गडकरींच्या विरोधात निदर्शने - बळीचा बकरा?

Submitted by राज अज्ञानी on 4 July, 2026 - 15:58

पेट्रोल मधे इथेनॉल किती असावं हे ठरवणे हे पेट्रोलियम मंत्रालयाचे काम आहे. गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नक्कीच नाहीत.

पण जेव्हांपासून भाजप सत्तेत आलेली आहे तेव्हांपासून गडकरी इथेनॉलचे फायदे सांगत आहेत. पूर्वी ते फ्लेक्स इंजिन बद्दल बोलत होते. मग हळूहळू शेतकर्‍यांना फायदा करून देण्यासाठी इथेनॉलचे धोरण आखल्याचे सांगू लागले. पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबतीत कधीही कसलेली विधान आलेले नाही.

पेट्रोलमधे इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलची आयात कमी करावी लागत असेल तर हा देशहिताचा विचार आहे असे वाटते. तसेच ब्राझिलने इथेनॉल ब्लेण्डेड पेट्रोल पासून पूर्णपणे इथेनॉलवर शिफ्ट केले आहे हा दावाही या निर्णयाला पुष्टी देतो असे वाटेल. मात्र अनेक संस्थांनी नीती आयोगाचा हवाला देऊन स्पष्ट केलेले आहे कि इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोलच्या तुलनेत २/३ असल्याने तितकी कमी उर्जा मिळणार आहे. म्हणजेच मायलेज कमी मिळेल.

नीती आयोग म्हणतो कि इथेनॉल वापरण्याने होणारी उर्जाघट ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी असेल. म्हणजे ई२० पूरक वाहनात जर ई ८५ इथेनॉल टाकलं तर ती घट वेगळी असेल. ई२० वाहनात पेट्रोल टाकले तर मिळणारा मायलेज आणि ई २० टाकल्याने मिळणारा मायलेज यात ६% घट दिसेल. ( लल्लनटॉप).

तर ई२० पूरक नसलेल्या म्हणजे ई१० किंवा ई ५ किंवा शुद्ध पेट्रोलवर असलेल्या वाहनात ई २० पेट्रोल टाकले तर होणारी घट वेगवेगळी असेल.

जर शुद्ध पेट्रोलसाठी असलेल्या वाहनात ई८५ पेट्रोल टाकले तर घट खूपच जास्त असेल. तसेच इंजिनालाही नुकसान होईल. अशा तक्रारी येत आहेत. अगदी एबीपी माझा या खासगी सरकारी वाहिनीनेही वाहनचालकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत.

सोशल मीडीयात गडकरींना विरोध होताना दिसतो. गडकरींनी पंधरा वीस दिवसांपूर्वी ई १०० ची घोषणाही केली.

याचे परिणाम म्हणजे लोक नवीन वाहन घ्यायला कचरत आहेत. एबीपी माझाने कुठल्यातरी सर्वेच्या हवाल्याने सांगितले कि ४०% लोकांनी नवीन वाहन घेणे लांबणीवर टाकलेले आहे.

लल्लनटॉपचा हा आणखी एक रिपोर्ट.
https://www.youtube.com/watch?v=_xvM3UaJrbA

त्यांनी सिरीजच केली आहे.
अन्य वाहीन्यांनीही या विषयावर उद्बोधक माहिती दिली आहे. इथे सर्वच सुशिक्षित आहेत.
पेट्रोलची कॅलरीफिक व्हॅल्यू 45,000 किलो ज्यूल प्रती किलो आहे.
इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू 29,700 किलो ज्यूल प्रती किलो आहे. म्हणजे ३०,००० जवळजवळ. तीन पैकी दोन हिस्से.

इथे १/३ उर्जा कमी आहे. गणित थेट नसेल तरी याचा अर्थ साफ आहे कि शुद्ध पेट्रोलवर एखादा समजा ५ लिटर मधे ४०० किलोमीटर जात असेल
तर

त्याला आता ई२० पेट्रोल वापरून त्याला ५.४० लॉटर पेट्रोल लागेल.
ई८५ पेट्रोल वापरले तर त्याला ७.०३ लीटर पेट्रोल लागेल
आणि ई १०० पेट्रोल वापरले तर ७.५८ लीटर पेट्रोल लागेल.

हे फक्त उर्जा गुणोत्तर लक्षात घेऊन गणित केले आहे. इथेनॉलमुळे इंजिनची कार्यक्षमता वगैरे तीच राहते असे गृहीत धरलेले आहे.
थोडक्यात आयात कमी होईल पण खूप कमी होणार नाही. शिवाय नैऋत्येकडच्या राज्यात इथेनॉल पिकत नाही. तिथे इथेनॉलची वाहतूक करण्यासाठी जे इंधन लागेल त्याचा खर्च पाहता तिथे इथेनॉल ब्लेण्डेड इंधन विकणे पेट्रोलियम कंपन्यांसाठी नुकसानीचा सौदा ठरणार आहे. अशाच प्रकारे देशाच्या विविध भागात इथेनॉल ब्लेण्डेड इंधन उपलब्ध करणे शक्य होणार नाही.

म्हणजे देशाच्या मैदानी भागात हे इंधन सहज वापरता येणार आहे. लल्लनटॉपने नीती आयोगाचाच हवाला दिला आहे. त्यानुसार ऊसापासून किंवा तांदळापासून इथेनॉल बनवले तर प्रती एक लीटर इथेनॉलसाठी ऊस किंवा तांदळाला लागणारे पाणी जवळपास ७५०० लीटर ते १०००० लीटर असेल. हा टीकेचा विषय आहे. सरकारने दिशाभूल करणारे उत्तर देताना पिकाला लागणारे पाणी सांगितलेले नाही. त्यांनी फक्त कारखान्यात इथेनॉल बनवण्यासाठी लागणारे पाणी सांगितलेले आहे.

सरकारने असेही सांगितलेले आहे कि आम्ही मक्यापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिले आहे. पण मक्यापासून बनवलेले इथेनॉल एकूण किती टक्के आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही.

सरकारचा कारभार पारदर्शी असेल तर इथेनॉल निर्मितीत सहभागी असलेल्या कारखान्यांची यादी दिली पाहीजे. या कारखान्यात तयार होणारे इथेनॉल सांगितले पाहीजे.

साधारण तर्काने सांगता येईल कि यात बहुतकरून सहकारी आणि खासगी साखर कारखानेच मोठ्या प्रमाणात असणार. मक्याची आकडेवारी उपलब्धच नाही. गडकरींचे साखर कारखाने आहेत हे त्यांनी स्वतःच सांगितलेले आहे. पण त्यांच्या मुलांचे इथेनॉलचे कारखाने असल्याचे आरोप काँग्रेसने केलेले आहेत.

मारूती सुझुकीने ई ८५ साठी वॅगन आर बनवली. पण फक्त चार वाहने विकली गेली आहेत. ही परिस्थिती ग्राहकात असलेली भीती स्पष्ट करतेय.

आता ब्राझीलबद्दल.

ब्राझीलने टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेण्डींग वाढवत नेले. पन्नास वर्षे लागली. या काळात त्यांनी कंपन्यांना पूर्णपणे फ्लेक्स इंजिनवर आधारीत वाहनांच्या उत्पादनासाठी पुरेसा वेळ दिला. इन्फ्रास्टृक्चर तयार केले. लोकांना जुनी वाहने भंगारात काढायला पुरेसा वेळ दिला. कुणाचेच नुकसाण होंणार नाही अशा पद्धतीने मधल्या काळात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक वाहनासाठी हवे ते पेट्रोल उपलब्ध करून दिले. जसजशी जुनी वाहने बंद होत गेली तसतसे जास्तीचे इथेनॉल पेट्रोलमधे वाढवत नेले.

इथे १२ वर्षातच ई २०, ई ८५ आणि आता ई १०० सुरू केलेय. आज ई २० पेट्रोलच अनेक ठिकाणी आहे. आजही १५ ते २० वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत. ती यासाठी तयार नाहीत. २०२२ च्या आधीची वाहने ई२० साठी तयार नाहीत. ती वाहने खराब होऊ द्यायची का?

एहसान पूनावाला यांनी दिल्लीतल्या गडकरींच्या घरासमोर धरणे देण्यासाठी परवानगी मागितली होती. ती त्यांना मिळाली आहे. ते म्हणतात आमचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही पक्षाला विरोध करत नाही.

यावरून हे आंदोलन सरकारनेच पुरस्क्रुत केले असावे असे वाटते. म्हणजे वाहनचालकात असलेल्या संतापाची कुणकुण लागल्याने गडकरींना बळीचा बकरा बनवून जनक्षोभाला वाट करून सरकार सुरक्षित राहू इच्छिते. या धोरणात अन्य कुणी वक्तव्ये केलेली नसल्याने आओपापच गडकरी हेच लक्ष्य बन्णार आहेत.

म्हणजे जर लोकांनी विरोध केला नाही तरी फायदा आणि लोकांनी गडकरींना विरोध केला आणि सरकारला सोडून दिले तरी फायदा असा हा प्रकार दिसतो.

संदर्भ
१. https://www.youtube.com/watch?v=liTmvZXl4S0
२. https://www.youtube.com/watch?v=i1iaPSLlFaU
३. https://i.ytimg.com/vi/C2VBDjxkqWE/hqdefault.jpg?sqp=-oaymwEnCPYBEIoBSFr...
४. https://www.youtube.com/watch?v=RkTKpuss7c8
५. https://www.youtube.com/watch?v=vZqPsscJZnw
६. https://www.team-bhp.com/news/maruti-wagonr-flex-fuel-only-3-units-sold-...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रमसिंह इंडीयन ऑइल कि अन्य पेट्रोलियम कंपनीचे लॅब टेस्टसचे रिपोर्टस वर दिलेले आहेत ते वाचून तुम्ही हे स्टेटमेण्ट करत आहात असे समजू का?
हेडर मधे पण मूळ संदर्भ दिले होते. ते फाट्यावर मारून गडकरीं आणि सरकार काय म्हणते हेच तुम्ही सांगत होतात. अर्थात तुमच्या म्हणण्याला मान डोलावणारे आता गायब आहेत. त्यांनी नंतरच्या पोस्टी बाचलेल्या आहेत.

राज आणि भरत,
BJP चे किंवा गडकरी यांचे काय मत आहे यावरुन मी मत बनवले नाही आणि नव्हते. 22% पर्यन्त ethanol blend मुळे काहिही प्रॉब्लेम येणार नाही हे माझे अजूनही मत आहे. त्याची कारणे तीन
1. विविध blend साठी विविध रबर वापरणं हे logistically व inventory च्या दृष्टीने economical होणार नाही. त्यामुळे जर गाडी ethanol compliant असेल तर ती एका लिमिट पर्यन्त सर्व blend ला compliant असेल. ते लिमिट 22% आहे असे माझे अजूनही मत आहे.
2. ब्राझील मध्ये फ्लेक्स नसलेल्या गाड्या मध्ये 22% पर्यन्त blend असलेले पेट्रोल भरलेले हे मी अनुभवले आहे.
3. माझ्या 2010 च्या गाडीला काहिही प्रॉब्लेम अजून पर्यन्त तरी आला नाही..
रस्त्यावर मी एकही गाडी या कारणाने बंद पडलेली मी पाहिली नाही, किंवा ज्याची स्वतःची गाडी बंद padli असे सांगणारा माणूस मला अजूनही भेटला नाही.

असो.

सुझुकीला लवाद निर्णयामुळे जर खरोखरच भरपाई द्यावी लागणार असेल तर सगळ्या car makers चे स्टॉक short करायला ही योग्य वेळ असेल. Happy

विक्रमसिंग, मागे जाऊन शोधा आणि रबर आणि प्लास्टीक पार्टस वर इथेनॉलचा काय परिणाम होतो याचे टेस्टस रिझल्टस दिले आहेत ते डोळ्याखालून घाला. त्यानंतरही तुमचे हेच मत कायम असेल तर माझा तुमच्या इथून पुढच्या सर्व पोस्टसना पास. सॉरी टू से.

<कोर्ट 20% ethnol blend वर स्थगिती आणू शकते> कोर्ट? बरं.

पार्ट बदलण्याची भरपाई - गडकरींचं वक्तव्य होतं की ई२० मुळे पार्ट खराब झाले तर कंपन्या फुकटात बदलून देतील.
हल वायाच्या घरावर तुळशीपत्र. आणि कंपन्या मान्य करणार की ई२० मुळे खराब झाले आणि सरकार त्यांना ते मान्य करू देईल?

विक्रमसिंग माफ करा, पण तुमचे प्रतिसाद ट्रस्ट मी ब्रो वाटतात आणि तुमचा अनिल बोकील होतोय असं वाटतंय.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2155558&reg=3&lang=2 १२ ऑगस्ट २०२५.

Only in case of certain older vehicles, some rubber parts and gaskets may require replacement earlier than in case non blended fuel was used. This replacement is inexpensive and can be easily managed during routine servicing. It may need to be done once in the life time of vehicle and is a simple process to be carried out at any authorized workshop

<विविध blend साठी विविध रबर वापरणं हे logistically व inventory च्या दृष्टीने economical होणार नाही > मुळात विविध ब्लेंड आहे कुठे? ई२० आहे किंवा इथेनॉलविरहित पेट्रोल आहे. ई५ , ई१० कुठे मिळतंय? त्यामुळे सगळ्यांनाच हे ई२० वाले भाग लावून घ्यावे लागतील.

Some concerns have been voiced that ethanol blended petrol should be cheaper than non blended fuel and that this cost advantage has not been passed on to the customers. They are referring to a NITI Aayog report. In 2020-21, when the Report of NITI Aayog was prepared, Ethanol was cheaper than Petrol. Over time, procurement price of Ethanol have increased and now the weighted average price of Ethanol is higher than cost of refined Petrol.

Currently, the average procurement cost of Ethanol for Ethanol Supply Year 2024-25, as on 31.07.2025, is Rs.71.32 per litre, inclusive of transportation and GST. For producing E20, OMCs blend 20% of this procured Ethanol with Motor Spirit (MS). Price of C-heavy molasses based Ethanol increased from Rs.46.66 (ESY 2021-22) to Rs.57.97 (ESY 2024-25). Price of Maize-based Ethanol increased from Rs.52.92 to Rs.71.86 over the same period. Despite the increase in price of ethanol in comparison to petrol, the oil companies have not gone back on the ethanol blending mandate because the programme delivers on energy security, boosts farmers’ incomes and environmental sustainability.

म्हणजे एकूण फक्त वाहनमालकांच्या खिशातून पैसा काढून बाकी सगळ्यांचं भलं होतंय (असं सरकार म्हणतंय)

ब्राझीलबद्दलचा हा पेपर मिळाला
https://www.scielo.br/j/bjce/a/GZcBDfQmH93VGjNj576xZzM/?format=html&lang=en
यातल्या तांत्रिक भागावर डोकं खपवायला वेळ नाही आणि तेवढं त्याचं ज्ञानही नाही.

पण तीन मुद्दे दिसले इथेनॉलमधला पाण्याचा अंश -
इथेनॉल पेट्रोल मिश्रणाची प्रक्रिया - कुठे आणि कसं?
रबरी भागावर परिणाम

यातल्या दुसर्‍या मुद्द्याबाबत भारतात काय स्थिती आहे? क्वालिटी कंट्रोल, चेकिंग?

ट्रस्ट मी ब्रो वाटतात >>. Yes. So?.
At least it's not political noise.

आणि तुमचा अनिल बोकील होतोय असं वाटतंय.>> who?. I don't care? .

विविध मटेरिअल्स वर विबिध इंधनाचा काय परिणाम होतो हे या लिंक्सवर जिज्ञासूंसाठी.

Compatibility Studies on Elastomers and Polymers with Ethanol Blended Gasoline
https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1155/2014/429608

Experimental Study on Elastomer Compatibility with Ethanol-Gasoline Blends
https://saemobilus.sae.org/articles/experimental-study-elastomer-compati...

Compatibility Assessment of Elastomer Materials to Test Fuels Representing Gasoline Blends Containing Ethanol and Isobutanol
https://saemobilus.sae.org/articles/

११ जुलैची पोस्ट आहे. आज १ ऑगस्ट आहे. इतक्या दिवसात बघायला वेळ झाला नाही.

माझा राहुल गांधींवर जेव्हढा विश्वास आहे तेव्हढा कोणत्याच राजकीय नेत्यावर नाही. आंदोलक सिजेपी च्या दिपके आणि त्याचे सहकारी ह्यांच्यावर तर अजिबातच नाही.

माझंही तेच मत आहे.
ज्यांना ज्यांना विनासायास परवानग्या मिळाल्या त्यांचं आंदोलन हे सेफ्टी वॉल्व्हचं आहे. केजरीवाल यांना प्रत्यक्ष भेटलो नसलो तरीही मंडल आयोगाच्या वेळी आरक्षणविरोधी हिंसक आंदोलनात त्यांचंच नाव विद्यार्थी नेता म्हणून ऐकलेलं आहे. अगदी मूठभरांनी ते आंदोलन खूप व्यापक असल्याचा भास केला होता.

अभिजीत दीपके दलित आणि एहसान पूनावाला मुस्लीम. हे दोन्ही मोठे केलेले मोहरे पुढे उत्तर प्रदेशात दलित मुस्लीम मतांत फाटाफूट करण्यासाठी वापरले जाणार याची दाट शक्यता आहे.

विरोधकांची स्पेस आधीच व्यापल्याने नंतर पुन्हा लगेच या मुद्द्यांवर आंदोलन होण्याची शक्यता मावळते. ईव्हीएमच्या विरोधात एका संघटनेने दोन महीन्यांपूर्वी परवानगी मागितली होती. तिला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्याआधीच वेगळे ईव्हीएम विरोधी आंदोलन लाँच पण झाले.

पुन्हा विषयावर..

शेतकर्‍यांना फायदा किती? इथेनॉलची जी एमसपी आहे तिच्यापेक्षा एक रूपयाही शेतकर्‍यांना मिळणार नाही. कारण गडकरींनी सांगितल्याप्रमाणे शेतातून थेट इथेनॉल शेतकरी विकू शकत नाही. तसे केल्यास त्याला तुरूंगाची हवा खावी लागेल. कारण ते अल्कोहोल असते. धान्य, ऊस यापासून फ्युएल ग्रेड इथेनॉल बनवण्यासाठी जी प्रोसेस लागते ती शेतकर्‍याला शक्य नाही. म्हणजे इथेनॉल उत्पादक हेच इथेनॉल विकू शकतात. शेतकरी त्यांनाच आपले कृषी उत्पादन विकतात. त्यासाठी त्यांना तोच भाव मिळेल जो सर्वसाधारण व्यापारी किंवा साखर कारखानदार देतो.
गडकरींनी शेतकर्‍यांना फायदा होईल हे कशाच्या आधारे सांगितलं हे त्यांनाच माहिती.

राअ यांनी दिलेल्या इथेनॉलचे सायन्स व्हिडीओतील प्रदूषणाच्या मुद्द्याबाबत:
मी वाचलेले की इथेनॉल आणि पेट्रोल गाडीत जळताना होणारे प्रदूषण यात दिलेल्या अंतराकरता दोन्ही सारखाच कार्बन-डाय-ऑक्साइड सोडत असले तरी ईथेनॉल कार्बन मोनाक्साईड कमी प्रमाणात सोडते. तेवढ्याच अंतरास ~ ३०% कमी. इथेनॉल मधल्या ऑक्सिजनमुळे पूर्ण इंधनाचे पूर्ण ज्वलन होते त्यामुळे असे होते.
NOx थोड्याफार प्रमाणात कमी होतात आणि SO2 नाहीच, पण आता पेट्रोल/डिझेल मधुनही गंधक शक्य तितके काढतात रिफाईन करताना त्यामुळे पेट्रोल डिझेल नवे इंजिन्स SO2 कमी सोडतील.
एक अजून असा मुद्दा वाचला की ईथेनॉल वनस्पती पासून बनवतात, त्यात वातावरणातलाच CO2 वापरला जातो आणि तो मग वाहनातुन सोडला जातो. पेट्रोल/डिझेलमध्ये मात्र आपण जमिनीच्या पोटातून कार्बन बाहेर काढुन तो जाळतो आणि वातावरणातल्या CO2 मध्ये भर घालतो. (याचा फायदा मिळण्यास तेल जमीनीतच राहु द्यावे लागेल. तसे होईल का?)

हे तयार इंधन वापरताना. Environ friendly नक्की किती, कितपत नक्की फायदा होतो त्यासाठी उत्पादन प्रक्रिये पासून अंतिम वापरा पर्यंत दोन्हीत किती प्रदूषण होते याची तुलना बघावी लागेल. शेतीसाठी लागणारे पाणी, खते, त्यांचे उत्पादन करणारे कारखाने, वापरण्यात येणाऱ्या मशिनरीज, कीटकनाशकांचा वापर (आणि असेच तेल उत्खनन, ट्रान्सपोर्ट, रिफायनरीज मुळे होणारे प्रदूषण) ) वगैरे विचारात घेता नक्की किती फायदा? मी यावर जेवढे वाचले त्यातुन ठोस असे काही दिसले नाही.

कुणाला याबद्दल माहिती असल्यास सांगावे/दुवा द्यावा.

त्या व्हिडीओत असे म्हटले आहे कि हे ग्रीन पोल्युशन नक्कीच नाही. पोल्युशन कमी होते.
खरं तर ग्रीन पोल्युशन म्हणून आणलेले सर्व पर्याय हे ग्रीन नाहीत.

अगदी सोलर आणि विंड सुद्धा. कारण त्यात बॅटरी वापरतात. हायड्रोजन इंधन हे सध्या ब्ल्यू हायड्रोजन आहे. बॅटरी चार्जिंग साठी सोलर/विंड आणि कोळशाची वीज असाच अभ्यास केला जातो. पण बॅटरीमधे वापरले जाणारे घटक मिळवताना होणारा function at() { [native code] }याचार आणि प्रदूषण, तसेच बॅटरीचा स्वतःचा कचरा याचा विचार सध्या केला जात नाही.

हा मुद्दा कदाचित इथे येऊन गेला असेल.
https://www.facebook.com/reel/1717809796196429
याने जे सांगितलंय तेच
Ethanol is hygroscopic, meaning it naturally attracts and absorbs water molecules from the surrounding air and environment. This happens because of hydrogen bonding between alcohol and water molecules
In fuel blends like E10 or E20 petrol, pulling too much moisture causes water and ethanol to separate from the gasoline and sink to the bottom of the tank
As fuel is drawn by the dispensing unit from the bottom of the underground tank, some vehicles may end up being dispensed this water-rich mixture instead of E20

One of the petrol pump owners also expressed fears that underground tanks and pipelines made of mild steel could become more susceptible to corrosion because ethanol’s tendency to absorb water, potentially adding to fuel contamination. Some said OMCs had however replaced seals and washers in petrol dispensing units with neoprene rubber in preparation for E20.
The separated water-ethanol layer at the bottom can lead to poor combustion, rough idling, engine misfires, and internal component damage

https://www.thehindu.com/business/Industry/petrol-pump-owners-claim-etha...

Petrol pump owners claim ethanol’s moisture-absorbing nature is contaminating fuel

One of the petrol pump owners also expressed fears that underground tanks and pipelines made of mild steel could become more susceptible to corrosion because ethanol’s tendency to absorb water, potentially adding to fuel contamination. Some said OMCs had however replaced seals and washers in petrol dispensing units with neoprene rubber in preparation for E20.

Petrol pump dealers also said there was need for creating awareness among vehicle owners in order to prevent disputes at fuel stations. They said motorists should be advised on the need for protecting their vehicles from rain as well as during washing to ensure there is no water ingress in fuel tanks, but the oil marketing companies (OMCs) were actively dissuading them from displaying any informational boards.

“Some petrol pumps had hoardings saying E20 was being dispensed on government order, but OMCs were offended and ordered for them to be removed. They don’t want customers to know even this much,

Petrol pump dealers said they have been instructed to check underground storage tanks for water contamination three times a day, with the frequency increasing to once every two hours during the monsoon. Many pumps use a dipstick coated with water-finding paste that turns red in the presence of water. If contamination is detected, the dealer informs the oil marketing company (OMC), which deploys personnel to drain the water from the tank using a hand pump.

Dealers, however, said they were unhappy with the financial burden of the process. They pointed out that while they purchase the entire stock of E20 fuel from OMCs, they must bear the losses when any contaminated portion has to be discarded. One of the persons above said he lost 600 litres of fuel recently, while there are others he said who have lost upto 20,000 litres of their stock. They also asked for guidelines for discarding such contaminated water.

Indian Oil Corporation Limited (IOCL) said that they have zero tolerance policy towards contamination. It said regular inspections, surprise checks and scientific testing are carried out as part of a rigorous quality assurance system, and that in the past week alone it had carried out 10,000 surprise inspections across its retail outlets, conducted more than 8,500 quality tests and deployed hundreds of special inspection teams to independently verify compliance with quality standards.

“If any instance of adulteration, contamination or violation of prescribed quality norms is detected during inspections or established through customer complaints, strict action is taken against the concerned dealer in accordance with the applicable guidelines and contractual provisions,” the statement added.

SIAM flags high chloride levels in E20 fuel, warns of permanent engine part damage, govt responds
The Petroleum and Natural Gas Ministry has responded to reports of fuel contamination, saying fuel quality is regularly monitored by oil marketing companies. The ministry said water ingress testing is being conducted 8-12 times a day across more than 87,000 retail outlets.
https://www.businesstoday.in/latest/economy/story/siam-flags-high-chlori...

मोदींनी नोटाबंदी करून बँकेच्या कर्मचार्‍यांना कामाला जुंपलं होतं. त्या वाढीव कामाचे पैसे सुद्धा काहींना मिळाले नाहीत.
ई२० इंधन ही मोटार उद्योगाची नोटाबंदी आहे हे पुन्हा लिहितोय.

CNBC TV 18 ने ही बातमी उडवली
https://www.cnbctv18.com/auto/siam-flags-e20-fuel-contamination-as-vehic...

बिझिनेस स्टँडर्डची लिंकही दिसत नाही.

ई २० बाबत अनेक मुद्दे आहेत. राज अज्ञानी, त्यांचे संकलन करून एक नवा लेख लिहिता येईल का?

१. माइलेज कमी होणं
२. वाहनांच्या काही भागांची हानी होणे
३. यामागचं अर्थकारण - अ. शेतकर्‍यांना खरंच लाभ होणार का? ब. सरकारच म्हणतंय - बँकांनी इथेनॉल कारखान्यांना मोठी कर्जे दिलीत म्हणून... इ. इथेनॉल पेट्रोलपेक्षा महाग पडणं (हेही सरकारच म्हणतंय)
४. लोकांना विश्वासात न घेता लादलेले निर्णय०
५. लोकांना - यात मोटार कंपन्याही आल्या - धमकावणे

आणखीही असतील.

मोटार कंपन्या अनेकदा एखाद्या ब्रँड च्या सगळ्या च्या सगळ्या मोटारी परत बोलावून त्यातले विशिष्ट पार्ट बदलून देतात. मारुतीच्या संकेत स्थळावरच किती रिकॉल्स आहेत पहा.
https://www.marutisuzuki.com/important-information-for-customers?srsltid...
मग इथेनॉल भेसळयुक्त इंधनासाठी जे भाग बदलायचे आहेत, ते असे प्रोअ‍ॅक्ट्व्हली का बदलत नाहीत? तसं केलं तर बोभाटा होईल म्हणून?

तीन दिवसांपूर्वी पुरी म्हणाले ई२० मुळे ग्राहकांचे प्रति लिटर ३० रुपये वाचले. आधी सांगत होते की सरकारने पेट्रोल कंपन्यांना आर्थिक मदत केली. मग पेट्रोल कंपन्या भाव न वाढवून स्वतः युद्धाची झळ सोसत आहेत.
https://www.ndtv.com/india-news/fuel-prices-petrol-diesel-iran-war-rs-1-...

https://energy.economictimes.indiatimes.com/news/oil-and-gas/omcs-feel-w...

https://energy.economictimes.indiatimes.com/news/oil-and-gas/omcs-feel-w...

बघतो. विस्कळीत स्वरूपात प्रतिसादात आलेल्या मुद्द्यांचं संकलन या स्वरूपात ना?

हो.

वारा किती वेगाने वाहतोय याचाही परिणाम होतो. वाहन नेहमी वारा वाहतोय त्याच दिशेने चालवावे.

वारा किती वेगाने वाहतोय याचाही परिणाम होतो. >> खरं आहे! Wink वार्‍याची दिशा वेळीच ओळखा! Wink Proud

Pages