फुटबॉल हा फक्त एक खेळ नाही; तो जगभरातील कोट्यवधी लोकांच्या भावना, स्वप्ने आणि अभिमानाशी जोडलेला आहे. आणि जेव्हा फिफा विश्वचषकाची वेळ येते, तेव्हा संपूर्ण जग एका उत्सवात सामील होते. 2026 चा FIFA World Cup हा इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात रोमांचक विश्वचषक ठरणार आहे.
पहिल्यांदाच विश्वचषकाचे आयोजन तीन देशांमध्ये – अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको – करण्यात आले आहे. याशिवाय, प्रथमच 48 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे अधिक सामने, अधिक स्पर्धा आणि अधिक नाट्य अनुभवायला मिळणार आहे.
नवीन फॉरमॅट – अधिक संघ, अधिक संधी
यापूर्वी विश्वचषकात 32 संघ सहभागी होत होते. आता 48 संघांना 12 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांसोबत काही सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचे संघही बाद फेरीत प्रवेश करतील.
या बदलामुळे आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक देशांना पहिल्यांदाच विश्वचषकात चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठे धक्के बसण्याची शक्यता अधिक आहे.
⸻
जर्मनी – पुनरागमनासाठी तयार असलेला फुटबॉलचा महाकाय संघ
मी स्वतः जर्मनीचा समर्थक असल्यामुळे माझे विशेष लक्ष या संघाकडे आहे.
जर्मनी हा विश्व फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्यांच्या खेळात शिस्त, रणनीती, मानसिक ताकद आणि संघभावना यांचा अनोखा संगम दिसतो.
मात्र 2018 आणि 2022 या दोन विश्वचषकांमध्ये जर्मनी अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. दोन सलग स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता.
परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते.
जुलियन नागेल्समन यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्कृष्ट मिलाफ आहे.
जर्मनीचे प्रमुख खेळाडू
• जामाल मुसियाला
• फ्लोरियन व्हिर्ट्झ
• जोशुआ किम्मिच
• काई हॅव्हर्ट्झ
• अँटोनियो रुडिगर
• लेरॉय साने
विशेषतः मुसियाला आणि व्हिर्ट्झ ही जोडी सध्या जगातील सर्वात रोमांचक युवा खेळाडूंमध्ये गणली जाते.
जर्मनीचा खेळ वेगवान, आक्रमक आणि अत्यंत संघटित आहे. जर बचावफळीने सातत्य राखले आणि आक्रमण विभागाने संधींचे गोलमध्ये रूपांतर केले तर हा संघ पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची क्षमता ठेवतो.
⸻
फ्रान्स – सर्वात धोकादायक दावेदार
जर एखादा संघ कागदावर सर्वात मजबूत दिसत असेल तर तो फ्रान्स आहे.
2018 चा विश्वविजेता आणि 2022 चा उपविजेता असलेल्या फ्रान्सकडे जगातील सर्वोत्तम प्रतिभांचा खजिना आहे.
प्रमुख खेळाडू
• किलियन एमबाप्पे
• औरेलियन त्चौमेनी
• एडुआर्डो कामाविंगा
• मायकेल ओलिसे
• विल्यम सालीबा
फ्रान्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची बेंच स्ट्रेंथ. त्यांच्या राखीव खेळाडूंनाही अनेक देशांच्या मुख्य संघात स्थान मिळू शकते.
जर एमबाप्पेने आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर फ्रान्सला थांबवणे अत्यंत कठीण ठरेल.
⸻
अर्जेंटिना – विश्वविजेत्यांचा वारसा
2022 मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जग जिंकले.
आता मेस्सीचे युग संपत असताना नव्या पिढीवर जबाबदारी आली आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्युलियन अल्वारेझ
• लॉटारो मार्टिनेझ
• एन्झो फर्नांडिस
• अलेक्सिस मॅक अॅलिस्टर
अर्जेंटिनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा लढाऊ स्वभाव. कोणताही सामना संपेपर्यंत ते हार मानत नाहीत.
विश्वविजेतेपदाचा अनुभव असल्यामुळे हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो.
⸻
ब्राझील – सहाव्या तार्याचा शोध
फुटबॉल म्हटले की ब्राझील आठवतो.
पाच वेळा विश्वविजेते ठरलेला हा संघ नेहमीच आकर्षक आणि आक्रमक फुटबॉलसाठी प्रसिद्ध राहिला आहे.
प्रमुख खेळाडू
• विनिसियस ज्युनियर
• रोड्रिगो
• राफिन्हा
• ब्रुनो गुइमाराएस
ब्राझीलकडे वैयक्तिक कौशल्याची कमतरता नाही. मात्र मोठ्या सामन्यांमध्ये सातत्य राखणे हे त्यांचे मुख्य आव्हान राहिले आहे.
⸻
इंग्लंड – यावेळी स्वप्न पूर्ण होणार?
इंग्लंडकडे कदाचित जगातील सर्वात संतुलित संघ आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्यूड बेलिंगहॅम
• हॅरी केन
• बुकायो साका
• डेक्लन राईस
गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये इंग्लंड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र निर्णायक क्षणी त्यांना अपयश आले आहे.
2026 मध्ये ते विश्वविजेतेपदासाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
⸻
स्पेन – नव्या सुवर्णपिढीचा उदय
स्पेन पुन्हा एकदा जगाला आपल्या फुटबॉलने प्रभावित करत आहे.
प्रमुख खेळाडू
• लॅमिन यामाल
• पेड्री
• गावी
• निको विल्यम्स
तरुणाई, वेग आणि उत्कृष्ट पासिंग गेम यामुळे स्पेन कोणत्याही संघाला हरवू शकतो.
⸻
कोणता संघ देऊ शकतो मोठा धक्का?
प्रत्येक विश्वचषकात एखादा संघ सर्वांना आश्चर्यचकित करतो.
2026 मध्ये खालील संघांकडे लक्ष ठेवावे:
• पोर्तुगाल
• मोरोक्को
• नेदरलँड्स
• क्रोएशिया
• उरुग्वे
यापैकी कोणताही संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकतो.
वक्त बदल दिया जजबात बदल दिये
वक्त बदल दिया जजबात बदल दिये जिंदगी बदल di
आणि दुसरा... जबरदस्त मेसी
आणि दुसरा...
जबरदस्त मेसी
जिथे कुठे असला हातातील कामं
जिथे कुठे असाल हातातील कामं सोडा मॅच बघा.
३
३
गेम झाला रे...
गेम झाला रे...
खेळाडू राहिले बाजूला इजिप्तचे
खेळाडू राहिले बाजूला इजिप्तचे कोचच जास्त पिसाळलेत.
इजिप्त घाबरली पहिल्या गोल
इजिप्त घाबरली पहिल्या गोल नंतर..
गुंडागर्दी झाली
काय गेम झाला शेवटच्या वीस
काय गेम झाला शेवटच्या वीस मिनिटात. जबरदस्त.
जबरी. सलग दुसर्यांदा खालच्या
जबरी. सलग दुसर्यांदा खालच्या क्रमांकाच्या संघाने हवा काढली argentinaची. आधी केप वर्दे, आता Egypt. खूपच उत्कंठा पूर्ण सामने होत आहेत.
इजिप्त मस्तच खेळले. अगदी ७५
इजिप्त मस्तच खेळले. अगदी ७५ मिनिटापर्यन्त वाटले आज अपसेट होणार . पण अर्जेन्टिना ने अनुभव दाखवून दिला शेवटी. गुड गेम!
शूट आउट वर निर्णय झाला.
स्वित्जर्लन्ड आणि कोलंबिया त्याउलट! सुपर बोरिंग गेम झाला. २ तास धावतायत पण कुणाला बॉल जाळ्यात टाकता येईना
इजिप्तला सलाम ! भारी खेळले !!
इजिप्तला सलाम ! भारी खेळले !! बॅड लक .
मेस्सी आणि कंपनी कड्यावरून पडता पडता तोल सावरून दुसऱ्यांदा परत स्पर्धेत आले आहेत. आता हरण्याचं भय त्यांना भेडसावणार नाही !!
Egypt bad luck. Refree was
Egypt bad luck. Refree was clearly partial towards Argentina. It looks like they don't want Egypt to win the march.
काय पार्शियल वैगरे नव्हता.
काय पार्शियल वैगरे नव्हता. अर्जेंटीनाने मॅच फिरवली. नाहीतरी इजिप्त काय मोठे दिवे लावणार होते पुढे जाऊन? हारले ते चांगलच झालं. आपल्या मेस्सीची अजून एक मॅच बघता येईल.
*Refree was clearly partial .
*Refree was clearly partial ...* - कांहीं बाबतीत थोडं डावं - उजवं झालं असावं रेफेरीकडून असं जाणवलं, पण सामन्याचा निकाल त्यामुळे बदलला, असं मात्र नाही वाटलं. अर्जेंटिना आपला अनुभव व कसब पणाला लावून जिंकले व इजिप्त अप्रतिम खेळ करूनही दुर्दैवाने सरस संघावर मात नाही करू शकले, हेच खरं वाटतं.
भाऊ आपल्या मताचा आदर आहे. पण
भाऊ आपल्या मताचा आदर आहे. पण रेफ्रींनी अर्जेंटीनाला झुकत माप दिल हे उघड दिसत होत. असो आता पुढच्या मॅच बघुया.
>>पण रेफ्रींनी अर्जेंटीनाला
>>पण रेफ्रींनी अर्जेंटीनाला झुकत माप दिल हे उघड दिसत होत<<
यात आर्थिक गणिताचा भाग असु शकतो. रोनाल्डोचं रिड्युस्ड सस्पेंशन याचपैकि एक होतं.. आय होप आयॅम राँग...
फ्रान्स 2, मोरोक्को ० !!
फ्रान्स 2, मोरोक्को ० !!
सुरवातीलाच एम्बापेने पेनल्टी किक अगदीच निर्जीवपणे (casually ) घेऊन फुकट घालवली असं वाटलं . पण नंतर त्याने केलेला गोल खूपच नेमका, कौशल्यपूर्ण व शैलीदार होता ! सलाम !!
मोरोक्को काल खूपच दबावाखाली खेळली असावी.
खूप चांगली झुंज अपेक्षित होती त्याच्याकडून. पण ह्या स्पर्धेत अप्रतिम खेळून वाहव्वा मिळवली त्या संघाने ! आफ्रिकेची स्पर्धेतील शेवटची आशा काल मावळली पण स्पर्धेवर आफ्रिकेचा शिक्का उमटवून ( केप व्हर्डे, इजिप्त, मोरोक्को !!! ) !
सुरवातीलाच एम्बापेने पेनल्टी
सुरवातीलाच एम्बापेने पेनल्टी किक अगदीच निर्जीवपणे (casually ) घेऊन फुकट घालवली असं वाटलं .>>> मोरक्कन किपर यासीन बौनू हा पेनल्टी शूट डेड बॉल सिच्युएशन मध्ये एक Tough nut to crack म्हणून ओळखला जातो. विश्वचकातील या बाबतीतील त्याचा रेकॉर्ड हा second to none आणि लिजेंडरी म्हणावा असाच आहे. आता पर्यंत दोन विश्व चषकांत तो ९ पेनल्टीजना सामोरा गेलाय, आणि त्यापैकी निव्वळ २ गोल होऊ दिले आहेत, म्हणजे फक्त २२% सक्सेस रेट (०.२२ XG) जिथे जागतिक दर्जाच्या कोणत्या ही पेनल्टी डेड बॉल सिच्युएशनचा XG (Expected goal) रेट हा १ पैकी कमीत कमी ०.७६ ते ०.७९ असा कन्सिडर केला जातो.
*मोरक्कन किपर यासीन बौनू हा
*मोरक्कन किपर यासीन बौनू हा पेनल्टी शूट डेड बॉल सिच्युएशन मध्ये एक Tough nut to crack म्हणून ओळखला जातो. * निर्विवाद ! पण कालच्या त्या शूटमध्ये त्याला त्याचं हे अत्युच्च कसब वापरावंव लागलं नाही, हेही मला तरी तीव्रतेने जाणवलं. कदाचित, यासीन बौनूच्या ह्या ख्यातीचं दडपण शूट घेताना एम्बापेवर आलं असावं !
काल फ्रान्स च्या संघाने अतिशय
काल फ्रान्स च्या संघाने अतिशय प्रभावी खेळ केला. संपूर्ण सामनाभर त्यांचा प्रभाव जाणवत होता. Very professional. Embappe आणि Dembele हे killing combo आहे.
पण आफ्रिकन संघांनी मजा आणली या स्पर्धेत.
आज la Roja favourites. स्पेन च्या गोलीचे रेकॉर्ड भारी आहे. Lukaku मला आवडत नसला तरी एक उत्कृष्ट खेळाडू आहे. मजा येईल बघायला.
भाऊ आमच्या कडे संध्याकाळी सामना आहे.
स्पेन बेल्जियम मस्त पासिंग
स्पेन बेल्जियम मस्त पासिंग खेळताहेत. आपली इंडिया फुटबॉल टीम चांगली आहे पण मी गोल मारतो दुसऱ्याला कशाला पास द्या या मेंटलिटीमुळे मागे असावेत.
नशीब तरी थाला फुटबॉल सोडून
नशीब तरी थाला फुटबॉल सोडून क्रिकेट खेळायला लागला नाहीतर शेवटच्या दहा पंधरा मिनिटात कोणाला पासच नसता दिला. त्या कोचचा शाल नारळ देऊन सत्कार केला पाहिजे.
फॅबियन रुईझ पहिला गोल. स्पेन
फॅबियन रुईझ पहिला गोल. स्पेन १-० ने पुढे. फॅबियनची आई एकेकाळी रियल माद्रिद ग्राउंडची सफाई कर्मचारी होती.
१-१
१-१
२-१ स्पेन पुढे आहे.
२-१ स्पेन पुढे आहे.
जिंकले बाबा एकदाचे. पण
जिंकले बाबा एकदाचे. पण फ्रान्स बरोबर आता त्यांचा सामना आहे पण अवघड आहे.
कदाचित, यासीन बौनूच्या ह्या
कदाचित, यासीन बौनूच्या ह्या ख्यातीचं दडपण शूट घेताना एम्बापेवर आलं असावं !>>> नक्कीच....या बाबतीत सामना पेनल्टी मुळे थांबवण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात किती वेळानंतर खेळाडू पेनल्टी घेतो हे बऱ्याचदा परिणामावर प्रभावी ठरते, या वेळी देखील पेनाल्टी दिल्यानंतर VAR कडून कन्फर्म होईस्तोवर जवळपास एक दिड मिनिट गेले. फुटबॉल सारख्या खेळात एलीट टेक्निकल स्किल्स असलेल्या खेळाडूंचा Overthinking हा त्यांच्या मैदानावरील worst opponents पेक्षाही अधिक धोकादायक प्रतिस्पर्धी असतो.
आज सामना मस्त रंगला.
आज सामना मस्त रंगला. सुरुवातीला कंटाळवाणा झाला तरी नंतर मजा आली. उत्स्फूर्त खेळापेक्षा टेक्निकल जास्त होता. झालेले तिन्ही गोल अप्रतिम. Norway चा गोल तर came from nowhere. इंग्लंड चा पहिला गोल टीम वर्क चा आणि शेवटी brilliant Bellingham चा परिणाम. दुसरा गोल जरी गोलीची चूक असली तरी पुन्हा Bellingham at right olace right time with excellent finish. वाह मजा आ गया.
१-१ स्विस खेळाडू घाबरून
१-१ स्विस खेळाडू घाबरून खेळताहेत.
शेवटी नॉर्वे वर प्रेशर आले.
शेवटी नॉर्वे वर प्रेशर आले. आम्ही हॉलंड हॉलंड इतके गाऊन घेतले पण त्याने आज स्कोर केले नाहीच उलट तो शेवटी काही मिनिटे बाहेरच जाऊन बसला! मला इन्ग्लन्ड नको होते सेमीज ला जायला. असो.
अर्जेन्टिना सहज जिंकतील असे वाटत होते पण तेही १-१ एक्स्ट्रा टाइम मधे गेलेत. मजाच आहे आज.
Pages