फुटबॉल हा फक्त एक खेळ नाही; तो जगभरातील कोट्यवधी लोकांच्या भावना, स्वप्ने आणि अभिमानाशी जोडलेला आहे. आणि जेव्हा फिफा विश्वचषकाची वेळ येते, तेव्हा संपूर्ण जग एका उत्सवात सामील होते. 2026 चा FIFA World Cup हा इतिहासातील सर्वात मोठा आणि सर्वात रोमांचक विश्वचषक ठरणार आहे.
पहिल्यांदाच विश्वचषकाचे आयोजन तीन देशांमध्ये – अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको – करण्यात आले आहे. याशिवाय, प्रथमच 48 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यामुळे अधिक सामने, अधिक स्पर्धा आणि अधिक नाट्य अनुभवायला मिळणार आहे.
नवीन फॉरमॅट – अधिक संघ, अधिक संधी
यापूर्वी विश्वचषकात 32 संघ सहभागी होत होते. आता 48 संघांना 12 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांसोबत काही सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकाचे संघही बाद फेरीत प्रवेश करतील.
या बदलामुळे आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिकेतील अनेक देशांना पहिल्यांदाच विश्वचषकात चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत मोठे धक्के बसण्याची शक्यता अधिक आहे.
⸻
जर्मनी – पुनरागमनासाठी तयार असलेला फुटबॉलचा महाकाय संघ
मी स्वतः जर्मनीचा समर्थक असल्यामुळे माझे विशेष लक्ष या संघाकडे आहे.
जर्मनी हा विश्व फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी 1954, 1974, 1990 आणि 2014 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. त्यांच्या खेळात शिस्त, रणनीती, मानसिक ताकद आणि संघभावना यांचा अनोखा संगम दिसतो.
मात्र 2018 आणि 2022 या दोन विश्वचषकांमध्ये जर्मनी अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. दोन सलग स्पर्धांमधील निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता.
परंतु आता परिस्थिती बदललेली दिसते.
जुलियन नागेल्समन यांच्या नेतृत्वाखाली जर्मनीकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्कृष्ट मिलाफ आहे.
जर्मनीचे प्रमुख खेळाडू
• जामाल मुसियाला
• फ्लोरियन व्हिर्ट्झ
• जोशुआ किम्मिच
• काई हॅव्हर्ट्झ
• अँटोनियो रुडिगर
• लेरॉय साने
विशेषतः मुसियाला आणि व्हिर्ट्झ ही जोडी सध्या जगातील सर्वात रोमांचक युवा खेळाडूंमध्ये गणली जाते.
जर्मनीचा खेळ वेगवान, आक्रमक आणि अत्यंत संघटित आहे. जर बचावफळीने सातत्य राखले आणि आक्रमण विभागाने संधींचे गोलमध्ये रूपांतर केले तर हा संघ पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची क्षमता ठेवतो.
⸻
फ्रान्स – सर्वात धोकादायक दावेदार
जर एखादा संघ कागदावर सर्वात मजबूत दिसत असेल तर तो फ्रान्स आहे.
2018 चा विश्वविजेता आणि 2022 चा उपविजेता असलेल्या फ्रान्सकडे जगातील सर्वोत्तम प्रतिभांचा खजिना आहे.
प्रमुख खेळाडू
• किलियन एमबाप्पे
• औरेलियन त्चौमेनी
• एडुआर्डो कामाविंगा
• मायकेल ओलिसे
• विल्यम सालीबा
फ्रान्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची बेंच स्ट्रेंथ. त्यांच्या राखीव खेळाडूंनाही अनेक देशांच्या मुख्य संघात स्थान मिळू शकते.
जर एमबाप्पेने आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर फ्रान्सला थांबवणे अत्यंत कठीण ठरेल.
⸻
अर्जेंटिना – विश्वविजेत्यांचा वारसा
2022 मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने जग जिंकले.
आता मेस्सीचे युग संपत असताना नव्या पिढीवर जबाबदारी आली आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्युलियन अल्वारेझ
• लॉटारो मार्टिनेझ
• एन्झो फर्नांडिस
• अलेक्सिस मॅक अॅलिस्टर
अर्जेंटिनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा लढाऊ स्वभाव. कोणताही सामना संपेपर्यंत ते हार मानत नाहीत.
विश्वविजेतेपदाचा अनुभव असल्यामुळे हा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत जाऊ शकतो.
⸻
ब्राझील – सहाव्या तार्याचा शोध
फुटबॉल म्हटले की ब्राझील आठवतो.
पाच वेळा विश्वविजेते ठरलेला हा संघ नेहमीच आकर्षक आणि आक्रमक फुटबॉलसाठी प्रसिद्ध राहिला आहे.
प्रमुख खेळाडू
• विनिसियस ज्युनियर
• रोड्रिगो
• राफिन्हा
• ब्रुनो गुइमाराएस
ब्राझीलकडे वैयक्तिक कौशल्याची कमतरता नाही. मात्र मोठ्या सामन्यांमध्ये सातत्य राखणे हे त्यांचे मुख्य आव्हान राहिले आहे.
⸻
इंग्लंड – यावेळी स्वप्न पूर्ण होणार?
इंग्लंडकडे कदाचित जगातील सर्वात संतुलित संघ आहे.
प्रमुख खेळाडू
• ज्यूड बेलिंगहॅम
• हॅरी केन
• बुकायो साका
• डेक्लन राईस
गेल्या काही मोठ्या स्पर्धांमध्ये इंग्लंड सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र निर्णायक क्षणी त्यांना अपयश आले आहे.
2026 मध्ये ते विश्वविजेतेपदासाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
⸻
स्पेन – नव्या सुवर्णपिढीचा उदय
स्पेन पुन्हा एकदा जगाला आपल्या फुटबॉलने प्रभावित करत आहे.
प्रमुख खेळाडू
• लॅमिन यामाल
• पेड्री
• गावी
• निको विल्यम्स
तरुणाई, वेग आणि उत्कृष्ट पासिंग गेम यामुळे स्पेन कोणत्याही संघाला हरवू शकतो.
⸻
कोणता संघ देऊ शकतो मोठा धक्का?
प्रत्येक विश्वचषकात एखादा संघ सर्वांना आश्चर्यचकित करतो.
2026 मध्ये खालील संघांकडे लक्ष ठेवावे:
• पोर्तुगाल
• मोरोक्को
• नेदरलँड्स
• क्रोएशिया
• उरुग्वे
यापैकी कोणताही संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकतो.
जिंकले एकदाचे.
जिंकले एकदाचे.
हालंडची संपत्ती किती वगैरे
हालंडची संपत्ती किती वगैरे विडीओ पाहिले. गाड्या पाहिल्या. पण गेला कुठे.
Ball possession कुणाकडे किती यावरूनच अंदाज आला कोण जिंकणार.
एक क्लिप व्हायरल होते त्यात
एक क्लिप व्हायरल झाले त्यात हालंड पास मागतोय समोर कोणीच नाही एकदम सोप्पा गोल होता पण त्याला पास नाही दिला.
एकटा खेळाडू काही करू शकत नाही
एकटा खेळाडू काही करू शकत नाही.
ज्युलियन अल्वारेझ गोल हा गोल
ज्युलियन अल्वारेझ गोल हा गोल ऑफ द वर्ल्ड कप होता अप्रतिम गोल...
एकटा खेळाडू जास्त काही करू
एकटा खेळाडू जास्त काही करू शकत नाही हा डिबेटचा विषय होईल पण जाऊ दे आपण हालंडला सपोर्ट करायला पाहिजे तो आपला माणूस आहे. त्याला भारतीय पदार्थ आवडतात. गार्लिक नान, बटर चिकन, चॉपस्टिक, कोल्हापुरी तांबडा पांढरा हे त्याचे आवडते पदार्थ आहेत. हे तोच बोललाय एका व्हिडिओत.
मेस्सी खेळाडुचं वैशिष्ट्य काय
मेस्सी खेळाडुचं वैशिष्ट्य काय असा लेख फार पूर्वी वाचला होता त्यात म्हटलं होतं की कित्येक वेळा स्वतः गोल करण्याऐवजी तो दुसऱ्याला पास देतो. अशामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूंचं लक्ष त्यावर केंद्रित होत नाही, त्याला कसंही करून अडवायचं हा हेतू राहात नाही. माझेच सर्वात जास्ती गोल कसे होतील { किंवा क्रिकेटात शतकं } हा विचार खेळाडूच्या डोक्यात गेला की तो संघ हारतो.
फ्रान्स ला हरवून स्पेन फायनल
फ्रान्स ला हरवून स्पेन फायनल मधे !! अगदीच अनपेक्षित निकाल! पण स्पेन ने पूर्ण डॉमिनेट केले आज! दोन्ही गोल्स सुपर्ब!
आधी माझ्यासकट बर्याच फॅन्स ना वाटले होते यावेळी पुन्हा अर्जेन्टिना - स्पेन रीमॅच होईल पण आता वाटु लागलेय इन्ग्लन्ड - स्पेन फायनल बघायला मिळणार
पेनल्टी दुर्दैवी होती.
पेनल्टी दुर्दैवी होती. स्पेनने छानच खेळ केला. Embappe ला अजिबात खेळू दिले नाही. पण मॅच तशी कंटाळवाणी झाली.
मबाप्पे _ डम्बेले निष्प्रभ.
मबाप्पे _ डम्बेले निष्प्रभ. बॉल स्पेनकडेच होता.
फ्रान्स बाहेर गेली या
फ्रान्स बाहेर गेली या धक्क्यातून अजून सावरायचा बाकी आहे. एम्बापे काय करत होता? तो एक दोन गोल नक्की मारणार हा हिशोब धरून चाललो होतो. हायलाईट्स बघायची हिम्मत होत नाही.
आज मेस्सी जिंकावा आणि शेवटी
आज मेस्सी जिंकावा आणि शेवटी ट्रॉफी पण त्यानेच उचलावी.
शेवटच्या क्षणात गेम केला
शेवटच्या क्षणात गेम केला अर्जेंटिनाने आज पुन्हा
France vs England- for 3rd
France vs England- for 3rd spot
>>मेस्सी खेळाडुचं वैशिष्ट्य
>>मेस्सी खेळाडुचं वैशिष्ट्य काय असा लेख फार पूर्वी वाचला होता त्यात म्हटलं होतं की कित्येक वेळा स्वतः गोल करण्याऐवजी तो दुसऱ्याला पास देतो. ......>>
Submitted by Srd on 12 July, 2026 - 22:10
*कित्येक वेळा स्वतः गोल
*कित्येक वेळा स्वतः गोल करण्याऐवजी तो दुसऱ्याला पास देतो....* - मला वाचल्याचं आठवतं - फार पूर्वी आडदांडपणाने खेळण्याबद्दल नियम आतासारखे कडक नव्हते , तेंव्हा पेलेला जखमी करणं हा ब्राझील विरुद्धचा मुख्य डावपेच असायचा; पेले करिअरच्या उत्तरार्धात त्यामुळेच स्वतः गोल न करता, नेमका पास देण्याचंच काम करत असे. पेलेवर बचावफळीचं लक्ष केंद्रित असल्याने , पेलेच्या सहकाऱ्यांचं काम सोपं होत असे.
तसंच कांहींसं आता मेस्सीच्या बाबतीतही होत असावं. कदाचित, रेफरी सुद्धा मेस्सीला लक्ष्य बनवलं जाणार म्हणून त्याच्या विषयी अधिकच जागरूक असतात व पार्शियालिटीचे आरोप आमंत्रित करतात !
( स्पेन विरुद्ध फ्रान्सच्या सामन्यातही एम्बापेच्या बाबतीत हेच घडलं पण असं होणार हे ओळखून डावपेच आखण्यात कदाचित फ्रान्स कमी पडला असावा )
When I die bury me in
When I die bury me in Argentina jersey
I might be come back..... लगातार चार मॅच मध्ये अविश्वसनीय कमबॅक अर्जेंटिना जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा
When I die bury me in
When I die bury me in Argentina jersey
I might be come back..... लगातार चार मॅच मध्ये अविश्वसनीय कमबॅक अर्जेंटिना जिंदाबाद है जिंदाबाद रहेगा !!!
When I die bury me in
When I die bury me in Argentina jersey
I might be come back.....>>>> व्वा व्वा व्वा काय मस्त लाईन्स आहेत.
(No subject)
.
फेंग
*When I die bury me in Argentina jersey
I might be come back.....>>>*-
साहेब, तुम्ही फुटबॉल प्रेमी म्हणून तुमच्या निरोप समारंभात तुम्हाला अर्जेंटिनाचा ओरिजनल जर्सी द्यायचा विचार त्याचे संभाव्य परिणाम बघून आता सर्वानुमते रद्द झाला आहे !
भाऊ
भाऊ
भाऊ क-ह-र!!
भाऊ

क-ह-र!!
व्वा भाऊ व्वा आतापर्यंतचा
व्वा भाऊ व्वा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट.
भाऊ Lol
भाऊ Lol
परत येऊ नक्को. झाला ताप पुरे.
परत येऊ नक्को. झाला ताप पुरे.
भाऊकाका
भाऊकाका
अर्जेंटिनाला नेहमी कम- बॅक
अर्जेंटिनाला नेहमी कम- बॅक करूनच जिंकायची आता एवढी चटक लागलीय की फायनलमध्ये स्पेनने जर मुद्दाम त्यांना पाहिला गोल करायला दिला, तर त्यामुळेच ते आत्ता जिंकायचं सोडून लगेचच पुढच्या वर्ल्डकपमध्ये कम- बॅक करायच्या मानसिकतेत जातील ! पण हे स्पेनच्या कोचला सुचायला हवं ना, मला सुचून काय उपयोग !
आज इंग्लंड वि. फ्रान्स , बऱ्याच जाणकारांना फायनल ह्या दोघांतच होणार असं खात्रीपूर्वक वाटत होतं ! मॅच अटीतटीची होणार हे निश्चित !
साधारणपणे कमबॅक हा अतिशय
साधारणपणे कमबॅक हा अतिशय गलथान परफॉर्मन्स नंतर केलेला पराक्रम असतो. अर्जेंटिनाने पहिल्या आणि दुसर्या हाफमधे देखिल सुनियोजित हल्ले केले होते. ३-४ तर गोल होण्याच्या ताकदिचे होते, पण इंग्लंडचं नशिब जोरदार असल्याने गोलीने ते परतवुन लावले. शेवटच्या ७ मिनिटांत ब्रिट्स बहुतेक भ्रमात राहिले कि आपण आता फायनलला पोचलो, अँड दे सॉर्ट ऑफ लोअर्ड द गार्डरेल्स. त्या संधीचा फायदा अर्जेटिनाने उचलला...
राज, एकदम मान्य.
राज, एकदम मान्य.
अर्जेंटिना किंवा मेस्सीला मी यत्किंचितही कमी लेखत नाही किंवा त्यांच्या विजयाचं श्रेयही कमी मानत नाहीं. (मेस्सी तर माझा हिरो आहे ! ). जरा गंमत, एवढंच !
Pages