पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
माझ्या आठवणीत दोन घटना आहेत.
माझ्या आठवणीत दोन घटना आहेत. तारीख वगैरे आता ध्यानात नाही.
पहिली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची कसबा पेठेत रिकाम्या खुर्च्यांसमोर झालेली सभा. मतदारसंघात भाजपच्या मतदारात असलेल्या नाराजीचा विषय सर्वच माध्यमात आला होता. एकही श्रोता नसलेल्या सभेनंतर त्याच मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून आला होता.
दुसरी घटना ही एकच घटना नाही.
https://www.youtube.com/watch?v=bUAUpdzEAQw
मोदींच्या सभा रिकाम्या होत्या, लोक उठून जात असल्याचे व्हिडीओज अक्षरशः गोदी मीडीयाने दाखवले होते. तेव्हांही त्या मतदारसंघातच नाही, तर आजूबाजूच्या पट्ट्यातही भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=8aTe_Xki9ug
त्यामुळे बापटांना समर्थन करणारे भाजपला मत देणार नाहीत यावर विश्वास ठेवणे जडच आहे. हे जे भाजपचे परंपरागत मतदार आहेत ते भाजपसोबतच राहणार आहेत. हेच राज ठाकरे शिवसेनेत असताना भाजपशी असलेल्या युतीत होते. तेव्हां ते महाआरत्या घेत होते. भोंग्यांविरूद्ध मोहीम काढल्याला फार वर्षे झाली नाहीत. तेव्हां त्यांना ढोल ताशे, डीजे खटकलेले नव्हते. भोंग्याविरूद्ध मोहीम चालवली तेव्हां त्यांचं भाजपशी सख्य झालं होतं. त्या आधी त्यांची इडीकडून कसून चौकशी झाली होती.
नवनीत राणा या भजपच्या सहयोगी आहेत. त्या धमक्या देत आहेत. थोडक्यात आपण स्वच्छ राहून हस्ते परहस्ते काम करवून घेण्याची ही पवार पॉलिसी दिसते. अर्थात पवारांना श्रेय देण्याचे काहीच कारण नाही. भाजप राजकारणात उशिरा यशस्वी झाली आहे.
गणेशोत्सव सुरू केला टिळकांनी. सत्तरच्या दशकापर्यंत तो फक्त पेठांमधे आणि मुंबईत तुरळक साजरा व्हायचा. दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी सहीत मटा, सकाळ, केसरी, लोकसत्ता यांनी वारेमाप प्रसिद्धी दिली, विद्युतरोषणाई, डोल ताशांचं कौतुक केलं, ३६ तास मिरवणूक, ४८ तास मिरवणूक याचं कौतुक केलं. विक्रमी मिरवणूक सारखे मथळे दिले. यातून हा धांगडधिंगा लोकप्रिय झाला. यात काही चुकीचं आहे हे पुढच्या पिढ्यांना वाटेनासं झालं आहे. आणि आता यातल्या लाजिरवाण्या भागापासून आपली नाळ तोडण्यासाठी हा देखावा आहे असे म्हटले तर त्याचा गळा धरता येणार नाही. ( गळा धरता येत नसला तरी राखीव आयडी सोडता येतात. त्यांना अभय असल्याने ते यथेच्छ नाचू शकतात. हेच आपल्याला नको असलेले मत मांडणार्यांचे आयडी असतील तर ते खलनायक ठरतात. असो. कुत्ता भी अपनी गली मे शेर होता है.)
फडणवीसांना माहिती आहे बापटांना पाठिंबा दर्शवणारे आपल्याला मत देणारच आहेत, पण आपणच ज्यांच्यात हे खूळ भरवले त्यांची मतं निर्णायक आहेत. राजकीय विषय आणल्यामुळे हे लिहीणे भाग पडले. आधीचे तरी कुठे शहाणे होते? पण ते भिऊन होते.
https://x.com/zoo_bear/status
https://x.com/zoo_bear/status/2097054455309225994
News18 Journalist Attacked By
News18 Journalist Attacked By A Mob For Objecting To Loudspeaker Being Played At ‘Jagrata’
https://hwnews.in/national/news18-journalist-attacked-by-a-mob-for-objec...
A mob attacked him without caring about policemen being present on the spot, reports said. he got threats from crowd against his family. The crowd also reportedly threatened the journalist that his wife will be paraded naked.
४ वर्षांपूर्वीची बातमी. तेव्हा गणेशोत्सवात आवाजाचा त्रास होतो अशी तक्रार करायला जायच्या आधी नीट विचार करा
२००५ मध्ये पुण्याच्या गणेश
२००५ मध्ये पुण्याच्या गणेश विसर्जनात नेमकं काय घडलं? ३३ तास २० मिनिटांची मिरवणूक, दगडफेक अन् जाळपोळ
https://www.youtube.com/watch?v=ez5YTkMYoQo
@बेफिकिर - लोक बदलतात. मी
@बेफिकिर - लोक बदलतात. मी इथेच बदललो. मला वाटते फारेंडचा दृष्टिकोण बराच बदलला इथे (तो तसाच आधीपासून असेल तर माहिती नाही).
माझ्या शाळेच्या आणि कॉलेजच्या ग्रुपमध्ये मी एक गंमत पाहतो आहे. जे संघाच्या कामात वगैरे प्रत्यक्ष होते त्यातले काही जण तरी आता विरोधात दिसत आहेत
विचार करणारे लोक बदलतात हे
विचार करणारे लोक बदलतात हे खरं आहे पण त्यात पण आणि परंतु पुष्कळ असावे असं वाटतं.
बहुतेक ठिकाणी भरत म्हणताहेत तसं कशी या त्यजू पदाला ऐकू येण्याची शक्यताच जास्त हे ही मला पटतं. माझ्या ही शाळेच्या ग्रुपवर एक कट्टर संघ समर्थक आवाजाला विरोध करून ' हल्ली कशाला जरा विरोध केला की लगेच देशद्रोही म्हणू लागले आहेत! ' असं एकदम उद्विग्नवगैरेतेने म्हणाला. तो तीन वर्षांनी मत बदलणार नाही मला पक्कं माहीत आहे. त्या बाबत मत बदलणे अशक्य आहे हे जमेस धरून आता निदान आवाज उठवणे हे तरी क्षीण का असेना... करतोय..अजून ते ही बहुतेक अंध लोक करत नाही आहेत. आयटी सेल कार्यरत होऊन कचरा येऊ लागला आहेच. म्हणून त्या मित्राला कचऱ्यात आत्ताच कशाला ढकलावे. तो जाणार आहेच.
बदलण्यावरून, मी ही भारता बाहेर आल्यावर / मायबोलीवर आल्यावर ( त्यामुळेच असेल असं नाही) बदललो. असं म्हटलं ... तरी दोन सलग वेळा लिबरल मत देऊन तिसऱ्या वेळी चालू प्रकार अगदीच डोक्यात गेल्याने कोंझर्वेटिव मत इथे दिलेलं. त्यात नशिबाने आमचा लोकल माथेफिरू बहुमतात आला नाही. नाहीतर आज पस्तावलो असतो. आता वय वाढतंय तसं बदलणे अशक्य होतंय. मग नावडले तर घरी बसणे प्रकार होईल. मग तेव्हा कशीया त्यजू पदाला गावं का काय कल्पना नाही
अहो बेफिकिर साहेब, माफ करा पण
अहो बेफिकिर साहेब, माफ करा पण एवढं मनाला लावून घेवू नका. राजकारणात सध्या दोनच सर्पोटरस आहे, अंधभक्त आणि मंदभक्त.. इकडे लिहिणारे कोणत्यातरी एका कंपूत आहे..
अहो बेफिकिर साहेब, माफ करा पण
डबल पोस्ट
घराबाहेर आवाज करणार्यांना
घराबाहेर आवाज करणार्यांना विरोध केला - संगीतकार चोंगथम विक्रम सिंह यांची निर्घृण हत्या
साम टीव्हीच्या पत्रकाराने
साम टीव्हीच्या पत्रकाराने बापटांना आरक्षण विषयक आंदोलनावर प्रतिक्रिया विचारली. त्यांनी मला या विषयावर प्रति क्रिया द्यायची नाही म्हटल्यावर दिपके, जरांगे, गुणवर्ते अशी नावं घेऊन प्रश्न विचारले.
चला बाई! राहुल गांधीनंतर देशापुढील समस्यांसाठी जबाबदार असलेला आणखी एक माणूस भेटला. एकटे नेहरू कुठे कुठे पुरे पडणार होते.
सामान्य मध्यमवर्गातील
सामान्य मध्यमवर्गातील सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्ती प्रामाणिकपणे केवळ एक नागरीक म्हणून लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा जबाबदारीने, सनदशीर मार्गाने वापर करते तेव्हा काय घडू शकते हे बापटांच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. आम्ही साधी, सामान्य मध्यम वर्गी माणसे काय करु शकतो असे म्हणत हताशपणे आहे त्या परीस्थितीत दिवस काढायचे की लोकशाहीत एक सामान्य नागरीक म्हणून सातत्याने सहभागी होत चांगल्या सार्वजनिक राहणीमानासाठी प्रयत्न करत रहायचे हे आता गावोगावच्या सुजाण नागरीकांनी ठरवायचे.
टण्या, तुझं बदलणं; आणि बेफि
टण्या, तुझं बदलणं; आणि बेफि-शेंड्यासारख्या लोकांचं बदलणं (किंवा तसं दिसणं) यात जमीन अस्मानचा फरक आहे. याचं मुख्य कारण असं आहे की इथंच तुम्हा सार्यांचे अनेक वर्षांचे प्रतिसाद इथं अजूनही आहेत. ते सारं काही दाखवतात. माझेही आहेत. काही मतं बदलल्याचं स्प्ष्ट दिसेलही.
पण पॅटर्न ट्रॅक करता येतो. ढोलताशाने पर्सनल स्पेस अॅटॅक होत असेल किंवा आवडत्या पक्षाने व्यक्तिगत मतांवर आक्रमण केलं, तर हे लोक सरड्यासारखे तात्पुरते रंग बदलतील, पण आपली उडी कधीही कुंपणाबाहेर जाणार नाही, याची काळजी घेतील.
हे रंग किती बदलून दाखवावेत, याचंही फ्युचर अॅनालिसिसवर आहे. एखादी गोष्ट डॅमेज कंट्रोलच्या बाहेर जात असेल तर 'सांस्कृतिक पद्धतीने करा' वगैरे येणार. नीट बघा- हा पॅटर्न आहे. अंगाला काहीही लावून घ्यायचं नाही, पण सार्वजनिक जीवनात आपण शक्यतो सावरकर दिसू याची काळजी घ्यायची. उदाहरणार्थ ते कल्पनारम्य हिंदू राष्ट्र यावं यासाठी काहीही चालेल, पण घरी त्यासाठी आवडती काकडी कोशिंबिर वर्ज्य करायचं व्रत करा म्हणलं, तर हे म्हणणार- घराबाहेर व्हा.
तर हे असं आहे. असं सगळ्यांना जमलं पाहिजे, पण नाही जमत.
आमच्या कडे सोसायटीच्या
आमच्या कडे सोसायटीच्या ग्रुपवर परांजपे बाईंनी एका अॅड मेश्रामची पोस्ट शेअर केली आहे. त्याचं म्हणणं कि "मारणारा बहुजन, आवाज बंद करणारा ब्राह्मण. बापट जे म्हणत होते तेच या गुंडाने सिद्ध केलं"
मेश्राम यांनी म्हटलं तेच साध्य असावं हीच शंका या धाग्यावर बोलून दाखवलीये. ती समजत नसेल किंवा वाचता येत नसेल किंवा वळत नसेल. मेश्राम सारखे असे शाबासकीचे भुकेले काय लिहील्यावर लाईक, शेअर होईल हे जाणून असतात. कौतुकभुकेल्यांची कमी नाही.
सर्वच संघीयांची मतं एक छापासारखी आल्याने टूलकीट आलं असावं ही शंका तेव्हांच आलेली. आता साजिरा सांभाळा मोर्चा. तुम्ही खूप आराम केला.
टण्या, हो माझाही दृष्टिकोन
टण्या, हो माझाही दृष्टिकोन बदलला गेल्या १५-२० वर्षांत. माबोवरची उलटसुलट मते, मधल्या काळात वाचलेली बरीच राजकीय सामाजिक पुस्तके, इथे अमेरिकेत आल्यावर भारतासारखेच दिसलेले अनेक पॅटर्न्स वगैरे बर्याच गोष्टींचा प्रभाव आहे. पण इथे राजकीय वादांत मुद्देसूद लिहीणार्यांना बरेच क्रेडिट आहे त्याचे.
पण ते आता संख्येने कमी आहेत, कमी झाले आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. बहुतेकांच्या लिहीण्याचा रोख आयडीकडे/व्यक्तीकडे असतो. आपला पॉइण्ट ठसवायला सतत डिवचल्यासारखे लिहून आपल्याला तात्पुरते जितं मया होतही असेल पण समोरची व्यक्ती कधीही तुमचे मत स्वीकारत नाही - त्यावेळी आणि त्यानंतरही. एखाद दुसर्या पोस्टने हे होत नाही. सततच्या डिवचण्याने मात्र एकदा अढी बसली की ती जात नाही. तुम्हाला जर कायम "अल्फा" मोड मधे राहून अॅग्रेसिव्ह भाषेतच लिहायचे असेल आणि त्याने तुम्हाला सोमिवर वावरण्याची किक मिळत असेल तर मग प्रश्नच नाही. पण तुमचे मत काहीतरी अभ्यासून लिहीलेले आहे आणि इथल्या इतरांनी त्याचा विचार करावा असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांनाच एलियनेट करून ते कधीच होणार नाही.
दुसरे म्हणजे कितीही टीका केली
दुसरे म्हणजे कितीही टीका केली तरी हे लोक का दुसरा पक्ष निवडतील? असा कोणता आकर्षक किंवा निदान मॉडरेट तरी पर्याय एखाद्या पक्षाने गेल्या ८-१० वर्षांत उभा केला आहे त्यांच्यापुढे? भाजप वगळता इतर सर्व पक्षांना हा मतदार नकोच आहे किंवा मिळणार नाही याची खात्री असल्यासारखे त्यांनी त्यांना खड्यासारखे लांब केले आहे. त्यांच्या कोणत्याही स्लोगन्स उघडपणे किंवा इन्डायरेक्टली ब्राह्मणांना विरोध करणार्या किंवा डिवचणार्या आहेत. अगदी घाऊकपणे. त्यांना आपुलकी असलेल्या अनेक मानचिन्हांवर सार्वजनिकरीत्या राळ उडवली गेली आहे. काँग्रेस पासून ते इतर कोणत्याही पक्षाचे टॉकिंग पॉइण्ट्स बघा. त्यात या मतदार गटापर्यंत पोहोचण्याचा काय प्रयत्न दिसतो? मी रागाचा फॅन आहे पण ही चूक तो ही करतो, काहीही गरज नसताना.
हे सगळे योग्यच आहे असे वाटत असेल तर प्रश्नच मिटला. पण मग तो समाज/वोटर ब्लॉक तुमच्याकडे येण्याची शक्यता तुम्हीच काढून टाकत आहात हे ही लक्षात घ्या.
काही वर्षांपूर्वी काँग्रेस सर्वसमावेशक होती. त्यांच्या प्रचारात कोणालाच दुरावण्यासारखे काही नसे. तेव्हा पुण्यात काँग्रेस अनेक जागी येत होती. कित्येक ब्राह्मण मतदारही काँग्रेसवालेच होते. भाजप तेव्हा नगण्य होती. गेल्या २५-३० वर्षांत सगळे बदलले.
मोर्चा बिर्चा सांभाळायला
मोर्चा बिर्चा सांभाळायला सांगू नका. मी दाराआड लपून घाबरून बघत असतो. खुप मोठी रेंज आहे इथं. रिस्पेक्ट. मी कुठेच नाही
.
हे जर घाबरणे असेल तर घाबरवणे
हे जर घाबरणे असेल तर घाबरवणे काय असेल हा विचार करून जीव घाबराघुबरा झाला.
एके काळी काँग्रेस ब्राह्मणी
एके काळी काँग्रेस ब्राह्मणी होती. जेधे जवळकर त्या वेळी विरोधक होते. पुढे ते काँग्रेसमधे दाखल झाले. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी यांची लोकप्रियता पश्चिम महाराष्ट्र आणि काही जिल्ह्यांत होती. यशवंतराव चव्हांणांनी मराठा लॉबी काँग्रेसमधे आणली. नंतर नाना पाटील आणि सहकार्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. अजूनही हा पक्ष जिवंत आहे. पण पैसा काँग्रेसमधे असल्याने अनेकांनी काँग्रेस जॉईन केली. मराठा लॉबीने मराठा मुख्यमंत्री हवा असा संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर काँग्रेसशी करार केला. तेव्हांपासून राज्यातलॉ काँग्रेस मराठा वर्चस्वाखाली तर केंद्रातली ब्राह्मणी. हे वर्चस्व भाजप या पाहुण्याने संपवलं.
बापटांनी मुलाखतींचा सपाटा
बापटांनी मुलाखतींचा सपाटा लावलेला असताना लोकसत्तेतली हि मुलाखत नजरेस पडली; आवडली. इतर चॅनल्स तेच-तेच मुद्दे उगाळत असताना मेहेंदळ्यांनी मांडलेले मुद्दे, बापटांची त्यांच्याच मुद्द्यावर केलेली कोंडी, गॉच्चा मोमेंट्स मधे बापटांना लीवे देउन त्यांना परत रुळावर आणण्याचं मेहेंदळ्यांचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. लोकसत्तेची घसरती (उतरती) कळा बघता मेहेंदळेंच्या रुपात एक आशेचा किरण दिसतोय..
इतरत्र वाचनांत आलं कि ध्बनीप्रदुषणा नंतर बापट नागरी समस्यांचा पाठपुरावा करणार आहे.. बातमीत तथ्य असेल तर, मोर पावर टु हिम...
तो इंटरव्ह्यू मी पाहिला
तो इंटरव्ह्यू मी पाहिला.मुलाखतकार डोक्यात गेला.त्याच्या दातावर ठोसे मारावे वाटले.या सर्वांना 7 हॅबिटस ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल मधल्या5 लिसनिंग लेव्हल चा अभ्यास करणे गरजेचे आहे.बापट तेच ते मुद्दे बोलतात कारण त्यांचे विचार, भूमिका पक्की आहे.मुद्दाम कुत्सित हसत काहीही प्रश्न विचारणे, त्यातून काहीही अर्थ काढणे, बापटांचा मुद्दा स्वतःला सोयीच्या निष्कर्षाचा नसला तर त्यांना मध्येच काटुन स्वतःचं काहीही प्रवचन चालू करणे, मुद्दाम वादग्रस्त विषयांवर मतं विचारून 'कशी मजा घेतली' अश्या अविर्भावात स्वतःला सोयीची वाक्य प्रिव्ह्यू मध्ये प्रसिद्ध करणे असं योग्य मुलाखत एथिक्स मध्ये न बसणारं सर्व चालू आहे.दुसऱ्यावर हल्ला कधी चढवता येतो असं दबा धरून काही काळ शांत बसणे, दुसऱ्याचे मुद्दे ऐकल्या सारखे दाखवणे पण त्यातला अर्थ अजिबात लक्षात न घेणे याला 'लिसनिंग' म्हणत नाहीत.
मी एक आस्तिक आहे.ढोल ताशा मनापासून आवडतो.पुण्यातले गणपती कमी गर्दीत जमेल तेव्हा पाहणं हा आवडीचा विषय आहे.पण यामुळे नास्तिक, शहराच्या एका लोकप्रिय भागात राहत असल्याने या उत्सवांचा मुख्य इम्पॅक्ट घेणारे, थोडे टोकाचे पण काही अभ्यास, व्यासंग, वाचन करून बनवलेले बापट यांचे विचार 'मनोरुग्ण' ठरत नाहीत.त्यांचा योग्य तो मुद्दा(आवाज, त्यातून होणारे त्रास बंद होणे गरजेचे आहे.त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना काही घटकांना काही काळ अडचणीच्या वाटू शकतात.) सर्वांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे गरजेचे आहे.
युट्युब इंटरव्ह्यू हे दुष्टचक्र आहे.द्यायला नाही म्हटलं तर हे लोक नकार दिल्याचा गाजावाजा करणार.हो म्हटलं तर मुद्दाम वेगळे असंबद्ध प्रश्न स्वतःच्या चॅनल चे व्ह्यू वाढवायला विचारणार.सेम प्रश्न विचारले आणि मुद्द्याला धरून उत्तरं मिळाली की 'सगळीकडे तीच टेप वाजवतात' म्हणणार.सामान्य, कॉर्पोरेट माणूस कोणी मुरब्बी राजकारणी नेता नसतो, की सगळीकडे वेगवेगळ्या भाषेत बोलून , हवा येईल तशी पाठ फिरवून स्वतःचे मुद्दे रेटत राहील.इतक्या आक्रमक लोकांशी संबंध आल्यावरही न घाबरता, विचार क्षमता आहे ती ठेवून स्वतःचे मुद्दे सांगत राहणं, योग्य संदर्भ योग्य वेळी आठवणं, हे सगळं रोज किमान 10 अतिशय बिनडोक युट्युबर्स साठी वेळ देऊन करणं आपल्यापैकी किती जणांना जमेल?
ध्वनिप्रदूषणाचे टेंडर
ध्वनिप्रदूषणाचे टेंडर जोपर्यंत काढता येत नाही तो पर्यंत राजकारणी यात रस घेणार नाही.
https://x.com/manas_muduli/status/2068960752514539849
या प्रकारचा काहीतरी आयडीया काढली बापटांनी तर काही होऊ शकेल.
सोशल मीडीयात आपली बाजू
सोशल मीडीयात आपली बाजू आपल्यालाच लढवावी लागते. एखाद्या ठिकाणी गँग सक्रीय असेल, तेव्हां गँगच्या नजरेतून जे जे योग्य असेल तेच पवित्र असतं. आपल्यापेक्षा वेगळा विचार हा "खल" ठरवला जातो, त्याला उडवण्यासाठी ड्युआयडींचा सापळा बनवला जातो, आणि त्या आयडीला उकसवून नंतर कारणांना महत्व न देता उडवण्याचं निमित्त मिळाल्यानंतर "एण्काउंटर" केला म्हणून फुशारक्या मारल्या जात असतील, तर अशा ठिकाणी शांत राहण्याला मर्यादा असतात.
अरे ला कारे करणे आणि टोचून मुद्दे मांडणे अनिवार्य होते. ड्युआयडीला ड्युआयडीनेच उत्तर द्यावं. पण आपला तो बाब्या, दुसर्याचं ते कार्ट असं खुद्द अॅडमिनला वाटत असेल, ते इतरांना ड्युआयडी बहाल करत नसतील, कुणी या विरोधात साथ देत नसतील, तर आपली लढाई आपणच लढली पाहिजे. जे साथ देत नाहीत, ते कितीही देवत्वाचा आव आणत असले तरी अशांशी मैत्री फार काळ ठेवण्यात अर्थ नाही. ज्याला बर्या वाईटाची चाड आहे तेच मित्र.
जे सोशल मीडीयात तेच प्रत्यक्षात सुद्धा. लोक बिलंदर असतात. उघड भूमिका हीच त्याची खरी भूमिका समजण्याचा भाबडेपणा केव्हांच गेला.
सरकारने ठरवले तर अशक्य काहीच
सरकारने ठरवले तर अशक्य काहीच नाही.
किंवा एकदा " भाईयो और बेहनो, अबसे हम डिजे नहीं बजाएंगे.., " अशी एक हाक आली तरी थाळ्या वाजवणारे सगळे डीजे फोडायला धावतील.
फक्त इच्छा हवी.
अखेरीस माझा आवडता विषय
अखेरीस माझा आवडता विषय बापटांच्या तोंडी आला हे फार उत्तम झाले.
वारी
त्यांना आपुलकी असलेल्या अनेक
त्यांना आपुलकी असलेल्या अनेक मानचिन्हांवर सार्वजनिकरीत्या राळ उडवली गेली आहे. >>>या सर्वाच्या चेन रिऍक्शनची सुरवात जेंव्हापासून भाजप, आरएसएस ने, गोडसे व्हॅलिडेट करायला सावरकरांना हिरहिरीने मैदानात उतरवले तेव्हा पासून झाली, असे तुम्हाला वाटत नाही काय? माझ्या आठवणी प्रमाणे, माझं शिक्षण पूर्ण होऊनही बरीच वर्ष उलटेपर्यंत (२००८-२०१०) मला सावरकरांबद्दल सार्वजनिकरीत्या महाराष्ट्रात काही वावगे बोललेले गेल्याचे आठवत नाही, अर्थात काही मोजके अपवाद असू शकतात, (ज्यांच्यातील सुप्त संघर्ष ठरविक माध्यमांद्वारे, ठरावीक वर्तुळात सुरवाती पासून सुरु होता.) माझं वैयक्तिक मत आहे, निदान सावरकरांच्या बाबतीत त्यांच्या प्रतिमेच्या अहितासाठी जेवढी भाजप/आरएसएसची त्यांना स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केवळ प्रखर हिंदुत्वादी म्हणून प्रक्षेपित करण्याची (with underlined support to Godase) करणी कारण ठरली, तितकं इतर काहीही ठरलं नाही. आणि या अपरिहार्य धुमश्चक्रीची कल्पना भाजप+आरएसएस ला नसेल असे मला तरी वाटत नाही, कारण राजकीय भूमिकेतून जर पाहीले तर काँग्रेससाठी 'गांधी' ('महात्मा' हे silent) हे नाव (विचारधारा नव्हे) आजही नॉन निगोशिएबल आहे, आणि भविष्यातही राहील.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DdDy_fzR-Wz/?stkn=ZTBvdHhmb3dham55
१. अंधभक्त हा शब्द वापरणं मी
१. अंधभक्त हा शब्द वापरणं मी कधीचंच थांबवलंय. इथे अमितचं वाक्य quote करताना तो आला. पण त्यामुळे एक छान वर्ड सॅलड वाचायला मिळालं.
२. लिहू शकतो व लिहू इच्छितो , इथे फार वेळा लिहिली नाही. नेमक्यावेळी कीबोर्ड लॉक झाल्याने राहिले डोक्यातल्या डोक्यात सारे विचार माझे.
पुढच्या तीन वाक्यांत सबबी आहेत. न लिहिण्याची ही कारणे आहेत का?
म्हणूनच मी अनेकदा लिहिलंय की भाजपने निवडणुकीत विजय मिळवला की तेवढ्यापुरती ही मंडळी राजकारणाच्या धाग्यावर उगवतात. भाजपच्या कारभाराबद्दल बोलण्या सारखं यांच्याकडे काही नाही.
३. निवडणुका जिंकल्या हे नेहमीचं उत्तर आहे. त्या कशा जिंकल्या हे जसं यांना माहीतच नाही.
४. न पटणार्या गोष्टींत दर्गा आणि मशिदींसमोर हिंदूं च्या सणाला होणारे प्रकार आलेले नाहीत.
५. अभ्यासोनी प्रकटावे हेच करत होतो. त्यावरच्या प्रतिक्रिया लक्षात आहेत. त्यामुळे आता कोणाचेही मतपरिवर्तन करण्यात रस नाही. १२ वर्षे वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनल अॅटॅक्स सहन करत आलोय. संभावित लोकांकडून आणि त्याहून जास्त स्वतः ची ओळख दाखवू न शकणार्यांकडून.
ताजा अॅटॅक - मी हिंदू नाव घेऊन लिहिणारा मुस्लिम मनुष्य आहे. आरक्षणाच्या बाजूने लिहिलं की लायकी नसताना आरक्षणाच्या जोरावर नोकरी मिळालेला असं लिहिलं गेलंय. यावर कोणी काही लिहिलेलं दिसलं नाही. पण माझ्या लेखनात सवर्ण किंवा ब्राह्मणांबद्दल काही लिहिलेलं दिसलं की लगेच प्रतिक्रिया उमटते.
६ ब्राह्मण्य आणि ब्राह्मण ही चर्चा आधी झाली आहे. त्यात मला पुन्हा जायचे नाही. आता संघाच्या विचारधारेवरच हल्ला करायचा तर तो संघासारख्या गुळमुळीत भाषेत करून काय उपयोग? मुळात तुमची कोअर विचारसरणी ती आहे. ( हे ज्यांना लागू नाही, त्यांनी लावून घेऊ नये. घेतले तरी मला फरक पडत नाही). दूर लोटलं ही सबब आहे. (पुण्यातल्या ब्राह्मणांना भाजप किती विचारतो हे सोदाहरण लिहिले आहे.- ती पुण्यात ल्या ब्राह्मणांचीच तक्रार आहे. मला अर्थात फरक पडत नाही. )
सक्षम पर्याय दिला नाही, ही सुद्धा. मुळात जी आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आला त्यातली काय पूर्ण केली? तेवढं कारण पुरेसं नाही का? तेव्हा ही सुद्धा सबब आहे. हिंदू राष्ट्र हवं हे सांगायला काही जण अजूनही लाजत आहेत.
भाजप विरोधी पक्षाबद्दल बोलताना सतत मुस्लिमांचं नाव घेतो. औरंग्याच्या अवलादी आणि काय काय. वंदे मातरम पूर्ण म्हणणं हा यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे.
७. बापट प्रकरणी थोडाफार कंठ फुटला कारण या गोष्टींचा त्रास यांनाही होतोय. पाहुण्याच्या काठीने साप मरत असेल तर बरंच आहे. इथेही आमच्या भाजपला काही म्हणायचं नाही हं, हे आहेच. या आणि दुसर्याही धाग्यावर.
८. स्वार्थ - ध्वनिप्रदूषण कमी झालं तर बरं हा स्वार्थ आहे. पण यातही गंमती पाहिल्यात. इथेनॉलमुळे गाड्यांच्या भागांचं नुकसान होतं हा एक चर्चेचा मुद्दा आहे. तिथे उघड चर्चेत इथेनॉल मिश्रणाविरोधातले मुद्दे उडवून टाकायच्या लायकीचे असं लिहून खाजगी गप्पांत मात्र काळजी व्यक्त करायची.
चीनमध्ये धरण बांधल्याने पर्यावरणाचं काय होईल म्हणून काळजी करायची आणि भारतात उदा: निकोबार मध्ये जे चाललंय त्याबद्दल मौन.
पण तेच पश्चिम घाटातल्या संरक्षित भागांच्या यादीत आपलं गाव आहे का नाही , हे पाहायचं.
९. प्रत्येक ठिकाणी अट्टाहासाने संतुलित भूमिका घेणार्यांचा कंटाळा आला आहे. काही मुद्दे माझ्यासाठी तरी महत्त्वाचे आहेत. तिथे स्पष्ट भूमिका न घेणे किंवा भूमिकाच न घेणे हे कारण फुली मारायला भाग पाडते.
फार्स विथ द डिफरन्स नी सावरकरांबद्दल जे लिहिलंय त्याला +१. बावळट काँग्रेसच्या काळात सावरकर महान देशभक्त होते हे शालेय इतिहासात शिकवले गेले. आमच्या वेळी स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास शालेय पाठ्यक्रमात नव्हता. गांधींची हत्या नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूने केली ,एवढंच शिकवलं होतं. आता यामागे सावरकर धार्जिण्या लोकांच्या हाती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ असणे हे कारण असू शकते.
सध्या सात्यकी सावरकर जे करत आहेत , त्यात मला तर अगदी मज्जा येतेय.
१०. बापटांवर झालेल्या हल्ल्याबाबत. कॅमेरामन किंवा चॅनेलचा पत्रकार मध्ये पडल्याने त्यांना फक्त एक चापट बसली. मारणार्याचं समाधान झालं नव्हतं.
भाजपने नुकतीच आपली सोशल मीडिया टीम बदलली आहे. ( यात प्रीती गांधी नावाच्या बाई आहेत. त्यांनी आपल्या अकाउंटवरच्या १.२२ लाख ट्वीट्स डिलीट केल्या. आधी १.२३ लाख ट्वीट्स होत्या. मी गांधींना नाही तर गोडसेला मानते हे त्यांचं जुनं ट्वीट आहे. डिलीट केलं की ठेवलंय का माहीत नाही. इंटरनेट सगळं जपून ठेवतं. )
आणि त्यानंतर भाजपच्या राज्यनिहाय सोशल मीडिया अकाउंट्सनी दिमागी नक्षलना टारगेट करत चित्रपट वेबसिरीजमधली हिंसक दृश्ये शेअर केली. स्वतंत्र भारद्वाज एकटा नाही.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना एका भाजप स र्थकाने केलेल्या मारहाणीचे मायबोलीवर समर्थन केले गेले.
बापटांनी सिव्हिक इश्युजमध्ये
बापटांनी सिव्हिक इश्युजमध्ये पडू नये. असे मुद्दे उचलणार्या संतोष पंडित नामक इन्फ्ल्युएन्सरला रात्री १ वाजता पुणे पोलिसांनी उचलला. कोण्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असं काहीतरी एका रीलमध्ये तो म्हणाला. ते त्या महिलेबद्दल नव्हतंच.
दुसरीकडे पानसरेंच्या पुस्तकाच्या प्रकाशकाला आईबहिणीवरून गलिच्छ शिव्या देणार्या सत्ताधारी पक्षाच्या आमदाराविरोधात केस नोंदवायला कोर्टाकडून आदेश आणावा लागला.
>>> कंठ फुटला
>>> कंठ फुटला
सगळी स्वतःचीच गृहीतके आणि तीच मांडण्यात आनंद मिळवणे
मजा आहे एकूण
दोन तीन दिवस गॅप घेऊन बापट
दोन तीन दिवस गॅप घेऊन बापट ऐकले कि अजीर्ण होत नाही.
https://www.youtube.com/watch?v=EruPquBKMYg
ते मायबोली वाचत असावेत किंवा त्यांचा एखादा गुप्तहेर त्यांना इथले मुद्दे पोहोचवत असावा अशी शंका घेण्यास वाव आहे.
कुमार नागे यांना ते मानतात.
Pages