पेट्रोल मधे इथेनॉल किती असावं हे ठरवणे हे पेट्रोलियम मंत्रालयाचे काम आहे. गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नक्कीच नाहीत.
पण जेव्हांपासून भाजप सत्तेत आलेली आहे तेव्हांपासून गडकरी इथेनॉलचे फायदे सांगत आहेत. पूर्वी ते फ्लेक्स इंजिन बद्दल बोलत होते. मग हळूहळू शेतकर्यांना फायदा करून देण्यासाठी इथेनॉलचे धोरण आखल्याचे सांगू लागले. पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबतीत कधीही कसलेली विधान आलेले नाही.
पेट्रोलमधे इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलची आयात कमी करावी लागत असेल तर हा देशहिताचा विचार आहे असे वाटते. तसेच ब्राझिलने इथेनॉल ब्लेण्डेड पेट्रोल पासून पूर्णपणे इथेनॉलवर शिफ्ट केले आहे हा दावाही या निर्णयाला पुष्टी देतो असे वाटेल. मात्र अनेक संस्थांनी नीती आयोगाचा हवाला देऊन स्पष्ट केलेले आहे कि इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोलच्या तुलनेत २/३ असल्याने तितकी कमी उर्जा मिळणार आहे. म्हणजेच मायलेज कमी मिळेल.
नीती आयोग म्हणतो कि इथेनॉल वापरण्याने होणारी उर्जाघट ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी असेल. म्हणजे ई२० पूरक वाहनात जर ई ८५ इथेनॉल टाकलं तर ती घट वेगळी असेल. ई२० वाहनात पेट्रोल टाकले तर मिळणारा मायलेज आणि ई २० टाकल्याने मिळणारा मायलेज यात ६% घट दिसेल. ( लल्लनटॉप).
तर ई२० पूरक नसलेल्या म्हणजे ई१० किंवा ई ५ किंवा शुद्ध पेट्रोलवर असलेल्या वाहनात ई २० पेट्रोल टाकले तर होणारी घट वेगवेगळी असेल.
जर शुद्ध पेट्रोलसाठी असलेल्या वाहनात ई८५ पेट्रोल टाकले तर घट खूपच जास्त असेल. तसेच इंजिनालाही नुकसान होईल. अशा तक्रारी येत आहेत. अगदी एबीपी माझा या खासगी सरकारी वाहिनीनेही वाहनचालकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत.
सोशल मीडीयात गडकरींना विरोध होताना दिसतो. गडकरींनी पंधरा वीस दिवसांपूर्वी ई १०० ची घोषणाही केली.
याचे परिणाम म्हणजे लोक नवीन वाहन घ्यायला कचरत आहेत. एबीपी माझाने कुठल्यातरी सर्वेच्या हवाल्याने सांगितले कि ४०% लोकांनी नवीन वाहन घेणे लांबणीवर टाकलेले आहे.
लल्लनटॉपचा हा आणखी एक रिपोर्ट.
https://www.youtube.com/watch?v=_xvM3UaJrbA
त्यांनी सिरीजच केली आहे.
अन्य वाहीन्यांनीही या विषयावर उद्बोधक माहिती दिली आहे. इथे सर्वच सुशिक्षित आहेत.
पेट्रोलची कॅलरीफिक व्हॅल्यू 45,000 किलो ज्यूल प्रती किलो आहे.
इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू 29,700 किलो ज्यूल प्रती किलो आहे. म्हणजे ३०,००० जवळजवळ. तीन पैकी दोन हिस्से.
इथे १/३ उर्जा कमी आहे. गणित थेट नसेल तरी याचा अर्थ साफ आहे कि शुद्ध पेट्रोलवर एखादा समजा ५ लिटर मधे ४०० किलोमीटर जात असेल
तर
त्याला आता ई२० पेट्रोल वापरून त्याला ५.४० लॉटर पेट्रोल लागेल.
ई८५ पेट्रोल वापरले तर त्याला ७.०३ लीटर पेट्रोल लागेल
आणि ई १०० पेट्रोल वापरले तर ७.५८ लीटर पेट्रोल लागेल.
हे फक्त उर्जा गुणोत्तर लक्षात घेऊन गणित केले आहे. इथेनॉलमुळे इंजिनची कार्यक्षमता वगैरे तीच राहते असे गृहीत धरलेले आहे.
थोडक्यात आयात कमी होईल पण खूप कमी होणार नाही. शिवाय नैऋत्येकडच्या राज्यात इथेनॉल पिकत नाही. तिथे इथेनॉलची वाहतूक करण्यासाठी जे इंधन लागेल त्याचा खर्च पाहता तिथे इथेनॉल ब्लेण्डेड इंधन विकणे पेट्रोलियम कंपन्यांसाठी नुकसानीचा सौदा ठरणार आहे. अशाच प्रकारे देशाच्या विविध भागात इथेनॉल ब्लेण्डेड इंधन उपलब्ध करणे शक्य होणार नाही.
म्हणजे देशाच्या मैदानी भागात हे इंधन सहज वापरता येणार आहे. लल्लनटॉपने नीती आयोगाचाच हवाला दिला आहे. त्यानुसार ऊसापासून किंवा तांदळापासून इथेनॉल बनवले तर प्रती एक लीटर इथेनॉलसाठी ऊस किंवा तांदळाला लागणारे पाणी जवळपास ७५०० लीटर ते १०००० लीटर असेल. हा टीकेचा विषय आहे. सरकारने दिशाभूल करणारे उत्तर देताना पिकाला लागणारे पाणी सांगितलेले नाही. त्यांनी फक्त कारखान्यात इथेनॉल बनवण्यासाठी लागणारे पाणी सांगितलेले आहे.
सरकारने असेही सांगितलेले आहे कि आम्ही मक्यापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिले आहे. पण मक्यापासून बनवलेले इथेनॉल एकूण किती टक्के आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही.
सरकारचा कारभार पारदर्शी असेल तर इथेनॉल निर्मितीत सहभागी असलेल्या कारखान्यांची यादी दिली पाहीजे. या कारखान्यात तयार होणारे इथेनॉल सांगितले पाहीजे.
साधारण तर्काने सांगता येईल कि यात बहुतकरून सहकारी आणि खासगी साखर कारखानेच मोठ्या प्रमाणात असणार. मक्याची आकडेवारी उपलब्धच नाही. गडकरींचे साखर कारखाने आहेत हे त्यांनी स्वतःच सांगितलेले आहे. पण त्यांच्या मुलांचे इथेनॉलचे कारखाने असल्याचे आरोप काँग्रेसने केलेले आहेत.
मारूती सुझुकीने ई ८५ साठी वॅगन आर बनवली. पण फक्त चार वाहने विकली गेली आहेत. ही परिस्थिती ग्राहकात असलेली भीती स्पष्ट करतेय.
आता ब्राझीलबद्दल.
ब्राझीलने टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेण्डींग वाढवत नेले. पन्नास वर्षे लागली. या काळात त्यांनी कंपन्यांना पूर्णपणे फ्लेक्स इंजिनवर आधारीत वाहनांच्या उत्पादनासाठी पुरेसा वेळ दिला. इन्फ्रास्टृक्चर तयार केले. लोकांना जुनी वाहने भंगारात काढायला पुरेसा वेळ दिला. कुणाचेच नुकसाण होंणार नाही अशा पद्धतीने मधल्या काळात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक वाहनासाठी हवे ते पेट्रोल उपलब्ध करून दिले. जसजशी जुनी वाहने बंद होत गेली तसतसे जास्तीचे इथेनॉल पेट्रोलमधे वाढवत नेले.
इथे १२ वर्षातच ई २०, ई ८५ आणि आता ई १०० सुरू केलेय. आज ई २० पेट्रोलच अनेक ठिकाणी आहे. आजही १५ ते २० वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत. ती यासाठी तयार नाहीत. २०२२ च्या आधीची वाहने ई२० साठी तयार नाहीत. ती वाहने खराब होऊ द्यायची का?
एहसान पूनावाला यांनी दिल्लीतल्या गडकरींच्या घरासमोर धरणे देण्यासाठी परवानगी मागितली होती. ती त्यांना मिळाली आहे. ते म्हणतात आमचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही पक्षाला विरोध करत नाही.
यावरून हे आंदोलन सरकारनेच पुरस्क्रुत केले असावे असे वाटते. म्हणजे वाहनचालकात असलेल्या संतापाची कुणकुण लागल्याने गडकरींना बळीचा बकरा बनवून जनक्षोभाला वाट करून सरकार सुरक्षित राहू इच्छिते. या धोरणात अन्य कुणी वक्तव्ये केलेली नसल्याने आओपापच गडकरी हेच लक्ष्य बन्णार आहेत.
म्हणजे जर लोकांनी विरोध केला नाही तरी फायदा आणि लोकांनी गडकरींना विरोध केला आणि सरकारला सोडून दिले तरी फायदा असा हा प्रकार दिसतो.
संदर्भ
१. https://www.youtube.com/watch?v=liTmvZXl4S0
२. https://www.youtube.com/watch?v=i1iaPSLlFaU
३. https://i.ytimg.com/vi/C2VBDjxkqWE/hqdefault.jpg?sqp=-oaymwEnCPYBEIoBSFr...
४. https://www.youtube.com/watch?v=RkTKpuss7c8
५. https://www.youtube.com/watch?v=vZqPsscJZnw
६. https://www.team-bhp.com/news/maruti-wagonr-flex-fuel-only-3-units-sold-...
विक्रमसिंह, चांगले मुद्दे
विक्रमसिंह, चांगले मुद्दे मांडलेत तुम्ही.
(No subject)
एक कायप्पा फॉरवर्ड ...

विक्रमसिंह छान पोस्ट सर्वच!
विक्रमसिंह छान पोस्ट सर्वच!
हल्ली राजकारण बाजूला ठेवत माहिती मिळाली की बरे वाटते. अन्यथा कोणावर विश्वास ठेवायचा हे समजणे अवघड होते.
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः | परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो अहो ध्वनिः
Union Minister Nitin Gadkari
Union Minister Nitin Gadkari has said that car manufacturers will replace damaged parts, mainly washers in older cars using E20 fuel during servicing at no extra cost. He dismissed social media reports of vehicle damage as exaggerated.
https://www.livemint.com/news/india/manufacturers-to-replace-washers-of-...
माझ्या माहिती आणि आकलनानुसार
पेट्रोलियम मंत्री आहेत, हरदीप सिंग पुरी. इथेनॉल मिसळायचं यांच्या अखत्यारीत येतं.
अवजड उद्योग मंत्री आहेत एच डी देवेगौडा. मोटार उद्योग यांच्या अखत्यारीत https://heavyindustries.gov.in/en/automotive
गडकरींचं काम आहे रस्ते , हायवे इ. बांधणं. रस्ते वाहतूक सुकर होईल हे पाहणं
Road transport Responsible for formulating policies, regulating motor vehicles, and ensuring efficient, accessible, and reliable road transport to support India’s socio-economic growth and connectivity.
रस्तेबांधणीबद्दल गडकरी किती बोलतात? रस्त्यांच्या अवस्थेबद्दल?
भरत यांनी दिलेली लिंक कृपया
भरत यांनी दिलेली लिंक कृपया पाहू नये.
गडकरींनी आव्हान केले, ज्याने
गडकरींनी आव्हान केले, ज्याने तक्रार केली त्याच्या विरोधात टोयोटा ने एफ आय आर केली. ही माहिती गडकरींनी एका मुलाखतीत सांगितली.
फ२० म्हणाले कि स्मार्ट मीटर मधे प्रॉब्लेम असते तर लाखो तक्रारी आल्या असत्या. गेले दोन महिने आम्हाला चार पट बिल येतंय. आता समजलं सैसायटीतल्या सर्व २५५ फ्लॅटसना असंच तीन ते चार पट बिल येतंय. नगरसेवक म्हणाले सर्वांनी बिलं माझ्या कडे द्या मी बघतो. हा ही भाजपचाच आहे.
सोसायटी भाजपमय आहे.
प्रश्न सुटला की मग!
प्रश्न सुटला की मग! नगरसेवकाला बिले दिली की प्रश्न सुटत असेल तर चोक्कस! जलसो!!
उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय
..
उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय
..
हीट मुळे बिल जास्त येते असा
हीट मुळे बिल जास्त येते असा शोध फ२० ह्यांनी लावलेला आहे म्हणे, त्यात स्मार्ट मीटरचा काहीही दोष नाही.
निति आयोगाच्या एक्स्पर्ट
निति आयोगाच्या एक्स्पर्ट कमिटीच्या रिपोर्टची लिंक मागच्या पानावर दिली आहे.
त्यात SIAM Society of Indian Automobile Manufactures च्या सूचना
:
1.
Protection Grade fuel: To ensure fuel availability for existing vehicles and assurance to customers,
parallel dispensing of a protection grade E10 fuel is a must. This is followed in other countries in the
transition period. In Brazil transition to higher blends was spread over 30 or more years. Even today
E0 fuel is available to customers as a choice in Brazil.
---
Fuel efficiency of a Flex fuel vehicle running on Ethanol E100 will be more than 30% lower than
a corresponding Gasoline Engine.
However as per current Ethanol fuel cost and taxation, cost of E100 at retail pumps will be 80%
to 106% of Gasoline fuel (calculated for Delhi scenario)
With lower fuel efficiency and higher fuel cost, running cost of a flex fuel vehicle will be 10%
to 36% higher than running on gasoline, making it unacceptable from a customer perspective.
लोकसत्तेने यावर अग्रलेख लिहिला होता. त्यातले मुद्दे - सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले आणि देशात सध्या गरजेपेक्षा बरेच जास्त इथेनॉल निर्माण होते. तेल कंपन्या उसापेक्षा धान्या पासून बनलेले इथेनॉल पसंत करतात.
India's ethanol production capacity reached approximately 1,990 crore litres,
India requires about 1,016 crore (10.16 billion) liters of ethanol annually to meet its mandate of blending 20% ethanol into petrol. Total national ethanol production capacity to support this includes around 760 crore liters from molasses and 740 crore liters from grains.
Ethanol producers in India are urging the government to support the sector as lower demand and tight margins persist, particularly as global crude oil uncertainty creates an opportunity to prioritise sustainable fuels.
The ethanol industry is calling for the diversification of ethanol usage, increases in blending mandates, and higher prices.
India's ethanol production capacity has exceeded its fuel-blending requirements, creating a structural surplus which could be directed toward industrial applications, he added.
But prices for domestic ethanol are regulated by the government, rendering it less competitive, while imported ethanol is consistently cheaper than its domestic counterpart. This regulation reduces the allure of domestic ethanol to be purchased for industrial use.
https://www.argusmedia.com/en/news-and-insights/latest-market-news/28088...
Corn accounts for 31pc of ethanol feedstock, with sugar contributing 49pc and the rest coming from surplus rice and damaged foodgrain.
Prices of ethanol from maize command a premium over sugarcane-derived grades, further destabilising the sector and reducing purchases from sugar mills that use molasses.
Using ethanol for diesel blending could be another solution to manage the surplus,
याशिवाय अन्यत्र वाचलेले - भारत औद्योगिक वापरासाठी लागणारे इथेनॉल आयात करतो- अर्थात अमेरिकेकडून
The US government has consistently pressured India to lift its fuel-blending import restrictions.
एकंदरित यात उपभोक्त्याचा कसलाही विचार नाही , करायची गरज नाही.
एक्झॅक्टली. हे सर्व मुद्दे
एक्झॅक्टली. हे सर्व मुद्दे लिहीले होते. पण त्यांना फाट्यावर मारून फक्त चेरी पिकिंग चालू झाले.
काल दिलेल्या लिंक मधे परदेशी चलन कसे वाचणार हे सांगितलेय. सर्वसामान्यांच्या नॉन इथेनॉल कॅलिब्रेटेड वाहनात इथेनॉल घालून चलन वाचवले पण इंडस्ट्रीला लागणारे इथेनॉल अमेरिकेतून इंपोर्ट केले. त्यात दर वर्षी वाढ होत आहे. मग इंडस्टॄला अमेरिकन इथेनॉल वापरून सर्वसामान्यांच्या वाहनात इथेनॉल वापरणे ही काय भानगड आहे?
इंडस्ट्रीयल पोल्युशन हे वाहनांपेक्षा जास्त घातक आहे. आता तर इंडस्ट्रीच्या पोल्युशन मुळे सायलेण्ट किलर म्हणजे ओझोनच्या उत्सर्जनाबद्दल बोलले जात आहे. ते वाहनातून निघणार्या धूराने होत नाही.
https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/summer-ozone-spike-how-...
https://www.youtube.com/watch?v=eGgEbjJ06B0
या सरकारकडून माझ्यासारख्या अज्ञानी लोकांना शिकण्यासारखे बरंच काही आहे.
या धाग्यावर कुठल्याही इंजिनात
या धाग्यावर कुठल्याही इंजिनात इथेनॉल मिश्रित पेट्रोल चालते असे म्हटले आहे ते योग्य नाही. लगेच प्रतिसाद दिला नाही. कारण हे दावे युट्यूबर्स करत आहेत. बातम्या आहेत. यात टेक्निकल माहिती नाही. एआय बरेचदा चुकीची माहिती देतं आणि गुगल लाखो वेबसाईटस देतं. काही मित्रांनी दिलेली माहिती इथे शेअर करता येत नाही. त्यातले इनपुटस एआय दिल्यानंतर मिळालेली माहिती (सारांश) अशी. ही ऑथेंटिक वाटते.
इथेनॉल (C₂H₅OH) : यातील OH (Hydroxyl Group) हा भाग इथेनॉलला ध्रुवीय (Polar) बनवतो. पेट्रोल मात्र अनेक Hydrocarbon चे मिश्रण आहे (उदा. Octane – C₈H₁₈) आणि त्यात ऑक्सिजन नसतो.
जी जुनी वाहने इथेनॉलसाठी कॅलिब्रेटेड झालेली नाहीत त्यामधे वापरलेले रबर (होजेस साठी) Natural Rubber आणि NBR (Nitrile Rubber) असते.
इथेनॉल रबर खराब करतो. कारण इथेनॉल Polar आहे ( ओएच गग्रुप) तो उत्कृष्ट Solvent आहे आणिपाणी खेचतो (Hygroscopic).
त्यामुळे बर फुगते . Plasticizer बाहेर पडतात. रबर मऊ होते. नंतर कठीण होते. Crack पडतात. Fuel leakage सुरू होते.
किती दिवसांनी खराब होते याचे एकच उत्तर नाही. ते इथेनॉलचे प्रमाण, तापमान , रबरचा प्रकार , इंधन सतत आहे की अधूनमधून, वाहन चालवले जाते की दीर्घकाळ उभे असते यावर अवलंबून आहे.
जुने NBR होजेस E85 मध्ये काही महिन्यांत खराब होऊ शकतात. E20 मध्ये काही वर्षांनी परिणाम दिसू शकतो. जर इंधनात पाण्याचा अंश असेल तर मात्र होजेस लगेच खराब होतात. पाणी खराब हाताळणीमुळे येते.
आधुनिक E20/E85 वाहनांमध्ये (इथेनॉल कीलिब्रेटेड वाहनात) होजेस साठी वापरले जाणारे मटेरियल :
FKM (Viton), HNBR, Fluorosilicone, PTFE (Teflon) lining, EPDM (क्वचित).
यातले टेफलॉन लोटिंग आपण इलेक्ट्रिकल केबल्स मधे बघतो. याचं जॅकेटिंग आतल्या केबल्सला संरक्षण देतं. म्हणून आजच्या ई २० वाहनात वेगवेगळे इलेस्टोमर्स वापरलेले असतात. या वाहनांत इथेनॉल वापरता येते.
याशिवाय फ्युएल टँक मधे करोजन रेजिस्टंट स्टील वापरावे लागते. हे जुन्या वाहनात नाही. फ्युएल पंपचे पार्टस इथेनॉल कॅलिब्रेटेड असावे लागतात. ओ रिंग्ज फ्युरोकार्बन्सचे बदलावे लागतात, इंजेक्टर करोजन रेझिस्टंट स्टीलचे वापरावे लागतात.
आधी इथे Stoichiometric Ratio बद्दल चर्चा केली आहे. इथेनॉलमुळे तो कसा बदलतो हे वर दिलेले आहे. त्याप्रमाणे ECU Software बदलावे लागते. म्हणजे ईसीयू जास्त इंधन इंजेक्ट करू शकते. नाहीतर पावर आणि मायलेज दोन्हीवर परिणाम होतो.
स्पार्क टायमिंग अॅडजस्ट करावा लागतो.
हे बदल ज्या वाहनात नाहीत त्या वाहनांना इथेनॉल ने काहीही फरक पडत नाही हे म्हणणे पटण्यासारखे नाही.
एआय ची लिंक देता येत नाही त्यामुळे क्षमस्व.
विविध मटेरिअल्स वर विबिध
विविध मटेरिअल्स वर विबिध इंधनाचा काय परिणाम होतो हे या लिंक्सवर जिज्ञासूंसाठी.
Compatibility Studies on Elastomers and Polymers with Ethanol Blended Gasoline
https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1155/2014/429608
Experimental Study on Elastomer Compatibility with Ethanol-Gasoline Blends
https://saemobilus.sae.org/articles/experimental-study-elastomer-compati...
Compatibility Assessment of Elastomer Materials to Test Fuels Representing Gasoline Blends Containing Ethanol and Isobutanol
https://saemobilus.sae.org/articles/compatibility-assessment-elastomer-m...
नीती आयोगाची लिंक भरत यांनी
नीती आयोगाची लिंक भरत यांनी दिलेलीच आहे. मी सुरूवातीपासून अनेक लिंक्स दिलेल्या आहेत.
यावरून काही निरीक्षणे नोंदवतो.
१. भारतात सध्या प्युअर पेट्रोलवरची वाहने रस्त्यावर आहेत. २००६ साली ५% इथेनॉल ब्लेण्डिंगचा निर्णय झाला. तो प्रत्यक्षात सर्वत्र व्हायला दोन तीन वर्षे गेली. म्हणजे २००९ पर्यंत सर्वत्र ५% इथेनॉल मिळू लागले. या वर्षी विकली गेलेली अनेक वाहने ही ५% इथेनॉल कॅलिब्रेटेड नव्हती. या वाहनांची मुदत वीस वर्षे आहे. जेव्हां घेतली तेव्हां अशी कुठलीच मुदत नव्हती. गडकरींनी १५ वर्षाfunction at() { [native code] }अ वाहन भंगारात काढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मागच्या वाहनांना लागू झाला हेच बेकायदेशीर आहे. म्हणून ५ वर्षे रिन्युअलची परवानगी दिली. त्यासाठी ग्रीन टॅक्स मधे भयंकर वाढ केली. आता ही वाहने वापरात असल्याने यांच्या साठी शुद्ध पेट्रोल असायला हवे.
२. २००६ मधे घेतलेली वाहने २०२६ मधे अॅब्सोल्युट होतील, २००७ ची पुढच्या वर्षी. २०१० पासून ५% इथेनॉल कॅलिब्रेटेड वाहने आली का? तर तसे काहीही दिसत नाही. कदाचित ५% इथेनॉल मुळे मोठे बदल करण्याची आवश्यकता नाही म्हणून असेल.
३. २०२२ साली १०% इथेनॉलचा निर्णय झाला. २०२३ साली १०% इथेनॉल कॅलिब्रेटेड वाहने यायला हवी होती. ती तशी आलीत का माहिती नाही. पण असावीत असे गृहीत धरले तर ही वाहने ई १० वर चालतील
४. पण दर वर्षी सरकरने कुणालाही न कळवता १२.५%, १४%, १५%, १७& आणि आता २०% असे इथेनॉल वाढवत नेले. हे कळवलेलेच नसल्याने या ग्रेडसाठी वाहने तयार नव्हती. ई २० साठी २०२२ च्या आधीची वाहने तयार नाहीत आच्या २०२५ च्या आधीचीही नाहीत.
५. भारतात आलेल्या फोर्ड, जनरल मोटर्स, ओपेल, शेवर्ले या कार कंपन्या गाशा गुंडाळुन परत गेल्या. पूर्वी वाहन कंपन्यांना किमान २० वर्षे भारतात राहून सेवा देणे, देखभाल करणे, पार्टस उपलब्ध करून देणे बंधनकारक होतं. आपण गॅट करारावर सही करताना कंपनीला परवडले नाही तर ती केव्हांही भारतातून गाशा गुंडाळू शकते याला सहमती दर्शवली आहे.
६. आता इथेनॉल ब्लेण्डिंग लागूच करायचे असेल तर सर्व कार्समधे बदल करण्याचे धोरण सरकारला राबवावे लागेल. त्यासाठी फ्युएल पार्टस बदलावे लागतील आणि इसीयू मधे बदल करावे लागतील. सॉफ्टवेअर बदलावे लागेल. एकतर कंपन्यांना हे सांगावे लागेल किंवा मध्यवर्ती एखाद्या एजन्सीने ते करावे. (जेव्हापासून ई१० सर्वत्र आले आहे तेव्हांपासून माझ्या गाडीत फ्युएलशी संबंधित एरर येते. सुरूवातीला फ्युएल प्प्प पाहिला, वायरिंग पाहिले, कुठे शॉर्ट आहे का पाहिले पण एरर जात नाही. या प्रकारची एरर अनेक गाड्यात येते. मेकॅनिकने सांगितले कि त्याने काही होत नाही. आता लक्षात येतंय कि ही एरर इथेनॉलची आहे. ईसीयू फ्युएल बदलाची एरर देतो. म्हणजे सॉफ्टवेअर बदालावे लागेल. पण कंपनीच अस्स्तित्वात नक्प्ण)
७. सरकार मान्यच करायला तयार नाही कि प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे असे धोरण येईल का शंका आहे. असे धोरण स्विकारले तर गाड्या खराब होतात याची अधिकृत कबुली दिल्यासारखे होईल असे सरकारला वाटत असावे. तसेच हा खर्च कोण करणार हा प्रश्न उभा राहील. लोक कोर्टात जातील ही भीती सरकारला असावी म्हणुन सरकार काही प्रॉब्लेम येत नाही असं म्हणत आहे.
८. यातून मार्ग काढण्यासाठी ई२० मागे घेऊन ते २०३० नंतर लागू केले पाहीजे. तर लोकांच्या तक्रारी कमी होतील.
वाहनांचं आयुष्य कितीhttps:/
वाहनांचं आयुष्य किती
https://www.pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1941044®=3&la...
-
मिश्र इंधनामुळे बिघडलेले पार्ट्स मोटार कंपन्या फुकटात बदलून देतील असं सांगताना गडकरींनी मिश्र इंधनाचा वाहनांच्या पार्ट्स वर परिणाम होतो, हे अप्रत्यक्ष रीत्या मान्य केले आहे. पण लबाडी अशी की हे बिघडण्याचं प्रमाण सोशल मीडियावर वाढवून सांगितलं जातं असंही म्हणतात.
सरकार आणि मोटार कंपन्यांकडे हे परिणाम तपासण्याची यंत्रणा असायला हवी, आकडेवारी असायला हवी.
-
अॅटर्नी जनरलनी सर्वोच्च न्यायालयात मिश्र इंधन वापराचे तूर्तास प्रयोग होत आहेत, असं सांगितलं. आमच्या वाहनांवर प्रयोग का असा गदारोळ झाल्यावर सरकारने नेहमीप्रमाणे त्या विधानाचा अर्थ संदर्भ सोडून लावला जातोय, असं स्पष्टीकरण दिलं
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2279625®=3&lang=1
इथेनॉल मिसळणं ही वाहनांसाठी नोटाबंदी आहे.
वाहनाच्या आयुष्याबद्दलची लिंक
वाहनाच्या आयुष्याबद्दलची लिंक महत्वाची आहे. दिल्लीत त्या वेळी वाहनं रस्त्यावर आणायची नाहीत असं काही तरी चालू होतं हे आठवलं.
जर वाहनांची संख्या जास्त झाली असेल तर नव्या वाहनांचं रजिस्ट्रेशन थांबवणं हा सरकारकडे उपाय आहे. जेणेकरून कुणाचं नुकसान होणार नाही. पण बेकायदेशीररित्या वाहनं १५ च वर्षे चालतील असा निर्णय घेऊन तो मागच्या तारखेपासून लागू करणं चुकीचं आहे, आता न्यायालयात जाऊन न्याय मिळणार नाही ही सार्वत्रिक भावना आहे. एका वकीलाने सर्वोच्च न्यायालयाला माय ज्युडिशिअल सर्वंट म्हणून कागदपत्रं फेकली, कारण त्याला तेव्हढा त्रास झाला.
प्रदूषण कमी करायचंय तर नव्या वाहनांची नोंदणी थांबवा. पण सरकार ते करत नाही. कारण वाहन उद्योगाला नुकसान होऊ द्यायचं नाही म्हणून नागरिकांना भुर्दंड सोसायला लागतोय. वाहन घ्यायच्या आधी माहीत असतं तर घेतलंच नसतं.
ऑटो सेक्टर - मोटारी आणि
ऑटो सेक्टर - मोटारी आणि त्यांना लागणार्या पार्ट्स बनवणार्या कंपन्यांचे शेअर्स घेतलेल्यांचा फायदा.
मध्य प्रदेशात इथेनॉलसाठीच्या धान्याची काहीतरी गंमत झाली आहे. शोधून लिहितो.
एक फेसबुक पोस्ट पाहिली होती.
एक फेसबुक पोस्ट पाहिली होती. ब्राझिल आणि भारताच्या लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या गुणोत्तराची तुलना. इथेनॉल बनवायला लागणारे पाणी.
पिके त्यासाठी वापरण्यात येणार असतील, तर त्यांना लागणारे पाणी.
भारत धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असला तरी डाळी आणि खाद्यतेल आयात करतो.
भारतात साखरेचे गरजेपेक्षा खूप जास्त उत्पादन होते. तिची कॉस्ट अधिक असल्याने निर्यातही हवी तशी होत नाही. साखर कारखान्यांना शेतकर्यांची देणी चुकवणं जड जातं. म्हणून इथेनॉल.
मूलगामी विचार करून उसाखालचं क्षेत्र कमी करणं आणि काही साखर कारखाने बंद करणं हा विचार करायची सरकार किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची हिंमत नाही.
(No subject)
इथेनॉलच्या या गलथानपणावर
इथेनॉलच्या या गलथानपणावर सरकार जाऊ शकेल एव्हढं मेरीट या मुद्द्यात आहे. पण सर्वच पक्षांचे हितसंबंध गुंतलेले असल्याने कुणी हा मुद्दा घेत नाहीये.
https://x.com/PankajPachauri
https://x.com/PankajPachauri/status/2075429192536056311
आकडेवारी वगैरे दुय्यम गोष्टी
भारतात सध्या विकल्या जाणार्
भारतात सध्या विकल्या जाणार्या सर्व गाड्या 20% ethanol असलेले पेट्रोल कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय चालू शकतात आणि हाच मुद्दा आहे.>>>>>
मनापासुन आभार विक्रमसिह… मला हीच काळजी वाटत होती आणि ती निराधार आहे हे तुमच्या प्रतिसादांमुळे कळले.
बाकीचा फाफटपसारा उडवुन फक्त तुमचे प्रतिसाद इथे ठेवले तर फार उत्तम होइल.
भरत यांचा प्रतिसाद मनापासून
भरत यांचा प्रतिसाद मनापासून पटला.
List of Cars Compatible with
List of Cars Compatible with E20 Fuel in India 2026 https://share.google/DnUlvBOr37euSKZMR
बजाज जनरल इन्शुरन्स काय म्हणतंय बघा.
अधून मधून कॉमेडिअन्सची हजेरी
अधून मधून कॉमेडिअन्सची हजेरी किती गरजेची आहे ते लक्षात आलं. '
बजाज इन्शुरन्सच्या या लिंकवर असे कॉमेडिअन्स गेलेच आणि नेमकी तारांकित ओळ सोडुन वाचतील, तर आभार मानतील.
हा उजवा विचारवंत काय म्हणतोय
हा उजवा विचारवंत काय म्हणतोय पहा
https://www.instagram.com/p/Dar60WYghNI/
https://timesofindia.indiatimes.com/videos/times-axis/no-politician-has-...
"3,000 litres of water for 1 litre of ethanol!" Anand Ranganathan decodes what's behind the E20 storm that has gripped the nation. He questions whether India's ethanol strategy is worth the environmental cost and explains why fixing roads and accelerating EV adoption may save more fuel than E20 blending
त्यावर एक बिनतोड प्रश्न
So we should stop eating rice because it takes 4000 ltrs of water to produce rice
इथल्या अनेकांना हा प्रश्न नक्की आवडेल
काही बिनडोक भक्तांना टेक्निकल
काही बिनडोक भक्तांना टेक्निकल माहिती काय आणि कचरा म्हणजे काय याचीच अक्कल नसते. तरी पण कुणीतरी शहाणा वाचून व्यक्त होईल ही आशा असते. बिनडोक लोक डिनायल मोड मधे असतात. त्यांचं समजू शकतो. पण..
नोटबंदीमळे छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले
करोना काळात छोटे व्यावसायिक आणि व्यापारी आयुष्यातून उठले
आणि आता
इथेनॉल मुळे जुन्या गाड्या आणि इथेनॉल ग्रेड नसलेल्या गाड्या खराब होऊ शकतात..
या सर्व गोष्टींच्या बाबतीत डिनायल मोड मधे असलेले काही जण पाहून थक्क व्हायला होते.
भारतात सध्या विकल्या जाणार्
भारतात सध्या विकल्या जाणार्या सर्व गाड्या 20% ethanol असलेले पेट्रोल कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय चालू शकतात>> बरोबर आणि हे अर्थातच असणार कारण 2023 पासून बनणाऱ्या गाड्या E20 साठी compatible हव्यात असा नॉर्मच केलाय.
सध्या विकल्या जाणत्या वाहनांनासुद्धा प्रॉब्लेम येतोय असे दावे इथे केलेले दिसले नाही.
E20 हायग्रोस्कोपीक आहे, मॉइस्चर शोषून घेते, कुठले पार्टस व्हल्नरेबल आहेत वगैरे माहिती इथे आली आहे. माझ्या माहिती प्रमाणे लॉंगटर्म वापरतात काही मेटल पार्ट्स् सुद्धा करोड होऊ शकतात.
हे टाळण्यासाठी E20 मध्ये आधीच काही additives घातले असतात तसेच E20 साठी बनवलेल्या वाहनांमध्ये मटेरियल compatibility पाळली असेल.
पण 2023 पूर्वी बनवलेली सगळीच वाहने E20 ला पूर्ण compatible असतील असं नाही हा मुद्दाही इथे आलेला आहे किंबहुना त्यासाठीच धागा आहे असे मला वाटते. आधीची वाहने E10 compatible होती. त्या वाहनामध्ये E20 पेट्रोल भरून ते जास्त वापरले नाही महिना दोन महिने तसेच ठेवले तर त्यात समस्या येऊ शकतील. तसेच ज्या कंपन्यांच्या वाहनांमध्ये E10 साठी मटेरियल compatible आहे पण E20 साठी नाही त्यांना प्रॉब्लेम येउ शकतो. त्यातील काही दीर्घकळाने दिसु शकतील.
(हे टाळण्यास त्यासाठी जास्तीचे additive स्वतः वेगळे घालुन घ्या अशी एक जाहिरात आहे, ती निव्वळ जाहिरात आहे की त्यात तथ्य आहे हे माहित नाही. )
2023 मध्ये Hyundai ची बातमी होती i10 Niosचे E20 conpatible अपडेटेड व्हर्जन launch झाले म्हणुन. यावरून आधीचेही fully compatible होते असे वाटत नाही.
एकंदरीत आपले वाहन 2023 आधीचे असेल तर नक्की कुठला ब्रँड आणि मॉडेल यावरून काही समस्या येईल की नाही अवलंबून असेल. एका विविक्षित मॉडेलला नाही आला तर इतरांनाही येणार नाही अथवा व्हाईस-अ-व्हर्सा असे ठामपणे म्हणता येणार नाही
Pages