५ वेळा कोमट दे. नसतील तर साधे पाणी कोमट करून दे. थोडे पोट गरम कापडाने शेक. एकदम नविन अन्न रोज देऊ नकोस. २-३ दिवसानी दुसरा नविन पदार्थ दे. प्रथम देताना फार देऊ नकोस.

खोकला अजून असेल तर ज्येष्ठमध, हळद, सुंठीचे चाटण दे. मधातून द्यायचे की नाही ते तुझ्या जबाबदारीवर ठरव. दिल्यास फायदा होईलच.

धन्यवाद अश्विनी....त्या पाण्याचा उपयोग झाला....खोकला नाहिये आता..
तुला अजुन एक विचारायचे होते...आयामच्या माथ्यावरचे केस चाललेत... खुप छान जावळ होते, आता काहीच राहिले नाहित... डॉ. नी एक लोशन दिले आहे आणि आठवड्यातुन एकदा केस शांपुनी धुवायला सांगितलेय...अजुन तरी लोशन सुरु नाही केले...स्टॅटियम बी नाव आहे...दुसरा काही उपाय आहे का? केसासाठी कोणता शांपु / साबण वापरावे.... मालिशला ऑलिव ऑईल वापरतेय... अंगाला बेसन-दुध आणि कधीतरी जॉन्सन चा साबण वापरतेय... आणि हो अंगावरच्या लव जाण्यासाठी तु सुचवलेल्या वेखंड पावडरचा उपयोग झाला होता...पण ती चेहर्‍यावर किंवा माथ्यावर लागु नये याची काळ्जी घेतलि होति..त्यामुळे त्याच्या अंगावर आता लव नाहिये, पण कपाळावर बर्‍यापेकी (दोन मात्रा देण्यासाठी काय करतात?) लव आहे..

डोक्याला मालिशसाठी खोबरेल तेल वापर.
कपाळावर लव जाण्यासाठी तो झोपला असताना वेखंड पावडर हलकासा थर कपाळाला दे आणि उठायच्या आत ओल्या कापडाने पुसून टाक.

अल्पना,

वेखंडाचा उपयोग सर्दी झाल्यावर हि करतात नि अश्विनी ने सांगितले तसे अंगावरची लव जावी म्हणून ही...बाळा ला दररोज अंघोळी नंतर छातीला, पाठीला,कपाळावर हलकेच वेखंड पावडर लावत जा, आताच्या थंडीच्या दिवसांत बर पडेल.तसंच त्याच्या अंथरुणात सुध्दा वेखंड कांडी टाकु शकतेस, मात्र त्याला
टोचणार नाही याची काळजी घे.

Take care urself n ur baby...

धन्यवाद... दिपाली अन अश्विनी.. वेखंड पावडर आहे माझ्याकडे..

माझा नउ महीन्याच्या मुलाला सोलिड्स सुरु केल्यापासुन खाल्ल कि potty(patal nahi regular) होते.Lactogen Cerelac banda karun bahitla,tari kahi farak nahi,mhanun parat chalu kela(cerelac occassionally).Kahiihi dile ki thodya velane potty hote.Me tyala khichadi(mixer madhun kadhun),nachni,rajgira,satu etc. dete.Irrespective of kay dila aahe,he does potty.BF sakali aani ratri karte.Pan divsatun lactogen to kamich pito.त्यामुळे सहा महिन्यानतर त्याचे वजन कहि नीट्से वाडले नाहीये.ALso ajun to fakta potavar sarakto,tyamule pot daable jaoon hi ha prakaar hoto.Doctoranna sangitla tar te mhantat ki this happens with some kids.DOn't worry he will be normal after one year.Baki he looks active,but he has not reached physical milestones of sitting on his own...crawling etc.Hyavar kahi upay aahe ka.

डॉ म्हणालेत ना काळजी करु नका. माझा लेक पण उशीरा रांगायला, चालायला लागला. आता मलाच इतका पळवतो की विचारता सोय नाही. बोलण्याचे पण तसेच. त्याच्या वर्गातली मुले १-२ शब्द बोलायला लागली पण हा ता ता शिवाय काही म्हणायचा नाही. आणि मग १-२ दिवसांच्या अंतराने थँक यु आणि एलेफंट एकदमच म्हणायला लागला. स्नो पण आधी म्हणाला आणि आई, आत्या, आजी, मामा असे किती तरी सोपे शब्द बर्‍याच उशीरा म्हणायला लागला. so let ur kid take his time.

खरच काळजी नका करु. माझा मुलगा ८ महिन्याचा आहे. तो पण रांगत, बसत नाही. बसवले तर बसतो, पण अजुन उठता येत नाही, काल-परवापासुन थोडेसे पोटावर सरकायला लागलाय. आणी शी चे म्हणाल, तर तो दिवसातुन एकदाच करायच. पण हल्ली खुपदा दिवसातुन ३-४ वेळी पण करतो. वजन पण खुप काही योग्य नाहीये, पण डॊ म्हणतात ना काळजी नको...मग आपण त्रास नाही करुन घ्यायचा..
जर डॊ खायला-प्यायला द्यायला हरकत नाही म्हणत असतिल तर द्या. कदाचित त्याला solids शी adjust व्हायला वेळ लागत असेल.

अगदी माझा पण अनुभव पण असच कहिसा आहे. माझी लेक पण जवळ जवळ १.५ वर्षची होयी पर्यन्त बिल्कुल बोलत नवती (? ...अवघड आहे आहे !) . नुस्त्य खाणा खुणा. आणी मग नन्तर अशी काहि बडबड सुरु झाली की बस.
कळ्जी करु नका. प्रत्येक मुल हेय वेगळ असत.

>>>सोलिड्स सुरु केल्यापासुन खाल्ल कि potty(patal nahi regular) होते.
माझ्या लेकाच्या डॉक्टरांच्या शब्दात.. (मराठीत भाषांतरित) : "काही मोठ्यांना नाही का चहा पोटात गेला की पोट रिकामं करायला जावं लागंत? तस्साच प्रकार बाळांच्या बाबतीत होतो काही काळ! त्यात काळजी करण्यासारखं काही नाही." Happy

तुमचे सगळ्यांचे प्रतिसाद वाचून जरा बरं वाटलं.आता काळजी नाही करणार.म्रुणमयी तुझ्या डौक्टरांचा सल्ला मस्त वाट्ला.Thanks all of you.

Pages