डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व! - भाग २

Submitted by अमितव on 9 April, 2026 - 12:33

'डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!' धाग्याचे २००० प्रतिसाद झाले म्हणून नवा धागा.
पहिल्या धाग्याची लिंक : https://www.maayboli.com/node/86200

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Submitted by vijaykulkarni on 8 October, 2026 - 12:48

Proud ड्रेन द स्वाम्प Biggrin

Hegseth says execution of Fort Hood shooter to be public

द काइट रनर मध्ये तालिबान public execution करतं असा एक प्रसंग आहे.

The Office of Religious Affairs (ORA) is a newly established department within the United States Department of Defense, announced by U.S. Secretary of Defense Pete Hegseth on September 30, 2026
https://media.defense.gov/2026/Sep/30/2004009308/-1/-1/1/ESTABLISHMENT-O...

यात सगळ्यांचं धार्मिक किंवा अधर्मी असण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहील असं म्हटलंय.

(महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा आलाय त्याचं नाव Maharashtra Freedom of Religion Act, 2026, आहे. )

>>> Hegseth says execution of Fort Hood shooter to be public

हो, काल हे वाचल्यापासून आता अमेरिकन पॉलिटिक्सबद्दल बोलण्यासारखं काही उरलं आहे असं वाटत नाही! माणुसकीच्या आणि सिव्हिलिटीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या गेल्यात!
रेजीम चेन्ज नक्की कुठल्या देशात व्हायला हवा आहे हे उघड आहे.

काल हे जेव्हा वाचलं तेव्हा पोटत ढवळलं. आत्ता परत तेच वाटलं. दरवेळी आता अजुन खाली घसरणे शक्य नाही वाटते आणि विकृतीला अंत नसतो तसं हे आणखी खोल तळ गाठतात. 'शेअर मार्केट चांगलं चालू आहे ना! मग झालं' यावर मी शांत बसू शकत नाही. असो.
मला 'नन ऑफ माय बिझनेस' म्हणणे तरी शक्य आहे. अमेरिकेत शेअर मार्केट बाहेर सारासारबुद्धी शाबुत असलेल्यांना यातुन कोपअप करण्याचे बळ मिळो.

>>>>>आता जनाची मनाची सगळीच सोडली की
जरा कुठे विरोधकांनी मत प्रदर्शन केलं की तुम्ही त्यांचे वस्त्र फेडणार. लाज काढणार. बरोबर? एवढं काय घोडं मारलय त्यांनी? वस्तुनिष्ठ बोलता येत अनही का? जिथे तिथे विरोधकांविरुद्ध असभ्य भाषा वापरता. एखादे कोणी असभ्य भाषा वापरणारे असतील त्यांच्याबद्दल असे शब्द काढणे वेगळे आणि निरुपद्रवी,function at() { [native code] }इशय संयत सभासदाची लाज काढणे वेगळे.
पण ती अपेक्षा तुमच्याकडून म्हणजे गाढवापुढे वाचली गीता आहे. तुम्ही फक्त मॅ निअ‍ॅक कांगावा आणि अद्वातद्वा 'पो'स्टस टाकत रहा.

मी एकही अपशब्द वापरलेला नाही, बहुतेक कधीही! असभ्य तर शक्यच नाही. चांगल्या शब्दांत लाज काढता यावी इतकं मराठी मला येतं. टाको समर्थकांसारखे अद्वातद्वा बोलायची गरज अजुन तरी पडलेली नाही.
आणि हे सगळं होत असताना ' इतकं काय घोडं मारलंय' हे विधान कोणी करत असेल तर त्याला विरोध करतच रहाणार. पिरिएड!

खांग्रेसी आणि लाज सोडली - हे सेम नाही.
इथे बामण, मंदुले, भक्तुले, गोदी मिडीआ - सगळे शब्द सगळे वापरतात. लाज काढणं वेगळं

>>>>' इतकं काय घोडं मारलंय' हे विधान कोणी करत असेल तर त्याला विरोध करतच रहाणार. पिरिएड!
घोडं ट्रंपनं मारलय. समर्थकांनी नाही. वी आर ट्राईंग अवर बेस्ट टु मेक सेन्स ऑफ हिस अ‍ॅक्शन्स. हे पचनी पडतं कधी तर कधी नाही. दर वेळेस पचनी पडलेलं मांडता येतच असं ना ही. न पचनी पदलेल्याचा निषेध दर वेळेला केलाच्च पाहीजे ही तुमची अपेक्षा आहे त्या करता कोणीही बांधील नाही.
पण ' जना मनाची लाज सोडली' आणि काही कुत्सित शेरे दूर ठेउन वस्तुनिष्ठ टीका व्हावी एवढी अपेक्षा आहे. त्याल function at() { [native code] }उम्हीही बांधील नाहीच म्हणा.

घोडं ट्रंपने मारलं असेलच तर तो केवळ निमित्तमात्र! मूळ घोडं त्याच्या ६० का ७० मिलियन मतदात्यांनी मारलं आहे. 'मेक सेन्स ऑफ हिज अ‍ॅक्शन्स' ... छान छान!
असो. तूर्तास अमेरिकेतील ७० मिलियन लोकांना इराक, नॉर्थ कोरिया आणि अफगाणिस्तान मधील लोकांसारखे, चवीपरीने चौकात फाशी चढवलेले बघायला आवडते. हीच त्यांची एंटरटेनमेंट असेल तर सो बी इट! पॅनअ‍ॅम मध्ये स्वागत आहे!
लाज वगैरे म्हणून मी चुकच केली आहे. आवडत असेलच की कुणाला गोळ्या घालताना बघायला. ज्याची त्याची आवड! त्यात लाज कशाची? खुलेआम ७० मिलियन लोक गोळ्या घालायला पाठिंबा देत असतील तर त्याला लाजेच्या कोंदणात तरी कसं बसवावं? चुकलंच!
याच गोळ्या घालताना बघायच्या आवडीची आणि त्यातुन मेक सेन्स आऊट ऑफ इट वृत्तीचा वस्तुनिष्ठ पुरावा दिल्याबद्दल छान वाटलं म्हणण्याइतकी मी मात्र लाज सोडलेली नाही.
जो जे वांछिल तो ते लाहो! मी या अशा स्खलनस्वातंत्र्याचा आदर कदापि करणार नाही!

घोडं ट्रंपनं मारलय. समर्थकांनी नाही >> दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है ... उगाचच आठवलं, झालं.

अरे तो एक विनोदच आहे!

३००,००० टन डिझेल ऑक्टोबर मध्ये, ५००,००० टन नोव्हेंबर मध्ये आणि मग भविष्यात कधीतरी १ मिलियन टन डिझेल देणार आहे. अशी त्याची फोड आहे.
आता ३००,००० टन अशा भाषेत डिझेल तुम्ही कधी ऐकलं आहे का? इतकं डिझेल अमेरिका १८ मिनिटांत संपवते. आणि ५००,००० टन म्हणजे जवळपास ३० मिनिटांचे डिझेल. म्हणजे नोव्हेंबर मध्ये रशिया अर्धातासाचे डिझेल देणार आहे. आणि हे मॅसिव्ह अमाऊंट ऑफ डीझेल आहे असं टाको म्हणालाय त्यामुळे आता यु मस्ट मेक सेन्स ऑफ हिज अ‍ॅक्शन्स!
अमेरिका एका महिन्यांत ११८ मिलियन टन डिझेल वापरते. तुम्हीच गणित मांडा.

बाकी आणखी एक गुपित सांगतो. अमेरिकेत डिझेलची टंचाई अजिबात नाही आहे. अमेरिकेत भरपूर डिझेल आहे, पण मग किंमती गगनाला का भिडल्या आहेत? कारण जगात टंचाई आहे. आणि जगात टंचाई असल्याने किंमती वाढल्या त्यामुळे अमेरिकेतही किंमती वाढल्या. आता त्यावर उपाय म्हणून अमेरिकेत १८ मिनिटाचे जास्त डिझेल आणून काय होणार आहे! यातलं एक थेंबही डिझेल जगात जाणार नाही आहे. मग या ०.२४३% जास्त अशा मॅसिव्ह डिझेलने काय होईल!

आता आपल्याला हा रिडिक्युलस स्टुपिडनेस दिवसरात्र का सहन करावा लागतो? कारण अमेरिका नामक देशातील निम्मे लोक यावर विश्वास ठेवतात आणि ते अर्थसाक्षर नाहीत! ते नाहीत तसा राष्ट्राध्यक्ष ही साक्षर नाही. भोत्यांकफ!

कुणाला सांगणार नसलात तर आणखी एक गंमत सांगतो, हे जे रशिया कडून महिन्याभरात डिझेल येणार आहे त्याच्या एक विसांश (१/२०) डिझेल अमेरिका दर दिवशी एक्सपोर्ट करतो. का करतो? हायस्कूल केमिस्ट्री आठवा. अमेरिकेला जेवढं पेट्रोल लागतं ते बनवताना क्रुडचे पृथक्करण करताना डिझेलही मिळतं. ते सगळं वापरलं जात नाही त्यामुळे एस्पपोर्ट करत असणार. पेट्रोल तर तितकं हवंच आहे ना.
आता अमेरिकेने डिझेलची निर्यात बंद केली तर कदाचित भाव कमी होतील, पण मग पुरेसं पेट्रोल तयार न झाल्याने पेट्रोलचे भाव वाढतील. Lol तो जोक परत कधीतरी.

व्हीलचेअरवरच्या माणसाला सात अमेरिकन आर्मी युनिफॉर्म मधील सैनिक गोळ्या झाडून मारत आहेत, आणि जग ते बघत आहे! हे अमेरिकेने जरूर जरूर करावेच!
अमेरिका आणि अमेरिकन सैनिक आणि अमेरिकन आर्मी याबद्दल जगात आणि खुद्द अमेरिकेत उत्तम सिग्नल जाईल! तेव्हा ते अवश्य करावे.

<न पचनी पदलेल्याचा निषेध दर वेळेला केलाच्च पाहीजे ही तुमची अपेक्षा आहे त्या करता कोणीही बांधील नाही.>
पण मी दर वेळी केतकी चितळेसाठी कोणी निषेध केला नाही म्हणून गळा काढणार. ती माझ्यासाठी जवान सीमा पर खडा है लेव्हल ऑर्ग्युमेंट आहे.

>>>>>पण मी दर वेळी केतकी चितळेसाठी कोणी निषेध केला नाही म्हणून गळा काढणार.
का तेव्हा निषेध न केल्याबद्दल तुम्हाला सल वाटते का दर वेळा? तसं अस्ले तर तुमच्या मनःशांती हितार्थ नाही काढत गळा का काय ते.

राजकारणाच्या धूळवडीत , चिखलात उतरुन खेळायचा तुमचा अनुभव दांडगा आगे भरत. तिथे मी पासंगासही पुरणार नाही. तेव्हा माझ्या मनःशांतीकरता मी गप्प रहाते. पण तुमचे चालू द्या. तुमचा तोच विरंगुळा असावा.

नाही. मला अजिबात सल नाही. मी तेव्हा काय लिहिलं काय नाही, हे तुम्हाला दाखवून द्यायची मला गरज नाही.
आताही तुमच्या लिहिण्यातली विसंगती तुम्हांला दिसत नसेल तर ती बाय चॉइस आहे की कसे ते तुमचे तुम्हांला माहीत.

तुमचंच वाक्य पुन्हा वाचा -न पचनी पदलेल्याचा निषेध दर वेळेला केलाच्च पाहीजे ही तुमची अपेक्षा आहे त्या करता कोणीही बांधील नाही.>

तुम्ही खांग्रेसी म्हणालात तिथेच चिखलात उतरलात.

द रिस्क ऑफ लुझिंग पीस ऑफ माईंड इज आऊटवेइंग द सोशल बेनेफिटस ऑफ कमिंग टु माबो.
----------
इथे डूखी आणि कडू लोकांबरोबर वाद घालत बसण्यापेक्षा मला वाटते न येणेच श्रेयस्कर आहे. तेव्हा रजा घेते. हां ती विशेषणे कोणाही विशिष्ठ व्यक्तीकरता नाहीत. वृत्तीकरता आहेत.

>>>>>मला अशा वृत्तीचा चांगला अनुभव आहे. किमान १२ वर्षांचा.
मला नाही आणि परत नकोय.
---------------------------------------
'खांग्रेसी' शब्द तिडीक आणणार अहे. तो वापरल्याबद्दल क्षमस्व.

सप्टेंबर कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, अर्थात इनफ्लेशन डेटा. ३.७% झालं. फेडचे इनफ्लेशन २% ठेवायचं टार्गेट असतं.


आता पुढच्या फेड मिटिंगला, म्हणजे मिडटर्मच्या आधीच, आणखी एक रेट हाईक होणार का काय! Wink

'गेट रेडी फॉर सिव्हिल वॉर इन रिपब्लिकन पार्टी' - असं ट्रंपचा अ‍ॅडव्हायझर स्ट्रीव्ह बॅनन म्हणतोय. वी आर रेडी! आर यु? Wink

रिपब्लिकन राजकारणी होणार्‍या पराभवाचे खापर तात्याच्या माथी ऑलरेडी मारू लागली आहेत. तात्या इथला बाडबिस्तारा आवरुन इझराईलचा पंतप्रधान होण्याची स्वप्ने बघतोय, ते ही मिडटर्मच्या सकाळी Biggrin
अब्दुल-अल-सयाद, ओसाफ, टॅलरिको, ट्रॉय जॅक्सन (मेन) आणि ओहायो पासून फ्लिप होतील म्हणताहेत. बाकी नेब्रास्का आणि आयोवा इ. पोल्स मध्ये टॉसअप आहेत.
व्होट करुन या आणि सांगा तुमच्या इकडे काय माहोल होता ते!

मी अजून काहीही बोलणार नाही. इट एन्ट ओव्हर टिल इट्स ओव्ह्रर!
आमच्याकडे बहुतेकांनी अर्ली वोटिंग केलं होतं. मी आज अगदी उजाडता उजाडता गेले होते. तेव्हा फार लोकं नव्हती - इन अ‍ॅन्ड आऊट!
हपिसात तीन तासाचं कन्सेशन दिलं आहे वोटिंगसाठी.

Pages