Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
बघितला पूर्ण व्हिडिओ संप्रति.
बघितला पूर्ण व्हिडिओ संप्रति.
<<कार्यक्रमाची थीम स्त्रिया, मुलींच्या प्रश्नांसंबंधी होती. स्टेजवरून मुली बेबाकपणे स्वतःला एक्सप्रेस करत होत्या आणि पुरूष ऑडियन्सही ते खूप चांगल्या पद्धतीनं रिसीव्ह करत होतं. हे एकप्रकारे लोकशिक्षण आहे. एवढ्या मोठ्या क्राऊडपुढे असा प्रयोग करणं हे धाडसाचं काम आहे.>> अगदी हेच जाणवलं पहाताना. महिला सक्षमीकरणाबद्दल पाठ करून केलेली नेहमीची भाषणं नाहीत. नेमके मुद्दे आणि त्यावर आपापले अनुभव शेअर करणाऱ्या सामान्य मुली. फार चांगला कार्यक्रम झाला.
फडणवीस एक मुरलेले राजकारणी
फडणवीस एक मुरलेले राजकारणी आहेत. पुढच्या चार चाली लक्षात घेऊन शांत डोक्याने आक्रस्तळेपणा न करता राजकारण करतात. मग मविआ सरकार फोडणे असो वा आपल्याला डोइजड होउ शकतील अशा पक्षातील लोकांचे पंख छाटणे असो.
म्हणूनच त्यांची 'छात्रों की गूंज' वर प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. पैसे कुठून आले याची चौकशी करणार म्हणे , मग गोहातीला ५० खोके कसे आले याचीही करावी लागेल, बात निकली तो दूर तक जायेगी.
'पेपर फुटी, नोकर्यांची वानवा, शाळांची दुरवस्था हे सारे खरे आहे पण काँग्रेस ने शंभर वर्षांपूर्वी तीन मिनिटांचे वंदे मातरम पूर्ण म्हणायला नकार दिला होता' हा मेसेज जेन झी ला अपील होईल ?
सोमीवर भाजपा व फडणवीस दोघानाही झोडपले जात आहे हे मात्र मजेशीर आहे
हे महाराष्ट्र भाजपा पेजवर
हे महाराष्ट्र भाजपा पेजवर:
https://www.facebook.com/share/p/1BvjDeuCGn/
छात्रों की गुंज मध्ये सर्वसामान्य जनतेचा आवाज नसुन परदेशी शक्तींच्या जीवावर माज आहे म्हणे.
आणि हे त्या पोस्टवरच्या
Submitted by मानव पृथ्वीकर on 23 August, 2026 - 21:45>>> आणि हे त्या पोस्टवरच्या रिॲक्शन्सचं bifurcation...3000 पैकी २५०० पोस्टवर हसत आहेत ... कमेंट्स मधे तर आणखीच हैदोस..

राहुलजींनी मनुस्मृतीचा मुद्दा
राहुलजींनी मनुस्मृतीचा मुद्दा उचलून सगळ्यांची मने जिंकली. जवळपास प्रत्येक हिंदू मनुस्मृतीची निदान एक प्रत आपल्या नित्याच्या दिनचर्येत समाविष्ट करतो. बहुतेक हिंदूंना मनुस्मृती तोंडपाठ असते. त्यातील सगळी वचने ते शब्द्शः पाळतात. त्याला तो देवाचा अखेरचा शब्द मानतात. त्यामुळे ह्या रानटी, कालबाह्य पुस्तकाबद्दल आवाज उठवून राहुलजींनी आपल्या पंतप्रधानपदावर मोहरच उठवली आहे.
दुसरीकडे कुराणातही काही कालबाह्य वचने आहेत ज्यात स्त्रियांना दुय्यम ठरवणारी वचने आहेत. पण कुराण जवळपास कुठलाही मुस्लिम वाचत नाही ना त्याला आदरणीय समजतो/ते. कुठलाही मुस्लिम कुराण हा ईश्वराचा अखेरचा अपरिवर्तनीय शब्द मानत नाही त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून आणि केवळ मनुस्मृतीला केंद्रस्थानी आणून राहुलजींनी आपल्या पंतप्रधानपदावर मोहरच उठवली आहे.
धन्य धन्य ते राहुलजी आणि धन्य धन्य ती पुण्यनगरी. पूर्वी शिवछत्रपतींनी सोन्याचा नांगर चालवून त्या नगरीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस पहायला मिळतील अशी दवंडी पिटली होती. आता ह्या राजकुमाराने पुण्याला सोनियाचे दिवस आणण्याचे वचन देऊन आपल्या पंतप्रधानपदावर मोहरच उठवली आहे.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0wUQ9fNJMmWEZughA4Qqr...
कमेंट्स वाचता वाचता अजित नाईक सरांचे विचार वाचून भानावर आलो.
‘दत्तक’ नाशिकची ही अवस्था का?
‘दत्तक’ नाशिकची ही अवस्था का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. मात्र, कुंभमेळ्याच्या कामांसाठी रस्ते फोडून ठेवल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.
गंगापूर रोड, नवश्या गणपतीजवळ रस्ता खचला अन् खडीने भरलेला हायवा थेट खड्ड्यात!
https://www.facebook.com/share/r/195AsjyJsv/
या व्हिडियोतला आवाज फडणवीसांचाच आहे का? स्टाइल २०१४ च्या वेळची वाटतेय. आता तो जोश राहिला नाही.
पुणे तेथे काय उणे.
पुणे तेथे काय उणे.
मनपात शामाप्रसाद मुखर्जी यांची तसवीर लावण्याचा प्रस्ताव पुणे मनपात आला. त्यांच्याबद्दल आणखी बोललं जावं असं राकॉ नगरसेवक अमोल बालवडकर यांनी म्हटलं. तर भाजप सदस्यां नी म्हटलं की शामाप्रसादांची चेष्टा करताहेत.
https://www.facebook.com/share/v/1Bx77FKVo7/
सावरकरांबद्दल सध्या जशी रोचक माहिती समोर येते आहे, तशीच यांच्या बद्दलही माहिती येईल म्हणून भाजप सदस्य अस्वस्थ झाले असतील का?
मला खात्री आहे, त्या भाजप
मला खात्री आहे, त्या भाजप नगरसेवकांपैकी किमान एक तरी प्रणव मुखर्जी बाबत बोलला असता
Narendra Modi’s historic
Narendra Modi’s historic gaffe involving freedom fighter Shyamji Krishna Varma occurred during a political rally in November 2013, when he was serving as the Chief Minister of Gujarat.During his speech, Modi confused Shyamji Krishna Varma with Jan Sangh founder Dr. Syama Prasad Mookerjee. He mistakenly told the audience that "Shyama Prasad" was a great revolutionist who died in Geneva, Switzerland, and whose ashes had not been brought back to India for decades.
पूर्वी शाह बानो प्रकरण
पूर्वी शाह बानो प्रकरण कांग्रेसने गाजवलं होतं. आता महिलांचे स्वातंत्र्य.
हिंदू कोड बिलाला, भारताच्या
हिंदू कोड बिलाला, भारताच्या घटनेत मनुस्मृतीचा अंतर्भाव नाही म्हणून तिला विरोध करणारे स्मॅश द पॅट्रिआर्की म्ह टल्याने अप सेट होणारच होते.
बिल्किस बानोच्या बलात्कार्यांचा आदरसत्कार करणार्यांना मुस्लिम महिलांचा कळवळा आल्याचे पाहून डॉळे पाणावले.
बरं ती पॅट्रिआ र्की फक्त हिंदूं मधली फोडा असं राहुल म्हणालाय का ? एका मुस्लिम तरुणीही स्टेजवरून पॅट्रिआर्कीबद्दल बोलली होती.
मायबोलीवरच्या ट्रंप
मायबोलीवरच्या ट्रंप समर्थकांचं कौतुक करायला हवं. ट्रंप चुकतोय हे कळल्यावर त्याचं समर्थन करायचे थांबले.
मोदी समर्थक कधी शिकणार?
जोपर्यंत विरोधी पक्ष भक्कम
जोपर्यंत विरोधी पक्ष भक्कम होत नाही तोपर्यंत मोदी काही हटत नाही.
डाव्यांच्या जोरावर कांग्रेस होती आणि आहे. आणि उद्योजकांना धुडकावण्यात आता कांग्रेस पुढेच आहे.
तृणमूल ( ममताची)संपलीच आहे.
जरांगेचा मुद्दा मराठा आरक्षण. म्हणजे व्यापक नाहीच.
शरद पवार गट.. तीन पायांच्या खुर्चीवर.
उद्धव गट... नक्की कोणता मुद्दा घेऊ हाती.
राज... मराठी फक्त मराठी नायतर फोडणार.
मोदी अजिबात हटायला नकोत. अजून
मोदी अजिबात हटायला नकोत. अजून पुरेसं वाटोळं झालेलं नाही.
अदानि अम्बानि च्या पन्क्तित
अदानि अम्बानि च्या पन्क्तित अजुन्फक्त सुभाष चंद्रा बसला आहे, बरेच बाकि असतील
पुण्यात विद्यानंद बापट नामक
पुण्यात विद्यानंद बापट नामक युवकाने डीजे नामक भयानक प्रकाराविरुद्ध आवाज उठवला आहे. त्याच्या अनेक चॅनेल वर मुलाखती येत आहेत.
त्याचे मुद्दे अगदी बिनतोड आहेत. सार्वजनिक शांतता हा सामान्य माणसाचा हक्क आहे. धार्मिक सण साजरा करत असताना सार्वजनिक शांतता भंग करून लोकांचे आरोग्य, मनःस्वास्थ्य बिघडवण्याचा कुणालाही अधिकार नाही.
पण मंडळ समर्थक लोक तो कसा नास्तिक आहे, डाव्या विचाराचा आहे वगैरे असंबद्ध मुद्दे काढून त्याचा विरोध करत आहेत.
परंतु बहुतेक राजकारणी (त्यातले अनेक भाजप वाले) अशा लोकांचा खुला किंवा छुपा विरोध करताना दिसत आहेत.
बहुधा ह्या उत्सवातून प्रचंड पैसा मिळतो तो त्यांना सोडायचा नसावा. पण लोकांच्या हितासाठी तरी हे बंद व्हायला हवे.
सोलापूर शहराने डी जे मुक्त उत्सव ही योजना यशस्वी रित्या राबवली आहे. ती आता बाकी शहरातही आणावी.
बहुतेक लोक वैतागले आहेत. इतका भयानक आवाज सहन करण्यच्या कितीतरी पलीकडे गेला आहे.
ही विकृती लवकर बंद व्हावी हीच प्रार्थना.
सरकारी कंत्राटदारांची बिलं
सरकारी कंत्राटदारांची बिलं थकवल्याने अडचणीत आहेत.
डीजे मुक्त सण ह्याबाबत
डीजे मुक्त सण ह्याबाबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार ह्यांनी अजून काही भाष्य केलेले नाही. हे तेच महोदय आहेत जे पीओपी मूर्तींची भलामण करत आहेत. मामुना देखील कुंभमेळ्याप्रमाणे ह्यात अजूनही विरोधकांचा हात दिसलेला नाहीये.
घरात एक सरकारी कंत्राटदार आहे
घरात एक सरकारी कंत्राटदार आहे, त्यामुळे त्यांची अवस्था अगदीच समजू शकतो. कोटीच्या घरात बिले थकलेली आहेत, बँकेचे हप्ते, स्टाफला पगार, घर चालवणे ह्या बाबी किती कठीण होत आहेत हे जवळुन बघतोय. लाडकी बहीण योजनेने हा फटका बसला आहे.
भ्रमर, माझी मागच्या पानावरची
भ्रमर, माझी मागच्या पानावरची पोस्ट
आशिष शेलार काय म्हणताहेत बघा
https://www.facebook.com/share/v/1C66ryjcpA/
ज्या घटना आम्ही सातत्याने पाहतो आहोत - गणपती मूर्त्यांच्या विसर्जनावर बंदी आणा , गणपती मूर्त्या कशाच्या बनल्या पाहिजेत यावर मर्यादा आणा, गणेशोत्सव साजरे करताना असलेले परंपरागत मंडप यांना परवानगी मिळता कामा नये, गणेशोत्सवाच्या काळात असलेल्या मंडपांबरोबर ध्वनी मर्यादा - अगदी आरतीपासून याच्यावर मर्यादा आणा , नागपंचमीचा आमचा खेळ - या पूज नावर मर्यादा आणा , गोविंदा - दहीकाला उत्सव यांच्या उंची, थर, वय आणि आयोजन यावर मर्यादा आणा, विसर्जन गणेशोत्सवाचं कुठे झालं पाहिजे यावर मर्यादा आणा. या मर्यादांच्या मागण्या करणारी लोकं कोण आहेत? होय, पर्यावरणाची चिंता, नागरिकांची चिंता, वाहतुकीची चिंता आम्हांला केलीऽऽऽऽच पाहिजे यावर काही दुमत नाही. पण मर्यादा आणत आणत आणत आणत आणत आणत याच्यावर बंदीच्या दिशेने न्या , ही भूमिका मांडणारे मराठी मातीतल्या मराठी माणसाचे हिंदू सण याच्यावर रोक लागण्याचीच भूमिका या लोकांची दिसतेय. मला कुठल्याही अन्य धर्माबद्दल बोलायचं नाही. कुठल्याही अन्य पंथाबद्दल बोलायचं नाही. त्यांची जशी मुभा आहे, तशी आमची पण मुभा आहे. काळजी जरूर घेऊ, चिंता जरूर करू , पण बंदीचा निर्णय मान्य नाही. अशा मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंत भूमिका मांडणारी ही लोकं शहरी नक्षलवादाशी जुळली आहेत का? हाच माझा थेट आरोप आहे. आणि म्हणून या म राठी, महाराष्ट्रात आणि हिंदू सणांची बाजू सर्व चिंता काळजींसहित आम्ही घेऊ , हीजबाबदारी आम्ही घेतली आहे, एवढंच माझं म्हणणं आहे.
आता पी ओ पीच्या गणेशमूर्ती घेऊ नका, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय. ते सुद्धा अर्बन नक्षल आहेत का?
भाजप समर्थकांनी सणांच्य बाबत कोणत्याही मर्यादा पाळू नयेत. आपापल्या कॉलनीत रस्त्यावर मंडप घालावेत. डीजे लावावेत. लेझर लाइट्सही लावाव्यात. मूर्तींच्या उंचीची स्पर्धा ठेवावी. आपल्या मुलानातवंडांना दहीहंडी खेळा यला पाठवावं.
पुढे दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाचा उच्चांक व्हायला हवा.
जणुकाही हजारो वर्षांपासून या
जणुकाही हजारो वर्षांपासून या भारतवर्षात हीच परंपरा आहे- दणादणा डीजे, दारूडे वसुलीबहाद्दर कार्यकर्ते, रस्ते अडवून रहदारीला बाधा, पन्नासशंभर फुटी मुर्ती, वीजेचा झगमगाट.. होऊ द्या त्रास. त्रास फक्त दिमागी नक्षलांनाच होतो, इतर लोक सुखात आहे मग कशाला असे प्रश्न मांडायचे आणि अर्बन नक्षल वगैरे उपाधीला पात्र व्हायचे.
साठ पासष्ट मध्ये सार्वजनिक
साठ पासष्ट मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात किती कार्यक्रम करतात यावर चढाओढ होती. मूर्ती किती उंच यावर नाही.
कंत्राटदारांची बिलं द्यायला
कंत्राटदारांची बिलं द्यायला पैसे नाहीत आणि ज्याची कोणी मागणी करत नाही, असे प्रकल्प मात्र राबवले जातात.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/DclPFKzmcnl/
मनसेचे संदीप देशपांडे म्हणताहेत मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराचं पण गुजरातीकरण झालंय.
ते केव्हाच झालं आहे.
ते केव्हाच झालं आहे.
कोस्टल रोड झाल्यावर मंदिराचा समुद्राकाठ गेला आणि गंमत हरवली. त्या अगोदर तिथून फोटो काढू देत नव्हते कारण म्हणे ते फोटो पाहून पाकडे अतिरेकी येतील! ( हसावं का रडावं?) ताज हल्ला झाल्यावर बंद केले. आता तर समुद्रच नाही.
दिपकेचा फंडा राहूल कंपनीने
दिपकेचा फंडा राहूल कंपनीने हाइजॅक केलाय. रोहित पवार सहा महिने परदेशात. आदिवासींचे प्रश्न म्हणे सरकार सोडवत आहे. आदिवासींनी दिले धन्यवाद रोहित आणि राहुलला.
मला पुणेकरांचा आणि
मला पुणेकरांचा आणि डोंबिवलीकल्याणकरांचा खूप हवी वाटतो.
पुणे जिल्हा भाजपचे आदर्णीय अध्य क्ष म्हणतात - या बापटांना गल्लीत कुत्रं पण ओळखत नाही. दुसरे कोणी म्हणताय आपण बापटांना खूप जास्त महत्त्व देतोय.
https://www.facebook.com/share/v/192LYv3B1e/
विद्याधर बापटांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना.
विद्याधर बापटांच्या
विद्याधर बापटांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना. >> +१
माझ्या मनात अगदी हाच विचार आला होता की आता एखादे गणेशोत्सव मंडळ झोडून काढणार बापटांना.
मुळात यामागे काही अर्थकारण
मुळात यामागे काही अर्थकारण आहे का नुसताच गल्लीतल्या तरूण पब्लिकचा हट्ट? या लोकांच्या घरच्यांना त्रास होत नसेल का लेझर/प्लाझ्मा/आवाजाचा?
याबाबतीत अगदी भाजपच्या कोअर मतदाराचाही विरोध आहे. एक नास्तिक व्यक्ती व मोदींचे घट्ट मतदार एकाच गोष्टीवर सहमत आहेत ही एक दुर्मिळ गोष्ट इथे दिसत आहे.
Pages