Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44
आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.
आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे ऐकलं आहे का?
हे ऐकलं आहे का?
तरीही तेच मत असेल, आणि हे सगळं मुद्दाम प्लॅन केलेला जोक असं काही राईट विंग सारखं म्हणायचं असेल तर मग अच्छा है! अच्छा है!
नेमाडेंचे हे सात मिनिटांचं
नेमाडेंचे हे सात मिनिटांचं भाषण मला अजिबात आवडलं नाही. एक शब्दही नाही. क्वचित असं होतं की काही गोष्टी आवडतात काही नाही पण यातलं काहीही पटलं नाही. आधी मी काही खूप भक्त नव्हतेच पण त्यांची काही पुस्तकं वाचलेली- आवडलेली आहेत. अतिशय असंबद्ध ( irrelevant) , एकांगी आणि दुराग्रही आहे. थोडा वंशवर्चस्ववाद (ethnocentrism ) सुद्धा दिसला. सप्तर्षी आणि व्हाट नॉट! जयतु जयतु हिंदूराष्ट्रम्??
वंशवर्चस्ववाद हे एकदम दुर्बळ संस्कृतीचे लक्षण आहे. खूप इनसेक्युअर असलं की माणूस जाहिरात करतो. तुम्हाला तुमचे गुण - दोष own करता यायला हवेत. त्यासाठी इतर संस्कृतींना घालून पाडून बोलायची गरज नाही. इतरांना कमी लेखल्याशिवाय स्वतः विषयी कृतकृत्य वाटत नसेल तर काही तरी गंभीरपणे चुकत असते. हे असे न करता काही स्वतंत्र खणखणीत मुद्दे मांडता आले तर ती तुमची खरी ताकद! ती तुमची ओळख! आपोआपच तीच तुमची संस्कृतीही !
हिंदू वाचलं आहे आणि ते आवडलं.
हिंदू वाचलं आहे आणि ते आवडलं. आता ते म्हणतात आणखी दोन भाग लिहिणार. बघू. भूतकाळ महत्त्वाचा म्हणतात म्हणजे पुढच्या भागात काही नवीन नसून उजळणी असेल. काय होतं की समाजासमोर आव्हानंच ठेवली नाहीत तर सुधारणा करणारे पुढे येत नाहीत. आहे तेच चांगलं आहे, बरोबर आहे, त्यात बदल नको म्हटलं आणि पाणी ओतून सडवलं तर काय होणार?
अमितव,
अमितव,
>> राइट विंग <<
लेफ्ट विंग आणि राइट विंग या आर्थिक दृष्टिकोनातून किंवा हुजूर मजूर पक्ष संसदेत कुठे बसतात त्यावरून आलेले टर्म्स आहेत असा माझा समज आहे. पण तुम्हाला अगदी हिंदुत्ववादी हा शब्द देखील स्पष्ट उच्चारायची धास्ती असावी असे कुठेतरी मला जाणवले. ताकाला जाऊन भांडे लपवणे म्हणत नाही पण मी हे अनेकांना करताना पाहतो. एखाद्या गोष्टीचा सुस्पष्ट उच्चार करायचे नाही. त्याला राइट विंग म्हणायचे. कदाचित झुंड अंगावर येऊ नये ही इच्छा देखील त्यामागे असावी. कदाचित आपलेही नाजूक हितसंबंध दुखावू नयेत (आता अमेरिकन मराठी NRI म्हंटल्यावर एक सॅम्पल सेट लगेच डोळ्यासमोर येतो) याची एक किंचित काळजी त्यामागे दिसते. अर्थात यातले काहीही नसू शकतेच. पण मला हे असे वाटले.
>> भाषण <<
हो मी हे भाषण पूर्ण ऐकले आहे.
मला तुम्ही आता शिव्या द्याल, मला नेमाडपंथी म्हणून माझी हेटाळणी कराल पण मला काही फरक पडत नाही.
मी हिंदू वाचली ती आल्या आल्या लगेच. त्याला आता पंधरासोळा वर्षे होऊन गेली. या भाषणाचे वृत्तांकन वाचून तथाकथित पुरोगामी मंडळींनी नेमाडेंवर टीकेची झोड उठवली. साहजिकच ही दांभिक मंडळी शिव्या घालत आहेत म्हंटल्यावर त्यात काहीतरी आहे याची जाणीव झाली. मी भाषण ऐकले तेव्हा मला काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागल्या. नेमाडे असेच आहेत. ते असेच बोलत असतात. त्यांच्या बोलण्यातला उपरोध असा बेमालूमपणे मिसळत असतो की ते आपली चेष्टा करत आहेत का खरोखर त्यांना तेच वाटत आहे हे कळणे अवघड होते. या भाषणात त्यांनी विझिबली हिंदुत्वखोरांना सुनावले देखील आहे. गंमत म्हणजे त्यांना तुमचा शत्रू मुस्लिम नसून तुम्ही स्वतःच आहात हे देखील सांगिले आहे. परंतु नुसत्या पाच सात मिनिटांच्या भाषणाने आणि चार पुरोगाम्यांच्या विव्हळसमीक्षेने मी लगेच माझे आकलन सांधणार नाही.
म्हणून मी हिंदूचा पहिला अध्याय पुन्हा वाचला. आणि मी पुन्हा एकदा थक्क झालो.
याभोवती एवढी घुसळण होणार आहे हे या म्हाताऱ्याला २०१० मध्ये आधीच पक्के ठाऊक होते. हिंदुत्वखोरांचे सरकार डोक्यावर बसणार आहे हे देखील मर्मज्ञपणे जाणवले असावे. पहिल्या अध्यायात देखील आहे की सगळेच. रिक्लेमिंग आहे. रिनाउंसिंग आहे. आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृती किंवा उर्वरित भारतावर थोपवलेल्या ब्राह्मणशाहिला, वैदिकशाहीला प्रचंडप्रमाणात क्रिएटिवली उध्वस्त करणे देखील आहे. यातले फरशारामचे बोलणे वाचावे. त्यात आताचे व्हॉट्सअप फॉरवर्ड करणारे हिंदुत्वखोर थेरडे अगदी स्पष्ट दिसतात जणू हे वायरल वगैरे होण्यापूर्वीचे एखादे प्राकफॉरवर्ड असावे असेच बोलणे आहे. (आताचे ब्राह्मण परशुरामाचे जे भयंकर आयकॉनिकरण करतात (स्वकियांचाच नाश करणारा तो, त्याने कुठल्या परदेशी आक्रमकांना संपवले नाही) ते व्यापक प्रमाणांत सुरू होण्याआधीच त्यांनी त्याला सुरुंग लावले आहेत)
नेमाडेंचा देशीवाद संकुचित आणि मागास म्हणून निकालात काढणे सोपे आहे. फारच सोपे आहे. पण तो केवळ अस्मितेकरिता अस्मिता आणि द्वेषातून आलेला नाही. इंग्रजांनी भारतात केवळ स्वातंत्र्यचीच गळचेपी केली असे नाही. नेमाडेंनी एके ठिकाणी ते इथे सपाट करत असलेली जंगले, झाडे, प्राणी यांची मोजदाद पण दिली आहे. मोजून ऐंशी वर्षापूर्वी गॅस चेंबर मधे हजारो माणसांना क्रूरपणे मारणारे युरोपियन, जपान वर अणुबॉम्ब टाकणारे अमेरिकन आणि भारत पाकिस्तानात काही दिवसांत एक सीमा आखून पुन्हा कोट्यवधी लोकांना संपवणारे साम्राज्यवादी इंग्रज. आता काय तुम्ही तिकडे राहता म्हणजे लगेच इतक्या सहजासहजी ही प्रचंड मोठी हानी, त्यांच्या हावरटपणाचे प्रताप, त्यांची शोषणाची वृत्ती, ती झाकून त्यावर तत्त्वज्ञानाची पखरण करण्याचा कुटिलपणा इत्यादी गोष्टी सहजपणे बाजूला करून चला आपण आता नेमाडेंच्या संकुचितपणाची आपल्याला लकिली मिळालेल्या लिबरल लिबर्टेरियन दृष्टिकोनातून चिरफाड करू, असे नसते ना हो होत. हो, म्हणा की त्याला ग्रम्पी ओल्ड बास्टर्ड. कारण आहेच तो ग्रम्पी. आणि ओल्ड (वयाने नव्हे, शतकांच्या चिवट धारणांनी). संस्कृतीचे लेयर्स च्या लेयर्स ओलांडत, तुळजाभवानीच्या बिछान्याखाली जसे झिरपलेले तेलअत्तर असते, तसे परकोलेट होत आलेला तो एक नैसर्गिक ग्रम्पीनेस आहे.
>> खूप इनसेक्युअर असलं की माणूस जाहिरात करतो << नेमाडे उलट अशा इन्सिक्युरिटीजला आणि त्यातून येणाऱ्या न्यूनगंडाला सुरुंग लावत असतात.
>> वंशवर्चस्ववाद हे एकदम दुर्बळ संस्कृतीचे लक्षण आहे << सॉरी, पण जगाने तुम्हाला दारे खुली करून दिली त्याला जगाचे उदार विशाल मायाळू लिबरल अंत:करण कारणीभूत नसून भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये तुमचे रिसोर्स असणे त्या त्या वेळेस आवश्यक होते हे कारणीभूत आहे. आता जेव्हा ऑटोमेशन, AI, तंत्रसमृद्धी येण्याची चिन्हे दिसू लागली की लगेच टॅरिफ युद्धे सुरू झाली, तीच उदार विशाल मायाळू लिबरल अंत:करणाची सरकारे तुमचे विजा रद्द करू लागली, तुमच्या घरांवर छापे टाकू लागली. आता खेळ फक्त संख्याबळाचा आहे. 'त्यांचे' संख्याबळ कमी पडते म्हणून ते गप्प बसतात. शतकानुशतके जाणीवपूर्वक पोसलेल्या या वंशवर्चस्ववादी अस्मिता अशा चारपाच दशकांच्या वैचारिक आणि आर्थिक घुसळणीने निघून जात नसतात. इटलीतील म्हातारी पण असेच बोंबलत असते जशी जपान मधली पण.
गंमत म्हणजे अगदी परवाच इथेच कुणीतरी आसमा खान ने ट्रेवर नोवा ला दिलेल्या मुलाखतीचे कौतुक करत होते. तिथे मात्र आपल्याला याच गोष्टी दिसत नाहीत याचे महादाश्चर्य वाटले. किंवा academic भाषा आणि संज्ञा वापरून कुणीतरी ग्लोबल साउथचे महत्त्व वगैरे उच्चरवाने पटवून दिले आपल्याला त्या खालची अस्मिता दिसत नाही का? अल जजीरा पण हेच करत असते की.
>> तुम्हाला तुमचे गुण - दोष own करता यायला हवेत, जयतु जयतु हिंदूराष्ट्रम्<<
वर्तमानकाळ फार वाईट आहे असे नेमाडे आधीच स्पष्ट सांगतात की. पुढे जाऊन सांगतात की अफगाण पासून कंबोडियापर्यंत हे सगळे लोक आपलेच आहेत असे समजून चालावे. यांच्यात कशाला शत्रुत्व वगैरे पाहिजे? ते असे म्हणत नाही की पुन्हा त्यांचे हिंदुकरण (कन्वर्जन) करून एक विशाल हिंदुराष्ट्र निर्माण करा. ते म्हणत आहेत त्यांना हिंदूच म्हणा. आणि आपले माना आणि स्वीकारा. विशाल आक्रमक हिंदुराष्ट्र किंवा हा सबंध भूभाग निर्मुस्लिम करून अखंड भारत करावा या कोणत्यातरी अशक्य दिवास्वनात रमून एकमेकांना मूर्ख फॉरवर्ड पाठवणाऱ्या थेरड्यांना तिथेच त्यांच्या तोंडावरच अगदी स्पष्टपणे सांगतोय की हा म्हातारा.. मला कळले नाही यात काय चुकीचे आहे. ही भूमिका त्यांनी आधीपासूनच सगळीकडे मांडली आहे.
हिंदुत्ववादी हा शब्द मी
हिंदुत्ववादी हा शब्द मी अनेकदा वापरतोच. इथे तो का नाही त्यामागचे आकलन चुकीचे आहे. इथे तो शब्द नाही इतकेच.
हिंदू किती उत्तम कादंबरी आहे किंवा नाही हा मुद्दा नसून त्यांनी केलेले भाषण मला तिटकारा येईल इतके आवडले नाही इतकेच सांगायचे आहे. भूतकाळ पहा, गणपतीला सर्जरी केली, १७ व्या शतकात इंग्रज पोरी विकायचे.... आपण अजूनही बायका पोरी विकतो. भोंदू बाबा लोकांचा भरणा आहे आपल्याकडे आणि इतर बरेच. त्यातून बाहेर पडायला भूतकाळ पहा , आणि म्हणजे काय पहा? तर गार्गी मैत्रेयी! स्त्रिया बंधनमुक्तच की!
असो. इतर पुस्तकांबद्दल बोलू.
पर्सिस्टंटचा मंच, गळ्यात भगवे
पर्सिस्टंटचा मंच, गळ्यात भगवे उपरणेधारी लोक मंचावर.. वयही झालेय. उगाच कशाला समोरासमोर भिडणार?
एक करेक्शन >> गणपतीला सर्जरी
एक करेक्शन >> गणपतीला सर्जरी केली << असे काही अजिबातच नाही त्यात. हे तुमच्या तोंडचे त्यांच्या तोंडी घालू नका.
तसेही आद्य मेडिकली डॉक्युमेंटेड प्लास्टिक सर्जरी भारतातच केली गेली आहे (डॉक्युमेंटेड) : नाकाची (गालावरची आणि नंतर कपाळावरची त्वचा काढून) हे असे संदर्भ त्या मागे आहेत. सुश्रुत, नीट कन्फर्म करून सांगतो.
भूतकाळ पाहा याचा अर्थ पुन्हा फंडामेंटल्स कडे जावा असा आहे.
एक उदाहरण देतो कारण आता तो प्रश्न ऐरणीवर आला आहे म्हणून : एखाद्या गोष्टीला आत्मभाव आहे म्हणजे काय आहे? भारतीय जे एक्सिस्टेंशियल प्रश्न विचारत होते ते आता AI विरुद्ध उभे राहताना पुन्हा तपासावे लागणार आहेत. मे बी चरकांनी सांगितलेले मनाच्या कंप्युटेशन चे गुण (अटॉमिसिटी (अणुत्व ) , आयसोलेशन (एकत्व)) इत्यादी आणि पुढे एखाद्याला स्व ची जाणीव आहे त्यासाठी सांगितलेली लक्षणे आणि त्याच्यावर केलेला अत्यंत मूलगामी विचार आता समजून घेणे क्रमप्राप्त आहे.
बाकी काय कुणाचे व्हॉट्सअप फॉरवर्ड करायचे कुणाचे नाही हे धंदे सगळेच करतात. पुरोगामी म्हणवून घेणारे देखील अगदी आनंदाने करतात. किंबहूना सोयीस्कर अर्थ काढणे यात त्यांचा हातखंडाच आहे.
मीच आस्मा खान आणि ट्रेवर
मीच आस्मा खान आणि ट्रेवर नोवाच्या मुलाखतीचे कौतुक केले होते. ती मुलाखत आवडली होती. हे भाषण आवडलं नाही आणि मी ते "हिंदू" शी जोडलं नाही. गरज वाटली नाही. पण मी तुमची पोस्ट नीट वाचली रॉय. किती वेळा "अस्मिता" शब्द लिहिलाय !
उचकी लागली. ही पोच द्यायला आले फक्त. चर्चा पुरे करते.
रॉय, तुम्ही म्हणताय तो अर्थ
रॉय, तुम्ही म्हणताय तो अर्थ तिथल्या भगवा उपरणाधार्यांना कळला असेल तर आनंद आहे.
सतीश तांबेंनी पण तुम्ही म्हणताय त्याच अर्थाचं लिहिलंय. पण त्यांनी लिहिलेलं पटकन कळलं
मला तरी तो अर्थ पटत नाही. उलट नेमाडेंसारख्यांना बोलावून असल्या संस्था व्हॅलिडेशन करून घेतात , मागे संघाने प्रणव मुखर्जींना बोलावले होते, तसं.
सुश्रुत , भास्कराचार्य, आर्यभट इ. सगळे माहीत आहेत. ते नाकारायचा प्रश्न नाही.
पण त्या सप्तर्षींत एक भारद्वाज आहेत ज्यांनी म्हणे विमानशास्त्र आणलं. याचं फॅक्ट चेक झालं आहे.
शिवाय मी इंग्रजी शिकवतो, ( म्हणून माझे म्हणणे बरोबर ) असले दाखले दिलेत त्यांनी.
फेसबुकवर साहित्यिक सर्कल आहे.
फेसबुकवर साहित्यिक सर्कल आहे. तिथे कायम नेमाडे - नेमाडेतर, साठोत्तरी, नव्वदोत्तरी असे वाद चालतात. ते मराठी भाषा शिकवणार्यांचं, लिहीणार्यांचं टोळकं आहे. इतिहास हा विषय कथा कादंबर्यांतून शिकणारी मंडळी फेसबुकचा एक लेख लिहीण्यासाठी सर्वांना कशी आवतणं धाडतात, सिगरेटी, दारू पीत इनपुटस घेऊन लेख लिहीतात हे पाहिलेले आहे. साहित्यिक चमकोगिरीमधे इतिहासाचं रोमँटिसिजम का आणतात ही मंडळी कळत नाही.
या सर्वांमधे नेमाडेंचा इतिहासाचा अभ्यास वरचा असावा असे वाटते, पण सरंजामी मानसिकता लपत नाही. याउलट इतिहास शिकवणारे किती तरी नम्र आहेत. लेणी, पुरातत्वखात्याच्या साईटस, इतिहासाची साधने त्या त्या जागी जाऊन इतिहासाची निरीक्षणे नोंदवणारे या वादात नसतात.
इतिहास हा विषय कथा कादंबर्
इतिहास हा विषय कथा कादंबर्यांतून शिकणारी मंडळी फेसबुकचा एक लेख लिहीण्यासाठी सर्वांना कशी आवतणं धाडतात, सिगरेटी, दारू पीत इनपुटस घेऊन लेख लिहीतात हे पाहिलेले आहे.>>> एकदम चपखल!
>> उलट नेमाडेंसारख्यांना
>> उलट नेमाडेंसारख्यांना बोलावून असल्या संस्था व्हॅलिडेशन करून घेतात , मागे संघाने प्रणव मुखर्जींना बोलावले होते, तसं. <<
मला हे असं सगळ्यांना आणि पुढच्या पार्टीला विशेषत: वाळीत टाकणं आवडत नाही. दोन्हीकडून संवादाची दारं उघडी ठेवली नाहीत तर मग काय कशालाच अर्थ नाही. नेमाडे यांनी त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन गोधरा मुळे तुम्ही हिंदुत्वाचा अर्थ आवाका खूप निगेटिव आणि संकुचित करून टाकलात असं जाऊन सांगणं मला धाडसाचंच वाटतं.
>> शिवाय मी इंग्रजी शिकवतो, ( म्हणून माझे म्हणणे बरोबर ) असले दाखले दिलेत त्यांनी. <<
असला आगावपणा नेमाडे मुद्दाम करतात असे माझे निरीक्षण आहे. ते त्यांच्या प्रकृतीतच आहे. सतीश तांबे म्हणतात ते बरोबर आहे, या बाबतीत ते पवार आणि ठाकरे यांचे कॉकटेल म्हणावेत असे बेरकी आहेत. बेनं / बेणं !!
एखाद्या कलाकृतीने नावाजलेला
एखाद्या कलाकृतीने नावाजलेला लेखक मग शिळेच बटाटेवडे पुन्हा तळू लागला तर? गुड अर्थ लिहिणाऱ्या पर्ल बक लेखिकेने आणखी दोन पुस्तकं लिहिली ती पटली नाहीत.
The Pinocchio Brief (Abi
The Pinocchio Brief (Abi Silver)
एका शाळाशिक्षकाचा खून होतो. एका विद्यार्थ्याला अटक होते. तो विद्यार्थी अभ्यासात हुशार असतो. त्या शिक्षकाचा लाडका असतो. पण प्रथमदर्शनी पुरावे सगळे त्याच्या विरुद्ध असतात.
एक तरुण वकील मुलगी, तिला या केसमध्ये रस निर्माण होतो. तिचं वकिली मन म्हणतं की तो मुलगा निर्दोष आहे. ती एका निवृत्त वकील बाईला ही केस लढवण्याची गळ घालते. ती बाई तयार होते.
त्या दोघी केसशी संबंधित लोकांशी बोलतात. शाळा परिसराची माहिती घेतात. त्यातून खटला उभा राहतो.
तो कोर्टरूम ड्रामा म्हणजे ही कादंबरी.
यात Pinocchio हा एक फिक्शन-फँटसी अॅन्गल आहे. Pinocchio हे एक सॉफ्टवेअर असतं. आरोपीची साक्ष सुरू असताना आरोपीच्या चेहर्यावर त्याचा कॅमेरा रोखलेला असतो. आरोपी प्रश्नांची उत्तरं खोटी सांगतोय की खरी, हे त्याच्या चेहर्यावरचे बारीकसारीक, सूक्ष्म बदल टिपून सांगणं, हे त्या सॉफ्टवेअरचं काम. आधी काही वर्षं सॉफ्टवेअरचं टेस्टिंग झालेलं असतं. त्यातून सरकारने ते प्रत्यक्ष खटल्यांमध्ये वापरायला परवानगी दिलेली असते. ज्येष्ठ वकील बाईला ते मंजूर नसतं, कारण त्या सॉफ्टवेअर निर्मितीच्या काळातल्या काही गोष्टी तिला माहिती असतात. पण ती त्याचा वापर पूर्ण रोखू शकत नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर खटल्यातले सवाल-जवाब, युक्तीवाद, शह-प्रतिशह, कुरघोडी - हे सगळं मस्त लिहिलं आहे. वाचायला मजा येते.
आरोपी मुलाची हुशारी कुठे कुठे काम करते, ते जबरी वापरलंय. एकदम डोकेबाज पात्र (आणि डोकेबाज लेखिका). तो सगळा भागही थ्रिलिंग आणि एन्गेजिंग आहे.
लेखिका ब्रिटिश आहे. कथानक ब्रिटिश वातावरणातलं आहे. ते वातावरण मस्त उभं केलंय. काही काही शब्दयोजनाही टिपिकल ब्रिटिश आहेत.
कादंबरीचा आकार मात्र जरा पसरट आहे. त्यामुळे कुठे कुठे ड्रॅग होते.
पण तरी टाइमपास वाचन म्हणून एकदा वाचण्यासारखी नक्की आहे. Whodunnit पेक्षा खटल्याचा प्रवास गुन्हेगारापर्यंत कसा पोचतो, त्यावर अधिक फोकस आहे.
https://www.aisiakshare.com
,,,
दहा मिनिटांत वाचून होणारं
दहा मिनिटांत वाचून होणारं पुस्तक? की जे वाचता येतं, अशा कशाहीबद्दल या धाग्यावर लिहायचं असं काही आहे? आधी इंटरनेटवर मिळणार्या कथांबद्दल लिहून झालंच आहे.
शिक्षणक्षेत्राबद्दल वेगळा धागा आहे की.
भरत
भरत
तुम्हाला पटत नसेल तर उडवून लावतो.
केकू, तुम्ही इंटरनेट वर
केकू, आवडत असेल तर तुम्ही इंटरनेट वर असलेले लेख, कथा किंवा माहिती यांच्या लिंक शेअर करणारा धागा काढून तेथे देऊ शकता. किंवा तसा धागा आधीच असेल तर तेथेही. कारण अशा माध्यमांतही भरपूर वाचण्यासारखे असते. सगळे कॉंन्टेटच आहे शेवटी. आपापल्या इंटरेस्ट प्रमाणे लोक लिंक देतील / वाचतील.
फार जुनं पुस्तक लॉर्ड ऑफ द
फार जुनं पुस्तक लॉर्ड ऑफ द फ्लाईज चा मराठी अनुवाद जी.ए.नी केलेला वाचलं. थोडं काल्पनिक कथानक टाकून माणसाच्या , समाजाच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्यासाठी लिहिलं आहे. बेटावर अडकून पडलेली आणि हरवलेली बारावर्षाखालील मुलं कशी वागतात हे कथानक. पण ते फार कृत्रिम आणि न पटणारं वाटलं. ( विकीपान सांगतं की लेखक विल्यम गोल्डिंगच्या या पुस्तकाला बरेच प्रकाशक नाकारत होते.) विज्ञानाचा आधार घेतला तर काही गोष्टी खटकतात. मुलं फळं खाऊन जगत होती किंवा एक दोनदा त्यांनी शिकारही केली. शेकोटीसाठी आग पेटवण्यासाठी एका मुलाच्या चष्म्याच्या भिंगाचा उपयोग केला. सूर्यकिरण भिंगाने गवतावर पाडून गवत पेटवलं.( मुलांची दृष्टी ऱ्हस्व असते आणि त्यासाठी आंतर्गोल भिंगे चष्म्यात वापरतात. त्याने किरण एकत्र कसे येणार?)
समाजातील प्रवृत्तींवर जागृती आणायची तर ओरवेलचं ॲनमल फार्म/em> सर्वात वरती आहे. किंवा चार्ली चापलीनचा ' द ग्रेट डिक्टेटर' सिनेमा आहे.
Pages