बृहनपुण्याचे बापट बाप्पामुळे बाल बाल बचावले

Submitted by Madan Hunkare on 27 August, 2026 - 12:47

पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.

यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.

https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.

अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.

पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0

उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हो, लॉजिकल फॅलसीचं उदाहरण देताना बापट ढोल-ताशांच्या पंगतीत सतीची प्रथा बसवतात त्यावर आता काय बोलावं हा प्रश्न पडतो...

त्याच्या बोलण्याला काही फिल्टर नाहीये Happy इतकी वर्षे त्याच्या लिमिटेड सर्कल्स मधे जे बोलले जात होते त्याचा नळ समोर माईक आला की तो उघडून सोडून देतो. त्यामुळे ओव्हरबोर्ड जाणे हे ओघानेच आले Happy आता माईकसमोर आलोय, आपली मते जरा मॉडरेट करून बोलले पाहिजे वगैरे त्याच्या गावीही नसते. त्यामुळेच त्याची मते पटो वा ना पटो त्याच्या मुलाखती ऐकायला जाम मजा येते. उलट तो "रीड द रूम" करू लागला तर बोअर होईल.

(आपल्याच वयाचा किंवा लहानच वाटतोय म्हणून एकेरी)

मिडलग्राऊंड न सुचवणे हे बेस्ट आहे. निगोशिएट करायला तो राजकारणी नाही, आणि निगोशिएट करायला गेलं की कधी माकड करतील कळणार नाही. तो त्याला जे वाटतं ते मनापासून बोलतोय. बदल हा लोकांनाच घडवुन आणायचा आहे. त्याच्या मुलाखती बघुन लोकांनी काही केलं तर तो बदल असेल. नुसती बोटचेपी भूमिका घेऊन काहीच होत नाही हे ७० वर्षांत समजलं असेल.
एकदा का मिडलग्राउंडवर आले की वॉटरडाऊन वर वॉटरडाऊन कसं होतं हे आपल्या सारख्या जुगाडू भारतीयांना वेसांन!

बापट बोलू लागले कि अजित अभ्यंकरांची आठवण येते. पण बापटांकडे इनोसन्स आहे.
स्तुती केल्यावर अवघडलेपण एक सेकंद झळकतं, मग लगेच ते विषयावर येतात.

द्वैत अद्वैत वगैरे मुद्दे हे मागणीशी संबंधित नाहीत. मुलाखतकाराने त्यांना काय वाचता असे विचारल्यानंतर नॉन फिक्शनल असे उत्तर दिले होते. त्या ओघात ते मुद्दे आले. त्याचाही खुलासा त्यांनी केलाच आहे. प्रश्नाच्या अनुषंगाने दिलेल्या उत्तरांना मुख्य मागणीशी जोडून वेगळं वळण द्यायचा प्रयत्न होतोय.

मायबोलीवर असतील तर त्यांनी https://www.maayboli.com/node/87782 इथे लिहावे ही विनंती.

समाजविघातक प्रथा केवळ रूढ झाल्या आहेत म्हणून पुढे चालवायलाच हव्यात असं नाही, आणि त्या बंद करण्याइतकी समज समाजाला नसेल तर ते कायद्याने करावं - या तर्काचं सती प्रथेहून परिणामकारक उदाहरण राज यांनी बापटांना सुचवायला हरकत नाही.

>>> डेसिबल आवाक्यात आणा, मिरवणुकिंवर बंदि घाला इ. जी प्रॅक्टिकेबल नाहि.
का नाही? त्याशिवाय सणवार होत नाहीत की काय?!
मिडल ग्राउंडसुद्धा बापटांनीच का सुचवायचं?!
मिरवणुकांची पद्धत सुरू झाली तेव्हा लोकसंख्या किती होती, सार्वजनिक मंडळं किती होती, वाहनं किती होती, आणि आता हे प्रमाण काय आहे हे कळायला इतकं अवघड आहे का?!

खरं म्हणजे परंपरेचा पुरस्कार करणार्‍यांनी सण, उत्सव साजरे करताना धोतर, नऊवारी या पारंपारिक वेषात तो केला पाहीजे. डीजे किंवा बापटभाषेत ध्वनीवर्धनयंत्रं ही पूर्वी अस्तित्वातच नसल्याने त्यामुळे परंपरेला धक्का पोहोचतो. (नगारे का नको असा पवित्रा घेतला जाईल.)

*धोतर नऊवारी याच्या पाठीमागे माहितीच्या अभावी जाता येत नाही.

'मानाचे पाच गणपती' हाही एक प्रकार बंद व्हायला हवा. एकूण मंडळे कमी होती तेव्हा हे ठीक होते पण आता ते वेडगळ आहे. इतर अनेक मंडळांना आपले गणपती प्राईम टाईम ला लक्ष्मी रोड वर यावेत असे वाटत असेल. मानाचे गणपती सावकाश जाणार आणी मग सकाळी इतर मंडळे येणार हे चूक आहे. काही मंडळे कोर्टातही गेली होती, आम्ही लक्ष्मी रोड वर वेळेवर आलो तर आम्हाला आधी सोडा म्हणून, त्यांची मागणीही रास्तच होती.

या वर्षी डॉल्बी वर बापट यांचे साउंड बाईट ऐकायला यायची शक्यता आहे. मध्येच स्खलन स्वातंत्र्य, बौद्धिक हस्त मैथुन, याला कोणी कुत्रा ओळखत नाही, इ. बापट यांनी स्वतच एक रिमिक्स काढले तर अजून मजा येईल.

बाकी त्यांची मागणी एकदम रास्त आहे. गोंगाट बंद करा, खड्डे बुजवा इ ऐहिक मागण्या ते करतायेत. मूर्ती हौदात विसर्जनाला जशी सुरुवात झाली आहे तशी हे पण पूर्ण व्हावे.

राहुल कुलकर्णी ने घेतलेला इंटरव्यू मध्येच एकतर बापट बराचसा त्याच्या डोक्यावरून जात होता. एक दोन वेळा त्याचे जहाल विचार ऐकून त्याची तंतरली की त्याला वाटले कुठून हा वेताळ घरी आणला त्याने शेवटी कबुली दिली तुमची माझी मते वेगळी आहेत. आपणही थोडे इंटलेक्चुअल आहे असे दाखवायला त्याने द्वैत अद्वैत विचारले तर बापट ने त्यावर जे ज्ञान दिले ते ऐकून त्याने विषयच संपवला.

कुत्रा ओळखत नाही वाल्या कार्यकर्त्याला फार शिव्या पडतील. त्याने आग लावली आणि बापट चा जो वणवा पेटला त्याने कहर केला. कॉकरोज मोमेंट झाला त्याचा. एकंदरीत या पुढे लोकांशी बोलताना राजकीय लोकाना फार काळजी घ्यावी लागणार आहे असे दिसते.

राहुल कुलकर्णीचं वाचन चांगलं आहे. त्याने घेतलेली मुलाखत चांगली होती. अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री चा संदर्भ अचूक होता.

बापटांनंतर केळकर आले आहेत मार्केट मधे. त्यांनी दिल्लीत केद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यात बापटांना मिळालेल्या ट्रीटमेंटचा उल्लेख आहे. आयोगाने या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस काढली आहे. केळकरांनी प्रत्यक्ष कृती केली आहे.

यशराज मुखाटे मस्त रिमिक्स करेल बापटांच्या डायलाॅगवर. "मी शस्त्रसज्ज नसल्याने" ऐकून मला फार हसायला येते.

याच्यापेक्षा यशराज मुखाते जास्त छान बनवेल.त्याचं कौन था आणि मनी डजंट म्याटर आमच्याकडे प्रसिद्ध आहे.
(सुनीती आणि माझा प्रतिसाद एकाच वेळी आला)

आम्ही एक देखावा केलाय त्यात बापटांना डीजेच्या समोर बांधणार आहोत. त्यात ट्विस्ट आहे. बापटांचा चेहरा सुरवातीला फडक्याने झाकला असेल. डीजे वाजायला सुरवात झाली की बापटांचा बाहुला त्रास होतोय म्हणून गरागरा मान हलवेल. त्याच वेळी खुदा गवाह पिक्चरमध्ये श्रीदेवीच्या तोंडावरचं फडकं उडतं तसं बापटांच्या चेहऱ्यावर लावलेलं फडकं उडेल आणि लोकं बापटांना बघून शॉक होतील.

काल काही अजून व्हिडिओ पाहिले. त्याच्या मराठीचा एक वेगळा फॅन क्लब झाला आहे.
किंबहुना त्यामुळेच जास्त वायरल होत आहे.
पण एका अर्थी ते ही चांगले आहे. त्या निमित्ताने योग्य मुद्दे समोर येत आहेत. हल्ली जो सर्वच जाती-धर्मांकडून सणांच्या निमित्ताने जो उन्माद दिसतो त्यावर निर्बंध बसायच्या दृष्टीने काहीतरी पावले पडतील. याचा त्रास होणारी लोकं पुढे येऊन बोलू लागतील.

नुकतेच जे जेनझी आंदोलन झाले तेव्हापासून असे सर्वच क्षेत्रात आवाज उठवणाऱ्या लोकांना एक बळ मिळाले आहे. सामान्य जनता सोशल मिडिया माध्यमातून एकत्र येत चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवत आहे. देशभरात एक नवीन पॅटर्न तयार झाला आहे ज्याचा फायदा इथेही दिसत आहे. अन्यथा गेले काही वर्षे हा त्रास होताच जो लोकं निमूटपणे सहन करत होते, कोणी उठवलाच आवाज तर तो लागलीच दाबला जात होता.

>>
शेंडे, उधोबाचे कौतुक होतेय पोटदुखीवरचे औषध घ्या
<<
बंद पडलेले घड्याळही दिवसातून दोन वेळा अचूक वेळ सांगते म्हणून काही ते वेळ बघायला वापरत नाही..
उधोबांचा एक निर्णय चुकून बरोबर ठरला म्हणून त्यांची थोरवी सिद्ध होत नाही. आडात नाही ते पोहर्यात कसे येणार?
पोटदुखी होणार नाही काळजी नसावी. भुणभुण थांबवा.

मिडल ग्राउंडसुद्धा बापटांनीच का सुचवायचं?!
>>>
अगदी बरोबर. जनतेने त्यांना अधिकृत प्रवक्ता, प्रतिनिधी किंवा प्रवक्ता म्हणून नेमलेलं नाही. जनतेनं ज्यांना नेमलेलं, निवडलेलं आहे, त्यांनी सार्वजनिक आयुष्याचा काय सत्यानाश करून ठेवला आहे, ते पाहता बापट वापरत असलेले सैन्यबलप्रयोग सारखे शब्द आणि शहराबाहेर गोंधळ घाला- असे वरकरणी विचित्र वाटणारे तर्कवाद हे त्यापुढे काहीच नाही. बापटांनी रीझनेबल असायची, निगोशिएशन करायची गरज नाही. त्यांची आक्रमक शब्दयोजना आणि टोकाचे तार्किक युक्तीवाद यामुळे प्रश्नाचं गांभीर्य कळलं तरी फार झालं, त्यातुनच काहीतरी होण्याची अपेक्षा ठेवता येईल.

'मी अमेरिकेत नसल्याने शस्त्रसज्ज नव्हतो' वगैरे कितीही अजब वाटत असलं, तरी ते ज्या पद्धतीने हे ठासून जवळजवळ प्रत्येक मुलाखतीत सांगत आहेत ते पाहता त्यांची या गोष्तीची काहीएक मांडणी करायचा हेतू आहे, त्यामागचं लॉजिक आणि मानसिक बैठक पक्की आहे- हे मानायला जागा आहे.

त्यांनी 'आयडेंटिटेरियन' असा शब्द वापरला आहे. हा शब्द शेवटी केव्हा वाचला ऐकला होता तेही आठवत नाही.

(बापटांचं ज्ञान, वाचन, तर्कबुद्धी आणि वक्तृत्त्व- या सार्‍याच बाबतीत त्यांच्यापेक्षा मी फारच लहान असल्याने त्यांना अहो-जाहो करतोय.

असंही त्यांचं वय ३७ आहे. म्हणजे तसे माझ्यापेक्षा मोठेच. Proud )

एक नोंद -
किरकोळ अपवाद वगळता मेनस्ट्रीम प्रिंट मेडियाने बापटांची दखल घेतलेली नाही. (लोकल गुंंडांच्या मारामार्‍यांच्या बातम्या हे लोक मोठ्या मथळ्यांत छापतात, तेही 'राडे', 'धूम' वगैरे शब्द वापरून). बापटांचा ऑडियन्स (समर्थन देणारे- या अर्थाने) ३५-४० वयाच्या पुढचा असावा, आणि प्रिंट मेडियाचाही तोच आहे. सीजेपी आंदोलन ज्या पद्धतीने सोशल मेडियावर चालवलं गेलं, त्यावरून या लोकांनी काहीच धडा घेतलेला नाही हे स्पष्ट होतं. स्वतःच स्वतःच्या मरणाच्या वाटेने जाणं- असं याचं वर्णन करता येईल.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिस आणि / किंवा प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. त्या परवानगीसाठीच्या अटींत ध्वनिप्रदूषण करणार नाही, अशी अट घालायची. मुंबईत रस्त्यात खांब पुरा यला खड्डे खोदले तर दंड लावतात म्हणे. त्यांना मिळणार्‍या पैशापुढे तो कितीसा असेल.
इथे पुण्याच्या महापौर म्हणतात - गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही, हे मी पाहेन. त्यांना ढोल ताशा सरावासाठी जागा करून देईन.

पण त्यांचा अंतिम मुद्दा सार्वजनिक गणेशोत्सव आता औचित्यहीन ( त्यांनी काय शब्द वापरला आठवत नाही, जड शब्द म्हणून मी हा वापरतोय) झाले आहेत, हा अगदी योग्य आहे.

आपल्याकडे आता सगळ्या सणांचं सार्वजनिकीकरण करून ते रस्त्यावर आणले जात आहेत. त्यात त्यांतली धार्मिकता नष्ट होतेय, धर्मांधता वाढतेय. याविरोधात बोलायचं धैर्य किती जणांकडे आहे? की हे योग्य वाटतंय?

मुख्यमंत्री देवाभैयांनी आपली खरी सन्स्कृती काय आहे ते पुणेकरांनीच दाखवून द्या , असं म्हटलंय. म्हणजे पोलिस अर्थात गृहखातं. ध्वनिप्रदूषणाबद्दल का ही ही करणार नाही, असंच दिसतंय. कळेलच. घोडा मैदान जवळ आहे. आधी गोकुळाष्टमी आहेच.

<कुत्रा ओळखत नाही वाल्या कार्यकर्त्याला > त्यांची पदावनती करू नका. ते भाजप पुणे शहर अध्यक्ष आहेत.

मिडल ग्राउंड - मध्यममार्ग सांगितला ना त्यांनी. एखादं मैदान किंवा सभागृह उपलब्ध करून द्या. तिथे काय ते करा. आवाज तिथून बाहेर येणार नाही याची सोय करा.
उदाहरणासाठी मैदानांची नावं सुद्धा गोळीबार, ईदगाह अशी घेतल्याचं आठवतं.

मुंबई तक वरचा मेधा कुलकर्णीं सोबतचा कार्यक्रम. मेधा कुलकर्णींनी त्यांना आणि मला एका फ्रेममध्ये ( चित्रचौकटीत ) ठेवू नका , आम्ही एकमेकांशी सरळ बोलणार नाही, अशा अटी घातल्या होत्या की काय?

जागतिकीकरणामुळे आता एकच एक सण साजरा केला जावा. सर्व सण, उत्सव रद्द करून २५ डिसेंबरपासून सर्वांनी नाताळ साजरा करावा. या सात दिवसात आपापल्या आवडीप्रमाणे देव ठेवावेत. गाणी आपल्या धर्माची वाजवावीत. म्हणजे संपूर्ण जगात एकच सुटी राहील. कुणाचाही खोळंबा होणार नाही.

मला त्यांची खरंच काळजी वाटू लागली आहे >>> त्यांना दगाफटका होईल या दृष्टीने, की त्यांच्या हातवार्‍यांना, नॉनस्टॉप तार्किक बोलत सुटण्याला आणि अजब युक्तीवादांना अनेक लोकांनी रोगट मानसिक अवस्थेचं नाव दिलं आहे- या दृष्टीने?

या वरच्या व्हिडिओत ते महत्वाचं बोलत आहेत, पण जास्त आक्रमक पद्दतीने, आणि 'कटकट' 'फालतुपणा', 'रोग' असे शब्द पुन्हापुन्हा वापरत आहेत. त्यादृष्टीने चिन्मयने फेसबुकवर मुद्दा मांडला आहे त्याची आठवण आली. त्याच्याशी पूर्ण सहमत नाही, मात्र ज्यांच्याविरुद्ध लढाई आहे, त्यांच्या डोक्यावरून जाईल, समजणार नाही- अशी भाषा वापरून हाती काही लागणार नाही, इतक्यापुरता तो मुद्दा मान्य आहे.

मात्र बापटांनी हेही स्पष्ट केलं आहे. मला या सार्वजनिकरीत्या धुडगूस घालणार्‍यांशी बोलायचंच नाही. कारण धर्म, अस्मिता, भावना, परंपरा यांपलीकडे त्यांच्याजवळ बोलण्यासारखं काहीच नाही- असं ते म्हणतात. मनपामध्येही मी त्यांच्याशी बोलायला गेलोच नव्हतो, तर प्रशासनाने विरोध असणार्‍यांना मत आणि म्हणणं मांडण्यासाठी बोलावलं होतं म्हणून गेलो होतो; मला बोलायचं आहे ते कायदे करण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींशी, आणि त्यांची अंमलबजावणी करणार्‍या प्रशासनाशी, अधिकार्‍यांशी- असं त्यांनी मुद्देसूदरीत्या सांगितलं आहे.

Pages