Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सेन्सिबल आहात हा तुमचा दावा कळला. दाढी पांढरी झालेले रिक्षावाले रस्स्त्यात कुणालाही काका अशीच हाक मारतात.
कचकन वळताना ते दुसर्‍यांना शिव्या घालतात तेव्हां तेच एकटे सेन्सीबल असतात.
तुम्ही शांतपणे आणि सभ्यपणे लिहीणार असे खरे खुरे बोलताय... आनंद आहे.

माझा मुलगा अजून अठरा पूर्ण नाही. त्याला पण काका म्हणून हाक मारा. Lol

तुमची पोस्ट मला उद्देशून नव्हती हे वाचून पण आनंदच झाला. आता टोटल लागत नसली तरीही.
झोपा आता आणि मी ही झोपतो.

अगदी अगदी तुमच्या समस्त फॅमिली मेम्बर्स ना काका म्हणेन हो काका
काळजी नसावी झोपा आता फार ताण घेतलात आज

पळ माकडछाप. तू जी भाषा खरेंना वापरलीस ती मी वापरली असती तर माझा आयडी उडाला असता.
इथे एक नाही अनेक व्हिडीओ दिले. तू आत्ता जागा झाला आणि मला ड्डिवचल्यासारखा चॅलेंज केल्यासारखा बोलतोस.
तुला व्हिडीओ बघायचे नाहीत तर मांडीवर थोपटत अंगाई गायची का?

जेन झी याच आंदोलनात गेले. कोथरूड पोलिसांनी त्या मुलींना एव्हढं मारलं. का नाही गेले अन्यायाच्या विरोधात?
सोमनाथ सोमवंशीचा मर्डर झाला. का नाही गेले? तुझ्या आहेत का पोस्टास?

आम्हाला निरंजन टकलेंनी त्या वेळी मदत केली. बाकीचे कुठे गेले होते?
मला या भंपक आंदोलनात माझ्या मुलांना जाऊ द्यायचं नाही. जबरदस्ती आहे का?

कोणी केली जबरदस्ती? बळच म्हणजे
कोण म्हणले सांगा पाहू तुमच्या मुलाला या आंदोलनाला पाठवाच म्हणून

बर मी हेही म्हणलं की मी व्हिडिओ बघितले म्हणून तरी ते वाचायचे कष्ट घ्यायचे नाहीत

इतका ताण घेऊ नका, उगाच काहीतरी व्हायचं

झोपताय तर झोपा की शांतपणे

बोर करू नका

अण्णांच्या उपोषणाच्या वेळी मागे स्टेजवर संघाचे असते तसे भारतमातेचे पोस्टर लागलेले होते. माझ्या संघी मित्रांकडून हू इज अण्णाचे ईमेल यायला सुरूवात झाली होती. यात संघाचा सहभाग असल्याचा वास येऊ लागला होता. नंतर फोन येऊ लागले. जंगली महाराज रोडवर प्र्रोटेस्ट आहे. नाही गेलो. तर घरी आले. देशद्रोही म्हणाले. सरळ कानाखाली ठेवून दिली.

लहानपणीचा मित्र, त्यांच्या आंदोलनात गेलो नाही म्हणून देशद्रोही ठरवायला लागला आणखी काय पाहीजे. ही लोकं माणूस म्हणून जगायच्याच लायकीची नाहीत.

मूर्खा, माझ्या पोस्टनंतर तू काय रटाळ लावली होतीस?
त्याचा आणि मुग्धमानसीच्या पोस्टचा काय संबंध लागतो सांग. अपघात होतात म्हणून गाडी चालवू नये हे लॉजिक लावून आंदोलन प्रत्येक फसवं नसतं हे सांगायची काय गरज?

शक्य असेल तर राजू परूळेकर आणि अन्य लोकांचेच व्हिडीओज दिलेत. जमलं तर खोडून काढ.

नाहीतर अस्साच बरळत बस. माझ्या दृष्टीने हे लोकांचा असंतोष डायव्हर्ट करून या आंदोलनातून नेता म्हणून पुढे आलेल्या अभिजीत दीपकेला उत्तर प्रदेशात फिरवण्याची खेळी आहे. बाकी तू काहीही बोल. तुच काय अन्य कुणीही. माझे मत हेच आहे.

इथे कुणी कुणी येणं बंद केलं आहे ते बोलकं आहे.
बोल आता प्रति ऋत्विक रोशन.

मी आज एका पोलिसाने काठीचा दुष्प्रयोग केला असा आरोप झाला होता तेव्हा ऑप्टिकल illusion होऊ शकते असे लिहिले होते
मी काही भाजपेयी नाही किंवा त्याचा वकील नाही पण उगाच कशाला एखाद्याचा पोटावर पाय
पण त्यानेच काल कबुल केले (मीडिया रिपोर्ट असनुसार ) आणि सांगितले कि त्याला सादर व्यक्ती पुरुष कि स्त्री हे दिसले नाही जे पूर्ण चादर ओढण्य्सारखा प्रकार होता

बेक्कार माजलेत. विरोधक एकत्र येत नाहीत तोवर हेच चालणार. आणि विरोधक एकत्र येणं म्हणजे जवळजवळ अशक्य.

Submitted by सुनिती. on 27 July, 2026 - 11:04

सध्या विरोधक फक्त योग्य संधी मिळाली कि भाजपा सामील होण्यासाठी येतात

ह्या आंदोलनातून दिसून आलेली एक गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष मोदींवर ह्या आंदोलनात पहिल्यांदाच (अगदी खालच्या पातळीवरही) टीका झालेली पाहिली. खरेतर २०१४ च्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर करणारे, टेक savvy, तरुणांची भाषा बोलणारे वगैरे अशी मोदींची इमेज झाली होती. त्यानंतर सुद्धा सर्वसामान्य तरुणांमध्ये भाजप, आरएसएस वगैरे प्रतिगामी अशी प्रतिमा किंवा सरकारच्या कामगिरीबद्दल नाखुषी जाणवत असली तरी स्वतः मोदींबद्दल एकप्रकारचा आदर जाणवायचा. (Caravan , बरखा, सागरिका घोष, आरफा खानम वगैरेंची गोष्ट वेगळी . त्यांच्यासाठी तर मोदींचं मीठही नेहमीच अळणी होतं आणि आहे). पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितल्यावर त्यांना इतकं आटापिटा करून पाठीशी घातलेलं, आणि त्यासाठी आंदोलकांवर हिंसेचा वापर केलेला पाहून इंद्राय तक्षकाय स्वाहा अशी मोदींची स्थिती झाली.
गेल्या निवडणुकीत भाजपचं बहुमत काठावर गेलं, पुढच्या निवडणुकांमध्ये मोदी ७७ वर्षांचे असतील, मोदींची १५ वर्षांची incumbency हे एक ओझं असेल. त्यांचा करिष्माही ह्या आंदोलनानंतर पूर्वीसारखा राहिलेला नाही. भाजपने २०२८ मध्ये निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याच ७५ वर्ष वयाच्या नियमाला अपवाद जरी केला तरी मोदींच्या नावावर पुढची निवडणूक जिंकणं भाजपाला कठिण आहे.

2014 मधेच मोदी स्वतःला ह्या देशाचा तारणहार म्हणून प्रोजेक्ट करून निवडून आले. त्यानंतर फक्त घपला

१९४७ मे जो मिली वो आझादी नही थी, वो भीख थी.
और जो आझादी मिली है, वो २०१४ मे मिली है..

- कंगना राणावत

https://www.instagram.com/reel/DbY7_iTyWWP/?igsh=MXZ1MDl6c3c5cngybQ==

हिचा सुद्धा राजीनामा घ्या

मिडीया चॅनेल्स मधे मोदींवर टीका होत नसेल पण यूट्यूब व्हिडिओज मधे आणि सोशल मिडियामधे पहिल्यापासूनच होत आहे. रवीश कुमार, वरूण ग्रोव्हर, धृव राठी सारख्या लोकांचे बरेच शोज आहेत. फेसबुकवर सतत मोदीविरोधात लिहीणारे आहेत, इथेही अनेक धाग्यांवर आहेत - उलट मोदीविरोधक पोस्टीच जास्त आहेत. त्यामुळे यात नवीन काही नाही. फक्त या लोकांनी रस्त्यावर हे केल्याने सर्वत्र दिसले इतकेच.

बाय द वे, गेल्या काही दिवसांत यात शिव्या घालणारे लोक शोधून काढण्याचे काम होत असलेले दिसते. फेसबुक व इन्स्टावर बर्‍याच क्लिप्स दिसल्या. पण आज मोदींचीच एक क्लिप पाहिली ज्यात ते या मुलांना कसलाही त्रास देऊ नका सांगत आहेत. त्याची अंमलबजावणी कितपत होईल माहीत नाही.

एक झीरो एफआयआर दाखल झाल्याची बातमीही वाचली (झीरो म्हणजे तात्पुरता, जो नंतर गुन्हा ज्या कक्षेत येतो त्या दुसर्‍या पोलिस स्टेशनमधे ट्रान्स्फर केला जातो). पण या पोरांनी दिलेल्या शिव्या जरी प्रोफॅनिटी मधे येत असल्या तरी त्याने कोणत्या कायद्याचा भंग होत नसावा.

विश्वगुरूंनी व्हिडिओत त्यांना शिव्या दिल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे, विशेषतः मुली ने असं वागावं याबद्दल त्यांना जोरदार सांस्कृतिक धक्का वगैरे बसला आहे पण त्यांनी मोठ्या मनाने सगळ्यांना माफ करून टाकलं आहे

शिव्या वगैरे देऊ नयेत म्हणत आहेत पण याने खरी पंचाईत तर अंधभक्त आणि आयटी सेलची होणारे, आजवर इतक्या अभिनेत्री, महिलांना कॉमेंट्स मध्ये, इनबॉक्स मध्ये जी शिवराळ भाषा वापरली गेली त्याचं आता करावं असा प्रश्न त्यांच्या सांस्कृतिक मनाला पडला आहे Happy

आता जोवर नवे काही सनसनाटी घडत नाही तोवर हे असेच राहणार आणि त्याचीच भीती आहे, लक्ष डायव्हर्ट करायला हे कुठल्या थराला जातील यांचा नेम नाही

आज सकाळी सकाळी फिस्कन हसू आलं. आकाशवाणी बातम्या मधलं पहिलं वाक्य+
"भरकटलेल्या तरुणाईला मार्गावर आणण हे आपलं कर्तव्य आहे" इति पंतप्रधान!

>>>>>>>>भरकटलेल्या तरुणाईला मार्गावर आणण हे आपलं कर्तव्य आहे

पेपरफुटी करणारे भरकटलेले की वैफल्यातून, आत्महत्या करणारे विद्यार्थी भरकटलेले? की न्याय मागणारे विद्यार्थी भरकटलेले?
नक्की 'भरकटणे' शब्दाची व्याख्या काय? Sad
-----------------------------------------------
गिरे तो भी टांग उपर. पंप्रंनी मोठ्या मनाने चूक मान्य करुन आदर्श घालून द्यायला हवा होता.

तेच कि सामो
विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.. कुटुंबं उध्वस्थ झाली आहेत आणि ह्यांना शिव्यांचं पडलंय..

लक्ष डायव्हर्ट करायला हे कुठल्या थराला जातील यांचा नेम नाही>>>
True

पंप्रंनी मोठ्या मनाने चूक मान्य करुन आदर्श घालून द्यायला हवा होता.>>>

आजवर कुठल्या चुकांबद्दल बोललेत ते
नोटबंदी फसली हे कधी मान्य केलं?
कोरोना काळात कुंभमेळा घेणे चूक होतं हे कधी मान्य केलं?
देशात 100 स्मार्ट सिटी करण्याचा प्रोजेक्ट फसला कधी मान्य केलं?

ते फक्त नेहरूंनी कशा चुका केल्या हे सांगतात

>>>>>आजवर कुठल्या चुकांबद्दल बोललेत ते
खरं सांगायचं तर दॅट सीम्स लाईक अ फ्लिप साईड ऑफ लीडरशिप. अहंकार आणि माफी यांची सांगडच बसत नाही. एव्ह्रीवन कम्स अ‍ॅज अ होलसम पॅकेज. हे हवे तर ते सहन करा टाईप्स.
.
मी पंप्रंना पाठीशी घालत नाहीये. स्वभावाचे विश्लेष्ण करते आहे. अजुन एक ऊठसूठ माफी मागीतली तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबळ खच्ची होणारच होणार. त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा कसा? आल्या वार्‍याबरोबर पाठ फिरवणार तुम्ही. काय नेतृत्व करणार. त्यामुळे, पंप्र कधीच माफी मागणार नाहीत.
-----------------
मात्र कृतीमधुन त्यांनी हे दाखवुन द्यायला हवे. मुलांवर एफ आय आर वगैरे नको म्हणजे नको.

अजुन एक ऊठसूठ माफी मागीतली तर त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबळ खच्ची होणारच होणार>>>

उठसूट नाही, एकदा तरी हा माणूस म्हणाला असता की नोटबंदी चा उद्देश चांगला होता आमचा पण ते नीट राबवता आलं नाही, जनतेला जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिर आहे

तरी भरून पावले असते

पण नाहीच उलट आजूनहो नोटबंदी कसा मास्टरस्ट्रोक होता, ज्या लोकांनी तक्रार केली ते कसे काळा पैसे वाले होते, भ्रष्टाचारी होते असल्याच फुशारक्या मारणे सुरूच आहे

कधीही हे मान्य केलं नाही की कुंभमेळा नको होता घ्यायला पण नाहीच
उलट सगळी लपवाछपवी करण्यातच सगळे मग्न

माफी म्हणजे अगदी दिनवणे होऊन नकोय
प्रांजळपणे सांगितलं असतं की हो बाबा जसं वाटलेलं तसं झालं नाही
आपण पुढच्या वेळी व्यवस्थित राबवू

संवाद साधणे इतकेही चाललं असतं
मन की बात मध्ये जो काही टाईमपास चालतो त्यापेक्षा हे असं अपेक्षित आहे

मनमोहन सिंग यांनी १९८४ साठी माफी मागितली होती.
नोटाबंदी : अरेरे ! तुम्ही 'धुरंधर' पाहिला नाहिये वाटतं !

>>>>>मनमोहन सिंग यांनी १९८४ साठी माफी मागितली होती.
ओह ओके. मनमोहनसिंग लीडर वाटले का? त्यांच्या विषयात ते हिमालय होते परंतु नेतृत्व हा त्यांचा बालेकिल्ला कधीच नव्हता.

मनमोहनसिंग लीडर वाटले का?

>>>>
या मातेला माझा साष्टांग दंडवत. इतके सत्य बरेच दिवस झाले ऐकले नव्हते.

>>मुलांवर एफ आय आर वगैरे नको म्हणजे नको.<<
माझ्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे - १८ वर्षां खालील मुलांवर आणि १८ वर्षां वरील ज्या मुलांचा प्रायर क्रिमिनल रेकर्ड नाहि त्यांच्यावर एफआयआर दाखल करायचा नाहि. मात्र, जे हिस्टरी-शीटर आहेत, प्रोटेस्टच्या नांवाखाली वँडलिझम करताना पकडले गेले आहेत, त्यांच्यावर कारवाई जरुर केली जावी..

आता, यात सुको किंवा सरकार सूडबुद्धीने कसं वागतंय हे कोणितरी समजावुन सांगा...

सुकोचा आदेश रिझनेबल आहे. त्यात नड्डांशी झालेल्या चर्चेनंतर कॉक्रोच पार्टीतील काही लोक हे प्रत्यक्षात होते का याची शहानिशा करू शकतात. तशी मागणी त्यांनी केली पाहिजे.

ठिकठिकाणी स्थानिक पब्लिक यांना शोधून काढून माफी वगैरे मागायला लावत आहेत. अशा अनेक मुलांच्या "बिफोर" आणि "आफ्टर" अशा क्लिप्स पाहिल्या. हे सुद्धा कालच्या मोदींच्या रीलनंतर थांबते का पाहू. यातली बरीचशी मुले लहान आहेत. आपापल्या क्लोज ग्रूप्समधे ते जसे बोलतात तसेच ते त्या दिवशी बोलत होते. अशा जाहीर वागण्याच्या परिणामांची त्यांना कल्पना नसेल. बर्‍याचदा इतरांच्या वागण्याने अनेकांना चेव चढतो व एरव्ही ते बडबडणार नाहीत असेही काही बोलून जातात. त्यांच्या क्लिप्स पब्लिक झाल्याने त्यावर ऑलरेडी प्रतिक्रिया येत आहेत. त्यापेक्षा जास्त काही करण्याची गरज नाही.

Pages