पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
भाजप लोकमताची कदर करतो हा
भाजप लोकमताची कदर करतो हा भाबडा विश्वास आवडला. >>> लोकमतची कदर तेंव्हाच होते, जेंव्हा पारदर्शक निवडणूकींच्या माध्यमातून जनता आपला रोष प्रकट करेल ही भीती नेत्यांच्या/ पक्षांच्या ठायी असते.. आणि हे लॉजिक समजायला मला नाही वाटत प्रकांड पांडित्याची आवश्यकता आहे....तेंव्हा लोक्स आता उगी राहा, आणि जे जे होईल ते ते पहा
बापट यांनी आता बोलणे
बापट यांनी आता बोलणे थांबवण्याची गरज आहे
रणगाडे आणून विरोध मोडून काढा किंवा पोलिसांनी आरोपीला तुडवावं असली वक्तव्ये सगळ्याच केल्यावर पाणी फेरणार आहेत आणि एकदा मुख्य चेहराच असा झाला तर बघता बघता हे सगळं आंदोलन कोलमडून जाणार आहे
परत येरे माझ्या मागल्या
ही आकडेवारी बरोबर आहे का?
ही आकडेवारी बरोबर आहे का?
पुणे शहराचं क्षेत्रफळ ५१६ चौ किमी. लोकसंख्या ४७ लाख.पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५२७ चौरस किलोमीटर आहे. पुणे शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ९४,२६,९५९ पेक्षा जास्त आहे. - पुणे मनपाच्या संकेत स्थळावरून.जालावर मिळालेल्या माहितीनुसार २५०० ते ३८०० मंडळे.
म्हणजे दर १२५० लोकांमागे म्हणजे २५० ते ३०० कुटुंबांमागे एक मंडळ.०.१४ चौ. किमी = १४००० चौ मीटर इतक्या भागात एकेक मंडळ ?पुणे शहराचं क्षेत्रफळ ५१६ चौ
पुणे शहराचं क्षेत्रफळ ५१६ चौ किमी >> हे जुनं पुणं नसावं. मध्यवर्ती म्हणजे १९७० चं पुणं छोटं असावं. इथेच एका गल्लीत पाच ते सात मंडळं आहेत. नवीन विस्तारित पुंण्यात पण आहेत पण डेन्सिटी एव्हढी तीव्र नाही.
पूर्ण शहरभर चालणारे सण म्हणजे शिवजयंती, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी. गणेशजयंतीची भर गेल्या पाच सहा वर्षात पडली आहे. रामनवमी पुण्यात तरी बाल्यावस्थेत आहे.
आंबेडकर जयंती दत्तवाडी, विश्रांतवाडी, डायस प्लॉट झोपडपट्टी, कॅन्टोन्मेन्ट या भागातल्या वस्तीत होते. यात विसर्जन मिरवणूक नसते.
अण्णाभाऊ साठे जयंती प्रामुख्याने पर्वती (दोन ठिकाणी) आणि वडारवस्ती, गोखलेनगर इथे होते. याच भागात लहुजी जयंती होते. यातही विसर्जन मिरवणूक नसते.
सर्वप्रथम विद्यानंद बापट
सर्वप्रथम विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध!
पोलिसांनी त्याला पकडला तर आहे, पण त्यावर शक्य तितकी कठोर कारवाई व्हावी. इतकेच नव्हे तर तो ज्या गणेशमंडळाशी संबंधित आहे, तेथे कोणीही हिंदूने दर्शन घेण्यास जाऊ नये, इतर ठिकाणी जावे. (शेवटी सगळीकडचे गणपती एकच आहेत) कारण या मारहाण करणाऱ्याने 'सर तन से जुदा' वाला रस्ता निवडला आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढणे आवश्यक आहे.
हल्ला करणारा ज्या दुकानात काम
हल्ला करणारा ज्या दुकानात काम करतो ते डीजेचं होलसेलचं दुकान आहे.
( पुण्याबद्दल माहिती नसणार्यांसाठी - मार्केट यार्ड ही अन्नधान्य, फळांची घाऊक बाजारपेठ आहे. पण एका भागात अन्य काही वस्तूंचीही घाऊक दुकाने आहेत. सिया गोयल, अगरवाल आणि तिसरा चौधरी त्यांची दुकाने इथेच आहेत. पुण्यातले सर्व दुकानदार इथून माल भरतात.)
रणगाडे किंवा बंदूक दिल्यावर
रणगाडे किंवा बंदूक दिल्यावर ती व्यक्ती खरंच चालवणार आहे का? उद्वेगापोटी असं कुणी म्हणू शकत नाही का?
शांततेने आंदोलन करण्यार्या विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, पॅलेट ग्न्स आणि लाठीमार- यांचा वापर होत असेल, तर गुंडगिरी करून रस्ते अडवणार्या आणि कान आणि अख्खं खाजगी आणि सार्वजनिक जगणंच आजारी करून टाकणार्यांवरही अशी कारवाई करा- ही मागणी योग्य आहे की नाही, याचाही विचार करून बघायला पाहिजे.
कुणी हाणामारी केली आहे, त्याचीही हिस्ट्री बघा, भाषा बघा आणि 'तो नास्तिक आहे, आणखी मारला पाहिजे त्याला' असे अगाध युक्तीवादही बघा. उद्या मला मेथीची भाजी आवडते म्हणून याला मारा असंही बोलण्याचं (फक्त बोलण्याचं. भर टिळक रस्त्यावर येऊन फटकावणं वगैरे पुढचीच गोष्ट आहे) स्वातंत्र्य असणारच आहे लोकांना.
बापटांवारील भ्याड हल्ल्याचा
बापटांवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध!
बापटांनी खरे तर लोकशाहीत सामान्य नागरीकाचा सहभाग कसा असावा याचा आदर्शपाठ घालून दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=c0AavG1E2kw
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/88759
बापट चे डीजेबद्दलचे मत जर
बापट चे डीजेबद्दलचे मत जर मानायचे तर त्याची इतर सर्व मतेही १००% मान्य असायलाच हवीत अशी सक्ती असल्यासारखे का पब्लिक ऑफेण्ड होत आहे? तुमचे डीजेबद्दल एकमत आहे तेवढे माना, बाकीची वैयक्तिक मते म्हणून सोडून द्या. डीजे बद्दल सहमती दाखवली, तर सरकार एकदम त्याला बाकीच्या बाबतीतही सर्वाधिकार देणार आहे का!
असतील त्याची वैयक्तिक मते टोकाची. अनेकांची आहेत. वैयक्तिक मतांच्या स्पेक्ट्रम मधे हिंदूराष्ट्र ते पूर्ण सीमाविरहित देश, पूर्ण धार्मिक ते पूर्ण नास्तिक सगळीच रेंज असेल. हा दुसर्या टोकाला आहे इतकेच.
चं प्र देशपांडेंचं नाटक ढोल
चं प्र देशपांडेंचं नाटक ढोल ताशे - कॅलिफोर्नियातल्या मंडळींनी केलेला प्रयोग
ललित प्रभाकरने हे नाटक केलं होतं.
काही कळत नाही मला लोकांचं.
काही कळत नाही मला लोकांचं.
इथं किती जण आहेत असे - प्रामाणिकपणे सांगा - की ज्यांच्या मनात किंवा कधीतरी जाहीररित्या बोलण्यात सुद्धा - खालिल विचार/ बोल आलेले नाहित कधीच?
- (डॉल्बी, लेझर आणि वेड्यावाकड्या नाचणार्या बेवड्यांनी अडवून ठेवलेली रहदारी मोकळी होऊन मी घरी जाऊन कधी बाथरूमला जाऊ शकेन याची असह्य अवस्थेत वाट बघणारी मी) - हा रस्ताच सगळा बॉम्ब टाकून उडवून द्यायला पाहिजे. जळून जावोत सारे!
- (रस्त्यावरून भयंकर वेगात, फुटलेल्या सायलेंसर चा भयानक आवाज करत, वेड्यावाकड्या वळणांनी रहदारीतल्या सगळ्यांना हादरवून टाकत जाणारी दुचाकी बाईक अचानक शेजारून गेल्यावर) - मर मेल्या कुत्र्याच्या लायकीनं लवकर.
- (एखाद्या छान पर्यटन स्थळी तुम्ही सहपरिवार फिरायला गेल्यावर तिथं बेवडा मारून बनियान चड्डीत चार मध्ये मोठ्यानं घानेरडी गाणी लावून ढेरपोटे काका लोक्स नाचताना बघून) - वीज पडून मरून तरी जावेत सारे निर्लज्ज मेले! किंवा दरड कोसळून चिरडून जवोत सारे.
असे अनेक प्रसंग सांगता येतील. यातले अनेक डायलॉक्स माझ्या काक्या-आज्या-मावश्यांच्या तोंडून आइकलेत.
तुम्ही कधी असे बोलला नाहीत? अगदी मनातही नाहीत? खरंच?
मग नेमके बापट का चुकले? ते फेमस झाल्यावर बोलले म्हणून? केमेरा समोर बोलले म्हणून? ते त्रस्त झाले म्हणून?
-
मला तरी बापटांचे ते 'टीकेचे
मला तरी बापटांचे ते 'टीकेचे धनी' झालेले मुद्देसुद्धा पटलेच. मात्र ते फक्त काहींना पटून व इतर असंख्य लोकांना न पटून काही होणार नाही. त्या इतर असंख्य लोकांच्याबाबतीत श्रद्धा, अर्थकारण, धर्माभिमान असे काही घटक विशेषत्वाने लागू होतात. त्यामुळे, ध्वनिप्रदूषण ह्या मुद्याची मर्यादा न पाळून बापट जे बोलत राहिले ते असंख्य लोकांना आवडले नाही. (श्रद्धा, अर्थकारण हे सोडले तर धर्माचा अभिमान इतर अनेकांप्रमाणे मलाही आहेच. पण तो माझ्यापुरता आहे. श्रद्धा थोडीफार आहे कारण तश्या विचारांच्या घरात वाढलो. उत्सवातील अर्थकारणाशी माझा संबंध काहीच नाही. ह्या सर्वांमुळे बापटांचे म्हणणे पटायला मला अवघड जात नाही.)
एक वेगळे - बापट आता बाईट्स देता देता मधेच चिडू लागले आहेत. त्या भरात ते अजून काही बोलले तर अधिक उग्र परिणाम होऊ शकतात. बाकी धांगेकर आणि बापट ह्यांना एकत्र debate साठी बोलावले हे मी फार उत्सुकतेने पाहायला बसलो. धांगेकर निव्वळ निरर्थक बोलले. पण मीडियावर त्या चर्चेत बापट काय बोलले हे -जो व्हिडीओ मला पाहायला मिळाला त्यात - दाखवलेच नाही. तत्यामुळे निराशा झाली.
बापट आगे बढो हम तुम्हारे पीछे
बापट आगे बढो हम तुम्हारे पीछे है
१०० किलोमीटर पीछे
हम हमारे घर मे है आप मस्त मार खाओ हमारा दोनो साईड से मनोरंजन
आपके कानफट खाणारे व्हिडिओ देखकर मजा आ रहा है
और डीजे बंद भी होनेवाला है
आप आगे बढो मार खाओ हम मस्त मच्छी फ्राय करके रात को मुव्ही देखकर सोनेवाले है
कल छुट्टी है आप लक्ष्मी रोडपर जाओ मार खाओ और दो दिन मनोरंजन करो.
धंगेकर हा एक मर्यादित कुवतीचा
धंगेकर हा एक मर्यादित कुवतीचा माणूस आहे. त्याच्याकडे प्रतिवाद म्हणण्याच्या लायकीचे कुठलेही मुद्दे नव्हते. बापटांच्या ढिगाने मुलाखती उपलब्ध असताना त्या पाहून आपण आपली व्यूहबांधणी करून काहीतरी मुद्दे तयार करावेत वगैरे गोष्टी धंगेकरांच्या आवाक्याबाहेर आहेत.
एक तर ते बापटांना कित्येक मिनिटे बोलूच देत नव्हते.
धंगेकरांची मुक्ताफळे:
बापटांच्या एक थोबाडीत मारणे म्हणजे बापटांवरील हल्ला नव्हे.
मग कार्यक्रमात बोलावून मला आक्रमकपणे प्रश्न विचारणे हाही माझ्यावरील हल्लाच आहे.
हा माणूस आज लोकप्रतिनिधी नाही ह्या उपकारासाठी पुण्यातील तमाम गणपतींचे आभार (आणि जनतेचेही!)
इथं किती जण आहेत असे -
इथं किती जण आहेत असे - प्रामाणिकपणे सांगा - की ज्यांच्या मनात किंवा कधीतरी जाहीररित्या बोलण्यात सुद्धा - खालिल विचार/ बोल आलेले नाहित कधीच?
- (डॉल्बी, लेझर आणि वेड्यावाकड्या नाचणार्या बेवड्यांनी अडवून ठेवलेली रहदारी मोकळी होऊन मी घरी जाऊन कधी बाथरूमला जाऊ शकेन याची असह्य अवस्थेत वाट बघणारी मी) - हा रस्ताच सगळा बॉम्ब टाकून उडवून द्यायला पाहिजे. जळून जावोत सारे!
- (रस्त्यावरून भयंकर वेगात, फुटलेल्या सायलेंसर चा भयानक आवाज करत, वेड्यावाकड्या वळणांनी रहदारीतल्या सगळ्यांना हादरवून टाकत जाणारी दुचाकी बाईक अचानक शेजारून गेल्यावर) - मर मेल्या कुत्र्याच्या लायकीनं लवकर.
- (एखाद्या छान पर्यटन स्थळी तुम्ही सहपरिवार फिरायला गेल्यावर तिथं बेवडा मारून बनियान चड्डीत चार मध्ये मोठ्यानं घानेरडी गाणी लावून ढेरपोटे काका लोक्स नाचताना बघून) - वीज पडून मरून तरी जावेत सारे निर्लज्ज मेले! किंवा दरड कोसळून चिरडून जवोत सारे.भौतिकशास्त्र नोट्स मिळवा
असे अनेक प्रसंग सांगता येतील. यातले अनेक डायलॉक्स माझ्या काक्या-आज्या-मावश्यांच्या तोंडून आइकलेत.
तुम्ही कधी असे बोलला नाहीत? अगदी मनातही नाहीत? खरंच?
मग नेमके बापट का चुकले? ते फेमस झाल्यावर बोलले म्हणून? केमेरा समोर बोलले म्हणून? ते त्रस्त झाले म्हणून?
-
Submitted by मुग्धमानसी on 4 September, 2026 - 18:39 <<<<<<
बापट काय म्हणाले आणि ते बरोबर की चूक याच्याशी संबंधित नाही पण
वैताग येत असला तरी सगळ्यांच्या मनात असे टोकाचे विचार काही येत नसावेत...
कुत्र्याच्या लायकीने? कुत्र्यांची आणि प्राण्यांची लायकी कितीतरी माणसांपेक्षा चांगलीच असते...
त्यांना उगाच कशासाठी वाईट बोलायचं...
-----
बापट प्रकरणाबद्दल, काही मुलाखत घेणारे बावळट सारखं बापटांना तुम्हाला गाणी आवडत नाहीत का music आवडत नाही का विचारत आहेत
गाणं आवडायचा आणि ध्वनी प्रदूषणाचा काय संबंध...
एक्स वरून साभार.
एक्स वरून साभार.
बापटांना मारहाण करणारा संतोष चव्हाण त्यांना उद्देशून म्हणाला की रस्त्यावर खड्डे आहेत, निकृष्ट रस्ते आहेत, नदी प्रदुषित आहे ते दाखवा. उगीच बापटांना प्रसिद्धी देऊ नका वगैरे.
तर हे सगळे व्हिडियो करून दाखवणारे संतोष पंडित यांना काहीतरी क्षुल्लक कायदेशीर खुसपट शोधून अटकेत टाकून आठवडाभराची कस्टडी दिली आहे.
संवैधानिक पद्धतीने मत मांडले तर संतोष चव्हाणसारखे थोर विद्वान येऊन थोबाड फोडणार.
खरोखरच्या समस्या व्हिडियोवर दाखवल्या तर सरकार पोलिस पाठवून बेड्या ठोकणार.
मग काय करावे हे सरकारने समजावून सांगावे!
आज हा धागा नजरेखालून घातला.
आज हा धागा नजरेखालून घातला.
आपण करत असलेल्या ध्वनी अत्याचाराबद्दल नुसती जाणीव नाही तर कृती करण्याची गरज वाटून गणेशोत्सव mandalaannich स्वतःहून DJ, Dolby, ढोल पथक वगैरे बंद केले आणि फक्त त्या त्या मंडळाच्या परिसरातच ऐकू जातील इतक्या हळू आवाजात उत्सवाला साजेशी, उत्सवाचं मांगल्य प्रतीत करणारी गाणी किंवा वाद्य किंवा कार्यक्रम, स्पर्धा, खेळ आयोजित केले तर आपोआप हा problem बऱ्याच प्रमाणात कमी होईल. बाप्पा बिचारा मोठे कान झाकून घेत असेल. त्याला कौतुकाने आणायचं आणि त्यालाच नको जीव करायचं, त्याच्या नावाने सगळ्यांना त्रास होईल असं करायचं.... हा कसला उत्सव??? हैदोस नुसता!
आमच्या गिरगांवातला सार्वजनिक गणेशोत्सव आठवला. विसर्जन मिरवणुकीत फक्त २-३ ताशेवाले असायचे. वाडीतल्यांचंच लेझीम असायचं. मूर्ती पालखीत बसवून नेण्याइतकीच मोठी असायची. आम्हीच पालखी साजवायचो, मखर करायचो. पालखी वाडीतलीच मुलं उचलायची आणि वाहून न्यायची गिरगांव चौपाटीपर्यंत. दररोज काही ना काही कार्यक्रम असायचे...अन्नकोट, मंत्रजागर, सहस्रआवर्तन, स्थानिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम, एखादे बाहेरचे नाटक, एखादा गाण्याचा कार्यक्रम, एखादे कीर्तन (आफळेबुवांचे कीर्तन तिथेच ऐकले होते), एखादे व्याख्यान, एक दिवस गणेश याग, रविवारी महाप्रसाद, जादूचे प्रयोग, बोलक्या बाहुल्या, स्थानिकांच्या स्पर्धा... दहा दिवस कधी संपले कळायचं नाही. कुठेच अचकट विचकटपणा नाही की कानठळ्या बसणारे आवाज नाहीत. वाडीतील वडीलधारे राहिवासी लक्ष ठेवून असत आणि तरुण मुलेही त्यांच्या सल्ल्यांचा विचार करत. पण हा! विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर अनेक मंडळे येतात त्यामुळे सगळ्या रस्त्यावरून mixed आवाज येतात.
अजूनही वाडीतला उत्सव असाच असतो.
-------
खूप वर्षांपूर्वी गणपतीत एक दिवस पुण्यात होते तेव्हा खरंच धडकी भरवणारे आवाज आणि स्पीकर्सच्या भिंती अनुभवल्या आहेत. तेव्हाच ठरवलं होतं की गणपतीत पुण्यात यायचेच नाही. आता सर्वांच्याच सहनशक्तीचा स्फोट झाला असावा. सगळ्यांनी एकत्रपणे बापटांना पाठिंबा द्यायला हवा. बापाटांनी फोकस ढळू द्यायला नको. ते त्यांच्या भाषेत व्यक्त होत असले तरी ते घाऊकमध्ये सगळ्यांसाठीच बोलत आहेत. त्यामुळे त्यावरून कीस पाडणे नको.
आता इकडेही स्पीकर्सच्या भिंती दिसतात गोकुळाष्टमीला एक दोन ठिकाणी. गणपतीत मात्र पुण्यापेक्षा ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आणि कमी ठिकाणी असावे.
-------
तुम्ही कधी असे बोलला नाहीत? अगदी मनातही नाहीत? खरंच?>>>> कितीही irritation झालं तरी कुणाचाही मृत्यू व्हावा किंवा हातपाय तुटावेत अशी हिंसक इच्छा चुकूनही मनात येत नाही. पण तो प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला. वैतागाचा कडेलोट झाला तर चुकीच्या वागण्याबद्दल संतापून अक्कल काढेन, समोर पोलीस दिसल्यास त्याला सांगून मदत मागेन, गर्दीत न अडकण्यासाठी जी सुचेल ती काळजी आधीच घेईन, अचानक परिस्थिती उद्भवल्यास तिथल्या उपस्थित लोकांना सांगून त्यातून बाहेर पाडण्यासाठी मदत मागेन.
---------
हा सार्वजनिक उत्सवांचा गोंधळ लवकरात लवकर आटोक्यात यावा आणि उत्सवांना constructive रूप यावे हिच गणरायाचरणी प्रार्थना. सारासारविवेकबुद्धीचे दान सगळ्यांना दे रे बाबा!
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DcbUzR-gdGs/?igsi=Y3g5Y2Z2ODVrNmJq
हा व्हिडिओ बघा
डीजे मुळे मेडिकल मधील औषधाच्या बाटल्या पडून फुटत आहेत. म्हणजे काय दणका असेल. वृध्द आजारी लोकांचे काय होत असेल..
आवाजाने बाटल्या खाली पडून
आवाजाने बाटल्या खाली पडून फुटणे भयानक आहे!
कानावर आणि अन्य शरीरावर किती दुष्परिणाम होत असतील?
लहान बालके रोगग्रस्त वृद्ध लोकांचे तर विचारायलाच नको!
https://thisisbarcelona.com
https://thisisbarcelona.com/agenda/altaveu-festival
हा उत्सव पण रस्त्यावरच होतो. याच महीन्यात आहे. याची उदाहरणे कशी दिली नाहीत अजून?
रस्त्यावरून भयंकर वेगात,
रस्त्यावरून भयंकर वेगात, फुटलेल्या सायलेंसर चा भयानक आवाज करत, वेड्यावाकड्या वळणांनी रहदारीतल्या सगळ्यांना हादरवून टाकत जाणारी दुचाकी बाईक अचानक शेजारून गेल्यावर)>> कर्कश्य horns चे आवाज कानावर आल्यावर मला त्यांना गोळ्या घालायची इच्छा होते. (मी कधी फटाक्यांची बंदूक किंवा पिचकारी पण हातात धरलेली नाही).
बार्सिलोनाचं उदाहरण दिलेलं
बार्सिलोनाचं उदाहरण दिलेलं आहे.
रस्त्यावरच्या उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे. मुखवटे घालून करायचा एक उत्सव पण पिपाण्या आणि कर्णकर्कश्श वाद्ये वाजवत करतात. याच महीन्यात होणारा डीजेचा उत्सव रस्त्यावर आहे कि कुठे ते कळेलच.
पण अशी आयती उदाहरणे देऊनही त्याचा लाभ उचलला जाणार नाही. मेहनत घेतलीच तर सध्या रामनामजप करणार्या अनेकांचे मागचे रेकॉर्डस पाहिले तर "हिरवे" "मशिदीचे भोंगे" "आमच्याच सणाला का?" छापाचे प्रतिसाद सापडतील. पण आपला अमूल्य वेळ हे सिद्ध करण्यात दवडायचा नाही. प्रश्न आहे कि एकाच वेळी अशा सर्वांना उपरती कशी काय झाली? भूत के मुंह मे रामनाम?
मुंढेंच्या कारवाईमुळे खरात प्रकरणापासून ते नीट पेपरफुटीपर्यंत चर्चेत असलेले अनेक इश्यू विस्मरणात गेले. आता आपण त्या वेळी काय बदाबदा लिहीले ते लक्षात नाही.
म्हणजे मुंढेंची कारवाई अयोग्य होत नाही. पण मोठा बाँब फोडला कि सुतळी बाँबचा आवाज त्यात दबला जातो.
एमपीएससी पेपरफुटीचं प्रकरण बापट प्रकरणाने चर्चेतच आलं नाही. अजून काही दोन तीन मुद्दे विस्मरणात गेले. हेच मुख्यमंत्री असताना मधली अडीच वर्षे वगळून दहा वर्षात कुणालाच आवाज कसा उठवावा वाटला नाही? आपलेच सरकार, आपलेच मुख्यमंत्री आणि आवाजाच्या विरोधात आपल्यांचेच मत, मग भीती कुणाची? गोदी मीडीयाला उपरती झाल्यापासून हा प्रश्न छळत होता. हे "नीट" कसे काय झाले?
म्हणजे बापटांचे इश्यूज चुकीचे आहेत का? अजिबात नाही.
बापटांच्या लढ्याला यश.
बापटांच्या लढ्याला यश.
कोर्टाच्या नियमांनुसार काढलेल्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाची दखल न घेता मान्य आवाजाच्या पातळीपेक्षा डीजे लावल्याबद्दल खडक पोलिसांनी सूचना मिळाल्यापासून काल २४ तासात आरोपपत्र दाखल केले आहे. हा गुन्हा २६ ऑगस्ट रोजी घडला होता. तपशील खालीलप्रमाणे
मंडळाचे नाव :
अल मदिना यंग बॉईज लोहियानगर कमानीजवळ
अध्यक्ष : वाहीद कासम मणियार, वय वर्षे ५४, रा लोहियानगर
उपाध्यक्ष : झाएद / जावेद मजीद शेख, रा लोहियानगर
डीजे चालक मालक : प्रकाश अस्वले, रा कोल्हापूर
कोर्टाने इतरांच्या शांततेचा भंग करणे हा हक्क मुलभूत अधिकारात येत नसल्याचे सांगितले. बापटांचा विजय झाला.
सर्व नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा!

दहीहंडी उत्सव, ठाणे.
https://www.facebook.com
बापट ची हल्ल्यानंतर झालेली एक पत्रकार परिषद.
जबरदस्त आहे. सगळे मुद्दे कव्हर.
https://www.facebook.com/share/v/1MkzCCQ6Hn/
25 मिनिटांचा व्हिडिओ आहे. पण एकटाच अडीच तासाचे बोलला आहे. थोडी बघूया म्हटले पण थांबायचे कुठे न कळल्याने किंवा त्यानेच उसंत न दिल्याने पूर्ण बघितली.
https://www.facebook.com
अवधूत गुप्ते ने विद्यानंद बापट वर गाणे बनवले.
https://www.facebook.com/share/r/1My24HBESF/
बापटांच्या नावाने खंडवर्गणी
बापटांच्या नावाने खंडवर्गणी वसूल करायला सुरूवात होऊ नये म्हणजे मिळवली.

बापट थोडे derail झाले. मला
बापट थोडे derail झाले. मला त्यांचे मुद्दे त्यानंतरही पटत आहेत. मात्र बहुसंख्यांना पटणे अवघड वाटते. एकाच प्रयत्नात अपेक्षित ती संपूर्ण उलथापालथ होऊ शकत नाही हे त्यांना माहीत तर असणारच. हिंमतीची दाद द्यायलाच हवी. मात्र बापट पुरे पडणार नाहीत हे वास्तव आहे.
पुण्यात दहीहंडीच्या
पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी DJ अंगावर कोसळला, ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
मुंबईत आगमन मिरवणुकीत गणेशमूर्ती पडून दोन माणसे मेली.
उद्या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर दहीहंडीत जखमी झालेल्यांची संख्या छापली जाईल.
https://x.com/Vidyanand_Bapat
https://x.com/Vidyanand_Bapat/status/2096195168387084594
Pages