पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
पुण्याचा सार्वजनिक उत्सव हा
पुण्याचा सार्वजनिक उत्सव हा सांस्कृतिक ठेवा आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवाने तो समृद्ध होत गेला आहे.
एका गणेशोत्सवात एका आगामी मराठी पिक्चरमधलं दुग्धशिरोमणी हे गाणं बाप्पासमोर वाजत होतं.
https://www.youtube.com/watch?v=XYuy2Mj6iio&list=RDMMXYuy2Mj6iio&start_r...
यामुळेच महाराष्ट्र आज दूधदुभत्यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
बापट बचावले हे आवडलं नाही का?
बापट बचावले हे आवडलं नाही का?
बापटांना मशिदींवरच्या
बापटांना मशिदींवरच्या भोंग्याचा त्रास होत नाही का असं विचारणार्यांच्या प्रतीक्षेत.
14 एप्रिलला कान फाटतात...
14 एप्रिलला कान फाटतात...