फुटबॉल हा फक्त एक खेळ नाही; तो जगभरातील कोट्यवधी लोकांच्या भावना, स्वप्ने आणि अभिमानाशी जोडलेला आहे. आणि जेव्हा फिफा विश्वचषकाची वेळ येते, तेव्हा संपूर्ण जग एका उत्सवात सामील होते. 2026 चा FIFA World Cup हा इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात रोमांचक विश्वचषक ठरणार आहे.
पहिल्यांदाच विश्वचषकाचे आयोजन तीन देशांमध्ये – अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको – करण्यात आले आहे. याशिवाय, प्रथमच 48 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे अधिक सामने, अधिक स्पर्धा आणि अधिक नाट्य अनुभवायला मिळणार आहे.
नवीन फॉरमॅट – अधिक संघ, अधिक संधी
यापूर्वी विश्वचषकात 32 संघ सहभागी होत होते. आता 48 संघांना 12 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांसोबत काही सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचे संघही बाद फेरीत प्रवेश करतील.
या बदलामुळे आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक देशांना पहिल्यांदाच विश्वचषकात चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठे धक्के बसण्याची शक्यता अधिक आहे.
⸻
जर्मनी – पुनरागमनासाठी तयार असलेला फुटबॉलचा महाकाय संघ
मी स्वतः जर्मनीचा समर्थक असल्यामुळे माझे विशेष लक्ष या संघाकडे आहे.
जर्मनी हा विश्व फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्यांच्या खेळात शिस्त, रणनीती, मानसिक ताकद आणि संघभावना यांचा अनोखा संगम दिसतो.
मात्र 2018 आणि 2022 या दोन विश्वचषकांमध्ये जर्मनी अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. दोन सलग स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता.
परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते.
जुलियन नागेल्समन यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्कृष्ट मिलाफ आहे.
जर्मनीचे प्रमुख खेळाडू
• जामाल मुसियाला
• फ्लोरियन व्हिर्ट्झ
• जोशुआ किम्मिच
• काई हॅव्हर्ट्झ
• अँटोनियो रुडिगर
• लेरॉय साने
विशेषतः मुसियाला आणि व्हिर्ट्झ ही जोडी सध्या जगातील सर्वात रोमांचक युवा खेळाडूंमध्ये गणली जाते.
जर्मनीचा खेळ वेगवान, आक्रमक आणि अत्यंत संघटित आहे. जर बचावफळीने सातत्य राखले आणि आक्रमण विभागाने संधींचे गोलमध्ये रूपांतर केले तर हा संघ पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची क्षमता ठेवतो.
⸻
फ्रान्स – सर्वात धोकादायक दावेदार
जर एखादा संघ कागदावर सर्वात मजबूत दिसत असेल तर तो फ्रान्स आहे.
2018 चा विश्वविजेता आणि 2022 चा उपविजेता असलेल्या फ्रान्सकडे जगातील सर्वोत्तम प्रतिभांचा खजिना आहे.
प्रमुख खेळाडू
• किलियन एमबाप्पे
• औरेलियन त्चौमेनी
• एडुआर्डो कामाविंगा
• मायकेल ओलिसे
• विल्यम सालीबा
फ्रान्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची बेंच स्ट्रेंथ. त्यांच्या राखीव खेळाडूंनाही अनेक देशांच्या मुख्य संघात स्थान मिळू शकते.
जर एमबाप्पेने आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर फ्रान्सला थांबवणे अत्यंत कठीण ठरेल.
⸻
अर्जेंटिना – विश्वविजेत्यांचा वारसा
2022 मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जग जिंकले.
आता मेस्सीचे युग संपत असताना नव्या पिढीवर जबाबदारी आली आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्युलियन अल्वारेझ
• लॉटारो मार्टिनेझ
• एन्झो फर्नांडिस
• अलेक्सिस मॅक अॅलिस्टर
अर्जेंटिनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा लढाऊ स्वभाव. कोणताही सामना संपेपर्यंत ते हार मानत नाहीत.
विश्वविजेतेपदाचा अनुभव असल्यामुळे हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो.
⸻
ब्राझील – सहाव्या तार्याचा शोध
फुटबॉल म्हटले की ब्राझील आठवतो.
पाच वेळा विश्वविजेते ठरलेला हा संघ नेहमीच आकर्षक आणि आक्रमक फुटबॉलसाठी प्रसिद्ध राहिला आहे.
प्रमुख खेळाडू
• विनिसियस ज्युनियर
• रोड्रिगो
• राफिन्हा
• ब्रुनो गुइमाराएस
ब्राझीलकडे वैयक्तिक कौशल्याची कमतरता नाही. मात्र मोठ्या सामन्यांमध्ये सातत्य राखणे हे त्यांचे मुख्य आव्हान राहिले आहे.
⸻
इंग्लंड – यावेळी स्वप्न पूर्ण होणार?
इंग्लंडकडे कदाचित जगातील सर्वात संतुलित संघ आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्यूड बेलिंगहॅम
• हॅरी केन
• बुकायो साका
• डेक्लन राईस
गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये इंग्लंड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र निर्णायक क्षणी त्यांना अपयश आले आहे.
2026 मध्ये ते विश्वविजेतेपदासाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
⸻
स्पेन – नव्या सुवर्णपिढीचा उदय
स्पेन पुन्हा एकदा जगाला आपल्या फुटबॉलने प्रभावित करत आहे.
प्रमुख खेळाडू
• लॅमिन यामाल
• पेड्री
• गावी
• निको विल्यम्स
तरुणाई, वेग आणि उत्कृष्ट पासिंग गेम यामुळे स्पेन कोणत्याही संघाला हरवू शकतो.
⸻
कोणता संघ देऊ शकतो मोठा धक्का?
प्रत्येक विश्वचषकात एखादा संघ सर्वांना आश्चर्यचकित करतो.
2026 मध्ये खालील संघांकडे लक्ष ठेवावे:
• पोर्तुगाल
• मोरोक्को
• नेदरलँड्स
• क्रोएशिया
• उरुग्वे
यापैकी कोणताही संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकतो.
जर्मनीची धडाकेबाज सुरवात.
जर्मनीची धडाकेबाज सुरवात. २००२ च्या वर्ल्ड कपची आठवण आली. तेव्हा ते क्लोसचे हेडर आणि सौदी विरुद्ध ८-० असा विजय.
अरे वाह थोडक्यात छान ओळख.
अरे वाह थोडक्यात छान ओळख.
मी फुटबॉल बघणे केव्हाच सोडले असल्याने माझा इथे पास. पण इतर ग्रूपवर चर्चा चालू असते. ज्यात काही कळत नाही. पण या माहितीमुळे कोण किती फेवरेट आहे हे तरी समजले.
माझ्यासोबत असा एक किस्सा घडला
माझ्यासोबत एक किस्सा घडला होता. मी विमानाने ब्राझीलला जात होतो तेव्हा एक गुजराती फॅमिली टारमॅक वर क्रिकेट खेळत होती. मला राग आला मी मोबाईलमध्ये वाका वाका गाणं लावलं. ते गाणं ऐकून माझे बाहू स्फुरण पावले आणि माझ्या मनगटावरची फूटबॉलची माळ तुटली. तिथे बाजूलाच एकजण फूटबॉल घेऊन गावी जात होता तो फूटबॉल मी उचलला आणि त्यांच्या अंगावर जो काय धाऊन गेलो की ज्याचे नाव ते. माझा तो रुद्र अवतार बघून गुजराती लोकांची बोबडी वळाली आणि त्यांनी कसलाही विचार न करता बॅटबॉल खाली फेकले. माझा तो अवतार बघून जे हेडफोन लावून कप ओफ लाइफ गाणी ऐकत होते त्यांनी पण त्यांचे हेडफोन काढून ब्यागेत भरले आणि फूट बॉल खेळायला लागले.
• ज्यूड बेलिंगहॅम
• ज्यूड बेलिंगहॅम
• हॅरी केन
• फिल फोडेन>>> फिल फोडेनची इंग्लंडच्या विश्वचषक चमू मधेच निवड झाली नाही आहे...
प्रमुख खेळाडू
• विनिसियस ज्युनियर
• रोड्रिगो
• राफिन्हा
• ब्रुनो गुइमाराएस >>>>ब्राझील च्या प्रमुख खेळाडूंमध्ये नेयमार चं नाव नाही? अहो आश्चर्यम
हर्पेन तुमचा प्रतिसाद इतका
हर्पेन तुमचा प्रतिसाद इतका आवडलाय ना. मस्तच किस्सा आहे. अगदी या धाग्यावरती योग्य. इतरांनीही असे मजेशीर किस्से टाकावेत. खेळीमेळीचा किस्सा मला आठवला तर टाकते.
Harpen चा मोबाईल हॅक झालाय ..
Harpen चा मोबाईल हॅक झालाय की काय ?????....
>>>>>Harpen चा मोबाईल हॅक
>>>>>Harpen चा मोबाईल हॅक झालाय .....
शक्य आहे. किंवा भूताने पछाडलाय मोबाइल
मला बोकलतनीच पछाडलं असावं
मला बोकलतनीच पछाडलं असावं
त्याशिवाय का असे प्रतिसाद येताहेत.
*अरे वाह थोडक्यात छान ओळख.* -
*अरे वाह थोडक्यात छान ओळख.* - 100% सहमत! धन्यवाद, बोकलत.
*ब्राझील च्या प्रमुख खेळाडूंमध्ये नेयमार चं नाव नाही? अहो आश्चर्यम * - नेयमार हा गेले दोन वर्ल्डकप फक्त ' जखमी ' म्हणूनच उल्लेखला जातो आहे, असं मला आठवतं. आत्ताही तो सुरवातीलाच injured list मध्ये दाखल झाला आहे असं म्हटलं जातंय ! He is probably a gone force now for Brazil .
अग, मॅच बघताना ओरडलो असेन मी, ' स्वीडन ', ' स्वीडन ' ! रात्री ' स्वीटहार्ट ', ' स्वीटहार्ट ' ओरडायचं वय आहे का आता माझं !!!
फार्सजी बरोबर आहे तुमचं फिल
फार्सजी बरोबर आहे तुमचं फिल फोडेन नाही बरोबर आहे. मी आपला फ्लो मध्ये लिहीत गेलो.
नेमार दुखापतग्रस्त आहे. हा वर्ल्ड कप कितपत खेळेल शंका आहे.
जाऊ दे हा धागा आपण आता भरकटवू
जाऊ दे हा धागा आपण आता भरकटवू नकोया. फुटबॉलचा महासंग्राम सुरू झालाय त्यावर चर्चा करू.
बाकी काल जर्मनी ७-१ ने जिंकणं
बाकी काल जर्मनी ७-१ ने जिंकणं आणि आज नेमारचा उल्लेख या धाग्यावर होणं हा योगायोग असू शकत नाही.
एकदा आम्ही फुटबॉल खेळत होतो.
एकदा आम्ही फुटबॉल खेळत होतो. आम्ही सगळेच बॉलच्या मागे पळत होतो. एक तेजस्वी मनुष्य आमचा खेळ बघत होता. त्याने आम्हाला इशारा केला म्हणून आम्ही थांबलो.
तो माणूस जवळ आला आणि त्याने पिशवीतून 22 फूटबॉल काढून आम्हाला प्रत्येकी एक एक बॉल दिला.
मग हसून म्हणाला "बाळांनो, भांडू नका"
आम्ही आश्चर्यचकित झालो. हातातल्या बॉलकडे पाहिलं तर तिथे सोन्याचा गोळा होता.आम्ही वळून त्या माणसाकडे पाहिलं तर तिथे कुणीच नव्हतं. एकदम रिकामी होती ती जागा.
फिफा च्या निमित्ताने
फिफा च्या निमित्ताने जगप्रसिद्ध ब्रँड्स च्या जाहिराती फार एक से एक मस्त आलेल्या आहेत. त्या पहाच. फिफा फीवर तुम्हाला नसेल तरी चढेल .
फिफा च्या निमित्ताने
फिफा च्या निमित्ताने जगप्रसिद्ध ब्रँड्स च्या जाहिराती फार एक से एक मस्त आलेल्या आहेत. त्या पहाच. फिफा फीवर तुम्हाला नसेल तरी चढेल .
ही नाय्के ची :
https://www.youtube.com/watch?v=IyZ1WIua_1s
अल्ट्रा:
https://www.youtube.com/watch?v=9SHoGssGL_4
अदिदास
https://www.youtube.com/watch?v=mJJY53qhJe0
जाऊ दे हा धागा आपण आता भरकटवू
जाऊ दे हा धागा आपण आता भरकटवू नकोया. . >>
काय...??
बोकलत यांचा मोबाईल हॅक तर झाला नाही ना !
बोकलत यांच्या अंगात देव तर संचारला नाही ना !
असो. थोडी गंमत केली. आता पुरे करतोय.
फुटबॉलचा महासंग्राम सुरू झालाय त्यावर चर्चा करू >>>
चालू द्या.
असो. थोडी गंमत केली. आता पुरे
असो. थोडी गंमत केली. आता पुरे करतोय.
फुटबॉलचा महासंग्राम सुरू झालाय त्यावर चर्चा करू >>>
चालू द्या.
नवीन Submitted by हर्पेन on 15 June, 2026 - 17:26>>>>
हर्पेनजी मी पण जरा चेष्टा
हर्पेनजी मी पण जरा चेष्टा केली. या धाग्यावर मजेशीर प्रतिसाद आले धागा जरा वाहवत गेला तरी ओके मला तर अजून मस्त वाटेल. धागा कुठलाही असो त्याचा कोअर शक्यतो बदलत नाही. एक जपानी फिलॉसॉफी आहे wabi-sabi नावाची त्यात म्हणतात की सुंदरता ही परफेक्शनमध्ये नसून इंपरफेक्शन मध्ये असते. त्यामुळे या धाग्यावर फुटबॉलचेच प्रतिसाद अपेक्षित आहेत असं नाही. हसत खेळत मजा मस्ती करत आपण सगळे चर्चा करू
“Nothing lasts. Nothing is finished. Nothing is perfect.”
माझ्यासाठी फेवरिट ब्राझील.
माझ्यासाठी फेवरिट ब्राझील.
Vinicious Jr.
Rayan
Endrick
Morocco चांगले खेळले. Dark Horse. सरासरी वय 21.
(No subject)
स्पेनला मस्त झुंजत ठेवलाय.
स्पेनला मस्त झुंजत ठेवलाय. काबो वर्डे च्या गोलकीपरने मस्त सेव्ह केले. मस्त मजा आली बघायला. जर्मनीच्या ऑलिव्हर कान्हची आठवण आली त्याचे सेव्ह बघताना.
हर्पेन... मस्त
हर्पेन... मस्त
स्पेनचा ढिसाळ खेळ. स्पेन
स्पेनचा ढिसाळ खेळ. स्पेन विरुद्ध एकटा गोलकीपर अशी मॅच झाली आजची.
इराणने आज फुटबॉलमध्येही
इराणने आज फुटबॉलमध्येही न्यूझीलंडबरोबर तह केला - इराण 2. - न्यूझीलंड २. !!!
ड्रॉ सामन्यांची लाटच आलीय !!
मेस्सी व रोनाल्डो दोघेही उद्या स्पर्धेत उतरलेले पाहायला मिळेल ! माझा लाडका - मेस्सी, माझ्या नातवाचा - रोनाल्डो ! हल्ली तरुण पिढी फुटबॉलमध्ये खूपच स्वारस्य दाखवते आहे, असं मला जाणवतं.
फा वि द डि - कसल्या लढाया,
फा वि द डि - कसल्या लढाया, कोण मधे येतं, काही कळलं नाही.
मराठीत सांगणार का, नाही सांगीतलं तरी चालेल.
धागा जरा वाहवत गेला तरी ओके मला तर अजून मस्त वाटेल. >>>
इतःपर माझ्याकडून काहीही मदत होणार नाही.
नाही सांगीतलं तरी चालेल.>>
नाही सांगीतलं तरी चालेल.>> हुश्श:..... 😅
काबो वर्डे चा गोल किपर
(छायाचित्र FIFA World Cup इंस्टाग्राम अकाउंट वरून साभार )
काबो वर्डे चा गोल किपर व्होझिन्या हा या वर्ल्ड कपचं पहिलं सेन्सेशन ठरला आहे, केवळ १८ तासांआधी स्पेन विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याचे इन्स्टावर ५० हजारांच्या आसपास फॉलोअर्स होते. गेल्या १८ तासांत ते वाढून आताच्या घडीला ६.६ मिलियन झाले. तुलनेसाठी इंग्लंड संघाचा स्टार बॉय बकायो साका याचे ८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत तर, जर्मन स्ट्रायकर काई हावर्ट्झ याचे ६.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.
*गोल किपर व्होझिन्या या
*गोल किपर व्होझिन्या या वर्ल्ड कपचं पहिलं सेन्सेशन ठरला आहे, * +१.
( मला वाटतं प्रत्येक खेळाडूचा असा एखादा दिवस असतो जेव्हा त्याची चपळता, रिफ्लेक्स, नशीब व आत्मविश्वास सगळंच एका वेगळ्याच उंचीवर असतं व त्यादिवशी तरी तो अजिंक्यच असतो. फार पूर्वी मुंबईच्या हॉकी गोल्डकप फायनल मध्ये टाटा वि. बीएसएफ ( बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ) सामना प्रकर्षाने आठवतो; टाटाचा गोली, सेड्रिक परेराचा तो असाच दिवस होता. बीएसएफची अगणित आक्रमणं तो लीलया अडवत व चलाखीने परतवत होता. पाच सहा जादा वेळ सामना चालला व सतत बीएसएफ गोलकडे शॉट मारत होते व एकटा परेरा त्यांना थोपवत होता. नंतर तर बीएसएफ वर भुरळ पडल्यासारखे त्यांचे शॉटही चुकायला लागले. शेवटी, काळोख पडल्यावर play to finish असलेली मॅच नाईलाजाने थांबवावी लागली होती ! दुसऱ्या दिवशी पेपरात प्रचंड ठळक व मोठ्ठा मथळा होता - CEDRIC THE GREAT !!!
परेरा नंतर भारतासाठी अप्रतिम खेळला पण त्याची ही मॅच अविस्मरणीय ठरली ! व्होझिन्याचाही हा सामना तसाच ठरेल !
रच्याकने, लहानपणी खेळताना तो नेहमी रडत आजीकडे जात असे म्हणून त्याचं नांव व्होझिन्या ( अर्थ - ' आजी ' ) पडलं असंही वाचनात आलं ! )
मला वाटतं प्रत्येक खेळाडूचा
मला वाटतं प्रत्येक खेळाडूचा असा एखादा दिवस असतो जेव्हा त्याची चपळता, रिफ्लेक्स, नशीब व आत्मविश्वास सगळंच एका वेगळ्याच उंचीवर असतं व त्यादिवशी तरी तो अजिंक्यच असतो >>> +१००
असे काही विक्रम त्याने स्वतः घ्या नावावर केले त्या सामन्यात.
त्याची आई विसा साठी लागणऱ्या पैशांच्या जमवाजमवीत वेळ गेल्याने विश्वचषकाला उपस्थित राहू शकली नाही.
मेस्सीने अल्जेरिया
मेस्सीने अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात फिफा 2026 मधलं आपलं खातं उघडलं ! अल्जेरिया - 0, अर्जेंटिना १ ( सामना सुरू आहे )
Pages