महाराष्ट्रातील राजकारण

Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03

इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं तर अर्थाअर्थी यात भाजपाचा काही संबंध नाही कारण आवाजाचा आणि बेशिस्त रहदारीचा त्रास, भाजपा आणि नॉन-भाजपा, सगळ्यांनाच होतो.

भाजपच्या महापौर, त्यांचा एक नगरसेवक आणि हे जिल्हा अध्यक्ष, शिवाय भाजपचेच असलेले सांस्कृतिक कार्यमंत्री अशा चार व्यक्तींची वक्तव्ये ऐकल्यावर भाजपचा आणि याचा काहीही संबंध नाही हे पूर्ण पटले.

हिंदी भाषकांचे लाडके देवाभैया म्हणतात, कुंभमेळ्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप करणे, हे कुंभमेळ्याला बदनाम करण्याचे कारस्थान.

मागे असंच कशावरून तरी ते महाराष्ट्राची बदनामी होते म्हणाले होते.

देवाभैया भाजपचे एक बुद्धिमान आणि अभ्यासू नेते आहेत, अशी त्यांची बदनामी कोणी केली?

आता सिलेक्टीव्हली भाजपावाल्यांचे व्हिडीओ टाकण्याचे तुमचे कौशल्य कौतुकास्पद आहे, हे मान्य केले पाहिजे. शोधले तर ४ भाजपावाले आणि ४ नॉन-भाजपावाले बापटांना पाठिंबा देताना दिसतील. पण तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. सामान्य नागरिकाला सामान्य त्रास असला तरी त्याला राजकीय रंग दिल्याशिवाय मजा येत नाही. चालू द्या.

पुण्याच्या महापौर , भाजप जिल्हा अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्यमंत्री हे रँडम लोक आहेत का?

लोकांना उपद्रव होईल असा गणेशोत्सव करण्यात सगळे पक्ष एकसाथ आहेत. उधोबा, भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी,काँग्रेस सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
जर ह्या राजकीय पक्षांना अशी खात्री झाली की पुरेसे जनमत ह्या बीभत्स उत्सव प्रकाराच्या विरुद्ध संघटित होत आहे आणि आपल्याला पुढील निवडणुकीत याचा फटका बसू शकतो तरच ते दुसर्‍या बाजूला समर्थन देतील.
ह्या अचकट विचकट पद्धतीने उत्सव साजरा करणार्‍या मंडळाकडून समस्त राजकीय पक्षांना राबणारे कार्यकर्ते मिळतात, पैसा मिळतो, भावी नेत्यांना सत्तेकडे जाण्याचे लाँचिंग पॅड मिळते त्यामुळे त्याला ते आज तरी विरोध करत नाहीत.
डाव्या विचाराचा असला तरी विद्यानंद बापट हा एक आदरणीय माणूस वाटतो. तत्त्वनिष्ठ, शांतपणे आपल्या मुद्द्यांना धरून राहणारा. बिनतोड मुद्दे मांडणारा. सरकार ह्याला पुरेसे पोलिस संरक्षण देत असेल अशी आशा आहे. त्याला काही झाले तर पुण्याच्या आणि राज्याच्या भाजपची अब्रू चव्हाट्यावर टांगली जाईल.

हे असे रस्ता आडवून होणारे कार्यक्रम बंदच केले पाहिजेत. गणपती असो, मिरवणूक असो किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्र रस्ता काय यांच्या बापाच्या मालकीचा आहे अशा थाटात सगळं चालतं.
त्या बापाटाला मात्र मानलं पाहिजे. एकाच वेळी एवढ्या मूर्खांना विरोध करायची हिंमत खरंच लागते.
पूर्णपणे बंदी घालणं शक्य नसेल, तर निदान नियम तरी कडक करा आणि ते कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पाळायला लावा.

DJ नको म्हणजे नको. रात्री दहा वाजता आवाज बंद म्हणजे बंद. मिरवणुकीची वेळ ठरलेली असेल तर त्याच वेळेत संपली पाहिजे. रस्ता अडवायचा असेल तर परवानगी आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था असली पाहिजे.
सार्वजनिक रस्ता हा कुणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही. उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी बाकीच्या लोकांना वेठीस धरण्याचा अधिकार कुणालाही नाही.

PoP च्या उंच गणेशमूर्तीं बनवतच राहू, त्यांचं विसर्जन नदीसमुद्र तलावातच करू हा महाराष्ट्र शासनाचा न्यायालयातला स्टँड आहे.

बाकी विद्यानंद बापट यांनी लॉजिकल फॅलसी, ध्वनीवर्धक वगैरे शब्द वापरले नाहीत तर बरं होईल. नुसत्या या शब्दांमुळे धीरज घाटे आणि मंडळींना चक्कर येण्याची शक्यता आहे. (डीजे लावत नाही; पण शब्द आवरा!) पुणे महानगरपालिकेचं घोषवाक्य वगैरे उद्धृत करणं म्हणजे तर फारच झालं. इतकाही अत्याचार करू नये.
अशाने पहिलीतल्या मुलांना स्पेस टेक्नोलॉजी किंवा क्वांटम फिजिक्सचे धडे दिल्यास जे होईल तेच होईल. तस्मात् काळजी घ्यावी. निखिल वागळे यांच्या गाडीवर दगड घालणे, एका जबाबदार, सजग, निर्भय नागरिकाला उद्देशून 'यांना कुत्रंही ओळखत नाही' असं ऑन कॅमेरा म्हणणे ही यांच्या दृष्टीने अभिमानास्पद कार्ये आहेत. लॉजिक यांना दुरून नमस्कार करून, मागे वळूनही न पाहता उलट पावली निघून जातं. लॉजिकल फॅलसीचं काय घेऊन बसलात बापट?

उत्पल व.ब.

कोणीतरी म्हटलंय की बापटांनीच ते आठवत नाही - ढोल ताशे ही रणवाद्ये आहेत. धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचं प्रयोजन नाही.

https://x.com/MDNagpure/status/2092229047875162119

पुण्यातील माझ्या गणेश मंडळाच्या
कार्यकर्त्याला कुठलाही त्रास होणार नाही !!

|| जय श्रीराम ||
आपले रामदूत

सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे

एक अजून मूर्ख प्रकार. शेकडो ढोल पथके गणेशोत्सवाच्या आधी कित्येक महिने विविध जागी तासनतास सराव करत असतात. म्हणजे आसपासच्या लोकांना प्रचंड ध्वनी प्रदूषण.
एक म्हणजे इतक्या प्रचंड संख्येने ढोल हवेत का? आणि ते काही सतार वा संतूर वा तबला असे वाद्य आहे की ते आत्मसात करायला मोठी तपस्या लागते? विश्वंभर चौधरींचा हा मुद्दा अगदी योग्य आहे.
विशिष्ट ताल पकडून ढोल बडवणे ह्याला किती प्रशिक्षण लागते आणि इतक्या प्रचंड प्रमाणात कशासाठी? पुण्यात नदीकाठी विविध मोकळ्या जागांवर हे उद्योग चालतात. तिथे आसपास हॉस्पिटल वगैरे आहेत वगैरे कुणाला पर्वा नाही.
सार्वजनिक शांतता म्हणजे जणू काहीतरी हीन त्याज्य गोष्ट आहे असे मानून तिचा पूर्ण नाश करण्यासाठी सर्व मंडळे कसून प्रयत्न करत असतात.

डाव्या विचाराचा असला तरी विद्यानंद बापट हा एक आदरणीय माणूस वाटतो >>> शेंडे, तो नास्तिक आहे असे तो स्वतःच म्हणाला आहे. तो "डावा" आहे असे कोठे दिसले आहे का? सगळी मोट एकत्र नको. सगळे नास्तिक डावे नाहीत, आणि सगळे लिबरल डावे नाहीत Happy

याला विरोध भाजप व नॉन भाजप मतदारांचा आहे पण उत्सवावर निर्बंधच नकोत म्हणणारे गेल्या काही दिवसांत फक्त भाजपवालेच दिसले आहेत.

तो बापट अस्सल पुणेकर असेल तर याला कुत्रं ओळखत नाही हे मेडलसारखे मिरवेल. त्याला कोणी ओळखावे असे वाटतही नसेल Happy तो लॉजिकल फॅलसी वगैरे म्हणू लागला तेव्हा मलाही हसू आले. तांबट आळीत सतार वाजवणे म्हणून माबोवरच कोणीतरी वापरलेली अत्यंत चपखल उपमा आठवली. (हा उल्लेख कोणालातरी जातीय वाटला होता म्हणून हे - याचा संबंध फक्त तेथे येणार्‍या जोरदार आवाजात इतर लहान आवाज हरवण्याबद्दल आहे)

जर ह्या राजकीय पक्षांना अशी खात्री झाली की पुरेसे जनमत ह्या बीभत्स उत्सव प्रकाराच्या विरुद्ध संघटित होत आहे आणि आपल्याला पुढील निवडणुकीत याचा फटका बसू शकतो तरच ते दुसर्‍या बाजूला समर्थन देतील. >>> ते आहेच पण इतका विरोध होत असताना नेते आणि कार्यकर्ते तरीही हे रेटत आहेत - हे केवळ आवडीनिवडीमुळे होत नाही. कोणाची तरी दुकाने यावर चालत असणार. पण त्यांचे यामुळे होणारे नुकसान एकवेळ नागरिक वर्गणी देऊन भरून काढायला तयार होतील या त्रासापेक्षा.

>>
डाव्या विचाराचा असला तरी विद्यानंद बापट हा एक आदरणीय माणूस वाटतो >>> शेंडे, तो नास्तिक आहे असे तो स्वतःच म्हणाला आहे. तो "डावा" आहे असे कोठे दिसले आहे का? सगळी मोट एकत्र नको. सगळे नास्तिक डावे नाहीत, आणि सगळे लिबरल डावे नाहीत
<<
बापटांनी स्वतः हे सांगितले की ते डाव्या विचारांचे आहेत. मोट बिट काही बांधत नाही. भांडवलशाहीच्या ते विरोधी आहेत. मी त्यांच्या अनेक मुलाखती पाहिल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=siDYlYjsFgU&list=WL&index=1&t=3089s
हे बघा आणि ठरवा की मी मोट बांधली आहे की कसे. उगीच काहीतरी दावे करू नका.

ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा गणेश उत्सवात १० वाजेपर्यंत डीजे वाजवता येत होता नंतर शिंदे आले त्यांनी ती मर्यादा १२ वर नेली. नाचणारे आता १२ वाजेपर्यंत उर बडवत नाचतात. विनाकारण दुसऱ्या लोकांना त्रास. सरकार पण येडछाप आहे. दोन चार लोकांना खुश करण्यासाठी १०० लोकांचे हाल करतात. हे जे परदेशात जाऊन राहिलेले भारतीय आहेत त्यांच्यावर तिथल्या सरकारने कडक कारवाई करून परत भारतात पाठवलं पाहिजे. एकदा का त्यांची लोकसंख्या जास्त झाली की हे त्यांचे असली रंग दाखवायला सुरवात करतील. गणपती नवरात्रीत १२ वाजेपर्यंत कमरेपर्यंत उड्या मारत नाचतील, पान तंबाखू काढून फॉरेनच्या रस्त्यांवर पचापचा थुंकतील, रस्त्याच्या मधोमध मंडप बांधलीत. परदेशातील वातावरण, लोकं शांततेत जगताहेत त्यांना तरी आरामात जगू द्या. हाकलवा सगळ्यांना तिथून.

परदेशात गुन्हा घडायच्या आधीच शिक्षा देण्याची सोय आज तरी नाही. कायदे मागासलेले असल्यामुळे अमुक एक व्यक्ती पुढे असा गुन्हा करेल तसा गुन्हा करेल आणि लोकांच्या नाकी नऊ आणेल म्हणून आधीच शिक्षा देऊन टाका हे सध्या शक्य नाही. (अर्थात पुरेशा संख्येने भारतीय लोक न्यायसंस्था आणि अन्य सरकारी विभाग भ्रष्ट करते झाले तर तसा कायदा निर्माण करतीलही!)

ओके तुम्ही ते तसे म्हणताना ऐकले/पाहिले असेल तर ठीक आहे. पॉइण्ट टेकन. त्याकरता प्रूफ बघायची गरज नाही. दावा वगैरे काय त्यात, सोमिवर सर्रास हे तिन्ही एकाच गटात असल्यासारखे बोलले जाते म्हणून लिहीले. मी जे पाहिले त्यात नास्तिक म्हणाले. इतरत्र ते म्हणाले असतील ते डावे आहेत तर असतील.

डावा असुदे की उजवा, नास्तिक आस्तिक काहीही असुदे, बापटाचा मुद्दा एकदम योग्य आहे.

एबीपी माझाचा एक वायझेड पत्रकार बापटाला विचारत होता की तुम्ही कुठल्या मंडळाचे सभासद आहात का ? एकदा होऊन का नाही बघत ? काय लॉजिक ?

गणेशोत्सव मंडळं म्हणजे राजकीय कर्त्यांचं ब्रीडिंग ग्राउंड . पक्षांना आपले कार्यकर्ते इथून मिळतात. त्यांना ट्रेन करता येतं.

खरेतर सर्व डीजे समर्थकांना त्यांच्या परिवारातील आबालवृद्धांसह गणेश स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सक्तीने मंडपात डीजे समोर बसवले पाहिजे, सर्वाना घरच्या लाथा बसतील तेंव्हाच सुधारतील भ---.

मला ह्या बापटांच्या मुलाखती ऐकायचा चस्का लागलाय.
भाषेची भुरळ पडली हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या माणसाचा ह्या विषयावरचा गृहपाठ पक्का आहे. समोरच्यानं कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात ऑफेंड होत‌ नाहीत.
बापट बोलत असताना मुलाखत घेणाऱ्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, तेव्हा बेकार हसू यायला लागतं. या लोकांना अशा ट्रीटमेंटची सवय नाही. यांना बापट फारच 'क्रूरपणे' वागवत आहेत. या बिचाऱ्यांपुढे हे अचानक एक आऊट ऑफ सिलॅबस प्रकरण उभं ठाकलेलं आहे. आणि कसं डील करावं ते कळत नाहीये.

मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांची पण दया यायला लागते. यांचंपण पितळ उघडं पडलेलं आहे.
एखादा मूर्ख प्रश्न विचारला गेला तरी हे बापट समोरच्याची अक्कल न काढता, नव्या जोमाने सविस्तरपणे उत्तर द्यायला लागतात. इतकं सविस्तर आणि संदर्भासहित स्पष्टीकरण की समोरच्याचा ते झेलण्याचा आवाका नसतो.‌ अशा प्रकारे हा अटेंप्ट पण फेल जातो.

मुळात या पत्रकारांकडे, कार्यकर्त्यांकडे, नेत्यांकडे मराठी शब्दांचा साठा शून्य आहे. त्याच त्याच किडुकमिडूक शब्दांच्या आधारे काहीतरी उसना प्रतिवाद करायला जातात आणि तेवढ्यात समोरून बापटांकडून आणखी नव्या संकल्पनांचा, संदर्भांचा, तर्कांचा, शब्दसमृद्ध जलप्रपात यांच्यावर कोसळतो. आणि त्यात हे घाटे वगैरे लोक गटांगळ्या खायला लागतात.

"सैन्यबलाचा वापर करा"
"मिरवणुका अवजड वाहतूकीसारख्या शहराच्या बाहेरून वळवा आणि तिकडेच पवना वगैरे नद्यांच्या काठी हौदांमध्ये विसर्जन करा"
"धर्मस्वातंत्र्य हे एक स्खलनस्वातंत्र्य म्हणून मला मान्य आहे. आम्ही त्याच्याशी काऊन्सेलिंगच्या किंवा प्रबोधनाच्या मार्गाने डील करू"

ही अशा प्रकारची जबरदस्त विधानं पहिल्यांदा ऐकली तेव्हा वाटलं की हा माणूस मुद्दाम समोरच्यावर घसरतोय की काय. पण नंतर नंतर दिसायला लागलं की नाही, हा काही मुद्दामहून बोचकारत नाहीये, हा फक्त क्यूट, इनोसंट आहे‌. याच्या मनाची बैठकच वेगळी आहे.

संप्रती +1
मलाही बापटाच्या मुलाखती घेणारे आणि त्या मुलाखतीतील इतर मुलाखतीस बोलवलेले लोक यांच्या तोंडाकडे पाहून हसू आवरत नाहीये. बापट जेनझीच्या वरताण आहेत.

एक दोन मुलाखती पाहिल्या ज्यात गणेश मंडळाचे अनेक कार्यकर्ते आपली बाजू मांडत होते. उर्मटपणा, आम्ही हेच करणार, आम्हाला कोण थांबवणार , आम्ही पुणेकरच आहोत किंवा उच्च प्रतीचा बिनडोकपणा, बापट कोण लागुन गेलेत? बापट नास्तिक आहेत, बापट मूळ पुणेकर नाहीतच, रत्नागिरीचे आहेत. तिकडे नदीपात्रात प्रदूषण होते ते थांबवा आधी आणि मग डी जे. आणि अर्थातच नेहमीचे यशस्वी आधी त्या मशीदीचे भोंगे काढा मग आमच्याशी बोला!
शिवाय अजून एक म्हणजे गणेश मंडळे काहीतरी अचाट आणि अफाट सामाजिक कार्य करतात म्हणून त्यांचा गोंगाट सहन करा.
ह्यातले कुठलेही मुद्दे मान्य होणारे नाहीत.

दुसरीकडे विद्यानंद बापट, "an iron hand in a velvet glove" ह्या वाक्प्रचाराप्रमाणे मृदू भाषेत पण अत्यंत ठामपणे, कुठलीही तडजोड न करता बिनतोड मुद्दे मांडतात.

महावितरण च्या कारभारावर कुणी धागा काढेल का?

मागे कुठल्या तरी धाग्यात ओघात सांगितलं होतं कि आम्हाला दोन महीने तिप्पट किंवा दुप्पट बिल आलं. काहींना चार पट आलं. मग भाजपच्या नगरसेवकाकडे गेलो, म्हणजे पुरूष मंडळी घरी नव्हतीच. सिनीयर सिटीझन्स आणि महिला मंडळ यांचा मोर्चा गेला. तेव्हां महावितरणचे अद्धिकारी दुरूत्तरं करत होते. थोड्या वेळाने नगरसेवक साहेबांचं आगमन झालं. ते आत गेले. बाहेर आल्यावर "आता तुम्हाला नॉर्मल बिलं येतील म्हणाले"

पूर्वी आम्हाला १५०० किंवा २००० बिल येत होतं, ते ६८०० रूपये दोन महीने आलं. नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर आता ३५०० रूपये येऊ लागलं. दर वाढले असतील, पण युनिटस सुद्धा वाढले. मी बारा महीन्यांचं युनिट (बिलाच्या पाठीमागे असतंच) असलेला चार्ट दिला होता. काही फायदा नाही झाला.

लॉकडाउनमध्ये अव्वाच्या सव्वा बिल आलं म्हणून सरांनी धागा काढला होता. आता त्यांना अव्वाच्या सव्वा बिल आलं नसावं.
त्यांच्या धाग्याचा जीर्णोद्धार करा. फॅन क्लबपण येईल.

वीज बिल वाढू लागलं की वीज खाणाऱ्या वस्तूंवर लक्ष द्यावे.
१. फ्रिज - यातला कंप्रेसर साधारणपणे पंधरा वीस मिनिटे चालून बंद होतो . थंडीत दिवसांत तीन चार वेळा चालतो. उन्हाळ्यात सहा सात वेळाही चालू बंद होतो. जर कंप्रेसर बराच वेळ चालूच राहात असेल तर फ्रिजमधला गॅस कमी झाला आहे. लीकेज दुरुस्त करून घ्यावे .बिल कमी होईल. ( दोन ॲम्पीअर करंट घेतो.)
२. इस्त्री आणि हीटर यांच्यात काही फरक जाणवलातर तेही दुरुस्त करावे. ( तीन ॲम्पीअर करंट घेतात.)
३. एसी. याचेही नेहमीसारखे काम न होता अधिक काळ चालू राहात असेल तर दोष असतो.( स्टार्ट होताना वीस ॲम्पीअर आणि थोड्या वेळाने पंधरा ॲम्पीअर करंट घेतो.)
तर अशा अधिक करंट घेणाऱ्या वस्तू दुरुस्त करण्यात दोन हजार रुपये खर्च झाले तरी पुढे तीनचार बिलांत वसूल होतो.

साधारण पणे या गोष्टी बर्‍याच जणांना ठाऊक असतात. रीडिंग का वाढले याची चिंता करणारा प्रत्येकजण विनाकारणच चिंता करत असेल असं नाही. ज्यांच्या घरात फक्त दोन बल्ब आणि एक पंखा आहे त्यांनाही अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत, असं बातम्याfunction at() { [native code] }अ आहे. एखाद्या घराचा सरासरी वीज वापर हा फिक्स असतो. एखाद्या महीन्यात जास्त वीज वापर झाला तर तो माहीत असतो.

जर ठराविक दोन महीन्यात वीज बिल वाढत असेल तर हा पॅटर्न प्रत्येक वर्षी दिसायला हवा. आंदोलनानंतर वीज बिल कमी हे अचाट आहे.

ही उपकरणे चेक करून ती व्यवस्थित चालत आहे असं दिसलं तर वाढीव बिलाचे पैसे सल्ले देणारे महाशय देतील.

मीरा भाइंदरमध्ये बोगस मतदानाने भाजपची सत्ता
असं कोण म्हणतंय? तर प्रताप सरनाईक,

काल शिंदेसेनेची एक जाहिरात पाहिली. भटक्या विमुक्तांसाठी त्यांच्या सेलचं काहीतरी.

वर दोन कोपर्‍यांत बाळ ठाकरे आणि आनंद दिघे.

मग मधल्या जागेत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र

खाली त्यांच्या खासदार आणि मंत्र्यांचे पोस्टेज स्टँप साइझचे फोटो. मला संजय दीना पाटील हे एकच खासदार ओळखता आले.

लक्ष्मण माने आणि गायकवाड दोघेही NBT अभ्यासक म्हणून. यातले एक कोणीतरी शरद पवारांसोबत होते. त्यांच्यावर ( म्हणजे लक्ष्मण यांच्यावर) बलात्काराचा आरोप झाला होता. त्यातून निर्दोष सुटले. त्यावर पुस्तक लिहिलं.

मणिः लुण्ठति पादेषु काचः शिरसि धार्यते।
क्रयविक्रयवेलायां काचः काचो मणिर्मणिः॥

एखाद्या ठिकाणी बोलण्याने ही भावना होत असेल तर तिथे जाऊ नये. तसेच काहींच्या धाग्यांबाबत आहे.
बापट म्हणाले असते, "अज्ञानाच्या तमिस्र अंध:कारात चाचपडणाऱ्या पात्रास ज्ञानप्रकाशाचा परिमळ देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अरण्यरुदन वा उष्ट्र-गर्दभ संवाद ठरतो. यास अत्यंत खेदाने मुधाश्रमविषाद असे म्हणावे लागेल.

वाढीव बिलाची तक्रार मंडळ घेत नसल्यास काय पर्याय आहेत?
आमचे मिटर बदलून द्या ---" तुमचं मीटर बरोबर आहे.."
काय करणार?

Pages