Submitted by भरत. on 14 July, 2025 - 03:03
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा व करू.
सिंहस्थ कुंभमेळ्यावर ३५,०००
सिंहस्थ कुंभमेळ्यावर ३५,००० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या पैशाचा उपयोग जन उपयोगी कामांवर ( म्हणजे भक्त जनांच्या सुख- सुविधा ) होणार असेल अशी अपेक्षा असते पण राम मंदिरात ठेवलेल्या दानपेटीतला पैसा CCTV कॅमेर्याच्या साक्षिने चोरणारे या ३५,००० कोटी रुपयांचा लचका का तोडणार नाही?
बातम्या बाहेर यायला सुरवात झालेली आहे. नाशिकचे पालक मंत्री आणि कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या फार फार लांबचे नातेवाईक लोक देखिल गैरव्यावहार करतांना प्रकाशात आले आहेत. दोषी व्यक्तींवर मंत्र्यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-minister-gir...
गिरीश महाजन सध्या फॉर्मात
गिरीश महाजन सध्या फॉर्मात आहेत. त्यांच्या एका मुलाखतीचे अंश दिसले. २६/११ च्या वेळी ते पिस्तुल घेऊन दहशतवाद्यांना मारायला गेले होते. पण दहशतवाद्यांच्या सुदैवाने ते महाजनांना मिळाले नाहीत.
https://www.facebook.com/watch/?v=1295800402633942
इथे ती किती छान डॅन्स करताहेत बघा.
https://www.youtube.com/watch?v=kYl5LHtyjkE
आशिष शेलार काय म्हणताहेत
आशिष शेलार काय म्हणताहेत बघा
https://www.facebook.com/share/v/1C66ryjcpA/
ज्या घटना आम्ही सातत्याने पाहतो आहोत - गणपती मूर्त्यांच्या विसर्जनावर बंदी आणा , गणपती मूर्त्या कशाच्या बनल्या पाहिजेत यावर मर्यादा आणा, गणेशोत्सव साजरे करताना असलेले परंपरागत मंडप यांना परवानगी मिळता कामा नये, गणेशोत्सवाच्या काळात असलेल्या मंडपांबरोबर ध्वनी मर्यादा - अगदी आरतीपासून याच्यावर मर्यादा आणा , नागपंचमीचा आमचा खेळ - या पूज नावर मर्यादा आणा , गोविंदा - दहीकाला उत्सव यांच्या उंची, थर, वय आणि आयोजन यावर मर्यादा आणा, विसर्जन गणेशोत्सवाचं कुठे झालं पाहिजे यावर मर्यादा आणा. या मर्यादांच्या मागण्या करणारी लोकं कोण आहेत? होय, पर्यावरणाची चिंता, नागरिकांची चिंता, वाहतुकीची चिंता आम्हांला केलीऽऽऽऽच पाहिजे यावर काही दुमत नाही. पण मर्यादा आणत आणत आणत आणत आणत आणत याच्यावर बंदीच्या दिशेने न्या , ही भूमिका मांडणारे मराठी मातीतल्या मराठी माणसाचे हिंदू सण याच्यावर रोक लागण्याचीच भूमिका या लोकांची दिसतेय. मला कुठल्याही अन्य धर्माबद्दल बोलायचं नाही. कुठल्याही अन्य पंथाबद्दल बोलायचं नाही. त्यांची जशी मुभा आहे, तशी आमची पण मुभा आहे. काळजी जरूर घेऊ, चिंता जरूर करू , पण बंदीचा निर्णय मान्य नाही. अशा मर्यादा आणि बंदी आणण्यापर्यंत भूमिका मांडणारी ही लोकं शहरी नक्षलवादाशी जुळली आहेत का? हाच माझा थेट आरोप आहे. आणि म्हणून या म राठी, महाराष्ट्रात आणि हिंदू सणांची बाजू सर्व चिंता काळजींसहित आम्ही घेऊ , हीजबाबदारी आम्ही घेतली आहे, एवढंच माझं म्हणणं आहे.
आता पी ओ पीच्या गणेशमूर्ती घेऊ नका, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलंय. ते सुद्धा अर्बन नक्षल आहेत का?
भाजप समर्थकांनी सणांच्य बाबत कोणत्याही मर्यादा पाळू नयेत. आपापल्या कॉलनीत रस्त्यावर मंडप घालावेत. डीजे लावावेत. लेझर लाइट्सही लावाव्यात. मूर्तींच्या उंचीची स्पर्धा ठेवावी. आपल्या मुलानातवंडांना दहीहंडी खेळा यला पाठवावं.
पुढे दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाचा उच्चांक व्हायला हवा.
२६/११ च्या वेळी ते पिस्तुल
२६/११ च्या वेळी ते पिस्तुल घेऊन दहशतवाद्यांना मारायला गेले होते. >>
नग आहेत एक एक.
नेमबाज आहेत ते.
नेमबाज आहेत ते.
मोदी सरकारने वंदे मातरमबद्दल
मोदी सरकारने वंदे मातरमबद्दल कायदा केला.
आधीच्या दोन कडव्यांऐवजी ५ की ६ किती आहेत ती कडवी वाजवायची . कोणी अपमान केला तर शिक्षा.
राष्ट्रीय गीत ठरलं तेव्हा वंदे मातरमची चाल कोणती असावी याबद्दल भरपूर चर्चा झाली होती. अनेकांनी चाली सुचवल्या / केल्या होत्या. मग एक चाल फायनल झाली.
एका कार्यक्रमात आनंदमठ चित्रपटातलं गाणं वाजवलं गेलं.
आता लाडक्या बहिणींचे बंधुराज एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या कार्यक्रमात अनिल कपूर माधुरी दीक्षितच्या पुकार चित्रपटातलं लताने गायलेलं गाणं राष्ट्रीय गीत म्हणून वाजवण्यात आलं.
https://news.abplive.com/cities/vande-matram-mix-up-at-eknath-shinde-eve...
शिंदे सेनेच्या लोकप्रतिनिधींसाठी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत शिबीरं आयोजित केली जात आहेत. त्यांना तिथे वंदे मातरम म्हणायला शिकवावं आणि पाठ करायला लावावं.
दुसरीकडे वतनचं सनम करणारे देवाभाऊ आहेतच.
विधानसभेचं कामकाज सुरू करताना सभापती राहुल नार्वेकरांनी वंदे मातरम म्हणून सभागृहाला लीड करावं.
नितेश राणे सारख्या स्वतःच्या
मोरल पोलिसींग आता कुठवर येऊन ठेपलंय पहा. एका ८ वर्षांच्या हिंदू मुलीने बरमुडा परिधान करुन नरवीर तानाजी मालुसऱ्यांच्या समाधीचे दर्शन घेतले म्हणून सिंहगडावर रविवारी मारहाणीचा प्रकार घडलायं....😡
https://www.esakal.com/pune/sinhagad-tourist-safety-under-question-after-two-days-of-fights-and-stone-pelting-at-historic-fort-in-pune-maharashtra-sdj87#goog_rewarded
ते मनोहर भिडेचे लोक होते का?
ते मनोहर भिडेचे लोक होते का?
ते मनोहर भिडेचे लोक होते का?>
ते मनोहर भिडेचे लोक होते का?>> या ऐवजी मनोहर भिडे सारख्या प्रवृत्ती स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी फोफावू देणे ही कोणाच्या मेंदूची उपज आहे हे शोधून त्यांना कसे त्याचे उत्तरदायित्व घ्यायला भाग पाडावे याबाबत चर्चा व्हायला हवी.
बरोबर.
बरोबर.
>>
>>
लिंचींगच्या शेकडो घटना घडलेल्या आहेत आणि बहुतेक वेळा निरपराधी मुस्ली माचा बळी गेलेला आहे. ट्रेन मधे पण अगदी नाव विचारुन , निवडून मारलेले जाते.
>>
शेकडो?
मी दिलेल्या आकडेवारीत कोट्यावधी मुस्लिम लोक मुस्लिम धर्माचा अपमान केला, प्रेषिताचा अपमान केला म्हणून संबंधित आरोपीला ठार मारण्याचे समर्थन करतात.
पाकिस्तानात कुराणाचा अपमान, महंमदाचा अपमान केला म्हणून कितीतरी ख्रिस्ती लोक, हिंदू लोक मारले गेले आहेत. मुळात त्यांची संख्या इतकी कमी आहे तरी.
जेव्हा इस्लामी तत्त्वज्ञान असा विचार शिकवते तेव्हा तो पूर्ण समाज अशा हिंसक विचाराचा बनतो आणि त्यातले अनेक तो विचार आचारात आणतात. जगभरात गेल्या ५०-६० वर्षात घडलेल्या अतिरेकी घटनांमागे इस्लामी अतिरेकीच आहेत हे डोळे उघडे ठेवल्यास लक्षात येईल.
आणि त्यावरून ह्या आकडेवारीतले तथ्यही
>>
..
बरमुडा प्रकरण, विचित्र होत
बरमुडा प्रकरण, विचित्र होत आहे. गड किल्ल्यांची शुचिता यांचेही काही अटी नियम केले आहेत का?
वंदे मातरम गाण्याला राष्ट्रीय गीताचा स्तर आहे का वगैरे नियम अटी कुठे लिहिल्या आहेत का? जनगणमन राष्ट्रगीताचेही नियम कुठे सापडतील?
जसजसे गडकिल्ले पर्यटन
जसजसे गडकिल्ले पर्यटन लोकप्रिय होत आहे तसे काही स्वघोषित स्वराज्यरक्षक जास्त दादागिरी करू लागले आहेत. त्यांना वेळीच वेसण घालणे आवश्यक आहे.
गडावर आलेल्या पर्यटकांच्या जबरदस्तीने बॅगा उघडायला लावून त्यात दारू नाही ना हे तपासणे हेही घडते.
आता बर्मुडा वगैरे वस्त्रविशेष चालणार नाहीत हे नवे खूळ.
ह्या लोकांना असले हवे ते नियम कायदा हातात घेऊन लागू करायचा कुणी हक्क दिला आहे?
सिंहगडावर खाद्यपदार्थ विकणारे डोके फिरवत असतात. भाकरी, भजी, ताक, दही, पोहे, अमुक तमुक. डोंगर चढायला सुरवात केल्यापासून पिच्छा सोडत नाहीत. महाराजांच्या काळात हे तर नक्कीच नव्हते. मग त्यावर बंदी का नाही? पर्यटक मंडळींना जाच होईल ते सर्व केले जाते. सोय होईल त्याकडे दुर्लक्ष!
तसेही सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर चक्क ट्रॅफिक जाम असतो असे ऐकले आहे. लोक अक्षरशः खेटून चालले असतात. नकोच ते!
Pages