Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
सिंहस्थ कुंभमेळ्यावर ३५,०००
सिंहस्थ कुंभमेळ्यावर ३५,००० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या पैशाचा उपयोग जन उपयोगी कामांवर ( म्हणजे भक्त जनांच्या सुख- सुविधा ) होणार असेल अशी अपेक्षा असते पण राम मंदिरात ठेवलेल्या दानपेटीतला पैसा CCTV कॅमेर्याच्या साक्षिने चोरणारे या ३५,००० कोटी रुपयांचा लचका का तोडणार नाही?
बातम्या बाहेर यायला सुरवात झालेली आहे. नाशिकचे पालक मंत्री आणि कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या फार फार लांबचे नातेवाईक लोक देखिल गैरव्यावहार करतांना प्रकाशात आले आहेत. दोषी व्यक्तींवर मंत्र्यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-minister-gir...
गिरीश महाजन सध्या फॉर्मात
गिरीश महाजन सध्या फॉर्मात आहेत. त्यांच्या एका मुलाखतीचे अंश दिसले. २६/११ च्या वेळी ते पिस्तुल घेऊन दहशतवाद्यांना मारायला गेले होते. पण दहशतवाद्यांच्या सुदैवाने ते महाजनांना मिळाले नाहीत.
https://www.facebook.com/watch/?v=1295800402633942
इथे ती किती छान डॅन्स करताहेत बघा.
https://www.youtube.com/watch?v=kYl5LHtyjkE
आशिष शेलार काय म्हणताहेत
आशिष शेलार काय म्हणताहेत बघा
https://www.facebook.com/share/v/1C66ryjcpA/
ज्या घटना आम्ही सातत्याने पाहतो आहोत - गणपती मूर्त्यांच्या विसर्जनावर बंदी आणा , गणपती मूर्त्या कशाच्या बनल्या पाहिजेत यावर मर्यादा आणा, गणेशोत्सव साजरे करताना असलेले परंपरागत मंडप यांना परवानगी मिळता कामा नये, गणेशोत्सवाच्या काळात असलेल्या मंडपांबरोबर ध्वनी मर्यादा - अगदी आरतीपासून याच्यावर मर्यादा आणा , नागपंचमीचा आमचा खेळ - या पूज नावर मर्यादा आणा , गोविंदा - दहीकाला उत्सव यांच्या उंची, थर, वय आणि आयोजन यावर मर्यादा आणा, विसर्जन गणेशोत्सवाचं कुठे झालं पाहिजे यावर मर्यादा आणा. या मर्यादांच्या मागण्या करणारी लोकं कोण आहेत? होय, पर्यावरणाची चिंता, नागरिकांची चिंता, वाहतुकीची चिंता आम्हांला केलीऽऽऽऽच पाहिजे यावर काही दुमत नाही. पण मर्यादा आणत आणत आणत आणत आणत आणत याच्यावर बंदीच्या दिशेने न्या , ही भूमिका मांडणारे मराठी मातीतल्या मराठी माणसाचे हिंदू सण याच्यावर रोक लागण्याचीच भूमिका या लोकांची दिसतेय. मला कुठल्याही अन्य धर्माबद्दल बोलायचं नाही. कुठल्याही अन्य पंथाबद्दल बोलायचं नाही. त्यांची जशी मुभा आहे, तशी आमची पण मुभा आहे. काळजी जरूर घेऊ, चिंता जरूर करू , पण बंदीचा निर्णय मान्य नाही. अशा मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंत भूमिका मांडणारी ही लोकं शहरी नक्षलवादाशी जुळली आहेत का? हाच माझा थेट आरोप आहे. आणि म्हणून या म राठी, महाराष्ट्रात आणि हिंदू सणांची बाजू सर्व चिंता काळजींसहित आम्ही घेऊ , हीजबाबदारी आम्ही घेतली आहे, एवढंच माझं म्हणणं आहे.
आता पी ओ पीच्या गणेशमूर्ती घेऊ नका, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय. ते सुद्धा अर्बन नक्षल आहेत का?
भाजप समर्थकांनी सणांच्य बाबत कोणत्याही मर्यादा पाळू नयेत. आपापल्या कॉलनीत रस्त्यावर मंडप घालावेत. डीजे लावावेत. लेझर लाइट्सही लावाव्यात. मूर्तींच्या उंचीची स्पर्धा ठेवावी. आपल्या मुलानातवंडांना दहीहंडी खेळा यला पाठवावं.
पुढे दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाचा उच्चांक व्हायला हवा.
२६/११ च्या वेळी ते पिस्तुल
२६/११ च्या वेळी ते पिस्तुल घेऊन दहशतवाद्यांना मारायला गेले होते. >>
नग आहेत एक एक.
नेमबाज आहेत ते.
नेमबाज आहेत ते.
Pages