FIFA World Cup 2026

Submitted by बोकलत on 14 June, 2026 - 14:37

फुटबॉल हा फक्त एक खेळ नाही; तो जगभरातील कोट्यवधी लोकांच्या भावना, स्वप्ने आणि अभिमानाशी जोडलेला आहे. आणि जेव्हा फिफा विश्वचषकाची वेळ येते, तेव्हा संपूर्ण जग एका उत्सवात सामील होते. 2026 चा FIFA World Cup हा इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात रोमांचक विश्वचषक ठरणार आहे.

पहिल्यांदाच विश्वचषकाचे आयोजन तीन देशांमध्ये – अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको – करण्यात आले आहे. याशिवाय, प्रथमच 48 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे अधिक सामने, अधिक स्पर्धा आणि अधिक नाट्य अनुभवायला मिळणार आहे.

नवीन फॉरमॅट – अधिक संघ, अधिक संधी

यापूर्वी विश्वचषकात 32 संघ सहभागी होत होते. आता 48 संघांना 12 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांसोबत काही सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचे संघही बाद फेरीत प्रवेश करतील.

या बदलामुळे आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक देशांना पहिल्यांदाच विश्वचषकात चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठे धक्के बसण्याची शक्यता अधिक आहे.

जर्मनी – पुनरागमनासाठी तयार असलेला फुटबॉलचा महाकाय संघ

मी स्वतः जर्मनीचा समर्थक असल्यामुळे माझे विशेष लक्ष या संघाकडे आहे.

जर्मनी हा विश्व फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्यांच्या खेळात शिस्त, रणनीती, मानसिक ताकद आणि संघभावना यांचा अनोखा संगम दिसतो.

मात्र 2018 आणि 2022 या दोन विश्वचषकांमध्ये जर्मनी अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. दोन सलग स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता.

परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते.

जुलियन नागेल्समन यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्कृष्ट मिलाफ आहे.

जर्मनीचे प्रमुख खेळाडू
• जामाल मुसियाला
• फ्लोरियन व्हिर्ट्झ
• जोशुआ किम्मिच
• काई हॅव्हर्ट्झ
• अँटोनियो रुडिगर
• लेरॉय साने

विशेषतः मुसियाला आणि व्हिर्ट्झ ही जोडी सध्या जगातील सर्वात रोमांचक युवा खेळाडूंमध्ये गणली जाते.

जर्मनीचा खेळ वेगवान, आक्रमक आणि अत्यंत संघटित आहे. जर बचावफळीने सातत्य राखले आणि आक्रमण विभागाने संधींचे गोलमध्ये रूपांतर केले तर हा संघ पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची क्षमता ठेवतो.

फ्रान्स – सर्वात धोकादायक दावेदार

जर एखादा संघ कागदावर सर्वात मजबूत दिसत असेल तर तो फ्रान्स आहे.

2018 चा विश्वविजेता आणि 2022 चा उपविजेता असलेल्या फ्रान्सकडे जगातील सर्वोत्तम प्रतिभांचा खजिना आहे.

प्रमुख खेळाडू
• किलियन एमबाप्पे
• औरेलियन त्चौमेनी
• एडुआर्डो कामाविंगा
• मायकेल ओलिसे
• विल्यम सालीबा

फ्रान्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची बेंच स्ट्रेंथ. त्यांच्या राखीव खेळाडूंनाही अनेक देशांच्या मुख्य संघात स्थान मिळू शकते.

जर एमबाप्पेने आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर फ्रान्सला थांबवणे अत्यंत कठीण ठरेल.

अर्जेंटिना – विश्वविजेत्यांचा वारसा

2022 मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जग जिंकले.

आता मेस्सीचे युग संपत असताना नव्या पिढीवर जबाबदारी आली आहे.

प्रमुख खेळाडू
• ज्युलियन अल्वारेझ
• लॉटारो मार्टिनेझ
• एन्झो फर्नांडिस
• अलेक्सिस मॅक अ‍ॅलिस्टर

अर्जेंटिनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा लढाऊ स्वभाव. कोणताही सामना संपेपर्यंत ते हार मानत नाहीत.

विश्वविजेतेपदाचा अनुभव असल्यामुळे हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो.

ब्राझील – सहाव्या तार्‍याचा शोध

फुटबॉल म्हटले की ब्राझील आठवतो.

पाच वेळा विश्वविजेते ठरलेला हा संघ नेहमीच आकर्षक आणि आक्रमक फुटबॉलसाठी प्रसिद्ध राहिला आहे.

प्रमुख खेळाडू
• विनिसियस ज्युनियर
• रोड्रिगो
• राफिन्हा
• ब्रुनो गुइमाराएस

ब्राझीलकडे वैयक्तिक कौशल्याची कमतरता नाही. मात्र मोठ्या सामन्यांमध्ये सातत्य राखणे हे त्यांचे मुख्य आव्हान राहिले आहे.

इंग्लंड – यावेळी स्वप्न पूर्ण होणार?

इंग्लंडकडे कदाचित जगातील सर्वात संतुलित संघ आहे.

प्रमुख खेळाडू
• ज्यूड बेलिंगहॅम
• हॅरी केन
• बुकायो साका
• डेक्लन राईस

गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये इंग्लंड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र निर्णायक क्षणी त्यांना अपयश आले आहे.

2026 मध्ये ते विश्वविजेतेपदासाठी मोठे आव्हान ठरू शकतात.

स्पेन – नव्या सुवर्णपिढीचा उदय

स्पेन पुन्हा एकदा जगाला आपल्या फुटबॉलने प्रभावित करत आहे.

प्रमुख खेळाडू
• लॅमिन यामाल
• पेड्री
• गावी
• निको विल्यम्स

तरुणाई, वेग आणि उत्कृष्ट पासिंग गेम यामुळे स्पेन कोणत्याही संघाला हरवू शकतो.

कोणता संघ देऊ शकतो मोठा धक्का?

प्रत्येक विश्वचषकात एखादा संघ सर्वांना आश्चर्यचकित करतो.

2026 मध्ये खालील संघांकडे लक्ष ठेवावे:
• पोर्तुगाल
• मोरोक्को
• नेदरलँड्स
• क्रोएशिया
• उरुग्वे

यापैकी कोणताही संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकतो.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जर्मनी बाहेर. 75 % वेळ ताबा असूनही गोल करायला क्वचितच संधी मिळाली होती त्यांना. एक गोल मात्र बाद केला गेला फाऊल झाल्यामुळे. Questionable decision. पण मी जर्मनीला दुर्दैवी म्हणणार नाही. They did not deserve to win.

पेनल्टी शूट आउट बघायला मजा आली. पराग्वेचा गोल कीपर चांगला होता जास्त. जर्मनीच्या मिस्ड किक्स अगदी सिली होत्या.

पेनल्टी शूट आउट बघायला मजा आली. पराग्वेचा गोल कीपर चांगला होता जास्त. जर्मनीच्या मिस्ड किक्स अगदी सिली होत्या.

जपानने पहिला गोल केल्यावर अगदी सामान्य अशी चूक केली, असं मला वाटलं; त्या एका गोलच्या आघाडीच्या जोरावर आपण सामना जिंकू या भ्रमात त्यांनी संपूर्ण वेळ फक्त बचावात्मक पवित्राच घेतला व ब्राझीलला गोल करायच्या वारंवार संधी दिल्या. ब्राझीलने नेमारला मैदानावर उतरवलं नाही, हे आश्चर्य.
जर्मनी बाहेर !! बाद फेरीतला पहिला मोठा अपसेट !

एका गोलच्या आघाडीच्या जोरावर आपण सामना जिंकू या भ्रमात त्यांनी संपूर्ण वेळ फक्त बचावात्मक पवित्राच घेतला व ब्राझीलला गोल करायच्या वारंवार संधी दिल्या.>>>> +१११११११

नेदरलँड 1, मोरोक्को 1 !
एक्स्ट्रा टाईम सुरू ! बाद फेरीचा दुसरा अपसेट होणार की काय ? बघूया !!!!!

मोरोक्को पेनल्टी शूट -आऊट मधे 3- 2 ने विजयी !!!!!
आजचा दुसरा अपसेट! पण मोरोक्को निश्चितपणे आज सरस टीम होती. त्यांचा आपसातील समन्वय, डावपेचांची समज व बचाव - आक्रमण याचं सुरेख नियोजन नेदरलँड पेक्षा आज खूपच दर्जेदार वाटलं ! अभिनंदन व शुभेच्छा !

आजोबा, तुमच्या पेले, मॅराडोनापेक्षाही मेस्सीच जगात बेस्ट आहे म्हणा, नाहीं तर तुम्ही चोरून लाडू खाता तें आजीला सांगेन !!
20181230_224844.jpg

हालन्डचा खेळ बघायचा आहे आज. नक्की काय प्रकरण आहे हा माणूस. माझ्या ७ वर्षाच्या मुलीला पण माहीत आहे तो. वर्ल्ड कप आधी फेमस नव्हता.

Embappe, Dembele जबरदस्त फ्रान्स. आत्तापर्यंतच्या त्यांच्या खेळावरुन हा संघ कप साठी प्रमुख दावेदार वाटतोय. अप्रतिम सांघिक खेळ. वेगवान पासिंग, गोल करण्याच्या अनेक संधी. वाह, मजा आली स्वीडन बरोबरचा सामना बघताना.

Embappe, Dembele जबरदस्त फ्रान्स. आत्तापर्यंतच्या त्यांच्या खेळावरुन हा संघ कप साठी प्रमुख दावेदार वाटतोय. अप्रतिम सांघिक खेळ. वेगवान पासिंग, गोल करण्याच्या अनेक संधी. वाह, मजा आली स्वीडन बरोबरचा सामना बघताना. Didier Deschamps 2018, 22 मध्ये पण त्यांचा कोच होता. Maybe longest serving coach. 2018 Chmps, 2022 Runners, यावेळेस पुन्हा शक्यता.

खूप इच्छा असूनही नाही बघता आला फ्रान्स वि. स्वीडन सामना. ! अर्थात,, आणखी किमान तीन संधी तरी मिळतीलच बहुतेक ह्या स्पर्धेत फ्रान्सचा खेळ पाहण्यासाठी ! Wink
* Maybe longest serving coach. 2018 Chmps, 2022 Runners, यावेळेस पुन्हा शक्यता.* सलाम!!!

फ्रान्स ने काल पूर्ण डॉमिनेट केले. चुरशीचा सामना नाही बघायला मिळाला तरी एम्बप्पे आणि इतरांचे स्विफ्ट पासेस, सराईत आक्रमणे, अलगद मख्खन सारखे जाळ्यात जाणारे शॉट्स बघायला फार मजा आली! येस्स फ्रान्स सर्वात कन्सिस्टन्ट आणि प्रॉमिसिंग दिसत आहे आत्ता!

कालचे सामने पाहिले. दोन पेनल्टी शुटाउटवर सुटले तरी आवडले. जर्मनीचा दुसरा गोल का बाद झाला ते समजले नाही.

जपानने ब्राझील विरुद्ध एका गोलची आघाडी घेऊन बचावाची भूमिका घेतली व मुख्यतः त्यामुळे मॅच हरले; आज काँगो पहिला गोल केल्यावर अधिक जोमाने आक्रमक खेळ करत इंग्लंडला हैराण करताहेत ! त्यातच काँगोच्या गोलीने इंग्लंडचं काम खूपच कठीण केलंय; त्याला सलाम ! बघू झुंज पुढे कशी चालते ते !!

इंग्लंड 2, काँगो १
इंग्लंडने आपला खेळ दुसऱ्या सत्रात खूप उंचावला, जे अपेक्षित व क्रमप्राप्तही होतं. त्यांचा दुसरा गोल तर अफलातूनच !! अभिनंदन.
काँगोने बलाढ्य इंग्लंड विरुद्ध जिद्द व कौशल्य याचं छान प्रदर्शन घडवलं. बॅड लक व सलाम !!

आजचा दुसरा सामना पण बहारदार झाला. Senegal unlucky ठरले. 85 मिनिटानंतर दोन गोल दिले आणि 120 व्या मिनिटाला पेनल्टी जी माझ्या मताने द्यायला नको होती. असो. Senegalcha दुसरा गोल अप्रतीम होता.
मस्त सामने चालू आहेत. सध्या इथे आहे म्हणून बघता येत आहेत. भारतातल्या मंडळीना जागरण.

94 च्या वर्ल्ड कप च्या वेळी सामने बघता यावेत म्हणून मी माझे नवीन कंपनीत रुजू होणे 1 महिना पुढे ढकलले होते. त्याची आठवण आली. जुलै मध्येच फायनल होती.

*आजचा दुसरा सामना पण बहारदार झाला. * - आयव्हरी कोस्ट.. काँगो....सेनेगल.. आफ्रिकन देश बलाढ्य संघाना जोरदार टक्कर देत इशारा देत आहेत ' यापुढे आम्हाला गृहीत धरणे बंद करा.... फिफा कप आता आफ्रिकन सफारीसाठी उत्सुक आहे!!! ' Wink

*सध्या इथे आहे म्हणून बघता येत आहेत. *-
कशाला जळवताय माझ्यासारख्या घरकोंबड्यांना हे सांगून !!! Wink

भाऊ Happy

आज स्पेन ची मजा.

आज एका मायबोली मधील सुप्रसिद्ध जुन्या जाणत्या खिलाडू व्यक्तीस भेटणार आहे. पण त्यामुळे पोर्तुगीज चा सामना बघता नाही येणार.

क्रोएशियाबद्दल वाईट वाटले. शेवटच्या मिनिटाला त्यांनी केलेला गोल वैध ठरला नाही. अतिशय सुंदर गेम. पोर्तुगाल जिंकले २ - १

क्रोएशिया हार्ड लक! लास्ट मिनिट हार्टब्रेक झाला त्यांचा. मला ते कधी अपील करून गोल नंतर कॅन्सल करतात ती टेक्निकॅलिटी कुठे फाउल झाला काय झाले अजिबात कळत नाही .

क्रोएशियाचा फाउल नव्हता असं आपले हिंदी कॉमेंटेटर बोलत होते. मला पण समजलं नाही शेवटी नक्की कोणाचा कोणाला लागून पास गेला.

Pages