पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.
यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.
https://www.youtube.com/watch?v=_5eE-0FDvhw
पुणे ही सांस्कृतिक राजधानी असल्याने संस्कृतीवरच बंदी आणण्याची मागणी केल्याने लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक कार्यकर्ते यांचे भान सुटणे हे एकदम नॅचरल होतं. बापट किरकिरे असतील. पण जिवावर उदार होऊन अशा मागण्या करू नयेत हे कुणालाही कळते.
अशा वेळी बाप्पानेच महापौर मंजुषा नागपुरे यांना बुद्धी दिली आणि त्यांनी "कोण आहे हा, याला धक्के मारून बाहेर काढा" असे उद्गार काढले. यामुळे सभागृहात जीवहिंसा न होता बापट बचावले.
पण बापट सुधारले का?
https://www.youtube.com/watch?v=HsLNl-Gdzv0
उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बापटांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU
मिरवणुकीच्या दिवशी
मिरवणुकीच्या दिवशी रुग्णवाहिका रुग्णापर्यंत व रुग्णालयात कशी पोचणार?
फेसबुक आणि सोशल मीडिया
फेसबुक आणि सोशल मीडिया आल्यावर दहा दिवस रस्ताअडवून व्याख्याने आयोजित करण्याचीही गरज नाही. युट्यूब लाईव्ह करता येतो.
फक्त गणेशोत्सवात डीजे बंद करण्याची बहाणेबाजी बंद व्हायला हवी. 6 डिसेंबर ला दादरला खूप घाण होते म्हणणाऱ्यांना देखील attrocity लागल्याचे एकही प्रकरण ऐकिवात नाही. खैरलांजी प्रकरण, खर्डा प्रकरणी गुनेगारांना शिक्षा झाली असे उदाहरण नाही. ही खोटी प्रकरणे होती. खून झालेच नव्हते.
दहीहंडी + गणेशोत्सव + आता गणेशजयंती + रामनवमी (गेल्या दहा वर्षांत) + नवरात्र + दिवाळी फटाके स्टॉल आणि रस्त्यावर लाखांची माळ लावणे. हे किती प्रमाणात आहे?
आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती फक्त त्या त्या वस्तीत असते. सर्व शहरभरात नाही. तरीही डीजे आणि नृत्य बंद व्हायला हवेच. पण एक दिवस ते ही मर्यादित वस्त्यात चालणाऱ्या धिंगाण्यामुळे आम्ही संपूर्ण शहर वेठीस धरणार आणि आम्हाला फारच अन्यायाला तोंड द्यावे लागते, आमच्या वर केसेस होतात हे ऊर बडवणे थांबवावे.
जर गणेशोत्सव दहीहंडी नवरात्रि विधायक मार्गाने होऊ लागले आणि जर इतरांनी अडेलतट्टू भूमिका घेतली तर भीमा कोरेगांव ला जसा धडा शिकवला तसा शिकवायला फडणवीस समर्थ आहेत. आजवर हल्लेखोरावर attocity सोडाच कायद्याचं कोणतंही कलम लागलेलं नाही. उलट ज्यांचा दूरान्वयानेही संबंध नाही ते तुरूंगात जामीन मिळाता तडफडून मेले.
फडणवीस असताना गळे काढण्याचे कारणच नाही.
फेसबुक आणि सोशल मीडिया
फेसबुक आणि सोशल मीडिया आल्यावर दहा दिवस रस्ताअडवून व्याख्याने आयोजित करण्याचीही गरज नाही. युट्यूब लाईव्ह करता येतो.
मग मांडव टाकून गणपती बसवण्याची ही गरज नाही
एआय ने सोशल मीडियावर सगळे गणपती आरती सगळं काही घरबसल्या मिळेल
सगळंच वाचेल मग ना दर्शन सोहळा ना विसर्जन
सार्वजनिक उत्सव केलेच पाहिजेत
सार्वजनिक उत्सव (रस्त्यावरच) केले पाहिजेत कारण.
१
२
३
४
n-1
n
लिहा.
गणपती, शिवाजी जयंती, आंबेडकर
गणपती, शिवाजी जयंती, आंबेडकर जयंती, ईद, अण्णाभाऊ साठे जयंती या सगळ्याच वेळी शहर वेठीस धरलं जातं.
पण जसा विरोध सध्या गणपतीच्या मिरवणुका आणि कार्यक्रमांना होतोय, तसा विरोध शिवाजी जयंती, आंबेडकर जयंती किंवा अण्णाभाऊ साठे जयंतीला होताना दिसणार नाही. कारण उघड आहे.
ॲट्रॉसिटीचा गुन्हा कदाचित होणार नाही, पण प्रतिक्रिया हिंसक होण्याची शक्यता नक्कीच आहे.
ईदची गोष्ट तर सोडूनच द्या.
पाच वेळच्या भोंग्याचा त्रास
पाच वेळच्या भोंग्याचा त्रास होत नाही का, हा प्रश्न कपडे बदलून आलाय.
#dogwhistling.
आता धागा भरकटतोच आहे तर
आता धागा भरकटतोच आहे तर लिहितो. मोहर्र्मच्या मिरवणुकांत मोठ्या प्रमाणात हिंदूही सामील होत. मग एकदा हिंदू मुस्लिम दंगे झाले. त्यानंतर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले.
महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक जलशांनाही हे उत्तर किंवा पर्यायी होते .
चर्चेचा विषय सार्वजनिक उत्सवा
चर्चेचा विषय सार्वजनिक उत्सवा मुळे होणाऱ्या आवजाचा आहे आणि त्यासाठी निमित्त येणाऱ्या गणपती उत्सवाच आहे.
आणि धाग्याचा विषय फक्त आणि फक्त गणपती उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचाका असेना उपाय योजना राबवयाच्या असतील तर सर्व बाजूनी विचार करायला हवा.
नाहीतर भाजप वाले हिंदू वर हल्ला म्हणतील आणि काँग्रेसवाले धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला.
फक्त गणेशोत्सवातलाच आवाज
फक्त गणेशोत्सवातलाच आवाज बंद करा, असं इथे वा अन्यत्र कोणीही म्हटलेलं दिसत नाही. सोशल मीडियावरच्या पोस्टीत मुस्लिम ( नावांनी लिहिणारे) लोक सुद्धा ईदच्या मिरवणुकीत डीजे नको असे म्हणताना दिसताहेत.
सगळ्यांचा सूर सगळेच धार्मिक सण असा आहे. काहींनी पुढे जाऊन राजकीय पक्षांच्या मिरवणुका, क्रिकेट संघ जिंकल्यानंतरच्या निवडणुका, लग्न, वाढदिवस असे कौटुंबिक सोहळे यांचीही भर घातली आहे.
लाउडस्पीकर इ.चा त्रास गणेशोत्सवात सर्वाधिक होतो, असे गणेशभक्तही म्हणत आहेत. आवाजाची सुरुवातही तिथूनच झाली आहे. तिथून सुरुवात करा , असे म्हटले तर चूक काय? विषयही नेमका गणेशोत्सवाच्या वेळीच आला आहे.तो बंद करा. बाकीचे करणार नाहीत, हे गृहीतक कशाच्या आधारावर?
"ही भूमिका मांडणारे मराठी
"ही भूमिका मांडणारे मराठी मातीतल्या मराठी माणसाचे हिंदू सण याच्यावर रोक लागण्याचीच भूमिका या लोकांची दिसतेय. मला कुठल्याही अन्य धर्माबद्दल बोलायचं नाही. कुठल्याही अन्य पंथाबद्दल बोलायचं नाही. त्यांची जशी मुभा आहे, तशी आमची पण मुभा आहे. "- हे आशिष शेलार यांचे शब्द आहेत. ते भाजप नेते आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत. म्हणजे ही सरकारची अधिकृत भूमिका आहे. पुढे तोंडदेखलं काळजी घेऊ , नियम पाळू म्हटलंय ते कसं ते पीओपीच्या उंच मूर्ती , त्यांचं नदी समुद्र तळ्यांत विसर्जन प्रकरणी दिसलंच आहे. सरकार यांचंच असताना उत्सवांच्या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारीची दखल पोलिस घेत नाहीत, असं यांच्याच खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्यात.
म्हणजे आम्हांला "आमच्या" सणाउत्सवांत आम्हांला हवं ते करता यावं म्हणून आम्ही इतरांनाही सूट देतो. शेलारांनी तुम्ही पाच वेळा भोंगा, ईदच्या आणि १४ एप्रिलच्या मिरवणुकांतले आवाज सहन करा, असंच अप्रत्यक्ष सांगितलं आहे.
आता देवाभैयांनी नियम पाळले जातील, असं म्हटलं असलं तरी खरंच पाळले जातात का ते कळेलच.
यंदा उत्तर प्रदेशांतल्या कावड यात्रां मधल्या डीजेच्या उंचीचे नियम पोलिसांनी पाळायला लावलेत, असं वाचलं. इथे काय होतं पाहू.
आणि अॅट्रोसिटीची केस दाखल करणं किती सोपं असतं ते खरगे प्रकरणी दिसतंच आहे. उलट आमच्याच धर्मातल्या प्रथाप रंपरांवि रुद्ध म्हणजे आमच्याच धर्माविरुद्ध बोलतो, असं म्हणून दाभोलकरांना याच पुण्यात संपवलं गेलं. आगरकरांची ते जिवंत असताना प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. -पुण्यातील काही कर्मठ सनातन्यांनी एकत्र येऊन आगरकरांच्या हयातीतच एका तिरडीवर (मृतदेह वाहून नेण्याचे साधन) त्यांचा एक प्रतीकात्मक पुतळा/पत्रावळ ठेवून प्रेतयात्रा काढली. ही प्रेतयात्रा पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या आगरकरांच्या घरासमोरून ढोल-ताशे वाजवत आणि घोषणा देत नेण्यात आली. आपल्याच घराच्या खिडकीतून आगरकर आणि त्यांच्या पत्नी यशोदाबाई यांनी ही स्वतःचीच 'अंत्ययात्रा' पाहिली. सनातन्यांनी त्यांच्या घरासमोर त्या प्रतीकात्मक शवाचे दहन केले
कमी आवाजाची सुरुवात
कमी आवाजाची सुरुवात गणेशोत्सवा पासूनच झाली तर चांगलंच आहे कारण सर्वात जास्त त्रास गणेशोत्सवा मध्येच होतो. पण होईल असं वाटतं तर नाही.
झालं तर मग.
झालं तर मग.
वर एक सूचना आली होती की जी मंडळं आवाज करणार नाहीत, त्यांना बक्षीस द्या. त्यापेक्षा जी मंडळं आवाज करतात, त्यांना वर्गणी देणार नाही, अशी भूमिका घ्या. त्या मोठ्या देणगीदाराने घेतलीच आहे. पुनीत बालन का?
इतर कुणीही त्यांच्या
इतर कुणीही त्यांच्या त्यांच्या सणांना/ जयंत्या पुण्यतिथ्यांना भोंगे डीजे वाजवत असले तरीही गणेशोत्सवाच्या निमित्ताने शांततेने उत्सव करण्याची चांगली प्रथा घालून द्यायला काय हरकत आहे?
नशीब... सती प्रथा बंद करतांना आधी ट्रीपल तलाक बंद करून दाखवा असं म्हटलं नाही....
मेधा कुलकर्णी म्हणाल्या
मेधा कुलकर्णी म्हणाल्या सतीचा उल्लेख धर्मग्रंथांत कुठेही नाही. परकीय आक्रमणात स्त्रियांना सुरक्षित ठेवण्यासाठी ती निर्माण झाली आणि पुढे तिने वेगळं रूप घेतलं.
१. महाभारतात माद्री सती गेली.
२. सती प्रथेचं उदात्तीकरण बंद करणार का? सतीच्या नावे देवळं आहेत. ती कशासाठी?
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/18W6ZgpbBj/
हैद्राबाद मध्ये मिलान-उन-नबीला डीजेवर बंदी.
https://www.instagram.com/reel/Dcg5FCrzYmv/
तरीही जिथे डीजे सिस्टम आणि बाईक स्टंट्स होत होते तिथे पोलिसांनी थांबवले.
कोणताही धर्म हा घरातच असला
कोणताही धर्म हा घरातच असला पाहिजे.
लष्करात अगदी मराठा लाईट इन्फन्ट्री च्या बटालियन मधील गणेशोत्सव कसा असतो. लोक स्वतः वर्गणी काढून श्री गणेशाची स्थानिक मंदिरात प्रस्थापना करतात. तेथे रोज सकाळ संध्याकाळ आरती होते. यासाठी पेटी तबला आणि झाँजा वाजवल्या जातात. तेथे लाऊड स्पीकर नसतोच. प्रसाद वाटलं जातो लोक एकमेकांना भेटतात. त्यानंतर स्थानिक लोकांचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.
शेवटच्या दिवशी मिरवणूक निघते ज्यात श्री मूर्ती शक्तिमान ट्रक मध्ये सजवून ठेवलेली असते बाकी सगळे पायी पायी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी जवळच्या तलावात जातात. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणात श्री गणेशाना निरोप दिला जातो.
मंदिरात गणेशोत्सव, दुर्गापूजा, जन्माष्टमी. बैसाखी (पंजाब रेजिमेंट) ओणम किंवा पोंगल (मद्रास रेजिमेंट) सारखे उत्सव साजरे होतात पण आरतीचा आवाज ५० मीटरच्या पलीकडे जात नाही.
युनिटच्या मशिदीत रमजान ईद किंवा चर्च मध्ये ख्रिसमस साजरा केला जातो.
जन्माष्टमी किंवा ख्रिसमस रात्री बारा वाजता साजरे केले जातात परंतु याचा आवाज बाहेर जाणार नाही याची कसून काळजी घेतली जाते.
मंदिरावर किंवा मशिदीवर बोम्बल्या( लाऊडस्पीकर) नसतोच
यापैकी कोणत्याही सणात डी जे किंवा लाऊडस्पीकर मुळे लोकांना त्रास होणार नाही याची खात्री असते.
नौदलाच्या रहिवासी भागात दिवाळी साजरी केली जाते तेंव्हा नौदलाच्या मैदानात जत्रा भरवली जाते तेथे विविध युनिट खाद्यपद्यदार्थांचे स्टॉल लावतात जेथे विविध खाद्यपदार्थ मूळ किमतीला विकले जातात. मुलान्साठी खेळणी पाळणे सारखे खेळ सुद्धा असतात. त्यानंतर नौदलाच्या खर्चाने लक्ष्मीपूजनाच्या रात्री आठ ते साडे आठ फटाक्यांची मोठ्या मैदानात आतषबाजी केली जाते. एरिया किंवा कमांड कडूनच याचे पैसे दिले जातात त्यामुळे अत्यंत सुंदर अशी आतषबाजी पाहायला मिळते.
त्यानंतर लोक दहा पर्यंत खाणे पिणे आटोपून आपापल्या घरी जातात. रात्री अपरात्री फटके वाजवायला बंदी असते.
आपल्या सणामुळे कुणालाही उपद्रव होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
नागरी आयुष्यात आल्यावर याबद्दल काही बोलले तर लोक लष्करी माणसे एककल्ली (एक्सेंट्रिक) किंवा तिरसट असतात असा शिक्का मारतात.
चालायचंच.
इथे रडून काहीही होणार नाही.
इथे रडून काहीही होणार नाही. आपण सगळ्यांनी एकत्र जमून जे लोकं गणेशोत्सवाची तालीम करत असतील त्यावर चालून जायला पाहिजे. माळरानावर खेचरं चरत असतात त्यांना पकडू आणि त्यांचा घोडा म्हणून वापर करू. रात्री गणेशभक्त तालीम करायला आले की दबा धरून बसलेले आपण सगळे येलगार करत भक्तांवर तुटून पडू. भक्तांची सळो की पळो करून टाकू. गळ्यातला ढोल सांभाळू की जीव सांभाळू अशी अवस्था झाली पाहिजे.
सैनिकी तळावर "आमची गल्ली",
सैनिकी तळावर "आमची गल्ली", "आमचा विभाग" अशी मालकी वृत्ती निर्माण होत नाही. कायम बदल्या होत असल्यामुळे सगळेच उपरे!
उलट पुण्यातील विविध भागात कित्येक दशके गणपती मंडळ अस्तित्त्वात आहेत. तिथल्या लोकांना आम्ही इतकी वर्षे मंडळे चालवत आहोत, समाजाई सेवा करत आहोत मग बदल्यात थोडा त्रास सहन करा. फक्त एखादा महिना. काय बिघडले? अशी अहंकारी वृत्ती आहे.
आम्ही पुण्याची थोर उत्सव परंपरा जपत आहोत. बाकीचे उपरे येऊन ध्वनी प्रदूषण वगैरे खुळे शोधून काढत आहेत असे त्यांना वाटते.
रात्रीचे नांदणे वगैरे आयडी
रात्रीचे नांदणे वगैरे आयडी आले कि मूडच जातो. किती किती आयडी शाबूत असतात रे तुमचे?
अगदी बालगंधर्व आहात..
बारकाईने लक्ष दिलं तर राष्त्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेकांनी गणेशोत्सवात डीजे नको अशी भूमिका घेतली आहे. हे इमेज चमकवणं नसावं ही अपेक्षा आहे. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कधीच लाऊडस्पीकरची गरज पडलेली नाही. काही गोष्टींचं कौतुक केलं पाहीजे. हेडगेवार, गोळवलकर, सावरकर यांचे विचार मागे नेणारे आहेत, पण या संघटनेसाठी ही दैवतं आहेत. पण आजवर मी कधीही हेडगेवार जयंती, गोळवलकार जयंती पाहिलेली नाही. सावरकर जयंती हिंदू महासभेचे लोक करतात.
विचार पुढे नेण्यासाठी व्याख्याने, जाहीर कार्यक्रम किंवा जयंतीचे मोठे कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नाही. संघाचे कार्यकर्ते रोज कुणाच्या ना कुणाच्या घरी जाऊन त्यांना छोट्या बैठकांना बोलवत असतात. तिथे मग शिक्षक किंवा प्रचारक म्हणवणारे गृहस्थ विचारसरणी सांगत राहतात. ही जुनी गोष्ट. आता काय करतात माहिती नाही. शाखा आहेतच. पण तिथे येण्यासाठी हा होमवर्क असतो.
अशी मेहनात पुरोगामी संघटना, गट बिल्कुल घेताना दिसत नाहीत. काही तरी काम केले हे दाखवण्यासाठी गणेशोत्सव, जयंती इ मधे कार्यकर्त्यांना पूर्ण मोकळीक दिली जाते. नेते येऊन पुरोगामी व्याख्यान देऊन जातात. ते कुणी ऐकले, कुणी नाही, त्याचा प्रभाव किती पडला याची मोजदाद नाही. कार्यकर्त्यांना असलं काहीही प्रशिक्षण नाही.
या गोष्टी संघाचे लोक हेरून गणेशोत्सव, जयंतीच्या भावनांचा फायदा उचलत असतात. पूर्वी वेगळे लोक उचलत होते. पण यांचे हेतू पूर्णपणे निराळे आहेत.
ज्या वेळी विचारांचा प्रसार करण्यासाठी निरंतर चालणारे मॉडेल पुरोगामी लोक स्विकारतील तेव्हां समाजात पुन्हा बदल होईल.
महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे डीजे लावला होता? फुलेंचा सत्यशोधक समाज तर किती व्यापक होता. पूर्णपणे अशिक्षित, अडाणी समाजात शाळा काढून तिचं महत्व पटवणं, मुलींच्या शिक्षणाचं महत्व पटवणं यासाठी प्रत्यक्ष कृतीच्या जोडीला घरोघरी जाऊन किती काम केलं असेल. सावित्रीबाई फुलेंचं महत्व इथे ठसतं.
मला तरी सार्वजनिक उत्सवात उदात्त असं काही दिसत नाही. धांगडधिंगा आणि मजा करून झाली आता ती अंगाशी आली आहे इतकंच.
रात्रीचे नांदणे वगैरे आयडी
रात्रीचे नांदणे वगैरे आयडी आले कि मूडच जातो. किती किती आयडी शाबूत असतात रे तुमचे?>>>>>>
वा, माझा प्रतिसाद सार्थकी लागला.
ढोलताशे बडवणार्यांवर त्याचे
ढोलताशे बडवणार्यांवर त्याचे काही ना काही परिणाम होतच असतील. अजिबात थांबवू नका. उलट प्रोत्साहन द्या.
आता सार्वजनिक गणेशोत्सव पुरता कमर्शियल झाला आहे. मेट्रो स्टेशन च्या नावांत ठिकाणासोबत प्रायोजकाचं नाव असतं. तसं मंड ळांच्या नावाशी अमुक तमुकचा राजा - अडाणी अंबानी ही नावं जोडली गेली आहेत.
गेल्या वर्षी विसर्जन यात्रेत भक्तांना गणेशासोबत आकाश अंबानींचेही दर्शन लाभले.
वा, माझा प्रतिसाद सार्थकी
वा, माझा प्रतिसाद सार्थकी लागला. > तुमच्या तृतीयपंथी मालकांकडून शाबासकी मिळवा मग. या आयडीने काहीही असंबद्ध बोलता येतं.
भरत यांच्या आजच्या सर्व
भरत यांच्या आजच्या सर्व प्रतिसादांना +१
तुमच्या तृतीयपंथी मालकांकडून
तुमच्या तृतीयपंथी मालकांकडून शाबासकी मिळवा मग. या आयडीने काहीही असंबद्ध बोलता येतं.>>>>
अरेरे काय ही भाषा.
नाठाळाचे माथी
नाठाळाचे माथी
लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण
लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडे पाषाण ॥
आजच्या लोकसत्तेतले एक
आजच्या लोकसत्तेतले एक वाचकपत्र
‘त्यांचे’ ध्वनिप्रदूषण जास्त, आपले कमीच
‘अमर्याद ‘आव्वाज’’ संपादकीय वाचले. गणेशोत्सव आला की आवाज फाऊंडेशन आणि मराठी वृत्तपत्रे कमालीच्या उत्साहाने ध्वनी प्रदूषणाच्या दृष्टीने कामाला लागतात. मोहरमच्या वेळी दणादणा डी.जे. वाजत असताना ताबुतांच्या मिरवणुकांचे वेळी हे सारे कोणत्या बिळात लपलेले असतात कळत नाही, ‘आवाज फाऊंडेशन’ची ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्याची पद्धत ही सदोष आहे. सामान्यत: सध्याच्या परिस्थितीत, विविध कारणास्तव सर्वच ठिकाणी, आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिकच असते. हा प्रयोग दस्तुरखुद्द मुंबई उच्च न्यायालयात केला गेला होता. न्यायालयात प्रत्यक्षात कोणतीही ॲक्टिव्हिटी चालू नसताना आवाजाची पातळी मोजली असता ती मर्यादेपेक्षा जास्त नोंदली गेली, याला कारण वातावरणात आवाजाची सतत होत असणारी स्पंदने होय. फाऊंडेशन डी. जे. वाजत असतानाच्या आवाजाच्या पातळीतून जर त्याच ठिकाणच्या सर्वसाधारण ध्वनी प्रदूषणाची पातळी वजा करून तेथील आवाजाच्या पातळीची मोजदाद करेल तर त्यांना जाणवेल की गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे ध्वनिप्रदूषण अत्यंत किरकोळ असते. मुख्यत्वे करून गणेशोत्सव मिरवणुकीत घरगुती गणपती सहसा डी. जे. चा वापर करतच नाही आणि दोन सार्वजनिक गणपतींच्या मिरवणुकीत अंतर बरेच मोठे असते, सबब ध्वनिप्रदूषणात फार मोठा फरक पडत असतो. उलट ताबूतांच्या मिरवणुका एकाला दुसर्या जोडूनच पुढे सरकत असतात आणि त्या प्रत्येकाच्या डी. जें चा दणदणाट एकापेक्षा एक सरस असतो.
ॲड. एम. आर. सबनीस, अंधेरी (पूर्व) मुंबई
इतर चार पत्र डीजे वापराच्या विरोधात आहेत.
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/loksatta-lokmanas-ganeshotsa...
आजच्या लोकसत्तेतले एक
आजच्या लोकसत्तेतले एक वाचकपत्र>> वाचून प्रचंड राग आला. किती निगरगट्ट लोकं असतात.
मुळात प्रॉब्लेम असा आहे की
मुळात प्रॉब्लेम असा आहे की सोमी वर बोलण्यापलीकडे काहीही करता येणे शक्य नाही
सर सामान्य माणसे गणेश मंडळाच्या अरेरावी कार्यकर्त्यांना जाऊन सांगणे हे बंद करा म्हणजे थेट हाणामारी
बर न्यायालयात जाऊन नियम केले
पोलिसांना जबाबदारी देउन कामाला लावले तर ते वरून आदेश देणार त्याप्रमाणे करणार की गुन्हा दाखल करणार
वर म्हणणार आम्ही कायदा सुव्यवस्था आणि शांतता पार पडेल असे पाहिले
काहीं वर्षांपूर्वी रात्री 12 वाजता वाद्ये बंद करण्यावरून पुण्यात झालेली दंगल मी अनुभवली आहे, पार अगदी राखीव सुरक्षा दलाची चिलखती वाहने, अश्रूधुर लाठीमार सगळं काही झालेलं तेव्हा
पोलिसांनी गुन्हे दाखल केले म्हणून त्या क्षणी डीजे किंवा काय बंद होईलच असे नाही
काही महिन्यांनी गणेश मंडळाचे पदाधिकारी जे बहुतांशी राजकारणी च आहेत ते पोलिसांना सांगून गुन्हे मागे घयायला लावणार
म्हणजे मग काय साध्य झाले
काहीच नाही
दोन पाच माणसे रस्त्यावर उतरले, माध्यमातून आवाज उठवला तरी जोवर शासन मान्य करत नाही आणि अंमलबजावणी करत नाही तोवर काहीही होणे नाही
हाती आलेल्या बातमीनुसार बापट
हाती आलेल्या बातमीनुसार बापट यांच्या सन्मानार्थ डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या बापट ला हे गाणे गणेशोत्सवात वाजवणार आहेत.
Pages