पेट्रोल मधे इथेनॉल किती असावं हे ठरवणे हे पेट्रोलियम मंत्रालयाचे काम आहे. गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नक्कीच नाहीत.
पण जेव्हांपासून भाजप सत्तेत आलेली आहे तेव्हांपासून गडकरी इथेनॉलचे फायदे सांगत आहेत. पूर्वी ते फ्लेक्स इंजिन बद्दल बोलत होते. मग हळूहळू शेतकर्यांना फायदा करून देण्यासाठी इथेनॉलचे धोरण आखल्याचे सांगू लागले. पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबतीत कधीही कसलेली विधान आलेले नाही.
पेट्रोलमधे इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलची आयात कमी करावी लागत असेल तर हा देशहिताचा विचार आहे असे वाटते. तसेच ब्राझिलने इथेनॉल ब्लेण्डेड पेट्रोल पासून पूर्णपणे इथेनॉलवर शिफ्ट केले आहे हा दावाही या निर्णयाला पुष्टी देतो असे वाटेल. मात्र अनेक संस्थांनी नीती आयोगाचा हवाला देऊन स्पष्ट केलेले आहे कि इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोलच्या तुलनेत २/३ असल्याने तितकी कमी उर्जा मिळणार आहे. म्हणजेच मायलेज कमी मिळेल.
नीती आयोग म्हणतो कि इथेनॉल वापरण्याने होणारी उर्जाघट ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी असेल. म्हणजे ई२० पूरक वाहनात जर ई ८५ इथेनॉल टाकलं तर ती घट वेगळी असेल. ई२० वाहनात पेट्रोल टाकले तर मिळणारा मायलेज आणि ई २० टाकल्याने मिळणारा मायलेज यात ६% घट दिसेल. ( लल्लनटॉप).
तर ई२० पूरक नसलेल्या म्हणजे ई१० किंवा ई ५ किंवा शुद्ध पेट्रोलवर असलेल्या वाहनात ई २० पेट्रोल टाकले तर होणारी घट वेगवेगळी असेल.
जर शुद्ध पेट्रोलसाठी असलेल्या वाहनात ई८५ पेट्रोल टाकले तर घट खूपच जास्त असेल. तसेच इंजिनालाही नुकसान होईल. अशा तक्रारी येत आहेत. अगदी एबीपी माझा या खासगी सरकारी वाहिनीनेही वाहनचालकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत.
सोशल मीडीयात गडकरींना विरोध होताना दिसतो. गडकरींनी पंधरा वीस दिवसांपूर्वी ई १०० ची घोषणाही केली.
याचे परिणाम म्हणजे लोक नवीन वाहन घ्यायला कचरत आहेत. एबीपी माझाने कुठल्यातरी सर्वेच्या हवाल्याने सांगितले कि ४०% लोकांनी नवीन वाहन घेणे लांबणीवर टाकलेले आहे.
लल्लनटॉपचा हा आणखी एक रिपोर्ट.
https://www.youtube.com/watch?v=_xvM3UaJrbA
त्यांनी सिरीजच केली आहे.
अन्य वाहीन्यांनीही या विषयावर उद्बोधक माहिती दिली आहे. इथे सर्वच सुशिक्षित आहेत.
पेट्रोलची कॅलरीफिक व्हॅल्यू 45,000 किलो ज्यूल प्रती किलो आहे.
इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू 29,700 किलो ज्यूल प्रती किलो आहे. म्हणजे ३०,००० जवळजवळ. तीन पैकी दोन हिस्से.
इथे १/३ उर्जा कमी आहे. गणित थेट नसेल तरी याचा अर्थ साफ आहे कि शुद्ध पेट्रोलवर एखादा समजा ५ लिटर मधे ४०० किलोमीटर जात असेल
तर
त्याला आता ई२० पेट्रोल वापरून त्याला ५.४० लॉटर पेट्रोल लागेल.
ई८५ पेट्रोल वापरले तर त्याला ७.०३ लीटर पेट्रोल लागेल
आणि ई १०० पेट्रोल वापरले तर ७.५८ लीटर पेट्रोल लागेल.
हे फक्त उर्जा गुणोत्तर लक्षात घेऊन गणित केले आहे. इथेनॉलमुळे इंजिनची कार्यक्षमता वगैरे तीच राहते असे गृहीत धरलेले आहे.
थोडक्यात आयात कमी होईल पण खूप कमी होणार नाही. शिवाय नैऋत्येकडच्या राज्यात इथेनॉल पिकत नाही. तिथे इथेनॉलची वाहतूक करण्यासाठी जे इंधन लागेल त्याचा खर्च पाहता तिथे इथेनॉल ब्लेण्डेड इंधन विकणे पेट्रोलियम कंपन्यांसाठी नुकसानीचा सौदा ठरणार आहे. अशाच प्रकारे देशाच्या विविध भागात इथेनॉल ब्लेण्डेड इंधन उपलब्ध करणे शक्य होणार नाही.
म्हणजे देशाच्या मैदानी भागात हे इंधन सहज वापरता येणार आहे. लल्लनटॉपने नीती आयोगाचाच हवाला दिला आहे. त्यानुसार ऊसापासून किंवा तांदळापासून इथेनॉल बनवले तर प्रती एक लीटर इथेनॉलसाठी ऊस किंवा तांदळाला लागणारे पाणी जवळपास ७५०० लीटर ते १०००० लीटर असेल. हा टीकेचा विषय आहे. सरकारने दिशाभूल करणारे उत्तर देताना पिकाला लागणारे पाणी सांगितलेले नाही. त्यांनी फक्त कारखान्यात इथेनॉल बनवण्यासाठी लागणारे पाणी सांगितलेले आहे.
सरकारने असेही सांगितलेले आहे कि आम्ही मक्यापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिले आहे. पण मक्यापासून बनवलेले इथेनॉल एकूण किती टक्के आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही.
सरकारचा कारभार पारदर्शी असेल तर इथेनॉल निर्मितीत सहभागी असलेल्या कारखान्यांची यादी दिली पाहीजे. या कारखान्यात तयार होणारे इथेनॉल सांगितले पाहीजे.
साधारण तर्काने सांगता येईल कि यात बहुतकरून सहकारी आणि खासगी साखर कारखानेच मोठ्या प्रमाणात असणार. मक्याची आकडेवारी उपलब्धच नाही. गडकरींचे साखर कारखाने आहेत हे त्यांनी स्वतःच सांगितलेले आहे. पण त्यांच्या मुलांचे इथेनॉलचे कारखाने असल्याचे आरोप काँग्रेसने केलेले आहेत.
मारूती सुझुकीने ई ८५ साठी वॅगन आर बनवली. पण फक्त चार वाहने विकली गेली आहेत. ही परिस्थिती ग्राहकात असलेली भीती स्पष्ट करतेय.
आता ब्राझीलबद्दल.
ब्राझीलने टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेण्डींग वाढवत नेले. पन्नास वर्षे लागली. या काळात त्यांनी कंपन्यांना पूर्णपणे फ्लेक्स इंजिनवर आधारीत वाहनांच्या उत्पादनासाठी पुरेसा वेळ दिला. इन्फ्रास्टृक्चर तयार केले. लोकांना जुनी वाहने भंगारात काढायला पुरेसा वेळ दिला. कुणाचेच नुकसाण होंणार नाही अशा पद्धतीने मधल्या काळात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक वाहनासाठी हवे ते पेट्रोल उपलब्ध करून दिले. जसजशी जुनी वाहने बंद होत गेली तसतसे जास्तीचे इथेनॉल पेट्रोलमधे वाढवत नेले.
इथे १२ वर्षातच ई २०, ई ८५ आणि आता ई १०० सुरू केलेय. आज ई २० पेट्रोलच अनेक ठिकाणी आहे. आजही १५ ते २० वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत. ती यासाठी तयार नाहीत. २०२२ च्या आधीची वाहने ई२० साठी तयार नाहीत. ती वाहने खराब होऊ द्यायची का?
एहसान पूनावाला यांनी दिल्लीतल्या गडकरींच्या घरासमोर धरणे देण्यासाठी परवानगी मागितली होती. ती त्यांना मिळाली आहे. ते म्हणतात आमचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही पक्षाला विरोध करत नाही.
यावरून हे आंदोलन सरकारनेच पुरस्क्रुत केले असावे असे वाटते. म्हणजे वाहनचालकात असलेल्या संतापाची कुणकुण लागल्याने गडकरींना बळीचा बकरा बनवून जनक्षोभाला वाट करून सरकार सुरक्षित राहू इच्छिते. या धोरणात अन्य कुणी वक्तव्ये केलेली नसल्याने आओपापच गडकरी हेच लक्ष्य बन्णार आहेत.
म्हणजे जर लोकांनी विरोध केला नाही तरी फायदा आणि लोकांनी गडकरींना विरोध केला आणि सरकारला सोडून दिले तरी फायदा असा हा प्रकार दिसतो.
संदर्भ
१. https://www.youtube.com/watch?v=liTmvZXl4S0
२. https://www.youtube.com/watch?v=i1iaPSLlFaU
३. https://i.ytimg.com/vi/C2VBDjxkqWE/hqdefault.jpg?sqp=-oaymwEnCPYBEIoBSFr...
४. https://www.youtube.com/watch?v=RkTKpuss7c8
५. https://www.youtube.com/watch?v=vZqPsscJZnw
६. https://www.team-bhp.com/news/maruti-wagonr-flex-fuel-only-3-units-sold-...
मानव बरोबर. बहुतेक सर्व
मानव बरोबर. बहुतेक सर्व मुद्दे व्यवस्थित कव्हर केले आहेत.
साठवण आणि वाहतूक करताना दोन वेगवेगळ्या परिस्थितीत काय होऊ शकते. याबद्दल क्राऊड एआय च्या सहाय्याने दोन प्रेझेंटेशन्स बनवले आहेत. या एआय ला खूप जास्त इनपुट द्यावा लागला नाही.
पहिली केस - विविध पातळ्यांवरचे टॅंकर, टाक्या ई२० कॅलिब्रेटेड आहेत. पण व्यवस्थित सील केले नाही /आहे.

केस 2 - नॉर्मल पेट्रोलसाठी असलेले टॅंकर / टाक्या (हाच चोर आहे)

2023 पासून बनणाऱ्या गाड्या
2023 पासून बनणाऱ्या गाड्या E20 साठी compatible हव्यात असा नॉर्मच केलाय. >>> बरोबर. हीच शंका मी सुरुवातीला काढलेली होती की बाकीच्या गाड्यांचे काय?
Ethanol Blended Petrol
Ethanol Blended Petrol Programme- Q&A
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2283118®=3&lang=1
यात लोकांनी विचारलेल्या आणि या धाग्यावर मांडल्या गेले ल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली आहेत. ती वाचली तर काहींना आणखी प्रश्न पडू शकतात.
Q2: Why don't consumers have the choice of buying pure petrol, E10 or E20? And what about older vehicles that are labelled as only E10 compatible?
याचं उत्तर त्या लिंकवरच वाचावं.
त्यातला एक मुद्दा -Over the past several years, public sector banks have financed nearly ₹1 lakh crore/yr of investments in ethanol production and associated infrastructure. Dedicated ethanol plants, distilleries, storage facilities and logistics networks have been created to meet India's blending targets.
If, after creating this capacity, we were to arbitrarily revert to E10, what happens to these investments? What happens to the surplus production capacity? What happens to thousands of crores invested by farmers, cooperatives, entrepreneurs, financial institutions and public sector companies in good faith based on a national policy?
Public policy must balance consumer interest with energy security, environmental sustainability, farmer welfare and prudent use of national resources.
हे सरकार ने दिलेलं उत्तर आहे. म्हणजे उपभोक्त्याने = मोटार मालकांनी देशहितासाठी थोडं सहन करावं.
If ethanol is blended with petrol, why isn't E20 cheaper than E10 or pure petrol? (निति आयोगाच्या पेपर मध्ये Society of Indian Automobile Manufacturers (SIAM) ने अशी मागणी केल्याचं म्हटलं आहे)
Therefore, if international crude oil is trading at around US$70 per barrel, E20 is actually costlier to produce than pure petrol.
If crude rises to US$120–130 per barrel, the economics naturally reverse and ethanol becomes even cheaper.
गडकरी काळाच्या फार पुढे असतात. त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, हा मुद्दा वेगळा.
ते एप्रिलमध्येच 100% Ethanol बद्दल बोललेत
https://www.ndtv.com/auto/nitin-gadkaris-100-ethanol-blending-vision-exp...
Nitin Gadkari's 100% Ethanol Blending Vision Explained: Here's How E100 Petrol Will Impact YouUnion Minister Nitin Gadkari urges India to transition to using 100 per cent ethanol-blended petrol to reduce dependence on oil imports.
Nitin Gadkari's 100% Ethanol Blending Vision Explained: Here's How E100 Petrol Will Impact You
Union Minister Nitin Gadkari
Nitin Gadkari, the Minister of Road Transport and Highways in India, has urged for a strong initiative towards achieving 100 per cent ethanol fuel usage in the country in the near future. His statement was made during the Indian Federation of Green Energy's Green Transport Conclave. This call for increased ethanol fuel adoption comes in light of vulnerabilities in oil exports due to the ongoing crisis in West Asia, highlighting the need for India to attain self-reliance in the energy sector.
What Is E100 Fuel?
E100 refers to a high-ethanol fuel blend that is primarily or nearly pure ethanol, typically comprising 95 to 100 per cent ethanol by volume. In India, the official "Ethanol 100" fuel introduced by IndianOil consists of approximately 93 to 93.5 percent ethanol, with about 5 percent petrol and 1.5 percent co-solvent included for safety purposes.
Why Push '100 Per Cent Ethanol Blending'?
As per Union Minister Nitin Gadkari, the use of 100 per cent ethanol-blend petrol will reduce the country's dependence on fossil fuel imports. This will be done by lowering the requirement of imports from the current 87 per cent to a lower number. It will eventually result in financial gain, which currently drains around Rs 22 lakh crore annually. Furthermore, the ongoing conflict in West Asia has exposed the vulnerabilities associated with importing fuel.
Also Read: Tesla Model Y L Six-Seater Variant Launched In India At Rs 61.99 Lakh
Current Status of 100 Per cent Ethanol Blend Petrol In India
India has made significant progress in its biofuel program in recent years. After the rollout of E20 (20 per cent ethanol-blended petrol) on April 1, 2026, the government is now focusing on transitioning to Flex-Fuel Vehicles (FFVs) for E100 or E85.
The upcoming CAFE III standards, effective April 1, 2027, will promote the adoption of electric and flex-fuel technologies. A draft notification for E85 fuel is reportedly in the final stages, indicating a prioritization of infrastructure for higher blending levels.
^^
^^
गडकरींची एबीपी माझाने विमानात घेतलेली मुलाखत बघा. भक्तांना उत्तरं मिळालीत म्हणून समाधान देईल.
इतरांना मनोरंजन.
गडकरी गलगोटिया विद्यापीठाचे
गडकरी गलगोटिया विद्यापीठाचे मानद विद्यावाचस्पती पी एच डी आहेत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=MISGh39Faas&t=1464s
या इंटरव्ह्यूतून काय समजले हे लिहा.
त्या दिवशी माहिती मिळाली असे
त्या दिवशी माहिती मिळाली असे वाटले होते पण आता पुढच्या पोस्ट वाचून अजून गोंधळायला झाले.
बरेचदा सरकार समाजातील खालच्या आर्थिक स्तरातील लोकांना लुबाडते. गाड्यांची वाट लागणार असेल तर त्याचा फटका वरच्या आर्थिक स्तरातील लोकांना बसणार. हे एक वेगळेपण म्हणू शकतो का?
गाड्यांची वाट लागणार असेल तर
गाड्यांची वाट लागणार असेल तर त्याचा फटका वरच्या आर्थिक स्तरातील लोकांना बसणार. हे एक वेगळेपण म्हणू शकतो का >> not necessary
याचा फटका मध्यमवर्गीय माणसांना जास्ती बसेल कदाचित. हे माझे assumption आहे.
जर २०२३ नंतरच्या गाड्या e२० compatible असतील, तर श्रीमंत लोक त्या विकत घेऊ शकतात. गरीब लोक तसेही गाडी घेत नाहीत त्यामुळे त्यांना खूप फरक पडणार नाही. पण मध्यमवर्गीय मात्र नवीन गाड्या लगेच घेऊ शकणार नाहीत त्यामुळे त्यांना जास्ती त्रास होईल.
ईएमआय मुळे आता कुणीही दुचाकी
ईएमआय मुळे आता कुणीही दुचाकी किंवा चारचाकी गाडी घेऊ शकतं. घरानंतर सामान्य माणसाची ही दुसरी मोठी भांडवली आणि भावनिक गुंतवणूक असते. मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असल्याने गाडीची गरज पडत नाही. पण अन्य शहरात स्वतःच्या गाडीची गरज असते.
गरीबांनीही ओबेरे, ओला, रॅपिडॉ, भारत टॅक्सी साठी गाड्या घेतलेल्या आहेत. बेकारीवर मात म्हणून तरूण रिक्षा, कार घेतात. या सर्वांना पेट्रोल, डिझेल लागतं.
आपोआप लॉग आउट होतंय का?
आपोआप लॉग आउट होतंय का?
मध्यप्रदेशात इथेनॉल घोटाळा उघडकीस आला आहे. बातमीत सांगितल्याप्रमाणे जो तांदूल शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी होता (पोषण योजना) तो राईस मिलकडे इथेनॉल बनवण्यासाठी गेला. हा सरकारने उत्कृष्ट क्वालिटीचा खरेदी केलेला तांदूळ आहे. २७२ क्विंटल तांदूळ पकडला. अशा पाच सहा राईस मिल्सबद्दल पोलिसांना सूचना मिळाली आहे असे संबंधित अधिकार्यांनी सांगितले. हा घोटाळा कधीपासून चालू आहे, कोणकोणत्या राज्यात चालू आहे हे अशा धाडी पडल्या तर समजेल.
काही वर्षांपूर्वी धान्यापासून अल्कोहोलची योजना आली होती. त्या वेळी जी भीती होती तीच आताही दिसू लागली आहे. अन्नधान्याचं शॉर्टेज होऊन धान्य आयात करावे लागेल.
Addressing concerns over
Addressing concerns over vehicle compatibility, the government said extensive testing by ARAI, SIAM and Indian Oil, along with feedback from automobil... manufacturers, found no evidence that E20 causes engine or component damage, including in older vehicles certified for E10.
It cited Maruti Suzuki's servicing of 2.84 crore vehicles during FY 2025-26, including around 1.5 crore non-E20-certified vehicles, saying no fuelrelated corrosion or component failures linked to E20 were reported.
Read more at: https://english.mathrubhumi.com/news/money/why-e20-petrol-is-not-cheaper.....
ARAI/ SIAM चा रिपोर्ट आहे
ARAI/ SIAM चा रिपोर्ट आहे का?
पेट्रोलियम कंपनीने केलेल्या टेस्टसचे रिपोर्टस मातृभूमी किंवा वर्तमानपत्रांतील दाव्यांपेक्षा कमी विश्वासार्ह आहेत का?
नवं कुरण
नवं कुरण
NDTV एक्सक्लूसिव: MP में 1160 करोड़ का 'चावल घोटाला', गरीबों के पोषण का अनाज एथेनॉल के नाम पर हुआ गायबNDTV ने मध्य प्रदेश में एथेनॉल नीति की आड़ में सामने आए 1160 करोड़ रुपये के कथित 'चावल घोटाले' का पर्दाफाश किया है. जानिए कैसे मुनाफाखोरों के एक संगठित सिंडिकेट ने सरकार से ही सब्सिडी पर वह फोर्टिफाइड चावल खरीदा जो गर्भवती महिलाओं और बच्चों के पोषण के लिए था, और फिर उसे नया नाम देकर वापस सरकारी गोदामों में ही ऊंचे दामों पर बेच दिया.
https://ndtv.in/madhya-pradesh-chhattisgarh/mp-ethanol-scam-ndtv-exclusi...
(No subject)
मला ती मध्य प्रदेश ची बातमी
मला ती मध्य प्रदेश ची बातमी नीट समजली नाही म्हणून मोघम लिहिले होते वर. त्या बाईला नेमके काय सांगायचं आहे.
जो तांदूळ शाळेत जाणार होता तो निकृष्ट दर्जाचा होता आणि त्याचे पेमेंट उत्कृष्ट तांदळाच्या दराने केले. चांगला तांदूळ खुल्या बाजारात विकला आणि निकृष्ट तांदूळ शाळेत न नेता इथेनॉल करता वापरला.
सकाळी घाईत ऐकली बातमी.
खाली जो स्क्रीनशॉट दिला आहे असे खूप व्हिडिओ दिसतात. त्याला उत्तर म्हणून आयआयटी ने ई20 सुरक्षित आहे असे सांगितले आहे अशा पोस्टस फेसबुक वर दिसल्या..
काय काय टेस्ट केले त्याचा तपशील मात्र दिलेला नाही.
Nagpur Cyber Police filed a
Nagpur Cyber Police filed a case against influencers Manish Kashyap, Desi Boyser, Harshit Rathi, and Anklesh Invate following a complaint by Shishir Arun Tripathi, head of the Nagpur BJP Social Media Cell. The influencers allegedly uploaded videos on YouTube and Instagram spreading misinformation about the Centre's E20 ethanol-blending programme and falsely linking it to Union Minister Nitin Gadkari. Police have launched an investigation into the posts for potential violations of relevant laws.
सौरभ जोशी नावाच्या यु ट्युबरने त्याच्या मर्सिडीजबाबत तक्रार केली होती. आता त्याने माफी मागितली. मर्सिडीजवाल्यांनी त्याला "समजावून सांगितलं" की इंजीनमधल्या बिघाडामुळे माइलेज कमी झालं. एथेनॉलमुळे नाही काही.
ऐकून धडकी भरलीhttps://www
ऐकून धडकी भरली
https://www.youtube.com/watch?v=NoyQY60ZGmo
Nitin Gadkari Announces India's "Flying Bus" | Future Of Public Transport
तीन मजली फ्लायओव्हरबद्दल बोलताहेत. ते इंजिनीयरिंग मार्व्हल असेल. जगभरातले लोक बघायला येतील.
पण लोकांचा प्रवास सुकर होईल का?
एकीकडे एफ आय आर होताहेत आणि
एकीकडे एफ आय आर होताहेत आणि दुसरीकडे हे म्हणतात कि माझ्याकडे तक्रारी आल्या नाहीत. ज्यांनी केल्या त्यांचं काय झालं हे लोक बघताहेत.
सर्वांना येत असलेला अनुभव नाकारण्यासाठी आयटी सेल पण गडकरींच्या मदतीला नाही. ना पक्षातून कुणी मदतीला धावून आलंय. गडकरी एकटे पडल्याने एबीपी माझाशी बोलताना ते चिडचिडे झालेले दिसले. एबीपी माझा एरव्ही भाजपाचा चॅनल. पण कुणीतरी मालकांना फ्री हँड दिला असावा गदकरींच्या बाबतीत. भाजपच्या मंत्र्यांना असे प्रश्न हे आक्रीतच.
<. पण कुणीतरी मालकांना फ्री
<. पण कुणीतरी मालकांना फ्री हँड दिला असावा गदकरींच्या बाबतीत. भाजपच्या मंत्र्यांना असे प्रश्न हे आक्रीतच.> +१
गडकरींची एबीपी माझाला दिलेली
गडकरींची एबीपी माझाला दिलेली मुलाखत अर्धवटच ऐकली. छान पानं पुसलीयेत तोंडाला. मायलेज कमी होतंय किंवा गाडीत बिघाड होतोय असं सांगितल्यावर एकच उत्तर - गाडी सर्व्हिस सेंटरला नेऊन प्रॅाब्लेम कशानुळे येतोय ते चेक करा.
मुलाखत बघितली. त्या पत्रकार
मुलाखत बघितली. त्या पत्रकार बाईने अगदी मुद्देसूद प्रश्न विचारले आहेत, उत्तरे मात्र गुळमुळीत वाटली.
सी व्होटरने सर्वे केला आहे.
सी व्होटरने सर्वे केला आहे. त्यामधे भाजपला मतदान केलेल्यांपैकी ५०% हून अधिक लोकांनी इथेनॉलच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
इथे आपल्याला हव्या त्या माहितीला "टेक्निकल" असे संबोधून +१ देणार्यांचं हसू आलेलं होतं. पण या ट्रिक्स नवीन नसस्ल्याने दुर्लक्ष केलं. कदाचित माझ्याशी भांडण असेल, पण मानव आणि भरत यांनी नंतर दिलेल्या नीती आयोगाच्या रिपोर्टच्या आधारावरच्या पोस्टसना सुद्धा "टेक्निकल" म्हटलेले नाही.
पेट्रोलियम कंपन्यांनी केलेल्या टेस्टसच्या रिझल्टसच्या लिंक्स दिल्या आहेत. त्या ही टेक्निकल नसणार. एखाद्या वाटतं म्हणून त्याने दिलेले मत ही तांत्रिक माहिती झाली हे नवं ज्ञान मिळाले. अशा विषयात सुद्धा स्कोअर सेटलमेण्ट किंवा पूर्वग्रहदूषित युक्त्या खेळल्या जाऊ शकतात हे समजलं.
इथेनॉलला विरोध नाही. पण अनेकदा लिहीले आहे तसे वेळ घ्यायला हवा होता. जुनी वाहने फेज आउट व्हायला हवी होती.
विदेशी चलन वाचवायचे असते तर अमेरिकेकडून इथेनॉल घेऊन ते इंडस्ट्रीला दिले याचा अर्थ +१ वाले सांगतीलच. ती टेक्निकल माहिती असेल.
अमेरिकडून इथेनॉल घेतले. ते न घेता भारतात तयार झालेले इथेनॉल इंडस्ट्रीला का दिले नाही? आमचुआ वाहनांवर का प्रयोग केला हा प्रश्न आहे.
माझे प्रामाणिक मत लिहू का?
माझे प्रामाणिक मत लिहू का? गडकरी हुकलेले आहेत. मागे एकदा ते 'बसेस हवेतून उडतील' म्हणाले होते.
पूर्वी कधीतरी पंतप्रधान पदाच्या योग्यतेचा नेता असा विचार पसरत होता. देवाचे आभार, तसे काही होऊ शकणार नाही ह्याबद्दल!
ह्या धाग्यावरील धागालेखन व पुढील चर्चा अभ्यासनीय आहे.
रायपूरच्या डॉ प्रेम राज देवता
रायपूरच्या डॉ प्रेम राज देवता यांनी जून २०२४ मध्ये Maruti Grand Vitara Strong Hybrid Zeta+ विकत घेतली. ही गाडी जानेवारी २०२३ मध्ये बनलेली होती. तिच्यात वारंवार बिघाड होऊ लागला. मारुती डीलरने ग्राहक न्यायालयाला सांगितलं की कमी दर्जाच्या इंधनामुळे गाडी बिघडत होती. ग्राहक न्यायालयाने म्हटलं की ती गाडी E20 compliant नाही हे विकताना सांगायला हवं होतं. आता ४५ दिवसांत E20 वर चालेल अशी गाडी द्या नाहीतर २० लाख द्या.
https://www.ndtv.com/auto/consumer-court-backs-owner-in-e20-case-orders-...
The order also pointed to the limited fuel choices available to motorists. The Commission noted that E20 petrol had become the commonly available fuel at petrol pumps, leaving consumers with little practical alternative. In its view, motorists could not reasonably be expected to avoid the fuel if other options were unavailable.
विक्रमसिंह यांच्या प्रतिसादातून - "Addressing concerns over vehicle compatibility, the government said extensive testing by ARAI, SIAM and Indian Oil, along with feedback from automobil... manufacturers, found no evidence that E20 causes engine or component damage, including in older vehicles certified for E10. " आता?
खटक्यावर बोट.
खटक्यावर बोट.
Pages