Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनमोहनसिंग लीडर वाटले का?
मनमोहनसिंग लीडर वाटले का? त्यांच्या विषयात ते हिमालय होते परंतु नेतृत्व हा त्यांचा बालेकिल्ला कधीच नव्हता.
>> माझंही आधी हेच मत होतं. पण भाजपने केलेली खेळी गेल्या काही वर्षांत मला जाणवली आहे.
कुठलेही पंतप्रधान सर्वगुणसंपन्न नव्हते. पण मोदींबद्दल नसलेल्या अती पॉसिटीव्ह गोष्टी आणि इतराबद्दल नसलेल्या निगेटिव्ह गोष्टी अशा डीप लेवलला पसरवल्या गेल्या आहेत की आपल्याला खरं कळणं अवघड आहे.
पण हे रियालाईज होण्याची प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे. कोणी कोणाला सांगून, प्रूफ देऊन उपयोग नाही. आपला इंटरेस्ट, वेळ, पेशन्स, मत बदलण्याची ताकत वगैरेवर अवलंबून आहे.
मनमोहनसिंग लीडर वाटले का?
मनमोहनसिंग लीडर वाटले का?
>>>>
मनमोहन सिंग आणि मोदी यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स आणि जबाबदाऱ्या हा एकच निकष लावता ते लीडर म्हणून कित्येक मैल पुढे निघून जातात.
मनमोहन सिंग यांच्यावर पक्ष प्रमुख म्हणून सोनिया गांधी यांचा कंट्रोल असेलही पण ते समोरून आलेल्या प्रश्नांना स्वतः उत्तरे द्यायचे.
त्याउलट मोदी यांच्यावर अमित शहांचा किंवा RSS चा कंट्रोल नक्कीच असणार कारण आजपर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्ट स्क्रिप्टनुसारच वाचून म्हटली आहे किंवा केली आहे. ती स्क्रिप्ट कोण लिहिते हे शोधायला हवे म्हणजे खरे लीडर कोण आहेत हे समजेल.
अर्थात मी हे तर्काने आणि कॉमनसेन्स वापरून म्हणतो आहे. मला राजकारणात फार ज्ञान नाही.
पीनी
पीनी
+786
पण दुर्दैवाने आजही जनता त्या नेत्यांना लीडर समजून विश्वास ठेवते ज्यांनी पहिल्यापासून एकूण एक गोष्ट खोटीच म्हटली आहे. मग ती वैयक्तिक माहिती असो किंवा आश्वासनांचा जुमला.
अर्थात मी सुद्धा यात होतो. पण एके काळापर्यंत. कारण आपल्या पर्यंत जे पोहोचत होते तेच आपल्यासाठी सत्य होते. पण आज गोदी मिडिया पलीकडे एक पत्रकारांचा समूह आहे जो सोशलमिडिया मार्फत आपल्यापर्यंत सत्य पोहोचवत आहे. तर आपली चूक कबूल करून स्वीकारणे गरजेचे आहे असे वाटते.
डॉ मनमोहन सिंग यांना कितीही
डॉ मनमोहन सिंग यांना कितीही हिणवले तरी तो माणूस सच्चा होता या बदद्दल कोणाचे दुमत होणार नाही
बाकी या धाग्यावर इतके वेळा रुनेमश सरांशी सहमत व्हावं लागतंय की कधी कधी मला वाटू लागलं आहे हे ते पॅरलल युनिव्हर्स तर नाहीये ना?

<<पंप्रंनी मोठ्या मनाने चूक
<<पंप्रंनी मोठ्या मनाने चूक मान्य करुन आदर्श घालून द्यायला हवा होता. >>
------ त्यांनी माफ केल्याचे जाहिर करणे चांगली गोष्ट आहे. त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.
सुकोचा आदेश रिझनेबल आहे>>
सुकोचा आदेश रिझनेबल आहे>>
सुप्रीम कोर्टाचा आदेश कायद्याच्या दृष्टीने बरोबर असेल कदाचित पण न्यायाच्या दृष्टीने नक्कीच चुकीचा आहे. जर एखाद्यावर आधी ची FIR असेल पण त्या दिवशी ती व्यक्ती शांततापूर्ण आंदोलन करत असेल तर त्यावर का कारवाई करावी.
तसेही एकदा मान्य केले की सगळ्यांवरील fir मागे घेणार की मग सुप्रीम कोर्टाच्या मागे लपून कारवाई का?
हे सरकार आंदोलन कर्त्या ना बदनाम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणजे सरकार ला सुसंधीच आहे.
RAF ची लेडी ऑफिसर २१ तारखेला हात मोडलेली TV वर दाखवली होती. ती ऑफिसर आज इंस्टावर हाताला काहीही न झालेली आणि डान्स movement करताना दिसून आली. ८ दिवसात बरी पण झाली.
दगडच ट्रक पोलिसांनी आणला मग पोलिसांनी त्यांचे लोक जखमी झाल्याचे नाटक केले नसावे कशावरून. फेक एन्काऊंटर मध्ये एखादा कॉन्स्टेबल जखमी होण्याचे स्टेज केले जाते. तसे इथे झाले असावे. मागची बारा वर्षे हेच चालू आहे.
एकंदरीत चर्चा पाहून हे
एकंदरीत चर्चा पाहून हे लिहिल्याशिवाय राहवत नाहीये.
यशस्वी नेतृत्वाचे ढोबळमानाने दोन मुख्य भाग पडतात. मोठ्या प्रमाणावर लोकांची मने जिंकणे त्यांना प्रभावित करून आपल्या मागे आणणे. दुसरा भाग समोर असलेल्या संस्थेच्या आकलनाचा आहे. यात जितकी मोठी संस्था तितकी जास्त गुंतागुंत. देशाचे उदाहरण घेतले तर यात निवडणूक जिंकणे आणि देश चालवणे असे दोन मुख्य भाग आहेत. यात दोन्ही भाग तितकेच महत्वाचे आहे. निवडणूक जिंकण्यासाठी नेते स्वप्न दाखवतात, आकर्षक वाटतील अशी वचने देतात, काही अजून एक पातळी खाली जाऊन विरोधकांची नाचक्की करणे, मतदारांमध्ये फूट पाडणे असे प्रकार करतात. जिंकून आल्यावर त्यांना देश चालवायचा असतो त्यात अर्थ, परराष्ट्र, सरंक्षण, अर्तंगत व्यवस्था इ. कामे त्यांना जी काही नोकरशाही आहे त्यांच्याकडून करून घ्यावी लागतात. यात नवीन धोरणे ठरवणे आणि ती राबवून घेणे हा भाग येतो.
आता यात जर लोकांना आकर्षित करत येत नसेल तर मते मिळत नाही आणि जर व्यवस्थेची समज नसेल तर धोरणे ठरवता येत नाही किंवा मंत्री किंवा नोकरशाही जे सांगेल त्यावर अवलंबून राहावे लागते. आदर्श नेत्यात दोन्ही असणे सगळ्यात उत्तम. त्यातही व्यवस्थेची समज जास्त महत्वाची कारण मूळ काम ते आहे.
आत्तापर्यंत झालेले काही पंतप्रधान पहिले तर त्यांच्यात कमी जास्त प्रमाणात हे दोन्ही भाग दिसतात. मर्केल, नरसिंह राव किंवा डॉ. मनमोहन सिंग हे व्यवस्था समजण्यात सगळ्यात वर पण सामान्य लोकांना आकर्षित करण्यात कमकुवत होते. ट्रम्प, मोदी, इंदिरा गांधी हे लोकांना आकर्षित करण्यात अग्रेसर पण व्यवस्था समजण्यात कमकुवत. आणि पंडित नेहरू, ओबामा, रुझवेल्ट, चीनचा तंग श्यावफिंग, नेल्सन मंडेला वगैरे ही दोन्ही आघाडीवर उत्तम काम केलेल्यांपैकी काही नावे. जुने परिचयाचे उदाहरण म्हणून शिवाजी व संभाजी महाराज जितके कुशल सेनापती आणि नेते होते तितकेच चांगले किंबहुना जास्तच त्यांचे अर्थव्यवस्थेचं ज्ञान होते. कोकणातली बंदरे ताब्यात घेण्यासाठी व ठेवण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न पहिले तरी लक्षात येतात.
अर्थात वैयक्तिक पातळीवर दोन्ही बाजू भक्कम असणे गरजेचे आहे. अन्यथा कमकुवत बाजूसाठी तुम्हाला सहकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. मग ते मंत्री असतील किंवा त्या विषयातील तज्ज्ञ असतील. मनमोहन सिंगांचा घात त्यांच्यातल्या शालीनतेने केला. आणि मोदींचा घात त्यांचे अर्थव्यवस्थेविषयीचे आणि एकंदरीत व्यवस्थेबददल असणारे अज्ञान करत आहे.
यात मग भाग येतो व्यक्तिकेंद्रित व्यवस्था की टीम? तर टीम कधी पण चांगली. नेहरूंचे यश हे त्यांच्या एकट्याचे नसून त्यांच्या एकापेक्षा एक वरचढ उच्चशिक्षित आणि अनुभवी सहकाऱ्यांमध्ये होते. त्यामुळे एक असा पक्ष जिथे नेत्यांची फळी आहे. एक टीम म्हणून जे काम करू शकतात असे पक्ष हे कधीही जनतेच्या समोर एक पर्याय म्हणून योग्य आहेत.
नरेंद्र मोदी सुरुवातीला काही प्रमाणात तज्ञांवर अवलंबून होते पण मग ते रघुराम राजन, उर्जित पटेल किंवा अरविंद सुब्रमण्यम असतील हे बाजूला गेले किंवा केले गेले. त्यात कुठे तरी निवडणूक जिंकायचा गवसलेले तंत्र, संस्था कमकुवत करून होयबा तयार करणे आणि मग भल्या बुर्या मार्गाने निवडणूका जिंकणे किंवा पक्ष फोडणे या मार्गाने आलेला अहंकाराने आपल्याला जनतेची पर्वा करायची गरजच काय असा त्यांचा ग्रह झाला.
त्यामुळे पंतप्रधान पदी दोन्ही गुण असलेली व्यक्ती असणे सगळ्यात उत्तम पण नसेल तर व्यवस्था समजणारे पंतप्रधान असणे कधीही उत्तम. फक्त पॉप्युलर व्होट वाले नेहमी खड्ड्यात नेतात.
जाताजाता इतका सारासार विचार करणारी जनता कुठल्याही देशात फार कमी आहे भारतात अजून नगण्य आहे. अजून फार मजल मारावी लागेल.
डॉ मनमोहन सिंग यांना कितीही
डॉ मनमोहन सिंग यांना कितीही हिणवले तरी तो माणूस सच्चा होता या बदद्दल कोणाचे दुमत होणार नाही>>+ १००
त्यांच चरित्र Strictly personal वाचलं होतं. खूप मदत झाली त्यांना समजून घेण्यात.
त्यांना कोणीही हिणवत नाहीये.
त्यांना कोणीही हिणवत नाहीये. त्यांच्या विषयात ते हिमालय होते असेच म्हटलेले आहे.
चिडकू - प्रतिसांद आवडला ,
चिडकू - प्रतिसांद आवडला , छान प्रकारे मांडला आहे.
झारखंड मध्ये काँग्रेस सरकार
झारखंड मध्ये काँग्रेस सरकार विरोधात विद्यार्थी प्रोटेस्ट करत आहेत
कोणी फॉलो करत नाहीयेत का ते आंदोलन?
सोशल मिडियावर तर धुमाकूळ सुरुये
काँग्रेस ने अंगाशी येऊ घातलेले प्रकरण बऱ्याच सेन्सिबल पध्दतीने हाताळले आहे असे दिसत आहे
काँग्रेस नेते विद्यार्थ्यांना जाऊन भेटले, मागण्या ऐकल्या, सारं काही शांततेत सुरू आहे, जाताना विद्यार्थ्यांना पिण्यासाठी सोय देखील केली, नाश्त्यासाठी पाकिटे पोचवण्यात आली
11 जणांना अटक करण्यात आली असून JPSC च्या अध्यक्षना हटवून चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे
अर्थात या प्रकरणात स्थानिक काँग्रेस ने योग्य पध्दतीने प्रकरण हाताळले असले तरी या राहुल गांधी आणि अन्य देशातील नेत्यांचे मौन अनाकलनीय आहे
हीच संधी होती की आपण निःपक्षपाती असल्याचे दाखवण्याची ती रांगा ने दवडली, दुसरे त्याच्याकडून काही अपेक्षित ही नव्हते म्हणा
संधी होती की आपण निःपक्षपाती
संधी होती की आपण निःपक्षपाती असल्याचे दाखवण्याची ती रांगा ने दवडली, दुसरे त्याच्याकडून काही अपेक्षित ही नव्हते >>>
ह्याच्याशी असहमत आहे कारण राज्यातील काँग्रेस ची भूमिका ही राहुल गांधीच्या विरोधात तर नसणार.
आंदोलकांची मागणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची नसून CBI चौकशीची आहे. CBI किती निष्पक्ष आहे हे सगळ्यांना माहित आहेच.
कोणावर गुन्हा दाखल करायचा,
कोणावर गुन्हा दाखल करायचा, कुणावर नाही, कुठली कलमं लावायची, कुठली नाही हे पोलिसांचे आणि सरकारचे काम आहे ना? हे सुको कोण सांगणारे? आणि त्यांचा काय संबंध? केस आली तर सुनावणी करायची का? कोणी कशी इ. सुको बघत नाही का?
राज्यातील काँग्रेस ची भूमिका
राज्यातील काँग्रेस ची भूमिका ही राहुल गांधीच्या विरोधात तर नसणार.>>>
नसणार पण तेच म्हणतोय की त्याने ही संधी घालवली
पहिल्याच दिवशी जर तो जाऊन भेटला असता विद्यार्थ्यांना तर
सध्या बंधू तिर्की किंवा इतर स्थानिक काँग्रेस नेते जे करत आहेत, ते केवळ विद्यार्थ्यांचा रोष शांत करण्यासाठी चाललेले प्रयत्न आहेत.हे नेते विद्यार्थ्यांना केवळ असे आश्वासन देत आहेत की, "आम्ही तुमच्या मागण्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यापर्यंत पोहोचवू."
रागा ने ना सोशल मीडियावर ना कुठेही काहीही न बोलता पूर्णपणे मौन बाळगले आहे
ही मोठी चूक करून त्याने भाजपला टार्गेट करायला संधी दिली
त्याने भाजपला टार्गेट करायला
त्याने भाजपला टार्गेट करायला संधी दिली>> सहमत
झारखंड विद्यार्थ्यांच्या
झारखंड विद्यार्थ्यांच्या चौकशी व्यतिरिक्त या मागण्या आहेत असे वाचले:
Protesting students are also seeking sweeping reforms, such as awarding contracts for different stages of the examination to different firms—prelims to one firm, the final to another—to improve oversight and prevent the monopoly of a single company.
मला वाटते हे करायला हवे. आणखी योग्य त्या सुधारणासहित. तिथे आणि सगळीकडेच.
स्रोत.
झारखंड मधेही आता लाठीमार,
झारखंड मधेही आता लाठीमार, अश्रूधूर वगैरे झालाय. दिल्लीची स्क्रिप्टच आहे पण कलाकार विरूद्ध भूमिकेत, एक रागा सोडला तर. तो कन्सिस्टंट आहे. तेथे सरकार भाजपचे नाही, त्यामुळे त्यांंना आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राग आलाय व त्यांनी बंद पुकारलाय.
दिल्लीची स्क्रिप्टच आहे पण
दिल्लीची स्क्रिप्टच आहे पण कलाकार विरूद्ध भूमिकेत,>>>>
अतिशय चुकीचं वाक्य आहे.
स्क्रिप्ट ही दिल्लीची नाही. कारण मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी बातचीत आधीच केली आहे. काँग्रेस, NSUI आधीच विद्यार्थ्यांशी संपर्क साधून होते.
कलाकार विरुद्ध भूमिकेत नाहीत. काँग्रेस ने विद्यार्थ्यांना पाठिंबा जंतर मंतर च्या वेळेस दिला होता. रांचीतही विद्यार्थ्यांनाच पाठिंबा दिला आहे. CJP नेही विद्यार्थ्यांनाच पाठिंबा दिला आहे. YouTube, आणि social media पत्रकार जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांसोबत होते, आताही रांचीत ते विद्यार्थ्यांसोबतच आहेत.
पार्टी बदलणारे आहेत भाजप आणि गोदी मीडिया.
रांचीत लाठीमार झाला आहे पण दिल्लीत झाला तेवढा अत्याचार झालेला नाही.
लाठीमारही निषेधार्यच आहे.
अर्थात रांचीत काहीतरी अघटीत व्हावे यासाठी बऱ्याच लोकांनी देव पाण्यात ठेवले असतील उदाहरणार्थ अमित शाह आणि नरेंद्र मोदी.
https://www.instagram.com/reel/Db3EqP8Pk_8/?igsh=MXBub3FyYTRsaTgzMA==
https://www.instagram.com/reel/Db3K7NCJ69g/?igsh=NHVveWlpdWVmMGtz
https://www.aljazeera.com
https://www.aljazeera.com/video/newsfeed/2026/8/10/indian-police-attack-...
लाठीचार्ज, पाण्याचा मारा, अश्रूधूर होणार असेल तर आधी बोलले की नाही याने काही फरक पडत नाही. झामुमो चे कोणी मंत्री हे आंदोलन दुसरेच कोणी चालवत आहेत असे म्हणाले. इकडे सरकारात असलेले भाजपवाले दिल्लीत काय झाले याकडे दुर्लक्ष करून तिकडे बंद पुकारत आहेत.
रागा कन्सिस्टंट आहे ते वरती लिहीलेच आहे. काँग्रेस तेथे किती दबाव आणते पाहू.
बाकी फरक जो तुम्ही दाखवला आहे तो बरोबर आहे.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Db6AgOhPOxy/?igsh=MTMza3B5aWE3a3hyZQ==
लोकं आता जाब विचारू लागले आहेत आणि रस्ते दुरुस्त सुद्धा होऊ लागले आहेत.
असे बरेच व्हिडिओ सापडतील.
ग्रेट!
जेन झी ने क्रांती घडवली आहे ❤️
ग्रेट! आपण सगळे एकत्र येऊन
ग्रेट! आपण सगळे एकत्र येऊन प्रशांत दामलेंचं नाटक बघून सेलिब्रेशन करू.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbvPOA5A8mw/?igsh=bGliaHhsa2lpYmp6
अरे काय बिनधास्त आहेत या मुली
छेड काढणाऱ्याला सोडले कसे म्हणून पोलिसांना सर्वांसमोर जाब विचारत आहेत.
जोरदार टाळ्या !!
जेन झी आंदोलनाने काय केले??
तर हेच केले जे मी पिकनिक debate मध्ये सांगत होतो. लोकं निर्भीडपणे जाब विचारू लागली आहेत. आणि यात युवा पिढी पुढे आहे.
देश बदलू लागला आहे.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Db-MHYiPx6-/?igsh=MTdpaG4wZ2N3YThsZQ==
स्कूलबसचे भाडे अवाजवी वाढवले म्हणून शाळेच्या मुलींचा प्रोटेस्ट.. मध्यप्रदेश
अश्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद बघायला आणि त्याखालच्या कॉमेंट वाचायला सुद्धा मजा येते.
बेसिक हक्कांसाठी हा लढा आहे त्यामुळे सामान्य माणूस म्हणून सपोर्ट सुद्धा करावासा वाटतो.
बाकी राजकारण ज्याचे त्याला लखलाभ. हे त्याच्या पलीकडचे आहे.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Db8rOinCteM/?igsh=eDlhNW5yaWx0YXpx
परीक्षेचा पेपर लिहिताना पंखा नव्हता. उकाड्याने हैराण विद्यार्थीनी अखेर जाब विचारायला प्रिन्सिपॉलच्या केबिनमध्ये घुसल्या. देशात वेगळेच वारे वाहू लागले आहेत.
पॉईंट तो है !!!
पहिल्या वाक्याशी सहमत न होता देखील हेच म्हणेन...... पॉईंट तो है !!!

बरोबर
बरोबर
आपणही आवाज उठवू शकतो ही जाणीव लोकांना होऊ लागली आहे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे
झुरळ पार्टी नामशेष झाली तरीही त्यानी जी सुरुवात करून दिली आहे ती अशीच रहावी
आणि कुठलेही सरकार असले तरी
काँग्रेस सरकार काही वेगळं वागेल असं वाटलेलं
आणि झारखंड आंदोलन मध्ये सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना भेटून मागण्या समजून घेतल्या हे आश्वसक वाटले पण नंतर ते भाजप च्या मार्गानेच गेले
थोडक्यात सरकार कुठलेही असो दडपशाही करणारच हे गृहीत धरूनच आत पुढची आंदोलने केली जातील
The Supreme Court and Chief
The Supreme Court and Chief Justice of Surya Kant criticised the Bar Council of India's (BCI) action against the 2026 law graduate of NALSAR University of Law, Hyderabad. CJI Kant was quoted by PTI as saying on Friday, "It's a dialogue between students and me." He asked, "Who are they [BCI] to interfere?"
The Supreme Court sought a response from the BCI to a plea filed by NALSAR against two Circulars issued by the BCI yesterday that received major backlash.
A bench led by CJI Surya Kant said that if students want to protest lawfully, BCI had no business to interfere. The court has agreed to hear the plea.
अमित मालवीय यांना बीजेपी आय
अमित मालवीय यांना बीजेपी आय टी सेल च्या प्रमुख पदावरून हटवले....Credit Goes to CJP & GenZ.....Bravo!!!
https://x.com/amitmalviya/status/2089313851317834228?s=20
आपणही आवाज उठवू शकतो ही जाणीव
आपणही आवाज उठवू शकतो ही जाणीव लोकांना होऊ लागली आहे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे >> +१
हल्ली कोणी किंचितशी विरोधी सूर असणारी पोस्ट टाकली की अगदी सगळीकडे जो गोंधळ माजवला जात असे की त्यामुळे कोणी काही बोलूच धजावत नसे ते जरी बंद झालं तरी मोठी स्टेप असेल.
तुम्ही कित्तीही उक्सवलं तरी
तुम्ही कित्तीही उक्सवलं तरी मी शांतपणे आणि सभ्यपणे लिहिणार आणि लिहीत रहाणार>>> आशुचँप खरं सांगा हा सरांचा ईफेक्ट आहे ना?
आपणही आवाज उठवू शकतो ही जाणीव लोकांना होऊ लागली आहे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे>> अगदी. माझा अल्गॉरीदम तसा सेट झालाय की खरंच लोक बोलण्याची हिम्मत दाखवू लागलेत कोण जाणे!
ठाण्याच्या ब्रीज चा १ रील पाहिला त्यात २ जेन झी उभे राहून निसटणारे ब्रिज चे भाग कॅप्चर करून म्हणाले, मागे अमुक तमुक पूल ओसळून जिवीतहानी झाली, आम्ही आधीच सांगतोय, हे ठीक करण्याची तत्परता नाही दाखवली तर मंंत्र्याचा पत्ता काढणं काही आम्हाला मुश्किल नाही! जबरा धमकी.
Pages