पेट्रोल मधे इथेनॉल किती असावं हे ठरवणे हे पेट्रोलियम मंत्रालयाचे काम आहे. गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नक्कीच नाहीत.
पण जेव्हांपासून भाजप सत्तेत आलेली आहे तेव्हांपासून गडकरी इथेनॉलचे फायदे सांगत आहेत. पूर्वी ते फ्लेक्स इंजिन बद्दल बोलत होते. मग हळूहळू शेतकर्यांना फायदा करून देण्यासाठी इथेनॉलचे धोरण आखल्याचे सांगू लागले. पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबतीत कधीही कसलेली विधान आलेले नाही.
पेट्रोलमधे इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलची आयात कमी करावी लागत असेल तर हा देशहिताचा विचार आहे असे वाटते. तसेच ब्राझिलने इथेनॉल ब्लेण्डेड पेट्रोल पासून पूर्णपणे इथेनॉलवर शिफ्ट केले आहे हा दावाही या निर्णयाला पुष्टी देतो असे वाटेल. मात्र अनेक संस्थांनी नीती आयोगाचा हवाला देऊन स्पष्ट केलेले आहे कि इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोलच्या तुलनेत २/३ असल्याने तितकी कमी उर्जा मिळणार आहे. म्हणजेच मायलेज कमी मिळेल.
नीती आयोग म्हणतो कि इथेनॉल वापरण्याने होणारी उर्जाघट ही वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी असेल. म्हणजे ई२० पूरक वाहनात जर ई ८५ इथेनॉल टाकलं तर ती घट वेगळी असेल. ई२० वाहनात पेट्रोल टाकले तर मिळणारा मायलेज आणि ई २० टाकल्याने मिळणारा मायलेज यात ६% घट दिसेल. ( लल्लनटॉप).
तर ई२० पूरक नसलेल्या म्हणजे ई१० किंवा ई ५ किंवा शुद्ध पेट्रोलवर असलेल्या वाहनात ई २० पेट्रोल टाकले तर होणारी घट वेगवेगळी असेल.
जर शुद्ध पेट्रोलसाठी असलेल्या वाहनात ई८५ पेट्रोल टाकले तर घट खूपच जास्त असेल. तसेच इंजिनालाही नुकसान होईल. अशा तक्रारी येत आहेत. अगदी एबीपी माझा या खासगी सरकारी वाहिनीनेही वाहनचालकांच्या मुलाखती घेऊन त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत.
सोशल मीडीयात गडकरींना विरोध होताना दिसतो. गडकरींनी पंधरा वीस दिवसांपूर्वी ई १०० ची घोषणाही केली.
याचे परिणाम म्हणजे लोक नवीन वाहन घ्यायला कचरत आहेत. एबीपी माझाने कुठल्यातरी सर्वेच्या हवाल्याने सांगितले कि ४०% लोकांनी नवीन वाहन घेणे लांबणीवर टाकलेले आहे.
लल्लनटॉपचा हा आणखी एक रिपोर्ट.
https://www.youtube.com/watch?v=_xvM3UaJrbA
त्यांनी सिरीजच केली आहे.
अन्य वाहीन्यांनीही या विषयावर उद्बोधक माहिती दिली आहे. इथे सर्वच सुशिक्षित आहेत.
पेट्रोलची कॅलरीफिक व्हॅल्यू 45,000 किलो ज्यूल प्रती किलो आहे.
इथेनॉलची कॅलरीफिक व्हॅल्यू 29,700 किलो ज्यूल प्रती किलो आहे. म्हणजे ३०,००० जवळजवळ. तीन पैकी दोन हिस्से.
इथे १/३ उर्जा कमी आहे. गणित थेट नसेल तरी याचा अर्थ साफ आहे कि शुद्ध पेट्रोलवर एखादा समजा ५ लिटर मधे ४०० किलोमीटर जात असेल
तर
त्याला आता ई२० पेट्रोल वापरून त्याला ५.४० लॉटर पेट्रोल लागेल.
ई८५ पेट्रोल वापरले तर त्याला ७.०३ लीटर पेट्रोल लागेल
आणि ई १०० पेट्रोल वापरले तर ७.५८ लीटर पेट्रोल लागेल.
हे फक्त उर्जा गुणोत्तर लक्षात घेऊन गणित केले आहे. इथेनॉलमुळे इंजिनची कार्यक्षमता वगैरे तीच राहते असे गृहीत धरलेले आहे.
थोडक्यात आयात कमी होईल पण खूप कमी होणार नाही. शिवाय नैऋत्येकडच्या राज्यात इथेनॉल पिकत नाही. तिथे इथेनॉलची वाहतूक करण्यासाठी जे इंधन लागेल त्याचा खर्च पाहता तिथे इथेनॉल ब्लेण्डेड इंधन विकणे पेट्रोलियम कंपन्यांसाठी नुकसानीचा सौदा ठरणार आहे. अशाच प्रकारे देशाच्या विविध भागात इथेनॉल ब्लेण्डेड इंधन उपलब्ध करणे शक्य होणार नाही.
म्हणजे देशाच्या मैदानी भागात हे इंधन सहज वापरता येणार आहे. लल्लनटॉपने नीती आयोगाचाच हवाला दिला आहे. त्यानुसार ऊसापासून किंवा तांदळापासून इथेनॉल बनवले तर प्रती एक लीटर इथेनॉलसाठी ऊस किंवा तांदळाला लागणारे पाणी जवळपास ७५०० लीटर ते १०००० लीटर असेल. हा टीकेचा विषय आहे. सरकारने दिशाभूल करणारे उत्तर देताना पिकाला लागणारे पाणी सांगितलेले नाही. त्यांनी फक्त कारखान्यात इथेनॉल बनवण्यासाठी लागणारे पाणी सांगितलेले आहे.
सरकारने असेही सांगितलेले आहे कि आम्ही मक्यापासून इथेनॉल बनवण्याला प्रोत्साहन दिले आहे. पण मक्यापासून बनवलेले इथेनॉल एकूण किती टक्के आहे याची आकडेवारी उपलब्ध नाही.
सरकारचा कारभार पारदर्शी असेल तर इथेनॉल निर्मितीत सहभागी असलेल्या कारखान्यांची यादी दिली पाहीजे. या कारखान्यात तयार होणारे इथेनॉल सांगितले पाहीजे.
साधारण तर्काने सांगता येईल कि यात बहुतकरून सहकारी आणि खासगी साखर कारखानेच मोठ्या प्रमाणात असणार. मक्याची आकडेवारी उपलब्धच नाही. गडकरींचे साखर कारखाने आहेत हे त्यांनी स्वतःच सांगितलेले आहे. पण त्यांच्या मुलांचे इथेनॉलचे कारखाने असल्याचे आरोप काँग्रेसने केलेले आहेत.
मारूती सुझुकीने ई ८५ साठी वॅगन आर बनवली. पण फक्त चार वाहने विकली गेली आहेत. ही परिस्थिती ग्राहकात असलेली भीती स्पष्ट करतेय.
आता ब्राझीलबद्दल.
ब्राझीलने टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेण्डींग वाढवत नेले. पन्नास वर्षे लागली. या काळात त्यांनी कंपन्यांना पूर्णपणे फ्लेक्स इंजिनवर आधारीत वाहनांच्या उत्पादनासाठी पुरेसा वेळ दिला. इन्फ्रास्टृक्चर तयार केले. लोकांना जुनी वाहने भंगारात काढायला पुरेसा वेळ दिला. कुणाचेच नुकसाण होंणार नाही अशा पद्धतीने मधल्या काळात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक वाहनासाठी हवे ते पेट्रोल उपलब्ध करून दिले. जसजशी जुनी वाहने बंद होत गेली तसतसे जास्तीचे इथेनॉल पेट्रोलमधे वाढवत नेले.
इथे १२ वर्षातच ई २०, ई ८५ आणि आता ई १०० सुरू केलेय. आज ई २० पेट्रोलच अनेक ठिकाणी आहे. आजही १५ ते २० वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत. ती यासाठी तयार नाहीत. २०२२ च्या आधीची वाहने ई२० साठी तयार नाहीत. ती वाहने खराब होऊ द्यायची का?
एहसान पूनावाला यांनी दिल्लीतल्या गडकरींच्या घरासमोर धरणे देण्यासाठी परवानगी मागितली होती. ती त्यांना मिळाली आहे. ते म्हणतात आमचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही पक्षाला विरोध करत नाही.
यावरून हे आंदोलन सरकारनेच पुरस्क्रुत केले असावे असे वाटते. म्हणजे वाहनचालकात असलेल्या संतापाची कुणकुण लागल्याने गडकरींना बळीचा बकरा बनवून जनक्षोभाला वाट करून सरकार सुरक्षित राहू इच्छिते. या धोरणात अन्य कुणी वक्तव्ये केलेली नसल्याने आओपापच गडकरी हेच लक्ष्य बन्णार आहेत.
म्हणजे जर लोकांनी विरोध केला नाही तरी फायदा आणि लोकांनी गडकरींना विरोध केला आणि सरकारला सोडून दिले तरी फायदा असा हा प्रकार दिसतो.
संदर्भ
१. https://www.youtube.com/watch?v=liTmvZXl4S0
२. https://www.youtube.com/watch?v=i1iaPSLlFaU
३. https://i.ytimg.com/vi/C2VBDjxkqWE/hqdefault.jpg?sqp=-oaymwEnCPYBEIoBSFr...
४. https://www.youtube.com/watch?v=RkTKpuss7c8
५. https://www.youtube.com/watch?v=vZqPsscJZnw
६. https://www.team-bhp.com/news/maruti-wagonr-flex-fuel-only-3-units-sold-...
२०२९ च्या आधी शहाला जे
२०२९ च्या आधी शहाला जे मन्त्री धोकादायक वाटतात त्यांच्यामागे आता शुक्लकाष्ठ लागेल. ह्यात मोदिचा देखिल नम्बर लागेल
एक प्रश्न. जितके पेट्रोल
एक प्रश्न. जितके पेट्रोल आपल्या देशाला लागते तितके इथेनॉल आपल्या देशात बनेल का?
शेती आणि इथेनॉल साठी पाणी वापर हा दुसरा प्रश्न
आपण अगदी संदर्भासहित माहिती
आपण अगदी संदर्भासहित माहिती दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद. खरे तर सगळे स्पष्ट आहे. आय आर बी बाबतही असेच मधुर संबंध आहेत.
काही गोष्टी स्पष्ट करू
काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो.
1. पेट्रोल मध्ये ethanol antiknocking agent म्हणून वापरले जाते ते MTBE या carcinogenic anti knocking agent च्या ऐवजी. यासाठी कमीतकमी 5% ethanol पेट्रोल मध्ये मिसळणे आवश्यक आहे.
Ethanol चा octane number पेट्रोल पेक्षा जास्त आहे म्हणजे IC इंजिन मध्ये Ethanol पेट्रोल पेक्षा चांगल्या पद्धतीने जळते.(combustion)
2. सध्या 20 % पर्यन्त ethanol मिश्रण ethanol च्या उपलब्ध प्रमाणात. गाड्या त्यासाठी तयार केलेल्या असतात. त्यात तांत्रिक दृष्ट्या काहीही प्रश्न नाही.
3. 22% च्या पेक्षा जास्त जर ethanol vaparayache असेल तर इंजिन आणि इतर प्रणालीत बदल करावा लागेल हे सर्व मान्य आहे. कार कंपन्यांना याची नीट माहिती आहे. त्यांना फक्त ते इतर देशात वापरत असलेली पुरवठा साखळी भारतात आणावी लागेल. हे अजिबात अवघड नाही.
4. Ethanol मध्ये पेट्रोल पेक्षा ऊर्जा कमी असते हे सत्य आहे. त्यामुळे वर लिहिल्याप्रमाणे मायलेज त्या प्रमाणात कमी होईल. जेंव्हा 100 टक्के ethanol उपलब्ध असेल त्यावेळेस petrol आणि ethanol च्या किमतीत तेव्हढा फरक ठेवावा लागेल व फ्लेक्स fuel कार मध्ये काय भरायचे याचा निर्णय पेट्रोल पंपावर ग्राहक घेऊ शकेल. ब्राझील मध्ये ही पद्धत आहे. तेथे ग्राहक कधी ethanol तर कधी (20% ethanol blended) petrol भरू शकतात व मी स्वतः दोन वर्ष तेथे तेच करत होतो. आपल्याकडेही अशीच व्यवस्था निर्माण होईल. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर लागेल आणि त्याला वेळ लागेल.
5. Oil marketing companies online tender पद्धत वापरून ethanol खरेदी करतात. ही अत्यंत पारदर्शी पद्धत आहे.
6. आपल्याकडे अलीकडे साखरेचे उत्पन्न कमी करुन त्याचे ethanol मध्ये रुपांतर केले जाते. त्यायोगे साखरेचे भाव कोसळण्याची शक्यता कमी होते, साखरेचे साठे पडून राहत नाहीत व साखर कारखान्यांना खेळते भांडवल उपलब्ध होते.
7.ethanol चे कारखाने (sakhar, तांदूळ, मका ) खाजगी सहकारी तसेच पूर्वापार सर्व पक्षीय आहेत. (आता सर्व पक्षीय त्यांच्या फायद्यासाठी एक पक्षीय होत आहेत ती गोष्ट वेगळी.) माझ्या मते खाजगी चे कारखाने जास्त आहेत.
8. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या जरुरी पेक्षा जास्त पेट्रोल उत्पादन करतो. त्याच कारण अस की आपल्याला जेव्हढे डिझेल लागते त्याचे उत्पादन करताना आपल्या जरुरी पेक्षा जास्त पेट्रोल निर्मिती होते म्हणून आपण पेट्रोल निर्यात करतो. देशी ethanol निर्मिती केल्यास तेव्हढे petrol जास्त निर्यात होईल आणि परकीय चलन उपलब्ध होईल.
9. जोपर्यंत आपण डिझेल मध्ये blending करू शकत नाही तो पर्यन्त आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकत नाही. डिझेल blending अजून कोठेही झाले नाही. पर्याय म्हणून हायड्रोजन, fuel cell इत्यादी बाबत संशोधन चालू आहे. EV हा अजून एक आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न आहे. पण त्याचे प्रश्न अजून वेगळे आहेत.
10. सध्याच्या परिस्थितीत सरकारी पाठींबा असल्याखेरीज ethanol निर्मिती फायदेशीर ठरत नाही. सरकार यासाठी ethanol दर ठरवते जो सर्वाना सारखा असतो. एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी हा कार्यक्रम आहे असे शक्य नाही.
11.कर्ज घेऊन बुडवणे हे फक्त ethanol क्षेत्रात चालते व त्यात फक्त राजकारणी असतात असा समज चुकीचा आहे.
12. थोडक्यात 100 टक्के ethanol अजून दूर आहे.
राजकारणावर मला भाष्य करायचे नाही.
तांत्रिक पोस्ट आवडली.
तांत्रिक पोस्ट आवडली.
गाड्या त्यासाठी तयार केलेल्या असतात. त्यात तांत्रिक दृष्ट्या काहीही प्रश्न नाही.>> सध्या भारतात ज्या गाड्या आहेत त्यात किती टक्के गाड्या या २०% इथेनॉलवर चालण्याकरता तयार करण्यात आलेल्या आहेत? मला असे वाटले होते की जुन्या गाड्यांना प्रॉब्लेम येतील. ब्राझीलची तुलना चुकीची वाटते कारण तिथे जवळ जवळ ३०-४० वर्षांपासून हे सुरू आहे. आणि त्यांनी गाड्यांचे तसे प्रकार तिथे आणलेले आहेत.
सर्व गाड्या काहीही बदल न करता
सर्व गाड्या काहीही बदल न करता 20% ethanol blended पेट्रोल वर चालू शकतात. मुख्य Problem मुळात इंजिनचा किंवा फायरिंग सिस्टीम चा नसतो. तो gasket, रबर वगैरे सारख्या मटेरियल चा असतो.
निलूदा यांचे दोन्ही प्रश्न
निलूदा यांचे दोन्ही प्रश्न योग्य आहेत.
एक सर्च मारला तर असे कळले.
एक सर्च मारला तर असे कळले. खरे काय काही कळत नाही
Modern Cars (2011 and newer): Most non-flex-fuel cars manufactured after 2011 are tested and warrantied by their automakers to run on up to E15. Using E20 in a vehicle calibrated for E15 may result in engine misfires, poor throttle response, and could void your manufacturer's warranty.
All petrol cars sold in India after April 2023 are fully E20 compliant.
Octane Number बद्दल. मनीष
Octane Number बद्दल. मनीष कश्यप हे व्हिसलब्लोअर समजले जातात. त्यांनी octane Number बद्दल घोळ घातला आहे. या नंबरचा आणि पेट्रोलच्या शुद्धतेचा काही संबंध नाही. हा नंबर पेट्रोल विशिष्ट बिंदू च्या आधी पेट घेईल कि नाही हे सांगतो. म्हणजे इगनिशन स्ट्रोक ला पेट्रोल ने पेट घेतला तर पावर स्ट्रोक क्षमता कमाल असते.
इथेनॉलच्या आधी विविध केमिकल्स (additives) पेट्रोल मधे मिसळून पेट्रोलचा octane Number वाढवत असत. त्यामुळे नॉकिंग होत नाही. सर्च केल्यावर इच्छुकांना additives ची नावे मिळतील. यांपैकी बऱ्याच additives ची कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोलच्या बरोबर किंवा जास्त असे. एकाच additive चा उष्मांक १% ने कमी आहे. कारण हे सर्व पेट्रोल च्याघ हायड्रोकार्बन फॅमिलीत आहेत.
इथेनॉलचा octane number 100 पेक्षा जास्त आहे. पण कॅलरीफिक व्हॅल्यू पेट्रोल च्या ०.६६ इतकी आहे. हे हेडर मधेच लिहिले आहे.
म्हणजे octane Number हे ध्येय असते तर ते स्पीड पेट्रोल मधे मिळतेच. त्यासाठी इथेनॉलवर अवलंबून रहायची गरज नाही.
इथेनॉल पेट्रोलला पर्याय म्हणून आणले जात आहे इथे सगळा गोंधळ आहे.
२०२१, २०२३ आणि २०२५ अशा दोन दोन वर्षांनी नवनवे व्हेरीएंटस आणले जात आहेत. दोन दोन वर्षांत जुनी वाहने absolute करता येत नाहीत. त्यांच्या साठी किमान १५ वर्षे पेट्रोलचे जुने व्हेरीएंटस उपलब्ध करून दिले पाहिजे इथे नेमकी समस्या आहे.
ब्राझिल ५० वर्षे घेतली. या दरम्यान वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी जुनी वाहने फेज आऊट होईपर्यंत त्यांना जुने इंधन उपलब्ध करून दिले होते. दिल्लीत ई20 ची सक्ती होतेय. पुण्यात सिलेक्टिव्ह पंपावर ई१० उपलब्ध आहे. पण ते ई५ वाहनांना चालत नाही. ई० वाहनेही रजिस्ट्रेशन नूतनीकरण करून चालत आहेत. ९००० रूपये नूतनीकरणाचा कर आहे. हे बंद करा.
ताळमेळ ठेवा. २०२१ च्या आधीच्या वाहनांना सहा वर्षांत ते ज्यासाठी बनलेले नाही ते इंधन वापरण्याची वेळ आली आहे. माझ्या पाहण्यात कुठल्याही पंपावर ई ५, ई१०, ई२० असे लिहिलेले नाही.
कदाचित हा धागा काय म्हणायचे
कदाचित हा धागा काय म्हणायचे आहे हे सांगण्यात कमी पडला असेल तर इंडियन एक्स्प्रेसने सांगितलेली ही टाईमलाईन नेमके काय ते सांगतेय.
https://youtu.be/E_LywIiB1QE?si=Y4b80f1mwwDts7v-
राहुल कुलकर्णीने ARAI च्या रिपोर्टचा हवाला देऊन सरकारने ई २५ ला ब्रेक लावल्याचे सांगितले आहे. हा रिपोर्ट जनतेला उपलब्ध नाही. त्यामुळे पुन्हा इंडियन एक्स्प्रेस चा रिपोर्ट पहा.
https://youtu.be/Y99JrEBJWC8?si=x__kAmNuC5RVLSLu
सरकारने e 25 च्या बाबतीत
सरकारने e 25 च्या बाबतीत आसते कदम धोरण स्वीकारले आहे असे आजचा लोकसत्ता म्हणतो
इंटरनेटवर काहीही दावे केले
इंटरनेटवर काहीही दावे केले जात आहेत. मी ऑटोमोबाईल इंजिनियर नाही. एक कोर्स केला त्याला हजारो वर्षे झालीत. त्याचं कोर्स मटेरियल शोधलं तर सापडेल, पण केवळ जालीय चर्चेसाठी एव्हढी मेहनत घेणं अडचणीचं वाटतं.
माझ्या आठवणीप्रमाणे स्टाईकिओमेट्रिक एअर फ्युएल रेशो हा महत्वाचा आहे. त्यानुसार इंजिनचे डिझाईन असते. इंधनाच्या ऑक्टेन नंबरमधे बदल झाला तर सगळेच गंडेल. पण कॅलरिफिक व्हॅल्यूत किंचितसा फरक असेल तर काही फरक पडत नाही. इथेनॉल थोडे असेल तर काही फरक पडणार नाही. उलट पेट्रोलचा ऑक्टेन नंबर वाढेल. मी शिकलो ते कार्ब्युरेटर इंजिनवर.
आता काँयुटराइज्ड इंजेक्शन मेथड असते. इथे मी चुकू शकतो. पण तर्काने एव्हढं सांगता येतं कि ज्वलनाच्या जागेत तेव्हढंच एअर फ्युएल मिक्श्चर इंजेक्ट करता येईल जेव्हढी त्याची क्षमता आहे. इंजेक्टरची क्षमता संपली कि त्यापेक्षा जास्त इंधन घेता येणार नाही.
पेट्रोल आणि इथेनॉलचे वस्तुमान हेडर मधे दिलेले आहे. त्यामुळे त्याचा स्टाईकिओमेट्रिक एअर फ्युएल रेशो काढता येईल.
पेट्रोल साठी तो १४:७ तर इथेनॉलसाठी ९:१ असा असेल. हवा : इंधन गुणोत्तर. ( हे गणित चुकलंय का सांगा.)
म्हणजे हवेसाठी इथेनॉलचे प्रमाण जास्त लागेल.
आधीच सांगितल्याप्रमाणे आधुनिक वाहनातली इंजेक्टर प्रणाली माहीत नाही. शुद्ध पेट्रोल (म्हणजे निव्वळ या अर्थाने) वरची आधुनिक कार इथेनॉल किती घेऊ शकेल याची कल्पना नाही. इथेनॉल साठी फ्लेक्स इंजिनात काय बदल करतात हे मला माहिती नाही. याबद्दल तज्ञांनी माहिती द्यावी.
हे झालं रचनेबद्दल.
आता इथेनॉल ब्लेण्डिंग बद्दल पण बघायला हवं. ब्लेण्डिंग करताना काय काळजी घ्यायला हवी, ती न घेतल्यास काय होतं हा मुद्दा महत्वाचा आहे.
भारतात अशी काळजी घेतात कि नाही कल्पना नाही. त्या क्षेत्रातले लोकच सांगू शकतात.
https://www.youtube.com/watch?v=L8SQCk2L4p4
आजच्या TOI मध्ये यावर विस्तृत
आजच्या TOI मध्ये यावर विस्तृत लेख आला आहे. तो वाचून घ्यावा.
जुन्या गाड्यांना 20%ethanol blended पेट्रोल वापरल्याने प्रॉब्लेम होतो हे मला आजवर एकाही मेकॅनिक ने सांगितले नाही. कुणालाही असा अनुभव आल्याचे मला ऐकिवात नाही. कुठल्याही रिपोर्ट मध्ये लोकांना असे वाटते असे लिहिलेले असते. माझ्या गाडीच्या 2010 च्या मॉडेल मध्ये मला कधीही पेट्रोल मुळे gaskets बदलाव्या लागल्या असे झाले नाही.
Ethanol is has not only antiknocking properties but is also an oxygenating agent.
पॉवर पेट्रोल मध्ये ethanol नसते हा गैरसमज आहे.
Ethanol blending करण्याची
Ethanol blending करण्याची पद्धत फारशी महत्त्वाची नाही. पूर्वी टँकर मध्ये मिक्स करायचे आता काही additives सह in line मिक्स करतात.
मी मा़झ्या गाडीचा अनुभव सांगू
मी मा़झ्या गाडीचा अनुभव सांगू शकतो. चढ चढताना पूर्वी आरामात चढायची. आता पेट्रोलवर सुद्धा चढ चढत नाही. एसी बंद करावा लागतो.
मी वर संपूर्ण टेक्निकल माहिती दिलेली आहे. ती चुकीची असेल तर कळवा.
ब्लेण्डिंगच्या बाबतीत वर एका मेकॅनिकल इंजिनियरचे म्हणणे मांडलेले आहे. अशाच अर्थाचे आर्टिकल्स गुगळल्यावर वाचले. फक्त भारतात किती काळजी घेतात हे माहिती नाही.
मनिष कश्यप यांच्या बाबतीत =
टोयोटा कंपनीने त्यांच्या गाडीची दुसरी सर्विसिंग फ्री मधे केली नाही. ९००० रूपये बिल चार्ज केलं. त्यांनी सांगितलं कि ई २० पेट्रोलमुळे आमची गाडी खराब होत नाही. गाडीत दूषित पेट्रोल होतं.
प्रश्न हाच आहे कि दूषित पेट्रोल आलं कुठून?
ते पेट्रोल टोयोटा च्या सर्विस सेंटरमधे टोयोटाच्या मेकॅनिकने बाटलीत दाखवलेले आहे.
टाईम्सचा लेख अद्याप वाचलेला
टाईम्सचा लेख अद्याप वाचलेला नाही. पण अनेक व्हिडीओज पाहिले आहेत ज्यात बाटलीत पेट्रोल काढल्यावर तीन थर स्पष्ट दिसतात. आमच्या मेकॅनिकने सुधा गाडी सीएनजीवर चालवा असे सांगितलेले आहे. पेट्रोल पंपावर ई १० आहे असे सांगतात, पण तसे कुठे लिहीलेले नाही.
मी ज्या गॅरेजमधे जातो तिथे बाईक्स आणि कार्सच्या इंजिनचे गॅस्केटस, पाईप बदलण्याच्या केसेस मधे वाढ झाली आहे. मेकॅनिक चांगला ओळखीचा आहे. असे का होते याचे कारण वर दिलेय तसे व्हिडीओज नंतर पुन्हा शोधून इथे देईन. मुळात इथेनॉल ओलावा शोषून घेते हे मान्य असेल तर हे क्लेम अवास्तव नाहीत यावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.
बॉश इंडीयाने भारतातल्या
बॉश इंडीयाने भारतातल्या इथेनॉल पेट्रोल इंधनाची गुणवत्ता यावर अभ्यास करून एक अहवाल सादर केला होता. कालपर्यंत तो होता.
https://www.services.bis.gov.in/tmp/cmt_1723200619_66b5f46b61372.pdf
आज दिसत नाही या अॅड्रेसवर. त्यात काय होतं हे सांगू शकेन.
चांगली चर्चा आहे. मूळ पोस्ट
चांगली चर्चा आहे. मूळ पोस्ट आणि पुढची चर्चा - दोन्हींतून तांत्रिक माहितीही होत आहे. पेट्रोल मधे इथेनॉल असते इतकेच ढोबळ माहीत होते आत्तापर्यंत. त्याकरता वाहनांमधेही काही करावे लागते वगैरे विचार केला नव्हता.
आपले पेट्रोल उत्पादन आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे ही नवीनच माहिती! बहुतांश जड वाहने डिझेल वाली आहेत याची कल्पना आहे.
बीएमड्ब्ल्यू चा फ्युएल प्प्म
बीएमड्ब्ल्यू चा फ्युएल प्प्म इथेनॉलमुळे खराब.
https://x.com/withbharatjodo/status/2074862011243208878/video/1
https://x.com/darabmansoorali/status/2075509200978112583/video/1
ए२० प्रॉब्लेम असा सर्च दिला तर हजारो असे दावे सापडतील. तसेच सरकारचे समर्थन करणारेही.
हा विषय केमिकल इंजिनीयर्सचा आहे. ते अधिकाराने सांगू शकतात.
इंटरनेट सर्च च्या आधारावर इतके म्हणू शकेन कि इथेनॉलमधे आर्द्रता शोषून घेण्याची प्रवृत्ती असल्याने जिथे साठवणूक होते, वाहतूक होते आणि पेट्रोलपंपाच्या टाकीत साठवणूक होते अशा सर्व पातळ्यांवर जर इथेनॉलने आर्द्रता शोषून घेतली असेल तर इथेनील + पाणी + पेट्रोल असे तीन द्रव पदार्थ असल्याने तीन थर दिसणे शक्य आहे. पेट्रोलियम रिफाईनरी मधे काळजी घेत असतील. तिथून डेपो मधे जाण्यासाठी टँकर्सचा वापर होतो. या टँकर्सच्या आतमधे इथेनॉल ग्रेड प्रोटेक्टिव्ह थर नसेल तर आर्द्रतेमुळे आतले लोखंड गंजून ते इंधनात उतरणे शक्य आहे. त्यानंतर डेपोमधल्या मोठमोठ्या टाक्या, तिथून पंपाकडे जाणारे टँकर्स आणि पंपाखालची टाकी या सर्व स्टेजेस मधे काळजी घेfunction at() { [native code] }लेली नसेल तर पाण्यामुळे ऑक्सिडेशन होऊन पेट्रोल दूषित होऊ शकेल.
हे कदाचित आर्द्रता जास्त असलेल्या भागात होईल, काही भागात होणार नाही.
पेट्रोलियम कंपन्या, वाहन उद्योग आणि सरकारमधले तांत्रिक बाबू यांना हे माहीत असेल ना?
पेट्रोल पंपावरचा बोर्डhttps:/
पेट्रोल पंपावरचा बोर्ड
https://x.com/the_hindu/status/2075519341228068968/photo/1
ब्राझिल मध्ये जेंव्हा फ्लेक्स
ब्राझिल मध्ये जेंव्हा फ्लेक्स fuel गाडीत ethnol भरतात ते hydrous ethanol ( म्हणजे 5 % पाणी असलेले ) ethanol असते.
त्यामुळे टाकीत पाणी असल्याने काही फरक पडत नाही. ही फ्लेक्स इंजिने अशी तयार केलेली असतात की ज्यात पाणी असलेले ethnol चालू शकते.
माझ्यामते सरकारने त्यांच्या फ्लेक्स योजने बाबत योग्य प्रकारे माहिती जनतेपर्यंत पोचवायला हवी. सध्या याचीच कमी आहे.माझी खात्री आहे की सरकार योग्य पाउले उचलेल कारण त्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही.
जेंव्हा फ्लेक्स fuel गाड्या उपलब्ध होतील तेंव्हा पेट्रोल पंपावर दोन्ही प्रकारच्या इंधनाचा पर्याय उपलब्ध असेल. असे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होण्यास कालावधी लागेल.
आजच्याच TOI मध्ये गडकरींनी कुणाची गाडी खराब झाली असेल पेट्रोल मुळे तर त्यांना फोन करावा असे आव्हान केले आहे.
माझे तेच म्हणणे आहे. हे सगळे ऐकीव किंवा speculative आहे.
Mileage मध्ये घट होते हे शास्त्रीय सामान्यज्ञान आहे.
BTW. माझा मुलगा केमिकल इंजिनियर असल्याने मी स्वतःला:केमिकल इंजिनियर चा बाप म्हणतो. (Just joking ).
विक्रमसिंह +१.
विक्रमसिंह +१.
विक्रमसिंग, तुमच्या मते
विक्रमसिंग, तुमच्या मते भारतात सर्व गाड्या फ्लेक्स इंजिनवर आहेत का?
मी याचा खुलासा वर केला आहे. पुन्हा लिहीत नाही.
सध्या भारतात एकही फ्लेक्स
सध्या भारतात एकही फ्लेक्स गाडी विकत नाहीत. पण भारतात सध्या विकल्या जाणार्या सर्व गाड्या 20% ethanol असलेले पेट्रोल कुठल्याही प्रॉब्लेम शिवाय चालू शकतात आणि हाच मुद्दा आहे.
ब्राझीलचे उदाहरण दिले आहे.
ब्राझीलचे उदाहरण दिले आहे. त्यांनी फ्लेक्स इंजिन नसताना इथेनॉलची सक्ती केली किंवा कसे, आणि किती वर्षे त्यांनी घेतली याबद्दल दोन वेळा लिहीलेले आहे.
नितीन गडकरी यांचे म्हणणे डोळे झाकून स्विकारायचे असेल तर प्रश्नच संपला.
राज जी. मी गडकरी बरोबर आहेत
राज जी. मी गडकरी बरोबर आहेत का चूक यावर चर्चा करत नाहीये.
सध्या पेट्रोल मुळे गाड्या खराब होतात याचा कुठलाही पुरावा नाही. या म्हणण्याला शास्त्रीय आधार नाही येवढेच.
मला नवीन काही सांगायचे नाही.
माझे मुद्दे संपले आहेत. धन्यवाद.
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/e20-fuel-may-damage-rubber-par...
An ARAI report, which recommended roll out of E20, had oncluded that using the fuel in E10-compliant vehicles howed deterioration in rubber parts of fuel-system component .., such as hoses, gaskets, seals and O-rings.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2283376®=48&lang=2
Ethanol Blended Petrol Programme
Frequently Asked Questions
प्रविष्टि तिथि: 10 JUL 2026 5:51PM by PIB Delhi
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/19JWfw2vZz/
E20 Petrol Hits BMW, Mercedes & Luxury Cars Hard | Live Demo
https://www.facebook.com/share/v/14h4iJvLnNa/
India Sticks to E20 Petrol Push, Maruti,Toyota & Hero Issue Clarifications
सरकारने आयोजित केलेली पत्रकार परिषद
यात कोणत्या ऑटो कंपन्या आल्या नव्हत्या?
गडकरींनी काय आव्हान केले आहे
गडकरींनी काय आव्हान केले आहे त्याचा दाखला दिलाय म्हणून तसं लिहीलं.
ब्राझीलने हा कार्यक्रम कसा राबवला हे सगळीकडे उपलब्ध आहे. अमेरिकेसारख्या राष्ट्रात ई १० च आहे. भारत सरकार ई २५ ची तयारी करत होतं. जॉ गोष्ट २०३० पासून करायची ती २०२५ साली इंप्लीमेंट केली ( हे वर लिहीले आहे). याची दखल न घेता फक्त ब्राझील मधे काय होतंय याचे दाखले देणं अर्धवट आहे असं मला तरी वाटलं.
तसेच अन्य देशात इथेनॉल हाताळणीसाठी जे बदल केले जातात ते आपण केलेले आहेत का याबद्दल कुठेच स्पष्टीकरण नाही. अशा परिस्थितीत जर मनीष कश्यप यांच्या वाहनाच्या टाकीत पाणी असेल तर टोयोटा कंपनीने ग्राहकाच्या विरोधात एफ आय आर दाखल करणे समजण्यापलिकडे आहे. एक ग्राहक आणि कंपनी यांच्यात यापूर्वीही खटके उडालेले आहेत. इथे मनीष कश्यप यांनी टोयोटाच्या विरोधात तक्रार केलेली नाही. त्यांनी व्हिडीओ बनवताना कंपनीच्याच मेकॅनिकने फ्युएल टँकमधून जे फ्युएल काढले त्यात पाणी आढळले. त्यात अनेक थर दिसले.
सरकारने घाईघाईने सर्वच वाहनकंपन्यांची मीटींग बोलावून ई२० सुरक्षित आहे हे त्यांना सांगायला लावलं. या आधी असं कधी घडलं? टोयोटा कंपनीला कश्यप यांच्या विरोधात तक्रार का कराविशी वाटली? ग्राहकाने पाणी टाकलं याचा पुरावा आहे का?
कंपनीने खुलासा केला आहे कि ई२० सुरक्षित आहे. ग्राहकाची गाडी दूषित इंधनाने खराब झाली. याचा अर्थ वाहनात दूषित इंधन होतं हे कंपनी कबूल करतेय. ते कुठून आलं याची चौकशी करायची कि ग्राहकाला दम द्यायचा?
ई२० सुरक्षित असेल पण त्याची हाताळणी सुरक्षित आहे का?
आणि जर आमची गाडी ई१० किंवा ई २० साठी बनलेलीच नाही तर आम्हाला पर्याय हवा हा लोकांचा हक्क नाही का? आधी कल्पना असती तर गाडीच घेतली नसती. ई२० च्या समर्थनार्थ जे मुद्दे आहेत तेच पटण्यासारखे नाहीत.
ARAI या संस्थेने दिलेल्या जुन्या रिपोर्टमुळे वातावरण तापलेले आहे. या संस्थेचा तसेच बॉशने बी आय एस या संस्थेला दिलेला अहवाल दोन्हीही उपलब्ध नाहीत. पण सर्च दिला तर बॉशने ब्युरो ऑफ इंडीयन स्टँडर्डला दिलेल्या प्रेझेंटेशन मधले मुद्दे समजतील. फक्त मायलेज कमी होईल ही सामान्य गोष्ट नाही. कॅलरीफिक व्हॅल्यू कमी झाली कि पावर पण घटणार आहे. हे ही लिहीलेले आहे. हे दुर्लक्षून फक्त सरकारच्या समर्थनातलेच मुद्दे हायलाईट करून कसं चालेल?
PCD-03 Committee Meeting dated 29-07-2024 – Minutes of Meeting
Bosch Limited presentation: "India E20 Fuel Status and Way Forward"
हा सर्च दिला किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डसकडे पाठपुरावा केला तर बॉशने दिलेल्या प्रेझेंटेशनची माहिती मिळेल.
https://www.niti.gov.in/sites
https://www.niti.gov.in/sites/default/files/2021-06/EthanolBlendingInInd...
ROADMAP FOR
ETHANOL BLENDING
IN INDIA 2020-25
Report of the Expert Committee
NITI Aayog | Ministry of Petroleum and Natural Gas
Pages