Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44
आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.
आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हरचंद पालव >>आंबेडकरांचं माझी
हरचंद पालव >>आंबेडकरांचं माझी आत्मकथा
बोलती पुस्तके ब्लॉगवर आहे.
माझी आत्मकथा नावाचं कुठलंही
माझी आत्मकथा नावाचं कुठलंही पुस्तक बाबासाहेबांनी ना स्वतः लिहीलं आहे , ना कुणाला लिहायला सांगितलंय. कीर यांनी लिहीलेलं चरित्र आणि चांगदेव खैरमोडे कृत १२ भागातले चरित्र हे अधिकृत समजले जातात.
माझी आत्मकथा हे मुख्यत्वे "वेटिंग फॉर व्हिसा" या निबंधाचा आणि अन्य काही गोष्टींची जोडणी करून संपादित केलेलं पुस्तक आहे.
माझी आत्मकथा नावाचं कुठलंही
माझी आत्मकथा नावाचं कुठलंही पुस्तक बाबासाहेबांनी ना स्वतः लिहीलं आहे , ना कुणाला लिहायला सांगितलंय. कीर यांनी लिहीलेलं चरित्र आणि चांगदेव खैरमोडे कृत १२ भागातले चरित्र हे अधिकृत समजले जातात.
माझी आत्मकथा हे मुख्यत्वे "वेटिंग फॉर व्हिसा" या निबंधाचा आणि अन्य काही गोष्टींची जोडणी करून संपादित केलेलं पुस्तक आहे.
रमेश इंगळे उत्रादकर ह्यांचे
रमेश इंगळे उत्रादकर ह्यांचे निशाणी डावा अंगठा पुस्तक वाचतोय. ह्यावर आलेला ह्याच नावाचा सिनेमा बराच आधी बघितला होता भरत जाधव अन् संजय नार्वेकर ह्यांनी वऱ्हाडी भाषा पकडण्याची केलेली केविलवाणी धडपड, भाषेचा लहेजा हाती नसताना पण फक्त आपल्या ऑरा वर भूमिका खेचणारे अशोक सराफ, सोबतीला मोहन आगाशे अन् विनय आपटे आठवले. पण पुस्तक वाचण्याचा आनंदच विरळा अतिशय सुलभ सावरगाव सरकारी शाळा, तिथे शिकवणारे मास्तर, त्यांची सर्वशिक्षा अभियानादरम्यान झालेली त्रेधा, कुठलाही विचार न करता योजना काढून तिचा बोजवारा उडवणारी सरकारी व्यवस्था आणि सामान्य माणसांचे आयुष्य हे फारच उत्तम आवडले रंगवलेले.
बारोमास आणि निशाणी डावा अंगठा
बारोमास आणि निशाणी डावा अंगठा - दोन्ही ग्रेट पुस्तके आहेत. तुलनेने जुन्या पुस्तकांना पुन्हा उजाळा मिळालेला पाहून बरे वाटतेय.
बारोमास बद्दल इथेच मायबोलीवर बरेच चांगले वाईट लिहिलेले आहे.
https://www.maayboli.com/node/44217
https://www.maayboli.com/node/13296
https://www.maayboli.com/node/8032
जुन्या धाग्यांवरच्या कमेंट्स वाचून आता मजा वाटते.
Link बद्दल धन्यवाद टवणे सर.
Link बद्दल धन्यवाद टवणे सर.
वाचतेय.
माहिती आणि लिंकबद्दल धन्यवाद
माहिती आणि लिंकबद्दल धन्यवाद स्मिताके आणि राज अज्ञानी
निशाणी डावा अंगठा पुस्तक
निशाणी डावा अंगठा पुस्तक भन्नाट आहे. पिक्चर तेवढा जमला नव्हता. आता फक्त शिध्यामधला सुकामेवा कलिग्जना देणारी निर्मिती सावंत आठवते आहे.
आक्का, मी आणि ...... वीणा संत
आक्का, मी आणि ...... वीणा संत
मागे बऱ्याच दिवसांपूर्वी अमलताश हे पुस्तक वाचले होते. त्यात इंदिरा संतांबद्दल जरा नकारात्मक सुर होता. त्या नकारात्मकतेचा परिणाम कमी करण्यासाठी हे पुस्तक असावे. अर्थात आरोपांना उत्तर असे पुस्तकाचे स्वरूप नक्कीच नाही. पण इंदिरा संतांचे त्या पुस्तकात दिसलेल्या रूपापेक्षा हे रूप खूप वेगळे आहे. पुस्तकात त्यांचीच प्रतिमा मांडण्याचा प्रयत्न असल्यामुळे साहजिकच त्या पुस्तकभर आहेत. लेखिका स्वतः गृहिणी असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून इंदिरा संतांचे व्यक्तिमत्व समोर येत राहते. त्यांचा व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष, घरातील वावर, घरातल्यांच्या नजरेतून सगळे त्यांचे साहित्यिक जग, अश्या पद्धतीने पुस्तक पुढे पुढे जाते.
पुस्तक सुरवातील एकदम पकड घेत नाही, मधूनच थोडे रटाळ पण होते पण पुढे पुढे गुंतवून ठेवते. पण पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावरही काहीतरी गूढ राहिल्यासारखेच वाटते. अमलताश वाचून खूप दिवस झाल्यामुळे आत्ता फार आठवत नाही पण तेव्हाही इंदिरा संतांबद्दल हे असे का? असे वाटले होते. पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावरही एखादा माणूस किंवा घटना पूर्ण उलगडले नाही कि अस्वथ वाटते. इंदिरा संत या दोन पुस्तकांपेक्षा कदाचित त्यांच्या कवितांमधुनच उलगडत असतील.
पुस्तक नक्कीच वाचावे असे आहे. ६० वर्षांपूर्वीच्या काळात एक स्त्री खंबीरपणे आपल्या मुलांसाठी, घरासाठी उभी राहते, एक सशक्त करिअर करते हे नक्कीच जाणून घेण्यासारखे आहे. बाकी घरांमधले वाद, मतभेद हे कोळसा उगाळावा तितका काळा!
आफ्टरमॅथ - माझ्याही
आफ्टरमॅथ - माझ्याही विशलिस्टला आहे.
बारोमास - गेल्या वर्षी वाचलं होतं. भकास रिकामपण आल्यासारखं झालं होतं.
निशाणी डावा अंगठा
निशाणी डावा अंगठा
पुस्तक नाही वाचलेलं पण चित्रपट अनेकदा पाहिलाय
माझे आई वडील शिक्षक
आणि मी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची सदस्य
त्यामुळे प्रौढ साक्षरता वर्ग अगदी जवळून अनुभवले
त्यामुळेच चित्रपट अधिक जवळचा वाटला असावा
मकरंद अनासपुरे चा हाहाहा इतर वेळेस कितीही असह्य वाटला तरी यात तो फारसा जाणवला नाही
दिलीप प्रभावळकर आणि मोहन आगाशे यांच्या भूमिका अगदी लक्षात राहणा-या
दुष्काळाचे कारण आणि परिणाम एकत्र
बाप्पा कामच झालं ना हे गाणं
बाप्पा कामच झालं ना हे गाणं लैच जबरदस्त.
वऱ्हाडी भाषेसाठी फॉलो करावा त्यात फक्त भारत गणेशपुरे
नुकतीच रवि आमले ह्यांनी
नुकतीच रवि आमले ह्यांनी लिहिलेली 'रॉ' आणि 'परकीय हात' ही पुस्तके वाचली. आधी रॉ वाचलं. भारताच्या ह्या गुप्तहेर संघटनेनं परदेशात केलेल्या कारवायांच्या उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिलेल्या कहाण्या ह्या पुस्तकात आहेत. काही काही घटनांचे उल्लेख ऐकले होते पण त्यांची पार्श्वभुमी माहित नव्हती आणि काही घटनातर अजिबातच माहीत नव्हत्या. खुल्या युद्धाच्या नाहीत पण हेरगिरीच्या ह्या कथाही "रम्म्या" आहेत! शिवाय आपल्या बाजूच्या असल्याने अभिमानास्पदही आहेत. बांग्लादेश युद्ध, सिक्कीममधली कारवाई, मॉरिशसमधल्या घटना थरारक आहेत. बांग्लादेश युद्धात इंदिरा गांधींनी दाखवलेली धमक खरोखरच अफाट होती! इंदिरा गांधीच्या सरकारच्या काळात एखाद्या घटनेमागे 'परकीय हात' आहे असा उल्लेख सतत यायचा.
"रॉ अस्तित्त्वात असतानाही परकीय हात भारतात काम करत होताच आणि आजही करतो आहे, पण तो स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे." असं एक वाक्य होतं पहिल्या पुस्तकात होतं आणि त्याच वाक्याचा धागा पकडून 'परकीय हात' हे परदेशी गुप्तहेर संघटनांचा भारतातील कारभार दाखवणारं दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे.
साडेचारशे पानी पुस्तकात बर्याच घटना आणि त्यांचे बरेच तपशील सविस्तर लिहिलेले आहेत. त्यामुळे पुढे पुढे हे तपशील / नावं लक्षात रहात नाहीत मात्र घटनांचा ढोबळ क्रम लक्षात रहातो. हेरगिरीच्या पारंपरिक तंत्रांपासून (लाचलुचपत, मोल, डबल एजंट, हनीट्रॅप) ते आधूनिक सायबर हेरगिरीपर्यंत बरीच मोठी व्याप्ती आहे. शीतयुध्याच्या काळातली महासत्तांची साठमारी ते पुढे मित्रदेशांनी केलेली हेरगिरी आणि कारवाया वाचून नक्की काय खरं आणि कशावार विश्वास ठेवावा असा प्रश्न पडतो! कुणालाही सुगावा लागू न देता केलेल्या पोखरणाच्या ७४ आणि ९८ मधल्या अणुचाचण्यांचे प्रसंग वाचायला विशेष मजा आली!
जाणवलेली एक गोष्ट म्हणजे लेखकाच्या राजकीय निष्ठा लेखनातून अगदी स्पष्ट दिसून येतात. गुप्तहेर संघटनांबाबत कॉंग्रेसेतर सरकारांनी (विशेषत: नेहरू, गांधी पंतप्रधानांंनी) केलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आणि बाकीच्यांच्या चुकलेल्या असं नक्कीच नसणार. त्यादृष्टीने पुस्तकांतला थोडासा एकांगीपणा सोडल्यास दोन्ही पुस्तकं खूप आवडली. अश्याप्रकारचं लिखाण मराठीत पहिल्यांदाच वाचलं.
इथेही पुस्तके राहतात.....
इथेही पुस्तके राहतात......
https://youtu.be/pAd0UU5124o?si=F58fHhhSQvA_11XX
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/89059
पुस्तक परिचय : The 1982-83 Bombay Textile Strike And the unmaking of a Labourers' City (Hub Van Wersch)
पराग, छान परिचय.
पराग, छान परिचय.
(शेवटी एकांगीपणाबद्दलच्या वाक्यात काहीतरी गडबड वाटते आहे.)
धम्मानंद कोसंबी यांनी
धम्मानंद कोसंबी यांनी लिहिलेल्या जातक कथा वाचतो आहे. या जातक कथांमधे फारसा इंटरेस्ट नाही. कारण या इसापनीतीप्रमाणे नीती कथा आहेत. पण या निमित्ताने तत्कालीन समाजजीवनाची ओळख होतेय. पहिल्यांदाच टिपणे काढून घेतोय, जी उभ्या आयुष्यात कधी काढली नाहीत. जातक कथांमधे कंस, देवकी आणि कृष्णजन्माची एक कथा आहे.
या निमित्ताने मनात अनेक विचार येत आहेत, ज्याचा शोध घेणे गरजेचे आहे, जातक कथा म्हणजे बौद्ध साहित्य नाही असा माझा समज झाला आहे. ए आय आडमुठी उदाहरणे देते. जातक कथा म्हणजे बुद्धाच्या निरनिराळ्या जन्मकथा आहेत असे एआय सांगतात कारण एआय इंटरनेटवर उपलब्ध असलेलं "बहुमत" पाहतं. त्याच्याशी डोकं देण्यापेक्षा तर्क आणि अस्सल पुरावे महत्वाचे. बुद्धाने पुनर्जन्म नाकारला असल्याने बुद्ध स्वतःच्या जन्माच्या कथा सांगेल हा मूर्खपणा नंतरचा प्रक्षेप असावा,
या बोधिसत्वाच्या कथा आहेत. कोसंबी यांच्या म्हणण्याप्रमाणे बोधि म्हणजे सत्य आणि ज्ञानाच्या मार्गावर चालणारे सत्व (म्हणजे जीव, जंतू मनुष्य) याला बोधिसत्व म्हटले जाते. त्यामुळे हजारो असे बोधिसत्व असू शकतात. मूळ जातक कथा श्रीलंकेत हस्तलिखित स्वरूपात सुरक्षित ठेवल्या होत्या. ज्याचे इंग्रजीत रूपांतर एका डच विद्वानाने केले. यात पुनर्जन्माचा उल्लेख नाही.
ब्रह्मदत्त हे नाव अनेक कथातून येते. त्या काळी काशीच्या राजाला ब्रह्मदत्त म्हणण्याची प्रथा होती. अनेक अशा इंटरेस्टींग गोष्टी सापडत असल्याने हे पुस्तक वाचत आहे. यात दशरथ जातक अद्याप सापडलेले नाही. कारण सर्वच कथा यात नाहीत. दशरथ जातकामधे रामायण आहे.
जातक कथा प्राचीन असल्याचे सज्जड पुरावे आहेत. त्या काळात भारतात संस्क्रुत भाषा नव्हती. संस्कृतचा पहिला शिलालेख पहिल्या शतकातला आहे. या सर्व इंटरेस्टींग फॅक्टस आहेत. याबद्दल उलटसुलट दावे असतात. ते तपासणे हे function at() { [native code] }यंत जिकीरीचे काम असले तरी यात वेळ छान जातो. त्याबद्दल सार्वजनिक लिखाण करण्याइतपत ठाम पुरावे अद्याप मिळालेले नाहीत. एव्हढा वेळ पण मिळत नाही.
मलाही जातक कथा म्हणजे बौद्ध
मलाही जातक कथा म्हणजे बौद्ध मायथॉलॉजी असेच वाटत होते आजवर
- जाहिरात अलर्ट -
- जाहिरात अलर्ट -
मित्रहो,
यावर्षी माझ्या पाच कथा दिवाळी अंकांत येतील.
१. सूर येती : हंस
२. तलावातलं ऊन : मुक्त शब्द (हा गंगाधर गाडगीळ यांच्या तलावातलं चांदणं या अजरामर कथेला दिलेला एक प्रतिसाद आहे)
३. चिरंतनाचा गंज : तथाकथित मंडळी
४. गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या : चतुरंग अन्वय
५. बिसलसिदरायाची न्हाणी : मिसळपाव
=================================================
खालील कथा काही अंकांनी रिजेक्ट केल्या. वरील कथा आणि खालील जर तुम्हाला वाचायच्या असतील तर मला व्य नी करा किंवा खरड लिहा / विचारपूस करा. पण खरोखर वाचायच्या असतील तरच करा. त्या लवकरच कथा संग्रह काढून प्रकाशित करायचे घाटत आहे.
६. माणदेश पार्क
७. दिक्काल धुक्याच्या समयी
८. रेषा आणि अंतर
नेहमीप्रमाणे हंस ने सर्व कथा प्रेमाने वाचून त्यांना हवी ती कथा निवडली. उर्वरित कथा दुसरीकडे पाठवता याव्यात म्हणून पोचपावती देखील लगेच दिली. महाअनुभव वाल्यांनी एकही कथा वाचायचे कष्ट घेतले नाहीत. त्यांना मुळात मला काही पाठवायचे नव्हते पण मला एक दोघांनी सांगितल्यामुळे मी अपेक्षा न ठेवता पाठवून दिल्या त्यामुळे फारशा अपेक्षाभंग झाला नाही! एकच चांगली गोष्ट म्हणजे यावर्षी जमले नाही असे खूपच उशिरा (तरी का होईना) सांगितले. पुढच्या वेळेस कानाला खडा! मुक्तशब्द साठी एका मित्राने जॅक लावला नाहीतर आपल्याला कोण विचारतेय? मौजवाल्यांचे काय चालले असते कुणास ठाऊक, त्यांनी कधी चुकून देखील रिप्लाय केलेला नाही आजवर. चतुरंग अन्वय चे संपादक हंस प्रमाणेच अत्यंत आदराने वागवतात. खूप सुखद अनुभव. भास प्रकाशनाने पाठवलेल्या कथा आनंदाने रिजेक्ट केल्या.
आपण पार्टीत फारच लेट आलो असे वाटते. २०१८ ला खरेतर माझी पहिली कथा अशी प्रसिद्ध झाली त्यानंतर मी अजिबातच कन्सिस्टटली लिहिले नाही. याचा आता खरेच पश्चाताप होतो आहे. LLM पूर्व काळात प्रकाशित होण्यात खरे सुख होते. याच वर्षी इतक्या कथा लिहायला मिळाल्या. आता पहिल्यांदाच इतक्या व्यापक प्रमाणावर(!) प्रसिद्धी मिळणार असल्याने आणि नंतर मला शेकड्यांनी फॅन मेल येणार असल्याने माझ्या अंगावर आत्ताच मूठभर मांस चढले आहे. लवकरच पाचशेची एक आवृती या प्रमाणे एक पूर्ण आवृती येत्या पाच वर्षांत खपून आपण बेस्ट सेलर ठरणार या कल्पनेनेच हुरळून जायला होते.
आता मात्र AI स्लॉपच्या महापुरात आपण वाहून जाणार ते जाणारच आणि जवळ जवळ end of text युगात आपण प्रवेश करत असतानाच इतक्या कथा लिहून व्हाव्यात हे नेहमीप्रमाणेच आमच्या फाटक्या नशिबाचेच भाग्य.
टवणे सर, नंतर जातक कथांना
टवणे सर, नंतर जातक कथांना चिकटलेल्या गोष्टी बघता असा समज होणं हे खूप स्वाभाविक आहे. माझा सहसा जे समोर आहे त्यावर अंधपणे विश्वास न ठेवण्याचा स्वभाव असल्याने ते पटतही नव्हतं, आणि खोदकाम केल्यावर तस आविश्वास वाटू लागला. असो. जर सवड झाली तर यावर स्वतंत्र धाग्यात लिहीन (या धाग्याचा मान ठेवून आटोपतो.)
अभिनंदन रॉय, अभिनंदन.
अभिनंदन रॉय, अभिनंदन.

प्रसिद्ध झाल्यावर गरिबाची ओळख विसरू नका.
AI स्लॉप पेक्षा माणसांबाबत भावनाशून्य आणि एआयचे अमाप कौतुक असलेली लोक जास्त भयप्रद वाटतात. तुम्हाला एआय कसं हरवणार आहे याचा आनंद असलेली. एकुण सगळ्या मनुष्यजातीचीच, कलेचीच हार असणार आहे. आपण माणसं एक टीम आहोत, हे आहेत "घरका भेदी" बिभीषण!
असो. जे होईल ते होओ. आपण जर शेवटची पिढी असू, मराठी येणारी, स्वतः लिहिणारी तर ते आपोआपच मौल्यवान ठरेल एकेदिवशी. मग तर जोर काढून लिहू. फना!
लेखनासाठी शुभेच्छा!
स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा!
अभिनंदन रॉय, आजकाल मासिकांना
अभिनंदन रॉय, आजकाल मासिकांना कथा पाठवताना ई मेल ने पाठवतात का ? पूर्वी परतीचे पोस्टेज लावून पाकिट पाठवत व आवडले नाही तर संपादक 'साभार परत' करत.
रॉय,
रॉय,
मी अनुभव मासिकाची सहसंपादक आहे.
तुम्ही पाठवलेल्या सर्व कथा आम्ही बारकाईने वाचल्या होत्या.
तुम्ही इथे जाहीरपणे आमच्या अंकाचा उल्लेख केलात,
तुमच्या प्रत्येक कथेचा मी इथे जाहीर पंचनामा लिहू शकते.
पण त्यात मला रस नाही. त्यासाठी वेळही नाही.
यापुढे
'संपादकांनी एकही कथा वाचण्याचे कष्ट घेतले नाहीत' हे लिहिण्यापूर्वी चारदा विचार करा, अंक आमचा असो वा इतर कुठला.
बाकी तुमचं चालू द्या.
आपण पार्टीत फारच लेट आलो असे
आपण पार्टीत फारच लेट आलो असे वाटते. >>>>> माझं मत सांगू का? (विचारलं नसलं तरीही "जाहिरात" दिली आहे म्हणून सांगतो) तुमचं जेवढं काही लेखन इथे मायबोलीवर वाचलं आहे ते मला अजिबातच आवडलं नाही आणि फारच सुमार दर्जाचं वाटलं. जगात लिहिल्या जाणार्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही ज्या पद्धतीने टीका करत असता ते बघून मला वाटलेलं तुम्ही खूपच उच्च दर्जाचे लेखक असाल.. (सचिनच्या बॅटींगवर टिका करायला तुम्ही आंतराष्ट्रीय सामन्यात १००+ सेंच्युर्या मारायला असायलाच हव्या असं काही नाही ह्याची जाणिव आहे, पण निदान बॅट हातात कशी धरावी हे समजण आवश्यक आहे असं मला वाटतं). हल्ली काही काही चर्चांवरचे प्रतिसादही असंबद्ध वाटले.
मुळात कोणी तुमच्या कथा न वाचता रिजेक्ट केल्या हे तुम्हांला इतक्या खात्रीशीर कसं कळलं? त्या वाईट असतील आणि त्यांच्या निकषात बसत नसतील ही एक शक्यताही असू शकते.
असो. पाच अंकात कथा येणार आहेत तर त्याबद्दल अभिनंदन.
(शेवटी एकांगीपणाबद्दलच्या
(शेवटी एकांगीपणाबद्दलच्या वाक्यात काहीतरी गडबड वाटते आहे.) >>>> हो बरोबर आहे.
सुधारीत वाक्य: (आता ते वर एडीट करता येत नाहीये..)
"गुप्तहेर संघटनांबाबत काँग्रेस सरकारांनी (विशेषत: नेहरू, गांधी पंतप्रधानांंनी) केलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आणि बाकीच्यांच्या चुकलेल्या असं नक्कीच नसणार. त्यादृष्टीने पुस्तकांतला थोडासा एकांगीपणा सोडल्यास दोन्ही पुस्तकं खूप आवडली. "
दुर्गा भागवतांनी जातक कथांचे
दुर्गा भागवतांनी जातक कथांचे मराठी भाषांतर केले आहे ना?
बरोबर आहे टवणे सर तुमचं.
बरोबर आहे टवणे सर तुमचं. त्यांनी शब्दशः आणि एकूण एक जातक कथांचे भाषांतर केले आहे. कोसंबी यांनी १९२४ साली संक्षिप्त (निवडक) सारांशरूपी जातक कथा प्रकाशित केल्या आहेत. (सर्व नाहीत). माझा उद्देश हा तोंडओळख आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी उल्लेखिलेल्या कोसंबी यांच्या त्यावरच्या नोंदी वाचणे हा होता. शिवाय किंमतीचा फरक आहेच.
दुर्गाबाईंनी बहुतेक आठ खंडात या जातककथा लिहिलेल्या असल्याने किंमत जास्त असणार. त्या वाचनालयात जाऊन मिळवाव्या लागतील. एव्हढा मोठा संग्रह घरात ठेवायचा तर मुलंही लहान नाहीत.
पराग, धन्यवाद, अशाच
पराग, धन्यवाद, अशाच अभिप्रायांची गरज असते. या मध्ये बायस असो वा नसो तरीही असे थेट बोलणे मला आवडते.
आपल्याला एखादी गोष्ट का नावडली हे देखील नीट सांगता आले पाहिजे. तसं नसेल तर हे नावडले हे तरी सांगता आले पाहिजे. प्रत्येकजण काही मुराकामी नसतो किंवा प्रत्येकजण काही शिशिन लिऊ नसतो. प्रत्येकाचे पॉइझन देखील वेगळे असते.
मला वेगवेगळ्या अंकांना कथा पाठवताना आलेले अनुभव मी सांगितले. त्यात काही संपादकांचे अतिशय चांगले फीडबॅक देखील आले. उदा. भास प्रकाशन. केवळ 'जमणार नाही', किंवा नो रिप्लाय असे त्यांनाही करता आले असते. आम्ही वाचले नाही असे देखील काही लोक कळवतात कारण खरोखर त्यांना कामाचा व्याप असतो. मात्र एखादी गोष्ट का वर्क आउट होत नाही, त्यात काय बदल असायला हवेत काय नकोत, असा किमान चार ओळींचा फीडबॅक तरी भास वाल्यांनी दिला. शेवटी प्रत्येकाची तशी कार्यपद्धती असते म्हणा. अनेक लोक प्रचंड प्रमाणात गेट कीपिंग करतात. पुन्हा प्रत्येकाचा वेगवेगळा कंपू असतो. पुन्हा एकमेकांच्या गुडबुकात राहायची सक्ती. त्यात एकट्याने खिंड लढवणाऱ्या आमच्यासारख्यांची काय वासलात लागणार?
ललिता-प्रीती,
मला खरेतर तुमच्या अंकाला काहीच पाठवायचे नव्हते. (नो ऑफेन्स, याला काही विशेष कारण नव्हते) दोन मित्रांनी त्यांना आलेले 'अनुभव' देखील सांगितले होते. (तोही पंचनामा मला मांडता येईल पण त्यात आता पडणार नाही, कारण तो मग खूपच मोठा विषय होईल). ही चूक माझीच झाली म्हणायची. खरेतर मला वाटले की त्या टीम मधे मृद्गंधा दीक्षित सारखी चांगली कथाकार आहे तर आपण किमान पाठवून देऊ. पण आपण बारकाईने कथा वाचून त्या घेत नाही असे कळवायला चार महिने घेता जवळपास. (खरेतर त्या वाचल्या हे आत्ताच कळले). मात्र इथे पंचनामा करायची तयारी (खुमखुमी) दाखवता!
असो!
(मृदगंधा दीक्षित : ज्यांच्या कथांवर मी आधी त्यांना अभिप्राय दिले आहेत, किंबहुना अनेकांनी त्यांना 'लिहू नका' असा सल्लाही दिलेला होता, मात्र मी तुमचा एक लॉयल वाचक आहे असे मी त्यांना आवर्जून कळवले. मी माझ्या अनेक मित्रांना त्यांच्या कथा वाचायला लावल्या, त्यातल्या नाविन्यावर आणि स्किल्सवर चर्चा केली. केवळ याच कारणामुळे मला तुम्हाला लिहिलेले पाठवावेसे वाटले.)
>> दुर्गाबाईंनी बहुतेक आठ
>> दुर्गाबाईंनी बहुतेक आठ खंडात या जातककथा लिहिलेल्या असल्याने किंमत जास्त असणार <<
राज अज्ञानी,
याची पहिली आवृती देखील खपली नसेल असे मला वाटते. त्यामुळे समजा तुम्ही विकत घ्यायला जरी गेलात तरी तुम्हाला तीच जुनी आवृत्ती (नुसती हाताळली तरी फाटतील पाने अशी आवृती) मूळ किमतीवर नवे स्टिकर लावून विकत देतील. मला वाटते मी मागे, आता बंद पडलेल्या पुस्तकपेठतेत ही घेण्याचा प्रयत्न केला होता. केवळ हेच ग्रंथ नाहीत तर गौरीने भाषांतरित केलेले अरेबियन नाईट्स चे सगळे खंड (मूळ किमंत अत्यंत कमी) त्याच पहिल्या आवृत्तीवर ( किमान पन्नास साठ वर्षे जुनी असावी ) असेच स्टिकर लावून हजारो रुपये किंमत लावली होती. म्हणजे ते खंड रेअर आहेत का तर नाही. मात्र दुर्मिळ नसून देखील त्यावर एवढा प्रचंड प्रीमियम मला तर देऊ वाटेना.
अत्यंत हलक्या दर्जाची पाने, जवळ जवळ निखळेलेले बाइंडिंग. त्यामुळे तुम्हाल ही लायब्ररीतच मिळतील. परंतु, या खंडांच्या सुरुवातीला कदाचित दुर्गाबाईंची दीर्घ प्रस्तावना देखील असू शकते. जी जास्त वॅल्युएबल असू शकते. (जसे श्रीमान योगी च्या मूळ कंटेंट पेक्षा कुरुंदकरांच्या प्रस्तावनेतच पैसे फिटून जातात तसे)
जशी श्रीमान योगी च्या मूळ
जशी श्रीमान योगी च्या मूळ कंटेंट पेक्षा कुरुंद करांची प्रस्तावनेतच पैसे फिटून जातात तसे
>>>
तुम्हाला शिव्या घालयला यावे तर हे असले काहीतरी एखादे लिहून बेत मोडीस काढता.
तुमचे मायबोलीवर फिक्शन काही वाचल्याचे आठवत नाही त्यामुळे दर्जाबद्दल माहिती नाही. पण तुमचे ग्रह, मते, आवड-निवड ठामपणे मांडत उद्धटपणे लिहिता इथे ते अनेकदा अस्थानी वाटते, तर कधी करमणूक होते. हे वरचे श्रीमान योगी - कुरुंदकर सारखे माझ्या आवडी-निवडीस समांतर काहीतरी आले तर दे टाळी असेही होते.
तसेही सगळे मायाजालच आहे. लिहा काय लिहायचे ते.
Pages