बाळगुटी आणि इतर माहीती

Submitted by webmaster on 6 June, 2008 - 00:14

बाळगुटी आणि इतर माहीती.

विशेष सूचना: हे फक्त मायबोलीकरांना आलेल्या अनुभवावर आधारीत सल्ले आहेत. कोणताही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा.

या अगोदरचे हितगुज इथे पहाता येईल
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/54450.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार,

माझा मुलगा १४ महीन्याचा आहे. वजन ९.५ कि.ग्र. सध्या तो वरण भात, खिचडी, उकड्लेला बटाटा, दुध पोळी, दुध, फळे (सन्त्री, डाळीम्बे, केळी, सफर्चन्द), नाचणीसत्व (दुधात शिजवुन) शिजवलेले पोहे खातो. या व्यतिरिक्त त्याला आणखी काय द्यायला हवे? जेणेकरुन सगळी जिवनसत्वे पोटात जायला हवीत. त्याला पालेभाज्या मनापासुन आवडत नाहित.
क्रूपया उपाय सुचवा.

आपले आभारी,
योगेश आणि किरण

काल परवा पासुन माझ्या मुलाने खाणं पिणं एकदम कमी केलय. आता साडेआठ महिन्याचा आहे. दोन दिवसापुर्वीपर्यंत तो दिवसातुन तिन वेळा फॉर्म्युला (सरासरी १८० मिली), एक केळं किंवा अर्ध सफरचंद, एक मोठा बाउल भरुन खिमटी किंवा नाचणी+गहु सत्व किंवा अर्धा फुलका व वरण, ६० मिली फॅरेक्स (एक फीड) किंवा भात व भाज्या + वरण व दोन वेळा ब्रेस्टफीड असा आहार होता. याव्यतिरिक्त कधीकधी भाज्यांचे सुप घ्यायचा.
दोन दिवसांपासुन त्याने खाने कमी केलयं. जर काही भरवायला गेले तर फुर्र् करुन बाहेर काढतो, किंवा तोंड गच्च बंद करुन मान फिरवतो. तरीही खाउ घालायचा प्रयत्न केला तर सरळ रडायला लागतो. काल त्यानी काहीही सॉलिड खाल्ल नाही. ४ वेळा फॉर्म्युला व २ वेळा ब्रेस्ट्फीड बस्स. आज सकाळपासुन आत्तापर्यंत २ वेळा फॉर्म्युला, १ चमचा शिरा व एक सफर्चम्दाची फोड इतकच खाल्लय. त्यातही दुध अगदी झोपेत पाजले तरच पितोय. एक बाटलीभर दुध प्यायला १ तास झटावं लागतय.
एक महिन्यापुर्वी पर्यंत तो मधुन अधुन कपानी दुध प्यायचा. आता बॉटलनी पण पीत नाहीये.
बाकी खेळणे वैगरे नेहेमीप्रमाणेच. खेळुन, घर्भर रांगुन उलट खुप थकतो व झोपी जातो. थोडीशी कुरकुर पण वाढलिये.
या वयाच्या मुलांचा आहार काय व किती असावा?

माझा मुलगा आता ८ माहिन्याचा आहे.त्याचे जावळ मे मध्ये काढनार आहे.तेव्हा उन्हाळा कडक असतो .त्यामुळे असे विचारायचे आहे की केस काढल्यावर काय लावावे,काढण्या अगोदर व नतर काय काळजी घ्यावी? मी भारतात असते.त्यामुळे ईकड्चे उपाय सूचवावेत. धन्यवाद.

हाय,

माझी छोटी २ वर्षांची होईल पुढच्या महिन्यात. आता खेळणे, मस्ती, बडबड पण खूप करते. तिच्या जनरल वाढीसाठी काय द्यावे? भारतातली आयुर्वेदिक औषध इथे मिळणे कठीण. तिला च्यवनप्राश द्यावे का? ते मिळते इथे देशी दुकानात.

माझ्या मूलाचे मी जावळ काढले. त्याच्या डोक्यावर एका जागी फारच विरळ केस आले आहेत बाकीच्या मानाने. काय करावे? तो १० माहिन्याचा आहे. ह्या वयात मूल थोडे तिरळे पाह्ते का?

सहिश ,
मुलाला डोक्यावर काही इन्फेक्शन (कोन्डा,खपल्या)नाही ना हे पहा,काहीही नसले तर खोब्रेल तेल हलक्या हाताने जिरवा,१ वर्षा पर्यन्त केस गळ्णे हे नोर्मल आहे.काळजी करु नका.
ह्या वयात बरीच मुले नजर स्थीर नसल्याने थोडी तिरळी पहतात.३ वर्शानन्तर ही तिरळे पणा वाढला तर मात्र डॉ कडे जा.

माझी मुलगी १५ महिन्यांची आहे. गेल्या दोन आठवड्यापासून तीची शी ची जागा लालसर झाली आहे. डॉ.नी RASHFREE म्हणुन Cream दिलेले पण काहिच उपयोग झाला नाहिय. तीला रोज जिर+धने पाणी उकळवून देते पण खुपच कमी पाणी पिते. शतधृत, जात्यादि तेल लावतेय पण फरक नाहिय. आयुर्वेदिक डाँ. नी काहि पावडरी दिल्यात पण त्यालाहि अजुन गुण नाहिय. परवापासुन तीला शी ला खडा होतोय. रात्री दुध + तुप देतेय, दिवसातून दोन वेळा त्रिफळा चुर्ण देतेय पण फरक नाहि. डॉ. म्हणताहेत तीच्या शरीरातील पाणी कमी झालेले आहे. शी मऊ होण्यासाठी काय करता येईल. शी करताना प्रचंड रडते. काय करू??

aas तु म्हणतेस तसे करुन बघेन. पण लगेच फरक पडेल म्हणजे stool soft होण्यासाठि काहि तातडिचा उपाय आहे का?
akhi पपई उष्ण असते ना? तीला आधीच शी च्या जागी लाल झालेय अशात पपई देणे कितपत योग्य ठरेल?

माझी ८ महिन्याचि लेक आहे तिला घट्ट शी झाली तेव्हा मी २ लहान फोडी दिल्या होत्या. शी ची जागा लाल आहे तर महितिइ नाही ग

sakhi_d सगळ्यात पहिले तिचि शीची जागा तुरटीच्या पाण्याने स्वछ धूवुन घे.. तुरटी बरीच उपयोगी पडते ह्यावर...दिवसातुन जमेल तितक्या वेळेला हा उपाय करुन बघ..
शी मऊ होण्यासाठी दुधाच प्रमाण वाढव .. त्यातही अगदी थोड थोड तुप घालुन बघ...
माझ्या महिती प्रमाणे त्रिफळा चुर्ण हे ह्या वयात अतीरेचक होइल...

sakhi_d, अगदी तातडीचा उपाय म्हणजे ग्लिसरीनची टॅबलेट मिळते. शी होत नसेल तर ती टॅबलेट शीच्या जागी सरकवायची. पण ते आपण रोज नाही करु शकत तेव्हा आहाराकडेच लक्ष दे. आणि शी ला खडा दोन्ही कारणांनी होतो - कमी पाणी किंवा कमी खाणे. तेव्हा दोन्ही व्यवस्थित असु दे.

vegayan,
मुलीला मी पोटॅशियम परमॅगनेटच्या पाण्यात बसवते सकाळी आंघोळ झाल्यावर पण नंतर ती पाळणाघरात असते. आणि दुध + तुपाचे म्हणशील तर रात्री देते मी तीला. त्रिफळा चुर्णाचा काहिच उपयोग झाला नाहिय. मी सकाळी माझ्या आयुर्वेदिक डॉ. शी बोलले तर त्यांनी छोटा चमचा गंधर्व हरितकी द्यायला सांगितले आहे. आता घरी गेल्यावर देईन बघु काय होते ते.

तरी सगळ्यांना धन्यवाद लगेच रि दिल्याबद्दल. अजुन काहि उपाय असेल तर सांगा.

सखी आयामला असा त्रास झाला होता मागे. आहारात भाज्या वाढवल्या (त्याच्या उपम्यात एक टोमॅटो, थोडे मटार दाणे हमखास घालायचे अन दुपारच्या जेवणात अर्धी वाटी भाजी-पोळी द्यायचे खायला, रात्री पण वरणात मेथी, कोथिंबीर, टोमॅटो घालायचेच), मनुका पाण्यात भिजवुन सकाळी खायला दिल्या. एक खजुर दुधात भिजवुन खायला दिला... या सगळ्याचा एकत्रित उपयोग झाला. त्याने दुधातुन तुप एकदाच घेतले.. अन पाणी तो भरपुर प्यायचा. त्याला नविन स्ट्रॉ असलेले सिप्पर आणले होते.. त्यातुन पाणी पिण्याचे कौतुक वाटायचे त्याला..अन भरपुर पाणी प्यायचा. अर्थात मी घरी असल्यामुळे त्यानी न मागता पण दर एखाद्या तासानी आठवणीने पाणी देवु शकते.
त्याच्या डॉ. नी त्याच्या खाण्यात साखरेचे (गोडाचे) प्रमाण वाढवायला सांगितले होते.ते ही केले... भाज्या, खजुर, मनुका या गोष्टींनी लगेच फरक पडतो असा माझा अनुभव आहे.

पपई उष्ण वाटत असेल तर केळ देउन बघा.सूप्,गुरगुट्या भात्,आसट खिचडी ,अदमुरं दही असं देऊन पण पाण्याचं प्रमाण वाढवता येईल.

सखी,
तुला रिप्लाय केला आहे.
अनुवासन बस्तीविषयी लगेच तुझ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचार. दुध गरम, पाणी गरम प्यायला दे.
अल्पनाने लिहील्याप्रमाणे, काळ्या मनुकांचे पाणी, खजूर दे. सफरचंद, ज्यूसही चालेल.

कृपया केळे देऊ नकोस. केळे विष्टंभी आहे. म्हणजे अतिसार होत असेल तर मल बद्ध करण्यासाठी केळे वापरतात. त्यामुळे उलटाच परीणाम होईल. दहीपण नको. सूप, गुरगुट्या भात, मुगाची मऊ खिचडी चालेल.

धन्यवाद सगळ्यांना.
काल तरी नीट झाली शी. काहि त्रास नाहि झाला. बहुतेक डॉ. (भावे वैद्य) चे औषध आता काम करायला लागले आहे. त्यांनी गंधर्व हरितकी द्यायला सांगितले होते.
तीच्या खाण्यात पालेभाज्या वाढवल्यात. तसेच तुम्ही सगळ्यांनी सांगितलेले सगळे चालु करते.
अश्विनी, तु सांगितल्याप्रमाणे मी बोलले डॉ.शी ते शुक्रवारी तीला बस्ती देणार आहेत.
पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना Happy

माझं बाळ आता ५ महिन्याचं आहे. आधी मी त्याला वावडिंग, सागरगोटा, मुरुडशेंग, कुडा, मायफ़ळ, वेखंड, डिकेमाली, हिरडा, बालहिरडा, अतिविष, हळकुंड, जायफ़ळ, नागरमोथा, सुंठ, पिंपळी, बेहडा, काकडशिंगी, ज्येष्ठमध, अश्वगंधा, खारिक, बदाम हे सर्व माझ्या दुधात उगाळुन मधातून देत होते. पण मधे पावसाळ्यात बुरशीच्या भीतीने २-३ महिने सर्व बंद केलं. आता बाळगुटी परत सुरु करायची आहे. तरी या जिन्नसांचे किती आणि कसे वेढे देऊ ? ( उदा. १ रुपयाच्या coin चे ५ वेढे. कारण ३-४ वेढे असं सांगितलं जातं पण वेढ्यांच्या आकाराबाबत काय ? ) तसच बुरशी न होण्यासाठी काय काळजी घ्यावी ? मी उगाळुन झाल्यावर सहाण आणि जिन्नस गरम पाण्याने पुसून घेते.

रचनाशिल्प,
गुटी ची द्रव्य वापरण्या आधी आणि नन्तर स्वछ धूवावीत्,वापरलेली द्रव्य ती पूर्ण कोरडी करावीत्.त्याशिवाय डब्यात घालू नयेतं नाहीतर लगेच बुरशी धरते.
सोपा उपाय म्हणून्,तवा सधारण गरम करयचा नन्तर gas बन्द करून त्यावर १ सुती रुमाल ठेवायचा,आणि त्यावर ही धुतलेली द्रव्य वाळवाय्ची..थोड्या थोड्या दिवासच्या अन्तरानी ही द्रव्य नवीन वापरायची/बदलायची.(सर्व द्रवव्यान्ची फारशी किमत नसते,आणि बाळाच्या अरोग्या साठी स्वछता कधीही महत्वाचीच.

३ महिन्याच्या बाळाला अंघोळीच्या आधी मसाज कसा करावा? प्लीज कोणी टिप्स देऊ शकेल का?

बाळाला पायान्वर उताणे ,किवा मउ गादिवर प्लस्टिक अन्थरून दुपत्यवर उताणे ठेवावे.
कोमट केलेले तिळाच तेल /उन्हाळ्यात खोबरेल वापरणे इष्ट ,बाळाच्या बेम्बीत २/३ थेम्ब सोडावे.आणि घड्याळ्याच्या काट्या च्या दिशेने बेम्बी पासुन सुरवात कारुन बाहेरील बाजूस नेत जावे्आलक्या हाताने करवा ,दाबू नये.
हाता पायाना खालुन वाराच्या दिशेत म्साज करावा ्आतापायान्चि कादे आजिबात खेचू नायेत वाकावू नयेत. टाळूत हलक्या हाताने तेल जिरवावे.
पाठीला पालाठे घेऊन कण्या पासून दोन्हि कडे बाहेरिल बाजुस मसाज करावा.अशावेळी बाळाचे नाक दबणार नाही याची काळाजी घ्यावी.
जिथे जिथे सान्धे आहेत त्या ठिकाणी गोलाकार दिशेत मसाज करावा.

माझ्या बाळाला ३ महीने पुर्ण झाले आहेत. माझ दुध आणि Lactogen चालु आहे. सकाळि आन्घोळ झाल्यावर आणि रात्रि झोपताना मी त्याला Lactogen 180ml प्रत्येक वेळि देते. बाकि दिवसभर माझच थोड्या थोड्या वेळाने देते. पण अजुनही मला वाटत कि त्याला माझ दुध पुरत नाहीय. माझ दुध पिल्यावर तो फार तर १५-२०मि. झोपतो. पुन्हा किरकिर करतो. माझ दुध आता वाढु शकेल काय? आणि कस? शतावरि चालु आहे पण फारसा फरक नाहीय. गायिच दुध चालु केल तर चालेल का आता? कशि किति प्रमाणाने सुरुवात करु?
आणि एक तो अजुन्ही रात्रिचा झोपत नाही. खुप रडत राह्तो. निपल तोन्डातच घेउन राहायला बघतो. झोपला कि मि हळुच काढ्ते पण मग लगेच तो उठ्तो . काय करु तो रात्रि atleast 4-5 तास तरि झोपण्यासाठि? जायफळ देउन पण पाहीले पण काहीच फरक नाही. सकाळि मात्र तो आन्घोळ केल्यावर दुध पिउन चान्गला ४-५ तास झोप्तो.

शिल्पा,
मला असाच प्रोब्लेम होता.तेव्हा डॉ. म्हणाले होते कि फॉर्मुला जेव्हा द्यावा लागतो तेव्हा त्याचं प्रमाण आणि दिवसात कधी द्यायचा ते तुम्ही ठरवू नका.अंगावर पाजून झालं आणि तरीपण बाळाला भूक असेल तर त्याची भूक भागेल इतका फॉर्मुला प्रत्येक फीडींगला द्या.पण पहिल्यांदा त्याला अंगावरच पाजा.इतक्या लवकर गाईचं दूध देऊ नकोस.अमेरीकेत तर १ वर्षापर्यंत आईचे दूध/फॉर्मुलाच देतात.
तो रात्री पोटभर दूध प्यायल्यावर पण झोपत नसेल तर त्याला पॅसिफायर देउन बघ.कदाचित तू जवळ आहेस ह्या फक्त जाणीवेची गरज असेल.पॅसिफायरची सवय इतक्या कमी वयात लागत नाही.तेव्हा अगदी आवश्यक तेव्हा द्यायला हरकत नाही.कधी कधी सगळीच बाळं आयडील बाळं नसतात रात्री शांत झोपायला.त्याला काय हवंय ते शोधून काढ.

शिल्पा, तुझे बाळ ३ महिन्याचे आहे तर तु आता गाईचे दुध देऊ शकतेस. सुरवातीला दुधात १:१ प्रमाणात पाणी मिसळुन ऊकळुन दे. पचतय असे वाटले तर हळुहळु पाण्याचे प्रमाण कमी करत जा.
आणि रात्री झोपण्यासाठी आंघोळ तु रात्री का नाही घालत?
माझ्या मुलीला आंघोळ घालायला ज्या बाई यायच्या त्या सकाळच्याएवजी संध्याकाळी एका ठिकाणी जायच्या. कारण तो मुलगा रात्री झोपत नसे. आणि तिकडे उपयोग झाला होता संध्याकाळी आंघोळ घालुन..
घरी चालत असेल संध्याकाळची आंघोळ तर तसे करु शकतेस. गरम पाण्याने मस्त शेकत शेकत आंघोळ.
नाही तर अजुन महिना -१५ दिवसात कदाचित त्याचे रुटीन पण बसेल.
आणी एक जायफळ जास्त नको वापरु त्याने शी घट्ट होते.

thnks pv & aas. अग पण मला कस कळणार की त्याच पोट भरल नाही ते कारण तो दुध पीतापीताच झोपतो. आणि जार्स्त वेळा पाजल की दुध वाढ्त म्हण्तात ना म्हणुन मी त्याला दिवसाच अंगावरच घेते. (Dr. म्हणतात बाटलीची सवय लागली तर तो माझ दुध ओढायला कंटाळा करेल म्हणुन पण)
आणि आंघोळिच म्हणाल तर जरा माझाच problem आहे. माझ सिझर झालय आणि overweight पण आहे अजुन त्यामुळे खालि बसण म्हण्जे जरा कठिण्च पडत , माझ मलाच अजुन उठण बसण जमत नाहीय. त्यामुळे त्याला खाली घेउन काही करायची मी risk नाही घेउ शकत. आणि मि एकटिच अस्ते त्यामुळे कोणाची मदत घेउ शकत नाही.

हंम्म्म. शिल्पा माझा मुलगा पण दुध पिता पिता झोपायचा...दुध न पुरणे अन रात्र रात्र जागवणे हे पण होतच. मला डॉ. नी सांगितले होते जर पिता पिता झोपला तर त्याला थोडसं उठवून दुध पाज. कंफर्टनेस मुळे मुलं बर्‍याचदा अंगावर पिताना झोपी जातात.
दुसरं जर दुध कमी पडत असेल असं अजूनही वाटत असेल तर दिवसापण अजून १-२ वेळा लॅक्टोजन देवून बघ. अर्थात आधी अंगावर पाज अन मग बाटलीने. म्हणजे जर त्याला दुध खरचं कमी पडत असेल तर अंगावर प्यायल्यावरही तो वरचे दुध घेईल.
गाईच्या दुधाबद्दल वर सांगितलेच आहे, की अमेरिकेत तरी एक वर्षापर्यंत डॉ. नको म्हणतात. मला औरंगाबादच्या डॉ. किमान सहा महिने तरी नको देवू असे सांगितले होते. दिल्लीतल्या आयामच्या डॉ. ८ महिन्यांनंतर आता फुल क्रिम मिल्क द्यायला हरकत नाही असे सांगितले होते, पण मी ११ व्या महिन्यानंतरच दिले होते. तोपर्यंत लॅक्टोजनच.
बाकी जागरणाचे काय सांगता येत नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत एक वर्षाचा होईपर्यंत रात्री १-१.३० ला झोपायचे अन मग ३.३०-४ ला उठायचे हे रुटिन होतेच. लोक म्हणायचे रात्री बाटलीने पोटभर दुध प्यायल्यावर पोरं शांत झोपतात, पण हा मात्र पोटभर दुध प्यायला की अंगात आल्यासारखं खेळायला लागायचा. Uhoh

अन हो जायफळ नको देवूस ग. शीला त्रास होईल उगीच सारखं दिल्याने...परत जायफळ उष्ण पण असतं ना!

शिल्पा,
मला वाटतं कि तू त्याला प्रत्येक फिडींगनंतर थोडा फॉर्मुला दे.एक दिवस असं करुन बघ्.त्या दिवशी त्याचं रडणं कमी होतय का बघ.बाटलीच्या सवयीबद्दल फारसं माहित नाही पण वाटी-चमचाने दे.
५-६ वाटया आणि चमचे रोज सकाळी उकळून ठेव म्हणजे कधीही दिवसभरात वापरता येतील.

Pages