बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो चालते लाजो..मि माझ्या २ वर्षाच्या मुलाला देते ...फक्त प्रमाण मोठ्या माणसांच्या निम्मे ठेवायचे.
(मला माझ्या डौ ने प्रमाण सांगितले आहे)..रात्री झोपताना दिले तर रात्रभर एकदम मस्त झोप लागते..

मला २ प्रश्न आहेत.:
१. गाईचे दुध सर्दि असेल तर दिलेले चालेल का? माझा मुलगा आता वर्शाचा झाला आहे. त्याला हळुहळु गाईचे दुध सुरु केले आहे. पण त्याला हल्लि बदलत्या हवेमुळे (बहुतेक) सारखी सर्दि होतेय. अजुन तो breastmilk घेतोय, पण आता कमी केले आहे. त्याला सध्या साधारण रोज ५-६ oz गायीचे दुध देते - खिरिमधुन वगैरे. तेवढे दिलेले चालेल का? दुधाची चव बदलेल म्हणुन त्यात मला सुंठ, हळद किंवा साखर घालायला नको वटतेय मला.
२. Ear Infection बरे करण्यासाठि किंवा होवु नये यासाठि आयुरेवेदात काय उपाय आहे?

Thanks..

गाई चे दुध पचायला हलके आसते,त्यात फॅट कन्टेन्ट ही म्हशी च्या दुधा पेक्षा कमी आसतात. त्याने सर्दी होण्याचे कारण नाही.दुध उकळून घेताना त्यात सुन्ठ /हळद/ लेन्डी पिम्पळी घाल सर्दी /अ‍ॅलर्ज्री कमी होइल.

hi all,

I'm a new member here....

My 3 month old boy has atopic dermatitis....anyone can suggest herbal cure...pls help
and pls dont post previous links....i'm unable to open them

मनीष, माझ्या मुलीला सिव्हिअर अटोपिक डर्माटायटिस होता. पण आयुर्वेद वगैरेंनी आम्हांल काडीमात्रही फरक पडला नाही. आमची सगळी भिस्त स्टिरॉईडस वरच होती. पण तो प्रत्येकाचा चॉईस आहे शेवटी.

but i'd like to give it a try bcoz they say steroids have many side affects and it very painful to see him scratch his face all the time.....btw sayo how many months it took for ur daughter to get rid of it ...some say it may take months or yrs

मनीष, डॉक्टरनी सांगितले असेल तर स्टेरॉइड क्रीम वापरा. तो एक ताबडतोब रिलीफ देणारा उपाय आहे. साईड इफेक्ट्स असतील पण सगळ्यांत दिसत नाहीत. ते होऊ न देताही स्टेरॉइड्स वापरता येतील.
हे वाचा - http://www.netdoctor.co.uk/skin_hair/eczema_corticosteroids_003762.htm
जास्त दिवस थांबलात आणि दुसरा उपाय चालला नाही आणि त्रास वाढला तर हाच उपाय पुढे जास्त strength चे औषध वापरुन करावा लागेल ज्याने साईड इफेक्ट्स ची शक्यता वाढेल.

मनीष, बर्‍याच जणांची स्टेरॉईडस वापरायची तयारी नसते. पण सिव्हिअर केसेस मध्ये इलाज नसतो. माझ्या मुलीला साधारण ४ वर्ष भरपूर त्रास झाला. पुण्याला नेऊन आयुर्वेदाचं औषध घेऊन आले होते पण त्याने तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायचं नी शेवटी गाडी टॉपिकल स्टेरॉईडसवरच यायची. आणि त्याने तात्पुरता का होईना आराम मिळायचा. तिने १+ वर्ष ओरल स्टिरॉईडही घेतलेलं आहे.

नमस्ते ..
माझा मुलगा ४ महिन्याचा आहे,त्याला गेल्या महिन्यापासुन बाहेरच दुध (म्हशीच) चालु केल आहे,सध्या दिवसातुन ३ वेळा ते देतोय,काही त्रास नाही ,पण हे योग्य आहे का ?

@अनिल, सुरवात गाइच्या दुधाने करावी,गाइचे दुध पचायला हलक आणि आइच्या दुधाशी साधर्म्य असणारे असते. म्हशीच्या दुधात फॅट जास्त असतात्.ते पचायला जड असते.गाईच्या दुधातही अगदी सुरवातीला पाणी (अर्थात उकळलेले) असे देतात. त्याला म्हशीच ही पचतय हे चान्गलच आहे पण तरीही मुलगा लहान असल्याने गाईच्या दुध द्याव.

मि वाचले कि बाल्गुटि मधे
सोने उगाळुन द्यावे .... मधाबरोबर..
पण इथे अमेरिकेत मध देउ नका सांगतात.... काय करावे???
दुधाबरोबर उगाळले तर चालेल का??

प्रिया
बाळगुटीत सोने जरूर उगाळावे. २/३ वेढे.
कालच माझं भाचीशी बोलणं झालं. ती कॅनडात असते. २ महिन्यांपूर्वी तिला मुलगा झाला( प्रिमॅच्युअर बेबी)
खूपच वजन कमी होते. भाचीच्या सासूबाई आहेत तिच्याजवळ. तर डॉक्टरांना न सांगताच त्यांनी घरीच गुटी द्यायला सुरवात केली. तर आधी डॉक्टरच जरा काळजीत होते. कमी वजनामुळे. पण हळूहळू तो इतका मस्त अंग धरू लागला की डॉ. आश्चर्य चकित झाले. त्यांनी तिला विचारलंच की तुम्ही माझ्या औषधांव्यतिरिक्त अजून काही देत आहात का बाळाला? कारण आम्हाला इतक्यात एवढी वजन वाढ अपेक्षित नव्हती. शेवटी तिने सांगितलं की आम्ही रोज गुटी(रीतसर उगाळून ..........ती बाटलीत सीरपच्या स्वरूपात मिळते ती नव्हे) उगाळून देतो व सोनेसुद्धा! तर डॉ. नी तिच्याकडे सर्व माहिती लेखी स्वरूपात मागितली आहे.
कालच हे बोलणे झाले व आज तुझी पोस्ट वाचली. म्हणून रहावलं नाही म्हणून लिहिते.

प्रिया, मी लहान मुलांना मध देऊ नये म्हणुन उकळलेल्या पाण्यात बाळगुटी उगाळायचे आणि तुरट चव जावी म्हणुन साखर घालायचे.
मी बाळगुटीत केशर पण उगाळून घालायचे, ते पण ब्रेन डेव्हलपमेंट करता चांगलं असतं.

२/३ वेढे हेच प्रमाण आहे... शुद्ध सोन्याचे वळे/वेढणी घ्यायची आणि २/३ वेढे/वळसे करायचे सहाणेवर...
अर्थात ते गुटीबरोबरच करायचे...

माझ्या आईने वेखंडाच्या काडीत सोन्याची तार घातली होती. वेखंड भिजत घालून मऊ केलं त्यामुळे तार छान आत इन्सर्ट करता आली. मग नीट सुकवून घेतलं. मध नाहीच म्हणतात इथे द्यायचं. आम्ही इतर औषधांबरोबर खारीक बदाम उगाळून द्यायचो. खारकेने छान गोडवा येतो. पौष्टिक ही असते. बाळाच्या अन्नामधे गुटी उगाळलेली कधीही चांगली. आईचं दूध अतीषय चांगलं ह्यासाठी. माझ्या लेकीला जाम आवडते गुटी. बोंडल्याने द्यायला जमायचं नाही नीट. ह्यावर सोप्पा उपाय म्हणजे फार्मसी मधे लहान मुलांना Antibiotics देण्यासाठी जी सिरिंज वापरतात ती वापरावी.

गुटी जर दुधात उगाळली तर चाटवण्या इतपत घट्ट नसते. आणी इथे मी जी सिरिंज म्हणते आहे ती फिडींग साठी स्पेशल सिरिंज असते. लहान मुलांना कुठलंही द्रवरूप औषध सहज पणे देता यावं म्हणून फार्मसी मधे फुकट दिल्या जातात अशा सिरिंज.( उसगावा मधे).फीडिंग सिरिंज म्हणून गूगल करून पाहिल्यास इमेज दिसेल.

ओह अच्छा...

>> इतपत घट्ट नसते
असते ग... मी स्वतः माझ्या भाचीसाठी पण उगाळली आहे गुटी.. बदाम, खारीक याने येतो घट्टपणा..
हां खूप दूध घातले तर पातळ होते

खरं आहे. खरीक बदाम घालून छान घट्टपणा येतो पण मुळात दूध थोडंसं जास्त घेतलं जातं. मग वाया का घालवा.त्यामुळे गुटी थोडी पातळ होते. बोंडल्याचं तंत्र मला जमलंच नाही मग हा सिरिंजचा हमखास उपाय केला.

डीलिवरीनंतर चा आहार काय असावा?
पहिल्या दिवसापासुन काय खावे ते सांगितला तर फार बरा होइल....
आणि किती दिवस काय खाउ नये ते पण सांगा प्लीज.

Pages