दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेनटिलेटरचा स्फोट आणि बालके मृत्युमुखी >>> अरेरे!! ही न्यूज माहिती नव्हती.

भारतात मेडिकल यूजचे ऑक्सिजन सिलिंडर कसेही ठेवलेले असतात.

>> वेनटिलेटरचा स्फोट आणि बालके मृत्युमुखी
बापरे Sad अशा घटना पूर्वीही घडल्याहेत ना? काय हे...!

डॉ. यास्मिन शेख. मागच्याच काही वर्षांमध्ये सोमी वर त्यांच्याविषयी लेख वाचनात येत असंत. त्यातूनच त्यांच्याविषयी माहिती मिळत गेली. आदरणीय व्यक्तिमत्व. त्यांना श्रद्धांजली. _/\_

खवड्या डोंगर, तिसगाव (छत्रपती संभाजीनगर) येथे घडलेली घटना फार व्यथित करणारी आहे. विशेषत: उथळ आणि बेजवाबदार माध्यमानी दिलेल्या बातम्या वाचून भराभर मतं बनवणाऱ्यानी त्या लेकराची केलेली बदनामी वाचून मन विषन्न झाले... Sad

एकेक दुर्दैवी घटना वाचून सुन्न Sad

डॉ. यास्मिन शेख आवडतं व्यक्तिमत्त्व. एवढ्या फिट वाटायच्या शंभरीत, अजून दोन चार वर्षे तरी नक्की असतील आपल्यात असं वाटायचं. वाईट वाटलं, श्रद्धांजली.

Yayoi Kusama - जॅपनीझ आर्टिस्ट
अत्यंत अतुलनिय (युनिक) शैली. मी बघायचे त्यांची कला. एकदम हट के.

Pages