फुटबॉल हा फक्त एक खेळ नाही; तो जगभरातील कोट्यवधी लोकांच्या भावना, स्वप्ने आणि अभिमानाशी जोडलेला आहे. आणि जेव्हा फिफा विश्वचषकाची वेळ येते, तेव्हा संपूर्ण जग एका उत्सवात सामील होते. 2026 चा FIFA World Cup हा इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात रोमांचक विश्वचषक ठरणार आहे.
पहिल्यांदाच विश्वचषकाचे आयोजन तीन देशांमध्ये – अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको – करण्यात आले आहे. याशिवाय, प्रथमच 48 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे अधिक सामने, अधिक स्पर्धा आणि अधिक नाट्य अनुभवायला मिळणार आहे.
नवीन फॉरमॅट – अधिक संघ, अधिक संधी
यापूर्वी विश्वचषकात 32 संघ सहभागी होत होते. आता 48 संघांना 12 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांसोबत काही सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचे संघही बाद फेरीत प्रवेश करतील.
या बदलामुळे आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक देशांना पहिल्यांदाच विश्वचषकात चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठे धक्के बसण्याची शक्यता अधिक आहे.
⸻
जर्मनी – पुनरागमनासाठी तयार असलेला फुटबॉलचा महाकाय संघ
मी स्वतः जर्मनीचा समर्थक असल्यामुळे माझे विशेष लक्ष या संघाकडे आहे.
जर्मनी हा विश्व फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्यांच्या खेळात शिस्त, रणनीती, मानसिक ताकद आणि संघभावना यांचा अनोखा संगम दिसतो.
मात्र 2018 आणि 2022 या दोन विश्वचषकांमध्ये जर्मनी अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. दोन सलग स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता.
परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते.
जुलियन नागेल्समन यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्कृष्ट मिलाफ आहे.
जर्मनीचे प्रमुख खेळाडू
• जामाल मुसियाला
• फ्लोरियन व्हिर्ट्झ
• जोशुआ किम्मिच
• काई हॅव्हर्ट्झ
• अँटोनियो रुडिगर
• लेरॉय साने
विशेषतः मुसियाला आणि व्हिर्ट्झ ही जोडी सध्या जगातील सर्वात रोमांचक युवा खेळाडूंमध्ये गणली जाते.
जर्मनीचा खेळ वेगवान, आक्रमक आणि अत्यंत संघटित आहे. जर बचावफळीने सातत्य राखले आणि आक्रमण विभागाने संधींचे गोलमध्ये रूपांतर केले तर हा संघ पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची क्षमता ठेवतो.
⸻
फ्रान्स – सर्वात धोकादायक दावेदार
जर एखादा संघ कागदावर सर्वात मजबूत दिसत असेल तर तो फ्रान्स आहे.
2018 चा विश्वविजेता आणि 2022 चा उपविजेता असलेल्या फ्रान्सकडे जगातील सर्वोत्तम प्रतिभांचा खजिना आहे.
प्रमुख खेळाडू
• किलियन एमबाप्पे
• औरेलियन त्चौमेनी
• एडुआर्डो कामाविंगा
• मायकेल ओलिसे
• विल्यम सालीबा
फ्रान्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची बेंच स्ट्रेंथ. त्यांच्या राखीव खेळाडूंनाही अनेक देशांच्या मुख्य संघात स्थान मिळू शकते.
जर एमबाप्पेने आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर फ्रान्सला थांबवणे अत्यंत कठीण ठरेल.
⸻
अर्जेंटिना – विश्वविजेत्यांचा वारसा
2022 मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जग जिंकले.
आता मेस्सीचे युग संपत असताना नव्या पिढीवर जबाबदारी आली आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्युलियन अल्वारेझ
• लॉटारो मार्टिनेझ
• एन्झो फर्नांडिस
• अलेक्सिस मॅक अॅलिस्टर
अर्जेंटिनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा लढाऊ स्वभाव. कोणताही सामना संपेपर्यंत ते हार मानत नाहीत.
विश्वविजेतेपदाचा अनुभव असल्यामुळे हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो.
⸻
ब्राझील – सहाव्या तार्याचा शोध
फुटबॉल म्हटले की ब्राझील आठवतो.
पाच वेळा विश्वविजेते ठरलेला हा संघ नेहमीच आकर्षक आणि आक्रमक फुटबॉलसाठी प्रसिद्ध राहिला आहे.
प्रमुख खेळाडू
• विनिसियस ज्युनियर
• रोड्रिगो
• राफिन्हा
• ब्रुनो गुइमाराएस
ब्राझीलकडे वैयक्तिक कौशल्याची कमतरता नाही. मात्र मोठ्या सामन्यांमध्ये सातत्य राखणे हे त्यांचे मुख्य आव्हान राहिले आहे.
⸻
इंग्लंड – यावेळी स्वप्न पूर्ण होणार?
इंग्लंडकडे कदाचित जगातील सर्वात संतुलित संघ आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्यूड बेलिंगहॅम
• हॅरी केन
• बुकायो साका
• डेक्लन राईस
गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये इंग्लंड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र निर्णायक क्षणी त्यांना अपयश आले आहे.
2026 मध्ये ते विश्वविजेतेपदासाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
⸻
स्पेन – नव्या सुवर्णपिढीचा उदय
स्पेन पुन्हा एकदा जगाला आपल्या फुटबॉलने प्रभावित करत आहे.
प्रमुख खेळाडू
• लॅमिन यामाल
• पेड्री
• गावी
• निको विल्यम्स
तरुणाई, वेग आणि उत्कृष्ट पासिंग गेम यामुळे स्पेन कोणत्याही संघाला हरवू शकतो.
⸻
कोणता संघ देऊ शकतो मोठा धक्का?
प्रत्येक विश्वचषकात एखादा संघ सर्वांना आश्चर्यचकित करतो.
2026 मध्ये खालील संघांकडे लक्ष ठेवावे:
• पोर्तुगाल
• मोरोक्को
• नेदरलँड्स
• क्रोएशिया
• उरुग्वे
यापैकी कोणताही संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकतो.
क्रोएशियाचा शेवटचा गोल
क्रोएशियाचा शेवटचा गोल फाऊलमुळे नाही तर ऑफसाइडमुळे दिला नाही.
#१५ आॅफसाइड होता
#१५ आॅफसाइड होता
However, the "snickometer"
However, the "snickometer" technology showed that the ball hit Croatia midfielder Igor Matanovic on the way and when the ball made contact with his head, Pasalic was in an off-side position. The ball did get deflected off Portugal defender Renato Veiga's head before reaching Pasalic but the referee ruled that his touch was not deliberate.
https://sports.ndtv.com/fifa-world-cup-2026/fifa-world-cup-2026-why-croa...
It was deemed Croatian forward Igor Matanovic flicked the ball mid-air before it came off Renato Veiga en route to Pasalic.
If the snicko technology had picked up a deflection, the goal would have stood.
https://football360.com.au/croatia-portugal-fifa-world-cup-offside-why-w...
मला अगदी शेवटी सामना पहाता
मला अगदी शेवटी सामना पहाता आला. माझ्या मताने तो offside चा foul नव्हता. Croatia नक्कीच unlucky.
पोर्तुगाल जिंकल्याने आणि
पोर्तुगाल जिंकल्याने आणि त्यातही रोनाल्डोने गोल मारल्यामुळे आमच्याकडे आज उत्साहाचे वातावरण आहे.
पण पुढचा सामना स्पेनसोबत आहे आणि कागदावर स्पेन फेवरेट आहे.
पोर्तुगाल वर्सेस उजबेकिस्तान सामन्याच्या आधी मुलीने ५-० असा अंदाज व्यक्त केला होता. आणि फायनल स्कोअर ५-० च झाला होता. मी अवाक झालो होतो पण त्यामुळे आणि तेव्हापासून मी फुटबॉल मध्ये थोडाफार रस घेऊ लागलो. अन्यथा सालाबादप्रमाणे थेट फायनल बघायचा विचार होता.
केप वर्दे ने घाम फोडलाय
केप वर्दे ने घाम फोडलाय अर्जेंटिनाला
जिंकले एकदाचे. पण ही केप
जिंकले एकदाचे. पण ही केप वर्दे एवढी भारी टीम कशी काय झाली अचानक. शेवटी २-४ मिनिट असताना अर्जेंटिनाच्या गोलकीपरने फ्री किक काय जबरदस्त सेव्ह केली. शेवटी शेवटी अर्जेंटीना घाबरून खेळत होती.
केप व्हर्डे, त्रिवार सलाम !!
केप व्हर्डे, त्रिवार सलाम !!
भारी झाली मॅच
भारी झाली मॅच
पण तरी शेवटी बरे झाले अर्जेंटिना मेसी आहेत स्पर्धेत अजून
केप वर्देची लोकसंख्या फक्त
केप वर्देची लोकसंख्या फक्त सहा लाख आहे म्हणे येथे एवढे लोक तर लालबागचा रांगेत आसतात तरी आपण फुटबॉलच्या जवळपास सुद्धा नाही
काबो वर्डे आणि गोलकीपर
काबो वर्डे आणि गोलकीपर वॉझ्निया दिल जीत लिया! त्यांच्या बॉडी लॅन्गवेज मधेही किती पॉजिटिविटी होती, शेवटपरयन्त गिव्ह अप केले नाही. असे वाटायला लागले की, कुणी सांगावे, जर शेवटी एक्स्ट्रा टाइम मधे बरोबरी होऊन मॅच शूटाआउट मधे गेली असती तर वॉझ्नियाने अनलाइकली मिरॅकल पुल केलेही असते कदाचित!!
एकूण फार मज्जा आली काल मॅच बघायला!
कुणी सांगावे, जर शेवटी
कुणी सांगावे, जर शेवटी एक्स्ट्रा टाइम मधे बरोबरी होऊन मॅच शूटाआउट मधे गेली असती तर वॉझ्नियाने अनलाइकली मिरॅकल पुल केलेही असते कदाचित!!>>>> +1111111 मी त्याचीच वाट बघत होतो. ऑलिव्हर कान्ह नंतर या गोलकीपरसाठी मॅच बघितली मी.
आता सर्वात फेवरीट फ्रान्स आणि
आता सर्वात फेवरीट फ्रान्स आणि जर्मनीला अपसेट केलेले पराग्वे ची मॅच मस्त होईल अशी आशा आहे. दोन्ही टीम्स चे कलर्स रेड, व्हाइट अँड ब्लू! त्यात आज ४ जुलै, अमेरिकेचा २५०वा बड्डे, मॅच फिली मधे त्यामुळे सगळीकडे फक्त रेड व्हाइट अँड ब्लू आहे स्टेडियम मधे! भारी दिसते आहे.
बॅलोगनचं रेडकार्ड सस्पेंशन
बॅलोगनचं रेडकार्ड सस्पेंशन रद्द झालं. त्याला रेडकार्ड दिलं गेल्यापासुन ते रद्द करेपर्यंतचे दोन्हि निर्णय काँन्ट्रावर्शल आहेत..
मेक्सिको-इंग्लंड मॅच अॅझ्टेका स्टेडियम मधे आहे, साधारण २२०० मिटर अबव सीलेवल. इंग्लंडच्या खेळाडुंची दमछाक होणार आहे...
ब्राझिल बाहेर. नॉर्वे विजयी!
ब्राझिल बाहेर. नॉर्वे विजयी!
दोन्ही गोल हॉलंड!
हालण्डचा गेम मला
हालण्डचा गेम मला रोनाल्डोसारखा वाटतो. जास्त हालचाल न करता गोल्पोस्टजवळ राहतात आणि गोल मारतात. तसे मेस्सी एम्बाप्पे बॉल जास्त कॅरी करतात.
ब्राझील फारच बंडल खेळले. Very
ब्राझील फारच बंडल खेळले. Very unbrazilian. आता नेहमीचेच झालेले कारण. ते एकत्र फार कमी वेळा खेळतात. But definately deserved to be out.
इंग्लंड मेक्सिको मस्त मॅच चाललीय. मध्यंतरात 2-1. पण काहिही होऊ शकते. अशक्य वेगवान पासिंग. इंग्लंड बघू मेक्सिकोला जिंकण्या पासून दूर ठेवू शकते का.
इंग्लंड बहुतेक जिंकते आहे.
इंग्लंड बहुतेक जिंकते आहे.
जिंकले. आता पर्यंतची सगळ्यात
जिंकले. आता पर्यंतची सगळ्यात उत्कंठावर्धक मॅच.
*ब्राझील फारच बंडल खेळले. * -
*ब्राझील फारच बंडल खेळले. * - पहिल्या अर्धवेळात ब्राझील पूर्वीसारखा नसला तरी बरा खेळ करत होता, असं मला जाणवलं . त्यांच्या कांहीं चाली वेगवान व खेळाडूंमधला छान समन्वय असलेल्या होत्या. नंतर मात्र नॉर्वे सरस खेळली. नेमारला अल विदा !!!
*हालण्डचा गेम मला.... हालचाल न करता गोल्पोस्टजवळ राहतात आणि गोल मारतात * +१
स्पर्धेत इंग्लंडचा खेळ चॅम्पियनसारखा, सर्वांगसुंदर म्हणता येईल असा, चालला आहे !
सर्व संघांसाठी आता स्पर्धा जीवघेणी होत चालली आहे !!
मेक्सिको कडे ८०% वेळा बॉल
मेक्सिको कडे ८०% वेळा बॉल होता. अनेक वेळा कॉर्नर मिळाले, गोल च्या इतके जवळ जायचे, पण त्यांच्याकडे हालंड,मेस्सी सारखा कोणी सटकन अलगद जाळ्यात मारणारा एक्झिक्यूटर नव्हता असे वाटले. त्यामुळे संधी गोल मधे कन्वर्ट करता आल्या नाहीत. उलट इन्ग्लन्ड ने लिमिटेड संधी मिळाल्या त्यात फास्ट गोल करून घेतले.
नॉर्वे -ब्राझिल मधे आधी सुरुवातीला अटॅक आणि पासिंग मधे ब्राझिल जास्त अनुभवी वाटत होते पण हालंड ने संधी मिळताच एकहाती ते चित्र फिरवले! त्याचे दोन्ही शॉट्स भार्री होते!
स्पेन १ वि. पोर्तुगाल 0
स्पेन १ वि. पोर्तुगाल 0
सामना अटीतटीचा झाला. रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्डकप !!!!
ट्रम्पचा शुद्ध आगाऊपणा - यूएसए च्या खेळाडूला मिळालेलं रेड कार्ड दुर्लक्षित करून त्या खेळाडूला पुढचा सामना खेळू देण्यासाठी फिफावर दबाव टाकणं ( व फिफाने त्यापुढे झुकणं !) असो, युएसए हरली व बाद झालीच!
यूएस टीम ढिसाळ खेळली.
यूएस टीम ढिसाळ खेळली. बेल्जियम ला शेवटचे दोन गोल्स बहालच केले. मग काय,बाहेर जाणारच होते !
आज ९.३० ला मॅच आहे. बेस्ट
आज ९.३० ला मॅच आहे. बेस्ट टाईम आहे. आपल्या भारतीयांचा विचार करून निदान सेमी आणि फायनल तरी या टाईमला पाहिजे होती. १०.३० पण चालेल.
सुरुवातीपासुनच अमेरिकन टीम
सुरुवातीपासुनच अमेरिकन टीम कुठलाश्या दबावाखाली खेळंत आहे असं वाटंत होतं. पोटस स्टेडियम मधे नसुनहि..
पुलिसिक वाज नोव्हेअर टु बी सीन..
अमेरिकेचा एकमेव गोल, पण तो एकदम ढांसु. बेल्जियमचे पहिले २ गोल, अमेरिकेच्या नगण्य डिफेंसमुळे झाले, अक्षरशः डिअर इन द हेडलाइट. तिसरा गोल बहुतेक आमचा गोली विसरला कि गोलीला बॉल हाताने पकडायला अलौड आहे. ३-१चा लीड म्हणजे मानसिक खच्चिकरण, ज्यामुळे ४था गोल झाला. अशा रितीने तिसरे यजमान सेरेमोनियस्ली स्पर्धेतुन बाद झाले...
मेस्सी गंडला परत एकदा. इजिप्त
मेस्सी गंडला परत एकदा. इजिप्त १-० ने पुढे.
अर्जेंटीना बाहेर.
अर्जेंटीना बाहेर.
परवा नेमार
परवा नेमार
काल रोनाल्डो
आज मेस्सी
२-१
२-१
२-२
२-२
Pages