मी वाचलेले पुस्तक -४

Submitted by भरत. on 9 April, 2026 - 01:44

आधीच्या मी वाचलेले पुस्तक -३ या धाग्यावर २००० हून अधिक प्रतिसाद झाल्याने , नवा धागा काढला आहे.

आनंदाने वाचत राहू. काय वाचलं त्यावर काथ्याकूट करत राहू.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डी डी कोसंबी यांच्या बद्दल भसिन यांनी करून दिलेली ओळख वाचली. त्यानंतर त्यांची माहिती शोधली. थक्क करणारं व्यक्तीमत्व आहे. कोसंबी बनण्याआधी ते शेनवी / शेणॉयस/ शेणाय होते. ( शेनवी हा उच्चार या आडनावाच्या मित्राकडून ऐकलेला आहे). शेणवी लोटलीकर असे आडनाव आहे. सारस्वत ब्राह्मण होते.
केंब्रीज विद्यापीठात ते प्रोफेसर होते. फर्गसन मधे गणित शिकवत होते. फिजिक्स आणि गणितावर त्यांचे निबंध, पुस्तके आहेत. त्यानंतर जेनेटिक्स हा विषय त्यांनी घेतला. इतिहासावर पुस्तके आहेत. त्या त्या काळातल्या साधनांचा वापर करून त्यांनी लिहीलेले तर्क काळाच्या पुढचे आहेत. सध्या वाचत असलेले हातातले पुस्तक पण असेच थक्क करते. अर्थात या थिअरीज वर नंतर बरंच काही झालं आहे. आता पुन्हा या थिअरीज बरोबर होत्या असंही लेटेस्ट डीएनए संशोधन झालेलं आहे. कोसंबी यांच्याबद्दल भरभरून लिखाण असायला हवं होतं. दिसत नाही.

१. समझावन - संग्राम गायकवाड, संप्रति१ नी सांगितलं होतं ते वाचनालयात होतं. परवा मिळालं. आणि वाचलं. लेखक संशोधक आहे आणि त्याने त्याच्या पद्धतीनं हिदू-मुस्लीम ऐक्य, दखनी भाषा, सोशल मिडियावरच्या चर्चा, हिंदू कुटुंबात दत्तक गेलेलं मूल मुस्लीम असणं, त्याने खऱ्या आईचा घेतलेला शोध
याचा एक काला करून ही कादंबरी लिहिली आहे. पात्रं स्वत: बोलतात असा लेखन प्रकार निवडून लेखकाने अलिप्त राहून निवाडा करण्यांचं टाळलं आहे. अशा विषयांत हा प्रयोग एकदम पटला मला.
२. Elon Musk याचं चरित्र शोधल्यास एक Ashlee Vans याचं दिसतं. पण Walter Isaacson ( स्टीव जॉब्सचं लिहिणारा लेखक) याने २०२३ पर्यंतच्या घटना अभ्यासून लिहिलेलं हवं होतं ते मिळालं. ते वाचलं. संबंधित सर्व लोकांशी मुलाखती घेऊन चरित्र लिहिल्याने वाचायला आवडतं. खूप चांगलं आहे .

मनसमझावन आलं.
लेखक संग्राम गायकवाड भारतीय राजस्व सेवेत अधिकारी आहेत. केजरीवाल सुद्धा यातच होते ना?
अर्पणपत्रिका - मध्य युगीन भारतातील प्रमुख संपर्कभाषा असणार्‍या दखनीस

चाळून पाहिलं. इन्शा अल्लाची आठवण आली.

पाडस वाचले

फार वर्षांनी पुस्तक / कादंबरी वाचून झाली.
माबोकर कुलुची कृपा
त्याने पाठवले हे पुस्तक.

आवडले.
अनेक वर्णनं तपशीलवार आहेत.
अर्थात हे अनुवादित आहे.
खुळखुळ्या साप आणि थोट्या अस्वलाचे सगळी उल्लेख असलेली प्रकरणं विशेष आवडली.
तरल मनोविश्वाचे शब्दांकन चांगले आहे.
अमेरिकेतही तेव्हा शेतकरी उपाशी राहू शकेल अशी स्थिती होती हे वाचून थोडेसे आश्चर्य वाटले.
गरिबी, जंगल, रोजचा संघर्ष, वन्यप्राणी हल्ले हे सर्व वाचताना मजाही आली आणि थरारही वाटला.
प्रचंड पाऊस पडून आलेला महापूर आणि नंतरच्या चिंता / काळजी हे ही एकदम भिडणारे.
निसर्गाच्या सोबत असणारे / अंदाज लावणारे, त्यातून शकणारे पेनी सारखे शेतकरी लोकं.
ही वेगळी अमेरिका आणि वेगळी दुनिया.

>> लेखक संग्राम गायकवाड भारतीय राजस्व सेवेत अधिकारी आहेत. <<

म्हणून या सुमार कादंबरीचे उगाच कौतुक केले गेले आहे. एक किस्सा आहे तो प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतो.

>>भारतीय राजस्व सेवेत अधिकारी>>
सरकारी नोकरीत असल्यावर धंधा, व्यवसाय करायला बंदी असते या नियमाचा मारुती चितमपल्ली यांनाही दणका बसलेला. पुस्तक लिहून प्रकाशित केले म्हणून मेमो मिळत गेले. एकदा एशियाटिक वाचनालयात यावर सहजच दुर्गा भागवतांशी बोलणे झाले तेव्हा दुर्गाबाई म्हणाल्या " बघते मी." आणि दोनच दिवसांनी मंत्र्यांचा फोन आला की लिहा तुम्ही आणि सगळी चक्रे फिरली.
असो.

Andy Weir चे The Martian वाचले. खूपच छान आहे. ( धन्यवाद @रानभूली, @टवणेसर)
लेखन प्रकार : वैज्ञानिक कादंबरी.(2011,2014)
विषय : मंगळावर स्वारी आणि तिथली माहिती गोळा करण्याची मोहिम.
पृथ्वीवरच्या लोकांना काही कारणांमुळे इतर कोणत्यातरी ग्रहावर जाऊन राहावे लागेल असे काही जण म्हणत आहेत. ( उदाहरणार्थ इलान मस्क याचा एक पुरस्कर्ता आहे.) तर नासाची सहा शास्त्रज्ञांची एक चमू मंगळावर माहिती गोळा करण्यासाठी गेली पण मोठ्या एका वादळामुळे घाईघाईने तिथून परतताना एक वनस्पती शास्त्रज्ञ( Mark Watney ) दूर कुठेतरी उडाल्याने सापडत नाही आणि पाच जण यानातून निघून जातात. हा खाली राहिलेला वाचतो , पण तिथे काही महिने कसा राहतो आणि शेवटी त्याच्या आणि उरलेल्या पाच जणांच्या, नासा आणि चिनी शास्त्रज्ञांच्या प्रयत्नाने कसे पृथ्वीवर परततात याची गोष्ट खूपच उत्सुकता वाढवणारी आणि एकूण मंगळावर { किंवा दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर )राहाणे किती कष्टाचे आणि अडचणींचे आहे हे कळते. काही काळ तो प्रयोग करतो, बटाटे वाढवतोही. तेच त्याला अन्न म्हणून उपयोगी पडतात.
(सातवी आठवीतल्या मुलांना space travel वाचायला आवडतं पण ते अमेरिकन लोक सतत f*** , d*** शब्द बोलतात ते वाचणे नकोसे होते.)यावर एक सिनेमाही आला होता म्हणतात. पण पुस्तकाएवढी माहिती त्यात येणार नाही.
विकी माहिती पान लिंक : https://en.wikipedia.org/wiki/The_Martian_(Weir_novel)
[ Archive book link : https://ia803109.us.archive.org/10/items/TheMartian_201808/The%20Martian... ]
या Archive च्या प्रतिमधून f word काढलेले आहेत. त्याऐवजी screwed शब्द वापरला आहे.

हॅलो ऑल,

मला माझ्याकडची काही पुस्तकं कमी करायची आहेत. जमवलेली होती मागच्या काही वर्षांत, परंतु आता जागेअभावी काही पुस्तकांना निरोप द्यावा लागतो आहे. लायब्ररीला वगैरे डोनेट करावंसं वाटत नाही, तिकडे ती वर्षानुवर्षे मानवी स्पर्श न होता पडून राहणार.
दुसरा ऑप्शन म्हणजे जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यास देऊन टाकणे. परंतु तिथंही ती कुणी ना कुणी, कधी ना कधी फूटपाथवरून आपल्याला उचलून घेईल या आशेने अश्रू ढाळत पडून राहतील. मी त्यांच्यावर केलेल्या ह्या अन्यायाची कहाणी स्वतःलाच सांगत राहतील. न जाणो कधीपर्यंत.

तर या पुस्तकांमध्ये इंटरेस्टेड असल्यास विपु मधून किंवा संपर्कामधून कळवावे. मी पुण्यात वाकडेवाडी/शिवाजीनगर वगैरे परिसरात असतो. ह्या एरियामध्ये आल्यास देणे सोईचे पडेल.'विनामूल्य'च द्यायची आहेत. कळवावे. धन्यवाद. Happy

१. मराठी :

  • रण, दुर्ग - मिलिंद बोकील
  • महेश्वर, नेचर पार्क - मिलिंद बोकील
  • साहित्य, भाषा आणि समाज - मिलिंद बोकील
  • एकम् - मिलिंद बोकील
  • जनाचे अनुभव पुसता - मिलिंद बोकील
  • विस्मरणापल्याड - सतीश काळसेकर स्मृतिग्रंथ
  • अन्वय - नरहर कुरुंदकर
  • वाटा: माझ्या- तुझ्या - नरहर कुरुंदकर
  • वाटसरू - यशवंत भागवत
  • मिडनाईट मॅटिनी - अमोल उदगीरकर
  • एक लेखक खर्च झाला - राजन खान
  • गालिबचे उर्दू काव्यविश्व (अर्थ आणि भाष्य)- डॉ. अक्षयकुमार काळे
  • विवेक मोहन राजापुरे यांच्या कथा - कथासंग्रह (लोक वाड्मय)
  • पिवळा पिवळा पाचोळा - अनिल साबळे
  • डेथबेडवरून क्लायमॅक्स - सतीश तांबे
  • दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी- बालाजी सुतार
  • ५९६० आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा - इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर
  • गौतमची गोष्ट- अनिल दामले
  • देशीवादाचे दुश्मन - रा रा अशोक बाबर
  • मुक्तिपत्रे - डॉ. आनंद नाडकर्णी
  • वंश - वि ज बोरकर
  • रूळानुबंध - गणेश मनोहर कुलकर्णी
  • वेरविखेर - वर्जेश सोळंकी
  • पेरूमल मुरूगन - वर्जेश सोळंकी
  • हुसेनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका- वर्जेश सोळंकी
  • दीडदमडीना - वर्जेश सोळंकी
  • अजुनी या शहरात - मेघना भुस्कुटे
  • भरून आलेलं आकाश - द भा धामणस्कर
  • देखणी - भालचंद्र नेमाडे
  • सोळा भाषणे - भालचंद्र नेमाडे
  • निवडक मुलाखती - भालचंद्र नेमाडे
  • जरीला - भालचंद्र नेमाडे
  • बुद्धलीला - धर्मानंद कोसंबी
  • लिहित्या लेखकाचं वाचन - विलास सारंग
  • एक दोन चार अ- राकेश वानखेडे
  • पुरोगामी - राकेश वानखेडे
  • करुणापटो - मृद्गंधा दीक्षित
  • बोलिले जे - महेश एलकुंचवार
  • पश्चिमप्रभा - महेश एलकुंचवार
  • आमदार निवास- पुरूषोत्तम बोरकर
  • मनसमझावन- संग्राम गायकवाड
  • मोनोक्रोम - सचिन कुंडलकर
  • सात गोष्टींचं पुस्तक - प्रशान्त बागड
  • विवादे विषादे प्रमादे प्रवासे- प्रशान्त बागड
  • एका लेखकाचे तीन संदर्भ - अवधूत डोंगरे
  • अस्वस्थ वर्तमान- आनंद विनायक जातेगावकर
  • ब्लॉगच्या आरशापल्याड - मनस्विनी लता रवींद्र
  • हलते डुलते झुमके - मनस्विनी लता रवींद्र
  • नऊ चाळीसची लोकल - शिल्पा कांबळे
  • नवं जग, नवं साहित्य - विश्राम गुप्ते
  • जाईच्या घरी जाई - जी के ऐनापुरे
  • ओस निळा एकांत - जी के ऐनापुरे
  • नासमाया - जी के ऐनापुरे
  • रूद्राक्षी- मनोहर सप्रे
  • नरकातला स्वर्ग - संजय राऊत
  • अतीत कोण? मीच- प्रसाद कुमठेकर
  • वाचन प्रसंग - नीतिन वैद्य
  • प्रश्नांकित विशेष - रंगनाथ पठारे
  • लोकहितवादींची शतपत्रे - लोकहितवादी

२. अनुवादित:

  • आंधळ्या बाईचे वंशज- अनीस सलीम
  • आरण्यक - विभूतिभूषण बंदोपाध्याय
  • रीयुनियन - फ्रेड उल्मान
  • द ग्रेप्स ऑफ रॉथ- जॉन स्टाईनबॅक
  • खोटं सांगेन - उर्मिला देशपांडे
  • द नाईव्ह ॲंड द सेंटिमेंटल नॉव्हेलिस्ट- ओरहान पामुक
  • ताओ ते चिंग - लाओ त्सु (अनु. अवधूत डोंगरे)
  • हाउ फॅशिझम वर्क्स - जेसन स्टॅन्ली
  • एक होता गाझा - हंकन गुंदे
  • मेलेल्यांची गढी - दस्तयेवस्की
  • भूमिगताची टिपणे - दस्तयेवस्की
  • विनाशवेळा- हेन्री मिलर (अनु. एलकुंचवार)
  • इतिवृत्त - प्रियंवद
  • सोफीज् वर्ल्ड - जॉस्टीन गार्डर
  • रसेलचे निवडक लेख - संपा. भा ज कविमंडन
  • नाही लोकप्रिय तरीही - बर्ट्रांड रसेल
  • द पॉवर ऑफ नाऊ - एखार्ट टॉल
  • द प्रॅक्टिसिंग पॉवर ऑफ नाऊ - एखार्ट टॉल
  • अवनी एक नवी - एखार्ट टॉल
  • द रिमेन्स ऑफ द डे - काझुओ इशिगुरो
  • व्हेन वी वेअर ऑर्फन्स - काझुओ इशिगुरो
  • पिसूक - फ्रान्झ काफ्का (अनु. जयंत कुलकर्णी)

३. हिंदी :

  • नदी के द्वीप- अज्ञेय
  • चक्का जाम - गौतम चौबे
  • तर्पण, त्रिशूल - शिवमूर्ति
  • सिस्टर यू आर ग्रेट - गिरिराज किशोर
  • प्रतिनिधि रचनाएँ (भाग १, २, ३) - लिओ टॉलस्टॉय
  • माटी कहे कुम्हार से - हरिशंकर परसाई
  • निठल्ले की डायरी - हरिशंकर परसाई
  • न्यूनतम मैं - गीत चतुर्वेदी
  • आलाप में गिरह - गीत चतुर्वेदी
  • आछे दिन पाछे गए- काशीनाथ सिंह
  • एक तानाशाह की प्रेमकथा - ज्ञान चतुर्वेदी

४. इंग्रजी :

  • 1Q84 - Haruki Murakami
  • Kafka On The Shore - Haruki Murakami
  • Men Without Women - Haruki Murakami
  • Rest in Peace (Ravan & Eddie)- Kiran Nagarkar
  • The Testaments - Margaret Atwood
  • Bird by Bird - Anne Lamott
  • The Humans- Matt Haig
  • The Tibetan Book of Living & Dying - Sogyal Rinpoche

रणजित देसाईंची स्वामी कादंबरी आता वाचली. जर का इतिहास माहीत नसेल तर समजणे कठीण आहे कारण पात्रांची ओळख दिलेली नाही. ती द्यायला हवी सुरुवातीला. रावसाहेब,दादासाहेब, श्रीमंत, बापू,वहिनीसाहेब, नाना, तात्या म्हणजे कोण? इतर पुस्तकांत ( विशेषत: इंग्रजी) एका सूचीमध्ये कोणते नाव कोणकोणत्या पानांवर आले आहे तेही देतात. पेशव्यांची वंशावळही द्यायला हवी.
बाकी कादंबरी चांगली प्रवाही लिहिली आहे.
---------
महाभारतातील व्यक्तिरेखांवरची पुस्तके मला वाचायला आवडत नाहीत. महाभारत एक महानाट्य आहे, त्यातील व्यक्ती आपण समजतील तशा समजून घ्यायच्या.

images (38)_0.jpeg

सध्या हे वाचणे सुरू आहे प्रचंड जास्त धाराप्रवाही उत्तम लेखन अन् समजायला अतिशय सुलभ, जबरदस्त आवडलेले आहे.

"In a thrilling dramatic narrative, Pulitzer Prize-winning reporter Joby Warrick traces how the strain of militant Islam behind ISIS first arose in a remote Jordanian prison and spread with the unwitting aid of two American presidents. - इंटरेस्टिंग दिसतंय

@भरत

होय, अबू मुसब अल झरकावी कसा जॉर्डनच्या झर्का गावात घडला, त्याची पार्श्वभूमी, त्याची जडणघडण, त्याचे अल कायदा सोबत आलेले संबंध, नंतर त्यांच्याशी झालेले मतभेद, एकंदरीत मस्त दाखवला आहे प्रवास.

माइल्ड स्पॉइलर अलर्ट

सध्याच्या सीरियाचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी @ अहमद अल शरा हा मुळात अबू मुसब अल झरकावी ने सीरिया मध्ये पाठवलेला एक प्रतिनिधी होता, बशर अल असद विरुद्ध एक सुन्नी रेसिस्टन्स म्हणून पण त्याने अतिरेकी हिंसाचार करायला कचऱला म्हणून त्याचे कान उपटून त्याला लाईन वर आणायला मूळचा इराकचा पण एक धर्मगुरू असणारा कार्यकर्ता तिथे पाठवला गेला ज्याने रक्का शहरात जाऊन आपले अतिरेक सुरू केले आणि घोषणा केली खिलाफतीची

त्याचे नाव होते अबू बकर अल बगदादी.

२००१ पासून इजिप्त ते अफगाणि-पाकिस्तान या पट्ट्यात घडामोडी इतक्या वेगाने घडल्या की पुस्तके धडाधड ऑब्सोलिट होत आहेत. २०११ मध्ये जेसन बर्के चे ९/११ वॉर्स हे पुस्तक वाचले होते व वाटले हे कॉप्रिहेन्सिव आहे. मग आयसिस आले व त्यावरची पुस्तके येऊ लागली. हे पुस्तक २०१६ मध्ये वाचले होते. तेव्हा वाटत होते हा आयसिस भस्मासुर संपणारच नाही. अल कैदा पेक्षा वाईट. त्यानंतर ट्रम्प बाबा आले. मध्ये जाँग उन जोरात होते. रशियाने युक्रेनवर हल्ला केला. ट्रम्प गेला. अमेरिकेने सैन्य अफगाणिस्तानातून मागे घेतले. ट्रम्प पुन्हा आला. आता इराण युद्ध.

या पत्रकारांनी सुद्धा एक टेम्प्लेट केले होते. ज्या विषयावर पुस्तक आहे त्यावर पहिले प्रकरण. मग दुसर्‍यात इतिहासात मागे ५०-१०० वर्षे जायचे. मग असे एकाड एक प्रकरण सध्याचा काळ आणि जुना काळ असे करत साधारण शेवटाला दोन्ही काळ सांधायचे.

स्टॅनिस्लाव लेमचे "द इन्व्हिन्सिबल" ह्या पुस्तकाबद्दल जितकी मिळेल तितकी माहिती आणि रीव्युज वाचले.
स्टॅनिस्लास लेम बद्दल , त्याच्या "कृत्रिम जीवन" विषयावरील अनेक कथा आणि त्यातून होणारे त्याचे तात्विक विवेचन ह्या विषयी बरेच काही व्वाचल्यावर ह्या पुस्तका बद्दल उत्सुकता वाढली आणि मग जिथून मिळेल तिथून वाचत गेलो.
"द इन्व्हिन्सिबल" ची कथा थोडक्यात अशी, रेजीस III ह्या एक्झोप्लानेट वर संशोधनासाठी गेलेले "कंडोर " नावाचे यान नाहीसे झाले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी "द इन्व्हिन्सिबल" हे यान रेजीस III वर उतरते इथून ह्या कथेची सुरवात होते, "कंडोर " चा शोध घेता घेता अनेक चित्र विचित्र गोष्टी "द इन्व्हिन्सिबल" च्या शास्त्रज्ञांच्या समोर येतात.
"कंडोर" वर कोट्यावधी वर्षांपूर्वी एक यान उतरलेले असते. या यानातून आलेले बायालोजीकल जीव नष्ट होतात पण ह्याच यानावरील स्वयंचलित यंत्रे मात्र उत्क्रांत होत होत ह्याच ग्रहावरील मूळ लाईफ फार्म बरोबर संघर्ष करत करत अखेर विजयी होतात. आणि ग्रहावर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करतात.
यंत्रांच्या उत्क्रांती तून काय बदल होतात? एका तर त्यांचा आकार खूप कमी होतो. सगळ्यात म्हणजे यंत्रांची कार्य पद्धती बदलून स्वार्म बुद्धिमत्तेचा प्रयोग.
प्रत्येक माणूस अद्वितीय असतो आणि म्हणूनच तो अद्वितीयपणे मौल्यवान असतो. अर्थात, यापैकी काहीही त्या थव्याला लागू होत नाही, ज्याचे प्रत्येक सदस्य अक्षरशः एकमेकांसारखेच असतात, आणि त्यातील प्रत्येक लहान स्वयंचलित यंत्र सहजपणे बदलता येते व म्हणूनच ते टाकून देण्याजोगे असते. कथेमध्ये ह्या सूक्ष्म यंत्रमानवाना माश्या असे संबोधले आहे.
"माश्यांच्या" थव्याने अत्यंत शक्तिशाली विद्युतचुंबकीय क्षेत्रे निर्माण केली, याचा अर्थ असा की ते छोटे स्वयंचलित यंत्रमानव केवळ त्यांच्या ग्रहावरील उत्क्रांतीचे विजेतेच नाहीत, तर आक्रमण करणाऱ्या मानवांविरुद्ध एक शक्तिशाली शक्ती देखील आहेत.
प्रत्येक माणूस अद्वितीय असतो आणि म्हणूनच तो मौल्यवान असतो. अर्थात, यापैकी काहीही त्या थव्याला लागू होत नाही, ज्याचे प्रत्येक सदस्य अक्षरशः एकमेकांसारखेच असतात, आणि त्यातील प्रत्येक लहान स्वयंचलित यंत्र सहजपणे बदलता येते व म्हणूनच त्यांचा त्याग करणे सोपे असते,
"माश्यांच्या" थव्याने अत्यंत शक्तिशाली विद्युतचुंबकीय क्षेत्रे निर्माण केली, याचा अर्थ असा की ते छोटे स्वयंचलित यंत्रमानव केवळ त्यांच्या ग्रहावरील उत्क्रांतीचे विजेतेच नाहीत, तर आक्रमण करणाऱ्या मानवांविरुद्ध एक शक्तिशाली शक्ती देखील आहेत.
"द इन्व्हिन्सिबल" ही ह्या स्वयंचलित यंत्र आणि मानव ह्यांच्यातील संघर्षाची कहाणी आहे.
ह्या संघर्षात अखेर मानवाची हार होते आणि त्याना माघार घ्यावी लागते.
ह्या संघर्शातून लेमने आपले तत्वज्ञान प्रभावी पणे मांडले आहे.
हा संघर्ष केवळ वेगवेगळ्या जीवस्वरूपांमध्येच नाही, तर पृथ्वीवरील मानव आणि या विचित्र ग्रहावरील "माश्या" यांच्या भिन्न उत्क्रांती मार्गांमधून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या मूल्यांमध्येही आहे.
सबर्भ इंटरनेट वरून.

होय,

म्हणले तर ही पुस्तके पठडीबाज असतातच. पण एकंदरीतच क्विक रेडी रेक्नर म्हणून वाचायला हरकत नसावी. ह्या काळात रुक्मिणी कालिमांचीची ISIS वरची सिरीज प्रचंड हिट झाली होती पण नंतर कळले तिच्या रिपोर्टिंगची क्रेडिबिलिटी प्रश्नांकित होती असे काहीसे पण घडल्याचे अंधुक आठवते.

टवणे सरांनी पॅटर्न बद्दल लिहिलेलं वाचून मला तेल नावाचा इतिहास - बहुतेक हेच - कुबेर नक्की - आठवलं.
या माहितीचं मी काय करू असं म्हणून मी ते पुस्तक पुढे न वाचताच परत केलं होतं.

ट्विटर की फेसबुकवर FINKS या सी आय ए वरच्या पुस्तकाबद्दल कळलं. फार विचार न करता मागवलं. तर त्यात सी आय ने देशोदेशीच्या लेखकांना कसं वापरलं tricked ते दिलं आहे. जयप्रकाश नारायण यांच्यावर एक लेख आहे. त्याची सुरुवात त्यांच्या गेल्या जन्मा पासून केली नाही, हे उपकार.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माशीचा फोटो आहे, असं आताच लक्षात आलं.

टवणे सर
वर मी ऑडिओ लिंक दिली आहे. आधी ती एकदा ऐकून पहा,
तुम्ही लेमचा "सोलारीस" २००२ पिक्चर बघितला आहे का? असेल कुठेतरी ott वर. तोही बघण्या सारखा आहे.
The Invincible वर पिक्चर व्हायचा होता, पण बारगळला,
टेक्नोलोजी बघितली तर सुपर hit झाला असता.

काही वर्षांपूर्वी फिलीप के डिक ह्यांच्या निवडक कथांवर बेतलेली "Electric Dreams" नावाची एक मालिका tv वर आली होती.
काल परवा ओरिसा मध्ये एक मानवी जीवनाला काळीमा फासणारी रक घटना घडली. दुसऱ्या ठिकाणी ४०० अश्रू ढाळणारया माबो करांनी या घटनेला अजिबात महत्व दिले नाही.
Why so silective ? असे का झाले असावे? असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर त्याचे उत्तर कदाचित ह्या कथेत मिळेल.
The Hanging Stranger
https://americanliterature.com/author/philip-k-dick/short-story/the-hang...
आणि ह्या कथेची चित्रफीत
https://www.youtube.com/watch?v=HFWFKTUBa9E
येथे पहा.
मुल कथा आणि चित्रफीत मध्ये काही फरक आढळेल. त्याचे कारण असे आहे कि ह्या सेरीज मधील कथा काही प्रसिद्ध लेखकांनी पुनर्लिखित केलया आहेत.
ही कथा Dee Rees नावाच्या दिग्दर्शिकेने लिहिलेली आहे. त्या सेरीज मध्ये कथेचे नाव आहे. Kill All Others.
Dee Rees ला ही कथा का आवडली?
‘Going home—with their minds dead.’ ह्या एका वाक्याने.
In this story, the spectre is literal and physical—a hanging body from the square. But in principal, Philip K. Dick illustrates that in real life, the spectre can be much darker, much more insidious. It could be words, it could be an attitude, it could be an idea. And obliviousness is the real alien that destroys . . .‘Going home—with their minds dead.’
पहा तुम्हाला आवडते का.
dee rees ला ही कथा आवडली. तेव्हा ट्रंप च्या पहिल्या निवडनुकीची धूळवड चालू होती.
तिच्याच शब्दात ऐका
"I adapted this story into the screenplay for Kill All Others during the throes of the 2016 US presidential campaign. There was blind, chanting jingoism. Many dangerous ideas were declared, nurtured, and allowed to propagate. There were many debates about ‘literalism’ vs. hyperbole; there were many debates about freedom of speech; there were many debates about nationalism. This is not really happening, they said. What you are seeing is not what you are really seeing, they said. What you are hearing is not really what is meant, they said. There were many debates about the wrong thing altogether. We didn’t see it.

There was a body hanging in the square.

संप्रति मला पुस्तके हवी आहेत. परंतु मला आता घ्यायला जमणार नाही. डिसेंबर पर्यंत थांबता काय?

थांबणे शक्य नसेल तर मी कोणाला तरी घेऊन ठेवायला पाठवतो. तोवर रुमाल टाकून ठेवतो.

काही जणांना रोजच्या बातम्या ऐकून वाचून सामान्य ज्ञान मिळत नाही त्यांच्यासाठी असतात तेल नावाचे वर्तमान वगैरे पुस्तकं. चांगलं आहे. अच्युत गोडबोलेही बरंच माहितीपर लिहितात.

SRD your comment is too biased. This book covers entire history of how oil is discovered and overall development of Oil & Gas sector. In which news paper you get all this information.

मी तेच म्हणतोय ना. पूर्वपिठिका माहीत नसणाऱ्यांना शे दोनशे पानांत {मराठीत} बरीच माहिती मिळते. जे लोक इंग्रजी पुस्तकं वाचतात त्यांना ही अडचण नसते. प्रतिसाद उपरोधिक नाही\नव्हता.

जॉर्ज लुईस बॊ-हेस ची 'द ॲलेफ' ही कथा शोधत होतो. शोधता शोधता अचानक एक हिंदी यू ट्यूब व्हिडिओ सापडला. तिथे ती कथा हिंदीतून थोडीशी ऐकली आणि मग त्या चॅनल वर गेलो, मग स्क्रोल डाऊन करत खणत खणत गेलो तर लक्षात आलं की हा काही साधा प्रकार नाही. आपल्याला सोन्याची खाण सापडली आहे.
सहाशे हून अधिक ऑडिओ रेकॉर्डिंग्ज. सगळं वर्ल्ड क्लास लिटरेचर. एवढा श्रीमंत कंटेंट आणि पूर्णत: फ्री. आश्चर्यकारक विरोधाभास.!

लाओ त्सु, दस्तयेवस्की, ऑरवेल, मार्केझ, काफ्का, हेमिंग्वे, फ्रॉईड, प्लेटो, सॉक्रेटिस, नित्शे, शॉपेनहॉवर, युंग, डार्विन, हरमन हेस, रमण महर्षी, कृष्णमूर्ती, रूमी, जिब्रान, मिशिओ काकु, हरारी ही उदाहरणादाखल काही नावं. अशी आणखीही आहेत, जी माझ्याही पहिल्यांदाच बघण्यात आली.
क्राईम ॲंड पनिशमेंट चं सलग पंचवीस तासांचं मॅरेथॉन ऑडिओ रेकॉर्डिंग, तर 'ओडिसी'चं सलग नऊ तासांचं, तसंच ऑरवेलचं. तसंच 'सिद्धार्थ'चं.

हा जो कुणी यूट्यूबर आहे तो जाणकार माणूस आहे. अतिशय चिकाटीनं, पॅशनेटली, संयम ठेवून आणि नि:स्वार्थ भावनेनं हे काम केलेलं आहे.
आणखी एक म्हणजे, ह्या ऑडिओज् मधला हिप्नॊटायझिंग आवाज. काहीतरी वेगळंच टेक्श्चर आहे या आवाजाला. ऐकायला सुरूवात केली की धरतोच आपल्याला. ॲडिक्टीव्ह आहे. मजकूर राहिला बाजूला आवाजाचीच नशा यायला लागते. संध्याकाळी थोडं थोडं ऐकत असतो. हे घबाड काही थोडक्यात आटोपेल असं नाही.

नमुन्यादाखल वरती उल्लेख केलेल्या 'द ॲलेफ' या कथेच्या अभिवाचनाची लिंक :
https://youtu.be/P6KZ7bIRnV0?si=9QguTYl08hOmSZp2

Pages