Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेक्कार माजलेत. विरोधक एकत्र
बेक्कार माजलेत. विरोधक एकत्र येत नाहीत तोवर हेच चालणार. आणि विरोधक एकत्र येणं म्हणजे जवळजवळ अशक्य.
हा एकच काळा वाटाणा नाही त्या
हा एकच काळा वाटाणा नाही त्या संस्थेत. तेथील आजी माजी सगळेच एका माळेचे मणी आहेत.
ते खरे आणि बेफिकिर कुठे
ते खरे आणि बेफिकिर कुठे गेलेत ?? अजुन कड घ्या भाजपाची
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=YA9XghcQ8Uw
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbM6Pr-RwGh/?igsh=d2lqMnN3Nmh5OGJ5
आणखी एक
तो मॉर्फ्ड व्हिडिओ असावा.
तो मॉर्फ्ड व्हिडिओ असावा.
त्या केरळच्या नेत्याने कसले
त्या केरळच्या नेत्याने कसले वाह्यात स्टेटमेंट दिले आहेत.
आशा करतो कडक ऍक्शन होईल
आता या धाग्याचा उपयोग कडव्या
आता या धाग्याचा उपयोग कडव्या सनातन्यांच्या पोस्टना आपापल्या ग्रुपात कशी उत्तरे दिली, त्यावरुन इतरांना कल्पना येऊन प्रत्येक जण आपापला टेलरमेड संदेश देऊ शकेल अशा साठी करायचा का?
हल्ली मुलांची भाषा आणि शिव्या इ. + मोदी हरले का? आमची बॅटिंग बाकी आहे वगैरे तोरसेकरांचा नवा व्हिडिओ आलाय..
त्यावर मी हा प्रतिसाद पाठवलाय
This seems गाजराची पुंगी. मोदी भक्तांना चुचकारण्यासाठी, आत्ताच एकदम चिडून विरोधी बनू नका म्हणून गाजर दाखवलेले आहे. मास्टरस्ट्रोक पुढे येणार आहे. 15 ऑगस्टला अर्थात काहीतरी पंतप्रधान बोलतीलच, नेहेमीच बोलतात, तर तोवर धीर धरा. तेव्हा जे बोलतील तो मास्टरस्ट्रोक!
तुकारामांचा अभंग आठवला..
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥
अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥2॥
तुका म्हणे xड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥३॥
केरळमधील भाजपच्या विचारवंत
केरळमधील भाजपच्या विचारवंत सेलचे माजी प्रमुख आणि आरएसएस (RSS) समर्थक टी. जी. मोहनदास (TG Mohandas) ने दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
मोहनदासने त्यांच्या 'पत्रिका' या यूट्यूब वाहिनीवरील व्हिडिओमध्ये म्हटले की, जर परिस्थिती त्यांच्या नियंत्रणात असती, तर त्यांनी जंतरमंतरच्या ४ चौरस किलोमीटर परिसरात कर्फ्यू लागू केला असता. जमावाला पांगवण्यासाठी तीन वेळा सूचना दिल्यानंतर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले असते, ज्यामुळे चार तासांत परिस्थिती शांत झाली असती आणि मृतदेह गोळा करून रुग्णालयात पाठवले असते.
इतकेच नाही तर
. "डाव्या विचारसरणीच्या, सेक्युलर आणि लोकशाहीवादी महिलांना बलात्कार आवडतो, त्यामुळे सामूहिक बलात्कार झाले तरी कोणतीही तक्रार येणार नाही,"
हे बोलला आहे
कुठं गेला तो खरे, याचा निषेध कर आता
काय नीच माणुस आहे!https://www
काय नीच माणुस आहे!
https://www.thehindu.com/news/national/kerala/kerala-rss-ideologue-tg-mo...
(No subject)
भयंकर माजलेत, भा वाले भो च्या
भयंकर माजलेत, भा वाले भो च्या पातळीवर उतरलेत. ह्यंना वाटतय की ह्यांच्या पापाचा घडा कधी भरणारच नाहीये. करा पापं
काय नीच माणुस आहे!>>>
काय नीच माणुस आहे!>>>
हाच एकटा नाही, त्या ऑर्गनायझेशन मधले आजी आणि माजी सगळेच असेच आहेत
Kangana's 'Generation Gutter'
Kangana's 'Generation Gutter' Slur On Gen Z Sparks Row
कंगनाला न्यूटन आठवला.
https://www.rediff.com/news/report/kanganas-generation-gutter-slur-on-ge...
गटारी गॅस ही गॅस!
Ewww, who is birthing these Gen Z protesters: Kangana
आता बातम्यातून E20 Janta
आता बातम्यातून E20 Janta Party विषयी येत आहे. यावर वेगळा धागा काढ ऋन्मेषा.
पुढे येऊ घातलेल्या पार्टी
पुढे येऊ घातलेल्या पार्टी कुठल्या असतील ?
E20 Janta Party
Uniform Population Code Demanding Janata Party
Reservation Hatao Janata Party
Roads Improvement Janata Party
Save Trees Janata Party
Clean Air/Water Janata Party...
ह्यातील काही पार्टीचे सुतोवाच फेसबुकवर पाहिले आहे
Reservation Hatao Janata
Reservation Hatao Janata Party>>>>
ह्याला बळी पडू नका
https://www.instagram.com/reel/DbTQqxCz8O5/?igsh=anE2Z3E0cWo4dWxu
दगडांनी भरलेला ट्रक हा चार
दगडांनी भरलेला ट्रक हा चार दिवसापूर्वी एक्सिडेंट मध्ये पकडला गेला होता म्हणून पोलीस कस्टडी मध्ये होता. प्रश्न हा आहे की पोलिस कस्टडीतून तो जनता मंतर वर कुणाच्या आदेशामुळे आला. खाली व्हिडिओ अधिक माहिती साठी
https://www.instagram.com/reel/DbVuSWIJryu/?igsh=MWN4NnBzbjNyYWpjNQ==
हास्यकवी सुरेंद्र शर्माhttps:
हास्यकवी सुरेंद्र शर्मा
https://www.youtube.com/watch?v=GLA84LtVJ3s
कंगना माजली आहे, ज्यांच्या
कंगना माजली आहे, ज्यांच्या जिवा वर निवडून आली त्यांनाच बोल लावते आहे.
मागे शेतकर्यांविषयी बोलली होती तेंव्हा च मनातून उतरली होती.
https://youtu.be/O8BBzF3mdA0
https://youtu.be/O8BBzF3mdA0?si=wvwbVcA4ldNsStsN
जेनझी नंतर आता जेन अल्फा रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांवर आंदोलन करत आहेत .
वर्गात चालू पंखे , स्वच्छ स्वच्छतागृह आणि पिण्यायोग्य पाणी अशा मागण्यांसाठी ह्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अर्थात त्यांना अपेक्षेप्रमाणे धमक्या जसे परिक्षेत नापास केले जाईल किंवा मुलींना मारण्याच्या , त्यांच्यावर थुंकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. अखेर जेन अल्फा समोर झुकुन व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या.
जेन अल्फा १६ वर्षाखालील असल्याने अद्याप पोस्कोला घाबरून आंदोलन चिरडण्यासाठी तशा प्रकारचे उपाय कुणी सुचविले नाही हे नशिब .
यापुढच्या पिढ्या आता काही
यापुढच्या पिढ्या आता काही कुणाचं ऐकत नसतात. आणि ऐकावं तरी का? एवढं काय भारी काम करून ठेवलंय आपण त्यांच्यासाठी? ना शुद्ध हवामान देउ शकलो ना स्वच्छ समाज. आपण नगण्य फिया भरून सरकारी शाळांत उत्तम दर्जाचं शिक्षण घेतलं. तेही मातृभाषेत. या पिढीला भरमसाठ फिया भरून खाजगी शाळांत यंत्रांसारखं उरबडवं शिक्षण घ्यावं लागतंय. वरून आपल्या पिढिच्या टोलेजंग अपेक्षांना पुरं पडण्याचं प्रेशर घ्यावं लागतंय. आपण निवांत तणावहीन बालपण उपभोगलं. यांच्या लहानपणात ताण-तणाव आपणच घुसवले. त्यांनी नव्हतं सांगितलं की मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला. तो निर्णय आपला होता. आपण त्यांना त्यांच्या उपजत भाषेपासून तोडलं.
स्पर्धापरिक्षा द्या. त्यासाठी मर मर अभ्यास करून पुन्हा अपेक्षित गुण नाही मिळाले किंवा भलतेच घोटाळे होऊन परिक्षाच रद्द झाल्या तर एकतर मरून जा किंवा पुन्हा पहिल्यापासून मरमर सुरू करा. आणि एवढं करूनही व्यवस्थित नोकरी मिळेल आणि ती टिकेल, सन्मानाचं जीवन मिळेल, सुरक्षा मिळेल याची काही खात्री नाही.
अश्या सगळ्या वातावरणात तारुण्याच्या उपजत जोशात ही पोरं जरा मजा-मस्ती करू लागली तर पुन्हा आपल्याच पिढीच्या पोटात दुखतं. का? करू देत की मस्ती, दंगा. काहीच वर्षांत ही सुद्धा अडकतील व्यवहार चक्रात. तोवर आयुष्य उपभोगू देत की.
आपल्याच पिढीनं मतदान करताना करून ठेवलेली घाण साफ करत बसण्याची वेळ आलीय पुढच्या पिढीवर. आपल्या आधीच्या पिढीनं स्वातंत्र्ययुद्धात कदाचित सहभाग दिला असेल. कदाचित समर्थन दिलं असेल. आपल्या पिढीनं अक्षरशः: का-ही-ही केलं नाही. मोर्चा नेला नाही आणि संपही केला नाही. ही मुलं काहितरी करताहेत तर करू द्यात की त्यांच्या त्यांच्या मार्गानं... कुठं वाजवताय तुमच्या संस्कारांचं तुणतुणं?
चाळीशीपुढच्या सगळ्यांनी खाली बसून घ्यायची वेळ आलीय आता. निव्वळ वयानं मोठे म्हणून मानपान देणारी, करणारी पिढी आपल्यासोबतच संपणार आहे आता. यापुढे मान-सन्मान कमवावा लागेल. सगळ्याच पिढ्यांना.
मानसी , खुप सुंदर पोस्ट ..
मानसी , खुप सुंदर पोस्ट ..
खुप खुप छान पोस्ट, मुग्धमानसी
खुप खुप छान पोस्ट, मुग्धमानसी .
मुग्धमानसी छान पोस्ट.! आणि
मुग्धमानसी छान पोस्ट.! आणि चांगला मुद्दा
बऱ्याच गोष्टी पटल्या नाहीत.
बऱ्याच गोष्टी पटल्या नाहीत. पण असो. प्रत्येकाचे मत आपल्या जागी.
मुग्धमानसी मस्त पोस्ट
मुग्धमानसी मस्त पोस्ट
पटली अगदीच
पण आपल्या पिढीने जितकं ऍडजस्ट केलं आहे तेवढं कोणी केलं नसेल
आपल्या पिढीने आधीच्या पिढीचा कायम आदर केलाय पटलं नाही तरी हो म्हणून त्यांना कधी दुखावलं नाही
कित्येकदा मन मारून वडिलांच्या इच्छेखातर दुसरे काही क्षेत्र वगैरे करणारी आपलीच पिढी
आणि आपलीच पिढी आहे जिने पूर्वापारपासून चालत आलेली प्रथा मोडली, की आम्हाला त्रास झाला तर तुम्ही सोसला तर काय होतं असे म्हणत सासुरवास सुरू ठेवणारी
आपलीच ही पिढी आहे जिने जेनझी ला स्वातंत्र्य दिल, मोकळीक दिली, मी म्हणतो तेच बरोबर असे डोक्यात मारून स्वीकारालायला भाग पाडले नाही
आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला सोसायला लागू नये म्हणून आपल्यापैकी कितीतरी सजग पालक झाले, मुलांची मानसिकता समजून घेऊ लागले, त्याला फॅड म्हणून आधीच्या पिढीने नाके मुरडली पण आपण मुलांना प्रश्न विचारायला कधी मनाई केली नाही
जेनझी च्या या बिनधास्त मोकळ्या मानसिकतेमध्ये आपल्या पिढीचाही वाटा आहे खात्रीने
हे त्यांनी लक्षात घेतलं नाही घेतलं तरी हरकत नाही आता आपण पालकत्व चांगल्या पद्धतीने पार पाडलं का नाही हे आगामी काळच ठरवेल
पण सध्याच्या एकंदरीत घटनाक्रमांनी हे सिद्ध केलं की जितकं वाटतं तितकी ही पिढी उद्धट बेजबाबदार आणि बेपर्वा नाहीये
त्यांना जाण आहे, विचार आहेत, भान आहे आणि सजगता आहे
सो आपण स्वतःला एक छोटीशी शाबासकी द्यायला हरकत नाही
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/DbWA_N9AR1l/?igsh=MXN5NjBzbDNvYTRnbQ==
रच्याकने जेनझी पाठोपाठ आता जेन अल्फा पण जागृत होते आहे
गलकी शाळा, निकृष्ट मिड डे मिल आणि अन्य मागण्यासाठी या पोरांनी फत्तेपुर मध्ये निदर्शने करून शाळा दणाणून सोडली
आता यांना कोण बरे फंडिंग करत असेल
माझे वडील खूप तापट होते. ते
माझे वडील खूप तापट होते. ते काळाचं प्रॉडक्ट होते. पण त्यांनी ज्या परिस्थितीतून आम्हाला इथवर आणलं त्याची कल्पना कुणीच करू शकणार नाही. शिक्षणासाठी एक जोडी कपड्यात पुण्यात येणं, कामं करून शिक्षण घेणं आणि नंतर छोट्या मोठ्या नोकर्या करत पैसे जमवून बडोद्याला पुढच्या शिक्षणासाठी रवाना होणं, जो कोर्स दुर्मिळ होता. अशा काबाडकष्टातून आम्हाला छोट्या छोट्या चाळीतून सेटल केलं. खाण्याची आबाळ होऊ दिली नाही. त्यांचे दिवस आम्हाला पहावे लागू नयेत म्हणून सतत ओरडणे, सकाळी उठून व्यायाम करायला लावणे, अभ्यासाला बसवणे, अभ्यास घेणे हे काही सत्ता गाजवणं नक्कीच नसतं. कुठलेच आईबाप मुलांना त्रास व्हावा म्हणून ओरडत नसतील.
त्यांच्या काळात मुलांच्या संगोपनाचे कोर्सेसच नव्हते. त्यांना जसं समजलं तसं त्यांनी वाढवलं. पण अजिबात दु:खं नाही. आई नेहमी सोबत राहते. बाप त्या त्या परिस्थितीतून गेल्यावर समजत जातो. बाप पूर्ण कळायला तो या जगात नसावा लागतो. आपल्यापेक्षा मुलांनी चांगलं आयुष्य जगावं हे काही अपेक्षांचं ओझं नाही. हे नकाराथी शब्द रूजवले गेलेले आहेत.
तो काळही असा होता कि काबाडकष्ट केल्यानंतर तुम्हाला दोन वेळची भाकरी मिळत होती. जेव्हढं मिळतंय त्यात भागत होतं. कार, आलिशान घर अशी स्वप्प्नं असली तरी जे छत मिळाल त्यात समाधान मानता येत होतं. गरजा माफक होत्या. देशाची परिस्थिती तशीच होती. बाप जसं घर चालवत होता तसंच सरकारही देश चालवतंय ही कल्पना जनतेला होती. त्यामुळं अशी आंदोलनं करण्याची गरज नव्हती. न्यायासाठी आंदोलनं होत होती. न्याय्य मागण्यासांठी संप, बंद होतच होते. त्यांना नावंं ठेवणारे काही लोक जेपींच्या आंदोलनाचे कौतुक करायचे.
जेपींच्या वेळी इंदिरा गांधी उन्मत्त झाल्या होत्या. तेव्हां झालंच आंदोलन. याच आंदोलनातून आर एस एस ला फूटेज मिळालं. सत्ता मिळाली आणि संघ विस्तारू लागला. असो. भरकटलं हे.
आता जी परिस्थिती आहे त्याला तमाम पालक जबाबदार आहेत असं मला वाटत नाही. ज्यांनी अण्णा आंदोलनाला सपोर्ट केला, उड्या मारल्या त्यांनी देशाची माफी मागावी. त्यांच्यामुळे हे सरकार आलंय. शिक्षणक्षेत्रात जी खासगीकरणाची लाट आली ती आधीच काँग्रेस काळात आली. पण आता कडेलोट झाला आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता नाही असे पालक असतील तर माहिती नाही. ज्यांच्या पाहण्यात आहेत त्यांनी माहिती द्यावी.
बातम्या येतात. मित्रांनी फोन करून बोलवलं, घरी येऊन घेऊन गेले. दुसर्या दिवशी कात्रजच्या घाटात किंवा अशाच ठिकाणी मुलाचा मृतदेह सापडला. या बातम्यांनी घाबरणार नाही असा पालक नाही. त्या काळजीपोटी तुझे मित्र कोण कोण आहेत हे सांग म्हणणे म्हणजे स्वातंत्र्य हिरावून घेणे असेल तर असल्या व्याख्या समजत नाहीत. हीच भीती अशा आंदोलनाबाबत आहे. आपल्या मुलाचा वापर होऊ नये ही भीती आहे. अंकल्स म्हणून हिणवून मुलांचे सुरक्षा कवच हिरावून घेतलं जातंय का? हा प्रश्न पडतो.
भीती वाटणे स्वाभाविक आहे पण
भीती वाटणे स्वाभाविक आहे पण प्रत्येक आंदोलन त्याच चष्म्यातून पाहिले तर कसे होईल
रस्त्यावर अपघात होतात किंवा झालाय
माझाच झालाय, सायकलवरून जाताना बेदरकारपणे कार वाला उडवून गेला
कित्येक महिने बेड रिडन होतो
आता मग मी माझ्या मुलाला सायकलवरून जाण्याची परवानगी द्यावी का नाही, कारण बेदरकारपणे वाहन चालवणारे आजही आहे वाढतच चाललेत
मग आता अशा वेळी मुलाच्या प्रोटेक्शन साठी त्याला घरी बसवावे का जे होईल ते होईल म्हणत जाऊ द्यावं, काय योग्य राहील?
Pages